Halloween Costume ideas 2015
June 2020

सूरह यूनुसच्या आयतीचा मागील अंकात उल्लेख करण्यात आला आहे. ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर विश्वास बाळगणाऱ्यांच्या आणि ‘दीन’च्या मार्गात त्रास सहन करणाऱ्याच्या आणि ‘ईमानी’ (श्रद्धावंताच्या) जीवनासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या आणि अज्ञानतेच्या शासनाशी संघर्ष करणाऱ्यांच्या बाबतीत आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘लहुमुल बुश्रा फ़िलहयातिद्दुनिया व फ़िल-आ़िखरति.’’ अर्थात- त्यांच्यासाठी शुभवार्ता आहे या जगातही आणि यानंतर येणाऱ्या जीवनातदेखील.

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्ट निश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ विंâवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी).

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचात्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि

(१०१) तो तर आकाशांचा व पृथ्वीचा आविष्कारक आहे, त्याची कोणी संतती कशी असू शकेल  ज्याअर्थी त्याची कोणीही जीवनसाथी नाही? त्याने प्रत्येक वस्तू निर्माण केली आहे व त्याला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.
(१०२) हा आहे अल्लाह तुमचा पालनकर्ता, कोणीही ईश्वर त्याच्याव्यतिरिक्त नाही, प्रत्येक वस्तूचा निर्माता. म्हणून तुम्ही त्याचीच भक्ती करा आणि तो प्रत्येक वस्तूचा रक्षणकर्ता आहे. (१०३) दृष्टी त्याला पाहू शकत नाही पण तो दृष्टीला पाहत असतो. तो अत्यंत सूक्ष्मदर्शी आणि जाणकार आहे.
(१०४ ) पाहा, तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून डोळे उघडणारा प्रकाश आला आहे आता जो डोळसपणे कार्य करील तो आपलेच भले करील आणि जो आंधळ्याप्रमाणे करील तो स्वत:चे नुकसान करून घेईल. मी तुमच्यावर काही पहारेकरी म्हणून नव्हे!६९
(१०५) अशाप्रकारे आम्ही आमचे संकेत वरचेवर विविध प्रकारे विशद याकरिता करतो की या लोकांनी म्हणावे, ‘‘तुम्ही एखाद्याकडून शिकून आला आहात.’’ आणि ज्या लोकांना ज्ञान आहे त्यांच्यावर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी.७०
(१०६) हे पैगंबर (स.), त्या ‘वह्य’ - दिव्य अवतरणाचे अनुसरण करीत जा जे तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरले आहे कारण त्या एका पालनकर्त्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही. आणि त्या अनेकेश्वरवादींच्या पाठीमागे लागू नका.
(१०७) जर अल्लाहने इच्छिले असते तर या लोकांनी अनेकेश्वरत्व (शिर्क)केलेच नसते. तुम्हाला आम्ही त्यांच्यावर संरक्षक नेमलेले नाही की रखवालदारदेखील नाही.७१ आणि (हे मुस्लिमांनो),
(१०८) हे लोक अल्लाहशिवाय ज्याचा धावा करतात त्यांचा उपहास करू नका, एखादे वेळेस असे होऊ नये की ते अनेकेश्वरत्वा (शिर्क)च्या पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाहचा उपहास करू लागतील.७२


६९)    हे वाक्य अल्लाहचे बोल (कलाम) आहेत परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारा अदा होत आहे. ज्याप्रमाणे कुरआनचा अध्याय अल् फातिहा अल्लाहची वाणी आहे, परंतु दासांच्या मुखाने म्हटली जाते. कुरआनमध्ये संबोधित लोक सतत बदलत असतात. ते संबोधन कधी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी होते तर कधी श्रद्धावंतांशी (ईमानधारकांशी) होते. कधी ग्रंथधारकांशी, तर कधी विद्रोहीशी कधी अनेकेश्वरवादींशी संबोधन होते. कधी कुरैश लोकांशी तर कधी अरबांशी तर कधी समस्त मानवांशी संबोधन होते. परंतु मूळ उद्देश मात्र संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शन व मानवकल्याण हाच असतो, त्याच प्रकारे संबोधन करणारेसुद्धा अनेकदा बदलत राहतात. कधी संबोधन करणारा अल्लाह तर कधी दिव्य प्रकटन आणणारे फरिश्ते (देवदूतांचा समुदाय) तर कधी पैगंबर मुहम्मद (स.) आणि कधी श्रद्धावंत लोक तरीसुद्धा या सर्व संबोधनात वाणी ही एकच असते आणि ती म्हणजे अल्लाहची वाणी आहे. ``मी तुमच्यावर निरीक्षक (पहारेकरी) म्हणून नियुक्त नाही.'' म्हणजे माझे काम फक्त एव्हढेच आहे की या ज्ञानप्रकाशाला तुमच्यासमोर ठेवावे. यानंतर डोळे उघडून पाहाणे अथवा न पाहाणे तुमचे काम आहे. माझी ही जबाबदारी नाही की ज्यांनी स्वत:हून डोळे बंद केले आहेत त्यांचे डोळे बळजबरीने मी उघडावे आणि ते जे पाहू इच्छित नाही ते त्यांना सक्ती करून मी दाखवावे.
७०)    हेच सूरह २ (अल्बकरा) आयत २६ मध्ये सांगितले गेले आहे. मच्छर (डास) आणि कोळी इ. उदाहरणे ऐकून सत्यशोधक तर त्या सत्याला प्राप्त् करतात जे अशी उदाहरणे देऊन सांगितले जाते. परंतु जे नकारावर दृढ आहेत पक्षपाती आहेत. ते उपरोधाने म्हणतात की अल्लाहच्या वाणीत या तुच्छ वस्तूंचा उल्लेख करणे काय कामाचे? हाच विषय येथे वेगळया शैलीत सांगितला गेला आहे. सांगायचा  उद्देश  म्हणजे  ही  वाणी  लोकांसाठी  कसोटी  बनली  आहे. ज्याद्वारा  खोट्या  व  खऱ्या उपदेशाची शिकवण यात दिली गेली आहे त्यापासून लाभान्वित होतात. या विपरीत दुसऱ्या प्रकाराची माणसे आहेत जे अल्लाहच्या वाणीला ऐकून व वाचून बोध घेण्याऐवजी संभ्रमात पडतात. त्यांना वाटते की या पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असे लिखाण आणले कोठून? आणि ज्याअर्थी विरोध व पूर्वग्रहदूषितपणा पूर्वीपासूनच यांच्या मनात भरलेला असल्याने हा कुरआन अल्लाहकडून अवतरित झाल्याचे मान्य न करता इतर सर्व कपोलकल्पित कुभांडे रचतात आणि अशा प्रकारे पटवून देतात की जणूकाही त्यांनी या ग्रंथाच्या स्त्रोताचा शोध लावला आहे.
७१)    म्हणजे तुम्हाला निमंत्रक (दायी) आणि प्रचारक बनविले आहे कोतवाल नव्हे. तुमचे काम फक्त हेच आहे की लोकांच्या समोर या ज्ञानप्रकाशाला ठेवावे आणि सत्याला प्रकट करण्याच्या कर्तव्याला पार पाडण्यात आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करण्यात कसर ठेऊ नका. याउपर या सत्याला कोणी स्वीकारत नसेल तर नसो, लोकांना सत्यवादी बनवूनच सोडावे या कामावर तुम्हाला मुळीच लावलेले नाही. तुमच्या जबाबदारीत आणि उत्तरदायित्वात याचा समावेश नाही की तुमच्या कार्यक्षेत्रात एकही असत्यवादी राहाता कामा नये. म्हणून आंधळयांना कसे डोळस बनवावे आणि जे डोळे उघडून पाहू इच्छित नाही त्यांना कसे दाखवावे या चिंतेत तुम्ही आपल्या मनाला विनाकारण त्रस्त करू नका. जगात कोणीच असत्यवादी राहाता कामा नये असे अल्लाहला अपेक्षित असते तर हे काम तुमच्याकडून करून घेण्याची काय आवश्यकता होती? काय तो एका संकेतात सर्व मानवांना सत्यवादी बनवू शकला नसता? त्याचा हा उद्देश मुळातच नाही. उद्देश हा आहे की मनुष्याला सत्य व असत्याला निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. सत्यप्रकाश त्याच्यासमोर ठेवून त्याची परीक्षा घेतली जावी की दोघांपैकी तो कोणता मार्ग निवडतो? म्हणून तुमच्यासाठी योग्य हेच आहे की जो सत्यप्रकाश (इस्लामी जीवनपद्धती) तुम्हाला दाखविण्यात आला आहे, त्याच्या प्रकाशात सरळमार्गावर स्वत:चालावे आणि दुसऱ्यांना या सरळमार्गाचे आवाहन करत राहावे. जे सत्य आवाहनाला कबूल करतील त्यांना आपलेसे करा आणि त्यांची साथ कदापि सोडू नका. मग असे लोक जगाच्या दृष्टीने कितीही तुच्छ का असेनात. जे याला कबूल करणार नाहीत त्यांच्यामागे मुळीच लागू नका. ज्या विनाशाकडे ते स्वत: जाऊ इच्छितात व जाण्यास आग्रही आहेत त्यांना त्यांच्या विनाशाकडे जाऊ द्या. ७२) हा उपदेश पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांचे अनुसरण करणाऱ्यांना दिला आहे. आपल्या प्रचारकार्याच्या त्वेषात अतिउत्साहित होऊन त्यांनी अनियंत्रित बनू नये यामुळे शास्त्रार्थ व वादविवाद सीमेपलीकडे जाऊन मुस्लिमेतरांच्या श्रद्धेवर तीव्र आक्रमण करणे व धर्मगुरूंना व उपास्यांना शिवीगाळ करण्यापर्यंत जातो व यामुळे ते सत्याकडे न येता त्यापासून अतिदूर जातील.

भिवंडी (जिल्हा- ठाणे)
सामाजिक कार्यअंतर्गत मुंबईच्या उपनगर भिवंडी शहरातील एक मक्का मशिद आहे येथे कोविड 19 रूग्णांसाठी विनामूल्य ऑक्सीजन व्यवस्था पुरविण्यात येत आहे.

ही सेवा भिवंडी पूर्व स्थानिक जमात ए इस्लामी हिंद (JIH), मुव्हमेंट फाॅर पिस अॅड जस्टिस आणि शांती नगर येथील या मशिदीच्या ट्रस्टच्या वतीने उपलब्ध केले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रूग्णांसाठी ऑक्सीजन सिलिंडर आणि पांच खाटांची सोय केली आहे. याशिवाय जमात ए इस्लामी हिंदचे कार्यकर्ते घरपोच ऑक्सीजन सिलिंडरची सेवाही विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत.

भिवंडी निजामपूर क्षेत्रात सध्या कोरोना विषाणूचा प्रकोप वाढला असून 1,332 पेक्षा अधिक सकारात्मक रूग्ण आढळे आहेत आणि 88 पिडीत मृत झाले आहेत. येथील मृत्यूदर ५.२६ टक्के एवढा असून राज्याच्या उच्च मृत्यूदरा एवढा हा मृत्यूदर आहे. संक्रमण अचानक वाढल्याने शहरातील स्वास्थ्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रूग्णांसाठी पर्याप्त उपचार आणि कोरांटीन सुविधांचा अभाव झाला आहे. स्थानिक पातळीवर 3 जुलैपर्यंत संपूर्ण शहरात लाॅकडाऊन केले आहे.

"भिवंडी- निजामपूर येथे कोरोना व्हायरसचा प्रभाव सर्वांधिक आहे. हे ठिकाण अतिशय गजबजलेले आहे. त्यामुळे संसर्ग अधिक प्रमाणात वाढत आहे. येथे स्वास्थ्य सेवा उचित प्रमाणात उपलब्ध नाही. बहुतेक डाॅक्टरांनी संसर्गाच्या भितीने आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. अधिकांश लोकांना आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाहीये आणि उपचारावरील खर्च पेलणारे नाही. म्हणून आम्ही आमच्या परीने ही सेवा पुरवून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे," ही माहिती जमात ए इस्लामी हिंद भिवंडीचे स्थानिक अध्यक्ष औसाफ अहमद फलाही साहेबांनी दिली.

या सेवेचा लाभ आत्तापर्यंत 70 पेक्षा अधिक रूग्णांनी लाभ घेतला आहे.ते आता स्वस्थ्य आहेत.15 रुग्णांना त्यांच्या घरी ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले.सर्व जाती धर्मांचे नागरीक या सुविधेचा लाभ घेत आहेत.

"खिदमत ए खल्क(मानवतेची सेवा ) ही सेवा इस्लामच्या मुळ सिध्दांतांपैकी एक आहे. मशिद फक्त नमाज पढण्यासाठी नाही तर आसपासच्या परिसरातल्या लोकांच्या कल्याणकारी कामाचे एक सामुदायिक केंद्र असतें. सध्या 'मक्का मशिद' कोरोना व्हायरस या महामारीने आणि लाॅकडाऊनमुळे बंद आहे. आम्ही याचा सदुपोयग करण्याचा निर्णय घेतला, जेथे रूग्णांना मदत मिळावी.ज्यांना दुसरीकडे उपचार घेणे शक्य नाही त्यांना येथे या सुविधेचा लाभ घेता यावा," असे शांती नगर मशिदचे ट्रस्टी कैसर मिर्झा साहेबांनी सांगितलं.

रसिक मायबाप हो, गेली सुमारे तीन महिने टाळेबंदीमुळे आम्ही आपल्या मनोरंजनासाठी तमाशा सादर करू शकलो नाही. त्यासाठी आपली माफी मागून परत आपल्या सेवेत रुजू होत आहोत. तशी तर आमच्या कलाकारांची तमाशा सादर करण्याची कधीपासूनच तयारी होती, पण या करोनाच्या संकटामुळे जनाची नाहीतर निदान मनाची तरी वाटून त्यांनी स्वतःला आवरून ठेवले होते. आता मात्र त्यांना आवरून ठेवणे आम्हालाही शक्य नसल्यामुळे आपल्या मनोरंजनासाठी सादर करीत आहोत, ‘मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!' आता ज्या घराच्या अंगणात कुरकुरणारी खाट असेल ते घरही तसंच असेल आणि त्यात राहणारी माणसंही तशीच असतील हे वेगळं सांगायला नकोच. तमाशा सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला त्यातल्या पात्रांचा, कथानकाचा थोडक्यात परिचय करून देतो म्हणजे मग प्रत्यक्षात तमाशा बघतांना तुम्हाला त्याचा पूर्णपणे आस्वाद घेता येईल.
तमाशाचं स्थळ - एक मोडकळीस आलेलं भाड्याचं घर, ज्याच्या अंगणात एक जुनाट, कुरकुरणारी खाट पडलेली आहे. वेळ - थोडी कटकट करण्याची तर बरीचशी तडजोड करण्याची.
थोडक्यात कथानक - तीन बेघर ज्यांची स्वतःचं तर सोडाच पण स्वतंत्रपणे भाड्याचंही घर घेण्याची ऐपत नाही ते ज्याची तशी थोडीफार का होईना पण ऐपत आहे, त्याची जिरविण्यासाठी एकत्र येतात; आणि एक मोडकळीस आलेलं घर पाच वर्षांच्या भाडेकराराने घेतात. तिघांकडे जेमतेमच पैसे असल्यामुळे मोडकळीस आलेल्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला जातो. अगदीच बेघर असण्यापेक्षा हे काय वाईट आहे, असा विचार त्यामागे असतो. तिघांचे विचार अगदीच भिन्न असल्यामुळे आणि पूर्वी सुस्थितीत असतांना एकमेकांची भरपूर निंदानालस्ती केलेली असल्यामुळे, गृहप्रवेशापासूनच त्यांच्यात मतभेद सुरू होतात. आपल्याला बाहेरच्या अंगणात एका कुरकुरणाऱ्या खाटेवर उपाशी बसवून इतर दोघे मात्र आतल्या खोलीत सागवानी पलंगावर डनलपच्या गादीवर बसून मेवा - मिठाई खात आहेत, हे लक्षात आल्यावर तिसरा अस्वस्थ होतो. त्या अस्वस्थतेतून पुढे जे काही घडतं ते म्हणजे हा तमाशा, 'मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!'

पात्र परिचय

१)    कुरकुरणाऱ्या खाटेवर बसलेली म्हातारी - कोणे एकेकाळी या बार्इंचा फार दरारा होता. देशभरात कुठेही गेल्या तरी त्यांना आलिशान बंगला राहण्यासाठी मिळत असे, ताटात मिष्टान्न पडत असे, पण बार्इंना काळाची बदलणारी पावलं ओळखता आली नाहीत, म्हणून आज त्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. असे असले तरी या घरातील इतर दोन भाडेकरूंना या म्हातारीने भांडवल पुरवल्यामुळेच या घरात राहायला मिळालं आहे. असे असूनही ते या म्हातारीला वाळीत टाकल्यासारखी वागणूक देत आहेत म्हणून तिची चिडचिड होते आहे, पण या दोघांशी जमवून घेतले तरच आपल्याला ही या घरात राहता येईल, नाहीतर या दोघांसोबत आपल्यालाही बेघर व्हावं लागेल हेही म्हातारी ओळखून आहे, म्हणूनच थोडीशी कुरकुर करण्यापलीकडे ती फार काही करत नाही.

२)    ‘दै. हमरीतुमरी'चे संपादक - हे महाशय आपल्या वर्तमानपत्राच्या नावाला जागून नेहमीच कोणाशी ना कोणाशी हमरीतुमरीवर येत असतात. अगदीच कोणी नाही मिळालं तर हे आपल्या कार्यालयातील भिंतांrशीच हमरीतुमरीवर येतात असे यांच्याच कार्यालयातील कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात. आपल्या धन्याला खूश ठेवण्यासाठी हे कोणावरही ‘सुटतात', पण धन्याने पट्टा ओढला की त्याच माणसाच्या घरी जाऊन, कमरेतून झुकून त्याला कुर्निसात घालतात आणि परत निर्लज्जपणे तो फोटो आपल्या दैनिकाच्या पहिल्या पानावर छापतात! यांच्या हातात लेखणी आल्यानंतरच ‘माकडाच्या हाती कोलीत' हा वाव्âप्रचार वापरात आला असावा असा कयास आहे. वास्तविक यांचा आणि या घराचा फारसा संबंध नाही, पण आपल्या धन्याला हे घर मिळवून देण्यासाठी यांनी अनेकांची मनधरणी केली असे म्हणतात. त्यासाठी यांना आपल्या धन्याची मनधरणी करण्याचा अनुभव कामी आला असावा. तसे थोरल्या धन्याला, मधल्या धन्याला यांनी व्यवस्थित सांभाळले, पण धाकटे धनी यांचा वेळोवेळी पाणउतारा करीत असतात. असे असले तरी धन्याचे घर सोडले तर बाहेर आपल्याला कवडीचीही किंमत नाही हे माहीत असल्यामुळे, ‘दुभत्या गाईच्या लाथा गोड' मानून हे सर्व काही सहन करीत असतात.

३)    घड्याळवाले काका - या काकांच्या हातातलं घड्याळ नेहमीच फसवी वेळ दाखवत असतं, म्हणून यांच्या नादी लागणारा फशी पडत असतो. हे काका अत्यंत व्यवहारकुशल असून, आपण स्वतंत्रपणे घर घेऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर, जे घर आपण भांडण करून सोडलं होतं त्याच घरात परत जाण्यातही यांना काहीच वावगं वाटत नाही. हे बारा गावचं पाणी प्यायलेले असल्यामुळे सर्व यांना वचकून असतात. कात्रजचा घाट हे यांचं आवडतं स्थळ. अनेकांना यांनी तो दाखवलेला आहे. यांनी स्वतःचा पुतण्या तर सांभाळलाच आहे, पण इतरांच्या पुतण्यांनाही नादी लावण्यात यांचा हातखंडा आहे. यांच्या या कलेमुळेच काही जण यांना ‘भानामती -कर' म्हणून संबोधतात! आपल्या तारुण्यात पावसात भिजत गाणं म्हणण्याची हौस भागवण्याचे राहून गेल्यामुळे आता हे भर पावसात सभा घेऊन दुधाची तहान ताकावर भागवून घेतात म्हणे! खासगीत यांच्याबद्दल बोलतांना कोणी काहीही बोलत असले तरी जाहीरपणे बोलतांना त्यांची नेहमीच स्तुती केली जाते. हे मोडकळीस आलेलं घर भाडे करार पूर्ण होइपर्यंत टिकवून ठेवायचं की मधेच मोडून टाकायचं, हे सर्वस्वी यांच्याच हातात आहे म्हणे.
तर रसिकहो हा झाला, आमच्या तमाशातील पात्रांचा परिचय आणि थोडक्यात कथानक. आता हे मोडकळीस आलेलं घर आधी मोडून पडतं की भाडेकरूंना भाडे करार संपण्यापूर्वीच ते सोडून जावं लागतं? त्यानंतर या तिघांपैकी कोणी दुसरा घरोबा करून नवीन घर मिळवितो का? एखादा बोकोबा जसं शिंक केंव्हा तुटते आणि लोण्याचा गोळा केव्हा आपल्या तोंडात पडतो म्हणून त्या शिंकेकडे डोळे लावून बसलेला असतो तसं कोणी यांच्या मोडकळीस आलेल्या घराकडे डोळे लावून बसला आहे का?  या तिघांपैकी कोणी त्याच्यासोबत नवीन घरात जाण्यासाठी हे घर मोडून इतर दोघांना वाऱ्यावर सोडेल का?या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तयार राहा. लवकरच आपल्या पुढे आमच्या नेहमीच्या यशस्वी कलावंतांच्या संचात सादर करीत आहोत, ‘मोडकळीस आलेलं घर आणि कुरकुरणारी खाट!'

-    मुकुंद परदेशी, मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

सध्या हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.पण बळीराजा त्याचा फार फायदा झाला नाही. कारण हरित क्रांती केवळ भ्रांती ठरली. हरित क्रांतीने उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे,रासायनिक खते,यंत्रे,अवजारे बाजारात आणली. उत्पादन वाढीची ही आयुधे खरेदी करण्यासाठी शेतकèयाला आधी स्वत:जवळचा पैसा खर्च करावा लागला. उत्पादन तर भरपूर येऊ लागले,पण खर्चाच्या मानाने योग्य दर मात्र मिळत नाहीत.कारण आवक वाढत राहिल्याने गरजेपेक्षा जादा माल बाजारात येऊ लागला. त्यामुळे गेल्या वीस-बावीस वर्षांत शेतीतले उत्पादन दुप्पट वाढले,पण शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले नाही. उत्पादन वाढ म्हणजे मालाची आवक वाढ, आवक वाढ म्हणजे भाव कमी अशा चक्रात शेतकरी पिळला जात आहे.शेती विकसित करण्यासाठी करावयाच्या सुधारणांसाठी काढलेले कर्ज शेतीतील उत्पन्नातून कधीच फिटत नाही असे अभ्यासान्ती शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांनी म्हटले होते आज देखील हे समीकरण बदललेले नाही.
कापूस उत्पादकाचे उदाहरण घ्या किंवा नाशिकच्या द्राक्ष उत्पादक, राज्यातील ऊस उत्पादक, फळ बागायतदार, भाजीपाला उत्पादक यांनाही कर्ज काढून साधनसामग्रीसाठी प्रचंड पैसा गुंतवावा लागतो.मात्र प्रत्यक्ष शेतीच्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड होत नाही. अशातच दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशी नैसर्गिक आपत्ती आली, तर त्यातून सावरायला अनेक वर्षे लागतात. मग कर्ज फिटणार कसे? एकवेळ कर्जमाफी हे त्याचे उत्तर नाही. शेतकèयाचे आर्थिक गणित त्याच्या शेतीभोवतीच फिरते.बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी, वाहतूक, कर्जावरील व्याज इत्यादीत तो पिचला जातो आहे. यातून काही राहिले, तर तो प्रपंच चालवतो?
आयुष्यमान योजनेचे कौतुक पंतप्रधान करीत असले तरी शेतकरी ज्या खर्चाना सामोरे जातो त्यात त्याच्या घरचे लग्नसोहळे किंवा मुलांचे शिक्षण याशिवाय दैनंदिन आर्थिक गरजा शेतीतील उत्पन्न भागवू शकत नाही त्याच्या कौटुंबिक खर्चाचे उत्तर सरकारच्या कोणत्याच योजनेत नाही. आज जिथे महिना 50हजार वेतन मिळविणाऱ्याच्या हाती महिना अखेरीस काही उरत नाही, तिथे शेतीतील उत्पादनाची शाश्वती नसलेल्या शेतकèयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. शेतातील उत्पन्न मासिक तर नसतेच,पण जेव्हा केव्हा येईल, तेव्हा ते स्वत:साठी वापरता येईल अशीही परिस्थिती नसते. मग कौटुंबिक खर्चासाठी तर त्याला बँक कर्ज देणार नाही. मग तो सावकाराचे दार ठोठावतो.
एकीकडे बँकेचे कर्ज फिटत नाही नि दुसरीकडे सावकारी कर्जाचा आकडाफुगत जातो. बँकांचे कर्ज वेळेवर परत केले नाही, तर ते घरापर्यंत तगादा लावायला पोहोचतात. जिल्हा बँकांना व राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकऱ्याची थोडी जाणीव तरी असते,पण पतपेढया किंवा अर्बन बँका तर शेतकèयाला कोर्टातच उभे करतात.यातून निर्माण झालेला तणाव शेतकèयाच्या जीवनात अंधार निर्माण करतो. शेतमालाची बाजारपेठ म्हणजे कसायाच्या हाती शेतकèयाची मान आहे मुकीबिचारी कुणी ही हाका अशी अवस्था शेतकèयाची अद्यापही आहे.
कधी कृषी उत्पादन बाजार समितीत गेलात, तर माणसांची मान कापणाèया असंख्य कसायांची फौज तेथे पाहायला मिळते. व्यापारी, आडते, हमाल, मापाडी या रूपात हे कसाई दिसतात. शेतमालाच्या दर्जाबद्दल व्यापारी नेहमीच नाक मुरडतो, तर आडत्या आवक जास्त झाल्याने कसे भाव पडले हे सांगतो. मालाचे मोजमाप होण्यासाठी हमाल मापाडयांची मिनतवारी करीत त्यांच्या मागे मागे फिरावे लागते. अशी विनवणी करताना त्याला अपमानितही व्हावे लागते.अलीकडे आवक जादा होते, मग शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली जातात.परंतु ते एक नाटक असते. कारण ही केंद्रे कधी बारदानाअभावी, तर कधी गोदामे रिकामी नाहीत म्हणून बंद असतात.
त्यामुळे योग्य दर मिळण्याची वाट न पाहता बाजारात नेलेल्या मालाला काहीही दर मिळो, शेतकरी तो विकून मोकळा होतो. खरे म्हणजे त्याला माल विकायची फार घाई होऊन जाते.
बाजारातला दर योग्य वाटला नाही म्हणून आपला माल परत नेणारा शेतकरी शोधूनही सापडणार नाही. म्हणून ग्रामीण भागात एक म्हण आहे, मेलेला मुडदा आणि शेतातलं पिक परत घरी न्यायचं नसतं. त्यामुळे कष्टाची परिसीमा गाठून काढलेल्या मालाची अशी हेटाळणी बाजारपेठेत होताना दिसते. यंदा शासनाने बाजारात नियमन मुक्ती आणली. म्हणजे शेतमालावरील आडतसारखे कर रद्द झाले तरी चालूच आहेत.व शेतकरी आपला माल कुठेही विकायला मोकळा झाला. परंतु आडते नि व्यापारी इतके चलाख आहेत की, त्यांना शेतकèयाला कापायची लागलेली चटक सहजासहजी कशी दूर होणार?
शेतकèयाचा माल ठरवून कमी दरात लिलाव काढून त्यांनी बदला घेतला. हमी भावापेक्षा कमी दरात शेतमाल विकला जाऊ नये, असा आदेश असताना शेतकऱ्याच्या कमी दरात माल विकायला भाग पाडले जाते.मोदी सरकारचे धोरण या दुष्टचक्रात पिचणाèया शेतकऱ्याना वरदान ठरले नाही. अशातच गारपीट, अवकाळीने झोडपणे, सध्या मान्सूनपूर्व पावसाचा कहर बघता, नैसर्गिक आपत्ती म्हणजे प्रत्यक्ष मरणच होय असे म्हणावे लागेल.शेती हा पूर्णार्थाने निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे कधी कोणती नैसर्गिक आपत्ती येईल हे सांगता येत नाही. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कधी वादळ तर कधी गारपीट. ही संकटे शेतकèयाच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. या संकटामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त होऊन जातो. अलीकडच्या चार-पाच वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट एकामागोमागच्या वर्षात आली. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला मागील तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी मोडून पडला आहे त्यात कोरोनाची आपत्ती म्हणजे शेतकèयाची खड्डा खोदणारी समस्या ठरली आहे. त्यापुढे सरकारने जाहीर केलेले पॅकेज काहीच नाहीत.
गारपिटीने अतिवृष्टी दुष्काळाने नुकसान झाले तर पंचनाम्यांबाबत तत्परता दिसून येत नाही. शिवाय झालेल्या नुकसानीच्या किमान 50 टक्के तरी मदत मिळायला हवी. परंतु हेक्टरी 3 हजार व तीदेखील 2 हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. दुसरे वर्ष उलटले तरी जाहीर केलेली मदत अनेक शेतकऱ्याना मिळालेली नाही. हे उदाहरण कापूस, ज्वारी उत्पादकांचे. फळ बागायतदारांची अवस्थाही वेगळी नाही. पीकविम्याची स्थिती फारशी वेगळी नाही.देशाच्या संरक्षणाइतकेच शेतकèयाचे संरक्षण महत्त्वाचे मानणारे सरकार या देशात ज्यादिवशी येईल तो सुदिन म्हणायला हवा.–सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

गुलाम रसूल गलवान यांची गाथा, ज्यांच्या नावानेच ओळखले जाते गलवान खोरे

Gulam Rasool Galwanही गाथा त्या गुलाम रसूल गलवानची आहे. ज्यांचे नाव गलवान खोऱ्याला देण्यात आले ही आहे. हेच ते गलवान खोरे जे भारत आणि चीनच्या सैनिकांत झालेल्या हिंसाचारानंतर
जगभरात चर्चेत आहे. याच ठिकाणी भारताने आपले 20 सैनिक गमावले. याच दरम्यान गलवान कुटुंब लेहच्या बाजारापासून जगभरात प्रसिद्धीला आले. या भागाचे नाव याच कुटुंबातील पूर्वजाच्या नावावर ठेवण्यात आले आहे. गलवान गेस्ट हाऊस जगात तर सोडाच लेहमध्ये सुद्धा एवढा प्रसिद्ध कधीच नव्हता. लेह बाजारात सुद्धा त्याच्या कुठेही चर्चा नव्हत्या. ताशी नावाची व्यक्ती आम्हाला या कुटुंबियांच्या घरात घेऊन गेली. सध्या सर्वत्र या कुटुंबियांची चर्चा आहे असे ताशीने सांगितले. घराच्या बाहेरच गुलाम रसूल गलवान यांची चौथी पिढी काही अभ्यास करताना पाहायला मिळाली. त्यामुळे, पहिला प्रश्न आम्ही त्यांनाच केला. यात आपले पंजोबा गुलाम रसूल गलवान यांच्याबद्दलची माहिती आपल्याला गेल्या आठवड्यातच मिळाली असे या मुला-मुलींनी सांगितले. आईने त्यांना आपल्या आजोबांच्या वडिलांबद्दलची माहिती टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांनंतर दिली होती.
मोहम्मद अमीन हे गुलाम रसूल गलवान यांचे नातू आहेत. विविध माध्यमांकडून त्यांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याने ते सध्या व्यस्त आहेत. त्यांच्याकडे खाण्या-पिण्यासाठी सुद्धा वेळ नाही. लेहच्या यूरटुंग परिसरात ते एक छोटेसे गेस्ट हाउस चालवतात. तत्पूर्वी ते सरकारी कार्यालयात क्लार्क होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले.
मोहम्मद अमीन आपल्या आजोबांची गाथा सांगायला लागले. ते हीच गोष्ट मीडियावाल्यांना एकसारखीच ऐकवत आहेत. गलवान खोऱ्याचे नाव कसे पडले आणि तुमचे आजोबा काय करतात? याशिवाय मीडियावाल्यांकडे दुसरा प्रश्नच नाही. असे अमीन म्हणाले.
गलवान यांचे नातू मोहम्मद अमीन व त्यांचे कुटुंबीय.

12 वर्षांचे असताना गाइड होते आजोबा

अमीन मोठ्या अभिमानाने आपल्या आजोबांबद्दल सांगतात की, माझे आजोबा वयाच्या 12 व्या वर्षी गाइड होते. 10 दिवस पायी चालत ते लडाख ते जोजिला दर्रा पार करून काश्मीरला जायचे. 1888 मध्ये असेच एकवेळ इंग्रजांसोबत ट्रेकिंग करताना ते काराकोरम जवळून अक्साई चीन मार्गे जात होते. त्याचवेळी ते लोक एका उभ्या डोंगरावर अडकले. पुढे जाण्यासाठी रस्ताच दिसत नव्हता. त्यावेळी माझ्या आजोबांनी मार्ग काढला आणि सर्वांना वाट मोकळी करून दिली. ते चपळ आणि बुद्धीमान होते. त्याचवेळी इंग्रजांनी खुश होऊन त्या खोऱ्याला माझ्या आजोबांचे नाव दिले. अमीन पुढे म्हणाले, माझ्या आजोबांना दोन मुले होती. एक माझे वडील आणि एक काका. 30 मार्च 1925 रोजी आजोबांचे निधन झाले. त्यावेळी माझे वडील खूप लहान होते. अमीन सांगतात की सर्वप्रथम आपल्या आजोबांची गोष्ट त्यांना त्यांच्या वडिलांनीच सांगितली होती. कसे आजोबा कुठेही निघून जायचे हे देखील माझे वडील सांगायचे.

आजोबांच्या आठवणीत केवळ एक पुस्तक

मोहंमद अमीन यांच्याकडे आपल्या आजोबांची आठवण म्हणून केवळ एक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी 1995 मध्ये प्रकाशित केले होते. अमीन यांच्या मते, त्यांच्याकडे या पुस्तकाशिवाय आपल्या आजोबांचा दुसरा फोटो नाही. लेहमध्ये ज्या ठिकाणी गुलाम रसूल राहत होते. त्या ठिकाणी आता एक संग्रहालय आहे. त्यांचे घर आणि सभोवतालची जागा इंग्रजांनीच त्यांना दिली होती. चीन सध्या जमीनीवर दावा करत असल्याचे ऐकून अमीन म्हणाले, माझे आजोबा भारतीय होते आणि जमीन त्यांच्या नावे होती. मग चीन त्या जमीनीवर आपला दावा कसा करू शकतो. माझे कुटुंबीय आजही गलवान खोरे पाहू इच्छितात. परंतु अजुनही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. अमीन यांनी तक्रार देखील केली की हे पुस्तक काश्मीरींनी प्रिंट केले. तसेच प्रिंट करण्यापूर्वी आम्हाला सांगितले सुद्धा नाही.

- उपमिता वाजपेयी,
साभार : दिव्य मराठी

हल्ली सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येने सर्व देश हुरळून गेला आणि प्रत्येक मीडियात याविषयी सध्या चर्चा सुरु आहे.
सुशांत सिंह सारख्या आणि त्यापूर्वीही बऱ्याच यशस्वी व प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीने असे पाऊल उचलावे ही बाब अनेक प्रश्नांवर विचार करायला लावते. 
उर्दू कवी एब्रत सिद्दीकी यांनी एकदा म्हटले होते, ‘‘खुदकुशी जुर्म भी है सब्र की तौहीन भी है, इसलिए इश्क में मर मर के जीया जाता है।’’
आत्महत्या हा गुन्हा आहे असा ओळीचा पहिला भाग. भारतातील मेंटल हेल्थ केअर विधेयक संमत करून फोल ठरला आहे. परंतु आत्महत्या हा नेहमीच संयमाचा अपमान मानला गेला आहे.
आत्महत्या ही जागतिक पातळीवर मानवी समाजासाठी एक गंभीर समस्या आहे. एका आकडेवारीनुसार, आत्महत्येमुळे दर ४० सेकंदात एक जीव गमावतो. आत्महत्या हे १५ तो ३५ वयोगटातील तरुणांमधील मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. भारतात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोक आत्महत्या करतात आणि दरवर्षी ६००,००० कुटुंबे आत्महत्येने बाधित असतात. युद्ध आणि हत्यामुळे होणार्या एकूण मृत्यूंपेक्षा आत्महत्येने होण्याचे प्रमाण जास्त आहे. आत्महत्येची ही प्रवृत्ती कोणत्याही विशिष्ट सामाजिक वर्र्गाची नसून ती संपूर्ण समाजासाठी एक समस्या बनली आहे. पुरुष, महिला, वृद्ध, मुले, सुशिक्षित, अशिक्षित, शेतकरी, व्यावसायिक, कवी, कलाकार आणि राजकारणी प्रत्येक जण आत्महत्याग्रस्त असल्याचे दिसते. प्रसिध्द इंग्रजी मॅग्ज़ीन ‘द वीक’ने २००८ मध्ये केलेल्या सर्वेनुसार ७२ टक्के लेखक, ४२ टक्के कलाकार, ४१टक्के राजकारणी आणि ३६टक्के विचारवंत आत्महत्या करतात किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आत्महत्येचे हेतू भिन्न आहेत. सामाजिक, मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय ही आत्महत्येस प्रवृत्त करणारी प्रमुख कारणे आहेत. काही मानसिक व वेदनादायक शारीरिक आजार एखाद्या व्यक्तीस आत्महत्येसारखी कठोर कृती करण्यास भाग पाडतात. आत्महत्येची अनेक कारणे आहेत. सामाजिक कारणे- डेविड इमाईल दुर्खीम यांनी आपल्या पुस्तकात आत्महत्येच्या सामाजिक कारणांवर प्रकाश टाकला आहे. दुर्खीम हे एक प्रेंâच सामाजिक विचारवंत होता. त्यांनी ‘ले सुसाइड’ या पुस्तकात आत्महत्येची पुढील कारणे दिली आहेत.
१.    अहंकारी आत्महत्या- जेव्हा समाजातून हाकलून दिले जाते तेव्हा एखाद्या व्यक्तीची अशी भावना विकसित होते की त्याने समाजाला कायमचे सोडून द्यावे, म्हणूनच तो आत्महत्या करतो.
२.    परोपकारी आत्महत्या- सामाजिक ध्येय गाठण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देणे ही आत्महत्यादेखील आहे. त्याचे एक उदाहरण सतीच्या रूपाने भारतात प्रचलित आहे.
३. अनैसर्गिक दबावाखाली आत्महत्या– आयुष्यात अनपेक्षित बदल एखाद्या व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात निराश होऊ शकतात. उदाहरणार्थ, एक श्रीमंत माणूस अचानक गरीब होतो, एक अनपेक्षित बिघाड होतो, एक आघात होतो इ. या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीच्या आत्मघातकी प्रवृत्ती उद्भवू शकतात प्रसिद्ध कवी जोश मलिहाबादी यांनी या वृत्तीचे वेडेपणा, स्वप्रेम किंवा स्वार्थ म्हणून वर्णन केले आहे.
औस्रfसन्य आणि आत्महत्या- औस्रfसन्य ही मानसिक आणि वैद्यकीय स्थिती आहे जी आत्महत्येच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. जागतिक पातळीवर, प्रत्येक पाचपैकी तिसरा व्यक्ती या आजारासाठी डॉक्टरला भेटतात. ‘डब्ल्यूएचओ’ने २१ व्या शतकातील रोगांच्या यादीमध्ये औस्रfसन्यला प्रथम स्थानावर ठेवले आहे. युनेस्कोच्या मते, जगभरातील ५० टक्के मुले तणावग्रस्त वातावरणात वाढतात, ज्यामुळे त्यांना नैराश्य येते. भारतातील ७२ टक्के विद्याथ्र्यांना नैराश्याला कसे तोंड द्यावे याची माहिती नसते. विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या प्रवृत्तीमध्ये हे अज्ञानदेखील एक प्रमुख घटक आहे.
पौगंडावस्थेतील आत्महत्या करण्याच्या प्रवृत्ती आणि स्मार्टफोन- आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी, आधुनिक काळाचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे स्मार्टफोनचा वारंवार वापर. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळले आहे की किशोरवयीन मुलांनी वेळ मोबाइल स्क्रीनवर घालवल्यामुळे त्यांचे नैराश्य आणि आत्महत्येचा धोका वाढतो. ‘क्लिनिकल सायकॉलॉजिकल सायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जे लोक मोबाइल किंवा संगणकाच्या पडद्यापासून दूर खेळ खेळण्यात, मित्रांना भेटण्यात आणि घरातील कामे करण्यात जास्त वेळ घालवतात ते तुलनेने अधिक आनंदी असतात. तसेच ४८ टक्के किशोरवयीन मुले जी पाच किंवा अधिक तास इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात, त्यांची आत्महत्या करण्याची मानसिकता असते. हिंसक देखावे, नैराश्य आणि शेवटी, आत्मघाती खेळ मुलांवर मानसिक परिणाम करीत आहेत. ब्ल्यू व्हेलसारखे गेम किशोरांना वेगवेगळ्या नावांनी आकर्षित करीत आहेत ज्यांना एका धोक्याच्या गजरेची घंटा म्हणून पाहिले पाहिजे.
जागतिक आत्महत्या प्रतिबंधक पुढाकार-
‘डब्ल्यूएचओ’च्या अंदाजानुसार आत्महत्यांमुळे मृतांची संख्या २०२० पर्यंत १५ दशलक्ष वाढू शकते. आत्महत्या ही सार्वजनिक आरोग्य समस्या आहे जी जगभरातील सर्व हिंसक मृत्यूंपैकी निम्मे आणि कोट्यवधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान आहे. आत्महत्या रोखण्यासाठी १० सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आंतरराष्ट्रीय आत्महत्येचे प्रतिबंधन’ या नावाने एकत्रित येण्याचे २००३ पासून सुरु करण्यात आले आहे. ‘वल्र्ड
सुसाइड प्रिव्हेन्शन डे’द्वारे ही गोष्ट निश्चित करण्याचे प्रयत्न करण्यात येते की या सामाजिक विषयावर लोकांचे मतप्रवाह सुव्यवस्थित व्हावे आणि आत्महत्या रोखून समाजातील हा त्रास दूर करण्यासाठी विविध उपक्रम, धोरणे आणि योजना तयार केल्या पाहिजेत. आत्महत्येचा प्रयत्न- हा जगभरातील कायदेशीर गुन्हा म्हणून ओळखला जात आहे. परंतु आता आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांच्या यादीतून दूर करण्याचा जागतिक प्रयत्न आहे. भारतासह जवळपास सहा देशांनी या संदर्भात प्रगती केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला एका वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली. परंतु ७ ऑगस्ट २०१६ रोजी भारत सरकारने मेंटल हेल्थ केअर विधेयकास मंजुरी दिली. म्हणूनच, ज्याने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यास दोषी ठरवण्याऐवजी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपचार दिले जातील.
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने वापरकत्र्यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रवृत्ती समजून घेण्यासाठी काही व्यवस्था केली आहे, ज्यामुळे त्यांना आत्महत्या करणारे लोक ओळखण्यात मदत होईल आणि त्यांना या कृतीतून सुरक्षित राहावे म्हणून त्यांना वेळेवर मदत मिळेल. ही सुविधा जागतिक स्तरावर वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न आत्महत्या रोखण्यात किती प्रमाणात सक्षम असतील हे केवळ येणारा काळच सांगेल, कारण हे प्रयत्न ‘वोही कत्ल भी करे हैं वो ही ले सवाब उल्टा’ सारखं आहे. इस्लामिक मार्गदर्शक- इस्लाम आत्महत्येपासून बचावासाठी एक उत्तम मार्गदर्शक आहे. सर्वप्रथम हे महहत्त्वाचे आहे की एखादी व्यक्ती मुस्लिम आहे आणि तिचीr आत्महत्येची प्रवृत्तीही असेल असे होऊ शकत नाही. मुस्लिम समाजात या साथीच्या घटना फारच कमी आहेत. कारण इस्लामने मानवी जीवनाचा उद्देश आपल्या अनुयायांना स्पष्ट केला आहे. कुरआन व सुन्नतच्या पुढील शिकवणींमुळे समाज आत्महत्येच्या शापातून मुक्त होऊ शकतो.
१) मृत्यू आणि पुनरुत्थान निर्माण करण्याच्या हेतूचे कुरआनात स्पष्ट करण्यात आले आहे, ‘जे चांगली कर्मे करतात त्यांची परीक्षा घेण्याचा हेतू आहे. जीवन हा ईश्वरप्राप्त आशीर्वाद आहे जो इस्लामने एका हेतूने जगण्याचा कार्यक्रम दिला आहे.
२) धैर्य हे बक्षिसाचे सर्वोत्तम स्रोत म्हणून वर्णन केले गेले आहे. श्रद्धा करण्याच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे उपासनेपूर्वी धैर्याला स्थान दिले गेले आहे. जगातील फक्त अधीर माणसेच आत्महत्या करतात. ३) आत्महत्या करणारे लोक निराशेच्या जोरावर आत्महत्या करतात. पण इस्लाम निराशेला निंदनीय ठरवितो.
४) चांगलं आणि वाईट नशीब म्हणजे ईश्वराकडुन आहे असा विश्वास माणसाला संतुलित विचार करायला लावतो.
५) त्रासलेल्याच्या अंत:करणांना समाधानी करण्याचा उत्तम मार्ग जो कुरआन दाखवतो ती अल्लाहची आठवण होय. ईश्वर अंतःकरणास आशीर्वाद देईल. ‘खरंच, अल्लाहची आठवण केल्याने अंतःकरणाला समाधान मिळते.' (पवित्र कुरआन)
६) आत्महत्या करणाऱ्यांबद्दल पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हदीसमध्ये कठोर आश्वासने देण्यात आली आहेत. ज्यामुळे व्यक्ती आत्महत्येच्या विचारापासुन परावृत्त होतो. कारण आत्महत्या करणारा स्वतःच्या जीवाला मारुन दुःखापासून मुक्ती मिळवत नसून मेल्यावर अधिक पापाचा भागीदार ठरतो.
‘‘अब तो घबराकर कहते है की मर जायेंगे,
मर के भी चैन न पाया तो किधर जायेंगे।’’
७) चांगली सोबत- अल्लाहच्या पैगंबरांनी श्रध्दावंतांना चांगल्या सहवासाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आत्महत्येची अनेक कारणे म्हणजे एकटेपणा. जरी एखाद्या व्यक्तीने चुकीची सोबत निवडली तरीही ती अवघड आणि एकटेपणाची आहे, परंतु तरीही तोटा आहे म्हणूनच, जे योग्य सोबत निवडतात ते जीवनातील वास्तविक आनंद घेण्यास समर्पित असतात. सध्याच्या युगात, तरुण लोकांसाठी सर्वोत्तम सोबत निवडण्याचे व्यासपीठ इस्लामी समुदायाशी जोडले जाणे आहे, जिथे असे मित्र आहेत ज्यांचे एकमेकांवर प्रेम आहे अल्लाहसाठी, जे जीवनाचा सर्वोत्कृष्ट आधारदेखील आहेत आणि जर जोडीदार निराश झाला तर तो त्वरित सांगतात.
‘‘खुदकुशी चुपके से करने नहीं देते मुझको, चंद चेहरे हैं जो मरने नहीं देते मुझको।’’
८) इस्लाम शहिदाच्या मृत्यूला आनंदाचा मृत्यू म्हणतो. इस्लामने केवळ जीवनमार्गच नव्हे तर आदर्श मृत्यूचे शिष्टाचारदेखील शिकवले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने स्वार्थामुळे आत्महत्या केली तर तो मरण पावला, परंतु जर तो अल्लाहने निवडलेल्या मार्र्गाने मरण पावला तर त्याला हुतात्म्याचा दर्जा प्राप्त होतो.
९)अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) प्रार्थनेला श्रध्दावंतांचे अस्त्र म्हणतात. त्यांनी उदासीनता, निराशा आणि आळशीपणाच्या मनोवृत्तीपासून ईश्वराचा आश्रय घेण्यास प्रोत्साहित करणारी प्रार्थना शिकविली. जर इस्लामच्या या मॉडेलचे सामान्यीकरण केले गेले तर समाजातून आत्महत्या नष्ट होऊ शकतात, या दाव्यासह असे म्हणता येईल.
ही समस्या तुमची नाही- ही समस्या आपली असू शकत नाही. परंतु आपण ज्या समाजात राहात आहोत त्या समाजात आपणास बऱ्याचदा असे लोक सापडतात ज्यांना जीवनाची चिंता असते आणि त्यातून मुक्त होऊ इच्छित आहे. अशा लोकांना मदत करणे आणि मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य आहे. आपण समाजात आढळणाऱ्या या आजाराच्या प्रतिबंधासाठी उभे राहिले पाहिजे. मानवी जीवनाचे रक्षण करणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. या क्षेत्रात विविध संघटना कार्यरत असून त्या लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. दुर्दैवाने या क्षेत्रात श्रध्दावंत समूह कुठेही दिसला नाही. खाली आत्महत्या रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या काही संस्था आणि हेल्पलाइन केंद्रांची माहिती दिली आहे. त्यांच्या कार्याचे आपण कौतुक केले पाहिजे. त्यांना समर्थन द्या आणि शक्य असल्यास आपणसुध्दा त्यांच्या समान प्रयत्न करा.

१) आसरा- मुंबईत १९९८ पासून पब्लिक चॅरिटी अ‍ॅक्टअंतर्गत नोंदणीकृत ही संस्था जीवनापासून निराश झालेल्या लोकांना फोनद्वारे, वैयक्तिकरित्या ऑनलाइन, आशादायी जीवन जगण्यास मदत करते. या संस्थेबद्दल अधिक माहिती www.aasra.info  या वेबसाइट वरून मिळू शकते.
२) www.suider.org  - ही एक ना नफा करणारी संस्था आणि वेबसाइट आहे, ज्याचा उद्देश आत्महत्या रोखणे, जनजागृती करणे आणि आत्महत्या करण्याच्या प्रवृत्ती असलेल्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करणे हा आहे. या वेबसाइटवर आत्महत्येसंदर्भात सर्व प्रकारच्या माहिती खालील वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
३) स्नेहा- चेन्नईस्थित ही संस्था जीवनात नैराश्याने ग्रस्त लोकांना भावनिक आधार देते. ही संस्था वेबसाइट, टेलिफोन व समोरासमोर बैठकीद्वारे समुपदेशन सेवा पुरवते. www.snehaindia.org
याव्यतिरिक्त अशा अनेक संस्था आणि वेबसाइट्स आहेत जे समुपदेशन पण करतात आणि ज्यांना स्वयंसेवा करण्याची आवड असणारे समुपदेशकसुध्दा तयार करतात. तर मित्रहो, समस्या प्रत्येकाला येतात पण खचून न जाता त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्या एकमेव ईश्वरावर श्रध्दा व विश्वास ठेवा. आणि आपले जीवन सुंदर बनवा, तो निश्चितच तुमच्यासोबत आहे. अधिक माहितीसाठी खालील टोल फ्री नंबरवर संपर्क करा : १८००२०००७८७

-डॉ. खालिद मोहसीन
(जालना) ९४०३०३२२९१

Ertugral Gazi
सध्या भारतीय उपखंडात ‘Ertugrul Ghazi’ नावाच्या एका महासिरियलची जोरदार चर्चा आहे. लहान मुलं, महिला, सामान्य जनांपासून ते उलेमा, परंपरावादी, अभ्यासक, विचारवंत व भाष्यकाराला त्यानं भुरळं पाडली आहे. बहुतेकजन त्याला एन्टरटेन्मेंट म्हणून बघत आहेत. ठराविक मंडळी त्यातून इस्लामचा सुवर्णकाळ समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
दिवाळीतच या सिरियलबद्दल कळालं होतं. काही इंटरनेशनल वेबसाइट वाचताना त्याचे रिव्ह्यूदेखील चाळले होते. पण तुर्की हुकूमशाहीचा प्रपोगंडा असेल म्हणून त्याला टाळलं. त्यातच इमरान खान (पाकिस्तान), महाथिर मुहंमद (मलेशिया) आणि अर्दोगान (तुर्की) यांनी यूरोपीयन अँटी इस्लामी प्रचाराविरोधात एकत्रिकरणाचा घाट घातला. पुढे इमरान खानने इस्लाम समजून घेण्यासाठी अर्तुग्रल गाजी पाहण्याचा सल्ला दिला. तरीही या सिरिजबद्दल मला कुतुहलता वाटली नाही. पण नेहरूमुळे तिथपर्यंत मी पोहोचलो. शुक्रिया चाचाजी..
शिवाय त्याची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय मला त्याकडे फिरकावसं वाटलं नव्हतं. म्हणून तुर्की राष्ट्रवाद समजून घेण्यासाठी लॉकडाऊनची मदत झाली. त्यात इस्लामवरची काही पुस्तके वाचली व त्यातून अर्तुग्रल समजून घेता आला.
अर्तुग्रल गाज़ी इस्लामचा सुवर्णकाळ सांगतोच पण इस्लाम वाचनाशी वैर धरून त्यावर टीका करणाऱ्या महाभागांना आपल्याकडे खेचतो, हे विशेष वाटलं. प्यार, सास-बहू, दोस्ती, शौर्य, दगा-फटका इत्यादी एन्टरटेन्मेंटचं सर्व (मसाला) सूत्र त्यात असल्यानं त्याला मनोरंजन मूल्य आहेच. शिवाय ती सत्यघटनेचा इतिहास असल्यानं त्याबद्दल जाणकारांना ओढ वाटते. ही केवळ काल्पनिक व पौराणिक कथा नाही तर इस्लामची जीवनपद्धती व तत्त्वज्ञान मांडणारे एक महासिरियल आहे.
सहज-सोपी समजणारी कथा, भुरळ टाकणारी दृश्यं, विलोभनीय नेपथ्य, निसर्गसौंदर्य सिरियलच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशा आहेत. संवाद म्हणून हदीस व कुरआनचे कोट वापरले आहेत. इस्लामिक फिलोसॉफीची सहज-सोप्या भाषेत ठिकठिकाणी मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या श्रद्धावंताला त्याची भुरळ पडणे सहाजिकच आहे. मला त्याच्या रिव्ह्यू करण्यात काडीचा रस नाही; पण इस्लाम समजून घेण्यासाठी ही सिरिज फार महत्त्वाचा रोल अदा करू शकते.
सुमारे ४५० एपिसोड आहेत. मूळ तुर्की भाषा असली तरी, इंग्रजी व उर्दू सबटायटल आहे. शिवाय - पाकिस्तानच्या सरकारी ‘पीटीव्ही’नं त्याचं ओघवत्या उर्दूत डब केलंय. सिरियलचा मुख्य गाभा न्याय्य तत्त्वावर आधारलेला आहे. शिवाय क्रुसेडची पार्श्वभूमी सांगणाऱ्या यूरोपीयन राष्ट्रवादाची क्रूरता, नृशंसता,अनैतिकता, अत्याचार, छल-कपट, दगा-फटका, ज्यू-खिश्चॅनिटी, कॅथोलिक-प्रोटेस्टंट वाद आदी प्रकरणे आपलं नागडं सत्य समोर घेऊन येतात.
सिरियल इस्लामच्या सहा शतकानंतरची पार्श्वभूमी कथन करतो. चंगेज खान व हलाकूनं अब्बासी खिलाफतची वाताहत लावली. त्यानंतरचा काळ आणि ऑटोमन साम्राज्य उभारणीचा पूर्वकाळ अशा दोन भागात अर्तुग्रल गाज़ीचा पट विस्तारलेला आहे. ऑटोमन साम्राज्याचा संस्थापक उस्मान यांच्या वडिलांची ही कथा आहे. ज्यांना सुमारे १०० वर्षे दीर्घ आयुष्य लाभलं होतं.
आधुनिक परिभाषेत काही जण या सिरिजला ‘इस्लामी साम्राज्यवाद’ म्हणतील. पण मी त्यापलीकडे जाऊन त्याची अशी व्याख्या करतो, भले हे इस्लामी साम्राज्यवाद असेल पण राज्यसंस्थेला व्रुâसेडप्रणित, अन्याय, अत्याचार व नृशंसतेच्या तावडीतून सोडवून आदर्श राज्यव्यवस्थेची पायाभरणी, इस्लामी न्यायशास्त्र, तत्त्वज्ञान, हदीसची फिलोसॉफी, सुन्नाहची जीवनपद्धती, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या समान न्यायाच्या तत्त्वावर आधारलेले शासन आणि इस्लामच्या श्रद्धाशील आदर्शावर नव-शासनप्रणालीची ही पुनर्स्थापना होती.
अभ्यासकांनी ही सिरिज अवश्य बघायला हवी, पण वाचनाशिवाय इस्लामवर टीका करणाऱ्यांनी, ज्यांना इस्लाम वाचायचा नाही पण त्यावर तोंडसुख घ्यायचे आहे अशांनी ही सिरिज जरूर बघावी. पौर्वात्यवादी विचारवंत-अभ्यासकांनी क्रुसेडची नृशंस हिंसा दडवून इस्लामला हिंसक धर्म ठरवला. त्यातून इस्लामचे राक्षसीकरण करण्याची जी स्पर्धा मध्ययुगातील इतिहास लेखकांनी राबवली तीच आजही आहे. इस्लामची शासनप्रणाली ही नैतिकता व न्याय्य तत्त्वावर आधारित होती आणि आहे. पण पैगंबर विरुद्ध मोझेस, पैगंबर विरुद्ध येशू असा संघर्ष तयार करून त्याआड इस्लामची नैतिकतेवर आधारित राज्यव्यवस्था नाकारली गेली. वर उल्लेखित सर्व प्रेषित किताबी मजहब (पुस्तकी धर्म) ला मानणारे होते. इस्लामने कुठल्याही प्रेषितांना नाकारले नाही. सर्वांचे सारखेच महत्त्व इस्लाम प्रतिपादितो. सर्वांना आदर, सन्मान देतो. पण अन्य किताबी धर्म पैगंबर मुहम्मद (स.) यांना नाकारतात. त्यांच्या लेखी ते नंतर आलेले साधारण मानव आहेत. त्यामुळे प्रेषित त्यांच्या आदर्श धर्म-पुरुषाचे (ईश्वराचे) महत्त्व कमी करतो. त्यामुळे त्यांनी फक्त पैगंबरांनाच नव्हे तर इस्लामला बदनाम करण्याचं षङ्यंत्र प्राचीन काळी आखलं. त्याविरोधात मोहिमा सुरू केल्या.
ज्यांना वाचायची सवड नसते, उसंत नसते, वेळ नसतो व इच्छा नसते अशांनी ही सिरिज जरूर बघावी. टाइमपास, एन्टरटेन्मेंट, मनोरंजन आदी मूल्यं जपून तुम्ही एका शानदार इतिहासाचे साक्षीदार होऊ शकता.

 - कलीम अजीम, 
अंबाजोगाई
(लेखकाच्या फेसबुक वॉलवरुन)

एखादे झाड जेव्हा आतून पोकळ होऊन वाळून जाते तेव्हा ते पाडण्यास वेळ लागत नाही आणि त्यासाठी कसलाही त्रास होत नाही. झाड कापणारा अतिशय सहजतेने आणि अल्पावधित ते कापून टाकतो. इतकेच नव्हे तर त्याची मुळेदेखील उखडून टाकतो. हीच स्थिती समुदायांची आणि सामाजिक गटांची असते. ज्या समुदायाला आपल्या परिस्थितीची जाण नाही, जो स्वत:च्या नीतिमूल्यांकडे, नैतिक तत्त्वांकडे दुर्लक्ष करतो, असा समुदाय मोठमोठी भाषणे आणि उपदेशांचे पहाड उभे करू शकतो, मात्र वास्तविक जगात त्याची स्थिती एका क्षुल्लक कणापेक्षा अधिक नसते. त्याची अवस्था आतून पोकळ झालेल्या झाडासारखी असते. असा समुदाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढू शकत नाही अथवा त्याचे जीवन नकोसे करणाऱ्या शत्रूशी दोन हात करू शकत नाही. जर आपल्याला देशातील सद्यस्थितीशी लढा द्यायचा असेल आणि आपली अस्मितेला वाचवायचे असेल तर शीर तळहातावर घेऊन सामना करण्याचे धैर्य पुरेसे नसून सर्वप्रथम स्वत:च्या अंत:करणात डोकावून पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण केली पाहिजे. माणूस आपल्या जीवनात जो व्यवसाय, छंद अथवा एखादे ध्येयाचा अंगीकार करतो तेव्हा तो त्यामध्ये खूप पुढे जाऊ इच्छितो. कारण यशाच्या शिखरावर पोहोचणे ही मानवी स्वभावाची गरज आहे. भूतकाळ आणि सद्य:स्थितीचे परीक्षणांती असा निष्कर्ष निघतो की जगातील बऱ्याच लोकांनी आपापल्या क्षेत्रात यशाचा ध्वज उंचावर आणि गंतव्यस्थान गाठले. परंतु अपयशी झालेल्या आणि स्वत:च्या गंतव्यस्थानाची तहान लागलेल्या लोकांची एक लांबलचक यादीदेखील आहे. हे यश आम्हाला येथे समजले पाहिजे. यश आणि अपयशामागे विविध कारणे असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आत्मिंचतनाचा अभाव होय. मानवी जीवनाच्या बारकाईने अध्ययनानंतर असे दिसून येते की ज्यांनी स्वत:ला जबाबदार धरले त्यांना त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी समोर आल्या आणि नंतर ज्यांना प्रगतीची आवड होती ते सकारात्मक बाजूकडे पुढे गेले. कठोरपणे चालत त्यांनी एकामागून एक मैलाचा दगड ओलांडला आणि नकारात्मक पैलूला यशाच्या मार्गातील एक दगड समजून तो आपल्या जीवनातून काढून टाकला. याउलट ज्यांनी हेतूपुरस्सर किंवा अजानतेपणी आत्मपरीक्षणाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच कारणास्तव आपल्या जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी माहिती नसलेले लोक केवळ आपल्याच क्षेत्रात अपयशी ठरले नाहीत तर अधोगतीच्या ढासळत्या खोल गुहेत जाऊन पडले. जगातील प्रत्येक माणसासाठी स्वत:चे उत्तरस्रfयत्व असणे आवश्यक आहे, जेणेकरून तो स्वत: प्रगती करू शकतो आणि यशाच्या मार्गावर जाऊ शकतो तसेच इतर लोकही त्यापासून लाभ घेऊ शकतात. वैयक्तिक जीवनात जसे उत्तरायित्व आवश्यक असते तसेच सामूहिक जीवनातदेखील उत्तरस्रfयत्व असते. एक राष्ट्र आणि येथील नागरिकाच्या नात्याने आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत? मुस्लिम म्हणून आपण जबाबदार असणे हे महत्त्वाचे ठरते. आपल्या समाजासाठी आवश्यक असलेले स्रfयत्व आपण निभावत आहोत काय याचे आत्मचिंतन आम्हास केले पाहिजे. आपल्या देशबांधवांप्रती आपल्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या आपण पार पाडत आहोत की नाही याचेही आपणास भान हवे. मात्र अतिशय दु:खाने आपणास मान्य करावे लागते की आपण आपल्या समाजाप्रती आणि देशबांधवांप्रती आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. सध्या भारतीय मुस्लिम समाजाल विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र दुर्दैवाने ते अनेक गटातटांमध्ये विभागले गेले आहेत आणि उत्तरस्रfयत्वाच्या प्रक्रियेमध्ये एका मंचावर एकत्रित येण्याचा प्रभावी मार्ग त्यांच्याकडून अवलंबताना दिसून येत नाही. अशा परिस्थितीत समस्या कधीच सुटत नाहीत आणि समाज त्यामध्ये गुरफटला जाऊन आगामी बिकट परिस्थितीचा सामना करणे भाग पडू शकते. जर जवळपास वीस कोटी मुस्लिमांनी आपली जबाबदारी ओळखून एकत्रितपणे आवाज उठविला असता तर आतापर्यंत अनेक समस्या सुटल्या असत्या. स्वत:ची जबाबदारी हे एक साधन आहे जे आपल्याला अपयशापासून दूर आणि यशाच्या जवळ नेते. म्हणूनच वैयक्तिक जीवन असो की सामूहिक जीवन अथवा धार्मिक गोष्टी असोत वा कौटुंबिक गोष्टी, आपण नेहमीच स्वत:च्या जबाबदारी आपले साधन बनविले पाहिजे जेणेकरून आपण नकारात्मक पैलू टाळून सकारात्मक बाबींचा अवलंब करू शकू आणि आयुष्यात यशस्वी होऊ. वैयक्तिक जीवनात जबाबदार राहण्याचा एकमेव सोपा व व्यावहारिक मार्ग म्हणजे आज जे काही योग्य आहे आणि जे अयोग्य आहे ते पाहण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी आपल्या रोजच्या दिनचर्येवर विचार करणे आणि मग चुकीच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करणे किंवा ते दुरुस्त करण्याचा एखादा मार्ग शोधणे आणि ईश्वराला योग्य कृत्यासाठी धन्यवाद देणे आणि या सर्व गोष्टींचा संकल्प सोडणे होय.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व : कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर

desert
हजरत अबुबकर यांचे निधन 23 ऑगस्ट 634 रोजी झाले. निधनापूर्वी ते आजारी होते व आपण या जीवघेण्या आजारातून  उठू शकणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी हजरत उमर रजि. यांना आपला उत्तराधिकारी निवडण्याचा विचार केला. याचे कारण असे होते की, प्रेषित सल्ल. यांच्या निधनानंतर सत्तेसाठी जी काही साठमारी झाली होती, त्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्यानंतर पुन्हा सत्तेसाठी मुस्लिमांमध्ये मतभेद होऊन रक्तपात होऊ नये, या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र याची घोषणा अचानकपणे न करता त्यांनी या संबंधीची पूर्वतयारी अतिशय योजनाबद्ध  पद्धतीने केली.
सर्वप्रथम त्यांनी आशरा-ए-मुब्बशरामधील प्रसिद्ध सहाबी अब्दुरहेमान बिन औफ रजि., हजरत उस्मान रजि. आणि हजरत अली रजि. यांच्याशी याबाबतीत सल्लामस्सलत केली. या तिघांनीही हजरत उमर रजि. यांना खलीफा करण्याबद्दल सकारात्मक मत दिल्यानंतर त्यांनी हजरत उमर यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपला निर्णय कळवला. त्यावर ह. उमर रजि. यांनी स्पष्टपणे सांगितले की, ’’एवढी मोठी जबाबदारी घेण्याची माझी अजीबात इच्छा नाही.’’ त्यावर हजरत अबुबकर यांनी सांगितले की, ’’तुमची इच्छा असण्या किंवा नसण्याचा इथे प्रश्न नाही. मला तुमच्यापेक्षा दूसरी योग्य व्यक्ती या पदासाठी दिसत नाही. म्हणून अपात्र व्यक्तीची निवड  करून मी अल्लाहला तोंड कसे दाखविणार? तुम्हाला या पदाची गरज नाही मात्र या पदाला तुमची गरज आहे. मी याबाबतीत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी सल्लामसल्लत करून हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे सर्व लोक तुम्हाला खलीफा म्हणून स्वीकारण्यास अनुकूल आहेत, म्हणून तुम्हाला हे पद घ्यावेच लागेल.’’ तेव्हा नाईलाजाने हजरत उमर रजि. खलीफा होण्यास होकार दिला.
यानंतर हजरत अबुबकर रजि. यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लोकांसमोर केली. त्यात त्यांनी सांगितले की, ’’मी माझ्या कुठल्याही नातेवाईकाला खलीफा म्हणून निवडलेले नाही. जो तुमच्यापैकी सर्वोत्कृष्ट आहे त्याचीच निवड मी केलेली आहे. कारण माझ्या दृष्टीने जनतेचे हित हेच सर्वोतोपरी आहे. मी हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना खलीफा म्हणून निवडलेले आहे. माझी ही निवड तुम्हाला मान्य आहे का?’’ त्यावर उत्स्फूर्तपणे उपस्थित लोकांनी त्यांच्या निवडीचे समर्थन केले. म्हणून अगदी सहज पद्धतीने सत्तांतर घडून आले. 23 ऑगस्ट 634 रोजी खलीफा अबुबकर रजि.यांचे निधन होताच 24 ऑगस्ट 634 रोजी त्यांनी खलीफा म्हणून शपथ घेतली व लगेच लोकांनी त्यांच्या हातावर हात ठेऊन एकनिष्ठतेची बैत (शपथ) घेतली.
हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे एक अतिशय कणखर, शिस्तप्रिय, न्यायप्रिय, उग्र, राकट, धाडसी आणि शूर होते. दुरून पाहणाऱ्यांना त्यांची भीती वाटे परंतु ज्यांचा त्यांच्याशी संपर्क होई, ते त्यांच्यातील उमदेपणा पाहून भारावून जात.
 हजरत उमर रजि. यांचा खिलाफतीचा कालावधी अतिशय गाजलेला कालावधी आहे. त्यांच्या कालावधीत इस्लाम बळकट झाला आणि इस्लामच्या सीमांचा विस्तार झाला.  हजरत उमर रजि. यांचा जन्म इ.स. 580 मध्ये ’अदि ’ या कुळात झाला. हे कूळ मक्का शहरातील प्रतिष्ठित जरूर होते पण सामार्थ्यवान   नव्हते. धार्मिक दृष्ट्याही या कुळाला बनू हाशीम आणि बनू उम्मैय्या सारखे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त नव्हते. मात्र हजरत उमर रजि. यांनी आपल्या अंगभूत कौशल्य आणि धाडसी स्वभावामुळे मक्का शहरामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नव्हती. ते लढाऊ प्रवृत्तीचे होते. न्यायासाठी लढण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांची एक कन्या हजरत हफ्सा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या सुविद्य पत्नी होत. मक्कामध्ये जे मुठभर लोक साक्षर होते त्यात हजरत उमर रजि. यांचा समावेश होता. त्यांना हिब्रु भाषा येत होती म्हणून ज्यू लोकांशी त्यांची चांगली मैत्री होती.
ते प्रेषित सल्ल. यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होते व कट्टर मूर्तीपूजक होते. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा इस्लामची घोषणा केली होती तेव्हा त्यांचा विरोध करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. ते इस्लामचा आणि प्रेषितांचा दुस्वास करीत, परंतु त्यांचे शौर्य आणि धाडसी स्वभाव पाहून प्रेषित सल्ल. सातत्याने अल्लाहकडे दुआ करीत की, ऐ अल्लाह! उमरच्या मनामध्ये इस्लामबद्दल प्रेम उत्पन्न कर. शेवटी ही दुआ स्विकारली गेली. वयाच्या तिसाव्या वर्षी हजरत उमर रजि. यांनी इस्लामचा स्वीकार केला. इस्लामचा स्वीकार करण्याचा त्यांचा किस्साही रोमहर्षक असा आहे.
ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा मक्का शहरामध्ये मुर्तीपूजक कुरैश हे इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा सर्व शक्तीनिशी विरोध करीत होते. तरीही हळूहळू लोक इस्लामचा स्वीकार करीतच होते. ह्या गोष्टीची हजरत उमर रजि. यांना चीड येत होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्ल. यांची हत्या करून हा विषय कायमचा संपविण्याचा निर्णय घेतला व एका दिवशी तलवार हातात घेऊन प्रेषित सल्ल. यांचा शोध घेत निघाले. रस्त्यात त्यांचा एक मित्र नईम बिन अब्दुल्लाह त्यांना भेटला. त्याने हजरत उमर रजि. यांचा अवतार पाहून विचारले, ’’ हे उमर एवढ्या त्वेषामध्ये कुठे निघालात?’’ त्यावर हजरत उमर रजि. उत्तरले, ’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा खून करण्यासाठी निघालो आहे.’’ आज त्यांचा आणि इस्लामचा नायनाट करूनच थांबेन. त्यावर त्यांचा मित्र हसून म्हणाला, ’’अगोदर आपल्या घराची काळजी घ्या’’ तुमची सख्खी बहीण ह.फातेमा रजि. आणि मेव्हणा ह.सईद रजि. दोघेही मुस्लिम झालेले आहेत.’’ हे ऐकताच हजरत उमर रजि. यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी थेट मोर्चा बहिणीच्या घराकडे वळविला. घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर कुरआन पठणाचा ध्वनी आला. ह.उमर रजि. वादळासारखे बहिणीच्या घरात घुसले. त्यांचा उग्र अवतार पाहून कुरआन पठण करणाऱ्या खब्बाब रजि. कुरआनच्या आयाती लपवून ठेवल्या व लपून बसले. उमर यांनी मेव्हण्याला दरडावून विचारले ’’तुम्ही काय वाचत होते?’’ तेव्हा मेव्हण्यांनी काही उत्तर दिले नाही. म्हणून चिडून ह. उमर रजि. यांनी मेव्हण्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांना सोडविण्यासाठी ह.फातेमा रजि. मध्ये पडल्या तर त्यांनाही जबर मारहाण केली. इतकी की त्यांचे डोके फुटून चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यांच्या बहिणीने त्वेषाने हजरत उमर रजि. यांना उत्तर दिले की, ’’ हो! माझ्या शरीरातही खत्ताब यांचे रक्त आहे. मी आणि माझ्या पतीने इस्लामचा स्वीकार केलेला आहे. तुला काय करायचे ते कर, आम्हा दोघांना ठार मार. पण लक्षात ठेव इस्लामची घौडदौड तू मूळीच रोखू शकणार नाहीस.’’ बहिणीचा रक्तबंबाळ चेहरा आणि तिचे कणखर व आत्मविश्वासाने भरलेले बोलणे ऐकताच ह.उमर यांचा राग खर्रकण उतरला. ते शांत झाले व त्यांनी मेव्हण्याला तुम्ही काय वाचत होतात ते माझ्यासमोर वाचून दाखवा, अशी विनंती केली. तेव्हा बहिणीने सांगितले, तू अगोदर गुस्ल (स्वच्छ होणे) कर, पवित्र हो आणि नंतर कुरआन ऐक. त्यावर ह.उमर यांनी अंघोळ केली व कुरआन ऐकण्यासाठी निमुटपणे येवून बसले. तेव्हा लपून बसलेले हजरत खब्बाब रजि. बाहेर आले  त्यांनी त्यांच्या समोर कुरआनच्या आयातींचे खालीलप्रमाणे पठण केले. ’’ताहा ! आम्ही तुम्हांस कष्ट देण्यासाठी हे कुरआन अवतरलं नाही. पण जे भितात त्यांच्यासाठी मात्र हे बोध घडविण्यासाठी आहे. ज्यानं ही धरती आणि उंच-उंच आकाशं निर्माण केलीत त्याच्याकडून अवतरलेला. (जो) महान कृपावंत राजसिंहासनावर आरूढ आहे. आकाश आणि पृथ्वीत आणि त्यांच्या उभयंतात आणि जमिनीखाली सर्वकाही त्याच्याच मालकीचं आहे. तुम्ही मोठ्यानं बोलला तरी आणि जे काही गुप्त अथवा लपलंय ते सर्व त्यास ठाऊक आहे. अल्लाहशिवाय कुणी ईश्वर नाही. सारी सुंदर नावं त्याचीच आहेत.’’ (कुरआन - सुरे ताहा :आयत नं.1-8)
उमर यांनी सुरवातीच्या या आयाती ऐकल्या आणि ऐकतच राहिले. ह. खब्बाब रजि. यांनी दुसऱ्या आयातीचे पठण केले, ’’निश्तिच मीच अल्लाह आहे, माझ्याव्यतिरिक्त कुणी ईश्वर नाही. तेव्हा माझी आराधना करा आणि माझ्या आठवणीसाठी नमाज कायम करा.’’(कुरआन-सुरे ताहा : आयत नं.14)
या आयातींचा जादूसारखा परिणाम ह.उमर रजि. यांच्यावर झाला. ते म्हणाले, ’’निःसंशय हा ईश्वरीय कलाम (साहित्य) आहे’’ त्यांनी बहिण आणि मेव्हण्याची माफी मागितली आणि सरळ घराबाहेर पडले आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. ज्या ठिकाणी आपल्या अनुयायांना दर्स (मार्गदर्शन) देत बसले होते त्या घरासमोर गेले. दारावर तैनात सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. त्यावर ह.उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपण भेटीला आल्याची बातमी देण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना तशी बातमी दिली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आत बोलावून घेतले. प्रेषित सल्ल. म्हणाले, ’’ बोला उमर कसे काय आलात ? चांगल्यासाठी आलात का वाईट करण्यासाठी आलात?’’ त्यावर हजरत उमर रजि. नम्रपणे उत्तरले, ’’ हे प्रेषित सल्ल. मी आपला सच्चा अनुयायी बणून इस्लामचा स्विकार करण्यासाठी आलोय.’’ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुस्लिमांनी , ’’अल्लाहु अकबर!’’ (अल्लाह श्रेष्ठ आहे) च्या घोषणा दिल्या आणि हजरत उमर रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या हातावर हात ठेऊन बैत घेतली आणि इस्लाम व प्रेषित सल्ल. यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय व्यक्त केला.
हजरत उमर रजि. यांनी ज्या दिवशी इस्लामचा स्विकार केला त्याच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी हजरत हम्जा रजि. यांनी इस्लाम स्वीकारला होता. ते ही मक्केतील एक मोठे प्रस्थ होते. या दोन धाडसी लोकांनी इस्लाम स्वीकारल्याने इस्लाम मानणाऱ्यांच्या गटात चैतन्य पसरले तर कुरैशच्या गटामध्ये नैराश्य पसरले.
हजरत उमर रजि. यांच्या द्वारे इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे इस्लामी इतिहासाला कलाटणी मिळाली. इस्लाम स्वीकारताच त्यांनी त्याची जाहीर घोषणा केली. त्यांनी व हजरत हम्जा रजि. यांनी मुस्लिमांच्या एका गटाला घेऊन काबागृहामध्ये जावून तवाफ (काबागृहाला 7 प्रदक्षिणा घालणे)  केला आणि आपण मुस्लिम झाल्याची सार्वजनिकरित्या घोषणा करून टाकली. या दोन योद्धयांच्या इस्लाम स्विकारण्याच्या घटनेमुळे मूर्तीपूजक कुरैशच्या गटामध्ये खळबळ माजली. हजरत उमर रजि. यांच्या या धाडसी कृतीचा सन्मान म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ह. उमर रजि. यांना ’अल-फारूक’ (सत्य आणि असत्यामध्ये फरक करणारा) ही पदवी बहाल केली. त्यानंतर हजरत उमर रजि. हे हजरत उमर फारूख रजि. या नावाने ओळखले गेले आणि आजही ओळखले जातात.
जेव्हा मुस्लिमांनी मदिनामध्ये हिजरत केली तेव्हा ती गुप्तपणे केली होती. पण ह. उमर रजि.यांना अशी गुपचूप हिजरत मान्य नव्हती. प्रेषित सल्ल. यांनी जेव्हा त्यांना मदिना येथे जाण्याचा आदेश दिला. तेव्हा ते सर्वप्रथम काबागृहामध्ये गेले. तलवार उपसून काबागृहाचा तवाफ केला आणि उपस्थित कुरैश लोकांच्या दिशेने तलवार फिरवून म्हणाले की, ’’तुमचा सर्वनाश होओ! मी मदिनेला जात आहे. कोणाला आपल्या पत्नीला विधवा करायचे असेल तर त्याने समोर येऊन मला थांबवावे.’’ त्यांना अडविण्याची कोणीच हिम्मत केली नाही आणि ते छाती पुढे करून ऐटित काबागृहातून निघाले ते थेट मदिनेला पोहोचले.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे त्यांच्या शब्दाला फार मान होता. ह. अबुबकर रजि. यांच्यानंतर प्रेषितांकडे त्यांचे स्थान होते. त्यांनी प्रेषित सल्ल. यांना जे-जे सल्ले दिले होते त्यापैकी 21 सल्ले असे होते, ज्यांचे समर्थन दस्तुरखुद्द कुरआनच्या आयातींच्या मार्फत झाले. ते प्रेषितांवर जीवापाड प्रेम करीत होते. एकदा अशी घटना घडली की, त्यांच्या घरी एक ज्यू आणि एक मुस्लिम व्यक्ती आले व त्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. त्यांच्यापैकी ज्यू व्यक्तीने गयावया करत ह. उमर रजि. यांना सांगितले की, ’’प्रेषित सल्ल. यांनी आमची गाऱ्हाणी ऐकूण माझ्यातर्फे निर्णय दिलेला आहे.’’ त्यावर हजरत उमर यांनी त्या मुस्लिम व्यक्तीला विचारले की, ’’हा सांगतोय ते बरोबर आहे का? ’’ त्याने सांगितले की हो बरोबर आहे पण मला तुमच्याकडून न्याय हवा. तेव्हा हजरत उमर रजि. रागाने बेभान झाले आणि म्हणाले, ’’ठीक आहे. दोन मिनिटे थांब. मी न्याय देतो.’’ ते आत गेले, तलवार आणली आणि एका झटक्यात त्या मुस्लिम व्यक्तीचे डोके धडावेगळे केले. या घटनेवरून त्यांच्याकडे प्रेषित सल्ल. यांच्या शब्दाला किती मान होता, याचा अंदाज येतो.
त्यांनी इस्लामपूर्व काळात तीन विवाह केले होते. इस्लाम स्विकारल्यानंतर त्यांच्यापैकी एकाच पत्नीने इस्लाम स्विकारला होता. तेव्हा त्यांनी इस्लाम न स्विकारणाऱ्या दोन पत्नींना घटस्फोट देऊन टाकला. त्यांना एकदा कळाले की, प्रेषित सल्ल. यांच्या पत्नींमध्ये काही कारणांमुळे इर्ष्या निर्माण झाली असून, त्यात त्यांची मुलगी हफ्सा सुद्धा सामील आहे. तेव्हा त्यांनी तिचे मुंडके छाटण्याचा इरादा प्रेषित सल्ल. यांच्यासमोर व्यक्त केला होता. तसेच त्यांनी हफ्सा मार्फत प्रेषितांच्या अन्य पत्नींकडेसुद्धा तीव्र शब्दात त्यांच्या इर्ष्यात्मक वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे प्रेषित सल्ल. यांच्या अन्य पत्नीसुद्धा त्यांना वचकून असत.
दि. 24 ऑगस्ट 634 रोजी द्वितीय खलीफा म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी ह. अबुबकर रजि. यांचा सन्मान म्हणून स्वतः खलीफा हे बिरूद लावण्याचा इन्कार केला. तेव्हापासून लोकांनी त्यांना ’अमीरूल मोमीनीन’ म्हणजे मुस्लिमांचा नेता म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली. शपथ गृहण केल्यानंतर त्यांनी जे भाषण केले ते खालीलप्रमाणे, ’’ हे श्रद्धावानहो अबू बकर रजि. आता आपल्यात नाहीत. दोन वर्ष नेतृत्व देऊन ते अल्लाहकडे परत गेले आहेत. ते अत्यंत समाधानी असतील की, त्यांनी अथांग सागरात तुफान वादळात सापडलेली मुस्लिम राज्याची नौका सुरक्षितपणे वल्हवीत किनाऱ्याला नेली. धर्मत्यागाविरूद्धचे युद्ध त्यांनी यशस्वी करून दाखविले. त्यांना धन्यवाद असोत. आता अरबभूमीत इस्लाम सर्वोच्च झालेला आहे. तो आता पुढच्या मार्गावर आहे. आता बायझॅन्टाईन व पर्शिया या बलाढ्य साम्राज्यविरूद्ध अल्लाहच्या नावाने आपला जिहाद चालू आहे...’’
’’ह.अबू बकर रजि. नंतर खलीफापदाचे दायित्व माझ्यावर येऊन पडलेले आहे. मी या पदाची आकांक्षा कधीही धरलेली नव्हती. मी आश्वासन देतो की, या पदामुळे माझ्यावर पडलेल्या अनिवार्य जवाबदाऱ्या व कर्तव्य इस्लामच्या आज्ञेनुसार व माझ्या कुवतीनुसार पार पाडण्याचा मी प्रामाणिक व अहर्निश प्रयत्न करीत राहीन.’’
’’ या माझ्या कार्यात मी पवित्र ग्रंथाचे मार्गदर्शन घेईन व प्रेषितांनी व पहिल्या खलीफांनी घालून दिलेल्या परंपरांचे अनुसरण करीन... जर मी या मार्गापासून विचलित झालो, तर मला दुरूस्त करा.’’ (28-116).
कठोर बनव, मृदू बनव !
यानंतर त्यांनी पुढील प्रार्थना म्हटली व प्रत्येक वेळी ’आमीन’ (तथास्तु) असे म्हणण्यास लोकांना सांगितले :
’’हे अल्लाह! मी कठोर आहे. सत्याच्या प्रस्थापनेसाठी,
तुझ्या आज्ञा अमलात त्यांच्याविरूद्ध मला कठोर बनव...
’’ हे अल्लाह ! मला दांभिकतेपासून मुक्त ठेव. माझा दृढनिश्चय वाढव, जेणेकरून मी जे काही करीन ते केवळ तुझ्या प्रसन्नतेसाठीच असेल...
’’हे अल्लाह ! माझे हृदय श्रद्धावानांसाठी दयाळू बनव, जेणेकरून त्यांच्या गरजांकडे मी समर्पणबुद्धीने लक्ष देऊ शकेन...
’’ हे अल्लाह ! तुझ्या आज्ञापालनात मी कमी पडल्यास मला कार्यप्रवण कर व माझी श्रद्धा वृद्धिंगत कर.. आत्मपरीक्षण करण्याची मला शक्ती दे...’’
हे अल्लाह ! मला कुराणाचा अर्थ समजण्याची बुद्धी व त्यानुसार वागण्याचे सामर्थ्य प्रदान कर..’’ सदरच्या भाषणाचा संदर्भ : चार आदर्श खलीफा, लेखक : डॉ. शेषराव मोरे, पान क्र. 155).

- एम.आय.शेख

Education
नुकताच एमपीएससीचा निकाल लागला. यात नु मुस्लिम समाजाच्या 3 मूली आणि एक मुलगा उत्तीर्ण झाले. यावरून आरक्षण आवश्यक आहे ते अन्याय होतो या सर्व बाबींचा परामर्श होतो आहे. हे योग्य ही आहे, किमान या निमित्याने चर्चा तरी घडू दे...    मात्र आम्ही मुस्लिमांच्या शैक्षणिक मानसिकतेवर प्रकाश टाकणाऱ्या काही बाबींचा इथे स्वयं अनुभवावरुन उल्लेख करणार आहोत.
   आमचा जन्म गड़चिरोली चा. अत्यंत मागास, आदिवासी बहुल जिल्हा. मुस्लिमांची एक मोठी वस्ती. आमचे वडील रेवेन्यू इन्स्पेक्टर असल्याने आमचे घर बस स्टँड जवळ, म्हणजे आजही जिथे मुख्य पोलिस स्टेशन आहे, त्याच्या समोर, मुस्लिम वस्तीपासून बऱ्याच अंतरावर होते. आम्ही वडीलांसह नमाजला मुस्लिम वस्तीत असलेल्या मस्जिदीत जायचो. तिथेच मदरसा ही होता, तिथेहि जायचो. वडील शासकीय नौकरीत असल्यामुळे शिक्षणाचे महत्व जाणत होते. त्यांनी आम्हा सर्व भाऊ-बहिणीना शिकविले. घरात सर्व ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रज्यूएट. दोन्ही ताई आणि मी शिक्षकी पेशात. मोठा कॉन्ट्रेक्टर, मजवे भाऊ फूड इंस्पेक्टर होते, राजीनामा देऊन कॉन्ट्रेक्टर झाले.
       वडिलांनी मोठ्या ताईस आणि भावंडास मराठीतूनच शिकविले. मला रामपुरी प्राथमिक मराठी शाळेत टाकले. पुढे शिवाजी महाविद्यालयातून बीकॉम, बीएड, नागपुरला एमए, एमएड, एमफिल, एमएफए वगैरे...
    काळ 1969-70 चा! या लहानपणी एक वेगळाच भाषिक तनाव पुढे आला. मुस्लिम वस्तित एक उर्दू शाळा होती. 4 थी पर्यन्त. या शाळेची कमेटी हिच मशिदिची कमेटी होती. जे मौलाना मदरसा शिकवायचे, ते उर्दू शाळेतही शिकवायचे आणि दूसरे जनाब देखील होते. अर्थात, मौलाना बिहारचे होते.
      मौलाना म्हणायचे, उर्दू ये अपनी जबान है. तहजीब की और मजहब की भी.मुस्लिम बच्चों को इसी जबान में पढ़ना चाहिए. मराठी  जबान अपनी नहीं है और उससे जबान तो खराब होती ही है और तहजीब भी! मजहब से भी बच्चे दूर हो जाते है... हे वाक्य ते मदरस्यात देखील बोलायचे...!
    घरी आल्यावर वडिलांना विचारल्यावर वडील एवढेच बोलले, उनका सुनने का, मदरसा जाओ, लेकीन इधर मराठी स्कूल में पढ़ने जाओ!
     मदरशात शिकविन्याची पद्धत छडीबाज होती. जबरदस्त मार पडायची. मौलाना क़ुरानच्या आयती पाठ करायला लावायचे, ते झाले नाही की जबरदस्त हातावर, तंगडीवर आणि पाठीवर मार! मदरशात 20-22 मुले आणि 15-16 मूली असायच्या. बहुतेक गरीबच! एकाध दूसरा मध्यमवर्गीय! सर्वांच्या मनात मौलानाजींच्या माराची जबरदस्त भीति. रोज कुणाला ना कुणाला जबर मार पडतच असे! घरी सांगायची सोय नाही! कारण क़ुरआन शिकणे हे पवित्र कार्य आणि मौलानाजींचा जबरदस्त मानसन्मान आणि भीतियुक्त आदर पाहून लहान तोंड उघडतच नव्हते! मिळणारा मार आणि पुढ़े आयात पाठ झाली नाही की पडणार असलेला जबरदस्त मार या भीतिने तेव्हा दूसरे काहीही सूचत नव्हते आणि संपूर्ण लक्ष पूर्ण ताकदिनीषि त्या आयाती पाठ करण्यावरच असायचे! आयाती पाठ करताना मेंदुच्या पाठांतरन् शक्तिचा कस लागायचा!
       जेव्हा मी स्वतः एमएड, एमफील झाल्यावर, त्या शैक्षणिक पद्धतिचा आणि त्या लहाणपणाची चिकित्सा करताना मुस्लिम विद्यार्थ्यांच्या लहाणपणीच्या घुसमटीचा मानसिक द्वंद्व ओळखू शकलो!
   त्या काळी मराठी शाळेत फक्त मी एकटा मुस्लिम विद्यार्थी! बाकी सर्व उर्दू शाळेत. कुणीही मुसलमान आपल्या मुलाला मराठी शाळेत पाठवेणा! वर्गामध्ये मुली 2 होत्या. ते ही पिंजरी जातीच्या. माझी मोठी ताई जेव्हा 12 वी उत्तीर्ण झाली आणि तिला पदविच्या अभ्यासक्रमात प्रवेश दिला आणि ताई सलवार-कुर्ता घालून इतर मूली सोंबत कॉलेजला जायची. गॅदरिंग आणि स्पोर्टमध्ये भाग घ्यायची, तेव्हा काही मुसलमान घरी येऊन ये मुस्लिम लड़की के लिए बराबर नहीं है म्हटल्याचे आणि वडिलांनी त्यांना घरुन हाकलून दिल्याचे आठवते! पुढे ताई भिवापुर येथील समर्थ जुनिअर कॉलेज मधुन प्रिंसिपल म्हणून सेवानिवृत्त झाली आणि तिचा मुलगा, परवेज आज इंजीनियरिंग करून प्रोडक्शन असिस्टेंट मॅनेजर पोस्टवर आहे. छोटी ताई शिक्षिका आहे.
    बाकी जी मुसलमानांची मुले होती ती उर्दू शाळेतच! 4 थी पर्यन्त अनुदानित शाळा. त्यांच्या लहानपनाची सर्व चौकस बुद्धि मौलानाजींच्या मारेला घाबरून आयाती पाठ करण्यात आणि पाठ सुजन्याच्या भीतिने सर्व बुद्धिचि शक्ति अत्यंत कठिण, वापरात आणि बोलचालित नसलेल्या अरबी भाषेच्या पाठान्तरात कामी लगत असे.
     मी वडिलांना मौलाना खुप मारतात असे सांगितले आणि वडिलांनी घरीच आईला अरबी शिकविन्यास सांगितले! आणि आई उर्दू शिकली असल्यामुळे बरिचशी प्राथमिक उर्दू घरिच शिकलो आणि अरबी वाचने सुद्धा!
    परन्तु माझ्या वयांची ती सर्व मुले फक्त उर्दू शाळेत शिकली. बाहेर पूर्ण मराठी! उर्दू शाळेचे शिक्षण नावाचेच! शिकविणारे शिक्षकही धन्यच! 4 थी पर्यन्त अनुदानासाठी पुढच्या वर्गात ढक्कल गाड़ी आणि 4 थी उत्तीर्ण झाल्यावर ठणठण! 4 थी नंतर पुढची शाळाच गावात किंव्हा जवळपास नाही! आज चिंतन केल्यावर कळते, त्या लेकराना 4 थी नंतर पर्याय नव्हता, असता तरीही काय केले असते? शेवटी ती सर्व मुलें पानठेला, फ्रूट गाड़ा, लहान-सहान टपरी, ब्रेड, भाजी विकायला लागले...
मराठी भाषेबद्दल बनविल्या गेलेला नकारात्मक दृष्टिकोण आणि तिथुन झिरपणारी शिक्षणाबद्दलची नकारात्मकता, लहाणपनीच भाषिक द्वंदात नष्ट होणारी बालबुद्धि... या सगळ्यांचा एकत्रित परिणाम बहुसंख्यक गरीब मुसलमानावर पडतो! सहज विचार येतो, वडील शिकले नसते आणि त्यांनी कनखर वास्तविक भूमिका घेतली नसती तर... आज जो जावेद पाशा उभा आहे, तो कुठे असता...!! ज्यांच्याकडे साधन भरपूर किंव्हा किमान आहेत, ते थोडेफार टिकतात तरी! मात्र 90-95%  है प्राथमिक शिक्षणातच बाहेर फेकल्या जातात!
 हा कुणाला आरोपी करण्याचा, किंव्हा दोष देण्यासाठी चिंतन नाही! स्वतः मुस्लिम समाजाने आणि त्याच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्यासाठी हे अनुभव मांडलेत! कित्येक पिढ्या 1969 पासून अश्या स्थितित लहानपणीच संपल्या असतील...!!
म्हणून मुस्लिम समाजाने शिक्षणाच्या क्षेत्रात मुलभूत सुविधा वाढविणे गरजेचे आहे! मदरसा शिक्षणाचा योग्य अभ्यासक्रम, प्रादेशिक भाषेशी सांगड घालने गरजेचे आहे....मदरसा शिक्षणाला आनंददायी करण्याची तर खूपच गरज आहे!
  इतर कारणे ही मुस्लिमाच्या नकारत्मकतेला कारणीभूत आहेतच! संघी मानसिकतेचे हल्ले आणि त्यातून येणारा प्रत्येक क्षेत्रातील नकार, जीवघेनी स्पर्धा आणि मुस्लिमांची आर्थिक समस्या... ह्या सर्व बाबीही आहेतच! आम्ही मांडलेला अनुभव त्यापैकी फक्त एक!

प्रा.जावेद पाशा 
9422154223

ओआयसी म्हणजे 57 मुस्लिम देशांची शिर्ष संघटना. या संघटनेने काश्मीरवर या आठवड्यात एक प्रस्ताव पास करून आधीच अडचणीत असलेल्या भाजप सरकारपुढे एक नवीन अडचण उभी केलेली आहे. ओआयसीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 21 जून रोजी बैठक झाली. यामध्ये एक प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, त्यात काश्मीरचे 370 चे विशेषाधिकार काढून घेतल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. तसेच पाच मागण्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत.
पहिली मागणी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे. दूसरी मागणी काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाला थांबविण्याचा सरकारने प्रयत्न करावा. तीसरी मागणी घाटीमधील लोकसंख्येमध्ये कुठलाही संरचनात्मक बदलाव केला जाऊ नये. संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारींची चौकशी करण्यात यावी. शेवटची मागणी आहे की, सरकारने मानवाधिकार हननाच्या तक्रारींबाबत आंतरराष्ट्रीय चौकशी  समिती तयार करण्यास 
मान्यता द्यावी.
 स्पष्ट आहे की वरील मागण्या भारत सरकारकडून मान्य करण्याची सुतराम शक्यता नाही. राहता राहिला प्रश्न मानवाधिकार हननाच्या तक्रारींबाबत त्यात ओआयसीच नव्हे तर देशांतर्गतसुद्धा अनेक संस्था आणि संघटनांनी मागणी केलेली आहे. पण सरकारने त्याकडे कधी लक्ष दिलेले नाही.
5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीर विधानसभेची मान्यता न घेता एकतर्फी कार्यवाही करत अनुच्छेद 370 घटनेतून काढून टाकलेले आहे. तेव्हापासून ओआयसी या विषयावर गप्प होता अचानक तो सक्रीय का झाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबाबतीत असे म्हणता येईल की, केंद्र सरकार आणि ओआयसीच्या अध्यक्षपदी असलेले सऊदी अरबचे शासक यांच्यात अतिशय चांगले संबंध असल्यामुळे सऊदी अरबने काश्मीर प्रकरणी कुठलाही प्रस्ताव भारताविरूद्ध मंजूर होऊ दिला नव्हता. मात्र अनुच्छेद 370 नंतर सीएए-एनआरसी त्यानंतर दिल्ली दंगे, उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांवर अत्याचार, मुस्लिमांची मॉबलिंचिंग, सफुरा जरगरसारख्या गर्भवती महिलेल्या युएपीए सारख्या आतंकवादी कायद्याखाली अटक इत्यादी अत्याचाराची साखळी सुरू झाली. त्यामुळे कदाचित ओआयसीवर दबाव वाढला असावा. शिवाय याच विषयावर ओआयसीमध्ये फूट पडून ईरान, तुर्की, मलेशिया, पाकिस्तान यांनी वेगळी बैठक घेतली होती. त्यात ऐनवेळेस सऊदी अरबने दबावतंत्राचा वापर करून पाकिस्तानला सहभागी होण्यास रोखले होते. परंतु, एकंदरित परिस्थिती पाहता ओआयसीला काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारींची दखल घ्यावीच लागली असावी. एकंदरित ओआयसीच्या या प्रस्तावाची दखल घेउन केंद्र सरकारने उदार धोरण स्वीकारल्यास या प्रस्तावावर मात करता येईल. भविष्यात केंद्र सरकार याविषयी काय धोरण ठरविते यावर सर्वकाही अवलंबून आहे.

अशा महान व्यक्तिमत्त्वाविरूद्ध अवमानास्पद शब्द वापरल्याबद्दल सरकारने अमिश देवगण याच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र या सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
 
मुंबई
हजरत मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी (रह.) इस्लामी शिकवण आणि मानवी मूल्ये यांचे महान उपदेशक आणि भारत-पाक उपखंडातील निर्विवाद आध्यात्मिक गुरू आहेत. हजरत मोईनुद्दीन चिश्ती (रह.) यांना कोणत्याही कौतुकाची गरज नाही. त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि मानवतेला त्याच्या सेवांवर विश्वास आणि प्रेम आहे. एखाद्या न्यूज अँकरने अशा महान व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द असह्य आहेत.
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र न्यूज १८ वृत्तवाहिनीचे अँकर अमिश देवगण यांच्या गैरवर्तनाचा निषेध करीत आहे आणि वृत्तवाहिनी व त्याच्या अँकरवर कडक कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याव्यतिरिक्त जमाअतची मागणी आहे की माध्यमांमध्ये भाषेचा वापर करण्यासाठी धार्मिक व सामाजिक व्यक्तिमत्त्वे आणि धार्मिक नेत्यांसाठी आचारसंहिता तयार केली जावी, जेणेकरुन देशात राष्ट्रीय एकता आणि जातीय सौहार्द टिकविला जाईल.
देशातील माध्यमांची वृत्ती अधिकाधिक पक्षपाती आणि चिथावणीखोर होत चालली आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये चर्चेची आणि रिपोर्टची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. चर्चासत्रात ज्या प्रकारची भाषा आणि शब्द एकमेकांसाठी वापरले जातात ते नीतिमत्तेच्या मूलभूत मानकांपेक्षा तुच्छ ठरत आहेत.
काही भारतीय प्रसारमाध्यमे बंधुत्वाच्या शांत वातावरण बिघडविण्याचे आणि त्याचे रूपांतर देशातील सांप्रदायिकतेत करण्याचे काम करीत आहेत, जे खेदजनक व निंदनीय आहे. देशातील प्रतिष्ठितांसाठी ज्या प्रकारचे शब्द वापरण्यात येत आहेत ते अत्यंत लाजिरवाणे आणि अपमानास्पद आहेत.
यासंदर्भात जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष रिझवान-उर-रहमान खान यांनी मुस्लिमांना अजिबात भडकवू नये आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. मुस्लिम तरुणांनी स्वत:ला प्रामाणिक व शांतताप्रिय असल्याचे सिद्ध करून या अँकर विरोधात विविध शहरे व विभागांतील पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, जे लोक चिथावणी देतात त्यांचा उत्तम उपाय म्हणजे त्यांच्याविरूद्ध अधिक तक्रारी नोंदविणे.
महाराष्ट्र सरकारने कायदा व सुव्यवस्था आणि बंधुता धोक्यात आणण्यासाठी अभद्र भाषेत प्रचार करणाऱ्या संबंधित मीडिया हाऊस आणि अँकरवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची जमाअत-ए-इस्लामी हिंद तर्फे मागणी करण्यात आली आहे.

पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. सन २०२० या वर्षाची संकल्पना आहे, 'जैवविविधता'. पर्यावरणीय संकटे आ-वासून उभी असताना वसुंधरेचे रक्षण केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आपल्या आजूबाजूच्या परिसराचा मनसोक्त आनंद घेणारे आपण नैसर्गिक आपत्तीने घरामध्ये कोंडले जाऊ लागलो आहेत. 
जगातील विनाशकारी भांडवली विकास आणि भारताने १९९१ साली स्वीकारलेल्या खाजगीकरण, उदारीकरण, जागतिककरणाच्या रेट्याने भारतातील जैवविविधतेचे मोठे नुकसान झालेले आहे. वसुंधरेचा चालेला ऱ्हास रोखण्यासाठी जनतेत पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेतली पाहिजे. असंख्य समस्याचे मूळ माहीत असतानाही सामान्य जनता या विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या वाटेत भरडली जात आहे. धोरणे राबवत असलेले माहिती असून नफ्याच्या हव्यासापोटी ते त्याचा मार्गावर आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास झपाट्याने वाढलेला आहे. प्राणी, पक्षी, वनस्पती, सृष्टीचा समतोल राखणाऱ्या असंख्य जीवाणूंंचा विनाश सुरू आहे, तो थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी जनतेनेच पुढे आले पाहिजे.
शासन यंत्रणा कुठलीही असली तरी व्यवस्थेचे हाताळणी आणि धोरणे आखणारी तिच माणसे असतात. जे भांडवली व्यवस्थेला पुरक निर्णय घेण्याचे सल्ले देत असतात. प्रकल्प चालू केले जातो, नागरिकांनी विरोध केला तर रद्द ही केले जातात, शासनाला माघार घ्यावी लागते. नागरिकांचा विविध प्रकल्पांना सातत्याने होणारा विरोध लक्षात घेऊन केंद्र शासनाने ‘पर्यावरण प्रभाव मूल्यांकन’ (ईआयए-एन्व्हायर्मेट इम्पॅक्ट असेसमेंट) नियमावली सुधारणांंसंदर्भात सूचना जारी केल आहे. त्या अहवालातील अनेक नियम व अटी शिथिल करण्याचे शासनाचे धोरण आहे. या नियमावलीतील बदलामुळे कोणत्याही प्रकल्पांना विनाआडथळा मंजुरी, सहजपणे मान्यता देणे शक्य होणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने उद्योगांबाबत 'ईआयए' नियमावली तयार केलेली असून त्यावर ३० जून २०२० अखेर सुचना मागविण्यात आल्या आहेत. एकीकडे कोरोनासारख्या महामारीचे संकट असताना आणि लॉकडाऊनची परिस्थिती असताना शासनाला एवढी घाई का झाली आहे, असे म्हणत पर्यावरणतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासकांनी या नियमावलीतील सुधारणांना विरोध केला आहे.
एनडीटीव्हीतर्फे आयोजित चर्चेत भाग घेताना नितीन गडकरी यांनी लॉकडाऊन उठल्यानंतरही निळे आकाश बघण्याचा सकारात्मक बदल कायम ठेवण्याची गरज व भारतातील शहरांमधील वायू प्रदूषणाची पातळी खाली आणण्याची गरज यावर प्रकाश टाकला. मंत्री म्हणाले की आपला समाज सुधारण्यासाठी ‘नीतिमत्ता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणशास्त्र’ या तीन गोष्टी एकत्र आणण्याची गरज आहे. कोणत्याही प्रमाणानुसार, हा एक उत्साहदायक संदेश आहे, तो देखील एका ज्येष्ठमंत्र्यांकडून आला आहे, जो विशाल नदी-जोडणी प्रकल्पाचे प्रभारीही आहे - ही एक दुर्दैवी योजना असून ती देशाच्या नदीकाठी असलेल्या इको सिस्टिमसाठी मृत्यूची घंटा ठरणार आहे. म्हणजे शासनकर्ते आश्वासनांची खैरात करत असून पडद्यामागे काळेबेरे सुरू आहे.
ईआयए मसुदा एकदा निश्चित केला गेला तर पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या मूल्यांकनांकांचा कोणताही विचार न होता, उद्योगपतींना त्यांची दुकाने थाटणे सोपे होईल. खुद्द पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, व्यवसायातील सुलभता वाढविण्यासाठी सुधारणा केल्या जाणार आहेत. म्हणजेच निसर्गाचा विनाश झाला तरी भांडवलदारी व्यावसायिकांना मदत करणारच हाच उद्देश दिसतो. यानुसार प्रकल्प अर्ज आणि परवान्यांचे मंजूर होण्यास विलंब ६४० दिवसांवरून १०८ दिवसांपर्यंत खाली आणण्यात आला आहे आणि येत्या सहा महिन्यांत हे ५० दिवस कमी करण्याचे मंत्रालय काम करत असल्याचे जावडेकरांनी म्हटले आहे. ईआयए सरकारला कमकुवत करण्याचा सध्याचा प्रयत्न म्हणजे पर्यावरणीय संवर्धनाची हमी देण्याऐवजी सरकार त्यास अडथळा मानते हे सूचित होते. ईआयए सुधारात्मक यंत्रणेचा एक भाग आहे, जी ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण आणि अधिवासातील नुकसानीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पाश्र्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठरते. कामगारांच्या सुधारणांच्या आणि गुंतवणुकीच्या उदारीकरणातील निकषांच्या अलीकडील घोषणेच्या अनुषंगाने पाहिले जाऊ शकते की सध्याच्या राजवटीतील वरिष्ठनेत्यांकडून पर्यावरण संरक्षणाबाबत वक्तृत्व असूनही ईआयएमधील सुधारणांचे धोरण रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नवीन अधिसूचनेत सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण, बांधकाम, खाणकाम, अंतर्देशीय जलमार्ग, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाशी संबंधित काम यासारख्या सार्वजनिक छाननीतून सूट मिळालेल्या प्रकल्पांची यादी विस्तृत करण्यात आली आहे. या यादीमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. पाईपलाइन आणि १२ समुद्री मैलांमध्ये ऑफशोर प्रकल्प. ईआयए मसुद्यानुसार नवीन सूचना पूर्तता अहवाल सादर करण्याचा कालावधी ३० दिवसावरून २० दिवस करण्यात आला आहे. तसेच अहवाल देण्यास विलंब झाला तरी यात सूट मिळणार आहे.
नवीन नियमावलीनुसार पर्यावरण प्रदूषण होत असेल तरी कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पाचा खर्च लक्षात घेता हा प्रकल्प चालू ठेवण्यास परवानगी असेल. म्हणजे ‘नफा' ही संकल्पना समोर ठेवून देशाचे पर्यावरण मंत्रालय भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहे, हे उघड होते. सरकारच्या मर्जीतले आणि सत्ताधारी पक्षाला निवडणूक फंड देणाऱ्या बड्या उद्योजकांना या सवलती दिल्या जातील यात शंका नाही. भांडवलदारी व्यवस्थेने सर्वच क्षेत्राला गिळंकृत केले आहे, शासन यंत्रणा सार्वभौम असली तरी ती आता भांडवलदारी व्यवस्थेच्या हातातील बाहुले बनलेली आहे. कारण मसुद्यानुसार पूर्वीच्या नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) च्या निर्णयाद्वारे किंवा कोर्टाच्या विविध आदेशांद्वारे मिळवलेल्या आदेशांचा परिणाम होत होता. आता पर्यावरणीय नियमच कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनजीटीच्या नेमणूकांच्या प्रक्रियेत झालेला बदल म्हणजे देशातील एकमेव पर्यावरणीय निरीक्षणाला कमकुवत बनविणारा हा शेवटचा धक्का आहे. नव्याने अस्तित्वात आलेले नियम हे अट घालतात की एनजीटी केवळ सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश असू शकतात आणि न्यायाधिकरणाचे सदस्य नियुक्त करण्याच्या प्रक्रियेवरील न्यायपालिकेचे नियंत्रण काढून टाकण्यात आले आहे.
कमकुवत पर्यावरणीय नियामक यंत्रणेसह आता पॅरिस कराराच्या अंतर्गत आपली वचनबद्धता कशी ठेवणार आहोत?  पॅरिस करारानुसार २०३० पर्यंत भारत २.५ - ३ अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईड कमी करेल असे वचन दिले आहे. तसे होण्यासाठी भारतातला सध्याच्या २४ टक्के वृृक्ष लागवडीसाठी असलेले क्षेत्र किमान ३३ टक्के लागवडीखाली आणण्याची गरज आहे. पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकात भारताचा ाâमांक सतत घटत आहे. १८० देशांपैकी भारत १७७ व्या स्थानावर आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ६ शहरे भारतात आहेत. हे एक ज्ञात सत्य आहे की भूगर्भातील पाणी आणि वायू प्रदूषणामुळे दरवर्षी भारतात कोट्यवधी लोकांचा बळी जातो. महामारी, चक्रीवादळ, उष्णतेची लाट, पूर आणि टोळ कुठूनही बाहेर येत नाहीत. ते आम्हाला नैसर्गिक संसाधनांच्या पद्धतशीर गैरव्यवस्थेची कहाणी सांगतात. ईआयएचा मूळ स्वरुपातील नियम हा आपल्या नैसर्गिक वातावरणाच्या अति-शोषणाविरूद्ध आमचा शेवटचा बचाव आहे. हे आता ध्यानात घेतले पाहिजे. ईआयएला कमकुवत करण्याचा पध्दतशीर प्रयत्न कोरोना पाश्र्वभूमीवर करत आहे.
महाराष्ट्र सरकार त्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे.
११ मे २०२० रोजी राज्य सरकारने पश्चिम घाटावरील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणजेच इको सेन्सिटीव झोन अंतर्गत राखीव जमिनीपैकी १५ टक्के जमिनी खाणकामांसाठी व उद्योगांसाठी वगळण्या बद्दलची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. जेव्हा की पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ समितीने पश्चिम घाटातील जागा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून तीचे संरक्षण करण्याची सूचना केली होती. ३ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रीय मंत्रालयाने पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या संबंधात जो मसुदा तयार केला आहे त्यापैकी ५६८२५ चौ.किमी क्षेत्र जे ६ राज्यात विखुरले गेले आहे, ज्याने पश्चिम घाटाचे ३७ टक्के क्षेत्र व्यापले गेले आहे. त्या पैकी १७३४४ चौ.किमी क्षेत्र महाराष्ट्रात येते. आतापर्यंत राज्य वन विभागाने २१३३ गावांपैकी ३५८ गावे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातून वगळली आहेत. २०१५ मध्ये हिमालयापेक्षा जुन्या पश्चिम घाटाला ‘युनेस्को'ने ‘जागतिक वारसा' म्हणून घोषित केले. १८  जैव- जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे उष्णकटिबंधीय जंगले असलेले एकमेव क्षेत्र आहे. अमेझॉनच्या जंगलांप्रमाणेच, पश्चिम घाटदेखील हवामान बदलाच्या परिणामास कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि ते ‘जगाचे फुफ्फुस’ म्हणून ओळखले जातात.
परंतु मार्च २०२० मध्ये कर्नाटक राज्य वन्यजीव बोर्डाने बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत हुबळी-अंकोला रेल्वे मार्गाला मान्यता दिली. प्रस्तावित १६४.४४ कि.मी. रेल्वे मार्ग पश्चिम घाटातून जाणार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला सादर केलेल्या साइट तपासणी अहवालानुसार, प्रस्तावित मार्गाचा सुमारे ८० टक्के भाग घनदाट जंगलांतून जातो. या प्रकल्पासाठी एकूण ९९५.६४ हेक्टर जमीन आवश्यक आहे, ज्यामध्ये ५९४.६४ हेक्टर वन जमीन, १८४.६ हेक्टर पिकाऊ जमीन आणि १९० हेक्टर कोरडवाहू जमीन आहे.
पश्चिम घाटाचे संरक्षण भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पश्चिम घाट हे भारतातील एकूण भूभागाच्या ६ टक्के क्षेत्राखाली आहेत. परंतु देशात आढळणाऱ्या सर्व सस्तन प्राणी, वनस्पती, मासे, पक्षी प्रजातींपैकी ३० टक्के हून या भागात आढळतात. अत्यंत दुर्मिळ व स्थानिक वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, मासे व उभयचर या क्षेत्रात आढळतात. भारतातील ३ जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट पैक हे एक आहे. जगभरात असे फक्त ३४ हॉटस्पॉट आहेत. पश्चिम घाटाचा विचार करता, गुजरातील डांग, महराष्ट्रातील सह्याद्री ते तमिळनाडूतील कन्यकुमारीपर्यंत ७९५३ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या पश्चिम किनाऱ्यालगत पसरलेले आहे. पश्चिम घाटात फुलांच्या ५००० हून अधिक प्रजाती, १३९ सस्तन प्राणी, ५०८ पक्षी प्रजाती आणि १७९ उभयचर प्राणी आढळतात. पश्चिम घाटातील कास पठार हे फुलांची विविधता असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. पश्चिम घाटात अनेक नद्या उगम पावतात, खेकड्यांच्या, माशांच्या अनेक प्रजाती आढळतात. आयुर्वेदाचे भांडार असेल पश्चिम घाट लाखो लोकांना रोजगार पुरवत आहे. डब्ल््यूडब्ल्यूएफच्या मते द्वीपकल्पित भारतीय राज्यांमध्ये राहणाऱ्या सुमारे २४.५ कोटी लोकांना पश्चिम घाटातील नद्यांमधून बहुतेक पाणीपुरवठा होतो. या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करता प्रस्तावित रेल्वे मार्ग वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या परिणाम करणारा ठरणार आहे. आसाममधील डहिंग पट्टाई या हत्तींंसाठी राखीव असलेल्या अभयारण्यात नॅशनल बोर्ड फॉर वाइल्ड लाइफ (एनबीडब्ल्यूएल) कोळसा खाणकाम करण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत ४७ सस्तन प्राणी, ४७ सरपटणारे प्राणी आणि ३१० फुलपाखरू प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. देहिंंग पट्टाई अभयारण्य दिब्रुगड आणि तिनसुकिया जिल्ह्यातील एकूण १११.१९ किमी क्षेत्र प्रदेश आहे (४२.९३ चौरस मैल). १३ जून २००४ रोजी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. आसाम सरकारने जंगलाचा एक भाग वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केला, तर दुसरा भाग डिब्रू-देवमाली हत्ती राखीव क्षेत्र. वन, पर्यावरण मंत्रालयाच्या संगनमताने सर्व नियम पायदळी तुडवताना कार्पोरेट जगताला रान मोकळे केले जात आहे. केंद्रीय स्तरावरील अधिकारी सुध्दा बड्या भांडवलदारांसाठी काम करत असल्याची दाट शक्यता आहे.
नव-उदारमतवादी धोरणांच्या मृगजळातून बाहेर पडून जनतेने सजग झाले पाहिजे. शासनाकडे सर्वांगिण शाश्वत विकासाचा आग्रह धरला पाहिजे. आता वेळ आली आहे, की पंतप्रधानांनी ‘हरित विकास मॉडेल'बद्दलचे स्वत: व्यक्त केलेले मत प्रत्यक्षात आणण्यासाठी जनलढा उभारण्याची!

-नवनाथ मोरे
कोल्हापूर, मो.: ९९२१९७६४६०

मानवाधिकारासाठी लढणारे वकील अशी ओळख असलेले उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होस्बेट सुरेश यांचे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील होसाबेटू येथे २० जुलै १९२९ रोजी होस्बेट यांचा जन्म झाला. मंगळुरू विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी विश्वस्वरय्या तंत्र विद्यापीठातून कला शाखेतूनच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९५३मध्ये त्यांनी वकिलीला सुरूवात केली. शासकीय विधि महाविद्यालय आणि के. सी. महाविद्यालयामध्ये त्यांनी विधि अभ्यासक्रमाचे अध्यापनही केले. सत्र न्यायालयात सहाय्यक वकील म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर २९ नोव्हेंबर १९६८ रोजी त्यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश, तर १९७९ मध्ये द्वितीय अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. परंतु स्वतंत्र वकिली करण्यासाठी त्यांनी काही महिन्यांनीच म्हणजेच १९८० मध्ये न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला आणि उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली. २१ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. १९ जुलै १९९१ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा न्याय आणि परोपकार अनुकरणीय होते. आपल्या कार्यकाळात आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. देशात जेथे जेथे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले तेथे ते त्यांच्या संरक्षणासाठी त्वरित पाऊल उचलीत. काश्मीर व इतरत्र होणाऱ्या अत्याचारांविरोधात त्यांनी नेहमी आवाज उठविला. त्यांनी काश्मीर, ओरिसा (काला हंडी), गुजरात इत्यादी ठिकाणी तथ्य-शोध आणि अत्याचाराच्या थेट तपासासाठी प्रतिनिधीमंडळांसह दौरा केला होता. न्यायमूर्ती दाऊद यांच्या सहकार्याने १९९२-१९९३ च्या मुंबई दंगलीची त्यांनी चौकशी केली आणि धैर्याने सत्य समोर आणले. असंख्य प्रसंगी ते बोलले आणि उत्पीडित अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम, दलित, आदिवासी आणि दुर्बल घटकांच्या समर्थनार्थ उभे राहिले. यूएपीए, पोटा, टाडा यासारख्या केंद्र सरकारच्या काळ्या कायद्यांविरूद्ध ते नेहमीच उभे राहिले आणि हे कायदे नाकारण्यासाठी व रद्द करण्यासाठीच्या चळवळींमध्ये अग्रणी होते. न्यायमूर्ती सुरेश यांचे ‘एपीसीआर’ (असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स) शी जवळचे संबंध होते. ‘एपीसीआर’च्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. त्यांनी आणि मी एकाच कार्यालयात ३० वर्षे कार्यरत होतो. फक्त केबिन स्वतंत्र होती. न्यायमूर्ती होस्बेट सुरेश यांच्या निधनानंतर, देशाने एक महान परोपकारी, मानवाधिकार चॅfिम्पयन आणि न्यायासाठी लढणारा, ‘एपीसीआर’ने एक महान सहानुभूतीदार आणि मी एक प्रामाणिक मित्र व सहकारी गमावला.

- यूसुफ मुछाला
(वरिष्ठ वकील आणि अध्यक्ष, ‘एपीसीआर’)

देशभरात कोरोनाच्या संकटाचे ढग अजूनही निवळलेले नाहीत, आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून आलेले आहे.लॉक डाऊनचे एपिसोड सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडी सरकारला शाळा सुरु करण्याची घाई का झाली आहे? असा प्रश्न पडतो. याबाबत पालक, शिक्षक आणि शिक्षक आमदार यांचे म्हणणे सरकारने ऐकायला हवे, असे आम्हाला वाटते, कोरोनाच्या संकटकाळात शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता 15 जूनपासुन लगेच शाळा सुरू करणे हे अति धाडसाचे ठरणार आहे. कोरोना संकटाचा वाढता विळखा लक्षात घेतला तर लहान वयोगटातील मुले-मुली आणि वृद्ध यांना सर्वाधिक धोका आहे असे तज्ज्ञांनी सांगितलेले आहे.पण संस्था चालक हे राजकीय नेते आहेत किंवा ते शिक्षणाचा धंदा करणारे व्यापारी आहेत. त्यांना शाळेत न शिकवता किंवा शाळा बंद ठेवल्यावर देखील पालकांच्या खिशातून पुढच्या तीन महिन्याची फीस काढायला मदत करणारे शिक्षणमंत्र्यांचे धोरण दिसत आहे. विशेषतः विना अनुदानित इंग्रजी शाळा सुरू करण्यामागे हाच डाव दिसतो आहे. हा लुटीचा मुद्दा बाजूला ठेवला तरी, शाळा सुरू करण्याची घाई नको असे मत मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत मांडले आहे. एका अ‍ॅपच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षक आमदारांची बैठक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ता.27 मे ला घेतली. या वेळी आमदार विक्रम काळे यांच्यासह सर्व शिक्षक आमदारांनी मत मांडले. यात आमदार श्री. काळे म्हणाले, मे महिना संपत आलेला असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आणि जूनमध्ये ती अधिक वाढेल असा सर्व तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. आज तालुका नव्हे राज्यातील अनेक गावांमध्ये कोरोना पोहोचलेला आहे. अनेक कामगारांनी स्थलांतर केले आहे. राज्यातील अनेक शाळा, महाविद्यालये विलगीकरणासाठी प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या असताना त्या कधी रिकाम्या होतील, याचे निर्जंतुकीकरण कधी होणार याचा कोणताच टाईम टेबल न आखता शाळा सुरू करायची घाई का केली जात आहे? या शिक्षक आमदारांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. काळे यांनी या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्याकडे शालेय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील सर्वच भागात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शिक्षक कोरोना संबंधीच्या सेवेत कार्यरत आहेत. यामुळे त्यांना एक मेपासूनची अजूनही सुट्टी मिळालेली नाही. 
पहिल्यांदा शिक्षकांना कोरोनाच्या कामातून मुक्त करावे लागेल, नंतरच शाळा सुरू करण्याची चर्चा होऊ शकेल. सर्वप्रथम सरकारी, अनुदानित खासगी आणि विनाअनुदानित आशा सर्वच शाळा सुरू करायच्या असतील तर अभ्यासक्रमाची पुस्तके घरपोच वाटप होतील, यासाठी आदेश काढणे हे शिक्षण खात्याचे आद्य कर्तव्य ठरते. म्हणजे विद्यार्थी किमान घरी तरी अभ्यास करतील. सर्व शाळांनी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करुन प्रत्येक वर्गात प्रवेश देताना विद्यार्थी क्षमतेच्याबंधनातच प्रवेश द्यावे लागतील. आमचे अनेक शाळांचे वर्ग शतक पार करणारे असतात. खुराड्यात कोंबडे कोंबावेत तसे विद्यार्थी बसविलेल्या अनेक शाळा आहेत. या शिवाय सॅनीटायझर फवारणी, शाळेची स्वच्छता ठेवणे,विद्यार्थ्यांचे हात धुणे या सगळ्या कामासाठी सेवक वर्गाची आवश्यकता आहे. यासर्व गोष्टीसाठी खर्च होणार असल्याने सर्व शाळांना देय असलेले वेतनेत्तर अनुदान तातडीने देण्यात आले पाहिजे.
अनुदान वितरणाचा शासन आदेश तातडीने निर्गमित करावे लागतील. दि. 13 सप्टेंबर 2019 पासून विना अनुदानित शाळांना देय असलेले 20 टक्के अनुदान व 20 टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना 40 टक्के अनुदान वितरणाचा शासन आदेश तातडीने निर्गमित करावा. मूल्यांकन पूर्ण केलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व सन2012- 13 च्या वर्ग तुकड्यांना अनुदानासाठी घोषित करून वेतन अनुदान सुरू करावे. सन 2019- 22 व 20-21 ची संच मान्यता करण्यात येऊ नये. सर्व अतिरिक्त शिक्षक व आयटी संगणक तज्ञ शिक्षकांना सेवेत घेऊन त्यांचे वेतन सुरू करावे अशा मागण्या आमदार श्री. काळे यांनी या बैठकीत मांडल्या आहेत. त्या रास्तच आहेत. जरी या व अन्य महत्त्वपूर्ण गोष्टींचा विचार करुन निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सांगत असल्या तरी शाळा सुरु करताना पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करायला हरकत नसावी कारण हा गट थोडासा मोठा आहे. त्यांना कोरोना काळात आपले वागणे बदलण्याची ट्रेंनिग सहज देता येईल. तरीही 15 जूनला शाळा सुरू करणे हे मोठे जोखमीचे ठरेल. सर्वात अगोदर  कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा अशी  मागणी रास्त आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांची फीस वाढविली जाणार नाही, बस भाडे वाढविले जाणार नाही आणि खोड रबर, सर्व पुस्तके, ड्रेस, बूट असे सर्व शालेय साहित्य इंग्रजी शाळांच्या प्राचार्य किंवा संचालक यांना नेमून दिलेल्या दुकानातूनच विकत घ्यावे अशी बंधने घातली जातात ती आता शिथिल करावीत. या आधी तिमाही फी घेऊनच या शाळाचालकांनी तीन-चार दिवस शाळा घेऊन लॉकडाऊन जाहीर होताच काही दिवस ऑन लाईन शिकविण्याचा ‘फार्स’ केला आहे. आता शाळा सुरू करताना पुढच्या तिमाही फिसचा हप्ता मागितला जाईल आणि कोरोना वाढू लागलातर  शासनाच्या आदेशाने पुन्हा शाळा बंद केल्या जातील या आदेशानुसार पुन्हा शिकविण्याचे आणि शिक्षणाचे भिजत घोंगडे भर पावसाळ्यात वाळायला घातले जाईल. कोरोनाआणि लॉक डाऊनमुळे सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे अनेक सामान्य पालक आपल्या मुलांस यावर्षाला 80 हजार ते एक लाख रुपये फीस उकळणाèया शाळांतून काढून घेण्याच्या विचारात आहेत. अशा जागतिक व असहाय्य पालकांचा विचार हे सरकार करणार आहे की नाही? राज्यातल्या शाळा सुरू करण्याची घाई करीत असताना अनेक प्रश्न उभे आहेत, त्याची उत्तरे सध्यातरी सरकारकडे पर्यायाने शिक्षण खात्याकडे नाहीत, त्यामुळे ‘शाळा सुरू करण्याची घाई का?’ असा प्रश्न पडतो.

–सुनीलकुमार सरनाईक
मो.: 7028151352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget