Halloween Costume ideas 2015
2020


उत्तर प्रदेशामध्ये पोलीस कधी काय करतील याचा नेम नाही. लव्ह जिहादच्या नावाखाली केलेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचा पोलिसांनी सर्रास दुरूपयोग सुरू केलेला आहे. मागच्या आठवड्यात मंगळवारी कुशीनगरमध्ये पोलिसांनी लग्नमंडपात घुसून नवरा-नवरीला लव्ह जिहादखाली उचलले आणि पूर्ण रात्र पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवले. रात्रभर चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री झाली की, नवरा-नवरी दोघेही मुस्लिम असून, अतिउत्साहात आपण दोघांनाही चुकीच्या पद्धतीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलेले आहे. यातील पुरूष 39 वर्षीय हैदरअली असून, त्याने प्रेस समोर पोलिसांवर आरोप लावला आहे की, पोलिसांनी रात्रभर त्या दोघांना डांबून ठेवले आणि त्याला चामडी बेल्टाने मारहाण केली. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा आझमगड जिल्ह्यात राहणार्‍या त्या मुलीच्या भावाने कसया पोलीस ठाण्यामध्ये जावून पोलिसांना लेखी जबाब दिला की, त्याच्या बहिणीच्या हैदरअलीशी लग्न करण्याच्या निर्णयावर त्याचा किंवा त्याच्या कुटुंबाची कसलीच आपत्ती नाही. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की, दोन्ही व्यक्ती सज्ञान असून, एकाच धर्माचे आहेत. तेव्हा त्यांच्याकडून पोलिसांकडून तक्रार नाही, असे लिहून घेवून सोडून देण्यात आले. 

कुशीनगरच्या पोलिसांनी सांगितले की, कोणीतरी त्यांना फोन करून सुचित केले होते की, एका हिंदू महिलेचे मुस्लिम पुरूषाबरोबर बळजबरीने लग्न लावून देण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला. कसया पोलीस स्टेशनचे सचिव संजयकुमार यांनी लव्ह जिहादची अफवा पसरविणार्‍या लोकांना यात दोषी ठरविले आहे. परंतु, पोलिसांना खोटी माहिती देणार्‍या व्यक्तीविरूद्ध कुठलीही कारवाई करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.



लबों के तबस्सुम को तो सबने देख लिया

पडी न ज़ख्म-ए-जिगर पर ज़र ज़माने की

याच आठवड्यात 18 डिसेंबर रोजी जगात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. या दिनासंदर्भात बहुसंख्य तर सोडा स्वतः अल्पसंख्यांकांना सुद्धा फारशी माहिती नाही. हा दिन साजरा केल्याने होत जात काही नाही परंतु, कमीत कमी हा दिन का साजरा केला जातो? भारतात अल्पसंख्यांक कोण? त्यांची स्थिती काय? त्यांच्या विषयी सरकारचे धोरण कोणते? त्यांच्या विषयी बहुसंख्य समाजाचा दृष्टीकोण काय? या संबंधी चार शब्द वाचकांच्या डोळ्यासमोरून जावेत म्हणून हा लेखन प्रपंच. 

अल्पसंख्यांक कोण? 

अल्पसंख्यांक आयोग कायदा 1992 च्या कलम 2 (क) प्रमाणे भारतात मुस्लिम, शीख, जैन आणि पारसी समुदायाला अल्पसंख्यांक म्हटल्या जाते. त्यांच्या कल्याणासाठी केंद्रात अल्पसंख्यांक मंत्रालय असून, त्याचे वर्तमान मंत्री मुख्तार अब्बास नक्वी असे मुस्लिम सदृश्य नाव असलेले व्यक्ती आहे. 

त्यांची अल्पसंख्यांकांच्या कल्याणाविषयीची भूमिका, तळमळ आणि कार्य हा फार किचकट विषय असल्याने तो तूर्त सोडून अल्पसंख्यांक हक्क दिवस यावर फोकस करूया. 

भारतीय राज्यघटना आणि अल्पसंख्यांक

भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 25 मध्ये सर्वच नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यात अल्पसंख्यांकांचा सुद्धा समावेश आहे, हे ओघानेच आले. त्यामुळे अल्पसंख्यांक समुदाय आपल्या धर्माचे पालन करू शकतो. त्याचा प्रचार आणि प्रसार करू शकतो.

  अनुच्छेद 29 प्रमाणे अल्पसंख्यांकांच्या भाषा, त्यांची लिपी आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याचा त्यांना अधिकार मिळालेला आहे. 

अनुच्छेद 30 मध्ये अल्पसंख्यांक समाजाला आपल्या स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्या चालविण्याचा अधिकार आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया व अलिगढ मुस्लिम विद्यापीठासह देशात हजारोंच्या संख्येत असलेले अरबी मदरसे, उर्दू भाषेतून शिक्षण देणार्‍या शैक्षणिक संस्था ह्यांना घटनात्मक संरक्षण मिळालेले आहे. या संस्थांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष आरक्षण प्राप्त आहे. शिवाय, अरबी मदरसे वगळता इतर शैक्षणिक संस्थांना सरकारतर्फे वित्तीय सहाय्य सुद्धा दिले जाते. खरे पाहता हा अधिकार इतका मोठा अधिकार आहे की, स्वातंत्र्यानंतर या अधिकाराचा वापर करून मुस्लिम समाज आपली शैक्षणिक, नैतिक आणि भौतिक स्थिती दैदिप्यमान करू शकला असता. परंतु दुर्दैवाने लघुदृष्टी असलेले मुस्लिम नेतृत्व आणि गफलत या दोन कारणांमुळे मुस्लिम समाज हा शैक्षणिक आणि भौतिकदृष्ट्या इतर समाजाच्या तुलनेत कित्येक योजने मागे पडलेला आहे. 

प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रम

1. एकीकृत बालविकास सेवांची समुचित उपलब्धता

2. अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक उपलब्धता आणि सुधारणा अंतर्गत सर्व शिक्षा अभियान आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना.

3. उर्दू शिक्षणासाठी संसाधनांची उपलब्धता. 

4. मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण.

5. अल्पसंख्यांक समुदायाच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती.

  अ) शालांत परीक्षा पूर्व शिष्यवृत्ती 

ब) शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती.

6. मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शैक्षणिक 

    सुविधांच्या उपलब्धतेचा विकास. 

7. गरीब अल्पसंख्यांकांसाठी मजुरी रोजगार योजना. 

अ) सुवर्णजयंती ग्रामस्वराज योजना. ब) सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना क) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना.

8. तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकास योजना. 

9. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी आर्थिक कर्ज सहाय्यता. 

10. केंद्र आणि राज्याच्या नोकर्‍यांमध्ये भरती. 

11. ग्रामीण आवास योजनेमध्ये योग्य भागीदारी. 

12. अल्पसंख्यांक समुदायाच्या गलिच्छ वस्तींमध्ये सुधार 

     योजना. 

13. जातीय घटनांना रोखण्यासाठी उपाययोजना 

14. जातीय स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अभियोजन. (प्रॉसीक्युशन)

15. सांप्रदायिक दंगलीमधील पीडित अल्पसंख्यांक समुदायाचे पुनर्वसन. 


वरील 15 कलमी कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये असे की, ही इतर सरकारी योजनांप्रमाणे योजना नव्हती तर हिचे नेतृत्व पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) करत होते आणि प्रत्येक जिल्हाधिकार्‍याला या संदर्भात प्रत्येक महिन्यात बैठक घेऊन केलेल्या कामाचा प्रगती अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठविणे अनिवार्य होते. जिल्हा स्तरावर यात मुस्लिम प्रतिनिधी सुद्धा घेणे अनिवार्य होते. परंतु भाजपच नव्हे तर काँग्रेसच्या काळात सुद्धा या योजनेचा इतका जबरदस्त फज्जा उडाला की त्याचे दूसरे उदाहरण मिळणे दुरापास्त आहे. जिल्हाधिकारी आणि पीएमओ दोघांच्या उदासीनतेमुळे या पंधरा कलमी कार्यक्रमाची अक्षरशः भृणहत्या झाली. 

याशिवाय मुस्लिम समाजाच्या विकासासाठी गोपालसिंग आयोग, गुजराल आयोग, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, बाबरी मस्जिद विध्वंसासाठी न्या. लिब्राहन आयोग, 1992-93 साली झालेल्या अभूतपूर्व अशा मुंबई दंगलींच्या तपासासाठी नेमलेले न्या. श्रीकृष्ण आयोग, महाराष्ट्र सरकारतर्फे नेमलेले महेमुदूर्रहमान आयोग आणि या सर्वावर कडी म्हणजे न्या. सच्चर आयोग. या सर्व आयोगांची शोकांतिका ही की ज्या सरकारांनी हे आयोग नेमले त्याच सरकारांनी त्यांचे अहवाल मंत्रालयाच्या हजारो कपाटांपैकी कुठल्यातरी कपाटांमध्ये कायमचे दफन करून टाकले आहेत. 

वित्तीय सहाय्य करणार्‍या अन्य संस्था 

एन.एम.डी.एफ.सी. अर्थात नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशन, एवढे लांबलाचक नाव असलेल्या या कार्पोरेशनची स्थापना 30 सप्टेंबर 1994 रोजी करण्यात आली. सदरचे कार्पोरेशन हे कंपनीज अ‍ॅक्ट 1956 च्या कलम 25 अंतर्गत रजिस्टर्ड असून दरवर्षी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या कार्पोरेशनला कोट्यावधी रूपयाचा निधी देण्यात येतो. परंतु या कार्पोरेशनतर्फे आर्थिक मदत मिळालेला मुस्लिम व्यक्ती मला तरी आढळून आलेला नाही. वाचकांपैकी कोणाला आढळून आल्यास त्यांनी ती माहिती शोधन कार्यालयाला कळवावी. याशिवाय अनेक वित्तीय संस्था देशाच्या इतर राज्यात असून, महाराष्ट्रात मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ नावाचे महामंडळ अस्तित्वात असून, त्याचीही अवस्था आई मेल्यानंतर वडिलांनी दूसरं लग्न केल्यावर मुलांचे जे हाल होतात तशी आहे. थोडक्यात योजना अनेक, आयोग अनेक वित्तीय संस्था अनेक परंतु लाभ नाममात्र, अशी एकंदरित अल्पसंख्यांकांची अवस्था आहे. 

धर्मनिरपेक्षतेचे सत्य

  पश्‍चिमेकडून घेतलेल्या अनेक मुल्यांपैकी सेक्युलॅरिझम हे एक असे मुल्य आहे की, ज्याचा स्वीकार आपल्या देशासह जगातल्या अनेक राष्ट्रांनी केलेला आहे. किंबहुना या मुल्यांवर अनेक राष्ट्रे उभी आहेत आणि त्यांना या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की, त्यांचे देश हे धर्मनिरपेक्ष देश आहेत. सेक्युलॅरिझमचा अर्थ असा की, देशाचा कोणताच धर्म असणार नाही. धर्म प्रत्येक नागरिकाचा व्यक्तीगत आस्थेचा भाग असेल. धर्म-शासन, प्रशासन आणि सार्वजनिक उपक्रमापासून वेगळा ठेवण्यात येईल. वरवर पाहता सेक्यूलॅरिझमचा हा आशय न्यायपूर्ण आणि मानवीय वाटतो. मात्र इतर पाश्‍चीमात्य मुल्यांप्रमाणे हे मूल्यही पोकळ आहे. प्रत्यक्षात अनुभव असा आहे की, ज्या देशात जो समाज जास्त असेल त्या देशात त्याच समाजाचे वर्चस्व आहे. उदाहरणार्थ आपल्या देशात सनातन हिंदू समाज जास्त असल्याने येथे सरकारी स्तरावर सर्व सनातन रितीरिवाज पाळले जातात. सरकारी कार्यालयांच्या इमारतीपासून ते कर्मचार्‍यांच्या टेबलाच्या काचेखाली अनेक देवी-देवतांच्या प्रतीमा लावल्या जातात. कोणत्याही सरकारी इमारतीची सुरूवात अधिकृतरित्या ब्राह्मण बोलावून भूमीपूजन करून केली जाते. राममंदिरच्या बांधकामाला सरकारी निधी पुरविला जातो. मस्जिद तोडून मंदिर बांधले जाते. अल्पसंख्यांकांशी पावलोपावली भेदभाव केला जातो. त्यांना बहुसंख्यांकांच्या वस्तीमध्ये भाड्याने घरे मिळत नाहीत. त्यांना गरज असतांनाही आरक्षण मिळत नाही. अल्पसंख्यांक मंत्रालयाला एक तर निधी दिला जात नाही, दिला तरी तो त्यांच्या विकासावर खर्च केला जाणार नाही, याची व्यवस्थेअंतर्गत व्यवस्था केली जाते. ते कायम गरीबीत राहतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. त्यांच्या वस्त्या वेगळ्या ठेवल्या जातात. त्यामध्ये चांगल्या तर सोडा मुलभूत सुविधा सुद्धा पुरविल्या जात नाहीत. त्यांना शिक्षणामध्ये कायम डावलले जाते. त्यांचा पावलोपावली पानउतारा केला जातो. राष्ट्रीय माध्यमांवरून अहोरात्र त्यांची बदनामी केली जाते. त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर कायम संशय घेतला जातो. त्या माध्यमातून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. हे सर्व कमी म्हणून की काय अधून-मधून त्यांची मॉबलिंचिंग केली जाते. एवढे सर्व करूनही अल्पसंख्यांकांनी आपल्या अंगभूत गुणांचा वापर करून कुठल्या शहरात प्रगती केलीच तर त्या शहरात ठरवून दंगली केल्या जातात. त्यात त्यांची घरादारांची राख रांगोळी केली जाते. प्रगत व्यवसाय जाळून टाकले जातात आणि त्यांना पूर्वपदावर आणले जाते. येनकेन प्रकारेन त्यांची भरभराट होणार नाही आणि ते बहुसंख्यांच्या बरोबरीत येणार नाहीत याची कायम काळजी घेतली जाते.  

बॉम्बस्फोट स्वतः घडवून त्यांच्या तरूणांना अटक केली जाते. वर्षोनवर्षे ते तुरूंगात खितपत पडतील याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी टाडा, पोटा, युएपीए सारखे घटनाबहाय्य कायदे केले जातात. उंच इमारतींना बिल्गुन ज्याप्रमाणे मुद्दामहून झोपडपट्या ठेवल्या जातात जेणेकरून फ्लॅटमध्ये राहणार्‍या श्रीमंतांना मुबलक प्रमाणात मोलकरीणी स्वस्तदरात सहज उपलब्ध होतील, अगदी त्याचप्रमाणे बहुसंख्य समाज मग तो कुठलाही असो गरीब अल्पसंख्यांक लोकांना जाणून बुजून आपल्या जवळ ठेवतो. जेणेकरून स्वस्त दरात व भरपूर प्रमाणात मजूर, ड्रायव्हर्स आणि नोकर उपलब्ध होतील. 

उपाय

वरील सर्व लक्षणे ही अदावतीचे लक्षणे आहेत, कुरआनच्या शिकवणीपासून पूर्णपणे वेगळे पडल्यामुळे मुस्लिमांना या परिस्थितीला कसे तोंड द्यावे याबद्दल फारसी माहिती नाही.  या अदावतींचे उत्तर मुस्लिमांना प्रेमाने द्यावे लागेल. अशा अदावतीचा कसा सामना करावा, याचा एका वाक्यात जो उपाय कुरआनमध्ये देण्यात आलेला आहे तो खालीलप्रमाणे - ”भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.” (संदर्भ ः सुरे हामीम सजदा , आयत नं. 34). शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! आम्हा मुस्लिमांना आपल्या काही देशबंधूंच्या अन्यायपूर्ण वागणुकीचा धैर्याने सामना करण्याचे, त्यांनी केेलेल्या हानीला सहन करण्याचे धैर्य दे आणि त्यांच्याशी अतिशय प्रेम, दया, करूणा आणि भलाईने वागण्याची शक्ती दे. आमीन.


- एम.आय. शेख



सध्या निरनिराळ्या कारणांनी देशाची अर्थव्यवस्था इतकी खालावली आहे की, यातून सुधारणेकडे प्रवास सुरू व्हायला किती वर्ष लागतील, सांगता येत नाही. आधी नोटाबंदी नंतर जीएसटी नंतर लॉकडाऊन आणि कोरोनाचा उद्रेक अशा भयंकर समस्यांशी तोंड देत असताना नवीन संसद भवनाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची ही वेळ नव्हती.

नव्या संसद भवनाच्या बांधकामाचे भूमीपूजन नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. कोरोनाकाळ असल्यामुळे भूमीपूजन समारोहाचा मोठा गाजावाजा झाला नाही नसता जीएसटी कायदा लागू करतांना जसा अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते आणि जसा जल्लोष करण्यात आला होता तसाच काही प्रकार या समारोहात देखील केला गेला असता. 

देशभर समस्यांचा पेव फुटलेला असताना अशा वेळी संसद भवनाच्या इमारतीचे भूमीपूजन करण्याची ही वेळ होती का? या प्रश्‍नाचे उत्तर त्याच प्रश्‍नात दडलेलेले आहे. समस्यांकडून तोंड फिरवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष शेतकरी आंदोलनापासून इतरत्र वळण्यासाठीच ही वेळ निवडली गेली.

तसे नव्या संसद भवनाची आवश्यकता होती का हा प्रश्‍न उपस्थित करणं चुकीचे आहे. कारण प्रत्येक शासन काळात मग ते भूतकालीन महाराजांचा, बादशाहांचा काळ असो की लोकशाहीतील नव्या राष्ट्रप्रधान प्रधानमंत्र्याचा काळ असो गरजेनुसार आणि सभ्यतेनुसार इमारती बांधल्या जातात. यामुळेच प्राचीन काळापासून आजवर सभ्यतांचा इतिहास अशाच इमारतींद्वारे लिहिला गेला आणि प्रस्तुत केला गेला आहे. भविष्यातही असे होत राहणार. याद्वारेच एका सभ्यतेपासून दुसर्‍या सभतेच्या पिढींची परंपरा अस्तित्वात येते आणि याच प्रतिकांद्वारे सभ्यतेची भविष्यकाळाकडे वाटचाल होत असते. या द्वारेच इतिहासाची मांडणी होत राहते. हाच तो काळाचा प्रवास; या प्रवासात मानवसंस्कृतीत खडांजगी होत राहते. एका राजवटीनंतर दुसरी उदयास येते, ती लयास जाते आणि तिसर्‍या संस्कृती-सभ्यतेचा उदय होतो. विथ द पॅसेज टाईम. काळानुरूप एकानंतर दुसरी सभ्यता काळाच्या पड्यावर आपला ठसा उमटविण्याचे प्रयत्न करत असते. मानवी इतिहासाच्या जगात विभिन्न संस्कृतीची प्रतिके, इमारती याचा पुरावा आहेत. 

भूतकाळातील मानवी समाज आणि तत्कालीन राजवटी आजच्यासारख्या प्रगत नव्हत्या. आपल्या रयतेला रोजी रोटी पुरवण्याचा एकमेव उपाय त्यावेळी विविध आलीशान इमारती बांधणे हाच होता. औद्योगिक क्रांतीनंतर लोकांना रोजगार पुरविण्याची असंख्य साधने मानवांनी विकसित केली. आता रोजगारासाठी इमारती उभे करण्याची गरज कोट्यावधी जनतेच्या उदर्निवाहासाठी इमारती बांधण्याची आवश्यकता संपली. मोठे व्यापार उदीम औद्योगिक कारखानदारी हे सभ्यतेचे प्रतिक बनले. लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक समुह उभारले जावू लागले आणि म्हणून वर्तमान काळात इमारतींकडे संस्कृतीचा वारसा या नात्याने पाहिले जात नाही आणि म्हणूनच एखाद्या राजवटीने, शासकाने असे काही पाऊल उचलले तर जुन्या इमारती अस्तित्वात असताना नव्या इमारती, बांधण्याची योजना केली तर प्रश्‍न निर्माण होतात म्हणजे अधीचे संसद भवन असताना नव्या संसद भवनाची इमारत बांधण्याचे काय प्रयोजन, असे लोक विचारू लागले आहेत आणि ते साहजिकही आहे. याचे उत्तर या प्रश्‍नात दडलेले आहे की आपल्याकडे जुने आणि चांगले घर असताना नवीन घर बांधायची गरज काय? 

सध्या निरनिराळ्या कारणांनी देशाची अर्थव्यवस्था इतकी खालावली आहे की, यातून सुधारणेकडे प्रवास सुरू व्हायला किती वर्ष लागतील, सांगता येत नाही. आधी नोटाबंदी नंतर जीएसटी नंतर लॉकडाऊन आणि कोरोनाचा उद्रेक अशा भयंकर समस्यांशी तोंड देत असताना नवीन संसद भवनाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची ही वेळ नव्हती आणि फक्त संसद भवनच नाही तर सरकारने हाती घेतलेल्या व्हिस्टा (सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट)वर 20,000 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या योजनेनुसार राष्ट्रपती भवनापासून गेटवेपर्यंत 13-14 किलोमीटरच्या अंतरातील सध्या अस्तित्वात असलेल्या शासकीय इमारतींचे नुतणीकरण तसेच नव्या इमारतींची उभारणी देखील केली जाणार आहे. संसद भवनाची चार मजली इमारत 64500 वर्गमीटरध्ये पसरलेली असेल आणि एकट्या याच इमारतीवर 971 कोटींचा खर्च होणार आहे. सध्याच्या संसद भवनात 888 सदस्यांच्या बसण्याची जागा आहे. तर नव्या इमारतीत 1224 सदस्यांच्या बसण्याची सोय केली जाणार आहे. 2024 पर्यंत म्हणजेच पुढच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही संबंध योजना बांधून पूर्ण करण्याचे ठरवले आहे. पण सर्वोच्च न्यायालयात राजीव सुरा यांनी व्हिस्टा प्रोजेक्टला आव्हान दिले असल्याने सध्या तर बांधकामावर कोर्टाने बंदी घातलेली आहे. पण पुढे ती बंदी कोर्टाकडूनच उठविली जाणार हा निकाल सामान्य माणसांनाही माहित आहे म्हणून अशा आव्हानाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. 


- इफ्तेखार अहेमद

संपादक


अधिवेशनात मुस्लिम आरक्षणावर मुस्लिम मंत्र्याचं मौन शर्मेची बाब; येणार्‍या काळात मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासणार : अजीज पठाण


राज्यात सध्या सर्वात चर्चेचा विषय हा आरक्षणाचा आहे. त्यातल्या त्यात मराठा आरक्षण. 2013 ला जाता-जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. परंतु 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची सत्ता गेली आणि युती सरकार सत्तेत आलं. युतीचा काळ हा आंदोलनाचा काळ म्हणून गाजला. ठोस निर्णयांची वाणवा याही सरकारच्या काळात होती. केंद्रात आणि राज्यात भाजपा युतीचं सरकार असून देखील मराठा आरक्षणाचा तिढा त्यांना सोडवता आला नाही. आश्‍वासनांची खैरात अन् मिरविले जोरात एवढचं काय ते साध्य करता आलं. शेवटी-शेवटी मी पुन्हा येईपर्यंत निघून गेला. युती सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राणे आयोग नेमला. प्रकरण न्यायालयात गेलं तिथे मात्र अजूनही भिजत घोंगडच आहे. युती सरकारनं (उर्वरित पान 2 वर)

मुस्लिम आरक्षणाकडं मात्र सपशेल कानाडोळा केला. न्यायालयानं शिक्षणात मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यासाठी नवीन अध्यादेश काढण्याचे सूचविले मात्र द्वेषापोटी आणि हिंदू मताची झोळी आपल्यापासून दूर जाईल यामुळे त्यांनी काहीच केले नाही. 2019 मध्ये राज्यात निवडणुका झाल्या. भाजपा-युतीचं बहुमत असूनदेखील त्यांना सरकार बनविता आलं नाही. 

केंद्रात रात्रीची घोषणा अन् राज्यात पहाटेचा शपथविधी एवढचं लक्षात राहिलं. भाजप ’आस्तीन का सांप’प्रमाणे सत्तेतून शिवसेनेला बाजूला सारत असल्याचे लक्षात आल्यामुळे युती विस्कटली आणि शरद पवार आणि अजित पवारांच्या खेळीत घट्ट अडकली. त्यामुळे राज्यात ’एकला चलो रे’ संपुष्टात येवून ’सब मिलकर चलेंगे भाजपा को सत्ता से दूर धकेलेंगे’ म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार बनले आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. या सरकारला प्रारंभीच कोरोनाचा सामना करावा लागला. आता यातून सावरतो न सावरतो तोच राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि चर्चा झडू लागल्या. 

गल्ली पासून राजधानी पर्यंत आणि विधानसभेपासून न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणावर चर्चा होत आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम आरक्षणावर मात्र मूग गिळून गप्प आहेत. यात त्यांचा एकट्याचाच दोष नसून मुस्लिम समाजातील नेत्यांचाही दोष आहे. ते ही आपल्या नेतृत्वाला आपल्या समाजाच्या 5 टक्के आरक्षणाची आठवण करून देत नाहीत की काय असे वाटत आहे. त्याऐवजी नेतृत्वानेच जरा थांबा असे म्हटले असावे, असा सूरही समाजातील सामाजिक संघटनातून उमटत आहे. त्यामुळेच की काय राज्यातील मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीमार्फत 14 डिसेंबर रोजी राज्य सरकारविरूद्ध काळ्या फिती लावून निषेध करीत मुस्लिम आरक्षणाची आठवण करून देण्यात आली. 

मुस्लिम समाजाच्या दुर्दशेबाबत न्या. राजेंद्र सिंह सच्चर समितीने अहवाल सादर केला. त्यामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात शिफारशीही करण्यात आल्या. राज्यसरकारनं महेमदूर्रहेमान आयोग स्थापन करून त्यांच्याकडूनही अहवाल मागविला. तेव्हाही मुस्लिमांची सर्व स्तरातील पिछेहाट समोर आली. तरी देखील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर सध्याचे पुरोगामी म्हणविणारे सरकार गप्प आहे. याचा समाजाने काय अर्थ घ्यायचा,हेच कळत नाही. अपेक्षा करूया  की लवकरच सरकार निवडणुकांच्या आधी मुस्लिम आरक्षण लागू करून पुण्य वाटून        घेईल.  

महाराष्ट्राच्या मुसलमानांकरिता सर्वात मोठी शर्मेची बाब 

अजिज पठाण (मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष, महाराष्ट्र) शोधनशी बोलताना म्हणाले, हे जे सरकार जे स्वतःला धर्मनिरपेक्ष मानते. यामध्ये खासकरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपल्या जाहिरनाम्यामध्ये लिहिले होते की, सत्तेत आल्यास मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ देऊ. मुस्लिम आरक्षणा संदर्भात संवैधानिक काही अडचण नाही. त्यामुळे कोर्टानं याला स्वीकार केलं आहे. कोर्टात मी ही एक पार्टी आहे. हाय कोर्टातही आणि सुप्रिम कोर्टात हे आरक्षण स्वीकृत झालं आहे. त्यामुळे याला काही संवैधानिक अडचण नाही. त्यामुळे सध्या सरकारला मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कशाची भीती वाटत आहे हेच कळत नाही. तसेच मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचं दूसरं अधिवेशन उस्मानाबाद येथे 2018 मध्ये झाले होते. यावेळी आज जे काँग्रेस-राष्ट्रवादीचे जे आमदार आणि मंत्री आहेत त्यांनी हजेरी लावली होती. आणि त्यावेळी आमच्या मंचावर त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा ही आम्ही सत्तेत येऊ सगळ्यात अगोदर मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ. मात्र सत्तेत येवून एक वर्षे झालं तरी या संदर्भात सरकारनं ब्र शब्दही नाही काढला. एकदा नवाब मलिक यांनी मंत्री मंडळात बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांना कोणत्या गोष्टीनं दाबल कळायला तयार नाही. तेव्हापासून ते आजपर्यंत मुस्लिम आरक्षणावर ते गप्प आहेत. मुस्लिम समाजाच्या नावानं आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीनं जे मंत्री बनविले ते सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. ते व्यवसायासाठी महाराष्ट्रात आले. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या जमीनी परिस्थितीशी अवगत नाहीत किंबहुना त्यांचा काही संबंध नाहीये. येथील मुसलमान कोणत्या परिस्थितीशी झगडत आहे  हे त्यांना माहित नाहीये. ते पैशाच्या जोरावर राजकारण करतात. ते मोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पुढे मागे फिरून मंत्रीपद झोळीत पाडून घेतात.  

स्थानिक मुस्लिम नेतृत्व पुढे येऊ न देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिम प्रत्येक क्षेत्रात अडचणीत आहेत. याचं दुखणं ते समजू शकत नाहीत. मुस्लिम मंत्री फक्त नावासाठी तिथे बसविले जातात. त्यामुळे येणार्‍या काळात आम्ही मुस्लिम मंत्र्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं आंदोलन करणार आहोत. कारण ते आमच्या समाजाच्या नावानं मतं घेतात. समाजाच्या नावानं मंत्रिपद घेत आहेत. समाजाबद्दलबोलण्यासाठी ते मूग गिळून गप्प बसतात. दुर्दैव या गोष्टीचं आहे की, मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टात स्टे मिळून देखील जे या महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक कल्याण मंत्री आहेत ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण भेटले पाहिजे.  ठीक आहे भेटले पाहिजे. परंतु ते मुस्लिम आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाहीत. मराठा समाजाबद्दल बोलण्यासाठी तर दोन्ही सभागृहात त्यांचे 180 आमदार आहेत. 

मराठा आरक्षणाबद्दल अधिवेशनात अशोक चव्हाण यांनी मोठ्या जोरात भूमिका मांडली. परंतु तेथे एखाद्या मुस्लिम मंत्र्याने किंवा मुस्लिम आमदाराने मुस्लिम आरक्षणावर तोंडसुद्धा उघडले नाही. ही महाराष्ट्राच्या मुसलमानांकरिता सर्वात मोठी शर्मेची बाब आहे . 

- अजीज पठाण, अध्यक्ष मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.


मुस्लिम आरक्षणावर निर्णय घेण्याकरिता सर्वोत्तमकाळ

सध्याचं सरकार जे बनलं यामधील काँग्रेस-राष्ट्रवादीने पूर्वी जाता-जाता मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात अध्यादेश आणला होता. या सरकारला अजून चार वर्षे बाकी आहेत त्यांनी जर ठरविले तर मुस्लिम आरक्षण लागू होऊ शकतं यासाठी भाजपाचा कितीही विरोध झाला तरी तो तोकडा पडेल आणि मुस्लिम आरक्षण लागू होईल. कारण आक्रमक शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. यांच्याकडे सध्या मोठी संधी आहे विधेयक आणून मुस्लिम आरक्षण लागू करण्याची. ते जरी म्हणत असले की कोर्टात टिकणार नाही मात्र हायकोर्टात तर मुस्लिम आरक्षण  टिकलेलंच आहे. जर राजकीय इच्छाशक्ती या सरकारमध्ये आहे तर हीच योग्य वेळ आहे मुस्लिम आरक्षण लागू करण्याची. आम्ही धर्माच्या आधारावर आरक्षण मागत नाही. कारण आमचा धर्म तर इस्लाम आहे. समाज मुस्लिम आहे. ज्यावेळी अध्यादेश काढला होता त्यावेळी तर कोर्टात टिकलं होतं. आता तर पक्क होईल. त्यामुळे सरकारनं आताच मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. महेमुदूर रहेमान कमिटीच्या अहवाल सुद्धा यासाठी उपयुक्त आहे. कारण मुस्लिम समाज हा मागासलेला आहे. - डॉ. रागीब अहेमद, पूर्व समन्वयक न्या. राजेंद्रसिंह सच्चर संघर्ष समिती.


मुस्लिम आरक्षण, शिक्षण आणि संरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा

पुरोगामी म्हणविणार्‍या सरकारनं मुस्लिम आरक्षणाचं जे वचन दिलं होतं ते पूर्ण कराव. आज त्यांच्यांकडे राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात बहुमत आहे. मुस्लिम मंत्र्यांनी आपली बाजू मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींसमोर भक्कमपणे मांडून मुस्लिम आरक्षण, शिक्षण आणि संरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायला भाग पाडावं.नाहीतर येणार्‍या काळात मुस्लिम मंत्र्यांना समाजासमोर जायला तोंड राहणार नाही. संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडणार आहे.-मोहसीन खान, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य.

- बशीर शेख

उपसंपादक



(८५) ....आणि सुधारणा झालेल्या या भूतलावर हिंसाचार माजवू नका,७१ यातच तुमचे भले आहे जर खरोखरीच तुम्ही ईमानधारक असाल.७२

(८६) (आणि जीवनाच्या) प्रत्येक मार्गावर वाटमारे बनून बसू नका की तुम्ही लोकांना भयग्रस्त करावे आणि श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना अल्लाहच्या मार्गापासून तुम्ही प्रतिबंध करावा आणि सरळमार्गाला वाकडे बनविण्यासाठी तुम्ही उत्सुक व्हावे. आठवा तो काळ जेव्हा तुम्ही थोडेसे होता. मग अल्लाहने तुमची संख्या वाढविली आणि डोळे उघडून पाहा की जगात उपद्रव माजविणाऱ्या लोकांचा काय शेवट झाला.

(८७) जर तुमच्यापैकी एक गट त्या शिकवणुकीवर, ज्याच्यासहित मला पाठविण्यात आले आहे, ईमान धारण करतो आणि दुसरा गट ईमान धारण करत नाही तर संयमाने पाहात राहा इथपावेतो की अल्लाहने आपल्या दरम्यान निर्णय करावा आणि तोच सर्वोत्तम न्यायनिवाडा करणारा आहे.''

(८८) त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी जे आपल्या मोठेपणाच्या दर्पात पडले होते, त्याला सांगितले, ''हे शुऐब! आम्ही तुला व त्या लोकांना ज्यांनी तुझ्यासमवेत श्रद्धा ठेवली, आपल्या वस्तीतून हाकलून लावू अन्यथा तुम्हा लोकांना आमच्या संप्रदायात परत यावे लागेल.'' शुऐबने उत्तर दिले, ''काय बळजबरीने आम्हाला परतविले जाईल, आम्ही तयार नसलो तरी?

(८९) आम्ही अल्लाहवर कुभांड रचणारे ठरू, जर आम्ही तुमच्या संप्रदायात परत आलो जेव्हा अल्लाहने त्यापासून आमची सुटका केली आहे. आमच्यासाठी त्याकडे परतणे आता कोणत्याही प्रकारे शक्य नाही याव्यतिरिक्त की आमच्या पालनकर्ता अल्लाहने तशी इच्छा केली.७३ आमच्या पालनकर्त्याचे ज्ञान प्रत्येक वस्तूवर व्याप्त आहे. त्याच्यावरच आम्ही भिस्त ठेवली. हे पालनकर्त्या! आमच्या व  आमच्या  देशबांधवांच्या  दरम्यान  ठीक-ठीक  निर्णय कर  आणि  तूच  सर्वोत्तम  निर्णय  करणारा  आहेस.''

(९०) त्याच्या जनसमुदायातील सरदारांनी, ज्यांनी त्याच्या गोष्टी स्वीकार करण्यास नकार दिला होता, एकमेकांस सांगितले, ''जर तुम्ही शुऐबचे अनुयायित्व स्वीकारले तर नष्ट व्हाल.''७४

(९१) परंतु घडले असे की एका थरकांप उडवून देणाऱ्या संकटाने त्यांना गाठले व ते आपल्या घरांत पालथेच्या पालथेच पडलेले राहिले.

(९२) ज्या लोकांनी शुऐब (अ.) ला खोटे लेखले ते नाश पावले जणूकाही कधी त्या घरांत ते राहिलेच नव्हते. शुऐबला खोटे लेखणारेच शेवटी नष्ट झाले७५

(९३) व शुऐब (अ.) असे सांगून त्यांच्या वस्त्यांतून बाहेर पडला की, ''हे देशबांधवांनो! मी आपल्या पालनकर्त्याचे संदेश तुम्हाला पोहोचविले आणि तुमच्या हितचिंतकाचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले, आता मी सत्य नाकारणाऱ्या लोकांबद्दल खेद तरी कसा व्यक्त करणार?''७६

(९४) कधी असे घडले नाही की आम्ही एखाद्या वस्तीत पैगंबर पाठविला आणि त्या वस्तीतील लोकांना त्याआधी अडचणीच्या व कठीण परिस्थितीत टाकले नाही जेणेकरून ते विनम्र व्हावेत. (९५) मग आम्ही त्यांच्या दुरावस्थेला सुस्थितीत परिवर्तीत केले इतके की ते खूप संपन्न झाले व म्हणू लागले, ''आमच्या पूर्वजांवरदेखील बरे-वाईट दिवस येतच राहिले आहेत.'' सरतेशेवटी आम्ही त्यांना अचानक पकडले त्यांना कळलेसुद्धा नाही.७७ 


७१) या वाक्याचा सविस्तर अर्थ याच सूरहच्या टीप -४४ व ४५ मध्ये आला आहे. येथे मुख्य रूपात पैगंबर शुऐब (अ.) यांच्या कथनाचा संकेत याकडे आहे की सत्यधर्म आणि सत्चरित्रावर आधारित जीवनाची व्याख्या मागील पैगंबरांनी आपल्या मार्गदर्शन व नेतृत्वात पूर्ण केली होती, आता तुम्ही आपल्या विश्वास आणि आस्थेच्या मार्गभ्रष्टतेत आणि नैतिक पतनात त्यास बरबाद करू नका. 

७२) या वाक्याने स्पष्ट होते की हे लोक स्वत: ईमानचे दावेदार होते. याविषयी वर उल्लेख आला आहे. वास्तविकपणे जीवनव्यवस्थेत बिघाड झालेले मुुस्लिम होते. अवधारणात्मक तसेच नैतिक आणि चारित्र्यिक बिघाड आणि मार्गभ्रष्टतासह त्यांच्यात फक्त ईमानचा दावाच नव्हता तर यावर त्यांना गर्वसुद्धा होता. म्हणूनच पैगंबर शुऐब (अ.) यांनी सांगितले की तुम्ही ईमानधारक असाल तर तुमच्याकडे भलाई, चांगुलपणा, सत्यत आचरणात दिसले पाहिजे. तुमच्याजवळ भलाई आणि दुष्टतेचा  आदर्श  त्या  भौतिकवाद्यांपासून  वेगळा असला पाहिजे जे अल्लाह व परलोकला मानत नाहीत.

७३) हे वाक्य त्याच अर्थाने आहे. त्यात 'ईन्शा अल्लाह' (अल्लाहने इच्छिले तर) बोलले जाते. याविषयी सूरह १८ (कहफ) आयत २३-२४ मध्ये स्पष्ट केले आहे, ''एखाद्या गोष्टीविषयी दाव्याने सांगू नका की मी असे करीन.'' परंतु असे म्हणा की ''अल्लाहने इच्छिले तर असे करीन.'' कारण खरा ईमानधारक अल्लाह प्रभुत्वशाली असण्याचा व आपण त्याचे दास असून सर्वस्वी त्याच्याच अधीन आहोत, याची सतत जाणीव ठेवणारा आहे. तो आपल्या सामर्थ्यावर कधीही असा दावा करू शकत नाही की मी ही गोष्ट करूनच राहील किंवा हे काम कदापि करणार नाही. परंतु जेव्हा तो सांगेल तर म्हणेल की माझी इच्छा असे करण्याची किंवा न करण्याची आहे. परंतु माझी इच्छापूर्ती माझ्या स्वामीच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्याने सौभाग्य दिले तर सफल होईन नाही तर असफल राहीन.

४) या लहानशा वाक्याकडे वरवरची नजर टाकली जाऊ नये. हे वाक्य म्हणजे येथे थांबून गहण विचार करण्याची जागा आहे. मदयनचे सरदार आणि नेतागण तर सांगतच होते आणि आपल्या राष्ट्राला विश्वासात घेत होते की पैगंबर शुऐब (अ.) ज्या ईमानदारी आणि सत्यतेकडे बोलवित आहे तसेच चारित्र्य आणि आचरणाच्या या सिद्धान्ताची पाबंदी करण्यास सांगत आहे, त्यांना आम्ही स्वीकारले तर आमचा सर्वनाशच होईल आणि आमचा व्यापार चौपट होईल, जेव्हा आम्ही पूर्णत: सत्य बोलू लागलो आणि सच्च व्यवहार करू लागलो तर आमचा व्यापार चौपट होईल. आम्ही आता जगाच्या सर्वात मोठ्या राजमार्गाच्या चौफुलीवर वसलेलो आहोत तसेच इजिप्त् आणि इराकच्या सुसभ्य व भव्य राज्यांच्या सीमालगत आबाद झालेलो आहोत. आम्ही काफिल्यांना लुटणे बंद केले आणि साधेभोळे शांतीप्रिय लोक बनून राहिलो तर जे आर्थिक आणि राजनैतिक लाभ आपल्याला वर्तमान भौगोलिक स्थितीपासून मिळतात, ते सर्व नष्ट होतील. इतर शेजारील राष्ट्रांवर आमचा आज जो प्रभाव आहे तो नष्ट होईल. हे सर्व पैगंबर शुऐब (अ.) यांच्या राष्ट्रातील सरदारांपर्यंतच सीमित नव्हते तर प्रत्येक युगातील बिघडलेल्या लोकांनी सत्य आणि प्रामाणिकपणाच्या आचरणात याच संकटांना तोंड दिले. प्रत्येक युगातील बिघडलेल्या लोकांचा बिघाड निर्माण करण्यासाठी हाच विचार होता. व्यापार-उदिम, राजनीती आणि जगातील इतर व्यवहार अनैतिकतेविना,  झुठशिवाय आणि लबाडीविना चालूच शकत नाहीत. प्रत्येक ठिकाणी सत्यसंदेशांविरुद्ध जोरदार अपवाद आणि विवशता पुढे ठेवल्या गेल्या, त्यांच्यापैकी एक हीसुद्धा आहे की, जगाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन या संदेशाचे पालन करीत राहिले तर राष्ट्र आणि त्याचे नागरिक नष्ट होऊन जातील. 

७५) मदयनचा हा विनाश बराच काळ जवळच्या राष्ट्रांत म्हणीच्या रूपात प्रसिद्ध होता. पैगंबर दाऊद (अ.) वर अवतरित `जबूर' मध्ये एके ठिकाणी उल्लेख आहे, ''हे अल्लाह! अशा अशा राष्ट्रांनी तुझ्याविरुद्ध प्रण केला आहे म्हणून तू त्यांच्याशी तोच व्यवहार कर जसा मदयानशी तू केला होता.'' (८३ : ९-१५) यशाहयाह पैगंबर एके ठिकाणी  बनीइस्राईलींना  सांत्वन  देत  म्हणतात, ''आशूरवाल्यांशी  भिऊ  नका  जरी   ते   तुमच्याशी    इजिप्त्  लोकांसारखा  अत्याचार  करीत  आहेत.  काही   काळानंतर  सेनांचा  प्रभु त्यांच्यावर  आपला वार करील आणि त्यांचा परिणाम तोच होईल जो मदयानचा झाला होता.'' (यशाहयाह - १० : २१-२६)

७६) या सर्व ऐतिहासिक घटनांचा येथे उल्लेख केला आहे, त्या सर्वांच्या माध्यमाद्वारा आपल्या ''प्रियतमच्या रहस्याचा उल्लेख'' ही शैली स्वीकारली गेली आहे. प्रत्येक घटना या मामल्याशी सुयोग्य बनते जी आज पैगंबर मुहम्मद (स.) आणि आपल्या अनुयायांशी घटित होत होती. प्रत्येक ऐतिहासिक घटनेचा केंद्रबिंदू एक पैगंबर आहे. पैगंबरांची शिकवण, त्यांचे संदेश आणि उपदेश, त्यांची हितैषिता, त्यांचे वैश्विक कल्याणकार्य अशाप्रकारे सर्वकाही ठीक त्याचे आहेत जे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे होते. या ऐतिहासिक घटनांचा दुसरा पक्ष सत्याला नाकारणारी मंडळी आणि राष्ट्र आहे. त्यांच्या धारणाविषयीची मार्गभ्रष्टता, नैतिक दोष, अज्ञानतापूर्ण हठधर्मीपणा, त्यांच्या सरदारांचा व नेत्यांचा अहंभाव, तसेच मार्गभ्रष्ट लोकांचा आपल्या मार्गभ्रष्टतेवर गर्व व आग्रह इ. सर्व तेच आहे जे कुरैश लोकसमूहात आढळत होते. प्रत्येक घटनेतील नाकारणाऱ्या राष्ट्राचा जो परिणाम झाला तोच परिणाम कुरैश लोकांच्या पुढे ठेवून त्यांना बोध घेण्याचे आवाहन केले. याद्वारे कुरैश लोकांना सचेत केले गेले. त्यांना सांगितले गेले की तुम्ही अल्लाहने पाठविलेल्या पैगंबराची शिकवण स्वीकारली नाही आणि तुमच्या जीवनपद्धतीला सुधारण्याची जी संधी तुम्हाला उपलब्ध आहे, तिला तुम्ही अज्ञानात वाया घालू नका. अन्यथा तुम्हालाही त्याच विनाशाला सामोरे जावे लागेल जे नेहमी पथभ्रष्ट आणि बिघाडावर गर्व करणाऱ्या आणि आग्रह धरणाऱ्या राष्ट्राला सामोरे जावे लागलेले आहेत. 

७७) एक एक पैगंबर आणि एक एक राष्ट्राच्या घटनांचा वेगवेगळा उल्लेख केल्यानंतर आता हा व्यापक नियम  सांगितला जात आहे. ज्याला अल्लाहने प्रत्येक युगात पैगंबरांना पाठवितांना अवलंबिला आहे. तो नियम म्हणजे जेव्हा  एखाद्या राष्ट्रात  पैगंबर  पाठविला  गेला  तेव्हा  प्रथमत: त्या राष्ट्राच्या बाह्य वातावरणाला संदेश  स्वीकार करण्यास पूर्णता अनुकूल बनविले. म्हणजे त्या राष्ट्राला संकटात आणि कठीण परिस्थित टाकले गेले. अकाल (दुष्काळ) महामारी, युद्ध, कारभारातील घाटा, लढाईतील पराजय इ. विपदा त्या राष्ट्रांवर टाकल्या गेल्या जेणेकरून समाजमन मृदु व्हावे. गर्वाने आणि हठधर्मीपणामुळे अकडलेली मान ढीली व्हावी, त्याचे सामर्थ्यांचे घमेंड आणि संपत्तीचा नशा उतरावा, आपली साधनसामुग्री आपली शक्ती आणि आपल्या योग्यतांवर त्याचा विश्वास डगमगावा. त्या राष्ट्राला जाणीव व्हावी की वर एक अशी शक्ती आहे जिच्या हातात त्या राष्ट्राचे भाग्य आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी राष्ट्र तयार होते. ते राष्ट्र आपल्या निर्माणकर्ता प्रभु अल्लाहपुढे नतमस्तक होण्यास तत्पर होते. अशा अनुकूल वातावरणातसुद्धा सत्य स्वीकारण्यास जे राष्ट्र तयार होत नाही तेव्हा त्याला समृद्धीच्या परीक्षेत टाकले जाते आणि येथून त्याच्या विनाशाची सुरुवात होते. जेव्हा ते राष्ट्र अल्लाहच्या देणग्यांनी मालामाल होते तेव्हा आपले वाईट दिवस विसरतात. त्या राष्ट्राच्या समाजमनात तेथील अल्प शिक्षित मार्गदर्शक इतिहासाचा विपर्यास करून टाकतात. ते पटवून सांगू लागतात की परिस्थितीचा हा उतार व चढाव आणि भाग्य, विकास, बिघाड निर्माणकर्त्याच्या प्रबंधातील नैतिक आधारावर होत नाही तर हे असे चालत राहाते तेसुद्धा अनैतिक कारणांमुळे. म्हणून संकटे आणि कठीण स्थिती येण्यामुळे नैतिक बोध घेणे आणि उपदेश करणाऱ्यांचा उपदेश ऐकून अल्लाहची क्षमायाचना करणे एक मानसिक दुर्बलता आहे, असे लोकांना पटविण्याचे कार्य ते तथाकथित दार्शनिक करत राहातात. याच मूर्ख मनोवृत्तीचा आलेख एका हदीसकथनाद्वारे दिला आहे. ``विपत्ती, संकट ईमानधारकांना सुधारत जाते जेव्हा ईमानधारक या भट्टीतून तावून सुलाखून तसेच असत्यापासून पवित्र होऊन बाहेर पडतो. परंतु दांभिकाची दशा मात्र गाढवासारखी असते. गाढवाला समजत नाही की त्याच्या स्वामीने त्याला का बांधले आहे आणि त्याला का सोडून दिले?'' जेव्हा एखाद्या राष्ट्राची स्थिती अशी बनते की संकटांनी तेथील समाजमन विरघळत नाही आणि अल्लाहपुढे नतमस्तक होत नाही, देणग्यांमुळे ते राष्ट्र अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करीत नाही की सुधार करण्यास प्रवृत्त होत नाही. अशा स्थितीत त्या राष्ट्राचा विनाश अटळ बनतो. तो त्या राष्ट्रावर कधी कोसळेल हे सांगता येत नाही. या आयतींमध्ये अल्लाहने ज्या नियमांचा उल्लेख केला आहे, ठीक तेच नियम पैगंबर मुहम्मद (स.) यांना पैगंबरत्व बहाल करते वेळीसुद्धा अवलंबिले गेले. दुर्भाग्याने पीडित राष्ट्राच्या ज्या कार्यनीती व जीवनव्यवहाराकडे संकेत केला आहे, ठीक तीच कार्यनीती सूरह ७ (आअराफ) अवतरणावेळी कुरैश लोकसमूहात प्रकट होत होती. हदीसमध्ये अब्दुल्लाह बिन मसऊद आणि अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांचे कथन आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्व बहालीनंतर कुरैशच्या लोकांनी त्यांच्या संदेशविरुद्ध मोहीम उघडली तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रार्थना केली.  ``हे अल्लाह! यूसुफच्या काळात जसा सात वर्षे दीर्घकाळ दुष्काळ पडला होता त्याच दुष्काळाद्वारा या लोकांविरुद्ध माझी मदत कर.'' म्हणून अल्लाहने कुरैशच्या राष्ट्राला दुष्काळग्रस्त केले. दशा ही झाली की लोक मृत जनावरे खाऊ लागले, कातडी, हाड आणि लोकर खाऊ लागले. मक्का येथील लोकांनी अबू सुफियानच्या नेतृत्वात पैगंबर मुहम्मद (स.) यांना विनंती केली की आमच्यासाठी अल्लाहशी प्रार्थना करा. परंतु जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या प्रार्थनेमुळे अल्लाहने ते संकट दूर केले आणि खुशालीचे दिवस आले तेव्हा ते लोक अधिकच गर्विष्ठ बनले आणि ज्यांची मन विरघळली त्यांनासुद्धा राष्ट्रातील दुष्ट लोकांनी ईमानापासून रोखले. ते म्हणू लागले की हे तर कालचक्र आहे. पूर्वी दुष्काळ पडतच होते. ही काही नवीन गोष्ट नाही की या वेळी  मोठा  दुष्काळ  पडला.  म्हणून  यापासून  धोका  खावून  पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या  फंद्यात अडकू नये. हे भाषण त्या वेळी होत होते जेव्हा हा अध्याय आअराफ अवतरित झाला. म्हणून कुरआनच्या या आयती ठीक प्रसंगानुरुप आहेत आणि याच पार्श्वभूमीला डोळयांसमोर ठेवून त्यांची सार्थकता लक्षात येते.



झोपलेल्या माणसाला जागे करणे सोपे असते पण झोपेचे सोंग करणाऱ्या माणसाला जागे करणे कठीण असते. झोपेचे सोंग करणारी मानसिकता ही परिवर्तनाला नेहमी शत्रू मानते. परिवर्तनाला शत्रू मानणारी मानसिकता ही समाजाचे मानसिक आणि बौद्धिक खच्चीकरण करून समाजाला चौकटीत बंदिस्त करीत असते. ही मानसिकता समाजाला चौकटी बाहेर जाऊच देत नाही. या मानसिकतेचे मानवी जीवनाच्या संवेदनेशी काही देणेघेणे नसते. या मानसशास्त्राच्या गुलामीत असणारी माणसे डोळे मिटवून या मानसशास्त्राचे पारायण करीत असतात. या लोकांना शहानिशा करणे परम अप्रिय वाटते. अशी माणसे परावलंबनाचे दास होतात. अशी माणसे प्रकृतीतः परिवर्तनाच्या विरोधातच असतात. ती माणसे माणुसकीला कुरूप करणाऱ्या प्रवृत्तीशी संग्राम करीत असतात, परिवर्तनाच्या उजेडाला थांबवणाऱ्या अंधाराच्या टिकऱ्या उडवित असतात, ती माणसे अंधाराला खाली मान घालायला लावतात याचा प्रत्यय अजीम नवाज राही यांच्या ‘वर्तमानाचा वतनदार’ या कवितासंग्रहामधून येतो. ‘वर्तमानाचा वतनदार’ हा कवितासंग्रह लोकवाङ्मय गृह मुंबई ने 2017 ला प्रकाशित केला आहे.

यापूर्वी अजीम नवाज राही यांचे ‘व्यवहाराचा काळा घोडा’ 2004 आणि ‘कल्लोळातला एकांत’ 2012 हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अजीम नवाज राही हे नव्वदोत्तरी मराठी कवितेतील सर्जनशील कवी आहेत. अजीम नवाज राही हे आपल्या कवितेमधून अवतीभोवतीच्या दुःखाशी चर्चा करणारे कवी आहेत. ते अवतीभोवतीच्या दुःखाशी केवळ चर्चाच करीत नाही तर त्या दुःखांना पराभूत करण्याचे सूत्र आपल्या कवितेमधून मांडतात. या दुःखांना पराभूत करण्याची अजिंक्य शक्ती त्यांना त्यांची कविता देते. अजीम नवाज राही यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या काही कवितांचा समावेश माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांचे कवितासंग्रह विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत.

अजीम नवाज राही हे बुलंद आवाजाचे धनी आहेत. मराठी बरोबरच उर्दू साहित्याचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते कवी बरोबरच उत्तम सूत्रसंचालक, निवेदन आहेत. सूत्रसंचालनातून त्यांनी महाराष्ट्राबाहेरील लोकांवरही भूरळ घातली आहे. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. ‘वर्तमानाचा वतनदार’ या कवितासंग्रहातील दार उघडणारी कविताच ‘सूत्रसंचालकाची रोजनिशी’ या शीर्षकाची आहे. या कवितेमधून कवी अजीम नवाज राही यांनी सूत्रसंचालकाची व्यथा आणि वेदना बोलक्या शब्दांत मांडली आहे.

‘सळसळत्या पिंपळासारखे राहावे लागते

सूत्रसंचालकाला सदा हरीत

आतल्याआत लपवाव्या लागतात

व्यावहारिक अडीअडचणींच्या पानगळी

एखाद्या शुष्क वाक्याची फांदी

चुकून वाणीतून डोकावली

की समयसूचकतेच्या इंद्रधनुष्यातून

कल्पक गुलालाची उधळावी लागते मूठ’ (पृ.क्र.8,9)

वरील ओळींमधील आशय हा सूत्रसंचालकाला वटवावी लागणाऱ्या भूमिकेतील रेखीवपणा स्पष्ट करणारा आहे. सूत्रसंचालक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोणकोणती आयुधे वापरतो, कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सूत्रसंचालक आपल्या निवेदनातून कार्यक्रमाचा विश्वासार्ह आशय फुलविण्यासाठी आपली बौद्धिक शक्ती पणाला कशी लावतो हे सूचित केले आहे. अजीम नवाज राही यांच्या देहबोलीत सूत्रसंचालनाचे पद्धतीशास्त्र चांगलेच मुरलेले आहे. या पद्धतीशास्त्रामुळे त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. सूत्रसंचालनात बेजबाबदारपणाला, उथळपणाला अजिबात स्थान नसते. हेच कवीने सूचविले आहे.

‘माझ्या निवेदनाला गोचिडसारखी चिकटलेली जात.

समारंभातही सोडत नाही पिच्छा

म्हणणारे म्हणतात

याची वाणी विणते

श्रवणसौख्याच्या गाठी

मुसलमान असूनही

बोलतात अस्खलित मराठी

देण्याची इच्छा झाली तरी

औदार्याचा पान्हा चोरून

जात्यंध दानशूर आखडता हात घेतात

कलेलाही धर्माच्या चौकटीत नेतात

एक बिच्चारी भाषा आहे

की दिली नाही तिने सापत्न वागणूक कधी’ (पृ.क्र.11)

वरील ओळींतील आशय कवीला उज्ज्वलतेकडे जाण्याची ऊर्जा पुरविणारा आहे. कवी आपल्या निवेदनातून कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावतो. त्यामुळे कार्यक्रमाला वेगळी झळाळी येते हे अगदी खरे असले तरी येथील मानसिकता सूत्रसंचालकाची शैली न पाहता सूत्रसंचालकाची जात पाहते. येथील धर्मांध व्यवस्था कवीच्या प्रतिभेचे स्वागत करण्याऐवजी आपल्या द्वेषाच्या जात्यात त्याला भरडू पाहते. सूत्रसंचालक मुस्लिम असल्यामुळे कौतुकाचे संदर्भ बदलतात. धर्मांध मानसिकतेला सूत्रसंचालकाच्या प्रतिभेत स्वारस्य नसते.

‘बिरादरीच्या ताकदीवर मूठभर अडाणी

मोहल्ल्यात गुणवत्ता पायदळी तुडवतात

लायकाला बैठकीत मिळतो कोपरा

मध्यभागी बसून न्यायनिवाडा करतो

मनगटाने शेंबुड पुसणारा छोकरा’ (पृ.क्र. 15)

वरील ओळींमधून कवीने बिरादरीची मजबूत व्यूह संरचना कशी असते याचे विश्लेषण मांडले आहे. बिरादरी ही आपल्या हितासाठी लायक लोकांना डावलते आणि नालायक लोकांच्या मार्फत आपल्या हिताचा आशय सर्वांवर लादते. कवी अजीम नवाज राही यांनी वरील ओळींमधून मोहल्ल्याचे मानसशास्त्र मांडले आहे. मोहल्यातील मानसशास्त्र हे सर्वसामान्य माणसाच्या संवेदनाविश्वाला घायाळ करणारे कसे आहे, तसेच समाजातील नव्या साहसांचे पंख कापणारे कसे आहे याचे मार्मिक विश्लेषण मोठ्या ताकदीने मांडले आहे. खरं पाहता काळ झपाट्याने बदलत आहे. बिरादरींनी ही आता आपल्या जुन्या मानसिकतेला निरोप द्यायला हवे. बिरादरींनी आपल्या चौकटींमधून बाहेर निघायला हवे.

‘अक्षरहीनतेच्या चिखलात धसलेल्यांची उभी हयात

तिथे तग धरणार कशा रसिकतेच्या वेली

उगवणाऱ्या दिवसाच्या पाठीवर

प्रापंचिक गरजांची पखाल’ (पृ.क्र. 19)

वरील ओळींमधून मुस्लिम भावजीवनातील स्वप्न कसे कोमजून जाते यांच्या नोंदी कवीने टिपल्या आहेत. मुस्लिम समाज वास्तवापासून लांब आहे की परिस्थितीने या समाजाला लांब ठेवले आहे. याचे प्रभावी चित्रण कवीने वरील ओळींमधून केले आहे. कवी मुस्लिम समाजाचे आक्रंदन मांडत असताना व्याकूळ होतो. कारण मुस्लिम समाजाच्या प्रगतीला मारक ठरणारे संदर्भ कवीला चांगल्याप्रकारे माहीत आहे. मुस्लिम समाजजीवनाच्या सुंदर स्वप्नाचा गर्भपात रोजच होतो. शिक्षण हे मुस्लिम समाजाला अज्ञानाच्या जबड्यातून बाहेर काढू शकतो. शिक्षण हे मुस्लिम समाजाला त्याच्या समृद्धीच्या असंख्य वाटा उघडून देईल. अशी तर्कसंगत मांडणी कवी अजीम नवाज राही यांनी वरील ओळींमधून केली आहे.

‘माणसांवर जनावरासारखी तुटून पडतात माणसं

मनसोक्त भाजतात हेव्यादाव्याची कणसं

मोहल्यात नसते सगळे कुशलमंगल

किरकोळ करणावरून उसळलेल्या हाणामारीला

मी संबोधू कोणती दंगल’ (पृ.क्र. 22,23)

एकीकडे सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे मोहल्ल्याचे जीवन करपलेले आहे तर दुसरीकडे मोहल्ल्यातील माणसांनी परस्परांतील प्रमोचा दोर स्वतःच्याच हातांनी कापलेला आहे. मोहल्ल्यातील माणसांनी माणुसकीची मोडतोड केली आहे. खरं पाहता मोहल्ल्यातील माणसे परस्परांसाठी हितकारक ठरायला हवी होती. पण परस्परांशी भांडून स्वतःच परस्परांच्या दुःखांची कारणे ठरलीत. या लोकांनी परस्परांच्या जीवनात कलहाचे आणि असुरक्षिततेचे जहर स्वतःच पसरविले आहे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. मोहल्ल्याच्या अवनतीला इतरांना जबाबदार धरता येणार नाही ही कवीने स्पष्ट भूमिका मांडली आहे. कवीची ही भूमिका स्पष्टपणाची आहे. त्याचबरोबर मोहल्ल्याच्या वाटचालीत सुधारणा व्हायला हवी. मोहल्ल्यातील माणसांनी परस्परांचा सन्मान करणे, परस्परांच्या भावभावनांचे संवर्धन करायला हवे.

रोजीरोटीचा प्रश्न रोजचाच आहे. रोजीरोटीच्या प्रश्नांबरोबरच नव्या पिढीला शिक्षित करणेही गरजेचे आहे. आपसात भांडण करण्यापेक्षा संघटीत होऊन मोहल्ल्यापुढील आव्हानांशी मुकाबला करायला हवा. मोहल्ल्यापुढील आव्हान मोठे आहे हे खरे आहे. पण संघटीत होऊन आव्हानांना तुडविता यतेे हेही खरे आहे. फक्त आपल्यासमोरील आव्हानांना तुडविण्याचा निर्धार हवा. आपसातील मारामारीला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा हवी, आधुनिक शिक्षण घेण्याची लालसा हवी. भोवतीच्या पर्यावरणाचे स्पंदने ऐकण्याची सवय लावायला हवी. स्वतःतील अहंकार सोडण्याची सवय लावायला हवी. हे झाले तर मोहल्ल्यात माणुसकीचा बहर येईल. हा अजीम नवाज राही यांचा सल्ला मोहल्ल्याने आपल्या काळजात कोरून ठेवायला हवा.

अजीम नवाज राही यांची कविता तडजोडीची भाषा शिकवित नाही. ती संघर्षाची भाषा शिकविते. ती जीवनातील असमतोलपणावर भाष्य करते. ती जीवनातील ज्वलंत वास्तवावर भाष्य करते. ती माणसांभोवती लादलेल्या चौकटींचे सीमोल्लंघन करण्याचे प्रशिक्षण देते.

‘एक दयाळू कविता आहे बिच्चारी

की शोषून घेते माझी दुःखं सारी

अन् चुकूनही करत नाही

कंठ निळा झाल्याचा आकांडतांडव’ (पृ.क्र. 72)

कवितेने कवीला नेहमी सजग केले आहे. कविता कवीला काय नाकारावे आणि काय स्वीकारावे हे शिकविते. जीवनातील समस्यांशी कसा मुकाबला करावा याचे प्रशिक्षण देते. कवितेने कवीला लढण्याचे बळ दिले आहे. जेव्हा अवतीभोवतीची परिस्थिती कवीला लाचार करण्याचा प्रयत्न करते, कवीचे पंख कापण्याचे षडयंत्र रचते, कवीला वास्तवापासून तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा कविताच कवीला अवसानघातकी परिस्थितीशी लढण्याचे बळ देते. अजीम नवाज राही यांची कविता त्यांना आपल्या उरात मानवीसौंदर्य वागविण्याचे बळ देते. अजीम नवाज राही यांची कविता त्यांना कधी विझू देत नाही. त्यांना कधी आपल्या बौद्धिकतेशी बेईमानी करू देत नाही. हेच अजीम नवाज राही यांच्या कवितेचे

मर्मशास्त्र आहे.

‘माझी कविता एकवटून आहे

गरिबीच्या अलीकडची, गरिबीच्या पलीकडची विव्हळणे’ (पृ.क्र. 81)

वरील ओळींमधील आशय अंतर्मुख करणारा आहे. कवी आपल्या कवितेद्वारे शोषित, पीडित, गरीब माणसांसाठी आंदोलन सुरू करतो. तो गरिबीचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण करतो कारण गरिबी माणसाला खूप छळते. गरिबी माणसाच्या स्वाभिमानाची हत्या करते. म्हणून कवी गरीब माणसांचे माणूसपण टिकविण्यासाठी आपल्या कवितेमधून आकांत मांडतो. पण कवीचा आकांत व्यवस्थेला दिसत नाही.

‘जात्यंध खेळताहेत आजही धर्माचा खेळ

बिरादरी असणारे सजातीय

अत्यल्पांना छळताहेत खुलेआम

सुरक्षेची हमी देणाऱ्या कळपवादा

तुला नगण्यांचा मनोभावे सलाम’ (पृ.क्र. 87)

धर्मांध मानसिकतेने मुस्लिम समाजाच्या मानवी प्रतिष्ठेची राखरांगोळी केली आहे. मुस्लिम समाजाला परकीय ठरविण्यात, देशद्रोही ठरविण्यात, दुय्यम ठरविण्यात कोणतीच कसर सोडली नाही. या मानसिकतेने मुस्लिम समाजाला त्यांच्या माणूसपणापासून तोडण्याची कोणतीच कसर सोडली नाही. या मानसिकतेने मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण विकसित केले आहे. हे जसे खरे आहे तसेच मुस्लिम समाजातील बिरादरींच्या ठेकेदारांनीही मुस्लिम समाजाची गळचेपी केली आहे. ही वेदना कवीने मोठ्या प्रभावीपणे मांडली आहे. कवी म्हणतो की, येथील धर्मांध शक्ती आणि बिरादरीवादी शक्तीने आपल्या अहंकाराने सर्वसामान्य मुस्लिम समाजाला वेठीस धरले आहे. कवी अजीम नवाज राही यांनी येथील एकूणच कळपवादाच्या विरोधात संग्राम पुकारला आहे. कवीचा संग्राम हा येथील समंजस सहजीवनासाठी आहे. 

‘सुपाएवढं अंतःकरण ठेवलं शाबूत

घेतली नाही भूमिका बोटचेपी

बसलो नाही आळीमिळी गुपचिळी

दाबणाऱ्यांनी दाबले

दाबून दाबून धपापले’ (पृ.क्र. 98)

वरील ओळींमधील आशय हा उत्कट स्वरूपाचा आहे. सुपाएवढं अंतःकरण शाबूत ठेवणे म्हणजे इतरांविषयी ममत्व भाव आपल्या हृदयात जपणे होय. कवीने बोटचेपी भूमिका घेणाऱ्या माणसांपुढे विधायकतेचा पर्याय उभा केला आहे. कवी कधीही आपल्या मनाला असुंदराचा हवाली करीत नाही. त्यामुळेच कवीला आपल्या विशाल हृदयात माणुसकीचे असीम सौंदर्य जपता आले आहे. हे सौंदर्यच कवीला अद्ययावत होण्यासाठी बळ देते.

अजीम नवाज राही यांच्या ‘वर्तमानाचा वतनदार’ या कविता संग्रहातील प्रतिमासृष्टीने मराठी कवितेची मौलिकता वाढविली आहे. नवनव्या प्रतिमांमुळे कवितेतील आशयाला चिंतशीलता प्राप्त झाली आहे. कवी अजीम नवाज राही यांची कविता ही प्रयोगशील आहे. त्यांनी बदलत्या भावजीवनाचे अत्यंत तरल चित्रण आपल्या कवितेमधून केले आहे. अजीम नवाज राही यांच्या कवितेचे वेगळेपण हे त्यांच्या प्रयोगशील शब्दरचनेत, शैलीत, अभिव्यक्तीत आहे. त्यामुळे त्यांची कविता ही अधिक आशयसंपन्न झाली आहे. अजीम नवाज राही यांची कविता अवतीभोवतीच्या नकाराला नाकारत पुढे जाते. त्याचप्रमाणे मोहल्ल्यातील नकारांनाही ती नाकारते. त्यांच्या कवितेमुळे मोहल्यातील पतझडीचा वीण शैल झाला आहे. त्यांची कविता मोहल्ल्यातील असुंदराशी मूलगामी संग्राम करते. हा संग्राम मोहल्ल्यातील चांगुलपणा वाचविण्यासाठी जसा आहे तसाच तो एकूणच मानवी जीवनाच्या सर्वकल्याणासाठीही आहे. अशा संग्रामकवीला पुढील काव्यप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!


-  डॉ. अक्रम पठाण 

नागपूर मो. : 8600699086



हे ईश्वरा, शेतकऱ्यांच्या प्रती सरकारला ताबडतोब सद्बुद्धी देरे बाबा! सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा फुंकर घातली तर बरे होईल. अन्नदाता शेतकऱ्यांचे हे आंदोलन हरीतक्रांतीचे मोठे प्रतीक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांप्रमाणेच ६५ लाख ईपीएस ९५ च्या पेन्शन धारकांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते. विकासासाठी सुधारणा आवश्यक परंतु कोणत्याही सुधारणा शेतकऱ्यांच्या विरोधात नसाव्यात.देशाचा विकास व्हायलाच पाहिजे यात तीळमात्र शंका नाही. परंतु विकासाच्या नावाखाली अन्नदाता शेतकरी व शिल्पकार कामगार यांची पीळवणूक होणार नाही याची काळजी सरकारने व राजकीय पुढाऱ्यांनी घेने गरजेचे आहे.

८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी भारत बंदची घोषणा केली. या बंदमध्ये अनेक विरोधी पक्ष सुध्दा उतरले होते. त्यामुळे आता सत्ताधारी दल म्हणतात की विरोधक शेतकरी आंदोलनाचे राजनीतीकरण करीत आहे. मी म्हणतो की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी समर्थन देणे हा गुन्हा आहे काय? भारतातील कोणताही राजकीय पक्ष असो देशाच्या १३० कोटी जनतेचा अचूक फायदा कसा घेता येईल याकडे करडी नजर असते. राजकीय पुढारी, पक्ष-विपक्ष हे नेहमीच स्वत:च्या स्वार्थासाठी खासकरून शेतकरी व कामगार यांच्या मजबुरीचा फायदा घेत असतात ही बाब जगजाहीर आहे.परंतु ८ डिसेंबर रोजी मंगळवारला जे शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले त्याला ज्यानी कोणी समर्थ दीले असेल ते देश विरोधी समजावे काय? ज्यांनी कोणी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले ते समर्थ राजकीय नसून शेतकऱ्यांचेच आहे ही बाब १३० कोटी जनता गृहीत धरतात. मग सरकारने का गृहीत धरू नये?

आज शेतकरी आंदोलनाला १५ दिवसांच्या वर होऊन गेले परंतु सरकार एक इंच ही मागे हटायला तयार नाही याला कोणती नीती म्हणावी?ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. संपूर्ण शेतकरी संघटना नवीन कृषी कायद्याच्या त्रृटी सरकारला आप-आपल्या भाषेत समजून सांगत आहे. परंतु सरकारच्या वागण्यावरून असे दिसून येते की नवीन कृषी कायद्यात कोणताही बदल करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलन आनखी उग्र होऊ शकते याला नाकारता येत नाही. सरकारने कृषी कायद्यात व कामगार कायद्यातच का बदल करावे? राजकीय पुढाऱ्यांच्या कायद्यात बदल करण्याची सरकारला का गरज वाटत नाही? आज देशाची व सरकारची तिजोरी भरण्याचे काम शेतकरी व कामगार वर्ग करीत असतो. परंतु तिजोरीला छिद्र पाडण्याचे काम देशाचा प्रत्येक राजकीय पुढारी, केंद्र सरकार व राज्य सरकारे करीत असतात. मग तो कोणत्याही पक्षाचा असो.

आज सरकारच्या हेटेखोरीवरून असे दिसून येते की जे काही आता नवीन कायदे अंमलात येत आहे ते संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांच्या व कार्पोरेट जगतच्या हिताचे व शेतकरी आणि कामगार यांना नुकसान पोहचवीणारे असल्याचे स्पष्ट दिसून येते. आज १५ दिवसांपासून शेतकरी थंडीने कुडकुडत आहे, कोरोणा महामारी छातीवर आहे, आंदोलन काळात अनेक शेतकरी बीमार पडत आहे. परंतु सरकारच्या चेहऱ्यावर थोडीशीही शीखस्त दिसून येत नाही. हा शेतकऱ्यांच्या प्रती घोर अन्याय असल्याचे मी समजतो.

उत्तरप्रदेशचे कृषीमंत्री सूर्यप्रताप शाही म्हणतात की मर्सिडीज आणि ऑडीसारख्या महागड्या गाड्या मिळविणारे लोक राजकीय हेतूने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. तर खरे शेतकरी उसाच्या शेतात काम करीत आहेत. हे सूर्यप्रताप शाही यांनी हे वक्तव्य एसीमध्ये बसून केले असावेत त्यामुळे ही हास्यास्पदबाब आहे. यावरून स्पष्ट होते की उत्तरप्रदेश सरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ओळखलेच नाही. शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यासाठी भाजपचे दिग्गज नेता प्रत्येक हतकंडा अपणावीतांना दिसत आहे. परंतु शेतकरी आपल्या मागणी करीता ठाम असल्यामुळे आता केंद्र सरकारने १३० कोटी जनतेची व शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी सरकार पश्र्चिम बंगालला टार्गेट बनवून ममता बॅनर्जी ला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजेच आज प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी शेतकण्याच्या तयारीत आहे.

शेतकरी थंडीत कुडकुडत आहे याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा पवीत्रा केंद्र सरकारने अंगीकारल्याचे दिसून येते. मी सरकारला आग्रह करतो की शेतकऱ्यांचे आंदोलन जास्त चिघळवू नये. याकरिता कृषी विधेयक ताबडतोब रद्द करावे व नंतर संशोधन करून व सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताचेच कृषी कायदे बनवीण्यावर भर दिला पाहिजे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे केंद्र सरकार शेतकऱ्यांचा मागण्यांना वेगळे वळण देऊन शेतकऱ्यांची मागणी ही देशाच्या दृष्टिकोनातून नुकसान दारी असल्याचा ढींढोरा पीटत आहे. यावरून असे दिसून येते की सरकार शेतकऱ्यांनाच न्याय देऊ शकत नाही तर आम जनतेला खरोखरच न्याय देईल काय हा प्रश्न १३० कोटी जनतेच्या मनात भेडसावत आहे.

आज ईपीएस १९९५ च्या पेन्शनधारकांचा प्रश्र्न मार्गी लागलेला नाही व पेन्शन धारकांना अजूनपर्यंत न्यायसुध्दा मिळालेला नाही. आज सरकारच्या तिजोरीत ईपीएस ९५ पेन्शन धारकांचे ५ लाख करोड रुपये जमा आहे. या पैशातूनच सरकार अनेक योजना राबवीत असते. परंतु ६० ते ७० वर्षांचा म्हातारा पेन्शनधारक सरकारकडे मोठ्या आशेने टकलावुन बसला आहे. सरकारला ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या प्रती थोडीशीही सहानुभूती असल्याचे दिसून येत नाही. आज पेन्शन धारकांची अशी भयानक परिस्थिती आहे की जगावं की मरावं. आज असे वाटत आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना व कामगारांना वाऱ्यावर सोडले की काय असे वाटत आहे.

पश्चिम बंगालमध्ये बीजेपी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या काफील्यावर हल्ला झाला ही निंदनीय बाब आहे. परंतु या घटनेची कारवाई व्हायला पाहिजे. या घटनेचे राजकारण करून त्रृनमुल कॉंग्रेस (टीएमसी) व भाजप राजकारण करतांना दिसत आहे. कोणताही हमला असो तो निंदनीयच आहे. परंतु एका व्यक्तीवर हल्ला झाला तर मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात बबाल सुरू आहे. परंतु करोडो अन्नदाता रस्त्यावर बसले आहे त्याकडे केंद्र सरकार जातीने लक्ष न देता पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तयारी असल्याचे दिसून येते. कोणीही गुन्हेगार असो त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. गेल्या २६ नोव्हेंबर पासून अन्नदाता शेतकरी थंडीत कुडकुडत आहे, करोना संक्रमन आपले पाय पसरवीत आहे तरीही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून राजकीय पुढारी एसीमध्ये बसुन असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारला विनंती आहे की अन्नदाता शेतकऱ्यांचा अंत न पहाता त्यांच्या संपूर्ण मागण्यांना प्रथम प्राधान्य देऊन ताबडतोब शेतकऱ्यांच्या समस्येवर तोडगा काढायला पाहिजे. कारण सरकारने शेतकरी संघटनेसोबत सहा वेळा चर्चा झाली परंतु अजूनही समाधान नीघाले नाही.

४० शेतकरी संघटनांनी नवीन कृषी कायद्याच्या त्रृटी सरकारला चांगल्याप्रकारे समजून सांगितल्या आहे. मग सरकार कृषी कायदा मागे का घेत नाही? सरकार अन्नदाता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तर कोणाच्या मागण्या पूर्ण करणार? सरकार आता शेतकरी आंदोलकांना विरोधक भडकवीत असल्याचा आरोप लावत आहे. यावरून स्पष्ट होते की सरकारच्या नितीमध्ये व नियतीमध्ये अवश्य खोटं दिसून येत आहे. केंद्र सरकार जेपी नड्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करून देशात विधानसभेची तयारी करीत आहे हे कसले राजकारण? सरकारने तर प्रथम प्राधान्य शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते. भारतात प्रत्येक राजकीय पक्ष-विपक्ष आपली राजकीय पोळी शेकण्याच्या मागे एकवटल्याचे दिसून येते. असेही सांगण्यात येत आहे की देशातील अलग-अलग राज्यातील तब्बल ४३० शेतकरी संघटना सरकार सोबत दोन-दोन हात करण्यास सज्ज झाली आहेत. आताही सरकार शेतकऱ्यांना कमजोरी समजत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची ताकद द्वीगुणीत होत आहे. सरकार शेतकरी आंदोलनावर वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप करून राजकीय वळण देण्याचे काम करीत आहे. शेतकरी आंदोलनामागे, विदेशी ताकद, खलिस्थानवादी ताकद, राजकीय ताकद असे वक्तव्य करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनांना भ्रमित करून आंलनात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय अन्नदाता आपल्या मागणीसाठी १३० कोटी जनतेच्या आशीर्वादानेच खंबीरपणे उभा आहे आणि याला साथ राजकीय नसून १३० कोटी जनतेची साथ आहे. केंद सरकार असो वा राज्य सरकारे यांनी प्रथम प्राधान्य देशाची ढाल असलेले जवानांना, व्दितीय प्राधान्य अन्नदाता शेतकऱ्यांना व तृतीय प्राधान्य देशाचा शिल्पकार कामगार यांना द्यायला पाहिजे. यातच खरे देशहीत व देशाचा विकास दिसून येईल.

मात्र भारतात याउलट परिस्थिती दिसून येते. प्रथम प्राधान्य सर्वच बाबतीत राजकीय पुढाऱ्यांना दीले जाते व नंतर बाकीच्यांचा विचार केला जातो ही बाब शेतकरी आंदोलनावरून स्पष्ट दिसून येते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणतात शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही असेही दालने म्हणतात. अशा राजकीय पुढाऱ्यांची मानसिकता इतक्या खालच्या स्तरावर उतरेल असे वाटत नव्हते. आज भारतीय अन्नदाता शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहे  आणि दानवेंसारख्या मंत्र्याला यात विदेशी हात दिसतो ही अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद बाब आहे. राजकीय पुढाऱ्यांनो आणि मंत्र्यांनो कमीतकमी शेतकऱ्यांची कदर तरी करा व आंदोलकांना योग्य न्याय द्या. कारण आता प्रत्येक शेतकरी आपल्या हक्कासाठी आर-पारच्या भूमिकेत आहे. सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा फुंकर घातली तर बरे होईल.

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर

मो.नं.९३२५१०५७७९



विक्रमने नेहमीप्रमाणेच आपला हट्ट सोडला नाही. आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्याने बेतालला शोधून काढला आणि त्याला आपल्या गाडीत बसवून तो परत पक्ष कार्यालयाकडे निघाला.गाडीच्या मागच्या सीटवरून आपलं तोंड वेताळच्या कानाजवळ नेत बेताल बोलला, 'विक्रमा, कृषी कायदा काय आहे ते मला माहीत नाही. फक्त टाईमपास करण्यासाठी मी तिथे जाऊन बसलो होतो. मी तिथे जाऊन बसलो याचा अर्थ मी विरोधकांना सामील झालो असा होत नाही, तरी तुला माझा संशय आला आणि तू मला शोधत तिथे आलास. आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐक आणि मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं दे. तुझ्या उत्तरांनी माझं समाधान झालं नाही तर मी तुझ्या गाडीतून उतरून परत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसेन. समजलास?'

विक्रमने समोरच्या आरशातून बेतालकडे पाहत काही न बोलता फक्त संमतीदर्शक मान डोलावली.

'ऐक विक्रमा, आटपाट एक राज्य होतं. त्या राज्यात सर्वच 'महा' होत असे. जसे की सत्ता प्राप्तीसाठी महातडजोड आघाडी, राज्यकारभारात  महागोंधळ, एकमेकांचा महाअपमान, महाभ्रष्टाचार, महाप्रगती (रिक्षावाला ते थेट करोडपती!) महाउत्पादन (साडेतीन एकरांत चक्क ११० कोटी रुपयांची वांगी!) इत्यादी इत्यादी, त्यामुळे त्या राज्याचं नाव महाराज्य पडलं होतं. त्या महाराज्यात एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या तीन पक्षांनी सत्तेसाठी महातडजोड करीत तयार केलेली आघाडी सत्तेवर होती. त्या महातडजोड आघाडी सरकारमध्ये असलेले आणि सरकारमध्ये नसलेले, पण  बाहेर राहून सरकारच्या तंबूच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवणारेही, या तंबूच्या दोऱ्या आम्ही पुढची पंचवीस वर्षे ओढून धरू, हे सरकार पुढील पंचवीस वर्ष चालेल असे सांगत असतांना आणि सरकारला जेमतेम एकच वर्ष झालेलं असतांना, सरकारमध्ये मंत्री असलेल्या यशोमती मैय्यांंनी दुसऱ्या पक्षाच्या 'जाणत्या सरदारा'स, 'सरकार स्थिर ठेवायचे असेल तर आमच्या नेत्यावर टीका करू नका. आघाडी धर्म पाळा.' असा दम का दिला असावा? दुसऱ्या एका मंत्र्याने, ''जाणता सरदार'ची समज आमच्या सरदाराला समजून घेण्यासाठी कमी पडली.' असा टोला का लगावला असावा? त्या भडीमारातून 'जाणत्या सरदार'ला वाचविण्यासाठी वाचाळतेच्या एका स्पर्धेत 'सामना'वीर ठरलेल्या संपादकाने फुकटची वकिली का केली असावी? 'डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं.' असे अकलेचे तारे तोडणाऱ्या एका विद्वानाने आपली शस्त्रक्रिया कंपाऊंडरकडून न करवून घेता डॉक्टरांकडून का करवून घेतली असावी?  राज्यावर कितीही संकटे येवोत, कोव्हीडने हजारो माणसं पटापट मरोत की बळीराजा झाडाला लटको, पण आपल्या तब्बेतीचा बाऊ करून घरातच बसून राहणारे महातडजोड आघाडीचे महामुख्यमंत्री एका महामार्गाच्या पाहणीसाठी जीवावर उदार होऊन घरातून बाहेर का पडले असावेत? माझ्या या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दे विक्रमा.'

'बेताला, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे अनेकांच्या आधीच जीर्ण झालेल्या इज्जतीच्या अजूनही चिंध्या करण्यासारखं आहे, पण तू विचारतोस म्हणून मी सांगतो. ऐक. सत्ताप्राप्तीसाठी आपण ज्यांच्या मिनतवाऱ्या केल्या, ज्यांच्या पाठिंब्यावर आपले बुड सत्तेच्या गादीवर टेकलेले आहे; त्यांच्यावरच टीका करणाऱ्याच्या बुद्धीत आणि ज्या फांदीवर आपण बसलेले आहोत त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवणाऱ्या शेख चिल्लीच्या बुद्धीत काय फरक असावा? मग अशा तथाकथित 'जाणत्या सरदारा'ला यशोमती मैय्यांंनी दम दिला किंवा आपल्याच पंखांखाली राजकारणात वावरणाऱ्या आपल्याच पुतण्याला जे नीट समजू शकले नाही त्यांच्या 'समज'ची मापं  कोणा मंत्र्याने जाहीररीत्या काढली तर त्यात गैर ते काय? आता  'सामना'विराने फुकटची वकिली का केली, हे काय विचारणं झालं? 'ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.' ही म्हण तू ऐकली नाहीस का? दुसऱ्यांंच्या मुलाखती घेण्याची नोकरी करणाऱ्याची मुलाखत कोणी घेऊ लागला तर तो आपली नसलेली विद्वत्ता पाजळणार नाही का? मग त्यासाठी तो वाट्टेल ती पोरकट विधानं करणार नाही का? पण जेव्हा स्वतःच्या जीवाचा प्रश्न असतो तेव्हा माणसाची अक्कल बरोबर काम करते, मग शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरच आठवतो. भंगोडी, गंजडी नशेत वाट्टेल ते बडबडतात ,पण नशेत त्यांनी स्वतःच्याच मानेवर चाकू फिरविल्याचं तू कधी ऐकलं आहेस का? आता राहिला तुझा शेवटचा प्रश्न. महामुख्यमंत्री घराबाहेर का पडले? मला सांग, राज्यावर येणारी संकटं असोत, की कोव्हीडने मरणारी हजारो माणसं असोत,  की झाडाला लटकणारा बळीराजा असो ,यांच्याशी महामुख्यमंत्र्यांचा काय संबंध? यांनी बनवला का त्यांना महामुख्यमंत्री? महामुर्ख कुठला? अरे, बेताला, त्या महामार्गाला महामुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच नाव दिलं जाणार आहे! मग आपल्याला पिताश्रींच्या नावासाठी कोणी घरातून बाहेर पडत असेल तर काय बिघडलं?'

'विक्रमा, जसं बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या यादीने राज्यपालांचं समाधान झालेलं नाही ,तसंच तू दिलेल्या उत्तरांनी माझं समाधान झालेलं नाही.' असे बोलून बेताल गाडीतून उतरून परत आंदोलनाच्या जागेकडे चालू लागला.

आंदोलनाच्या जागी गर्दी वाढत असल्याची दृश्ये माध्यमांवर झळकू लागली होती.

- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक,  संपर्क-७८७५०७७७२८


शासनाच्या कृषी कायद्यांविरूद्ध देशभरातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ३-४ आठवडे उलटले आहेत. शेतकरी आणि केंद्र सरकार दोन्ही आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. आंदोलनावर तोडगा निघेल की नाही, आंदोलन आणखी किती दिवस चालेल, शेतकरी ते मागे घेतील की नाही किंवा शासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी पुढे येईल की नाही? हे असे प्रश्न आहेत जे आज भारताच्या सर्व नागरिकांना पडलेले आहेत. हे आंदोलन जरी शेतकऱ्यांनी चालविलेले असले तरी भारतातील प्रत्येक नागरिकाचा मग तो शेकरी असो की व्यापारी, शासकीय नोकर असो की खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, श्रीमंत असो की गरीब, सामान्यांतून सामान्य असो की उच्चभ्रू वर्गातील नागरिक अशी सर्व क्षेत्रांतील लोकांचा या आंदोलनाशी संबंध आहे. कारण शेतकऱ्यांनी हाती घेतलेले आंदोलन भारताच्या १.३८ अब्ज नागरिकांवर परिणामकारक ठरणार आहे. दिल्ली प्रदेशचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे अन्नधान्याचा, इतर कृषिउत्पादनांचा सर्व नागरिकांशी संबंध आहे. जर केंद्र सरकारने हा कायदा मागे घेतला नाही किंवा शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान केले नाही आणि हा कायदा आहे तसाच लागू केला तर आज आपण अन्नधान्य ज्या भावाने घेत आहोत त्या किंमतीत सोळा पटीने वाढ होणार आहे. याचा साधा अर्थ असा की आज गहू ३० रुपये प्रति किलो उपलब्ध आहे. जर हा कायदा अंमलात आला तर पुढील २-३ वर्षांत तीन पटीने जास्त म्हणजे १६० रु. प्रति किलो भावाने विकला जाईल.

शेतकऱ्यांच्या समस्यांचा दुसरा भाग असा की शेती व्यवसायात जितके धोके आणि अनिश्चितता आहे, तशी इतर कोणत्याही व्यवसायात नाही. शेतकऱ्याला सर्वांत अगोदर निसर्गाशी झुंज द्यावी लागते. शेतीचा हंगाम सुरू झाला की यंदा पाऊस पडतो की नाही यापासून चिंता सुरू होते. पाऊस पडला तर कमी प्रमाणात ज्याचा रास्त प्रभाव कृषिउत्पादनांवर होतो. पाऊस जास्त पडला तर आलेले पीक हातातून निघून जाण्याचा धोका. पावसाने सरासरी गाठली आणि चांगले पीक आले तर मग शेतकरी आनंदाने भारावून जातो, पण जेव्हा तो आपले कृषिउत्पादन बाजारात घेऊन जातो तेव्हा भांडवलदार व्यावारी लगेच किंमती कमी करून टाकतात. पाऊस चांगला झाला, उत्पादन चांगले आले तरी त्याची वाजवी किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. याचा अर्थ असा की शेतकऱ्याची जी हलाखीची परिस्थिती पूर्वी होती, त्यात काहीही बदल होत नाही. उलट चिंता वाढतेच. कारण कर्ज घेऊन बी-बियाणे घेतलेले असते. पीक चांगले येईल ही आशा असते, पण जेव्हा मोबदला त्यांना आपल्या उत्पादनाचा मिळायला हवा, ज्याद्वारे घेतलेले कर्ज वर्षभराच्या भाजीभाकरीची सोय मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं या सर्व गरजांसाठी लागणारे उत्पन्न व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून काढून घेतलेले असते. त्याला रिकाम्या हाती घरी परतावे लागते. शेतीखर्चासाठी घेतलेले उच्च व्याजदराने कर्ज जसेच्या तसे त्याच्यावर आणखीन व्याजाची भर होत राहते. वर्षानुवर्षे आयुष्यभर शेतकरी याच समस्यांना तोंड देत असतो. एकीकडे निसर्ग, दुसरीकडे शेतीमालाकडे टक लावून बसलेला उद्धट व्यापारी आणि तिसरीकडे सरकार तर चौथीकडे शासन दरबारी फेऱ्या या न् त्या शेतीच्या कामाने. अनुदानाची वाट पहात बसणे, यातच त्याचे वय लोटते. काही शेतकरी याच परमोच्च उपाय म्हणजे आत्महत्येची वाट धरतात. अशाच परिस्थितीच्या जाणिवेतून कविवर्य, तत्त्वज्ञ इकबाल यांनी म्हटले आहे की ज्या शेतीतून शेतकऱ्याला पोट भरण्याइतके साधनदेखील उपलब्ध होत नसेल अशा शेतीउत्पादनाला जाळून टाकावे.

आपले काळे धन व्हाइट करण्यासाठी जे लोक शेती करतात त्यांना सोडून बाकीचा जो शेतकरीवर्ग आहे तो भारतातल्या गरीब वर्गामध्ये मोडतो. पंजाबसारख्या प्रगत शेती व्यावसायिकाचे मासिक उत्पन्न फक्त १७ हजार प्रति माहच्या आसपास आहे. म्हणजे शासकी कर्मचारी शिपायापेक्षाही कमी. महाराष्ट्रातील मराठवाडासारख्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा तर विचारच करू नका. दिवसभर मजुरी करणाऱ्याला ५०० रु. मिळतात तर शेतकऱ्याने २०० रुपयांची बेरीज करणेदेखील अवघड आहे.

तिसरीकडे आपले सरकार जे या शेतकऱ्याला आता कार्पोरेट क्षेत्राच्या दावणीला बांधण्याची व्यवस्था करीत आहे म्हणजे त्याला आता आपला शेतीमाल ९० रु. किलोने विकून स्वतःला गरज पडल्यास तोच माल १५० प्रति किलोने खरेदी करावा लागणार आहे. केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठामच नाही तर या आंदोलनात कसा सुरुंग लावता येईल याच्या तयारीत आहे. आंदोलनकर्त्यांना देशद्रोही म्हटले जाते, खलिस्तानी आतंकवादी, पाकिस्तानी अतिरेक्यांचे हस्तक आणि टुकडे टुकडे गँगची उपमा दिली जाते. कोणी शासक आपल्याच देशातील गरीब जनतेला कसे आतंकवादी म्हणू शकते, कोणता आतंक त्यांनी माजवला आहे? आज त्यांना तुकडे तुकडे म्हणा पण कितीतरी राजकीय पक्ष गेल्या काळात तुकडे तुकडे झालेले आहेत. उद्या भाजपचेही तसेच होणार, याच उद्धटपणाचा परिणामदेखील. आमचे पंतप्रधान आम आदमीच्या भल्याच्या गोष्टी सांगत लोते, आज त्याच आम आदमींना देशद्रोही म्हणतात. ईश्वरानं त्यांना १३८ कोटी जनतेवर राज्य बहाल केले आहे. एकदा तरी त्यांनी यांच्याशी सहानुभूती दाखवावी. कोणी शासक अमर नसतो, पण देशाचे नागरिक सदासर्वदा राहणार आहेत. त्यांच्याशी आपुलकीने वागले तर वर्षानुवर्षे लोक अशा शासनाचे ऋणी असतात. ही साधी गोष्ट तरी त्यांनी लक्षात घ्यावी. आपल्या खरबोपती मित्रांच्या भल्यासाठी नव्हे कोट्यवधी लोकांच्या हितासाठी पुढे यावे.

- सय्यद इफ्तिखार अहमद 

संपादक



(७६) त्या मोठेपणाच्या वल्गना करणाऱ्यांनी सांगितले, ``जी गोष्ट तुम्ही मान्य केली आहे आम्ही तिला नाकारणारे आहोत.'' 

(७७) मग त्यांनी त्या सांडणीला ठार मारले६१ आणि अत्यंत उद्धटपणे आपल्या पालनकर्त्याची आज्ञा भंग केली. आणि सॉलेह (अ.) ना सांगितले, ``जर तू पैगंबर आहेस तर तू सांगतोस त्या यातना आमच्यावर घेऊन ये.''

(७८) सरतेशेवटी एका हादरून सोडणाऱ्या६२ संकटाने त्यांना गाठले आणि ते आपल्या घरांत पालथेच्या पालथेच पडून राहिले.

(७९) आणि सॉलेह (अ.) हे सांगत त्यांच्या वस्तीतून बाहेर निघून गेला, ``हे माझ्या देशबांधवांनो! मी आपल्या पालनकर्त्याचा संदेश तुम्हाला पोहोचविला आणि मी तुमचे खूप हित चिंतिले परंतु मी काय करू तुम्हाला आपला हितचिंतक पसंतच नाहीत.''

(८०) आणि लूत (अ.) ला आम्ही पैगंबर बनवून पाठविले. मग आठवा जेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले,६३ ``तुम्ही इतके निर्लज्ज झाला आहात की ती अश्लील कृत्ये करता जी तुमच्या अगोदर जगात कोणी केली नाहीत?

(८१) तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषाकडून आपली कामवासना भागविता?६४ वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही सर्वस्वी मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात.''

(८२) परंतु त्याच्या लोकांचे उत्तर याव्यतिरिक्त काही नव्हते की, ``हाकलून द्या या लोकांना आपल्या वस्त्यांतून, मोठे आले हे पवित्र व सोवळे बनून''६५

(८३) सरतेशेवटी आम्ही लूत (अ.) व त्याच्या परिवाराला - फक्त त्याच्या पत्नीला वगळून जी मागे राहणाऱ्यांपैकी होती६६ - वाचवून बाहेर काढले.

(८४) आणि  त्या  जनसमुदायावर  वर्षाव  केला  एका वृष्टीचा,६७ तेव्हा पाहा त्या अपराध्यांचा शेवट काय झाला?६८

(८५) आणि मदयनवासियांकडे६९ आम्ही त्यांचे बंधु शुऐब (अ.) याला पाठविले. त्याने सांगितले, ``हे देशबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याचे स्पष्ट मार्गदर्शन आले आहे, म्हणून वजन व मापे प्रामाणिकपणे करा, लोकांनंा त्यांच्या वस्तूत कमी देऊ नका७०



६१) एका व्यक्तीनेच मारले होते जसे कुरआन अध्याय ९१ (अश्शम्स) आणि अध्याय ५४ (अल्कमर) मध्ये उल्लेख आला आहे. परंतु सर्व राष्ट्र त्या दुष्ट अपराधाने लिप्त् होते. तो मनुष्य वास्तविकपणे या अपराधासाठी त्या लोकांच्या इच्छापूर्तीच्या प्रतिनिधी स्वरुपात होता. म्हणून आरोप पूर्ण समाजावर लावण्यात आला. प्रत्येक तो अपराध जो समाजइच्छेनुसार केला जातो किंवा समाजप्रसन्नतेसाठी केला जातो की ज्याच्या अनुसरणास राष्ट्राची अनुमती व पसंती प्राप्त् असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे. मग त्याला एक व्यक्तीने का केलेला असेना. कुरआन सांगतो की जो अपराध राष्ट्रात जाहीररित्या केला जातो आणि राष्ट्र त्याला मान्यता देते तर तो अपराध राष्ट्रीय अपराध ठरतो.

६२) या संकटाला येथे `रज़फा' (भयंकर धक्का देणारी) म्हटले आहे. दुसऱ्या ठिकाणी यासाठी `सैहा' (ओरडणे) `साईखा' (तडाखा) आणि `तागिया' (मोठा आवाज) हे शब्द वापरले गेले आहेत.

६३) पैगंबर लूत (अ.) पैगंबर इब्राहीम (अ.) यांचे पुतणे होते आणि ते राष्ट्र ज्याच्या मार्गदर्शनासाठी त्यांना अल्लाहने पाठविले होते त्या क्षेत्राला ट्रान्स जॉर्डन म्हणतात. ते क्षेत्र इराक आणि पॅलेस्टाईनच्या मध्यभागी आहे. बायबलमध्ये या राष्ट्राच्या मुख्यालयाचे नाव `सदूम' सांगितले गेले आहे. ते डेड सी (मृतसमुद्र) जवळ होते किंवा आज त्यात बुडलेले असावेत. पैगंबर लूत (अ.) आपल्या चुलत्यासह (इब्राहीम (अ.)) इराकहून निघाले आणि काही काळ सीरिया आणि पॅलेस्टाईन तसेच इजिप्त्मध्ये गस्त करून धर्म प्रचारकार्याचा अनुभव घेत होते. नंतर पैगंबरत्वाच्या पदावर आसनस्थ झाल्यावर त्या बिघाड झालेल्या लोकसमूहात सुधारकार्य करू लागले होते. `सदूमवाल्यांना' त्यांचे राष्ट्र यासाठी म्हटले गेले आहे की शक्यतो त्यांच्याशी संबंधित नाते असतील. यहुदींच्या परिवर्तीत बायबलमध्ये पैगंबर लूत (अ.) यांच्या आचरणावरच लांच्छन लावले गेले. त्यापैकी एक म्हणजे ते पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याशी भांडण करून सदूमच्या क्षेत्रात निघून गेले होते (उत्पत्ति १३ : १-१२) परंतु कुरआन या चुकीच्या गोष्टींचे खंडन करतो. कुरआनोक्ती आहे की अल्लाहने लूत (अ.) यांना पैगंबर बनवून त्या लोकसमूहाकडे पाठविले होते.

६४) दुसऱ्या ठिकाणी या लोकसमूहाच्या (राष्ट्र) नैतिक अपराधांचा उल्लेख आला आहे. परंतु येथे त्याच्या सर्वात  मोठ्या  अपराधाच्या  वर्णनाला  पर्याप्त्  समजले  गेले  आहे  ज्यामुळे  अल्लाहचा  कोप   त्यांच्यावर झाला होता. घृणा करण्यायोग्य काम या लोकसमुदायाने केल्याने मानवी इतिहासात ते कुविख्यात आहेत. या कुकृत्याने दुष्ट लोक कधीही थांबले नाहीत. परंतु युनानच्या तत्त्वज्ञांनी या घृणास्पद अपराधाला नैतिक गुणांत समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जी उणिव बाकी राहिली होती तिला आजच्या पाश्चात्य देशांनी पूर्ण केली आहे. समलिंगी संभोग निश्चितच नैसर्गिक पद्धतीविरुद्ध आहे. अल्लाहने सर्व सजीवांमध्ये नर आणि मादी निर्माण करून वंश वाढविण्याची व्यवस्था केली आहे. मनुष्यजातीत याचा एक आणखीन उद्देश दोन्ही लिंग (स्त्री व पुरुष) मिलनाने एक कुटुंब अस्तित्वात यावे आणि त्यामुळे सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी असा आहे. कुटुंब व्यवस्थेतच सभ्यतेचे व नैतिकतेचे बाळकडु पाजले जाते. याच उद्देशासाठी स्त्री आणि पुरुष असे दोन वेगळया जाती बनविल्या आणि त्यात एकदुसऱ्यासाठी आकर्षण ठेवले गेले. यांची शारीरिक रचना आणि मानसिकता दांपत्य उद्देशाला पुढे ठेवून केली गेली. त्या दोघांच्या मिलापमध्ये आणि समरस होण्यामध्ये अत्यानंद ठेवला गेला. नैसर्गिक उद्देशाला प्राप्त् करण्यासाठी हे सान्निध्य निर्माण करणारे आणि प्रेरित करणारे आहे आणि त्या सेवेचा बदलासुद्धा आहे. परंतु मनुष्य निसर्गाविरुद्ध कार्य करून समलिंगी संभोग करतो तेव्हा तो एकाच वेळी अनेक अपराध करणारा ठरतो. 

१) तो स्वत: आणि ती व्यक्ती ज्याच्याशी तो समलिंगी संभोग करतो नैसर्गिक व्यवस्था आणि मानसिक स्थितीशी संघर्ष करतो आणि त्यात मोठे विघ्न निर्माण करतो, ज्यामुळे दोघांच्या शरीरावर, मनावर आणि चारित्र्यावर अत्यंत वाईट परिणाम होतात. 

२) तो निसर्गाच्या विरुद्ध द्रोह आणि फसवेगिरीचा अपराध करतो. निसर्गाने ज्या आनंदाला जाती आणि संस्कृतीसेवेचा मोबदला बनविले होते आणि त्याला प्राप्त् करण्यास कर्तव्य, दायित्व आणि सत्यासह जोडले होते. तो या सर्वांना म्हणजे कर्तव्य, दायित्व आणि सत्याविना चोरीचे कृत्य करतो.

३) मानवसमूहाशी असा मनुष्य उघड विश्वासघात करतो. समाजाच्या संस्थापासून लाभ घेतो परंतु जेव्हा त्याची पाळी येते तेव्हा सत्य, कर्तव्य आणि दायित्वाचे ओझे उचलण्याऐवजी आपल्या सर्व शक्तींना स्वार्थप्राप्तीसाठी पूर्ण अशा पद्धतीने वापरतो जे समाजासाठी हानिकारक आहे. तो स्वत:ला वंशवृद्धी आणि कुटुंबपद्धतीसाठी अयोग्य बनवितो. आपल्याबरोबर दुसऱ्यालासुद्धा वाईट मार्गावर लावतो. आपल्याबरोबर आपल्याचसारख्या एका पुरुषाला अनैसर्गिकरित्या स्त्रीत्वात ओढतो आणि समाजातील दोन स्त्रियांसाठीसुद्धा नैतिक पतनाचे दार उघडे ठेवतो. 

६५) याने माहीत होते की नैतिक पतनाच्या आणि दुष्टतेच्या सर्व सीमा या लोकांनी पार केल्या होत्या त्यामुळे सुधारणा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नव्हता. पावित्र्याच्या त्या लहान तत्त्वालासुद्धा ते नष्ट करू पाहात होते जे त्यांच्या या घृणास्पद वातावरणात शिल्लक राहिले होते. याच सीमेला पोहचल्यानंतर अल्लाहकडून त्यांना समूळ नष्ट करण्याचा निर्णय झाला होता. ज्या समाजाच्या सामूहिक जीवनात पावित्र्याचा लवलेशही शिल्लक राहात नाही तेव्हा त्या समाजास जमिनीवर जीवित ठेवण्याचे कारण राहात नाही. 

६६) दुसऱ्याठिकाणी दाखविण्यात आलेले आहे की पैगंबर लूत (अ.) यांची ही पत्नी जी त्याच देशाची संभवत: मुलगी होती, ती ईशद्रोही नातेवाईक लोकांची समर्थक होती. ती शेवटपर्यंत त्या अनेकेश्वरवादी लोकांबरोबरच राहिली म्हणून कोप होण्याअगोदर अल्लाहने पैगंबर लूत (अ.) आणि त्यांच्या ईमानदार साथीदारांना ती वस्ती सोडून जाण्याचा आदेश दिला आणि सांगितले की त्या स्त्रीला बरोबर घेऊ नये.

६७) वर्षा म्हणजे येथे पाऊस अपेक्षित नाही तर दगडांचा पाऊस (वर्षाव) आहे. कुरआनमध्ये दुसरीकडे उल्लेखित आहे. येथेसुद्धा कुरआनमध्ये उल्लेख केला गेला आहे की त्यांच्या वस्त्या उलटून टाकल्या आणि सर्वांना नष्ट केले.

६८) येथे आणि दुसऱ्या ठिकाणी कुरआनमध्ये केवळ हेच सांगितले गेले आहे की लुतच्या लोकसमूहाचे (राष्ट्राचे) कुकर्म समालिंगी संभोग अत्यंत घृणास्पद पाप आहे. त्यामुळे ते राष्ट्र अल्लाहच्या कोपला सामोरे गेले. यानंतर पुढे आम्हाला याविषयी सविस्तर वृत्त पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिले. हा एक असा अपराध आहे ज्यापासून समाजाला पवित्र ठेवण्याचे दायित्व इस्लामी शासनाचे अनिवार्य कर्तव्य आहे. तसेच हा अपराध करणाऱ्याला कडक शिक्षा दिली गेली पाहिजे. हदीसकथने आहेत, ``भोगी आणि भोग्य दोन्हींना ठार करावे.'' काही कथनांद्वारे कळते, `ते विवाहित असोत की अविवाहित' तसेच `वरचा आणि खालचा' दोघांनाही दगडांनी ठेचून ठार केले जावे. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात असा दावा कोणी पेश केला नाही म्हणून पूर्णत: याविषयी शिक्षा कशी दिली जाते हे कळू शकले नाही. माननीय अली (रजि.) यांच्या मतानुसार अपराध्यांना तलवारीने ठार केले जावे व त्यांचे प्रेत जाळून टाकावे. याच मताला माननीय अबू बकर (रजि.) यांनी सहमती दर्शविली होती. माननीय उमर आणि उस्मान (रजि.) यांच्या मतानुसार जुन्या पडक्या इमारतीच्या खाली त्यांना उभे करून त्यांच्यावर ती इमारत पाडून टाकावी. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या मते अपराध्यांना उंच इमारतीवरून खाली डोके करून फेकून दिले जावे आणि वरून दगडे मारली जावीत. धर्मशास्त्रींपैकी इमाम शाफई (रह.) यांच्या मतानुसार भोगी आणि भोग्य दोघांना ठार केले जाणे आवश्यक आहे, मग ते विवाहित असोत की अविवाहित. शाबी, जोहरी, मालिक आणि अहमद (रह.) यांच्या मतानुसार त्यांची शिक्षा दगडाने ठेचून मारणे आहे (रजम). सईद बिन मुसयिब, अता, हसन बसरी, इब्राहीम नखई, सुफियान सौरी आणि औजाई (रह.) यांच्या मतानुसार या अपराधासाठी तीच शिक्षा दिली जावी जी व्यभिचारासाठी दिली जाते. म्हणजे अविवाहितांना शंभर कोडे मारले जावेत आणि तडीपार केले जावे आणि विवाहितांना दगडं मारून (रजम) ठार केले जावेत. इमाम अबू हनीफा यांच्या मतानुसार,  या  विषयी निश्चित अशी शिक्षा नाही तर हे कृत्य दंडनीय आहे. जशी परिस्थिती आणि आवश्यकता असेल त्यानुसार शिक्षा दिली जाऊ शकते. या समर्थनार्थ इमाम शाफई (रह.) यांचे याविषयी कथन आहे, ``जाणून असा की मनुष्यासाठी हे अगदी अवैध (हराम) आहे की त्याने आपल्या पत्नींशी स्वत:लुत लोकांसारखा व्यवहार करावा.'' हदीससंग्रह अबू दाऊदमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ``जो आपल्या पत्नीशी अशाप्रकारे कर्म करील त्यावर धिक्कार आहे.'' इब्ने माजा आणि अहमद या हदीससंग्रहात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे, ``अल्लाह त्या पुरुषावर आपली कृपादृष्टी करणार नाही जो आपल्या पत्नीशी असे कुकर्म करतो.'' तिर्मिजी हदीससंग्रहात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे, ``ज्याने मासिक पाळी आलेल्या पत्नीशी संभोग केला किंवा पत्नीशी लूत लोकांसारखे कुकर्म केले किंवा भविष्य सांगणाऱ्याकडे गेला आणि त्याच्या भविष्यवाणीची पुष्टी केली तर अशा माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित शिकवणींना नाकारले आहे.'' 

६९) मदयनचा मूळ क्षेत्र हिजाजच्या उत्तर-पश्चिम आणि पॅलेस्टाईनच्या दक्षिणेत लाल सागर आणि अकबार खाडीच्या किनाऱ्याला स्थित आहे. परंतु सीना प्रायद्वीपच्या पूर्वी किनाऱ्यावरसुद्धा हा प्रदेश फैलावलेला होता. हे एक मोठे व्यापारी राष्ट्र होते. प्राचीन काळात जो व्यापारीमार्ग लाल सागराच्या किनाऱ्याने यमनपासून मक्का आणि यम्बुअ मार्गे सीरियापर्यंत जातो आणि एक दुसरा व्यापारी राजमार्ग जो इराकहून इजिप्त्कडे जात होता त्याच्या ठीक चौफुलीवर हा लोकसमूह राहात होता. याच आधारावर अरबांची लहान लहान मुले मदयनविषयी जाणत होते. त्याच्या विनाशानंतरसुद्धा अरबांत त्याची प्रसिद्धी होती. कारण अरबांचे व्यापारी काफिले इजिप्त् आणि सीरियामध्ये जातांना रात्रंदिवस त्याच्या भग्नावशेषामधून जात असत.

मदयनवाल्यांचे एक वैशिष्ट्य ज्यास मनात ठेवले पाहिजे ते म्हणजे हे लोक पैगंबर इब्राहीम (अ.) यांचे पुत्र मिदयान यांचे वंशज होते. ते त्यांची तिसरी पत्नी कुतुरापासून होते. प्राचीन रूढी-परंपरेने जे लोक एखाद्या मोठ्या मनुष्याशी संबंधित असताना हळूहळू त्याच्याच घराण्याशी जोडले जात. याच परंपरेनुसार अरबच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा बनीइस्माईल म्हणून ओळखला जाऊ लागला आणि याकूबच्या संततीच्या हातावर इस्लाम स्वीकारणाऱ्या लोकांना बनीइस्राईलच्या व्यापक नावाने ओळखले जाऊ लागले. याचप्रमाणे मदयनच्या क्षेत्रातील सर्व लोकसंख्या  जी मिदयान बिन इब्राहीम यांच्या प्रभावाखाली होती ते बनीमिदयान म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्या देशाचे नावसुद्धा मदयन प्रसिद्ध झाले.

या ऐतिहासिक तथ्याला जाणून घेतल्यानंतर हा अनुमान काढण्यासाठी एकही कारण शिल्लक राहात नाही की या राष्ट्राला सत्य धर्माची  हाक प्रथमत:  पैगंबर  शुऐब (अ.)  यांनी  दिली  होती. वास्तवता  बनीइस्राईलप्रमाणे  प्रारंभी  तेसुद्धा मुस्लिमच होते. पैगंबर शुऐब (अ.) यांच्या काळात या  लोकांची  स्थिती  बिघाड  निर्माण  झालेल्या  मुस्लिम  समुदायासारखी  होती, ज्याप्रमाणे  पैगंबर मूसा (अ.) यांच्या काळात बनीइस्राईल लोकांची होती. पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या  नंतर सहाशे-सातशे वर्षांपर्यंत अनेकेश्वरवादी आणि दुष्चरित्र लोकांमध्ये राहाताना हे लोक अनेकेश्वरत्वाला अंगीकारू लागले आणि दुष्टतेचे शिकार बनले होते. परंतु यानंतरसुद्धा ते ईमानचा दावा करीत होते आणि त्यावर गर्व करीत होते.


hyderabad Election

1983 साली विश्व हिंदू परिषदेने जुन्या अस्मितेचा पुनरूद्धार करण्यासाठी राष्ट्रव्यापी एकात्मता यात्रेचे आयोजन केले होते. यासाठी 1925 च्या सुमारास याच अस्मितांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. नुकत्याच संपन्न झालेल्या हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत परत त्याच अस्मितेचा मुद्याचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न  गृहमंत्री अमित शहा यांनी केला. एका शहराच्या महापालिकेच्या निवडणुकांत त्या शहराचे मुलभूत प्रश्न, स्थानिक सोयीसुविधा अशा कोणत्याही बाबीचा उल्लेख न करता शहा म्हणाले की, ’’जर आम्ही ही निवडणूक जिंकलो तर हैद्राबाद शहरातून नवाब निजाम कल्चर हद्दपार करून हैद्राबादला आधुनिक शहर बनवू’’. त्यांनी हैद्राबादच्या नागरिकांना स्पष्ट संदेश दिला की, यापुढे हैद्राबादची ओळख असलेल्या अस्मितेच्या प्रतिकांना नष्ट करून तिथे एक दूसरी संस्कृती रूजवायची आहे. खरे पाहता हैद्राबादला या योजनेचा प्रारंभ करून भारतात सर्वत्र त्यांना जुन्या अस्मितांची संस्कृती रूजवायची आहे. या संस्कृतीला त्यांनी जरी आधुनिक म्हटले असले तरी ती अस्मिता भारतात हजारो वर्षांपासून एका विशिष्ट वर्गाने लादलेली आहे. आधुनिकतेच्या नादात प्राचीन संस्कृतीची स्थापना करण्याचा हा केवळ शहा यांचा मानस नसून संबंध संघ आपल्या या उद्देशासाठी गेली जवळ-जवळ शंभर वर्षे झटत आहे. केंद्रात सत्ता काबीज केल्यावर पहिल्यांदाच भाजपने किंवा संघाने अमित शहा यांच्या तोंडातून त्यांना यापुढे काय करायचे आहे? याची प्रखरपणे घोषणा केली आहे आणि म्हणूनच हैद्राबादच्या निवडणुकीच्या निकालांची कारणमिमांसा निवडणुकींच्या चौकटीत न करता येत्या काळात देशात प्राचीन संस्कृतीला रूजविण्याचे हे पहिले पाऊल आहे असे समजून करावी लागेल. 

गेल्या महापालिकेत भाजप सदस्यांची संख्या फक्त 4 होती, आता ही 48 वर पोहोचली आहे. भाजपने ही निवडणूक स्थानिक मुद्यावर लढली असती तर पक्षाला इतक्या जागा सोडाच मागील चारची संख्या देखील गाठता आली नसती. म्हणूनच त्यांना ह्या निवडणुकींना अमित शहाच्या म्हणण्याप्रमाणे नवाब निजाम कल्चर संपुष्टात आणून आधुनिक शहर (व्हाया प्राचीन संस्कृती रूजविणे) बनवायचे आहे. संघ आणि भाजपच्या प्रभावाखाली मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांनी याचा अर्थ अचूकपणे लावला आणि म्हणूनच भरघोस यश भाजपला प्राप्त झाले. हैद्राबादचे नागरिक शहांच्या वक्तव्याने जणू इतके प्रभावीत झाले असावेत की त्यांनी तेलंगणा राज्याची निर्मिती, काँग्रेस पक्षाने केली होती या वास्तवाकडे देखील दुर्लक्ष केले. काँग्रेसच्या पदरात तेलंगणा राज्य निर्मितीचे श्रेय पडण्याऐवजी अभूतपूर्व अशी राजकीय नामुष्की पदरात पडली. टीआरएसच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला देखील बहुमत गाठता आले नाही. तो सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरीही भाजपा हे अंतर कोणत्याही पद्धतीने, केव्हाही कापू शकते. पैसा, यु्नत्या आणि दडपशाही यांची त्यांच्याकडे कसलीच कमतरता नाही. सुदैवाने असदोद्दीन ओवेसी वाचले पण त्याचे कारण काय आहे? ते पुढे पाहू या. 

भाजपने आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात जनसंघापासून केली. जनसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभारलेला पक्ष होता. 1977 साली आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत त्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून धर्मनिरपेक्ष पक्षांशी युती केली होती. नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करीत अखेर भाजपला स्वबळावर केंद्रात सत्ता काबिज करण्यात यश मिळाले. प्रादेशिक पक्षांशी आघाडी करत असतांनाच त्या पक्षांना नामोहरम करत, काँग्रेस पक्षाची स्थिती देशाच्या राजकारणात इतक्या खालच्या स्तरावर आणून सोडली आहे की, तो पक्ष वर्तमान राजकीय विचारधारेद्वारे कधी भाजपला आव्हान देऊ शकेल की नाही, हे आजतरी सांगता येत नाही.

काँग्रेसचा पराभव केल्यावर भाजपाने हिंदुत्वाच्या विचारसरणीचा अवलंब करीत देशातील सर्वात बलशाली आणि श्रीमंत पक्ष म्हणून जम बसविला आहे.

अशात जर भाजपला आव्हान देऊन सत्तेतून बाहेर करायचे असेल तर काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना हिंदुत्वाचे राजकारण केल्याशिवाय, आजतरी अन्य पर्याय नाही. राजकारण आणि धर्मकारण एकत्र आल्यास अशा शक्तीला आव्हान देणे कोणत्याही विचारसरणीला शक्य होणार नाही.

एमआयएमला जे यश हैद्राबाद निवडणुकीत मिळाले आहे त्याचे कारण भाजपच्या विचारसरणीत दडलेले आहे. जसा भाजपा हिंदु संस्कृतीवादी पक्ष आहे तसेच ओवेसींचा पक्ष देखील मुस्लिम संस्कृतीचा पुरस्कर्ता पक्ष आहे. म्हणून या पक्षाला भाजपासारखे यश मिळाले आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की यापुढे इतर पक्षांना स्वतःच्या आजवरच्या राजकीय विचारसरणीला तिलांजली देऊन भाजपासारखी हिंदू संस्कृतीवादी विचारसरणीचा स्विकार करावा लागेल. 

याचा अर्थ भारताला आधुनिक लोकशाही, समता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या मुद्यांचा त्याग करावा लागणार आहे आणि अमित शहा यांना हैद्राबादला ज्या धर्तीवर आधुनिक शहर बनवायचे आहे ती कोणत्या अर्थाने आधुनिक आहे की प्राचीन काळातील संस्कृतीतील आहे जिला ते आधुनिक म्हणत आहेत, हा प्रश्न समोर येतो. 

भाजपाला फक्त राजकारणात हिंदू संस्कृतीच्या मुल्यांची पुर्नउभारणी करावयाची नाही तर अर्थव्यवस्थेत, न्यायव्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत सुद्धा ही संस्कृत रूजवायची आहे. 

भाजपाला शेती असो का इतर उद्योगधंदे आज ज्या परिस्थितीशी तोंड देत आहेत त्याचे नेमके कारण त्यांना उत्पन्नाची सर्व साधने कार्पोरेट उद्योगपतींच्या हवाली करावयाची आहेत. भाजप आपल्या ध्येयधोरणापासून मागे हटणार नाही. भाजपाला आपल्या अजेंड्यावर कार्यरत ठेवण्यासाठी देशातील सर्व शक्ती त्याची साथ देत आहेत. मग ते उद्योगपती असोत, भांडवलपती असोत, विद्यापती असोत, बुद्धीपती असोत की आणखीन कोणते पती असोत. महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की, कोणते पक्ष भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा जास्त जहाल हिंदुत्वाचा स्विकार करतील, यातच त्यांचे राजकीय भवितव्य दडलेले आहे.

नवाब निजाम कल्चर

हैद्राबादला ज्या नवाब निजाम कल्चरपासून मुक्ती देण्याचे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्या निजामांनी केेलेल्या दानधर्माची यादी भली मोठी आहे. त्यातील काही निवडक आकडे खालीलप्रमाणे आहेत. 

हैद्राबादच्या निजामशाहीबद्दल एका लेखात ’द हिंदू’ या वर्तमानपत्राने लिहिले आहे की, निजामची राजवट पुरोगामी आणि प्रगत होती. शिक्षणाच्या क्षेत्रात निजामांची कारकिर्द उल्लेखनिय आहे. त्यांनी आपल्या राज्यात अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. त्यांना उदार हस्ते आर्थिक मदत पुरविली. जाती-धर्माचा विचार न करता त्यांनी केवळ आपल्या राज्याचाच नव्हे तर भारताच्या इतर ठिकाणीही मस्जिदी, मंदिरे, चर्च आणि गुरूद्वारासाठी उदार हस्ते मदत केली होती. हिंदू मंदिरांची दुरूस्ती व रखरखावासाठी आर्थिक सहाय्यता केली होती. 

द हिंदू वर्तमानपत्रानुसार मीर उस्मानअलीखान यांनी भोनगीर येथील यादगारपल्ली मंदिराला 82 हजार 825 रूपये, सिताराम मंदिराला 50 हजार रूपये, भद्राचलम मंदिराला 29 हजार 999 रूपये आणि बालाजी मंदिराला 8 हजार रूपयांची आर्थिक सहाय्यता दिली होती. त्यांनी 1918 साली उस्मानिया विद्यापीठाची स्थापना केली.  मंदिराखेरीज शांतीनिकेतन, शिवाजी विद्यापीठ, लेडी हार्डिंग स्कूल इत्यादींना भरघोस आर्थिक मदत दिली होती. 1932 साली पुणे येथील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटला दरवर्षी 1 हजार रूपयांची आर्थिक सहाय्यता देण्यास आपल्या प्रशासनाला फरमाविले होते. 11 वर्षे ही मदत त्यांना दिली गेली. त्याच बरोबर अमृतसर येथील गोल्डन टेंपललाही निजामांनी मदत केली होती. 

ऑ्नटोबर 1965 सालाच्या युद्धात देशाच्या अर्थव्यवस्था बिघडली असता तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ’राष्ट्रीय सुरक्षा निधी’ची स्थापना केली होती. या निधीसाठी मीर उस्मानअलीखान यांची हैद्राबादला जावून शास्त्रीजींनी भेट घेतली होती. तेव्हा निजामांनी 5000 किलो सोने या फंडामध्ये उपलब्ध करून दिले होते.

टाईम मॅगझीनच्या एका लेखात असे म्हटलेले आहे की, त्या काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हैद्राबादचे शेवटचे निजाम मीर उस्मानअली खान हे होते. त्यांची त्यावेळची मालमत्ता 200 कोटी अमेरिकन डॉलर होती, जी अमेरिकेच्या आयातीच्या 2 टक्के इतकी होती. त्यांच्या निधनानंतर त्यांनी मागे सोडलेल्या संपत्तीची मोजदात करण्यासाठी त्यांचे सुपूत्र मुकर्रमजाह यांना एक महिन्याचा कालावधी लागला होता. (संदर्भ : द लल्लनटॉप) 

तर हाच तो नवाब निजाम कल्चर आहे ज्यापासून अमित शहा हैद्राबादला मुक्ती देण्याचे आश्वासन देत आहेत.

हिंदू एकात्मता यात्रा

16 नोव्हेंबर 1983 साली विश्व हिंदू परिषदेद्वारे एकात्मता यज्ञाचे आयोजन केले गेले होते. आठव्या शतकामध्ये शंकराचार्याद्वारे हिंदूंना संघटीत करण्याच्या प्रयत्नानंतरचे हे सर्वात मोठे यज्ञ होते. या यात्रा आणि यज्ञामध्ये जवळपास 100 दशलक्ष हिंदूंनी भाग घेतल्याचा अंदाज आहे. यामध्ये सुरूवातीला व्हीएचपीचे महासचिव हरमोहनलाल यांनी हे स्पष्ट केले होते की, ’’मला स्पष्टपणे सांगावयाचे आहे की, हे यश त्या लोकांसाठी आहे जे या भूमीला आपली मातृभूमी मानतात आणि फक्त हिंदूच या भूमीला भारतमाता असे संबोधतात. इतर लोक या भूमीला आपली मातृभूमी म्हणून स्विकारत नाहीत म्हणूनच व्हीएचपीसाठी राष्ट्रीय एकात्मता म्हणजे हिंदूंचे संघटन होय’’ या यात्रेसाठी चार मार्ग ठरविण्यात आले होते. पहिला मार्ग नेपाळमधून, दूसरा उत्तर प्रदेशातील हरिद्वारमधून, तिसरा मार्ग पश्चिम बंगालमधील गंगासार आणि चौथा मार्ग दक्षिण भारतातील रामेश्वर मंदिरापासून ह्या यात्रा निघाल्या. या यज्ञासाठी त्या काळात 53 लाख रूपये बजट ठरविले गेले होते. यात वाढ होवून 1 कोटी 53 लाखापर्यंत खर्च येण्याचा अंदाज लावला गेला होता. यात्रेदरम्यान, गंगाजलाच्या बादल्यांचे वितरण केले गेले होते. हिंदू समाज विभिन्न जाती, पंचायतीमध्ये विभागलेला आहे, हे मान्य करून गंगाजल आणि भारतमातेद्वारे सर्वांना एकत्र करता येईल म्हणून ही योजना आखली गेली होती. सर्व हिंदूंसाठी गंगाजल आणि भारतमातेबद्दल आदर आहे. तसेच ’भारतमाता की जय’ हे घोषवाक्यदेखील या यात्रेदरम्यान उपयोगात आणले जावे असे सर्वांना कळविण्यात आले होते. राजकीय नेते, पक्षाचे कार्यकर्ते यांना या यात्रेपासून दूर ठेवले गेले होते. तत्कालीन भारताच्या गृहमंत्र्यांनी अल्पसंख्यांकांना या यात्रे आणि यज्ञाकडे शांततेने पहावे (म्हणजे याचा काही उलट अर्थ काढू नये) असे म्हटले होते. (संदर्भ : टाईम्स ऑफ इंडिया 10 नोव्हेंबर 1983).

-इफ्तेखार अहेमद

मो.: 9820121207


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget