(९) वस्तुस्थिती अशी आहे की हा कुरआन तो मार्ग दाखवितो जो अगदी सरळ आहे, जे लोक याला मान्य करून भली कृत्ये करू लागतील त्यांना हा शुभवार्ता देतो की त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे.
(१०) आणि जे लोक परलोक जीवनाला मानत नसतील त्यांना ही वार्ता देतो की त्यांच्यासाठी आम्ही दु:खदायक शिक्षा तयार ठेवली आहे.
(११) मनुष्य अरिष्ट असे मागतो जसे भले मागितले पाहिजे. मनुष्य फारच उतावीळ ठरला आहे.६
६) मक्केतील काफिर, पैगंबर मुहम्मद (स.) यांना वरचेवर असे म्हणत असत की, ‘बस्स, आणा तो प्रकोप ज्याचे आम्हाला तुम्ही भय दाखविता’ अशा त्यांच्या मूर्खपणाच्या गोष्टीचे हे उत्तर आहे. अगोदरच्या वर्णनानंतर लगेच हे वाक्य प्रतिपादन करण्याचा हेतू या गोष्टीवर तंबी देण्याचा आहे की, मूर्खांनो! इष्ट मागण्याऐवजी प्रकोप मागता? ईशकोप जेव्हा एखाद्या राष्ट्रावर कोसळतो तेव्हा त्याची काय गत होते याची तुम्हाला काही कल्पना तरी आहे? याचबरोबर काफिरांचे जुलूम व अत्याचार आणि त्यांच्या हेकेखोरीला त्रासून कधी कधी त्यांच्यावर प्रकोप कोसळविण्याची जे मुस्लिम प्रार्थना करू लागत असत,– वास्तविक पाहता अद्याप त्याच काफिरांत असे लोकही समाविष्ट होते जे नंतर भावी काळात ईमान आणणारे आणि संपूर्ण जगात इस्लामचा झेंडा उंचावणारे होते.– अशा प्रार्थना करणार्या मुस्लिमांसाठीदेखील तंबी होती. यावर सवोच्च अल्लाह फरमावितो की मनुष्य फारच अधीर ठरला आहे. अशा प्रत्येक वस्तूची मागणी करतो तात्कालिक जिची गरज वाटू लागावी, वास्तविकपणे नंतर त्याला स्वत:च अनुभवाने कळून येते की जर त्या वेळी त्याची प्रार्थना स्वीकारली गेली असती तर ती त्याच्यासाठी इष्ट ठरली नसती.
Post a Comment