Halloween Costume ideas 2015
April 2018

- एम.आय. शेख
14 आक्टोबर 1956 साली दलित समाजाचे झालेले धर्मपरिवर्तन  नि:संशय भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मपरिवर्तन होते. या धर्मांतराला 61 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हा फार मोठा कालखंड आहे. ही योग्य वेळ आहे याबाबतीत विचार करण्याची की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धर्मांतराचा उद्देश यशस्वी झाला काय? याचा मागोवा,  बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या आठवड्यात घेण्याचा माझा मानस आहे. 
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशपातळीवर दलितांनी भाजपला भरपूर मतदान केले होते. इतके की या मतदानाच्या तुफानात बीएसपी सारखा बलाढ्य पक्ष सुद्धा भुईसपाट झाला होता. केंद्रातील भाजप सरकार दलितमित्र सरकार मानले जाते. तरी पण हे सरकार आल्यापासून अधून मधून दलित उत्पीडनाच्या घटना घडत आहेत. याची सुरूवात रोहित वेमुलाच्या आत्महत्येपासून झाली. ताजी घटना 29 मार्च 2018 ची आहे. भावनगर गुजरातमधील टेंबी तालुका उमरालामध्ये राहणार्या एका दलित युवकाला ज्याचे नाव प्रदिप राठौर (21) होते. गावकर्यांनी ठार मारले. त्याचा दोष इतकाच होता की दलित असूनही त्याने घोडा खरेदी केला होता व त्यावर बसून तो ऐटीत शेताकडे येणेजाणे करीत होता. 29 मार्च रोजी त्याचे व घोड्याचे प्रेत त्याच्या शेताजवळील रस्त्यात पडलेले आढळून आले. तत्पूर्वी गावातील सवर्णांनी त्याला घोड्यावर न बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. तो घोडा विकणारही होता. पण दरम्यान, त्याची हत्या करण्यात आली. 
जुलै 2016 मध्ये गुजरातच्याच उणामध्ये गोरक्षकांनी सात दलित तरूणांना हातपाय बांधून बेदम मारहाण केली होती. तसेच आनंद जिल्ह्यामध्ये गरबा पाहण्यासाठी आलेल्या जयेश सोलंकी नावाच्या दलित तरूणाची सवर्णांनी हत्या केली होती. तत्पूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दलित वस्त्या जाळण्यात आल्या व अनेक दलितांची हत्या करण्यात आली. त्याचा विरोध केल्याने चंद्रशेखर आजाद ’रावण’ या तरूण नेत्याला रासुखाखाली अटक करून तुरूंगात डांबण्यात आले. आजतागायत तो तेथेच आहे. 
यावर्षाची सुरूवातच भीमा कोरेगाव येथे झालेल्या दलित विरोधी दंगलीने झाली. शिवाय, 2 एप्रिलला अॅट्रॉसिटीज अॅक्टच्या तरतुदी शिथील केल्याच्या कारणावरून झालेल्या भारत बंदमध्ये 9 लोक ठार झाले. जाळपोळ करून कोट्यावधीचे संपत्ती नष्ट करण्यात आली. शिवाय, उत्तर प्रदेशच्या कासगंद जिल्ह्यातील निजामपूर गावात एक दलित वकील संजयकुमार व त्याची नियोजित पत्नी शीतल यांच्या लग्नाची वरात गावातून काढण्यासाठी सवर्णांनी कठोर विरोध करून वरात निघाल्यास दंगल होईल, अशी धमकी सवर्णांनी ऑन कॅमेरा दिली. यासंदर्भात प्राईम टाईममध्ये रविशकुमार यांनी या संबंधीचा सविस्तर रिपोर्ट नुकताच सादर केलेला आहे. 
2 एप्रिलच्या बंदच्या नंतर ज्या दलितांनी  बंदमध्ये हिरहिरीने सहभाग घेतला त्यापैकी 100 लोकांची हिटलिस्ट उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात तयार करण्यात आली व त्यातील क्रमांक 1 वर शोभापूरमध्ये राहणारा गोपीपार्या या दलित तरूणाची हत्या करण्यात आली. बाकीचे तरूण घरसोडून फरार आहेत.  
या घटनां पैकी अनेक घटना, ”पाहिजे तर मला गोळ्या घाला पण माझ्या दलित बांधवांना त्रास देऊ नका.” पंतप्रधानांनी या सुभाषितवजा दिलेल्या आर्त हाकेनंतरही घडल्या हे विशेष. थोडक्यात स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे लोटल्यावरसुद्धा आरक्षणाशिवाय दलितांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. नागरि हक्क संरक्षण कायदा 1955 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटीज अॅक्ट 1989) हे दोन्ही कायदे सुद्धा दलितांवरील होणार्या अत्याचारांना रोखू शकलेले नाहीत. 
बाबासाहेबांनी आरक्षण मिळविण्यासाठी धर्म परिवर्तन केले नव्हते तर समता व सन्मान मिळविण्यासाठी केले होते. 61 वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा जर तो उद्देश साध्य होत नसेल तर धर्मांतरांच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे कोणत्याही सुज्ञ माणसास वाटल्याशिवाय राहणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते तर त्यांनीही आपल्या या निर्णयाचा नक्कीच फेरविचार केला असता, असा विचार काही दलित बांधवांमधूनच पुढे येत आहे. म्हणून या संदर्भात शोध घेतला असता ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम’ हे छोटेसे पुस्तक माझ्या हाती लागले. ते एका दमात वाचून काढल्यावर त्यातील लेखकाचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटल्याने सदरचा लेखन प्रपंच मांडला आहे. 
सदर पुस्तकाचे लेखक आर.एस. विद्यार्थी असून त्यांनी 2010 साली हे पुस्तक लिहिलेले आहे. जे इस्लामिक पब्लिकेशन ट्रस्ट मुंबई यांनी प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकात बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या निर्णयापूर्वीची पार्श्वभूमी व निर्णयाची समिक्षा दोन्हीही गोष्टी नमूद आहेत. त्याचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणे -
आर.एस. विद्यार्थी लिहितात, हिंदू धर्माने दलित वर्गाला पशु पेक्षाही अधिक वाईट स्थितीत पोहोचविले आहे. याच कारणास्तव तो आपल्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू शकत नाहीत. पशुप्रमाणे तो चांगल्या चार्याच्या शोधाला लागला आहे. परंतु, मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आपल्या उद्देशांना तो गांभीर्याने घेत नाही. परंपरागत उच्च वर्णीयांद्वारे निरपराध दलितांवर ममतेने केल्या जाणार्या अत्याचारांना कसा पायबंद घालावा? हीच दलितांची मूळ समस्या आहे. हजारो वर्षांपासून दलितांवर अत्याचार होत आलेले आहेत. आजसुद्धा होत आहेत. अत्याचारांची सुरूवात कशी झाली आणि आजदेखील या अत्याचारांना का आळा बसत नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. 
इतिहास साक्षी आहे, या देशाचे मूळ रहिवाशी द्रविड होते. जे अत्यंत सभ्य व शांतताप्रिय होते. आजपासून जवळ-जवळ 5 ते 6 हजार वर्षापूर्वी आर्य लोक भारतात आले आणि द्रविडांवर हल्ले चढविले. फलस्वरूप आर्य आणि द्रविड या दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. चालाक आर्यांनी फसवणूक आणि कपटाचा वापर करून द्रविडांना पराजित केले व या देशाचे स्वामी झाले. या युद्धात सामिल द्रविडांचे विभाजन दोन वर्गात करता येईल. एक - ज्यांनी शेवटपर्यंत आर्यांशी लढा दिला आणि दोन - जे सुरूवातीपासून युद्धात तटस्थ राहिले किंवा युद्धात भाग घेतल्यानंतर थोड्याच वेळाच अलिप्त झाले, अर्थात लढले नाहीत. पहिल्या प्रकारच्या द्रविडांना आर्यांनी अस्पृश्य शुद्र घोषित केले आणि त्यांना अशाप्रकारे तुडविले की, ते लोक हजारो वर्षांपर्यत डोळे वर काढू शकले नाहीत. त्यांचे उद्योगधंदे बंद केले, त्यांना गावाबाहेर वस्ती करण्यास भाग पाडले आणि त्यांना इतके लाचार करून टाकले की जीवंत राहण्यासाठी त्यांना मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यासाठी भाग पाडले. जाटव, भंगी, चांभार, महार, खाटिक वगैरे याच वर्गात मोडतात. ज्यांनी युद्धात भाग घेतला नाही त्यांना स्पृश्य शुद्र घोषित करून त्यांना शांतीपूर्वक राहू दिले. कोळी, माळी, पिंजारी, पानके, मांग वगैरे या वर्गात मोडतात. (संदर्भ : पान क्र. 4 व 5).
लेखकाने डॉ.बाबासाहेबांचे म्हणणे खालील प्रमाणे आपल्या पुस्तकात नोंदविलेले आहे, ”जर तुम्हाला माणुसकीशी प्रेम असेल तर धर्मांतर करा. हिंदू धर्माचा त्याग करा तमाम दलित अस्पृश्यांच्या शेकडो वर्षांपासून गुलाम ठेवल्या गेलेल्या वर्गाच्या मुक्तीसाठी ऐक्य, संघटन करावयाचे असेल तर धर्मांतर करा. समाधान प्राप्त करावयाचे असल्यास धर्मांतर करा, स्वातंत्र्य प्राप्त करावयाचे असल्यास धर्मांतर करा, आपल्या जीवनाचे साफल्य हवे असेल तर धर्मांत करा, मानवी सौख्य हवे असेल तर धर्मांतर करा, हिंदू धर्म सोडण्यातच सर्व दलित, पददलित, अस्पृश्य, शोषित, पीडित वर्गाचे खरे हित आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.” अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा मुख्य उद्देश बाह्य शक्ती संपादन करण्यासाठी निश्चित केला होता. ही गोष्ट आम्ही कधीही विसरता कामा नये. कारण बाह्य शक्ती प्राप्त केल्यानेच दलितांवर होणार्या अत्याचारांना पायबंद घालणे शक्य होईल. या निश्चयाला क्रियान्वित करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला होता. (संदर्भ : पान क्र. 13)
पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर 1956 मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी धर्मपरिवर्तन केले होते तेव्हा भारतात मुस्लिमांची शक्ती नव्हतीच. त्याशिवाय, त्यावेळी हिंदूंच्या मनात मुस्लिम अथवा इस्लामच्या नावाने इतकी घृणा होती की, जर त्यावेळी आम्ही मुस्लिम झालो असतो तर आम्हाला गावोगावी गाजर मुळ्याप्रमाणे कापून फेकून दिले असते. या सर्व गोष्टी लक्षात घेवून त्यांनी उद्देशाच्या प्राप्तीसाठी बौद्ध धर्म स्विकारून भविष्यकाळात बुद्धीचा उपयोग करण्याचा संकेत देऊन, दलित वर्गाच्या मुक्तीचा खरा मार्ग मोकळा करून एकूण महान कार्य केले होते. परंतु, दुर्देवाने केवळ एक महिना 22 दिवस लोटले की 6 डिसेंबर 1956 रोजी ते परलोकवासी झाले. 
अशाप्रकारे बाबासाहेब हे पाहूच शकले नाही की त्यांनी आपल्या या लोकांना जे की, महान व्याधीने पिडले होते, त्यांना जे रामबाण औषध दिले होते, ते त्यांना लागू तरी पडले काय? किंवा त्याची रिअॅक्शन तर आली नाही. 
बौद्ध धर्म स्विकारून आम्ही आपल्या उद्देशप्राप्तीमध्ये किती यशस्वी झालो यासंबंधी बाबासाहेबांद्वारा निर्धारित कोणताही धर्म स्विकारण्याचा उद्देश दलित वर्गाला बाह्यशक्ती प्राप्त करून देणे असला पाहिजे. म्हणून आम्हाला हे पाहिले पाहिजे की, बौद्ध धर्म स्विकारल्यामुळे दलित वर्गाला बाहेरील शक्ती किती मिळाली? काही मिळाली की अजिबात नाही? अथवा या धर्माचा स्विकार केल्याने आमची मूळ शक्ती देखील काही कमीतर झाली नाही? (संदर्भ : पान क्र. 15). 
बाबासाहेबांच्या अनुयायांनी प्रथम हे समजून घेतले पाहिजे की, बाबासाहेबांनी ठरवून दिलेल्या धर्मांतराचा उद्देश बाह्य शक्ती प्राप्त करणे होता. बाह्यशक्तीचा अर्थ विदेशी शक्ती नव्हे तर भारतात विद्यमान असलेल्या दुसर्या समाजाची शक्ती होय. जी शक्ती प्राप्त करण्यासाठी आम्हाला पूरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. बौद्ध धर्मरूपी परम औषधी घेतल्याने जो विकार आणि उपद्रव आमच्या समाजात उत्पन्न झालेले आहेत, सर्वप्रथम ते शांत केले पाहिजेत. आणि या बौद्ध धर्मरूपी परम औषधीच्या जागी एखादा अन्य धर्म स्विकारावा, जेणेकरून आम्ही आमच्या धर्मांतराचा उद्देश प्राप्त करून अत्याचारापासून मुक्ती प्राप्त करावी. बाबासाहेब यासाठी प्रयत्नशील होते की, माझ्या दलित बांधवांना हिंदूंच्या जुलूमापासून मुक्ती मिळावी. त्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता की, या रोगीरूपी दलित वर्गाला विशिष्ट औषध अर्थात बौद्ध धर्मच दिला पाहिजे, मग गुण येवो की न येवो. म्हणून एकदा तर त्यांनी असे सांगितले होते की, ”जर मी आपल्या अस्पृश्य बांधवांना अत्याचारापासून मुक्त केले नाही तर  स्वत:ला गोळी घालून आत्महत्या करेन” अशी होती त्यांची भीष्म प्रतिज्ञा. अशा प्रकारे हे स्पष्ट झाले आहे की, आज जर बाबासाहेब जीवंत असते तर निश्चितपणे त्यांनी बौद्ध धर्म सोडून एखादा अन्य धर्म स्विकारण्यास सांगितले असते. परंतु, बाबासाहेब आमच्यामध्ये नाहीत. म्हणून तर आज आम्हाला त्यांनी निश्चित केलेल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी व स्वत:ला अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी बौद्ध धर्माचा त्याग करून एखादा अन्य धर्म स्विकारावा लागेल. (संदर्भ : पेज नं. 19-20).
आम्ही हे पाहिलेच आहे की, बौद्ध धर्माचा स्वीकार ज्या उद्देशासाठी केला होता त्यात तो सपशेल निष्फळ ठरला आहे. म्हणून असा प्रश्न उद्भवतो की, कोणता धर्म आता स्वीकारावा? यासाठी आम्ही हे पाहिले पाहिजे की, बाबासाहेब बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोण-कोणत्या धर्मांना चांगले आणि योग्य मानत होते. त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माची खूप प्रशंसा केलेली आहे. आणि म्हटले आहे की, माणसाची माणुसकीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या मुळाशी आहे. (संदर्भ : पान क्र. 22). 
आम्हाला आमच्या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीचा शोध घेतांना हे पाहिले पाहिजे की, लक्षावधी गावांत दररोज आमच्यावर तर्हेतर्हेचे अत्याचार कोठे न कोठे होतच असतात. म्हणून आम्हाला त्याच लक्षावधी गावातील मदत करणारे गावकरी पाहिजेत. आम्हाला रूपया पैशांची मदत करणारे नकोत. आम्हाला क्रूरतेने कत्तल करणार्याचे, हात धरणार्या मदतनीस-मार्शलची गरज आहे. जेणेकरून सर्वप्रथम अत्याचार्यांपासून आमच्या जीवाचे रक्षण होईल. (संदर्भ : पेज नं.23).
धर्म अधिक चांगले जीवन जगण्याची कला आहे. जगात याची तीन रूपे आढळतात. एक - घोर ईश्वरवादी, दोन - घोर नास्तीक आणि तीन - बुद्धीपरक ईश्वरवादी. पहिल्या प्रकारचे लोक माणसाला काहीच महत्व देत नाहीत. दुसर्या प्रकारचे लोक माणसालाच सर्वकाही मानतात. हे दोन्ही अतिरेकी मार्ग आहेत. इस्लाम तीसरा मध्यम मार्ग आहे. जो ईश्वरावर विश्वासही ठेवण्यास सांगतो आणि माणसालाही महत्व देतो. तो म्हणतो की सार्या जगाप्रमाणे अल्लाहने माणसाची देखील निर्मिती केलेली आहे. परंतु, अल्लाहने माणसाला स्वातंत्र्य दिलेले आहे. माणसाने आपल्या इच्छेप्रमाणे बरे-वाईट कर्म करावेत, अशा प्रकारे आपल्या कर्मांना मनुष्य स्वत:च जबाबदार आहे. अल्लाह नव्हे. अल्लाह असे म्हणत नाही की, निर्बलांवर अत्याचार करा, त्यांचे शोषण करा, त्याने तर अशा अत्याचार पीडितांशी सहानुभूतीचा आदेश दिलेला आहे. आम्ही ईश्वराला मानायचे यासाठी सोडून दिलेले होते की, हिंदू धर्मात सांगितले आहे की, मनुष्य जे कर्म करतो ते ईश्वराच्याच आज्ञेने करतो. अशाप्रकारे अत्याचार करणार्यांचा कोणताही दोष असत नाही. हे ईश्वरवादी तत्वज्ञान आम्हाला पसंत नव्हते. (संदर्भ : पान क्र. 24). 
दूसरीकडे आम मुस्लिमांनी मानवी आधारावर अस्पृश्य लोकांना सदैव काही ना काही मदत केलेली आहे. जेव्हा धर्म बदलण्याची गोष्टही निघालेली नव्हती. तेव्हा सुद्धा मुस्लिमांनी अस्पृश्यांना मदत केली. महाडच्या आंदोलनात जेव्हा मंडपाकरिता कोणीही जागा दिली नव्हती तेव्हा मुस्लिमांनीच जागा दिली होती. 
दुसर्या गोलमेज परिषदेत भारतीय पुढार्यांमध्ये भरपूर वादविवाद झाले. अस्पृश्यांच्या मागणीला तुडविण्यासाठी गांधींनी जीनांशी गुप्त करार करण्याचा प्रयत्न केला. गांधी जीनांना म्हणाले, ” जर माझ्याशी हात मिळवणी करून तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध केला तर मी तुमच्या सर्व अटी मानण्यास तयार आहे.” परंतु, जीनांनी ही गोष्ट मान्य केली नाही. त्यांनी सांगितले की, ” आम्ही स्वत: अल्पसंख्यांक असल्यामुळे विशेषाधिकाराची मागणी करीत आहोत. अशा स्थितीत आम्ही दुसर्या अल्पसंख्यांकांच्या मागणीला कसा विरोध करू शकू.” (संदर्भ : पुना पॅक्ट गांधींच्या नावे, लेखक शंकरानंद शास्त्री पान क्र.13).
बाबासाहेबांनी म्हटले आहे की, ”ख्रिश्चन व इस्लाममध्ये जी समानतेची शिकवण दिली गेलेली आहे तिचा संबंध विद्या, धन-दौलत, चांगला पोशाख आणि शौर्य यासारख्या बाह्य कारणांशी नाही. माणसातील माणुसकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हाच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा पाया होय. हीच शिकवण हे दोन धर्म देतात.” 
”धार्मिक संबंधांमुळे तुर्कांचे गठबंधन अरबांशी राहिले. इस्लाम धर्माचा संयोग मानवतेसाठी अत्यंत प्रबळ आहे. ही गोष्ट जगजाहीर आहे. इस्लामी बंधुत्वाच्या दृढतेशी कोणताही अन्य सामाजिक संघ स्पर्धा करू शकत नाही.” (संदर्भ : पाकिस्तान अथवा भारताचे विभाजन, लेखक डॉ. आंबेडकर पान क्र. 244).
”जेथे हिंदू आपल्या सामाजिक कुरीतींच्या चिखलात अडकून पतनाकडे जात आहेत आणि रूढीवादी आहेत तेथे भारताचे मुस्लिम त्या वाईट गोष्टींच्या विरूद्ध आहेत आणि हिंदूंच्या तुलनेत ते अधिक प्रगतीशील आहेत. जे लोक मुस्लिम समाजाला अगदी जवळून जाणतात त्यांच्यासाठी उक्त प्रभावाचा प्रसार त्यांना आश्चर्यचकीत करतो” (संदर्भ : पाकिस्तान अथवा भारताचे विभाजन, लेखक डॉ. आंबेडकर पान क्र. 253).
मुस्लिमात देखील जातीयवाद आहे काय?
जरी ख्रिश्चन आणि मुस्लिमात जातीभेद असले तरी ते हिंदूमधील जातीभेदांसारखे नाहीत. या दोहोंत फार मोठे अंतर आहे. त्यांच्यातील जातीभेद त्यांच्या समाजाचे प्रमुख अंग नव्हेत. त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात तर ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन हेच उत्तर देतील. आणि या उत्तराने प्रश्न विचाराचे समाधान देखील होईल. तू कोणत्या जातीचा असे विचारण्याची कोणालाही गरज भासणार नाही. परंतु, आपण एखाद्या हिंदूला विचारले की तुम्ही कोण आहात? तो उत्तर देतो की मी हिंदू आहे तर याने कोणाचेच समाधान होणार नाही. मग पुन्हा प्रश्न विचारणे भाग पडते की तुमची जात कोणती? जोपर्यंत तो आपल्या जातीचे नाव घेत नाही तोपर्यंत कोणासही त्याच्या वास्तविक स्थितीचा पत्ता लागणार नाही. यावरून हे स्पष्ट होते की, हिंदू समाजात जाती-पातीला किती प्राधान्य दिले गेलेले आहे आणि ख्रिश्चन व मुस्लिम समाजात जातीला किती गौन स्थान दिलेले आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जातीभेदाच्या मुळात त्यांचा धर्म नाही. (संदर्भ : पान क्र. 28).
वरील विवेचनावरून स्पष्ट झाले आहे की, मुस्लिमामधील जात-पात केवळ सोयीसाठी आहे. मत्सर, द्वेष अथवा तिरस्कारासाठी नाही. तरीसुद्धा याला दोष म्हणून पाहिले तरी मुस्लिमामध्ये जातीभेद इतका खोलवर रूजलेला नाही जितका हिंदूमध्ये रूजलेला आहे. याचे कारण म्हणजे इस्लाममध्ये जातीवादाला स्थान नाही. याउलट हिंदूमध्ये जातीयवाद त्यांच्याच धर्माचा अभिन्न भाग आहे. 
जर आमच्या लोकांना चांभार म्हणून संबोधले असते आणि पूर्ण प्रेम आणि मान दिला असता तर त्यात आम्हाला कसला त्रास झाला असता? ब्राह्मणांचा क्षत्रीय अथवा वैश्यांना कोठे त्रास आहे? क्षत्रीयांकडून ब्राह्मण आणि वैश्य कोठे दुखी झालेले आहेत? याउलट ब्राह्मण क्षत्रीय आणि वैश्य लोक तर सहृदयतेने आणि सहयोगाने एकमेकांसोबत राहतात. (संदर्भ : पान क्र. 29). 
आर.एस. विद्यार्थी यांचे हे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित व विमल किर्तीद्वारा अनुवादित ’दलित वर्ग को धर्मांतर वर्ग की आवश्यकता क्यूं है?’ या सन 1978 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाला आधारभूत माणून लिहिले गेलेले आहेत. 
सतत होत असलेल्या अत्याचाराने पीडित दलित समाजामध्ये अशा प्रकारचे पुनर्धमांतराचे विचार अलिकडे उघडपणे व्यक्त केले जात आहेत. पुस्तकाच्या माध्यमातून आर.एस. विद्यार्थी यांनी तेच विचार मांडलेले आहेत. ते डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त वाचकांच्या नजरेत आणून द्यावेत, एवढाच या लेखामागचा उद्देश्य आहे.

- नौशाद उस्मान, औरंगाबाद
तिहेरी तलाकविरोधी कायद्यांमुळे महिला फार खुष असून तलाकचा आग्रह फक्त पुरूषी मानसिकता असणारेच करतात, असा कांगावा काही अतिपुरोगामी आतापर्यंत करत आलेले आहेत. याचा फायदा मुस्लिमविरोधी राज्यकर्तेही घेत आहेत आणि आपण कसे सुधारणावादी आहोत याचा डांगोरा पिटत आहेत. याची जाहिरात करणारी एक चित्रफीतही ते सध्या फिरवत आहेत. अशाप्रकारे आपण वापरले जात असल्याचे भानही या अतिपुरोगाम्यांनी राहिलेले नाहिये. त्यांना चपराक दिली आहे देशभरात निघणार्या मुस्लिम महिलांच्या शरियतसमर्थक मोर्च्यांनी. तलाक हा अत्याचार नसून अत्याचारापासून मूक्तीचा मार्ग आहे आणि याचा कुठे अपवादात्मक गैरउपयोग होत असेल तर ते आम्हीच प्रबोधनाद्वारे करू, सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची मुळीच गरज नाहीये, तसेच नवर्याला तुरूंगात पाठवून लेकरांना असहाय करणारा, त्यांना शिक्षणापासून वंचित करणारा हा नियोजित कायदा आमच्यावर अत्याचार करणारा असल्याचं त्या बेधडक सांगत आहेत.  यामुळे बरेच सत्ताधारीसमर्थक तोंडघशी पडले असून ते जाम खवळले आहेत. 
तेंव्हा मराठा मोर्चांना जसे बदनाम करण्याचा काही वृत्तपत्रांनी प्रयत्न केला तसाच प्रयत्न या मुस्लिम महिला मोर्चांविषयी केला जातोय. काही वृत्तपत्रे पुरूषच बुरखा नेसून मोर्चे काढत असल्याची व्यंगचित्रे काढत आहेत, तर काही पत्रकार मुद्दामून काही अल्पशिक्षित महिलांना निवडून त्यांना विधीशास्त्रातले कायदेविषयक अवघड प्रश्न विचारून त्यांना भांबावून सोडत आहेत आणि नंतर असा जावई शोध लावत आहेत की, त्या महिला पढवून आल्या आहेत, स्वत:हून आलेल्या नाहियेत. म्हणजे मुस्लिम महिला मुर्ख असतात, त्यांना पढवूनच आणावं लागतं, त्यांना स्वत:चे विचारच नसतात, त्यांचं ब्रेन वॉश केलेले असते, अशी सावरासारव आता अतिपुरोगामी करत आहेत. हाच कावा हादिया प्रकरणात इस्लामद्वेष्ट्यांनी केला होता की, ती ब्रेनवॉश केलेली आहे.  पण हाच आरोप त्या अतिपुरोगाम्यांवरही केला जाऊ शकतो, ज्यांना कुरआनाचे चार श्लोक नीट वाचता येत नाही अन् त्या कुरआनविरोधी वक्तव्य करत असतात.
मूळात या अतिपुरोगाम्यांना महिलांसाठी काहीही करायचं नसते तर सत्ताधार्यांना अप्रत्यक्ष अनुकूल ठरतील, खरे मुद्दे बाजुला राहतील याची केलेली ती सुनियोजित सोय असते. सर्वच तसे नसले तरी काही तथाकथित स्वयंसेवी संस्थांच्या आंदोलनांचे अर्थशास्त्र तपासून पाहिल्यावर हा जळफळाट का होतोय, ते स्पष्ट होते.

- राम पुनियानी
अलिकडे अनेक दलित संघटना, उत्तर प्रदेश सरकारद्वारे त्यांच्या अधिकारिक अभिलिखानमध्ये भिमराव आंबेडकर नावासमोर रामजी शब्द जोडण्याचा विरोध करीत आहेत. ही गोष्ट खरी आहे की, संविधान समितीच्या अध्यक्षाच्या रूपात डॉ. आंबेडकरांनी , तयार झालेल्या संविधानाच्या प्रतीवर केलेल्या सहीत भिमराव रामजी आंबेडकर असे लिहिलेले होते. परंतु, साधारणपणे त्यांचे नाव लिहितांना रामजी हा शब्द लिहिला जात नाही. तांत्रिकदृष्ट्या उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकत नाही. परंतु, हे ही म्हणणे चुकीचे नाही की, हा निर्णय आंबेडकरांना ’आपला’ घोषित करणार्या हिंदूत्ववादी राजकारणाचा हा एक भाग आहे. भाजपासाठी भगवान राम तारणहार आहेत. त्यांच्या नावाचा उपयोग करून भाजपाने समाजाला धार्मिक आधारावर धु्रवीकृत केले. मग तो राम मंदिरचा मुद्दा असेल, राम सेतूचा किंवा मग रामनवमीच्या पूर्वसंध्येला जाणून बुजून घडवून आणलेली हिंसा असेल. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आपण भारतामध्ये दोन विरोधाभासी प्रवृत्तींचा उत्कर्ष होताना पाहतो. एकीकडे दलितांविरूद्ध अत्याचार वाढलेले आहेत. दुसरीकडे आंबेडकर जयंती उत्सव अधिकाधिक ताकदीने साजरे केल्या जात आहेत आणि हिंदू राष्ट्रवादी एकसारखे आंबेडकरांचे स्तुतीगान करीत आहेत. 
या सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात आपण दलितांवर झालेल्या अत्याचाराची अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत. आय.आय.टी. मद्रास मध्ये पेरियार स्टडीसर्कलवर सर्वात अगोदर प्रतिबंध लावला गेला. रोहित वेमुला याची संस्थागत हत्या झाली. गुजरातच्या उना मध्ये दलितांवर घोर अत्याचार केले गेले. मे 2017 मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सहारणपूरमध्ये हिंसा भडकाविली गेली आणि त्यात मोठ्या संख्येत दलितांची घरे जाळली गेली. दलित नेता चंद्रशेखर रावणला जमानत मिळाल्यानंतरही अद्याप तो जेलमध्ये आहे. कारण त्याच्यावर आरोप आहे की, त्यांनी ती हिंसा भडकाविली. दलितांची घरे जाळण्याची घटना भाजपा खासदाराच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीनंतर झाली. ज्या मिरवणुकीत, ” यु.पी. में रहेना होगा तो योगी-योगी कहेना होगा” व ’ जय श्री राम’ हे नारे आक्रमक स्वरूपात लावले गेले. महाराष्ट्रातील भीमा-कोरेगावमध्ये दलितांविरूद्ध हिंसा भडकविली गेली. यासंबंधी प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे रास्त आहे की, हिंसा भडकाविणार्या मुख्य कर्ता-धर्ता भिडे गुरूजीला अजून अटक झालेली नाही. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्ही.के. सिंग यांनी 2016 मध्ये दलितांची तुलना कुत्र्यांशी केली होती व अलिकडेच एक अन्य केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीही असेच म्हटलेले आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरला जेव्हा योगी आदित्यनाथ मुशहर जातीच्या लोकांच्या भेटीला जात होते तेव्हा त्यांच्या भेटीपूर्वी स्थानिक अधिकार्यांनी दलितांमध्ये साबनाच्या वड्या आणि शॅम्पू वाटप केले जेणेकरून ते अंगोळ-पाणी करून स्वच्छ राहतील! 
मोदी-योगी पद्धतीच्या राजकारणाच्या मुळाशी असलेले तत्वज्ञान, निवडणुकांमध्ये आपले हित साध्य करण्याच्या आतुरतेमुळे हे सगळे घडत आहे. खरे पाहता योगी-मोदी आणि आंबेडकर यांच्या मुल्यांमध्ये मुलभूत फरक आहे. आंबेडकर भारतीय राष्ट्रवादाचे पक्षधर होते आणि जाती व्यवस्थेचे उन्मूलन करू पाहत होते. त्यांचा असा विश्वास होता की, जाती आणि अस्पृश्यतेची मूळे हिंदू धर्मग्रंथात आहेत. त्याच मुल्यांना नकारण्यासाठी आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. त्यांनी भारतीय संविधानाचे निर्माण केले, जे स्वाधिनता संग्रामाच्या वैश्विक मुल्यांवर आधारित होते. भारतीय संविधानाचा मूळ आधार स्वातंत्र्य, समता व बंधुत्व व सामाजिक न्याय ही मुल्य होत. दूसरीकडे हिंदू महासभा सारखी संस्था होती. जिचा पाया हिंदू राजा आणि हिंदू जमीनदारांनी मिळून रचला होता आणि हे लोक भारताला त्याच्या गौरवशाली भूतकाळात परत घेऊन जाण्याची भाषा बोलत होते. त्या भूतकाळात जेथे वर्ण आणि जातींना ईश्वरकृत समजले व मानले जात होते. हिंदुत्ववादी राजकारणाचे अंतिम उद्देश आर्यवंश आणि ब्राह्मणी संस्कृतीवर आधारित हिंदू राष्ट्राचे निर्माण आहे. संघ याच राजकारणाचा पक्षधर आहे. 
माधव सदाशिव गोळवलकर व अन्य हिंदू चिंतकांनी आंबेडकरांच्या विपरीत हिंदू धर्मग्रंथांना मान्यता दिली. सावरकरांचे म्हणणे होते की मनुस्मृती हाच हिंदूंचा कायदा आहे. गोळवलकर यांनी मनुला जगाचा सर्वश्रेष्ठ विधीनिर्माता म्हणून निरूपित केले होते. त्यांचे म्हणणे असे होते की आणि जे पुरूष सुक्तामध्ये म्हटलेले आहे की, सूर्य आणि चंद्र ब्रह्माचे डोळे आहेत आणि सृष्टीची निर्मिती त्याच्या नाभीतून झालेली आहे. ब्राह्मण हे ब्रह्माच्या डोक्यातून उपजले, हातातून क्षत्रीय, जांगेतून वैश्य आणि पायातून शुद्र. याचा अर्थ असा की, ते लोक जे या चार स्तरांमध्ये विभाजित आहे तेच हिंदू आहेत. 
भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर संघाच्या मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये एक संपादकीय लिहून राज्यघटनेची घोर निंदा केली गेली होती. संघ अनेक वर्षांपासून म्हणत आलेला आहे की, भारतीय राज्यघटनेमध्ये अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. अलिकडेच केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी याच बाबीची पुनरावृत्ती केली होती. डॉ.आंबेडकरांनी जेव्हा संसदेमध्ये हिंदू कोडबिल सादर केले होते तेव्हा त्या बिलाचा जबरदस्त विरोध झाला होता. दक्षीणपंथी शक्तींनी आंबेडकरांची घोर निंदा केली होती. परंतु, आंबेडकर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. ते म्हणाले, ” तुम्हाला फक्त शास्त्रांचाच नव्हे तर शास्त्राधारित सत्तेलाही नाकारावे लागेल. जसे की, गुरूनानक आणि गौतम बुद्धांनी नाकारले होते. तुमच्यामध्ये एवढे धाडस असायला हवे की तुम्ही हिंदूंना हे समजावून सांगू शकाल की, त्याच्यात जे काही चुकीचे आहे तोच त्यांचा धर्म आहे. तोच धर्म ज्याने जातीच्या पावित्र्याच्या धारणेला जन्म दिला आहे. ”
आज काय चालले आहे? आज प्रत्यक्षात जातीप्रथेला औचित्यपूर्ण ठरविले जात आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परीषदेचे अध्यक्ष वाय.सुदर्शन यांनी अलिकडेच म्हटले होते की, इतिहासामध्ये जातीप्रथेविरूद्ध कधीच कोणी तक्रार केलेली नाही आणि याच प्रथेने हिंदू समाजाला स्थायीत्व दिलेले आहे. एस.सी.एस.टी. अत्याचार निवारण कायद्याला कमकुवत करणे आणि विद्यापीठांमधून या व ओबीसी वर्गातील पदांमधील आरक्षण संबंधी नियम बदलून टाकणे या गोष्टी सामाजिक न्याय तत्त्वावर आणि डॉ. आंबेडकरांवर केलेला सरळ हल्ला आहे. 
जशी-जशी हिंदू राष्ट्रवादाची आवाज बुलंद होवू लागलेली आहे. त्या समक्ष ही समस्याही उत्पन्न होत आहे की, ते दलितांच्या सामाजिक न्याय हस्तगत करण्याच्या महत्त्वकांक्षेला तोंड कसे द्यायचे. हिंदू राष्ट्रवादी राजकारण, जातीय आणि लैंगिक पदक्रमावर आधारित आहे. या पदक्रमाचे समर्थन आरएसएसचे चिंतक व संघ परिवारातील नेते करत आलेले आहेत. त्यांच्यासमोर प्रश्न हा आहे की, ते दलितांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करू इच्छित नाहीत. परंतु, त्यांना निवडणुकीमध्ये त्यांची मत हवी असतात. म्हणूनच ते एकीकडे दलितांचे नायक बाबासाहेब आंबेडकर यांना आपला सिद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न करतात तर दुसरीकडे दलितांना आपल्या झेंड्याखाली गोळा करण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. त्यांची इच्छा आहे की, दलित, भगवान राम आणि पवित्र गायीवर आधारित त्यांच्या कार्यक्रमाला स्विकार द्यावा. 
हा एक विचित्र कार्यकाळ आहे. ज्यात एकीकडे त्या सिद्धांतांची आणि मुल्यांची अवहेलना केली जात आहे. ज्यांच्यासाठी डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि दुसरीकडे त्यांची अभ्यर्थनाही होत आहे. अलिकडे तर आंबेडकरांच्या नावाचा उपयोग हिंदूत्ववादी लोक श्री रामच्या आपल्या राजकारणाला गती देण्यासाठीही करू इच्छित आहेत. (इंग्रजीतून हिंदीत भाषांत अमरिश हरदेनिया, हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख)

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
दारुल अद्ल” संकल्पनेच्या मुळाशी बरनीचे आर्थिक समानतेचे तत्व प्रेरणादायी ठरले आहे. अल्लाउद्दीन खिलजी बाजारातील मुल्य नियंत्रीत राहवेत म्हणून दक्ष होता. त्याने बाजारातील मुल्यांचा दैनंदीन अहवाल मागवण्यास सुरुवात केली. एसामी म्हणतो,“ बाजारातून रोज सुर्य मावळल्यानंतर, हरकारे ( बरीद ) अन्नधान्याच्या विक्रीमुल्याची वार्ता आणत. हे सर्व विक्रीमुल्य सुलतानांच्या समोर पठण केले जात. एक - एक करुन प्रत्येक संध्याकाळी.”15 अल्लाउद्दीन खिलजीने बाजारमुल्यासंदर्भात दक्षता बाळगल्यामुळचे नैसर्गिक संकटात देखील सामान्य रयत सुखा समाधनाने जगत होती. ह्या संपूर्ण बाजारमुल्य नियंत्रणाच्या प्रक्रीयेबद्दल बरनीने विस्ताराने लिखाण केले आहे. ह्या इतिहासाव्यतिरिक्त त्याने स्वतंत्र मुल्यं देखील सांगितली आहेत. बाजारमुल्यावर नियंत्रण करण्यासाठी बादशाहने काय करावे? दुष्काळ पडल्यानंतर बादशाहची कोणती कर्तव्ये आहेत ? वस्तूंचे मुल्य कमी झाल्यानंतर कोणते फायदे होतात ? हे सर्व फतुहाते जहांदारीच्या माध्यमातून बरनीने मांडले आहे. 
दुष्काळ पडल्यानंतर बादशहाची कर्तव्ये आणि 
साठेबाजारी रोखण्याचे उपाय
दुष्काळ पडल्यानंतर मध्ययुगीन समाजाचे पूर्ण जीवनमान विस्कळीत व्हायचे. महसूल संकलन ठप्प झाल्याने राजव्यवस्था देखील कोसळून पडायची. अशा परिस्थितीत बादशहाची कोणती कर्तव्ये आहेत. हे बरनीने सांगितले आहे. बरनी म्हणतो, “ दुष्काळाच्या वेळी जे दैवी संकट आहे, आणि जेंव्हा वर्षा होत नाही तथा कृषी आणि अन्नधान्याची अत्याधिक हानी व्हायला लागते तेंव्हा अशा स्थितीत बादशाह कडे प्रजेच्या सहाय्यतेशिवाय अन्य कोणतेच उपाय असत नाहीत. बादशाहकडे खराज आणि जजिया मध्ये कमी करणे तथा खजिन्यातून सहाय्यता प्रदान करण्याशिवाय अन्य कोणतेही मार्ग नसते. ” अशा काळात देखील साठेबाजारी (बरनीने यासाठी मुळ पाठात एहतेकार हा शब्द वापरला आहे.) करण्यासाठी काही लोक प्रयत्नशील असतात. त्यामूळे बाजारात वस्तूंचे मुल्य वाढते. त्यावेळी मुल्य कमी करण्यासाठी यथासंभव प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बरनी लिहतो. 16
“ राज्यव्यवस्था आणि शासन संबधी कार्यात अन्न (अन्नधान्य) तथा कपड्यांची सुगमता (अन्न व वस्त्र) ह्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्या राज्याची सुंदर व्यवस्था तथा न्यायाला सामग्रीच्या स्वस्त होण्याशी संबधित समझा. बाजारातील गुमाश्ते 17, शहरातील शहन आणि कोतवालांना आदेश द्या की,  राजधानीत ऐहतेकार (साठेबाजारी ) कधी होउ देउ नका. ऐहतेकार करणार्यांचे अन्न जाळून टाका. मुहम्मद साहेब (प्रेषित स.) ऐहतेकार करणार्यांचे अन्न जाळून टाकत असत. ” 18
क्रय विक्रयावर नियंत्रण
बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या उपायासंबधी बरनी लिहतो, “रईसांना आदेश द्या की, बाजारवाल्यांना त्यांनी आपल्या नियंत्रणात ठेवावे. आणि बाजाराचे भाव बाजारवाल्यांच्या हातात राहू देउ नये. भाव निश्चित करणे आणि क्रय विक्रय संबंधी कार्यात अत्याधिक प्रयत्नशील राहायला हवे. ह्या महान कार्यात ज्यामुळे खास आणि आम लोकांना लाभ प्राप्त होत राहतो, त्यात कमी करु नये. आणि कोणत्याही प्रकारचे लोभ करु नये. मुल्य निश्चित करण्याच्या कार्याला साधारण कार्य समजू नये. अनभिज्ञ, ग्रामीण, नाबालीग ( सज्ञ न झालेले किंवा वयात न आलेले), ग्रामीण, असहाय तथा वृध्द क्रय विक्रय करणार्यांची  सहाय्यता करत रहावी. क्रय विक्रयात न्याय करत रहा. आधिक मुल्यावर वस्तू विकणारे तथा त्या लोकांना जे एखादी वस्तू वेगळी असून वेगळीच महती सांगून विकतात. नानाप्रकारे अपमानित करुन दंड करा. बाजारी, नक्काल, शिल्पकारांना दीन -दु:खी, बालक, अनभिज्ञ लोकांवर अन्याय करु देउ नका. 
जे लोक आपल्या कौडीला रत्न तथा रत्न विकणार्याला कौडी विकणारा म्हणतात त्यांना बादशाह जर आपले आधिकार तथा शक्ती असतानाही, दीन-दु:खी, दरिद्री तथा शक्तीहीन,बालक तथा अनभिज्ञ लोकांवर अत्याचार करण्यापासून रोखत नसेल आणि त्यांना ह्या गोष्टीची अनुमती देत असेल तथा न्याय करत नसेल तर त्याला इश्वराची सावली म्हणू नये.19 बादशाह क्रय विक्रयाशी संबधित जे मार्ग निश्चित करतो राज्याचे आधिकारी तथा प्रजाजन त्यावर चालतात. ”20
मुल्य कमी झाल्याने होणारे लाभ
मुल्य कमी झाल्याने कोणते लाभ होतात ह्यावर बरनी म्हणतो, “ तुम्हाला हे ज्ञात असावे की, सामग्रीचे मुल्य कमी होण्यात मोठे लाभ आहेत. प्रथम लाभ हे आहे की, ज्या राजधानीत तथा प्रदेशात अन्न आणि जिविकेच्या संबंधी सामग्री, कपडे, घोडे तथा सैन्याची सामान ह्यांचे मुल्य कमी असते तेथे सेने समग्रपणे एकत्रित होउ शकते. सेना जी बादशाहीचे भांडवल आहे. प्रजेची रक्षक आहे. शीघ्र सुव्यवस्थीत होते आणि सुव्यवस्थीत राहते. त्यामूळे बादशाह सेना आणि सर्वांनाच लाभ मिळतो. 
दुसरा लाभ हा होतो की, मुल्य कमी झाल्याने बादशाहच्या राजधानीत अत्याधिक बुध्दीमान , कलाकार तथा शिल्पी एकत्र होतात. ह्यामूळे जे लाभ बादशाह आणि प्रजेला होतात ते कोणापासून लपलेले नाहीत. 
तृतीय लाभ हा आहे की, जेंव्हा विरोधी, शत्रू, बादशाहच्या कार्याचे प्रभाव सैन्याची दृढता, आराम तथा निश्चिन्तता च्या विषयात ऐकतो तेंव्हा त्या राज्यावर आधिकार मिळवण्याच्या कुत्सीत विचारांचे त्याच्या हृदयातच अंत होते. त्याठिकाणी आतंक भय आरुढ होते. त्यामूळे राजाला आणि प्रजेला लाभ होतो.   
चतुर्थ हे की, प्रजेच्या जीवीकेसंबंधी वस्तू स्वस्त झाल्याने हे लाभ होते की, यामूळे बादशहाची ख्याती होते. आणि हि ख्याती वर्षानुवर्षे लोकांच्या जीभेवर राहते. अन्न तथा जीवीकेसंबधी वस्तू झाल्याने लोकांची एक दुसर्या प्रतीची इर्ष्या समाप्त होते. आणि प्रत्येक दिशेला प्रफुल्लता, संपन्नता आणि परोपकार दृष्टीगत होउ लागतो. बेईमानी आणि एहतेकारीमुळे ( साठेबाजीमुळे) खूप थोड्या बेईमान लोकांच्या घरात संपन्नता राहते.आणि सहस्त्र खेरदीदारांच्या घरी अव्यवस्था निर्माण होते. साठेबाजी करणार्या तथा आधिक मुल्य घेणार्यांच्या प्रती सर्वसामान्यांच्या हृदयात सर्वदा प्रतिकाराची भावना जागृत राहते. ”21 यापध्दतीने जियाउद्दीन बरनीने वस्तू स्वस्त झाल्यानंतर होणारे लाभ म्हणून 10 मुद्दे मांडले आहेत. ह्या दहा मुद्यांचा अभ्यास केल्यानंतर बरनीच्या चिंतनाची उंची स्पष्ट होते.  
मुल्य निश्चित करण्याचे नियम
मुल्य कमी झाल्यानंतर होणारे लाभ सांगितल्यानंतर बरनीने मुल्य कमी करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी लिहतो “ बादशाह मुल्यांना दोन प्रकारे निश्चित करु शकतो. एक प्रकार असा आहे की, त्याने न्याय करण्याचे अत्याधिक प्रयत्न करावेत. आपली तथा अन्य कुणाचीही या संदर्भात त्याने चिंता करु नये. न्यायाच्या प्रती इतके आधिक प्रयत्न केल्याने लोक न्यायाचे अधिन होतात की, व्यापारी आधिक मुल्यावर वस्तू विकणे थांबवतात. साठेबाजारी करणारे साठेबाजार रोकतात. आणि ते देखील न्याय करु लागतात. त्यांच्या राज्याची प्रजा परस्पर न्याय करायला लागते. कारण प्रजा बादशहाच्या धर्माचे पालन करते.
बादशाह मुल्य निश्चित करण्याचे याप्रकारे देखील प्रयत्न करु शकतो बादशाहला जेंव्हा हे दिसेल की, वर्षा झाल्यानंतर देखील पिक चांगले आल्यानंतर संपन्नता आल्यानंतरही व्यापारी तथा कारवान वाले आपली सवय सोडत नाहीत, आणि साठेबाजारी करणारे साठेबाजारी सोडत नाहीत, बाजारवाले तथा बक्काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत बुध्दीमान तथा अनभिज्ञ ग्राहकांना छळत राहतात, आणि बाजारमुल्याचे मालक बनले आहेत. इच्छेनुसार आपली सामग्री विकतात. ना इश्वराप्रती लज्जा प्रदर्शित करतात ना बादशाहचे त्यांना भय वाटते. बादशाहसाठी हे आवश्यक आहे की, खास आणि आम लोकांच्या हितासाठी अशा गोष्टींचे अंत करावे आणि अन्न,वस्त्र आणि सामग्री ज्याची रात्र दिवस गरज असते मुल्य निश्चीत करावेत.” ह्यानंतर बरनीने बाजारमुल्य ठरवण्यासाठी आधिकार्यांची नियुक्ती करण्याची सुचना केली आहे. राज्यात काम करणार्या आधिकार्यांना साठेबाजारी रोखण्यासाठी आदेश देण्यात यावेत. कोणतीही वस्तू महाग होउ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे त्याने सुचित केले आहे.22
जियाउद्दीन बरनी उपेक्षा आणि उपेक्षाच
मध्ययुगीन भारतात झालेल्या असंख्य विद्वानात बरनीचे स्थान वेगळे आहे. अभ्यासू आणि मर्मग्राही चिंतन करणार्या बरनीला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरदेखील उपेक्षेचा सामना करावा लागला. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात त्याला विद्वानांमधील राजकारणामुळे राजकारणापासून दूर रहावे लागले. मोहम्मद तुघलकाच्या काळात त्याला काही राजकीय लाभ झाले. मात्र नंतर अखेरच्या काळात त्याला हालाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करावे लागले. बरनीच्या मृत्यूनंतर त्याच्या साहित्याची देखील उपेक्षा झाली. अल् बेरुनी प्रमाणे मध्ययुगात त्याच्या साहित्याचा अभ्यास कुणी केल्याचे दाखले मिळत नाहीत. आधुनिक काळात तर त्याला धर्मांध म्हणून हिणवण्यात आले. प्रक्षेपकांनी केलेल्या अन्यायाने बरनीच्या मुळ साहित्यच शिल्लक राहिले नाही. त्यामूळे बरनी म्हणजे एका उपेक्षेचा प्रवास आहे. 
संदर्भ व टिपा
1) बरनी जियाउद्दीन, फतुहाते जहांदारी, इंडीया ऑफीस मेन्युस्क्रिप्ट, अनुवाद- रिजवी सय्यद अतहर अब्बास, तुगलक कालीन भारत पृष्ठ क्र. 277, सन 2016, नवी दिल्ली.
2) तत्रैव पृष्ठ क्र.277
3) तत्रैव पृष्ठ क्र. 282 आणि 283 ( बरनीच्या संपूर्ण ग्रंथात त्याचे ह्यासंबधीचे विचार पहायला मिळतात. त्याने अनेकठिकाणी बादशहाच्या सत्यावलोकानाची चर्चा केली आहे.)
4) तत्रैव पृष्ठ क्र. 284, (5) तत्रैव पृष्ठ क्र.285
6) तत्रैव पृष्ठ क्र. 285  (7) पारुथी एस.के., सल्तनतकालीन भारत का आर्थिक इतिहास, पृष्ठ क्र. 105, सन 2013, नवी दिल्ली. (8)बरनी जियाउद्दीन, पुर्वोक्त पृष्ठ क्र. 286
9) तत्रैव पृष्ठ क्र. 293
10) बरीदांच्या संदर्भात इब्ने बतुता ने विस्ताराने माहिती दिली आहे. बतुता बरीदांना गुप्तहेरांच्या समकक्ष मानतो. असे त्याच्या एकुण विश्लेषणावरुन दिसून येते. बरीदांच्या संदर्भात अन्य साधनांमध्ये आधिक माहिती मिळत नाही. त्यामूळे बरीद म्हणजे सुचना देणारा आणि पत्र पोहचवणारा असा साधारण समज आहे. बरनीनेदखील त्याच्या विश्लेषणात बरीदांचा उल्लेख करताना गुप्त सुचनांचे वहन करण्यासंदर्भातील बाबींची देखील चर्चा केली आहे.  
11) जियाउद्दीन बरनी तत्रैव पृष्ठ क्र. 295
12) डि.डी. कोसम्बी, एन इन्ट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडीयन हिस्ट्री, पृष्ठ क्र.370 पासून पुढे, सन 1975, मुबंई 
13) यासंदर्भात मोहम्मद हबीब यांनी ‘सुलतान महमूद ऑफ गजनी’ आणि त्यांच्या अन्य ग्रंथात विस्ताराने मांडणी केली आहे. इरफान हबीब ह्यांनी संपादीत केलेले त्यांचे काही लेख देखील ह्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरु शकतात. 
14) प्रा. हबीब, इरफान, मध्यकालीन भारत, खंड 4, इरफान हबीब यांचा, अल्लाउद्दीन खिलजी के मुल्यनियंत्रण के उपाय : जिया बरनी के समर्थन में, ,पृष्ठ क्र.26, नवी दिल्ली, सन 1992. (15)-एसामी कृत फतुहुस्सलातीन पृष्ठ 315, उद्धृत प्रा. हबीब, इरफान, मध्यकालीन भारत  खंड- 4,  पृष्ठ क्र.27, नवी दिल्ली, सन 1992. (16)-बरनी जियाउद्दीन, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. 297. (17)-गुमाश्ते हा बाजारावर देखरेख करणारा आधिकारी असल्याचे अमीर खुसरो, एसामी आणि जियाउद्दीन बरनी यांचे विश्लेषण सांयुक्तीक आहे. (18)- बरनी जियाउद्दीन पुर्वोक्त पृष्ठ क्र. 296 (19)-मध्यकाळात बादशहाला इश्वराची सावली म्हटले जायचे. बरनीने देखील अनेक ठिकाणी बादशहाचा उल्लेख त्याच पध्दतीने केला आहे. (20)-बरनी जियाउद्दीन पुर्वोक्त पृष्ठ क्र. 297. (21)-तत्रैव पृष्ठ क्र. 297 ,298
22) तत्रैव पृष्ठ क्र. 299

‘अर्रहमानु अर्रहीमु’– हे दोन्ही शब्द कृपेपासून बनले आहेत. पहिल्यामध्ये आवेश व उत्साह आणि विपुलतेचा अर्थ आपल्यात सामावलेला आहे आणि दुसऱ्यात निरंतरता आणि कायमस्वरूपीपणाचा अर्थ आढळतो. कृपाळू तो ज्याची कृपा अतिशय जोशपूर्ण आहे. हवा, पाणी व दुसऱ्या सर्व गरजांची पूर्तता त्याच कृपेचे प्रतिबिंब आहे. मग त्याच गुणवैशिष्ट्याचा परिणाम आहे की त्याने सर्वांत मोठी कृपा (कुरआन) पाठविली. अल्लाह म्हणतो,
‘‘अर्रहमानु, अल्लमल कुरआना, खल़कल इन्साना अल्लमहुल बयाना.’’
कृपाळूने कुरआनची शिकवण दिली, कृपाळूने मानवाला निर्माण केले, कृपाळूने मानवाला बोलण्याची क्षमता दिली. आणि कृपावंत तो ज्याच्या कृपेचा क्रम कधीच संपत नाही, ज्याची कृपा व दया निरंतर राहणार आहे. ही गुणवैशिष्ट्ये मानल्यामुळे अनिवार्य ठरते की मानवाने अशाप्रकारे जीवन व्यतीत करावे जे कृपावंत पसंत करतो, जेणेकरून आणखीन अधिक कृपेचे हक्कदार बनावे आणि त्या नियमांनुसार आपल्या जीवनाची इमारत बांधू नये जे त्याला आवडत नाहीत, अन्यथा तो आपली दृष्टी वळवील. मग जे लोक ‘दीन’चे कार्य करतात त्यांना वाईट परिस्थितींमध्ये आणि संकटांमध्ये आठवले पाहिजे की जेव्हा ते पालनकत्र्याचे कार्य करीत आहेत तेव्हा तो त्यांना या जगात आपल्या कृपांपासून वंचित का करील?
‘अल-काईमु बिल-किस्ति’– म्हणजे न्यायी व न्यायाधीश. जर अल्लाह न्यायी व न्यायाधीश आहे तर त्याच्या दृष्टीने प्रामाणिक व आरोपी समान असू शकत नाहीत. दोघांशी तो सारखाच व्यवहार या जगात करणार नाही आणि त्या जगातही करणार नाही.
‘अल-अ़जी़ज’– शासक. ज्याच्या सत्तेने सर्वांना घेरले आहे, ज्याच्या सत्तेला कोणी आव्हान देऊ शकत नाही, अथवा त्याने आपल्या प्रामाणिक दासांना प्रभुत्व व सत्ता देण्याचा निर्णय घेतला तर कोणतीही शक्ती त्याचा निर्णय रोखू शकणार नाही आणि ज्याला तो शिक्षा देऊ इच्छिल तो त्यापासून वाचू शकणार नाही आणि कोणी त्याचा निर्णय टाळू शकणार नाही.
‘अल-ऱकीब’– देखरेख करणारा. जेव्हा तो दासांच्या कर्मांची देखरेख करीत आहे तेव्हा त्यांच्यानुसारच मोबदला व शिक्षा देईल.
‘अल-अलीम’– जाणणारा. संपूर्ण ज्ञान बाळगणारा. कोण कुठे आहे व काय करीत आहे आणि कोणाला कशाची आवश्यकता आहे, त्याचे प्रामाणिक दास कुठे आहेत आणि कोणत्या संकटात अडकले आहेत. तसेच तो ज्ञान बाळगतो म्हणून कोणाला एखादी वस्तू देण्यात अन्याय करीत नाही. प्रत्येकाला तोच देईल ज्याचा तो हक्कदार आहे. त्याच्या कृपा व मदतीचे हक्कदार निष्क्रिय होऊ शकत नाहीत आणि त्याच्या राग व शिक्षेचे हक्कदार यशस्वी होऊ शकत नाहीत.
येथे सांगण्यात आलेल्या काही आवश्यक गुणवैशिष्ट्यांमध्ये आणखी सर्व गुणवैशिष्ट्ये सामावतात. या ठिकाणी यापेक्षा अधिक सांगणे कठीण आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते की अल्लाहच्या अनेक गुणवैशिष्ट्यांना विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी कुरआन व हदीसचे पठण व अध्ययन करणे गरजेचे आहे. जे लोक अरबी भाषा जाणतात आणि जे लोक जाणत नाहीत, दोघांनी विचार करण्याची गोष्ट आहे की आयतींच्या शेवटी अल्लाहची गुणवैशिष्ट्ये का आणली गेली आहेत आणि त्यांना त्यापासून कोणत्या उपदेशाचा लाभ होतो.
जगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले,
‘‘फ-मय्यंरिदिल्लाहु अय्यंहदियहू यश्रह सदरहू लिलइस्लामि.’’
(ज्याला अल्लाह उपदेश देण्याचा निर्णय घेतो त्याची छाती इस्लामसाठी उघडतो.)
या आयतीच्या पठणानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा प्रकाश छातीत प्रवेश करतो तेव्हा छाती उघडते.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! त्याला ओळखता येईल अशी त्याची एखादी अनुभूत निशाणी आहे काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय त्याची अनुभूत निशाणी ही आहे की मनुष्याच्या हृदयाला या जगाचा वीट आलेला असतो आणि कायमस्वरूपी घराची त्याला ओढ लागलेली असते आणि मरण येण्यापूर्वी मरणाच्या तयारीला लागतो.’’
स्पष्टीकरण : ज्या मनुष्याच्या हृदयात इस्लामची वास्तविकता उतरते तेव्हा त्याचे हृदय 
या समाप्त होणाऱ्या जगापासून दूर पळू लागते आणि त्याला परलोकाची ओढ लागते. मृत्यू येण्यापूर्वी पुण्यकर्म करू लागतो.

(७) हे पैगंबर (स.)! तोच ईश्वर आहे, ज्याने हा ग्रंथ तुमच्यावर अवतरला आहे. या ग्रंथात दोन प्रकारची वचने आहेत. एक अटळ आहेत, जी ग्रंथाचा मूळ आधार आहेत आणि दुसरी उपलक्षित (मुतशाबीहात), ज्या लोकांच्या मनात तेढ आहे, ते नेहमी अनाचाराच्या शोधात ‘संदिग्ध’ उपलक्षित  (आयती) चाच पाठपुरावा करीत असतात आणि त्यांना (मनमानी) अर्थाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करीत असतात. वास्तविक पाहता त्यांचा खरा अर्थ अल्लाहशिवाय कोणासही ठाऊक नाही. याउलट जे लोक ज्ञानाने परिपक्व आहेत ते म्हणतात, ‘‘आमची यांच्यावर श्रद्धा आहे, या सर्व आमच्या पालनकत्र्याकडूनच आलेल्या आहेत.’’ आणि सत्य असे आहे की, एखाद्या गोष्टीपासून खरा बोध केवळ बुद्धिमान लोकच ग्रहण करतात.

५) येथे अरबी शब्द `मुहकमात' चे अनुवाद `अटळ' केले आहे. `अटळ आयत' (स्पष्ट) म्हणजे त्या आयती ज्यांची भाषा अगदी स्पष्ट आहे. अशा आयतीचा अर्थ आणि भाव निश्चित करण्यात शंकेला मुळीच वाव राहात नाही. प्रत्येक शब्दांचा अर्थ अगदी स्पष्ट असतो. या प्रकारच्या आयती ग्रंथाचा मूलाधार आहेत. म्हणजेच कुरआन ज्या उद्देशासाठी अवतरित झाला आहे तो उद्देश या आयतींमुळे पूर्ण होतो. जगाला याच प्रकारच्या आयतींद्वारा इस्लामचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच मार्गदर्शन, शिकवण आणि उपदेश कार्य याच आयतींद्वारा (मुहकमात) करण्यात आले आहे. याचद्वारा मार्गभ्रष्टतेचे खंडन तसेच सरळमार्गाचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. याच आयतींमध्ये इस्लाम धर्माचे मूळ सिद्धान्त सांगितले गेलेले आहेत. याच आयतींद्वारा मूळ धारणा, उपासना, नैतिकता, कर्तव्य आणि करणे न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणून जो मनुष्य सत्याभिलाषि आहे, त्याची तहान शमविण्यासाठी या अटळ आयतींच मूळ स्त्रोत आहेत. स्वाभाविकपणे यांच्याकडेच त्याचे लक्ष केंद्रित होते.
६) येथे अरबी शब्द `मुतशाबिहात'चा अर्थ होतो `उपलक्षित' आयतीं त्या आयतींना म्हटले जाते, ज्यांचा अर्थ आणि भाव निश्चित करताना शंकेला वाव राहातो. हे स्पष्ट आहे की मनुष्यासाठी कोणताच जीवनमार्ग तोपर्यंत प्रस्तावित केला जाऊ शकत नाही जोपर्यंत त्याला परोक्षसंबंधी आवश्यक तथ्यांविषयीची माहिती दिली जात नाही. हेसुद्धा अगदी स्पष्ट आहे की जे ज्ञान मनुष्य इंद्रियापलीकडचे आहे ज्याला त्याने कधीही पाहिले नाही की स्पर्श केला नाही की आस्वादसुद्धा घेतला नाही; या तथ्यांसाठी  मानवी  भाषेत  शब्द  उपलब्ध  नाहीत  की  वर्णनशैलीसुद्धा  उपलब्ध  नाही  ज्याद्वारे  ऐकणारा आपल्या मनात त्यांचे खरे चित्र रेखाटू शकेल. निश्चित रूपात हे अनिवार्य आहे की अशाप्रकारचे विषय वर्णन करण्यासाठी असे शब्द आणि अशा वर्णनशैलीचे प्रयोग केले जावे जी वास्तविक तथ्यांशी अधिकाधिक मिळती जुळती प्रत्यक्ष वस्तूसाठी मानवी भाषेत सापडते. म्हणून या तथ्याविषयीच्या वर्णनासाठी कुरआन याच प्रकारच्या भाषाशैलीचा वापर करतो. उपलक्षित (मुतशाबिहात) आयतीं म्हणजे त्या आयती ज्यात वरील भाषाशैलीचा वापर करण्यात आला आहे.
परंतु या भाषेचा अधिक लाभ मनुष्याला वास्तविकतेच्या जवळ पोहचण्यासाठीच होतो कविंा अस्पष्ट कल्पना त्याद्वारे मनुष्य करू शकतो. अशा प्रकारच्या आयतींच्या अर्थास निश्चित करण्यासाठी जितका जास्त प्रयत्न केला जाईल तितके जास्त संशय आणि संदिग्धता वाढतच जाईल. परिणामत: मनुष्य सत्याच्या जवळ जाण्याऐवजी सत्यापासून अधिक दूरवर भरकटला जाईल. म्हणून जे लोक सत्याभिलाषि आहेत आणि निरर्थक रूची ठेवत नाहीत ते तर उपलक्षित आयतींच्या त्याच अस्पष्ट आणि सत्यानुकूल अर्थावर संतोष करतात ज्यामुळे काम करणे सुलभ होते. अशा वेळी हे लोक अटळ आयतींकडे आपले पूर्णलक्ष केंद्रित करतात. परंतु जे कोणी व्यर्थ गोष्टीत आवड ठेवून आहेत किंवा उपद्रवी आहेत, त्यांचे पूर्ण लक्ष या उपलक्षित (संदिग्ध) आयतींवर केंद्रित असते व ते तर्क वितर्कात गर्क होतात.
७) येथे कुणाला ही शंका येऊ नये की जेव्हा ते लोक उपलक्षित (मुतशाबिहात) आयतींचा खरा अर्थ जाणतच नाही तर त्यावर ईमान धारण कसे करावे? वास्तविकपणे योग्य व्यक्तीला कुरआन ईशवाणी आहे याचे ज्ञान अटळ आयतींमुळे होते; उपलक्षित आयतींमुळे मुळीच नाही. जेव्हा अटळ (स्पष्ट) आयतींवर चिंतन मनन करून माणसाला खात्री पटते की हा ग्रंथ खरोखरीच अल्लाहचा ग्रंथ आहे तेव्हा त्या माणसाच्या मनात उपलक्षित आयतीं काही एक संभ्रम निर्माण करूच शकत नाहीत. अशा आयतींचा सरळ सोपा अर्थ त्या माणसाला कळतो त्याला तो ग्रहण करतो आणि जिथे संभ्रम मनात निर्माण होतो तिथे तो किस काढण्याऐवजी आणि समुद्रात गटांगळया खाण्याऐवजी तो अल्लाहच्या या वाणीवर विश्वास ठेवून आपले लक्ष कामाच्या गोष्टींकडे केंद्रित करतो.

- सलीम खान, औरंगाबाद
समाजातील तरूणांनी नोकऱ्यांच्या मागे न धावता स्वत:मधील सर्जनशीलता आणि रचनात्मकतेच्या मार्गाचा अवलंब करून स्वत:चे व्यक्तिगत उद्योग व व्यावसायावर भर द्यावा, असा सूर स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एस.आय.ओ.) दक्षिण महाराष्ट्राच्या वतीने दि. ०८ एप्रिल २०१८ रोजी गोरेगाव येथील सेंट पायस महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय ‘उद्योजकता प्रशिक्षण परिषदे’त उमटला.
`समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने गरजेचे आहे की विद्यार्थी आणि युवकांनी केवळ नोकऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित न करता स्वत:मधील सर्जनशील आणि रचनात्मक कलागुणांचा उपयोग करून खाजगी उद्योगांची सुरूवात करावी. नवीन संकल्पनेवर आधारित खाजगी उद्योगची सुरूवात करणारी मंडळी ही केवळ स्वत:च्या उदरनिर्वाहापुरते मर्यादित न राहता इतर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीदेखील साहाय्यभूत ठरतात व समाजाच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातदेखील त्यांचे मोलाचे योगदान मिळू शकते. याच पाश्र्वभूमीवर ‘एस.आय.ओ. ऑफ इंडिया’च्या नीतीधोरण कार्यक्रमांतर्गत हा मुद्दा सामील करण्यात आला होता की संघटना ही संघटनेतील सदस्य व समाजातील युवकांसाठी उद्योजकता वाढीसाठी प्रयत्नशील राहील. याच अनुषंगाने एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्राच्या वतीने सदर उद्योजकता प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून जवळपास ८० तरूणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमाची सुरूवात सकाळी १०:०० वाजता पवित्र कुरआन पठणाने झाली. नंतर संघटनेचे दक्षिण विभागाचे सचिव राफिद शहाब यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात सदर कार्यक्रमाची गरज व महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर मार्गदर्शन करताना आय.आय.टी. मुंबई येथील मुहम्मद शहाब खान यांनी भारतात मुस्लिम समाजाची आर्थिक आणि व्यवसायिक परिस्थिबद्दल माहिती दिली. आय.आय.एम. अहमदाबाद येथील साहाय्यक प्राध्यापक अबरार अली सय्यद यांनी ‘उद्योजकता संकल्पनेतून प्रात्यक्षिकाकडे' या विषयावर सहभागी उमेदवारांचे सखोल मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी उद्योजकतेचे महत्त्व स्पष्ट करताना या क्षेत्रातील काही यशस्वी लोकांची उदाहरणे प्रस्तुत केली. ‘रीफा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज’चे संचालक अब्दूस्सलाम यांनी आपले विचार व्यक्त करताना छोट्याछोट्या लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक अनुदान देणाऱ्या शाखा व संस्थांबद्दल माहिती दिली. त्यांनी या क्षेत्रात उपयुक्त ठरणाऱ्या योजना व कार्यक्रमांबद्दलदेखील सविस्तर माहिती दिली. 
सदर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला ‘स्टँडर्ड टच ई सोल्युशन’चे संस्थापक हमजा मुअज्जम अली ‘डिजीटल वल्र्ड’सारख्या संकेतस्थळ, ब्लॉग, पेâसबूक, युट्यूब, अ‍ॅमेझॉन तसेच फ्लिपकार्डच्या बाबतीत तसेच आधुनिक काळात उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधीच्या बाबतीत उपयुक्त माहिती दिली. या प्रसंगी दोन यशस्वी उद्योजकांनी उपस्थितांसमोर आपले अनूभव कथन केले. या वेळी लिथोटिक इंजिनीयरर्सचे संस्थापक मिर्झा अफजल बेग यांनी आपल्या प्रोडक्शन कंपनीच्या निर्मितीकार्यात आलेले अनुभव मांडले तर हात (एच ए टी एच) चे संस्थापक हमजा शेख यांनी हातांनी अपंग लोकांसाठी कृत्रिम हातासंबंधी आपल्या इंजिनियरींग प्रोजेक्टच्या बाबतीत सविस्तर अनुभव कथन केले. ई-बे चे क्षेत्रिय प्रबंधक सनीकुमार यांनी आपल्या वस्तू ऑनलाईन कशा विकता येतील याबाबत मार्गदर्शन केले. चार्टर्ड अकाऊंटंट समीर शेख यांनी देशातील जी एस टी सोबतच उद्योग क्षेत्राशी निगडत कायद्यांच्या संदर्भात माहिती दिली. शेवटी जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच ‘रीफा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज’चे चेअरमन तौफीक अस्लम खान यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

- प्रा. आरिफ ताजुद्दीन शेख, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र. समतेचा लढा व्यापक पायावर उभा करण्याची भूमिका आंबेडकरांनी घेतली व सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करण्यावर भर दिला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला श्रेष्ठ विद्वान हजारो वर्षांपासून चालत आलेल्या समाजव्यवस्थेविरूद्ध लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बंडाचा झेंडा उभारला. समतेचा हक्क हा पवित्र आहे व तो अबाधित व अभेद्य असला पाहिजे. समाजातील तळागाळातील माणूस समतेच्या तत्त्वाने आत्मगौरवाने उभा राहू शकतो. समताकाशातील प्रज्ञासूर्याने भारतीय समाजाला झालेला जातिभेदाचा वॅâन्सर फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीने या रोगावर उपचार केला. त्यांच्या उपचारात्मक दृष्टीचा लाभ आजही देशाला होऊ शकतो.
प्रारंभीच्या काळापासून बाबासाहेबांचेया लेखनत इस्लाम आणि मुस्लिम समाजासंबंधी संदर्भ येतात. बहिष्कृत हितकारणी सभेचे मुखपत्र असलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या आपल्या वृत्तपत्रात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. आंबेडकर जर इस्लामविरोधी आणि मुस्लिमविरोधी असते, तर महत्प्रयासाने सुरू केलेल्या आपल्या वृत्तपत्रातील महत्त्वाची जागा त्यांनी इस्लामसारख्या विषयावर खर्च केली नसती. इस्लाममधील समतावादी तत्त्वांमुळे आंबेडकर प्रभावित झाले होते. इस्लाममधील दृढ ऐक्याच्या भावनेची त्यांनी नेहमीच स्तुती केली आहे. मुस्लिम समुदायातील एकसंघतेमुळे ते भारावून गेले होते. याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येतो.
बाबासाहेब इस्लाममधील समतावादी तत्त्वामुळे प्रभावित झाले आणि बार्शी जि. सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ते म्हणतात, ‘‘माझी कात्री आहे की, जर आपण आज धर्मत्याग केला आणि केलाच आहे तर  त्याऐवजी माझ्या मते महंमदी धर्म स्वीकारणे बरे.’’ हिंदू धर्माच्या तुलनेत बाबासाहेबांना ‘इस्लाम’ धर्म हा निश्चितच चांगला वाटत होता. कालांतराने त्यांचा हा विचार बदलला आणि बौद्ध धम्माचा अंगीकार केला. याचा अर्थ ‘इस्लाम’ हा निश्चित चांगला वाटत होता. ‘इस्लाम’ धर्माच्या ते विरोधी नव्हते. इस्लामच्या अनुयायांकडून मूळ इस्लाम बिघडवून टाकला गेला याची त्यांना खंत वाटत होती. ते मुस्लिम नेत्यांवर नाराज होते. इस्लामवर नाराज नव्हते. त्यामुळे धर्मावलंबन किती महत्त्वाचे असते याकडे लक्ष देता येते. धर्मांतर करण्याची इच्छा असल्यास इस्लामचा स्वीकार करा, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून केले होते. (१५ मार्च १९२९)
जोपर्यंत समाजातील तळागाळातील माणूस आत्मगौरवाने उभा राहात नाही तोपर्यंत हा देश उभा राहाणार नाही. केवळ थोर पुरुषामुळे देश मोठा होत नसतो. देश मोठा होण्यासाठी आपल्याला व शासनाला प्रयत्न करावे लागतील. याचे श्रेय जनतेला व शासनाला जाईल. आपल्या राष्ट्राविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनात पराकोटीचे प्रेम असायला हवे. राष्ट्राची जर उभारणी करावयाची असेल तर सर्वांत मोठे काम कोणते असेल तर त्यांनी समाजातील सर्वांना समान दर्जा देण्यावर भर दिला.
सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भारतीय समाज व्यवस्थेचा फार गंभीरपणे आणि अत्यंत सखोलपणे बाबासाहेबांनी विचार केल्याचे लक्षात येते. समाजात बंधुभाव असणे महत्त्वाचे आहे. बंधुभावाचे तत्त्व नसेल तर समाज दुभंगलेलाच राहणार आणि त्यामुळे राष्ट्र दुर्बल राहणार. जर आपल्याला प्रगती करावयाची असेल तर मला असे वाटते सर्व धर्मांतील लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा. कारण बंधुभाव हा काही किराणा दुकानात मिळत नाही किंवा कायद्याने देता येत नाही. तर तो आपापल्या चांगल्या आचरणातून निर्माण होत असतो. जेव्हा राज्यघटना अंतिमत: तयार झाली तेव्हा जी उद्देशिका निर्माण झाली, त्यात बंधुभाव हा शब्द बाबासाहेबांनी योजेलला आहे. स्वातंत्र्य, समता यांच्या रक्षणाची हमी बंधुभावाची मानसिकता देऊ शकते. की मानसिकता आपल्याला बाबासाहेबांच्या समतावादी विचारसरणीतून मिळू शकते.
विषमता, अन्याय, जातिभेद याविरूद्ध लढण्यासाठी ‘भीमा’ची गदा सदैव सिद्ध असे आणि आंबेडकर म्हणजे विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र, असे उद्गार आचार्य अत्रे यांनी त्यांच्या लढ्याविषयी काढले आहेत. राजकारण हे बाबासाहेबांच्या आवडीचे क्षेत्र नव्हते. केवळ दलित बांधवांच्या उत्थानासाठी ते त्यात पडले. त्यांचा मूळ पिंड अभ्यासकाचा. इतक्या हुशार, तल्लख, विद्वानाला परदेशात राहून खूप धनदौलत जमविता आली असती. पण बाबासाहेबांनी तो मार्ग स्वीकारला नाही. आपल्या असंख्य पीडित बांधवांची प्रगती त्यांना साधायची होती. त्यांच्यात माणूस म्हणून जगण्याची क्षीण झालेली अवस्था व पात्रता निर्माण करायची होती. बाबासाहेबांनी संघर्ष करण्याचा व आपल्या बांधवांकडून करवून घेण्याचा निश्चय केला. हा संघर्ष होता जातिव्यवस्थेविरूद्ध. हा संघर्ष होता दुष्ट क्रूर वागणुकीविरूद्ध, हा संघर्ष होता न्याय्य हक्क मिळविण्याचा. समाजातील पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी जुन्या अमानुष परंपरा व रुढी यावर प्रखर प्रहार केले आणि समाजाची झोपमोड करून त्याला गदागदा हलविले. सामाजिक न्याय व समतेवर त्यांनी भर दिला होता. हे करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रभावी भाषणे, परखड वृत्तपत्रीय लिखाण लोकांत शिक्षणाचा प्रसार इत्यादी मार्ग कार्यतत्परतेने चोखंदळले. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी निरनिराळ्या चळवळी केल्या. त्यात महाडच्या चवदार तळ्याचा सत्यागृह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश इत्यादींमुळे समाजपुरुषाची झोपमोड करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
२० जुलै १९४२ रोजी समता सैनिक दलाची परिषद भरली. ७० हजारांहून अधिक भोत्तäयांनी त्यात हजेरी लावली होती. या परिषदेत जे आंबेडकरांचे स्वागत करून त्यांना मानपत्र दिले गेले याप्रसंगी समता सैनिक दलाच्या समूहापुढे केलेल्या भाषणात आंबेडकर म्हणतात, ‘‘माझा स्वत:चाही अहिंसेवर विश्वास आहे; पण अहिंसा व नेभळटपणा यात मी फरक करतो. नेभळटपणा हा दुबळेपणा असतो आणि स्वेच्छेने लादलेला दुबळेपणा हा काही सद्गुण म्हणता येणआर नाही... तुम्ही कोणत्याही टीकेला घाबरू नका. कोणालाही उगाच दुखापत करू नका. ज्याला तुमची मदत लागेल त्यालाच ती करीत चला. यातूनच तुम्ही लोकांची मोठीच सेवा करू शकाल... गुंडांनी बायकांना पळवून नेल्याचे शहरात आपण अनेकदा ऐकतो. खेड्यात आपल्या लोकांवर सवर्ण-हिंदूंनी जुलूम केल्याच्याही वार्ता नेहमी कानी पडतात. अशा प्रकरणांमुळे समाज समता दलाने लक्ष घालायला पाहिजे. या घटना गंभीर असून तुमच्यासारख्या संघटनाच त्याबाबत काहीतरी करू शकतात.’’
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे काम पूर्ण झाल्यावर घटना समितीत त्यांनी जे भाषण केले ते उल्लेखनीय आहे. बाबासाहेर सदस्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘आपले काम पूर्ण झाले. उद्या सूर्योदय होऊ देत. नवीन भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. पण अजून सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य उदय पावायचे आहे.’’­

– सुनीलकुमार सरनाईक

महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंनी अंगावरील कपड्यानिशी ज्योतिरावांना घराबाहेर काढले. अंगावरील कपडे अन् सोबतीला पत्नी यापलीकडे ज्योतिरावांकडे काहीच नव्हते. अशा बिकट प्रसंगी ज्योतिरावांच्या मदतीला धावून येणारा त्यांचा बालपणीचा जिवलग मित्र म्हणजे उस्मान शेख. शेख यांनी ज्योतिरावांना आपले गंजपेठेतील राहते घर दिले. इतकेच काय तर संसारासाठी लागतील म्हणून भांडीकुंडी अन् कपडेही दिले. सर्व प्रकारची मदत देऊ केली. ज्यामुळे ज्योतिरावांची शाळा उस्मान शेखच्या घरात भरू लागली. वर्ग वाढू लागले तर उस्मानने आपल्या बहिणीला सांगून सावित्रीबाईची मदत केली. सावित्रीबाईच्या सोबतीला शिक्षिका म्हणून काम करणारी पहिली स्त्री फातिमा शेख होती. फातिमा शेख सुशिक्षित होती, शिकवायचे कसे याचे प्रशिक्षण सावित्रीबार्इंकडून घेऊन ती शिक्षिका म्हणून काम करू लागली.

``विद्येविना मती गेली, मती विना नीति गेली,
नीतिविना गती गेली, गती विना वित गेले,
वित्ताविना शुद्र खचले, इतके सारे अनर्थ एक अविद्येने केले!''
१९ व्या शतकातील पहिले बंडखोर समाजसुधारक, महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणासंबंधीचे मांडलेले हे विचार म्हणजे आजच्या काळात ही प्रत्येकांने अंगीकारावा असा मूलमंत्र आहे! मानवी स्वातंत्र्याकडे आणि समतेकडे नेणारा विचार सांगून महात्मा फुले थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्त्री शिक्षणासाठी व अस्पृश्यता निवारणासाठी अहोरात्र कष्ट उपसले. त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबार्इंनी स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी मानहानी स्वीकारली पण घेतला वसा टाकला नाही. त्यांनी १८५१ मध्ये मुलींसाठी या देशातील पहिली शाळा सुरु केली. स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबार्इंनी व महात्मा ज्योतिराव फुल्यांनी घातला. स्त्री शिक्षणाची सुरूवात करताना त्यांना अतोनात कष्ट सोसावे लागले, दु:ख वाट्याला आले, अपमान गिळावे लागले.
भारतात त्या काळात प्रचंड निरक्षरता होती, स्त्री या जर शिकल्या सवरल्या तर त्या संसार करणार नाहीत, त्या बिघडतील, स्त्रियांनी शिकू नये ही त्या देवाचीच इच्छा आहे, अशा प्रकारच्या तत्कालीन समाजात अंध: समजुती होत्या. पुरुषी अहंकार बळावल्यामुळे स्त्री शिक्षणाला समाजातील एक फार मोठा वर्ग सातत्याने प्रखर विरोध करीत होता. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये अत्यंत धाडसाने व मनोनिग्रहाने फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात या देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यासाठी सावित्रीबार्इंनी अत्यंत हालअपेष्टा सोसल्या व मानहानीच्या प्रसंगांना तोंड दिले. तत्कालीन समाजाने सावित्रीबार्इंना अक्षरश: शेणाचे गोळे मारले, अपमानकारक टोमणे मारले व प्रत्यक्ष दगडधोंडे मारुन त्यांच्या कार्याला प्रचंड विरोध केला, मात्र समाजाकडून होणारा कडवा विरोध झेलत व शिव्याशाप ऐकत सावित्रीबार्इंनी स्त्रीशिक्षणाचे घेतलेले व्रत सोडले नाही. तत्कालीन समाजात स्त्रीने घराच्या उंबऱ्याच्या बाहेर येणे निषिद्ध मानले जात होते. अशा वेळी सामान्य घरातली एक स्त्री उंबऱ्याबाहेर पडून स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन चालत आहे, हे चित्र अगदीच आगळेवेगळे होते, ते तत्कालीन समाजाला न पटणारे व न बघवणारे होते, त्यामुळे शाळेत जातांना त्यांच्यावर काही टोळभैरवांनी व गुंड प्रवृत्तीच्या समाज कार्यकत्र्यांनी मुद्दाम चिखल व शेणाचा मारा करुन त्यांना मुलींच्या शिक्षणाच्या घेतलेल्या व्रतापासून परावृत्त करण्याचा निकराने प्रयत्न केला होता. त्यांच्यावर भलतेसलते आरोप करुन त्यांना खजिल करण्याचाही प्रयत्न केला. पण अशा वेळी सावित्रीबाई त्यांना नम्रपणे उत्तर देत की, ``मी माझ्या भगिनींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य हाती घेतले आहे, ते मी कदापीही सोडणार नाही, तुम्ही जे माझ्यावर भलतेसलते आरोप करता, माझ्यावर शेण व चिखल तसेच दगडधोंडे टाकीत आहात ते मला फुलांप्रमाणे वाटतात!''
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ज्योतिरावांनी या ऐतिहासिक कार्याला सुरुवात केली. या कार्यात त्यांना शब्दश: सावलीप्रमाणे खंबीर साथ देणारी त्यांची पत्नी सावित्रीबाई होती अवघ्या १८ वर्षाची. मुलींची शाळा सुरु केल्याबद्दल आप्तनातलगांनी त्या दोघांना वाळीत टाकले, त्यांच्या घरीही कोणी येईना. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष ज्योतिरावांच्या वडिलांनी या दोघांना घरातून बाहेर काढले; त्यामुळे शाळेसाठी जागा कोणीही देईना, भाड्याने जागा घ्यावी म्हंटले तर खिशात पैशाची वानवा होती. ज्योतिरावांची जिद्द वाखाणण्याजोगी होती, हे पाहून पुण्यातील भिडे नावाचे सदगृहस्थ की, जे ज्योतिरावांचे स्नेही होते, त्यांनी आपला वाडा या कार्यासाठी उपलब्ध करुन दिला. भिडे यांचे धारिष्ट्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते. ज्योतिरावांच्या शिक्षणप्रसाराच्या कार्यात भिडे व त्यांच्या कुटुंबियाचे सहकार्य आणि मदत मोलाची आहे. त्यांच्यामुळेच फुले दाम्पत्यांना पुण्यासारख्या सनातनी विचाराच्या कर्मठ शहरात शिक्षणप्रसाराचे कार्य करता आले, हे आपणास विसरुन चालणार नाही.
याच भिडे वाड्यात ज्योतिराव व सावित्रीबार्इंनी मुलींची पहिली शाळा ३ जुलै १८५१ रोजी सुरु केली, पुढे चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आल्यावर १७ सप्टेंबर १८५१ व १५ मार्च १८५२ मध्ये दोन शाळा चालू गेल्याचा उल्लेख आढळतो, तसेच या शाळेत अनुक्रमे ४८, ५१, ३३ इतक्या मुली शिकत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या शाळांची प्रथम वार्षिक परीक्षा दि. १७ पेâब्रुवारी १८५६ रोजी झाल्याची नोंद आळढते. या परीक्षा बघायला पुण्यातील नागरिकांनी अभूतपूर्व अशी गर्दी केल्याचीही नोंद आहे.
समाजसुधारणा, शिक्षणप्रसार व सुधारणावादी विचारांचे प्रबोधन या गोष्टी एका सामान्य समाजात जन्माला आलेल्या ज्योतिरावांनी व सावित्रीबार्इंनी केले आहे. अर्थात टिळक-आगरकर-कर्वे-गोखले या पुण्यातील समाजसुधारकांचा त्या वेळी जन्मही झालेला नव्हता. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाची भूमी नांगरुन मशागत करण्याचे महत्त्वाचे काम फुले दाम्पत्यांनी केले, ही गोष्ट भूषणावह आहे. तद्वतच भिडे कुटुंबियांनी फुले दाम्पत्यांना आपला वाडा मुलींच्या शाळेसाठी उपलब्ध करुन देणे हे त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात येईल. या सर्वच गोष्टींना ऐतिहासिक मुल्य आहे. या देशातील स्त्री-शुद्रादीसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबार्इंनी ज्या भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवली, तो `भिडे वाडा' फडणवीस सरकारने `ऐतिहासिक वास्तू' म्हणून जतन करायला हवा! आणि फुले दाम्पत्यांबरोबरच भिडे यांच्या त्यागालाही अभिवादन करायला हवे असे सुचवावेसे वाटते!
(लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर `दर्पण' पत्रकार पुरस्कारांने सन्मानित असून लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

सध्या दलितांप्रमाणेच मुस्लिमांनाही अत्याचाराचे लक्ष्य बनविले जात आहे. याचे कारण मुस्लिमांनी भारतात येऊन ब्राह्मण व क्षत्रियांवर राज्य केले हे नसून याचे खरे कारण म्हणजे मुस्लिम शासकांनी भारतातील वर्णव्यवस्था भंग केली होती. (भंग एवढ्यासाठी की त्यांनी वर्णव्यवस्था नष्ट केली नाही.) आणि ती मुस्लिम शासनकाळापासून भंगावस्थेतच चालत आलेली आहे. वर्णव्यवस्था भंग करण्यासाठी मुस्लिम शासकांनी कोणतेही आंदोलन सुरू केलेले नव्हते. त्यांनी फक्त शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले होते. म्हणजे जे शिक्षण फक्त ब्राह्मणांपर्यंत मर्यादित होते ते सार्वजनिक झाले होते. तो हिंदू भारताच्या इतिहासातील सर्वांत क्रांतिकारी कार्य ठरले होते. जे युगायुगांपासून शिक्षणापासून वंचित होते ते आता लिहू-वाचू शकत होते. या परिवर्तनामुळे ब्राह्मणवादाला आव्हान उभे ठाकले. आता हळूहळू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात बदल करून त्यांचेही ब्राह्मणीकरण करण्याचे कार्य सध्या सत्ताधारी भाजपद्वारे सुरू आहे. त्यांच्या नावात ‘रामजी’चा उल्लेख करून त्यांच्या अनुयायांना भटकविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या षङ्यंत्रामागे फक्त आणि फक्त वर्णव्यवस्था आहे ज्यात ज्ञानक्षेत्रात ब्राह्मण अधिकारी आणि ब्राह्मणेतर अधिकारहीन आहेत. मुस्लिम शासकांनी याच वर्णव्यवस्थेला भंग केले आणि अधिकारी आणि अधिकारहीन हा भेद संपुष्टात आणला. ही काही क्षुल्लक गोष्ट नाही. यामुळे मोठे परिवर्तन घडले होते. म्हणूनच रा.स्व. संघ मुस्लिम समाजाचा आज मोठ्या प्रमाणात द्वेष करीत आहे. मुस्लिम शासकांच्या या कृतीमुळे ज्या जातींना संघाने कोमामध्ये ठेवले होते आणि निरंतर कोमातच ठेवू इच्छित होते त्या अचानक जागृत होऊन हिंदू परिघामधून बाहेर पडल्या. प्रतिष्ठा, सन्मान व मुक्तीसाठी मुस्लिम धर्मही स्वीकारला. त्यांनी हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने धर्मपरिवर्तन केले आणि सुशिक्षित होऊन त्यांनी आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य सावरले. आता संविधानाच्या माध्यमातून कायद्यांमध्ये परिवर्तन करून, विविध समाजांच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये हस्तक्षेप करून त्यांना त्रास दिला जात आहे. ‘तीन तलाक कायदा’ आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल’ हे दोन्ही उदाहरणे सर्वश्रुत आहेत. अशा प्रकारे राष्ट्रवाद वा फॅसिस्टवादाला लोकशाहीचा मुख्य प्रवाह बनविले जात आहे. त्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मानवतावाद, समतावाद आणि सामाजिक न्याय धोकादायक शब्द आहेत. हे शब्द त्यांना भयभीत करतात. देशातील राजकारणात सर्वांत चर्चित ‘पॉलिटिकल आयकॉन’ बदलत राहिले आहेत. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्वांत चर्चित ‘पॉलिटिकल आयकॉन’ बनले आहेत. भाजप, काँग्रेस, समाजवादी इत्यादींचा इ.सन २०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्वत:ला डॉ. आंबेडकरांचे सच्चे अनुयायी सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्वाचे राजकारण करताना त्यात दलितांचा समावेश भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘‘हिंदूराष्ट्राचे भूत कायमचे गाडून टाकण्यासाठी भारतात हिंदू व मुस्लिमांचा एक पक्ष वा गट तयार करणे फारसे कठीण काम नाही. हिंदू समाजात ज्या लहानसहान जाती आहेत त्यांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्या बहुसंख्य मुस्लिमांसारखीच आहे आणि त्या एकाच उद्देशासाठी मुस्लिमांच्या बरोबरीने एक मोठे आंदोलन उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयार होतील. त्या कधीही युगायुगांपासून त्यांना मावी अधिकारांपासून वंचित केलेल्या उच्चवर्णीय हिंदूंच्या बरोबर जाणे पसंत करणार नाहीत.’’ (डॉ. बाबासाहेब राइटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड-८, पृ.३५८-५९) दलित-अल्पसंख्यक एकतेचे सूत्र डॉ. आंबेडकरांनी ३१ डिसेंबर १९३० रोजी अल्पसंख्यक उपसमितीच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘दलितांप्रमाणेच अन्य अल्पसंख्यक वर्गांना भीती आहे की भारतातील भावी संविधानाद्वारे या देशातील सत्ता बहुसंख्यकांच्या हातात सोपविण्यात येईल. ते दुसरेतिसरे कोणी नसून रुढिवादी हिंदू असतील. जोपर्यत ते आपल्या रुढी, कट्टरता आणि पूर्वग्रह सोडणार नाहीत तोपर्यंत अल्पसंख्यकांसाठी न्याय, समता व विवेकावर आधारित समाज एक दिवा स्वप्न ठरेल. म्हणून अशी व्यवस्था अवलंबण्यात यावी ज्यामुळे अल्पसंख्यकांच्या हितांचे रक्षण होईल आणि त्यांच्याशी पक्षपात होणार नाही. त्यासाठी अल्पसंख्यकांना विधायिका व कार्यपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावे. देशातील सार्वजनिक क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळावे. अल्पसंख्यकांवर अन्याय होणार नाही यासाठी बहुसंख्यकांना असा कायदा करण्यापासून रोखण्यात यावे ज्यायोगे अल्पसंख्यकांशी पक्षपात होईल.’’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वाङ्मय, खंड-५,पृ.४३-४४) यावरून हेच सिद्ध होते की संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले दलित-मुस्लिम एकतेचे सूत्रावर आज या क्षणाला दोन्ही समाजांतील लोकांनी विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे अन्यथा डॉ. आंबेडकरांनी अगोदरच धोक्याचा इशारा दिलेला आहे त्यानुसार त्यांना परिणाम भोगावे लागतील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहची ९९ नावे आहेत, शंभरात एक कमी. ती मुखोद्गत करणारा नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल होईल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : ‘मुखोद्गत करणे’ म्हणजे जो मनुष्य त्या नावांचा अर्थ व उद्देश जाणून 
घेईल आणि त्यांची निकड व मागणी पूर्ण करील, दुसऱ्या शब्दांत त्याचा अर्थ असा आहे की मनुष्याने ती गुणवैशिष्ट्ये आत्मसात करावीत आणि आपल्या संपूर्ण जीवनात त्या निकडींवर आचरण करावे.
या हदीसमध्ये सर्व नावांची यादी देण्यात आलेली नाही. ती नावे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या निकडी माहीत करून घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे मनुष्याने पवित्र कुरआनचे पठण करावे. त्यात अल्लाहने आपली सर्व गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत आणि त्यांच्या निकडी काय आहेत आणि मनुष्याने त्यांचा कशाप्रकारे लाभ घेतला पाहिजे हे सर्व कुरआनमध्ये सांगितले गेले आहे. परंतु त्यापासून पूर्णत: तोच लाभ घेऊ शकतो जो कुरआनचे पठण व समजून पठण करण्याची सवय लावून घेईल. मग पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ती आपल्या शब्दांत निकडींसह व्यक्त केली आहेत. त्या दोन्हींच्या अध्ययनांति माहीत होईल की अल्लाहच्या गुणवैशिष्ट्यांपासून नामोस्मरण व मुखोद्गत कशाप्रकारे करण्यात यावे. आम्ही या ठिकाणी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये ज्यांचा कुरआनमध्ये वारंवार उल्लेख आला आहे आणि ज्यांपासून मुस्लिमांच्या प्रशिक्षणातून मोठ्या प्रमाणात काम घेण्यात आले आहे, उद्धृत करीत आहोत आणि तेही संक्षिप्तपणे, कारण हे पुस्तक तो विषय विस्तृतपणे सांगण्याची परवानगी देत नाही.
१. अल्लाह : हे त्या अस्तित्वाचे नाव आहे ज्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. हा शब्द एकमेव ईश्वराव्यतिरिक्त दुसऱ्या कोणासाठीही वापरला गेलेला नाही. हा ज्या मूळ शब्दापासून निर्माण झाला आहे त्याचे दोन अर्थ आहेत- प्रेमाने एखाद्याकडे झडप घालणे, पुढे जाणे आणि धोक्यापासून बचाव करण्यासाठी एखाद्याकडे धावणे आणि त्याच्या आश्रयात स्वत:ला झोवूâन देणे. अल्लाह आमचे उपास्य आहे. आमचे हृदय त्याच्या प्रेमाने भरलेले असावे ही त्याची निकड आहे. आमच्या मनात त्याच्या प्रेमाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही प्रेम असू नये. आमच्या शरीराच्या व प्राणाच्या सर्व शक्ती आणि क्षमता त्याच्यासाठी अर्पित असावीत. फक्त त्याचीच उपासना आणि दासत्व असावे. फक्त त्याच्याचपुढे नतमस्तक व्हावे आणि फक्त त्याच्याचसाठी भेटवस्तू व बलिदान सादर करावे. फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवावा आणि फक्त त्याच्याच कार्यासाठी स्वत:ला झोवूâन द्यावे. अल्लाहव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडेही संकटसमयी व कठीणसमयी मदत मागू नये. ही निकड आहे अल्लाहच्या उपास्य असण्याची आणि नि:संशय प्रोत्साहित झालेली निकड आहे.
२. रब : हा शब्द ज्या मूळ शब्दापासून बनला आहे त्याचे अर्थ आहेत- पालनपोषण करणे, संगोपन करणे, व्यवस्थित ठेवणे, अनेक धोक्यांपासून वाचवून आणि सर्व साधनसामुग्रीचे नियोजन करीत शिखरावर पोहोचविणे, अल्लाहचे ईशत्व एक स्पष्ट गोष्ट आहे. आईच्या उदरातील अंधारात हवा आणि अन्न कोण पोहोचवितो? जगात येणापूर्वी बालकाच्या अन्नाचे कोण नियोजन करतो? मग आई-वडील आणि दुसऱ्या लोकांच्या हृदयांत प्रेम निर्माण करणारा कोण आहे? असे घडले नसते तर मांसाच्या गोळ्याला कोण उठविल? त्याच्या गरजा कोण पूर्ण करील? मग हळूहळू शरीर आणि बुद्धीच्या क्षमतांची कोण वृद्धी करतो? तारुण्य व आरोग्य कोणाची देन आहे? मग ही जमीन व आकाशाचा कारखाना कोणासाठी चालत राहतो? हे सर्व त्याच्या ईशत्वाचे उपकार नाहीत काय? त्याच्याव्यतिरिक्त कोणी आहे काय? आणि तो त्याच्या ईशत्वात भागीदार आहे काय? जर फक्त तोच आमचे कल्याण करणारा आणि पालनपोषण करणारा आहे तर जीभ, हात, पाय, शरीर व प्राणाच्या सर्व क्षमता फक्त त्याच्याच बनून राहाव्यात, ही त्याची अगदी उचित निकड आहे. मग त्याने फक्त अन्नपाण्याचीच व्यवस्था केली नाही तर हे त्याच्या ईशत्वाचे उपकार आहेत की आमच्या जीवनाला योग्य स्थितीत ठेवण्यासाठी आणि आमच्या आत्म्याचे संगोपन करण्यासाठी त्याने आपला ग्रंथ पाठविला जो सर्व उपकारांमध्ये सर्वांत मोठा उपकार आहे. या उपकाराची निकड आहे की आम्ही त्याच्या ग्रंथाचा मान राखावा, त्याला आपले हृदय व आत्म्याचे अन्न बनवावे, त्याचा आपल्या जीवनात समावेश करावा आणि उपकृत गुलामाप्रमाणे जगभर त्याची चर्चा करावी आणि ज्या लोकांना त्याची रुचि व गोडवा माहीत नाही त्यांना तो माहीत करून द्यावा.

(२८६) आमचे अपराध पोटात घे, आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर, तूच आमचा वाली आहेस, काफिरांच्या विरूद्ध आम्हाला सहाय्य कर.३४२


३४२) या प्रार्थनेच्या (दुवा) आत्म्याला पूर्णत: समजण्यासाठी ही गोष्ट नजरेसमोर ठेवली गेली पाहिजे, की हे दिव्य अवतरण हिजरतच्या एक वर्षापूर्व मेराजच्या वेळी झालेले आहे. तेव्‌हा मक्का येथे इस्लाम आणि कुफ्र यांच्यातील संघर्ष चरमसीमेला पोहचला होता आणि मुस्लिमांवर संकटांचे डोंगर कोसळले होते. या परिस्थितीमध्ये मुस्लिमांना शिकवण देण्यात आली की आपल्या पालनकर्त्या स्वामीजवळ अशाप्रकारे प्रार्थना करा. स्पष्ट आहे की देणारा स्वत:च मागणाऱ्यांसाठी प्रार्थनेची (मागण्याची) पद्धत दाखवीत आहे; तर स्वीकृतीची शाश्वती आपोआप होते. म्हणून ही प्रार्थना (दुवा) मुस्लिमांसाठी त्या काळी मन:शांतीचे एक मोठे कारण बनली. याव्यतिरिक्त या प्रार्थनेत हेसुद्धा मुस्लिमांशी वेगळ्या पद्धतीने सांगितले गेले, की आपल्या भावनांना एखाद्या अनुचित दिशेत वाहू देऊ नका तर त्यांना या प्रार्थनेच्या साच्यात साकारू द्यावे.


आलिइमरान
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) अलिफ, लाऽऽम, मीऽऽम. (२) अल्लाह तो चिरंजीवी नित्य सत्ता ज्याने सृष्टीची व्यवस्था सांभाळली आहे. खरोखरच त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही.
(३-४) हे पैगंबर (स.)! त्याने तुमच्यावर हा ग्रंथ अवतरला जो सत्य घेऊन आला आहे व त्या ग्रंथांच्या सत्यतेला प्रमाणित करत आहे, जे पूर्वी अवतरले होते. यापूर्वी त्याने मानवांच्या मार्गदर्शनाकरिता तौरात व इंजिल अवतीर्ण केले आहे. आणि त्याने ती कसोटी अवतीर्ण केली आहे, (जी सत्य आणि असत्य यातील फरक दर्शविणारी आहे.) आता जे लोक अल्लाहचा आदेश स्वीकारण्यास नकार देतील त्यांना निश्चितच कठोर शिक्षा मिळेल. अल्लाह अमर्याद शक्तीचा स्वामी आणि दुष्कर्मांचा बदला घेणारा आहे.
(५) पृथ्वी आणि आकाशांतील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही. (६) तोच तर आहे, जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचा रूप हवे तसे घडवितो. त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही.

१) तपशीलासाठी पाहा सूरह - २ (अल्बकरा) टीप नं. २७८.
२) सर्वसाधारणात: लोक `तौरात' म्हणजे बायबलचा जुना करारमधील सुरूवातीची पाच पुस्तके समजतात. तसेच इंजिल (बायबल) म्हणजे बायबलच्या नव्या करारातील प्रसिद्ध चार पुस्तकांना समजतात. याचमुळे हा पेच निर्माण होतो की काय खरेच हे ग्रंथ ईशग्रंथ आहेत? काय कुरआन त्या सर्व बाबींना पुष्टी देतो जे या ग्रंथांमध्ये नमूद आहेत? वास्तविकता तर ही आहे की `तौरात' हे बायबलच्या जुन्या करारातील सुरूवातीच्या पाच पुस्तकांचे नाव नाही तर ते त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. तसेच बायबल नवीन कराराच्या चार पुस्तकांचे नाव नाही तर ते त्यांच्यामध्ये अंकित झालेले आहेत.
३) म्हणजेच तो सृष्टीच्या सर्व रहस्यांना जाणणारा आहे. म्हणून जो ग्रंथ त्याने अवतरित केला आहे तो पूर्णत: सत्याधिष्ठित आहे. तसेच विशुद्ध सत्य फक्त याच ग्रंथात मनुष्याला मिळू शकते जे त्या ज्ञानी आणि बुद्धीविवेकी अस्तित्वाकडून अवतरित झाले आहे.
४) यात दोन महत्त्वाच्या तथ्यांना स्पष्ट केले आहे. एक म्हणजे तुमच्या प्रकृतीला तो जसे जाणतो तसा दुसरा कोणी जाणू शकतच नाही. तुम्हीसुद्धा जाणू शकत नाही. म्हणून त्या अल्लाहच्या मार्गदर्शनाला मान्य करण्याव्यतिरिक्त तुमच्यासमोर दुसरा मार्ग नाही. दुसरे तथ्य म्हणजे ज्याने तुमची गर्भधारणा होण्यापासून ते नंतरच्या अवस्थेत तुमच्या लहान-मोठ्या गरजांची पूर्तता करण्याची व्यवस्था केली. कसे शक्य आहे की तो ऐहिक जीवनात तुमच्या मार्गदर्शनाची व्यवस्था करणार नाही? जेव्हा की तुमची सर्वांत अधिक गरज तर हीच आहे.

आपले ‘शोधन’ साप्ताहिक आता मराठीतले एक उत्तम नियतकालिक होऊ पाहात आहे, त्याबद्दल आपले व आपल्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन!
मराठी संस्कृतीच्या घडणीत इस्लामचा मोठा वाटा असून मुसलमानांचे भरीव योगदान राहिले आहे. २ ते ८ मार्चच्या अंकातील सर्व लेख वाचनीय आहेत. ‘अल्-बेरूनी’वरील सरफराज शेख यांचा लेख सर्वत्र पुनर्मुद्रित व्हावा असा महत्त्वाचा आहे. अल् बेरूनी यांचे ‘तहकीक-मा-लिल-हिन्द’ हे अतुलनीय पुस्तक मराठीत उपलब्ध नव्हते. तो संपूर्ण ग्रंथ आम्ही लवकरच ‘साहित्य अकादमी’तर्पेâ प्रकाशित करीत आहोत.
असाच साप्ताहिकाचा दर्जा कायम ठेवावा आणि मराठीला योगदान देत राहावे.
- डॉ. भालचंद्र नेमाडे, मुंबई
(‘कोसला’ व ‘हिंदू’ या लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक आणि ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते)

-शाहजहान मगदुम
काही दिवसांपूर्वी लोकसभेत ‘तिहेरी तलाक’ अवैध ठरविण्याबाबतचे विधेयक केंद्र सरकारतर्पेâ पारित करण्यात आले. या विधेयकाचा मुस्लिम समाजातील महिला संघटनांबरोबरच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून कडाडून विरोध होत आहे. त्या निमित्ताने देशभरात मुस्लिम महिलांचे हजारोंच्या संख्येने शहरातच नव्हे तर गावपातळीवर अनेकानेक मोर्चे निघत आहेत. सरकारच्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदविला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजपने सत्तेवर येण्यारपूर्वी आपल्या घोषणापत्रात अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे देशात समान नागरी कायदा आणण्याची पूर्ण तयारी सुरू आहे. याचा फटका फक्त मुस्लिम समाजालाच नव्हे तर देशातील इतर धर्मीयांबरोबरच हिंदूंच्या काही जाती-जमातींनाही बसणार आहे. एकीकडे मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचे धोरण आखले जात आहे तर दुसरीकडे दलितांच्या ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यामध्येदेखील हस्तक्षेप करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे दिसून येते. म्हणजे भाजपच्या टार्गेटवर सध्या मुस्लिम व दलित-आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत हे तो सत्तेवर आल्यापासून देशभरात घडत असलेल्या मुस्लिम व दलितविरोधी घटनांवरून दिसून येते. आता या मुद्द्यांकडे एका षङ्यंत्राच्या स्वरूपात पाहिले जात आहे. मुस्लिम व दलित वर्गाला सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवायचे, त्यांची दडपशाही करायची हा विचार भाजपा आणि संघाच्या डीएनएमध्येच आहे. त्यांच्या या विचाराला जो कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करतो त्याविरोधात हिंसाचार भडकवला जातो. सध्या हजारो मुस्लिम-दलित बंधू-भगिनी रस्त्यावर आले. आपल्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी आंदोलन केले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तीन तलाक आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची मागणी मुस्लिम व दलित संघटनांनी केली आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) ला संपवण्यासाठी सरकारचे षडयंत्र असल्याचे म्हटले जाते. (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) दलितांसाठी सुरक्षा कवच म्हणून बघितले जात होते तो कवच काढून घेण्याच काम सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. अशाने या कायद्याचा धाकच संपून जाईल किंवा कायदा निष्प्रभ होईल,अशी खेळी केंद्र सरकारने खेळली आहे. इतकेच नव्हे तर हा निर्णय मागे घेणार नसल्याचे सुतोवाच सर्वोच्च न्यायालयाने भारत बंदनंतर सांगूनही टाकले आहे. देशात अनुसूचित जाती, जमातीच्या नागरिकांवर उच्चवर्णीयांकडून अन्याय अत्याचार होण्याचे प्रकार सर्रास घडत होते. त्याला पायबंद घालण्यासाठी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याची नितांत गरज आजही आहे. २०१६ आणि १७ मध्ये देशात ४० हजार ८११ घटना दलित अत्याचाराच्या घडल्या. दिवसेंदिवस दलित आदिवासींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अशा पद्धतीनेचे निर्णय व्हायला लागले, तर भविष्यात मुस्लिम व दलित समाजाचे मानवाधिकार हिरावले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये काँग्रेस व इतर राजकीयपक्षांनी मूक संमतीच दिली असल्याचे दिसून येते. दलित बांधवांना गोळ्या खाऊन जीव द्यावा लागला. सरकार त्यांना आर्थिक मदत म्हणून काही पैसा देईल परंतु जे जीव गेले त्याच काय? सरकारच्या विरोधात आक्रोश वाढत चालला असल्यामुळे जनतेला रस्त्यावर हिंसक व्हावे लागत आहे. याला सरकार जवाबदार असून दंगलखोरांच्या हातात आयतेच कोलित सापडले आहे. सरकारचे धोरण हे संविधानविरोधीही आहे. कारण संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचे अधिकार दिले आहेत. देशात जातीयव्देश व सांप्रदायिकता वाढली आहे. सरकारमधील मंत्री, तसेच इतर राज्यांमधील मंत्री हे सांप्रदायिकता पसरविण्या पलीकडे कोणतेही काम त्यांच्याकडून होताना दिसत नाही. महागाई, बेरोजगारी, भ््राष्टाचार, अत्याचार, दंगलीच्या घटनांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नोकरशाहीचा मस्तवालपणा वाढला. सरकारच्या धोरणामुळे सर्वच जातीधर्माचे, पंथाचे लोक नाराज आहेत. भाजपा सरकार अस्तित्वात आल्यापासून तसेच भाजपाशासीत राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ््राष्टाचार, गुन्हेगारी वाढली. सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सपशेल अपयशी ठरले आहेत. चार वर्ष उलटून गेले प्रचंड प्रमाणात बेकारी वाढली. महागाई दोनशे टक्यांनी वाढली. अशा सर्व स्थितीत एक रोष सरकारच्या विरोधात आहे. व्यवस्थेकडून वैयक्तिक कायद्यांमध्ये होणाऱ्या बदलाविरोधात सध्या देशभरातून विरोधाची लाट पसरली आहे. मग तो मुस्लिम समाज असो की दलित वा इतर मागासवर्गीय; सर्व थरांतून सरकारचा विरोध होत आहे. त्यामुळे जणू संपूर्ण देश पेटून उठला आहे. व्यवस्थेद्वारे निर्माण करण्यात आलेल्या या दंगलसदृश वातावरणाचे खापर सरकारी हस्तक्षेपाचा विरोध करणाऱ्यांवरच फोडले जात आहे. एकीकडे न्यायालयाने एखाद्या याचिकेच्या किंवा खटल्याच्या अनुषंगाने सरकारला हस्तक्षेपाबाबत विचारणा करायची आणि दुसरीकडे सरकारने आपण जनतेच्या बाजूने आहोत असे भासवून आपल्याला हवा तसा निवाडा निघण्यासाठी न्यायव्यवस्थेला बाध्य करायचे कारस्थान शासनाने थांबवावेत. सरकारच्या वैयक्तिक हस्तक्षेपाचा दूरगामी परिणाम आपल्या देशातील सौहार्दपूर्ण वातावरणावर होईल.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget