Halloween Costume ideas 2015
March 2022


खलीफा उमर बिन अब्दुल अजीज रहे. यांच्या काळात एका राज्याच्या राज्यपालाने आपल्या अखत्यारितील आपल्या एका उजाड गावाचे पुनर्वसन नव्याने करण्याची विनंती वजा पत्र त्यांना पाठविले. उत्तरादाखल खलीफा उमर अ. अजिज रहे.  यांनी उत्तरादाखल जे पत्र पाठविले त्यात लिहिले होते, ’’तुम्हाला जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा ते काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या उजाड शहरामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. शहराच्या प्रत्येक रस्त्यावर कोणी कोणावर अत्याचार करणार नाही, याची दक्षता घ्या. असे केल्यास अल्पावधीतच ते शहर नव्याने भरभराटीला येईल.’’

१५ मार्च 2022 रोजी हिजाब संबंधी  बहुप्रतिक्षित निकाल देत कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब हा इस्लामी धर्मपरंपरेचा भाग नाही, असे स्पष्ट करीत सहा मुलींनी यासंबंधी दाखल केेलेली याचिका निकालात काढली. यानंतर या निकालासंबंधी समाज माध्यमांवर उलट-सुलट प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. वर्तमानपत्र आणि चॅनलीय चर्चांना ऊत आले. या संदर्भात बहुतांश मुस्लिमांच्या प्रतिक्रिया ह्या नकारात्मक होत्या. बाबरी मस्जिद, तीन तलाक आणि हिजाब ह्या विरोधात गेलेल्या निर्णयांचा देत मुस्लिमांनी सावधपणे न्यायालयीन निर्णयाविरूद्ध उघड नाराजी व्यक्त केली. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही या निर्णयाला,’’अफसोसनाक’’ अर्थात दुर्दैवी या शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. 

वास्तविक पाहता नैराश्य आणि नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया ह्या न्यायालयीन प्रक्रियेच्या वरवरच्या अभ्यासाचा परिणाम आहेत. यात खोलपणे विचार केला असता त्यांच्या लक्षात आले असते की, याच आठवड्यात दिल्ली महानगर निगमच्या माजी नगरसेविका इशरत जहाँ यांना युएपीएसारख्या कायद्यात न्यायालयाने जमानत दिलेली असून, उमर खालीद यांचा जामीनही नजरेच्या टप्प्यात आलेला आहे. येत्या 21 मार्चला त्यांचाही जामीन होईल, अशी दाट शक्यता आहे. या निर्णयाशिवाय, याच आठवड्यात केरळच्या अल्पसंख्यांकांद्वारे चालविल्या जाणाऱ्या ’मीडिया वन’ या मल्याळी भाषेतील चॅनलवरील केंद्र सरकारने लादलेली अनुचित बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविली व या संदर्भात केंद्र सरकारवर ताशेरे मारले आहेत. पुढच्या तारखेला ही बंदी पूर्णपणे उठेल,अशी आशा आहे. सीएए आंदोलनादरम्यान, विरोध प्रदर्शन करणाऱ्याविरूद्ध उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या वसुलीच्या नोटिसा सुद्धा कोर्टाने रद्दबातल ठरविल्या. डॉ. हादिया प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिला. ज्याप्रमाणे हिजाबच्या विरूद्ध निकाल आला त्यामागे जी भूमीका कोर्टाने घेतली आहे अगदी तशीच भूमीका कोर्टाने सबरीमाला प्रकरणातही घेतली होती, हे विसरता कामा नये. राहता राहिला प्रश्न न्यायालयीन निकालाशी सहमत न होण्याचा तर शुद्ध अंतःकरणाने न्यायालयाच्या निकालाचा विरोध करण्याचा अधिकार स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सर्व नागरिकांना दिलेला आहे. म्हणून तो अधिकार अल्पसंख्यांकांनाही आहे. म्हणूनच शुद्ध अंतःकरणाने या निकालाशी आम्ही असहमत का आहोत, याची कारण मिमांसा सुज्ञ वाचकांसमोर मांडण्यासाठी हा लेखन प्रपंच.

हिजाब इस्लामी धर्मपरंपरेचा भाग आहे का? 

  होय! हिजाब इस्लामी धर्मपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. म्हणून ’’हिजाब हा इस्लामी धर्मपरंपरेचा भाग नाही’’ हे कोर्टाचे म्हणणे बरोबर नाही, हे आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो. आमच्या या म्हणण्यासाठी इस्लामचा पाया ज्या ग्रंथावर रचलेला आहे त्या कुरआनचे हवाले आम्ही            -(उर्वरित पान 2 वर)

या ठिकाणी देऊ इच्छितो. हिजाब हा परदा व्यवस्थेचा एक भाग आहे आणि परदा व्यवस्थेसंबंधी कुरआनमध्ये एकूण 7 आयाती अवरित झालेल्या आहेत. तसेच 70 पेक्षा अधिक हदीस या संदर्भात उपलब्ध आहेत. 7 आयातींपैकी दोन आयाती ज्यात सरळ महिलांच्या परद्यासंबंधी निर्देश दिलेले आहेत त्या खालीलप्रमाणे - 1. ’’हे नबी (स.), आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.’’(सुरह अलएहजाब आयत नं.: 59).

2. ’’आणि हे पैगंबर (स.) श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की, त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. आणि आपला साजशृंगार दर्शवू नये त्याव्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साजशृंगार प्रकट करू नये परंतु या लोकांसमोर, पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले आपल्या मेलमिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल. हे श्रद्धावंतांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चात्ताप व्यक्त करा, अपेक्षा आहे की सफल व्हाल.’’ (सुरे अन्नूर आयत नं.:31).

एवढ्या स्पष्ट आयाती असतांना सुद्धा कोर्टाने हिजाब हा इस्लामी धर्मपरंपरेचा आवश्यक भाग नाही असे का म्हटले आहे याचा उलगडा निकालपत्र वाचल्याशिवाय होणे शक्य नाही. हिजाब ही अगदी सुरूवातीपासूनची अनिवार्य अशी धार्मिक परंपरा आहे त्यामुळे व अनुच्छेद 25 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार या दोन गोष्टींचा एकत्रित विचार करून सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाचा हा निर्णय फिरविता येईल, अशी आशा आहे. म्हणून मुस्लिमांनी समाज माध्यमात व्यक्त होतांना सकारात्मक दृष्टीकोणाला तिलांजली देता कामा नये, ही गोष्ट आवर्जुन लक्षात ठेवावी. 

न्यायाची इस्लामी संकल्पना

मुळात न्याय ही संकल्पना मानवी नसून ईश्वरीय आहे. प्रत्येक माणसाला न्याय प्रिय असतो.  म्हणूनच अन्याय परद्यावर पाहतांना सुद्धा माणसाला चीड येते. हिजाब संबंधी आलेल्या या निर्णयाच्या प्रतिक्रियांच्या गदारोळामध्ये इस्लाममध्ये न्याय संकल्पनेसंबंधी अधिक जाणून घेणे अनुचित ठरणार नाही.

कुरआनमधील खालील आयात ’न्याय’ या संकल्पनेला समजण्यासाठी अतिशय समर्पक अशी आहे.

’’हे श्रद्धावंतांनों ! ईश्वरासाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची साक्ष देणारे बना, एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की, तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपारायणतेसाठी अधिक जवळ आहे.’’ (सुरे अलमायदा आयत क्र. 8)

एकदा प्रसिद्ध चिनी तत्ववेत्ता कन्फुशियस याला प्रश्न विचारला गेला की, जर एखाद्या समाजाकडे तीन गोष्टी आहेत. एक - न्याय, दोन - मजबूत अर्थव्यवस्था, तीन - शक्तीशाली सैन्य. एखाद्या विवशतेमुळे त्यांना या तीनपैकी एक गोष्ट सोडणे अनिवार्य होवून जाईल तर त्यांनी कोणती गोष्ट सोडावी? कन्फुशियसने उत्तर दिले. शक्तीशाली सैन्य सोडून द्या.

तेव्हा प्रश्नकर्त्याने पुन्हा प्रश्न केला की, राहिलेल्या दोन गोष्टींपैकी आणखीन एका गोष्टीचा त्याग करण्याची वेळ येईल तर या दोनपैकी कोणत्या गोष्टीचा त्याग करावा? तेव्हा कन्फुशियस उत्तरला मजबूत अर्थव्यवस्थेला सोडून द्या. त्यावर प्रश्नकर्त्याने आश्चर्याने विचारले. शक्तीशाली सैन्य आणि मजबूत अर्थव्यवस्थेचा त्याग केल्याने तो समाज उपाशीपोटी मरून जाईल आणि त्याच्यावर शत्रु समाज हल्ला करेल. तेव्हा काय? तेव्हा कन्फुशियसने उत्तर दिले की, नाही असे होणे कदापि शक्य नाही. समाजात न्याय शिल्लक असल्यामुळे त्या समाजाचा आपल्या सरकारवर पूर्ण विश्वास असेल आणि लोक अशा परिस्थितीत पोटावर दगड बांधून शत्रूचा सामना करतील आणि स्वकष्टाने अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देतील. 

अगर न पुरे तकाजे हों अद्ल के काज़ीम

तो कुर्सियों से भी मन्सब मज़ाक करते हैं

कन्फुशिअसची ही कथा यासाठी सांगावी लागली की, यापूर्वीही भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल शरद पवार सारख्या मातब्बर नेत्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यासाठी खालील घटना जबाबदार होत्या. 

पहिली घटना अशी की एका कार्यक्रमाच्या दरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.आर. शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. प्रत्युत्तरादाखल प्रधानमंत्र्यांनीही भारतीय न्यायव्यवस्थेचे कौतुक केले. 

दूसरी घटना अशी घडली की, तृणमुल काँग्रेसच्या फायर ब्रांड महिला खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व्यक्त होतांना भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल अत्यंत कडक शब्दात असमाधान व्यक्त केले.  होते. 

तीसरी घटना अशी झाली की, सेवानिवृत्त होऊन राज्यसभेचे सदस्य झालेले सर्वोच्च न्यायालयाचे पूर्व मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी 13 फेब्रुवारी 2020 रोजी न्यायव्यवस्थेवर टिप्पणी करताना असे म्हटले होते की, ’’भारतीय न्यायव्यवस्था जीर्ण झालेली आहे. मला कधी कोर्टात जाण्याची पाळी आली तर मी कोर्टात जाणार नाही. कोर्टात कोण जातो? जो जातो तो पश्चाताप करतो.’’ 

स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधिशाला जर असे म्हणण्याची वेळ आली असेल की, मला कोर्टावर विश्वास नाही आणि मी न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणार नाही तर लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी हाल-अपेष्टा भोगून आणि हजारोंनी जीवाचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित होतो.

अदल से मूंह मोडकर जब मुन्सफी होने लगे

सख्त काफीर जुर्म भी अब मज़हबी होने लगे

भारतातच नाही तर जगात ज्या समाजात असे घडेल की सामान्य व्यक्ती एखादा गुन्हा करत असेल तर त्याला कडक शिक्षा आणि खास व्यक्ती तोच गुन्हा करत असेल तर त्याला सौम्य शिक्षा देण्यात येईल किंवा शिक्षेपासून सूट देण्यात येईल तेव्हा त्या समाजाला विनाशापासून कोणीच रोखू शकणार नाही. म्हणूनच एकदा प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्याकडे चोरीच्या एका प्रकरणात एका श्रीमंत महिलेची शिक्षा माफ करण्याची शिफारस करण्यात आली, असे म्हणून की ती अमूक शक्तीशाली कबिल्याची आहे. तेव्हा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ठामपणे नकार देत उत्तर दिले होते की, हिच्या ठिकाणी माझी प्रिय मुलगी फातेमा जरी असती तरी मी तिला तीच शिक्षा दिली असती जी शरियतमध्ये नमूद आहे.

न्याय म्हणजे काय?

न्यायाला उर्दूमध्ये इन्साफ तर अरबीमध्ये अद्ल असे म्हटले जाते. ज्याचे खालीलप्रमाणे अर्थ आहेत. 

1. तराजूचे दोन पारडे बरोबर करणे,

2. फैसला करणे, 3. हक्क देणे 

4. कुठल्याही गोष्टीला तिच्या योग्य ठिकाणी ठेवणे. 

याच्या विरोधार्थी शब्द आहेत हक्क डावलणे, अत्याचार करणे इत्यादी. समाजामध्ये ज्याचे जे अधिकार आहेत ते त्याला त्याची जात, धर्म, वर्ण, लायकी, भाषा व त्याचे समाजातील स्थान न पाहता देणे म्हणजे न्याय होय? कुठल्याही समाजाचे स्थैर्य हे त्या समाजामध्ये न्याय किती व कसा केला जातो यावर अवलंबून आहे. न्यायासंबंधी कुरआनमध्ये फरमाविलेले आहे की- 1. ’’हे मुस्लिमानों ! ईश्वर तुम्हाला आज्ञा देतो की, ठेवी, ठेवीदारांच्या स्वाधीन करा आणि जेव्हा लोकांदरम्यान निवाडा कराल तेव्हा न्यायाने निवाडा करा अल्लाह तुम्हाला उत्तम उपदेश देत आहे. निःसंशय अल्लाह सर्वकाही ऐकतो व पाहतो.’’(सुरे निसा आयत क्र. 58). 2. ’’ हे श्रद्धावंतांनों ! न्यायावर दृढ रहा आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-वडिलांवर किंवा नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील. मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची भाषा बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून घ्या जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.’’  (सुरे निसा आयत नं. 35)

या ठिकाणी सत्याच्या साक्षीचे इतके प्रचंड महत्व विदित केलेले आहे की, सत्य साक्ष दिल्याने स्वतःचे आई-वडिल किंवा नातेवाईक यांना सुद्धा हानी पोहोचत असेल तरी सत्यापासून विचलित व्हायचे नाही, असे नमूद केलेले आहे. ही गोष्ट समाजहितासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 

आज नेमकी याउलट परिस्थिती आहे. ज्याची दखल दै. लोकसत्ताने खालील शब्दात घेतलेली आहे, ’’न केलेल्या विनोदाबद्दल कोणा अपरिचित कलाकारास काही आठवडे तुरुंगवास सहन करावा लागणे आणि दिल्ली दंगलीत प्रत्यक्ष हिंसाचाराची चिथावणी देणाऱ्यांकडे कानाडोळा होणे किंवा सरकारस्नेही संपादकास लगोलग जामीन मिळणे आणि सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांस कित्येक महिन्यांच्या तुरुंगवासानंतरही तो नाकारला जाणे अथवा तुरुंगात वाचनाची सोय व्हावी यासाठीही संघर्ष करावा लागणे इत्यादी. असे आणखी काही दाखले सहज देता येतील. पण त्यांच्या संख्येवर त्यामुळे निर्माण होणारा प्रश्न अवलंबून नाही. सरकारची दिशा नेमकी कोणती, हाच तो प्रश्न. (संदर्भ : लोकसत्ता संपादकीय 16 फेब्रुवारी 21).

एक खरी बोधकथा

खलीफा उमर बिन अब्दुल अजीज रहे. यांच्या काळात एका राज्याच्या राज्यपालाने आपल्या अखत्यारितील आपल्या एका उजाड गावाचे पुनर्वसन नव्याने करण्याची विनंती वजा पत्र त्यांना पाठविले. उत्तरादाखल खलीफा उमर अ. अजिज रहे.  यांनी उत्तरादाखल जे पत्र पाठविले त्यात लिहिले होेते, ’’तुम्हाला जेव्हा हे पत्र मिळेल तेव्हा ते काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या उजाड शहरामध्ये कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. शहराच्या प्रत्येक रस्त्यावर कोणी कोणावर अत्याचार करणार नाही, याची दक्षता घ्या. असे केल्यास अल्पावधीतच ते शहर नव्याने भरभराटीला येईल.’’ एकंदरित, इस्लाममध्ये न्यायाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. जगामध्ये जेवढी काही युद्ध होतात त्यांचे साधारपणे तीन भागात वर्गीकरण करता येईल. एक - स्त्री साठी, दोन - संपत्तीसाठी आणि तीन - जमीनीसाठी. परंतु इस्लाममध्ये तलवारीने जिहाद या तिन्ही कारणासाठी करता येत नाही. तलवारीने जिहाद फक्त न्यायाच्या स्थापेनसाठी करण्याची परवानगी आहे.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची प्रसिद्ध हदीस आहे, ज्यात म्हटले आहे की, ’’ज्या ठिकाणी वाईट गोष्टी घटतांना पहाल तेव्हा त्यांना ताकदीने रोखा. तेवढी ताकत नसेल तर तोंडाने त्याचा निषेध करा. तसे करणेही शक्य नसेल तर मनात त्या गोष्टीबद्दल तिरस्कार निर्माण करा आणि ही श्रद्धेची सर्वात निम्नश्रेणी आहे.’’

थोडक्यात जगात न्यायाची स्थापना झाल्याशिवाय शांतीची स्थापना होऊ शकत नाही, याची वाचकांनी खूनगाठ मनात बांधावी. आणि वरील कुरआनमधील आयाती आणि हदीसच्या प्रकाशात आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचे मुल्यांकन करावे. अनेक मुस्लिम देशांमध्ये इस्लामी दंडविधान (शरई कायदा) आणि न्याय व्यवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी गुन्हे नगण्य स्वरूपात घडतांना आपण पाहतो. एकंदरित आपल्या देशातही ढासळत्या न्याय व्यवस्थेच्या स्तराला सावरण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपण निष्पक्षपणे सत्याची साक्ष देण्याचा निर्णय करावा आणि आपली न्यायव्यवस्था कशी दृढ होईल, यासाठी शक्यतेवढे प्रयत्न करावे. भारताला महाशक्ती बनविण्यासाठी असे करणे अनिवार्य आहे. 

मेरे खुदा सज़ा व ज़जा अब यहाँ भी हो

ये सरजमीं भी अद्ल का उनवाँ दिखाई दे

जावेद मंजर यांच्या वरील ओळी या ठिकाणी चपलख बसतात. या लेखाच्या शिर्षकामध्ये जे वाक्य आम्ही वापरलेले प्रसिद्ध तुर्की सुफी संत ताब्दुक अ‍ॅम्रे यांचे आहे. पुनरूक्तीचा दोष पत्करून त्यांचे वाक्य पुन्हा उधृत करतो की, जगाला न्यायाशिवाय कुठल्याच गोष्टीची गरज नाही. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! माझ्या देशात न्यायाची स्थापना होवू दे. (आमीन.).

-एम. आय. शेख


इमानवंतांसाठी ती प्रत्येक गोष्ट  ’’Essential Religious Practice’’ आहे ज्याचा एकवेळा उल्लेख किंवा इशाराही जर कुरआन व प्रेषित सल्ल. यांनी केला असेल. न्याय व्यवस्था ही भौतिक पुरावे मागते. पण अख्खा इस्लाम हा ‘‘ईमान बिल गैब’’ म्हणजे ‘‘अदृश्यावर’’विश्वास या तत्वावर उभा आहे. आता दोघांची दखल सुप्रिम कोर्ट कशी घेते हे पहायचे आहे. माझा हिजाब नाकारणाऱ्या, न घालणाऱ्या मुस्लिमेत्तर व मुस्लिम स्त्रियांवर काहीही आरोप नाही. 


समस्त वाचकवर्ग, अस्सलामु अलैकुम ! (तुमच्यावर शांती व सुरक्षितता असो). दिनांक 15/3/2022 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने ज्या शाळेत व्यवस्थापनाने गणवेश निर्धारीत केला आहे, त्याच्या विरोधात जावून ’’हिजाब’’ परीधान करण्यास मज्जाव, या आदेशाच्या समर्थनात निर्णय दिला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर अनेकांनी विरोध. यापैकी किती जणांनी ’’हिजाब’’ हे नेमके काय आहे? व इस्लामशी त्याचा नेमका संबंध काय? याचा शोध घेतला असेल. याबद्दल संशयच आहे. मी माझ्या परीने या विषयाचा जो अभ्यास केला त्याचा उहापोह म्हणजे हा लेख. खर तर ’’हिजाब’’ या अरेबीक शब्दाचा शब्दशः भाषांतर होते ’’पडदा’’ किंवा ’’अवरोध’’ पण हा शब्द जनसामान्य भाषेत प्रतिनिधीत्व करतो स्त्री-वेशभूषेबद्दल. इस्लाम धर्माचे अस्सल अवतरित पुराण किंवा संदर्भग्रंथ म्हणजे कुरआन. कुरआनमधील एकाही शब्दावर कुणीही इस्लामचा अनुयायी आक्षेप घेवूच शकत नाही. त्या शब्दाच्या अर्थावर चर्चा होऊ शकते. दूसरा सदंर्भ म्हणजे हदीस. तर या दोन्ही संदर्भानुसार इस्लाम स्त्रियांच्या वेशभूषेबद्दल काय म्हणतो हे जाणून घेऊ. सुरतुल नूर, आयत (39) (हे प्रेषित) सांगा इमानवंत स्त्रीयांना आपली नजर झुकलेली ठेवा व आपल्या अब्रुचे संरक्षण करा (हाच आदेश इमानवंत पुरूषांनादेखील आयत क्र. 30 मध्ये दिला गेला आहे. लगेच कुराणमध्ये स्त्री-पुरूष असमानता आहे या निष्कर्षावर येण्यापूर्वी हे  -(उर्वरित पान 7 वर)

समजून घ्यावे) व नका दिसू देऊ आपले श्रृंगार शिवाय त्याच्या जे आपोआप प्रकट होते व आपले खुमूर (अरब स्त्रीया ज्या कपड्याने डोके झाकत व पाठमोरे मोडत त्याला खुमूर म्हणतात.) आपल्या छातीवरून पसरवा. (सुरतुल अहजाब आयत नं. 59,) ’’ हे प्रेषित सांगा आपल्या पत्नींना व मुलींना व इमानवंतांच्या स्त्रीयांना आपल्यारवून परिधान करा आपले बाह्यवस्त्र / चादर (जसे की घुंगट) यावरून कुरआनमध्ये स्त्रियांनी आपल्या डोक्याचे व चेहऱ्याचे झाकणे अपेक्षित आहे हे स्पष्ट होते. 

हदीसमध्ये बऱ्याच ठिकाणी या वेशभूषेला दुजोरा दिला आहे, पण वरील दोन्ही आयतहमध्ये वेशभूषेपेक्षा अजून एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो म्हणजे ’’ईमान’’ अल्लाहने प्रेषितांना ’’इमानवंत स्त्रीयांना’’ हा संदेश दिला. कारण इमानवंत स्त्रीयाच या आदेशाला  समजू शकतात. ज्यांच्या हृदयात ’’ईमान’ आहे त्यांना कुरआनच्या कुठल्याही आदेशाचे समर्थन करण्यासाठी इतर भौतिक, सामाजिक किंवा आर्थिक स्पष्टीकरणाची गरज पडत नाही. जरी कुरआनचे आदेश या सर्व स्पष्टीकरणाला सार्थ ठरतात. त्यामुळेच मी म्हणतो की, मूळ प्रश्न ’’हिजाब’’ चा नाही तर ’’ईमान’’चा आहे. काय आहे हे ’’ईमान’’?  इमान म्हणजे पोलादापेक्षा मजबूत, पर्वतापेक्षा अढळ व स्वच्छ पाण्यापेक्षाही निर्मळ विश्वास. विश्वास कशावर? तर इस्लाममध्ये असा विश्वास तीन गोष्टीवर अपेक्षित आहे. 

1) एकच परमेश्वर हा विश्वास अंध नाहीए. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर हे पर्वत, या नद्या, पशु-पक्षी, झाडे व स्वतःचे अस्तीत्व बघून विचार करावा कि हे सर्व विना कर्त्याच्याच चालले आहे का? का हे सर्व निर्माण करणारा चालविणारा कुणी एकच असलाच पाहिजे!

2.) प्रेषित : मग जर या सृष्टिला त्याने बनविले व मनुष्य जातीला सर्वांपेक्षा वरचढ केले ते का? आपला जन्म का झाला असावा? त्या परमेश्वराच्या आपल्यासाठी काय आदेश आहेत? आपण इतरांशी कसे वागावे व एकंदरीत हे जीवनच कसे जगावे? यासाठी परमेश्वराने त्याचा संदेश देऊन ज्या व्यक्ती विशेषांना आपले प्रेषित म्हणून निवडले त्यांच्या शिकवणी व आचरणाकडे  लक्ष दिले तर एक गोष्ट लक्षात येईल की त्यांचे चारीत्र्य व स्वभाव ईशसंदेशा अनुरूप होते. म्हणून प्रेषितांना खरे प्रेषित मानने हे ईमान होय.

3) मरणोत्तर आयुष्य : इस्लाम धर्माला समजण्यासाठी ही संकल्पना समजणे खूप गरजेचे आहे? ’’ईमान’’ हे प्रत्येक इस्लाम अनुयायी म्हणविणाऱ्यासाठी एक पूर्व अटच आहे. या जगात आपण फक्त एक परीक्षा देण्यासाठी आलो आहोत. या जगात ईश संदेश पोहोचवून आपले चारित्र्य व स्वभावाने या जगाला उत्तमात उत्तम बनविण्साठी आलो आहोत. या जगात आपल्याला आपल्या मनमर्जीने न जगता परमेश्वराने ठरविलेल्या व प्रेषितांनी दाखवून दिलेल्या मापदंडानुसार जगायचे आहे. कारण या जगातील मृत्युनंतर आपण पुनःश्च जीवंत केले जाऊ व आपल्याला या 70-80 वर्षाच्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाची हिशोब द्यावा लागणार. मरणानंतरचे हे आयुष्य चिरकालीन अक्षय्य आहे. 

आता विचार करा, ज्या व्यक्तीच्या मनात या गोष्टीचा ’’ईमान’’ दृढ विश्वास आहे, त्याला ’’हिजाब’’ किंवा ’’दारूबंदी’’ किंवा ’’लैंगीक शालीनता’’ या गोष्टीच्या सक्तीच्या नाहीत तर भक्तीच्या वाटतात. सोप उदाहरण म्हणजे जर का कुणी तुम्हाला फक्त एका मिनीटासाठी अमुक एक वेशभूषा करायला सांगितली, अमुक एका प्रकारचे खाने किंवा अमुक एक जीवनशैली सांगितली ज्यात वैज्ञानिक, सामाजिक, मानसीक व शारीरिकदृष्ट्या तुमचं भलच आहे व बदल्यात अब्जावधी रूपये द्यायचे कबुल केले तर कोण हे एका मिनिटासाठी करणार नाही? हे आहे मुस्लिम व्यक्तीचे ’’इमान’’ या जीवनाच्या संकल्पनेसाठी त्याला परत जाऊन परमेश्वराला तोंड दाखवायचे आहे, जाब द्यायचा आहे.

इमानवंतांसाठी ती प्रत्येक गोष्ट ’’एीीशपींळरश्र ठशश्रळसर्ळेीी झीरलींळलश’’ आहे ज्याचा एकवेळा उल्लेख किंवा इशाराही जर कुरआन व प्रेषित सल्ल. यांनी केला असेल तर न्याय व्यवस्था ही भौतिक पुरावे मागते. पण अख्खा इस्लाम हा ’’ईमान बिल गैब’’ म्हणजे ’’अदृश्यावर’’विश्वास या तत्वावर उभा आहे. आता दोघांची दखल सुप्रिम कोर्ट कशी घेते हे पहायचे आहे. माझा हिजाब नाकारणाऱ्या, न घालणाऱ्या मुस्लिमेत्तर व मुस्लिम स्त्रियांबद्दल काही आरोप नाही. परमेश्वराने प्रत्येकाला जसे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे तसेच त्या निर्णयाच्या परिणामास सामोरे जाण्यासही सचेत केले आहे. ’’हिजाब’’ घाला अथवा न घाला त्याचा जाब प्रत्येक स्त्रीला परमेश्वराकडे द्यायचा आहे. आमची प्रामाणिक इच्छा एवढीच की ’’हिजाब’’ घालायचा अथवा न घालायचा याचे स्वातंत्र्य गोठवून मुस्लिम स्त्रीचे ’’ईमान’’ हिरावून घेतले जाऊ नये.  


- डॉ. असद पठाण


देशातील अनेक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे इस्लाम आणि मुस्लिमांविरूद्ध एकतर्फी लिखाण करून देशातील बहुसंख्याक देशबांधवांमध्ये कमालीचा गैरसमज आणि द्वेषभाव निर्माण करण्यात येत आहे.


‘शोधन’ आपल्या मर्यादित क्षमतेनुसार अशा खोट्या अपप्रचाराचा आढावा घेत, दिव्य कुरआन आणि अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींचा परिचय देऊन देशबांधवांमधील गैरसमज व द्वेषनिर्मूलनाचे कार्य गेल्या 48 वर्षांपासून अखंडपणे करीत आहे. दलित, पददलित, आदिवासींसह देशातील समस्त मूलनिवासी समाजाच्या समस्या, त्यांची दुरावस्था, त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचारासंबंधी सामाजिक बांधिलकी म्हणून ‘शोधन’ आवाज उठवित आहे. कुठलेही वृत्तपत्र केवळ वाचक-वर्गणीवर टिकू शकत नाही. त्याला जाहिरातीचा भक्कम आधार लागतो. पण... ‘शोधन’ला तोही आधार नाही. त्यामुळे ‘शोधन’ची आर्थिक आघाडीवर अवस्था अत्यंत शोचनीय आहे. ‘शोधन’ आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी आमच्या सर्व वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार आणि हितचिंतकांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की पवित्र रमजान महिन्यात आपली जकात ‘शोधन’ला देऊन इस्लाम संबंधीच्या गैरसमजांना दूर करण्याच्या व इस्लामचा संदेश मराठी भाषेत पोहोचविण्याच्या या पवित्र कार्यात आपणही सहभागी व्हावे.

अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जकात अनिवार्य आहे. जकात समृद्धीदायक व अर्थवृद्धी करते. पवित्र कुरआनात म्हटले आहे, ‘‘ईश्वराला स्वत:साठी कोणत्याही दानाची गरज नाही. एखाद्या निर्धन, गरजवंतास दिले तर ते आपल्याला दिले असे अल्लाह म्हणतो आणि जकात देणाऱ्यास अल्लाह अनेक पटीने मोबदला देतो. जकात दिल्याने स्वार्थ, संकुचित मनोवृत्ती, धनलालसा हे दुर्गुण नष्ट होतात.’’ ‘शोधन’ला जकात देऊन ‘सवाबे जारिया’मध्ये सामील व्हा. याचा मोबदला सर्वशिक्तमान अल्लाहद्वारे आपल्याला मिळेल. आमीन.


प्राचार्य बी.व्ही. गमे :  राष्ट्रीय, सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जमाअते इस्लामी हिंदकडून येवला येथे  मस्जिद परिचय कार्यक्रम


येवला (शकील शेख) 

मस्जिदमध्ये आल्यानंतर मनाला खूप शांती मिळाली. मनात असलेले गैरसमज दूर झाले. मस्जिद हे अतिशय पवित्र व मनाला शांती देणारे स्थान आहे हे आज अनुभवले असे मनोगत जनता महाविद्यालयाचे प्राचार्य बी व्ही गमे यांनी येथे व्यक्त केले.

येवला शहरातील चांद शहा मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंदच्या वतीने ’मस्जिद परिचय’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अर्जुन कोकाटे होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जमात-ए-इस्लामी हिंद चे मराठी भाषा प्रवक्ते मोहम्मद शमी, प्राचार्य भाऊसाहेब गमे, प्राचार्य विभांडिक सर, लक्ष्मण भाऊ दराडे, जमात-ए-इस्लामी हिंद नाशिक जिल्हाध्यक्ष फैरोज आजमी, फारुक शेठ चामडेवाले, प्राचार्य दिनकर दाणे, राष्ट्र सेवा दलाचे येवला तालुका अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र बारें यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात कुरआनची आयत वाचून करण्यात आली. 

यावेळी मान्यवरांना मस्जिदीचा परिचय करून देण्यात आला. नमाज कशी, केव्हा व का पठण करायला पाहिजे हे सविस्तर सांगण्यात आले. अजान व त्याचा मराठी भाषेत अनुवाद सांगितला. अजान दिल्यानंतर मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी येताना काय करायला हवे हे समजावण्यात आले. यात वजू कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी नमाजे मगरिब स्व अनुभवातून बघितले व त्यांच्या मनात उपस्थित झालेले प्रश्न सादर केले. त्याचे निरसन मोहम्मद शमी यांनी केले व आपल्या पुढील वक्तृत्वात इस्लाम कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा देत नाही, इस्लाममध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पवित्र कुरआनच्या आदेशानुसार आहेत व प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मार्गदर्शनावर आधारित आहेत. अतिशय सुंदर मांडणी करून इस्लाम आणि मस्जिद याचे महत्त्व उपस्थितांना जळगाव जिल्हा जमात-ए-इस्लामी चे मोहम्मद शमी यांनी समजावून सांगितले.

राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य दिनकरराव गाणे यांनी खरा शांती चा धर्म इस्लाम आणि प्रेषितांचे विचार म्हणजेच मानवाने मानवाप्रमाणे जगणे हे आहे. आज संपूर्ण देशात धर्माच्या नावाखाली खूप मोठे राजकारण होत आहे अशा परिस्थितीत माझ्या सर्व बांधवांनी एकदा तरी मस्जिद परिचय कार्यक्रमाला उपस्थित राहून खरा इस्लाम काय आहे, हे समजून घ्यायला हवे. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी असे कार्यक्रम वेळोवेळी घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आम्हाला व युवकांना तसेच सर्व धर्मातील जातीतील अभ्यासक लोकांना आमंत्रित करत रहावे. आज मला खूप आनंद झाला, मी मस्जिदबद्दल ज्या काही वाईट गोष्टी ऐकल्या होत्या त्या पूर्णतः खोट्या असून सर्वात पवित्र ठिकाण मस्जिद आहे, असे मनोगत व्यक्त केले. 

सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राचार्य अर्जुन कोकाटे यांची राष्ट्रसेवा दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अर्जुन कोकाटे यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका करून खरा देश घडवायचा असेल तर वेळोवेळी   - (उर्वरित पान 7 वर)

सर्व धर्मांना समजून घेणे गरजेचे आहे आणि ज्या धर्मामध्ये आपल्या उत्पन्नातील अडीच टक्के जकात म्हणून गोरगरिबांना सहकार्य म्हणून देण्याचे सक्तीचे आदेश आहेत, असा धर्म कोणताही नाही. इस्लाम धर्मात ज्या मूळ गोष्टी आहेत त्या खूप सुंदर व मनाला शांती देणाऱ्या आहेत.आज देशात अतिशय गलिच्छ असे वातावरण मुसलमान आणि मस्जिद यांच्या बाबतीत पसरवण्यात येत आहे. परंतु, मी साक्ष देतो आज या चाँद शाह मस्जिद येते मी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार बघितला नसून शांती व सद्भावनेचा मार्ग दाखवणारे एकमेव स्थान म्हणून मस्जिद आहे असे, घोषित करतो. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे व अविस्मरणीय क्षण म्हणून आजच्या दिवसाला कधीच विसरू शकत नाही. कारण ज्या मस्जिदीबद्दल खूप सारे गैरसमज होते त्याच मस्जिदमध्ये आज माझा सत्कार करण्यात आला.

आम्हाला अतिशय आदराने व प्रेमाने मस्जिदीबद्दल मार्गदर्शन केले, चांगली वागणूक दिली याबद्दल मी जमात-ए-इस्लामी हिंद चा ऋणी आहे. त्यांनी मला आणि आमच्या सर्व राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांना या कार्यक्रमात बोलावले या कार्यक्रमात व त्यांच्या सर्व कार्यक्रमाला आम्ही सर्व नक्कीच उपस्थित राहू, असे मी त्यांना शब्द देतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे, अजिजभाई शेख,अझर भाई शेख, ऋषिकेश गायकवाड, शिवाजी साताळकर, गणेश जाधव, सुकदेव आहेर तसेच मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्र सेवा दल सैनिक शिक्षक भारती चे पदाधिकारी व इतर अनेक धर्माचे लोक उपस्थित होते. याप्रसंगी जमात-ए-इस्लामीच्या मराठी भाषेतील असलेल्या असंख्य पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यात उपस्थितांनी भरपूर प्रमाणात पुस्तके खरेदी केली. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार व मराठी भाषेतील इस्लामिक  पुस्तकांवर चर्चा रंगली. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष फेरोज आजमी यांनी सादर केले. सूत्रसंचालन अजहर शहा यांनी केले. आभार शकील शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमील साहब, मुस्ताक साहब, इमरान शेख, समद शेख, अब्दुल रहिम महेवी , मकसुद महेवी, अकील अन्सारी, फैसल अंसारीसह आदी समाज बांधवांनी प्रयत्न केले.



माननीय अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपले पैगंबर मानून खूश होणाऱ्या मनुष्याने खऱ्या अर्थी ईमानचे समाधान प्राप्त केले.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

अल्लाहच्या दासत्वात स्वत:ला झोकून देऊन आणि इस्लामी शरियत (धर्मशास्त्र) ची उपासना करून आणि स्वत:ला पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मार्गदर्शनासाठी वाहून घेऊन पूर्णत: संतुष्ट आहे, त्याचा निर्णय असा आहे की मला दुसऱ्या कोणाचे दासत्व करायचे नाही आणि प्रत्येक स्थिती इस्लामनुसार आचरण करणे आणि पैगंबरांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या मनुष्याची स्थिती अशी असेल त्याने समजा ईमानचा गोडवा त्याने प्राप्त केला.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे आज्ञापालन करावयास हवे).'' (हदीस : मुस्लिम)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ''हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.'' पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.'' (हदीस : मुस्लिम)

अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र 'नफ्ल नमाज' (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ''मी नेहमी 'नफ्ल रोजे' (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही'' आणि तिसरा म्हणाला, ''मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.'' (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, ''तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!'' मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) 'नवाफिल' (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल, त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.'' (हदीस : मुस्लिम)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



(६९) आणि पाहा, इब्राहीम (अ.) जवळ आमचे दूत शुभवार्ता घेऊन पोहचले. म्हणाले, ‘‘तुम्हावर सलाम असो.’’ इब्राहीम (अ.) नी उत्तर दिले, ‘‘तुमच्यावरदेखील सलाम असो.’’मग विनाविलंब इब्राहीम (अ.)ने एक भाजलेले वासरू (त्यांच्या पाहुणचारासाठी) आणले.७५ 

(७०) परंतु जेव्हा पाहिले की त्यांचे हात जेवणासाठी पुढे होत नाहीत७५अ तेव्हा तो त्यांच्याविषयी साशंक झाला आणि मनात त्यांची भीती धरू लागला.७६ त्यांनी सांगितले,‘‘भिऊ नका, आम्ही तर लूत (अ.) च्या लोकांकडे पाठविले गेलो आहोत.’’७७ 

(७१) इब्राहीम (अ.) ची पत्नीदेखील उभी होती. ती हे ऐकून हसली७८ मग आम्ही तिला इसहाक (अ.) आणि इसहाक (अ.) नंतर याकूब (अ.) ची खुशखबरी दिली.७९ 

(७२) ती म्हणाली, ‘‘माझे दुर्दैव!८० आता मला संतती होईल काय जेव्हा मी चक्क म्हातारी झाले आणि माझे पतीदेखील म्हातारे झाले?८१ ही तर मोठी विचित्र बाब आहे!’’ 

(७३) दूतांनी सांगितले, ‘‘अल्लाहच्या आज्ञेवर आश्चर्य करतेस?८२ इब्राहीम (अ.) च्या कुटुंबियांनो! तुम्हावर तर अल्लाहची कृपा आणि त्याची समृद्धी आहे आणि निश्चितच अल्लाह अत्यंत प्रशंसेस पात्र व वैभवशाली आहे.’’ 

(७४) मग जेव्हा इब्राहीम (अ.) ची भीड चेपली आणि (संतानच्या सुवार्तेने) त्याचे मन प्रसन्न झाले तेव्हा त्याने लूतच्या लोकांसाठी आमच्याशी भांडण मांडले.८३



७५) याने माहीत होते की देवदूत (फरिश्ते) आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या येथे मानवी रूप धारण करून गेले होते. सुरवातीला त्यांनी आपला परिचय दिला नाही म्हणून इब्राहीम (अ.) यांनी विचार केला की हे कोणी अनोळखी पाहुणे आहेत आणि त्वरित त्यांनी त्या पाहुण्यांची भोजन व्यवस्था केली.

७५अ) याने आदरणीय इब्राहीम (अ.) यांना माहीत झाले की हे फरिश्ते आहेत.

७६) काही भाष्यकारांना ही भीती यामुळे होती की जेव्हा या अनोळखी पाहुण्यांनी जेवण घेण्यास संकोच केला तेव्हा इब्राहीम (अ.) यांना त्यांच्या हेतूवर शंका आली आणि विचार करू लागले की हे एखाद्या शत्रुत्वाच्या हेतूने तर आले नाहीत ना? त्यांना शंका वाटू लागली, कारण अरबांमध्ये जेव्हा एखादा माणूस एखाद्याचे आदरातिथ्य स्वीकारण्यास नकार देतो, तेव्हा असे समजले जात होते की ते पाहुणे म्हणून आलेले नाहीत तर हत्या आणि हिंसा करण्यासाठी आलेले आहेत. परंतु नंतरची आयत याचे समर्थन करीत नाही.

७७) या वर्णनशैलीने स्पष्ट होते की जेवणाकडे त्यांचे हात पुढे न झाल्यामुळे आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी समजून घेतले होते की हे फरिश्ते आहेत. फरिश्त्यांचे स्पष्टपणे मानवी रुपात येणे असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यानेच होते. म्हणून आदरणीय इब्राहीम (अ.) यांना भीती ज्याची वाटली होती ती म्हणजे काय माझ्या घरातील सदस्यांकडून किंवा गावातील लोकांकडून काही अपराध तर घडला नाही ना? ज्यामुळे फरिश्त्यांना मानवी रूपात आपली पकड करण्यासाठी पाठविण्यात आले आहे? जर असे असते तर फरिश्ते म्हणाले असते, 'भिऊ नका, आम्ही तुमच्या निर्माणर्कत्या स्वामीकडून आलो आहोत." परंतु जेव्हा त्यांनी भीती दूर करण्यासाठी सांगितले, "आम्ही तर लूतच्या  लोकसमुदायाकडे  पाठविले  गेले आहोत." याने  ज्ञात  होते की आदरणीय इब्राहीम (अ.) यांना ते फरिश्ते होते ह्याचे ज्ञान झाले होते. परंतु काळजी याची होती की ते ज्या उपद्रवामुळे कसोटीच्या रूपात आले आहेत. तर शेवटी तो अभागी कोण आहे? त्याची आता गय केली जाणार नाही.

७८) याने माहित होते की देवदूतांची (फरिश्ते) मानवी रुपात येण्याची खबर ऐकून सर्व कुटुंब व्यथीत झाले होते. आदरणीय इब्राहीम (अ.) यांची पत्नी घाबरून घराबाहेर आली होती. जेव्हा त्यांनी हे ऐकले की त्यांच्या घरावर किंवा वस्तीवर विपदा येणार नाही तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला आणि ती खूश झाली.

७९) देवदूतांनी आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्याऐवजी आदरणीय सारा यांना ही शुभसूचना यासाठी ऐकविली की यापूर्वी आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या येथे त्यांची दुसरी पत्नी आदरणीय हाजरा यांच्यापासून आदरणीय इस्माईल (अ.) जन्माला आले परंतु आदरणीय सारा तोपर्यंत निपुत्रिक होती. त्यामुळे आदरणीय सारा अधिक दु:खी होती. त्यांच्या या दु:खाला दूर करण्यासाठी देवदूतांनी त्यांना हीच शुभवार्ता दिली नाही की तुमच्या येथे इसहाकसारखा प्रतिष्ठित पुत्ररत्न जन्माला येणार आहे; परंतु हेसुद्धा सांगितले की या मुलानंतर नातू याकूब (अ.) सुद्धा एक महान पैगंबर होईल.

८०) याचा अर्थ हा होत नाही की आदरणीय सारा खरेतर यावर खूश होण्याऐवजी उलट याला अभागीपणा समजत होती. परंतु हे अशा शब्दांमध्ये आहे ज्याद्वारा स्त्रिया आश्चर्य व्यक्त करतात आणि ज्यांचा उद्देश शाब्दिक उद्देश नसतो तर उद्देश आश्चर्य व्यक्त करणे हाच असतो. 

८१) बायबलद्वारा माहीत होते की आदरणीय इब्राहीम (अ.) यांचे वय त्या वेळी 100 वर्षे आणि आदरणीय सारा यांचे वय 90 वर्ष होेते.

८२) म्हणजे स्वभावत: या वयात माणसाला संतती प्राप्त होत नाही. परंतु अल्लाहच्या कृपेने असे होणे काही असंभव नाही. जेव्हा ही शुभवार्ता तुम्हाला अल्लाहकडून देण्यात येत आहे, म्हणून काहीच कारण नाही की तुमच्यासारख्या ईमानधारक स्त्रीने आश्चर्य व्यक्त करावे.

८३) 'भांडण' शब्द या ठिकाणी त्या अत्याधिक प्रेम आणि गर्वपूर्ण संबंधाला व्यक्त करतो जे आदरणीय इब्राहीम (अ.) अल्लाहशी ठेवून होते. या शब्दाने हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते की दास आणि अल्लाहच्या दरम्यान दीर्घकाळ संवाद चालत राहिला असेल. दास आग्रह करतो की लूतच्या लोकसमुदायावरून प्रकोप टाळला जावा. अल्लाह उत्तरात सांगतो की हे राष्ट्र भलाई आणि सदाचारापासून पूर्णरिक्त झाले आहे आणि याचे अपराध आता त्या सीमेपार झाले आहेत ज्यांना आता क्षमा केली जाऊ शकत नाही. परंतु दास आपला हट्ट सोडत नाही आणि पुन्हा पुन्हा म्हणतो, "पालनर्कत्या प्रभु! त्यात थोडीशी भलाई शिल्लक असेल तर त्याला आणखीन सवलत दे, शक्य आहे त्यामुळे सुधार होईल." बायबलमध्ये या भांडणाचे स्पष्टीकरण दिले आहे परंतु कुरआनचे संक्षिप्त वर्णन अधिक व्यापक अर्थ ठेवून आहे. (उपत्ति 18:23-32)



पाच राज्याच्या निवडणूक निकालाची उत्सुकता आता संपली आहे. चार राज्यात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. उत्तरप्रदेश, गोवा, मणीपूर आणि उत्तराखंड ही ती चार राज्ये. खरं तर २०१४ सालापासून देशात मोदीकरीष्मा इतरत्र नाही तरी निदान निवडणूक निकालात तरी का होईना पहायला मिळतो आहे. संसदीय राजकारणात हार जित ही होत असते. परंतु ते विसरुन त्यापुढे जात देशहितासाठी एकोप्याने काम करण्याची गरज असते. कोण जिंकला कोण हरला त्यापेक्षा सामान्य जनतेच्या पदरी त्यामुळे काय येणार आहे. त्यांची जगण्याची लढाई सोपी होणार आहे का? महागाई  आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील का हा खरा प्रश्न आहे. त्याहीपुढे जाऊन आम्हीच जिंकू शकतो हा उन्माद भाजपा नेत्यांच्या ठायी निवडणूक निकालानंतर ठासून भरलेला पहायला मिळतो आहे.

सबंध देशभर काँग्रेसची पिछेहाट होताना दिसते आहे. काँग्रेसमुक्त भारत होण्यात काँग्रेसचा वाटा अधिक आहे. सत्तेच्या गणितात आपल्या फायद्याप्रमाणे दलबदल करणारी सामंतशाही मंडळी दुरावल्याने काँग्रेसचा जनाधार संपलेला आहे. आपले संपूर्ण आयुष्य सत्तेच्या छायेत गेल्याने एकदम आलेली विरोधकाची भूमिका काँग्रेसी नेत्यांना वटवणे अशक्य होऊन बसले आहे. तशी कबुली सुशीलकुमार शिंदेनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केली आहे. केवळ विरोधी बाकावर बसून उपयोग नाही तर प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका वटवत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तशी वचक निर्माण करण्यात राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडतो आहे. त्यामुळे भाजपाने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर अनेक संसदीय परंपरा बहुमताच्या जोरावर पायदळी तुडावण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतो आहे. संसदेत बहुतांश विधेयके चर्चेविना गोंधळात संमत केली जाताना हतबल होऊन पाहण्यापलीकडे विरोधी पक्षांच्या हाती काहीही राहीलेले नाही. ही बहुमताची धमक मजबूत सरकार नव्हे तर मजबूर सरकार असावे हेच दाखवून देते.

भारतीय लोकशाही अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना तिची संरचना डळमळून पडते की काय अशी आज देशभर स्थिती आहे. यापूर्वी अशी अवस्था इंदिरा गांधीनी लादलेल्या अघोषित आणीबाणीनंतर झाली होती. आज संपूर्णपणे सत्तेचे केंद्रीकरण चालू झाले आहे. त्यातूनच एक देश एक निवडणुका अशी घोषणा करुन निवडणूक प्रक्रियाच निष्क्रिय करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. अशा अवस्थेत देशभर भाजपा विरोधी एकजूट होऊन केंद्र सरकारला सत्तेवरुन कसे पायउतार करता येईल यासाठी काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसविरहीत तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ममता बॅनर्जींचा महाराष्ट्र दौरा त्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनीही महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद हेच निर्देशीत करते. विरोधी स्वराला दडपण्याचे केंद्र  सरकारचे धोरण त्यातून होणारा संघर्ष यातून राजकारणाची पत घसरत चालली आहे. अशा स्थितीत तृणमुल काँग्रेस, शिवसेना यासारखे प्रादेशिक पक्ष आपल्या क्षमतेने भाजपाला सर्व स्तरावर तोंड देत आहेत. त्यातून होणाऱ्या संघर्षातून संघराज्यीय व्यवस्था धोक्यात येत आहे.

महाराष्ट्रात बहुमत मिळवूनही सत्ता गमवावी लागली याची सल अद्यापही भाजपा नेतृत्वाच्या मनात खदखदते आहे. त्यातूनच महाविकास आघाडी विरुध्द भाजपा आणि राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्रात पहायला मिळतो आहे. केंद्रीय तपास यंत्रणा वापरुन अनिल देशमुख,नवाब मलिक यासारख्या  महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अटक करुन दबावाखाली ठेवत सरकारला एकीकडे बदनाम करायचे आणि दुसरीकडे कामकाजात व्यत्यय आणत हे सरकार कसे निष्क्रिय आहे हे लोकांसमोर आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. हे चित्र संबंध देशभर जिथे विरोधी पक्षाचे सरकार आहे तिथे पहायला मिळत आहे. याउलट महागाई, दमनशाही, कोरोना महामारीत झालेले हाल, टोकाचा दलित अत्याचार, गंगेत कोविड मृतदेहांचे विसर्जन ही अशी दयनिय स्थिती निर्माण होऊनही अजूनही भाजपाला देशात विक्रमी बहुमत मिळत आहे. हे कशाचे द्योतक म्हणावे हा विरोधकांना अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.

संपूर्ण निवडणूक काळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे वर्तन हे निवडणूक प्रक्रियेविषयी संदिग्धंता निर्माण करणारे होते. त्यातूनच काही पक्ष आता निवडणुका बँलेट पेपरवर घ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सदोष आहेत असा आरोप करीत आहेत. त्यात तथ्य असले तरी कुठलेही सत्ताधारी त्यासाठी आजतरी राजी होणार नाहीत. हे  सर्व  आताच एकाएकी  नवीन घडते आहे असे नाही. गेल्या सात दशकांच्या संसदीय वाटचालीत काँग्रेस पक्षाने जे चुकीचे आणि अससंदीय वर्तन करुन विरोधी पक्षांना नमवण्यासाठी आयुधे वापरली तिच आयुधे मोदी सरकार वापरुन आज काँग्रेससह इतर पक्षांना नेस्तनाबुत करीत आहे. इंदिरा गांधींनी सरळसरळ विरोधी सरकारे राष्ट्रपती राजवट लादून सत्तेवरुन पायउतार केली हा इतिहास आहे. इतकेच नाही तर आपल्याला विरोध होईल अशी नेतृत्वाची फळी उभी राहायला नको या काँग्रेसी धोरणामुळे १९८० च्या दशकानंतर देशभरात अनेक प्रादेशीक नेतृत्व आणि पक्ष तयार झाले. त्यांच्याशी हातमिळवणी करुन काही काळ काँग्रेसला सत्ताधारी रहाता आले तरी शेवटी हळूहळू का होईना काँग्रेस त्या त्या राज्यातून हद्दपार झाली. त्यानंतर आलेल्या  मंदीरप्रणित हिंदुत्वाच्या लाटेच्या राजकारणाशी स्वतःला जोडून घेण्यासाठी काँग्रेसला उघड हिंदुत्वाची भूमिका घेता आली नसली तरी काँग्रेसला हिंदुत्व मान्य होते  तरीसुध्दा स्वार्थी मतपेटीच्या राजकारणात दलित आणि मुस्लिम ही हक्कांची मतपेढी गमवायला नको म्हणून या पक्षाने ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे झुल पांघरुन घेऊन  त्याआडून भाजपासारख्या पक्षाला विस्तारायला आणि विकास पावण्यासाठी मोकळी स्पेस उभी करुन दिल्याचा भोग आता काँग्रेस भोगत आहे.

स्वातंत्र्याच्या लढ्यातून पुढे आलेली गांधी नेहरु परंपरा सांगणारी पिढी संपुष्ठात आल्यानंतर त्यापुढच्या राजकीय नेतृत्वाने सत्तेच्या समीकरणात सर्वसामान्यांशी असलेली नाळ तोडली. पुढे पैसे देऊन मत विकत घेण्याच्या संस्कृतीमुळे काँग्रेस म्हणजे केवळ निवडणुकीपुरता पक्ष अशी त्याची ओळख बनली. त्यामुळेच कधीही स्वातंत्र्याच्या लढ्यात नसलेली १९२५ साली स्थापन झालेली संघाची विचारसरणी पुढील काळात मात्र आपणच स्वातंत्र्य लढा लढलेल्या पिढीचे नेतृत्व करतो आहोत असे भासवायला सुरुवात केली. एवढेच कशाला ज्या विचारधारेने गांधीहत्या करणाऱ्या नथुरामांचे प्रतिनिधित्व केले त्या विचारधारेने काँग्रेसपासून गांधी आणि आंबेडकरांना कधी आपलेसे केले हेही कळू दिले नाही. आज तर उघड नथुरामांचे उदात्तीकरण चालू झालेले आहे. त्यातूनच कंगनासारखे इतिहासकार २०१४ साली नवे स्वातंत्र्य मिळाले अशी नवी ऐतीहासिक मांडणी करीत असताना हे सगळे गप्प आहेत. नथुरामांचे उदात्तीकरण करणारी विचारधारा नवदेशप्रेमाचे डोस पाजवून खऱ्या देशभक्तांना देशद्रोही ठरवीत आहे. खरे देशद्रोही कोण हे वेगळे सांगायला नको. अशास्थितीत स्वातंत्र्यलढ्याची देदीप्यमान परपंरा असणाऱ्या काँग्रेस पक्षात फॅसीझमचे नवआव्हान स्वीकारुन ही लढाई आजही जिंकू असा आत्मविश्वास जागवेल असे नेतृत्व या  दिसत नाही. केवळ गोंधळलेले आणि भयभीत झालेले नेतृत्व आपली पक्षांतर्गत सामंतशाही कशी अबाधीत राहील याकरिता धडपडते आहे. याउलट हे नेतृत्व नको काँग्रेस ही लोकचळवळ व्हावी असे नवे नेतृत्व सर्वमान्य निवडणूक प्रक्रियेतून समोर यावे यासाठी काही मंडळी काँग्रेसअंतर्गत संघर्ष करते आहे. ही मंडळी आतून भाजपाचेच काम स्वतःहून करते आहे. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी भाजपाची गरज उरलेली नाही. काँग्रेस ही स्वतःहून रचलेल्या नेतृत्व संरक्षक प्रणालीमुळे लोप पावेल अशी चिन्हे आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काँग्रेसने वाऱ्यावर सोडून दिली होती. राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील एकही नेता या निवडणुकीत फिरकला नाही. सगळी मदार स्थानिक नेतृत्वावर होती तरीसुद्धा बऱ्यापैकी जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यानंतर शरद पवारांच्या करिष्म्यामुळे महाविकास आघाडीच्या रुपाने का होईना काँग्रेसला सत्ताधारी होता आले.त्यानंतर भाजपाच्या गोटातून स्वाभिमानाचा हुंकार देऊन काँग्रेसमध्ये सामील झालेल्या नाना पटोलेंवर पक्षाची जबाबदारी देण्यात आली. नाना पटोले केवळ मुंबईतून माध्यमांच्या प्रकाशझोतामध्ये राहता येईल अशी वक्तवे करण्यापलीकडे काही करतील अशी शक्यता नाही. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासारख्या  राजकीय दमदार नेत्यांना पक्षवाढीसाठी  प्रयत्नशील ठेवणे काँग्रेसनेतृत्वाला जमले नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेस गलीतगात्र होईल अशी शक्यता आहे. पंजाबात अकाली दलाशी दोन हात करुन प्रतिकुल परिस्थितीत काँग्रेसला विजयी करणाऱ्या अमरींदर सिंगांनाच पक्षाबाहेर खेचण्यामुळे आज पंजाबात काँग्रेस संपली आहे. तेथील आपचा विजय हा काँग्रेस केंद्रीय नेतृत्वाने अमरींदर सिंगाना दिलेल्या वागणुकीचा परिणाम आहे. अशीच स्थिती काँग्रेस पक्षाची देशभर आहे. त्यामुळे हा पक्ष दिवसेंदिवस अधिकच गाळात रुततो आहे. 

भाजपाविरोधी शक्तींना आपल्याला संरक्षक ठरेल अशी काँग्रसी व्यवस्था मोडीत निघाल्यास आपली अवस्था गलीतगात्र होईल या भितीने पछाडले आहे. त्यातुनच अधूनमधून तिसऱ्या आघाडीची चर्चा काही काळ रुंजी घालते. ती यशस्वी होईल अशी शक्यता नसली तरी तशी वातावरणनिर्मिती करुन ही मंडळी काँग्रेसच्या अपयशावर पांघरुन घालून आपले मानसिक समाधान करुन घेताना दिसतात. एकूणच काँग्रेस जगली आणि जिंकली पाहिजे असे या वर्गाला प्रकर्षाने वाटते मात्र यासाठी प्रामाणिक प्रयत्न ह्या वर्गाने कधीही केलेले नाहीत. केवळ काँग्रेसी संरक्षण मिळवून ही मंडळी आपले स्वहित साधते. धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाचे ढोंग घेऊन आपले स्वहित जपू पाहणारी ही सभ्यमंडळी काँग्रेस वाचवण्यासाठी का पुढे येत नाही.खरचं काँग्रेस भाजपाविरोधाचा पर्याय राहिली आहे का? काँग्रेसमध्ये ती नैतीकता आणि लढाऊ बाणा आहे का? या सगळ्यां प्रश्नांची चिकित्सा करुन भाजपाविरोधी राजकारणाची फेरमांडणी आता करावी लागणार आहे.

काँग्रेस पक्ष आता मध्ययुगातील मुघल बादशहा बहादुरशहा जफर सारखा झाला आहे. १८५७ च्या उठावानंतर आपसुक आलेले नेतृत्व करण्याची बहादुरशहाची इच्छा नसली तरी त्याला ते नेतृत्व स्वीकारावे लागले. आणि पुढे उठाव मोडीत निघाल्यानंतर त्याची अवस्था इंग्रजांनी रंगूनच्या बंदीवासात कशी केली हा इतिहास आपण जाणतो. तशीच अवस्था आज काँग्रेस नेतृत्वासमोर दिसते आहे. राहुल  गांधीच्या ठायी हे नेतृत्व  पेलण्याची क्षमता नाही.

भारतीय जनतेची नस पकडण्यात आणि संसदीय राजकारणात ते अजून परीपूर्ण मुरलेले नाहीत त्यामुळे आधी अध्यक्ष करुन पुन्हा पायउतार करण्याची वेळ काँग्रेस पक्षांवर आल्याने अध्यक्षनिवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागत आहे.अशास्थितीत भाजपाला शह द्यायचा झाल्यास स्वच्छ राजकारण करु  पाहणाऱ्या आम आमदी पक्षांसारख्या  पक्षांना सोबत घेत प्रादेशीक पक्षांची मोट बांधुन त्याद्वारे एक समान किमान कार्यक्रम  आखून त्याद्वारे विकासाचे नव प्रतिमान विकसीत करीत दिल्लीसारख्या राज्यात धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि समाजवादी धोरणे राबवत शिक्षण, आरोग्य, रोजगार,पायाभूत सुविधा या क्षेत्रात एक नवा आदर्श प्रस्थापीत करुन जी लोकांचे मने जिंकण्यात आप सरकार जसे यशस्वी झाले तसाच कित्ता सर्वच पक्षांना गिरवावा लागणार आहे. भाजपा सत्तेसाठी कितीही कडवट आणि धार्मीक द्वेषाचा अगदी खालच्या स्तरावरचा प्रचार केली तरी त्या द्वेषाला बाजुला सारुन त्याकडे दुर्लक्ष करुन त्याला प्रत्यूतर न देता प्रेमाचा आणि  स्नेहाचा सुगंध हिंदू मुस्लिमांमध्ये रुजेल असेच बहुआयामी राजकारण भाजपाविरोधी पक्षाला करावे लागेल.जी बहुसांस्कृतीकता भारतीय समाजमनाचा आत्मा आहे ती मिटवण्यासाठी भाजपा कितीही  प्रयत्नशील असली तरी ते कदापि शक्य होणार नाही त्यातून बहुआयामी विचार ही भारतीय परंपरा  अधिकच जोपासली जाईल अशी आशा करु या.


- हर्षवर्धन घाटे

नांदेड, 

मो. : ९८२३१४६६४८

(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)



The Kashmir Files सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी यामधून मांडण्यात आली आहे. पण सिनेमाच्या पार्श्वभूमीवर एक विशिष्ट अजेंडा रेटण्याचा प्रयत्न देखील सुरू झाला आहे. काश्मिरी पंडितांचे हत्याकांड झाले तेव्हा केंद्रात कुणाचे सरकार होते, काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जाण्याचा सल्ला कुणी दिला, काश्मिरी पंडितांचे विस्थापन होण्यास खरे जबाबदार कोण आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि वास्तव मांडणारा लेख....

काश्मिरी पंडितांचे विस्थापन! काश्मीरच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक कालखंड!

आधीच गुंतागुंतीचा असलेला काश्मीर प्रश्न ह्या काळ्या अध्यायाने आणखीनच बिकट बनला. जानेवारी 1990 मधील भयानक थंडीने थिजवून टाकणार्‍या त्या दहशतीच्या काळोख्या रात्री कश्मीरी पंडित कुटुंबं खचितच विसरतील. घरं-दारं, व्यवसाय- धंदे सारं सोडून मुला-बाळांसह एका अंधकारमय अनिश्चित भविष्याकडे सारी कुटुंबं लोटली गेली होती.

काश्मिरी पंडितांवरचा हा अन्याय भाजप आणि आरएसएस आजवर एखाद्या राजकीय ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरत आले आहेत. मागील सरकारांच्या तथाकथित कमकुवतपणाकडे बोट दाखवण्यासाठी आणि समस्त भारतातील हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी, जागृत ठेवण्यासाठी हेच ब्रह्मास्त्र वापरलं जातं. आज काश्मिरी जनतेचा आवाज पायदळी तुडवण्याच्या कृतीच्या समर्थानासाठी सुद्धा याच ब्रह्मास्त्राचा वापर केला जात आहे.

म्हणूनच कश्मीरच्या इतिहासातील ही घटना तपासून पहावी लागेल. अशोक कुमार पांडेय यांनी "कश्मीरी पंडीत – बसने और बिखरने के 1500 साल" या पुस्तकामध्ये काश्मीरी पंडितांच्या दुर्दशेचा हा काळ अतिशय चिकित्सकपणे मांडला आहे. अनेक तथ्य त्यांनी निःपक्षपातीपणे समोर ठेवली आहेत.

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा हा काळ जानेवारी 1990 चा होता. 1990 मध्ये, पाकिस्तान-पुरस्कृत अतिरेकी अचानक इतके मजबूत झाले की काश्मीर मधील दहशतवाद आणि हिंसाचाराचे हे सत्र कुणाच्याही आटोक्याबाहेरचे बनले होते. उघडपणे पंडितांना काश्मीर सोडण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. 1947 नंतर काश्मीर काही प्रमाणात अस्वस्थ-अस्थिर जरूर होते, पण मुस्लिम वा हिंदू काश्मीरी जनतेलाच धोका निर्माण व्हावा इतके हे दहशतवादी गट याआधी कधीच प्रबळ नव्हते.

दहशतवादी अचानक इतके प्रभावी होण्याची कारणे काय होती? त्यावेळी केंद्रात कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे? नाही!! अजिबात नाही! पंडितांच्या पलायनाची ही भीषण शोकांतिका घडत असताना केंद्रात व्ही. पी. सिंग पंतप्रधान पदी विराजमान झाले होते आणि तेही भाजपच्या पाठिंब्यामुळे. केंद्र सरकारवर त्यावेळी भाजपचे संपूर्ण नियंत्रण होते. त्यामुळे देशात अतिरेक्यांना अशी खुली सूट देण्याचे श्रेय भाजप आणि त्यांच्या मित्रांनाच जाते. अनुभवशून्य व्ही.पी. सिंग सरकार काश्मीरबाबत स्वतंत्रपणे कोणताही पुढाकार घेण्याच्या स्थितीत नव्हते. काश्मीरचे मुफ्ती मोहम्मद सईद यांना देशाचे गृहमंत्री म्हणून नेमण्यात आले.

8 डिसेंबर रोजी, मुफ्तींनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी, त्यांची मुलगी डॉ. रुबिया सईद हिचे काश्मीरमधून अपहरण करण्यात आले. रुबियाच्या सुटकेऐवजी आधी 3 आणि नंतर 5 दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला कोणत्याही परिस्थितीत ह्या सुटकेस अनुकूल नव्हते. मात्र त्यांच्यावर दबाव आणून केंद्र सरकारने हमीद शेख, शेर खान, नूर मोहम्मद, मोहम्मद अल्ताफ आणि जावेद अहमद या 5 दहशतवाद्यांची सुटका केली. सरकार दबाव आणून नमवता येते हे या घटनेने सिद्ध केले. यातून दहशतवाद्यांचे मनोबल वाढणे स्वाभाविक होते. यानंतर अपहरण आणि त्याबदल्यात सुटकेच्या असंख्या घटना घडल्या. आणि हे सर्व भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले केंद्र सरकारच करीत होते.

‘काश्मीर: द बाजपेयी इयर्स’, या पुस्तकात आय. बी आणि रॉ ह्या संस्थांचे माजी प्रमुख ए.एस. दुलत लिहितात, "1990 च्या हिवाळ्यात श्रीनगर हे एका भयंकर झपाटलेल्या शहरासारखे होते. युद्धाच्या तांडवाची ही सुरुवात होती. रुबिया सईदच्या अपहरणाने बंडाचे सारे बांध उघडले. हत्या जणू रोजचीच गोष्ट झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील सर्वात सुरक्षित भागातही बॉम्बस्फोट आणि गोळीबार होऊ लागले. कॅन्टोन्मेंट परिसराजवळ ट्रकमध्ये बंदुका फिरवणारे तरुण दिसू लागले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात दहशतवाद्यांकडून लष्करी परेड काढण्यात येऊ लागली होती." (पान 60)

'काश्मीरवर लक्ष केंद्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणणे' हे केंद्र सरकारचे यावेळचे राजकीय प्राधान्य असायला हवे होते. पण आरएसएस आणि भाजप दुसऱ्याच खेळीत गुंतले होते. होय, अडवाणींच्या नेतृत्वाखाली देशभर रथयात्रा काढून हिंदूंना भडकवण्यात आर.एस.एस. भाजप मग्न होते. भाजपला देशहिताची काळजी असती तर या यात्रेऐवजी पंडितांच्या रक्षणाचा प्रयत्न केला असता. पण काश्मीरमध्ये दहशतवाद जितका वाढेल, तितका देशभर मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवण्यास सोपं जाईल, हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे आरएसएस विचारांच्या जगमोहनना राज्यपाल पदी नियुक्त करण्यासाठी मुफ्तींवर दबाव आणला गेला.

पुढे काश्मीर मधील निवडून आलेले सरकार हटवले गेले आणि राष्ट्रपती राजवट आणली गेली. आता आर एस एस च्या जगमोहन कडे काश्मिरची सारी सूत्रं होती. या गेम प्लॅनची पुढची पायरी होती परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनवणे. जगमोहन यांनी येताच अशी विधाने सुरू केली, ज्यामुळे काश्मीरमधील सामान्य जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा गेला.

जगमोहन त्यांच्या एका भाषणात म्हणाले, "काश्मीरमधील प्रत्येक मुस्लिम दहशतवादी आहे... जोपर्यंत सर्व दहशतवादी मारले जात नाहीत, तोपर्यंत येथे शांतता प्रस्थापित होणार नाही." (संदर्भ: Kashmir in Conflict: India, Pakistan and the Unending War – Victoria Scofield , IB Tauris & Company London, 2003)

त्यामुळे लोकांवर थेट गोळीबार आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूची एक मालिकाच सुरू झाली. काश्मिरी लोकांच्या संताप आणि असंतोषात अचानक वाढ झाली आणि अधिकाधिक लोक भारत-विरोधी मिरवणुकींमध्ये सामील होऊ लागले.

1990 मध्ये काश्मीरला गेलेले न्यायमूर्ती तारकुंडे, न्यायमूर्ती सच्चर आणि तज्ज्ञांच्या चमूने लिहिले आहे की, "जानेवारी 1990 मध्ये जगमोहनच्या आगमनानंतर, भयंकर दडपशाहीच्या कारवायांमुळे खोऱ्यातील संपूर्ण मुस्लिम लोकसंख्या भारतापासून दूर झाली आणि त्यांचे तुटले-पण आता कडवट रागात बदलले." (संदर्भ: Kashmir in Conflict: India, Pakistan and the Unending War – Victoria Scofield , IB Tauris & Company London, 2003)

जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव असलेले अशोक जेटली म्हणतात: 'जगमोहनने पाच महिन्यांत ते केले, जे दहशतवादी पाच वर्षांत करू शकले नाहीत' (संदर्भ: एडवर्ड डेसमंडचा लेख द इंसर्जेंसी इन काश्मीर (1989-91), कंटेपररी साउथ एशिया (1995))

वास्तविक काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या त्या काळात सातत्याने घडत होत्या. अशा परिस्थितीत एकीकडे दहशतवाद- विरोधी नागरिक आणि दहशतवादाचे बळी पडलेल्या काश्मिरींना सोबत घेऊन प्रशासन बळकट करणे गरजेचे होते. दुसरीकडे बळाचा योग्य वापर करून दहशतवाद्यांचा मुकाबला करायला हवा होता. परंतू याऐवजी राजकीय हत्यांना, जातीय रूप देऊन समोर आणण्याचे काम जगमोहन प्रशासनाने केले. या गेम प्लॅनची पुढची पायरी होती, काश्मिरी पंडितांना खोर्‍यातून हाकलून लावणे.

काश्मीरचे अभ्यासक आणि नेते बलराज पुरी सांगतात की त्या काळात लोकांच्या नेतृत्वाखाली हिंदू-मुस्लिम संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचा उद्देश काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवणे हा होता. यामध्ये काश्मीरचे माजी सरन्यायाधीश मुफ्ती बहाउद्दीन फारुकी, एच.एन. जट्टू आणि गुलाम नबी हाग्रू हे होते. अनेक मुस्लिम नेते, राजकीय नेते आणि काही कट्टरवादी संघटनांनीसुद्धा काश्मिरी पंडितांना स्थलांतर न करण्याचे आवाहन केले होते. पण जगमोहन यांनी संयुक्त समितीच्या अशा प्रयत्नांना काडीचेही महत्त्व दिले नाही. उलट हिंदू राष्ट्र उभारणीची कथा पंडितांना सांगून त्यांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले. (संदर्भ: पृष्ठ 70-71, संदर्भ: पेज 70-71, कश्मीर : इंसरजेंसी अ‍ॅन्ड आफ़्टर, बलराज पुरी, ओरियेंट लॉन्गमन, दिल्ली, 2008)

काश्मिरी पंडितांचे नेते संजय टिक्कू सांगतात की त्या वेळी काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने जगमोहन यांची भेट घेतली आणि सुरक्षेसाठी अक्षरशः विनवण्या केल्या. परंतु जगमोहन यांनी सुरक्षा देण्याऐवजी ताबडतोब जम्मूला निघून जाण्याचा आग्रह केला. (संदर्भ: Greater Kashmir News – Kashmiri Pandits an incendiary venomous narrative)

तवलीन सिंग म्हणतात की "हे खरे आहे की जगमोहन काश्मीरमध्ये आल्याच्या काही दिवसांतच काश्मिरी पंडितांनी गटा-गटांमध्ये खोरं सोडलं आणि या स्थलांतरासाठी प्रशासनाने संसाधने देखील पुरविल्याचा पुरेसा पुरावा आहे" (संदर्भ: Greater Kashmir News – Kashmiri Pandits an incendiary venomous narrative)

18 सप्टेंबर 1990 रोजी 'अफसाना' या स्थानिक उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या पत्रात काश्मिरी पंडित के. एल. कौल यांनी लिहिले की, 'पंडितांना सांगण्यात आले की सरकारला काश्मीरमधील एक लाख मुस्लिमांना मारायचे आहे जेणेकरून दहशतवाद पूर्णतः संपुष्टात येईल. जम्मूमध्ये गेल्यावर पंडितांना मोफत रेशन, घरे, नोकऱ्या इत्यादी देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. हत्याकांड संपल्यानंतर त्यांना परत आणले जाईल असे त्यांना सांगण्यात आले.' (संदर्भ: Greater Kashmir News – Kashmiri pandits an incendiary venomous narrative)

या साऱ्या घटना एक भयानक कट आणि अतिशय गलिच्छ राजकारण समोर आणतात. आरएसएसने आपले स्वयंसेवक जगमोहन यांना काश्मिरी पंडितांच्या संरक्षणासाठी नव्हे तर काश्मीरमधून पंडितांना हाकलण्यासाठी पाठवले होते असेच यातून समोर येत नाही का? पंडित मुक्त काश्मीर करण्याच्या या सेवेबद्दल आरएसएस आणि भाजपने जगमोहन यांना अर्थात इनामही दिलेले दिसते. पुढे वाजपेयी सरकारमध्ये त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले. हेही लक्षात ठेवायला हवे की काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल सतत ओरड करणाऱ्या आरएसएस आणि भाजपने वाजपेयीजींच्या ५ वर्षात आणि मोदीजींच्या ७ वर्षात काश्मीरमधील एकाही पंडित कुटुंबाला काश्मीरमध्ये पुनर्स्थापित केलेलं नाही. अर्थात ते करतीलही का म्हणून? आरएसएस / भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाच्या अजेंड्यासाठी पंडितांनी सतत वनवासात राहणेच अनिवार्य नाही का

(लेखकाच्या फेसबुक वॉलवरून)

- आशुतोष शिर्के


प्रत्येकाचे आयुष्य वळण वाटा ने भरलेले असते. माणसाच्या आयुष्यात नेहमी सुख किंवा नेहमी दुखत असते असे नाही, मात्र बऱ्याचदा अनेकांना आपल्या वाट्याला आलेली दुःखे कवटाळण्याची सवय असते,त्यातच त्यांना आनंद मिळतो की काय असे वाटते,खरं तर ते आपल्या आयुष्याला  दुःखाच्या खाईत लोटत असतात. त्यातूनच ते नेहमी 'ना' चा पाढा गात असतात, त्यांची प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भूमिका असते."मी जन्मता दुर्देवी आहे." "माझे नशीबच फुटके आहे". "मी कमनशिबी आहे" किंवा "मला कशातच यश मिळत नाही," अशा प्रकारची त्यांची वाक्ये सतत त्यांच्या तोंडून बाहेर पडत असतात. नशिबाला दोष देण्यात ते धन्यता मानत असतात. माझा एक मित्र सतत कष्ट करीत आला आहे. त्याचा कुरियर सर्व्हीस चा व्यवसाय आहे.तो दिवस रात्र राबत असतो पण त्यामध्ये त्याला जेमतेमच कमाई होते. तो एकदा माझ्या कार्यालयात आला आणि आपली दुर्दैवी कहाणी सांगत बसला. नशिबावर त्याचा विश्वास होता. त्याने सांगितले मी सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करीत असतो. अक्षरश: पाठीचा कणा मोडीस्तोवर राबराब राबत असतो, तरीही मला अपेक्षित असणारे यश गेल्या चाळीस - पन्नास वर्षात मिळाले नाही. काम करण्याच्या मागे सतत कामच लागते, मात्र एवढे काबाडकष्ट करूनही माझ्या आयुष्यात काहीही चांगला बदल झालेला नाही. माझ्या नशिबात छप्पर फाडके यश नाही ,रोज राबणे हेच माझ्या नशिबात आहे.

खरंतर माणसाला आपल्या व्यवसायाचा अंदाज येत असतो अनेकदा पराकोटीचा प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, तर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा त्या व्यवसायात कल्पकतेने बदल केला पाहिजे. राबराब राबून यश मिळत नसेल तर व्यवसाय सुद्धा बदलला पाहिजे,कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ऑटोमोबाईल स्पेअर्स पार्ट व्यवसाय वीस वर्ष उत्तमपणे चालत असताना ही सन २००२ साली मला व्यवसायातील मंदीची कल्पना अगोदरच आली होती. मी सदरचा व्यवसायातून हळूहळू निवृत्ती घेतली, आणि दुसरा व्यवसाय सुरू केला,त्या व्यवसायात मी अत्यंत परीश्रमाने तसेच कौशल्याने गती दिली,त्यातूनच मला बऱ्यापैकी यश मिळू लागले. त्यानंतर मी निष्ठापूर्वक त्या व्यवसायात कष्ट घेतले,

थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य म्हणजे प्रत्येकाने आपल्या अधिकृत व्यवसायाचा अंदाज घेऊन वेळीच बदल केला पाहिजे,वारे कोणत्या दिशेने वाहत आहे,हे पाहीले पाहिजे. अन्यथा यश माझ्या नशिबातच नाही असे म्हणून नकारात्मक भावनेला खतपाणी घालून सतत अपयशाचे धनी व्हावे लागते.

 वास्तविक कोणी जन्मताच दुर्देवी किंवा अपशकुनी असत नाही, तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला मी लकी होणारच,असा सकारात्मक संदेश दिला पाहिजे, तर तुम्ही निश्चितच लकी व्‍हाल...! तुमच्या अंतर्मनाला सतत दुखी भावना किंवा अपयशी विचार पेरले की प्रत्यक्षात तुम्ही अयशस्वी होता किंवा अपयशाचे धनी होता असा सर्वांचाच अनुभव आहे. सुखी व समृद्ध होणे हे ९०% सुखी व निरोगी भावनांवर व विचारांवर अवलंबून आहे.

अनेकदा परीक्षेच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीत मनाला सकारात्मक विचारांचा संदेश देणे अत्यंत महत्त्वाचे असते. सकारात्मक विचारातूनच प्रगतीला स्फूर्ती व प्रेरणा मिळत असते. मागे एका कुस्तीच्या मैदानात दोन पैलवानांपैकी एक बलदंड वजनदार पैलवान होता, तर दुसरा पैलवान त्याच्या तुलनेने फारच कमी वजनदार होता. या पहिल्या बलदंड पैलवाना समोर त्या दुसऱ्या पैलवानाचा निभाव लागणे अत्यंत कठीण वाटत होते. मात्र जेव्हा दोन्ही पैलवान मैदानात एकमेकाला भिडले,तेव्हा दुसऱ्या पैलवानाकडे असणारी चपळता आणि कुस्तीच्या डावातील कौशल्य या जोरावर बलदंड वजनदार पैलवानाला त्यांने जेरीस आणले आणि काही मिनिटांतच त्या बलदंड पैलवानांला त्यांने अस्मान दाखवले. पुढे त्या विजयी पैलवानाची मी मुलाखत घेतली त्यावेळी त्याने संपूर्ण यशाचे श्रेय त्याच्या सकारात्मक विचारांना दिले, तो म्हणाला की माझी या पैलवानासोबत ज्या दिवशी सलामी झाली. त्या दिवसापासून मी विजय होणारच आहे, अशा सूचना मी माझ्या अंतर्मनाला देत होतो, शिवाय  मी माझ्या अंगात जास्तीतजास्त चपळता आणण्यासाठी दररोज दहा बारा मैल पळण्याचा व्यायाम करीत होतो. शिवाय पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत मैदानातील लाल मातीत मेहनत करून स्टॅमिना वाढविण्याचा प्रयत्न करीत होतो. आपण ही कुस्ती जिंकणारच आहे असा भाव सातत्याने कायम ठेवण्यात मी यशस्वी झालो होतो, त्यामुळेच मी शेवटी त्या बलदंड व वजनदार प्रतिस्पर्ध्यास पराभूत केले आणि मी विजयी झालो.

तात्पर्य प्रत्येकाने आपल्या नशिबाला दोष न देता सकारात्मक विचाराने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते. यासाठी मात्र सकारात्मक विचारधारा महत्त्वाची आहे, अन्यथा सतत नकारात्मक विचारांचा पाढा वाचत बसल्यास अपयशाचे धनी व्हाल. तुम्ही स्वतःला "लकी" म्हणत चला म्हणजे "लक" आपल्या पाठीशी लागेल,व आपण नक्कीच लकी व्हाल.

-सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी वृत्तपत्राचे संपादक आहेत)



उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुका भाजपच जिंकणार होते हे सर्वांना माहीत होते, तर दुसरीकडे सर्वांचीच ही इच्छा होती की भाजपने त्या जिंकू नयेत. पण इच्छा आणि वास्तव वेगवेगळे असतात. वास्तवांचे इच्छांशी काही देणे घेणे नसते, तर इच्छांवर कोणाचे नियंत्रण नसते. भाजपला या निवडणुका जिंकायच्याच होत्या. येनकेन प्रकारे त्या त्याने जिंकल्या, पण त्याची कारणे, त्याचे विश्लेषण अनेकजण निवडणूक तज्ज्ञ, पत्रकार आणि सामान्यातला सामान्य माणूस करण्यात व्यस्त आहे.

ज्या देशाच्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला दोन वेळच्या जेवणाची तजवीज करण्यात अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागते, त्या लोकांना जर मोफत अन्नधान्य दिले गेले तर त्यांच्या निम्म्या समस्या आपोआप सुटतात. दुसरी निकडीची गरज त्यांना राहण्यास चार-सहा पत्रांचा का असेना निवारा मिळत असेल आणि त्याचबरोबर शौच्यालयाची व्यवस्था देखील मिळाली तर आणखीन काय हवंय. याऐवजी जर देशाची संपत्ती अडाणी-अंबानी की इतर कोणते उद्योगपती असोत, त्यांना मिळाली तर त्याचा कोणता परिणाम या लोकांवर होणार आहे? पाच किलो अन्नधान्य आणि इतर काही साहित्याच्या बदल्यात ते खुशाल देशाच्या संपत्ती विक्रीकडे का लक्ष देतील? ती जर मोठ्या उद्योगपतींना मिळाली नाही आणि सामान्य जनतेच्या हितासाठी ठेवली गेली तर त्याचा लाभ कुणाला होईल? ज्याच्याकडे संपत्ती असते तेच लोक देशाच्या संपत्तीचा लाभ घेऊ शकतात. अशात जी काही संपदा देशाच्या मालकीची आहे तिचा सातबारा या उद्योगपतींच्या नावे केला गेला तर त्या अन्नधान्यावर जगणाऱ्यांना काय फरक पडणार? भाजपने एक गुलामवर्ग मोफत शौच्यालय आणि मोफत अन्नधान्यावर जगणारा निर्माण केलेला आहे. हा गुलामवर्ग जोपर्यंत भाजपला मते देत राहील तोपर्यंत भाजपची सत्ता अबाधित राहणार आहे. इतर पक्षांना अशी संधी मोफत अन्नधान्य वाटप करण्याची मिळणार नाही. त्यासाठी सत्ता हवी आणि सत्तेसाठी मते हवीत. गुलाम मतदारांच्या मतांवर भाजप काबिज आहे.

भाजपने असा एक गुलामवर्ग सत्ताप्राप्तीसाठी निर्माण केला आहे. त्याच्या जोडीला धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी नवीन मतदार पिढीचा दुसरा वर्ग. या दोन्हींच्या बळावर तो अबाधित सत्ता संपादन करत राहणार.

किती बेरोजगार, किती गरीब, किती लाचार, किती अशिक्षित, कोणती लोकशाही, कोणते संविधान, कसलं गणतंत्र हे सारे प्रश्न काही थोडेफार शिकल्या सवरल्या मध्यामवर्गाचे. यांच्याशी मोफत अन्नधान्यप्राप्त गुलामांचा काडीमात्र संबंध नाही. चर्चासत्रे, विश्लेषण, अध्ययन ज्यांना आवडतील त्यांनी खुशाल करत राहावे. भाजपला याचा काहीही धोका नाही. श्रीमंत, सत्ताधारी आणि धर्म सत्तेवर काबिज असलेल्यांच्या सेवेसाठी गुलामांचा वर्ग निर्माण झाला. देशाचे स्वातंत्र्य जपायचे की नाही याची या गुलामांना काळजी कशाची? त्यांच्या पोटापाण्याची तजवीज झाली हेच पुरे. संघाला अभिप्रेत हेच हिंदू राष्ट्र!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



युक्रेन युद्धाला तीन आठवडे उलटत आहेत. तरी तिथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या संपूर्ण भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात आपल्या सरकारला यश मिळालेले नाही! आजही हजारो विद्यार्थी कोणाच्याही मदतीशिवाय परत आपल्या घरी येण्यासाठी धडपड करत आहेत. कडाक्याची थंडी अन् त्यात पाऊस देखील. रहायला निवारा नाही, खाण्या-पिण्याच्या वस्तू नाहीत, अशातच क्षणोक्षणी रशियाकडून होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यापासून मृत्यूच्या भीतीपोटी जीव मुठीत धरून दिवस काढणे सुरू आहे. युद्धास सुरुवात झाली त्यावेळी आपले प्रधानमंत्री उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत व्यस्त होते. साहजिकच त्यांना या गंभीर समस्यांचा अंदाज आला नसावा. पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा भारत सरकारने गंगा मोहीम हाती घेतली. पण वेळ हाताबाहेर गेला होता. इराकी, इराणी विद्यार्थ्यांना त्या देशांनी केव्हाच परत आणलेले होते. 

कर्नाटकातील एका भाजप नेत्याने सभेत प्रश्न विचारला, मुळात हे विद्यार्थी युक्रेनला जातात कशाला? असो ते सरकार दरबारी लोक त्यांच्या एवढी लायकी तर कोणात? हे विद्यार्थी युक्रेन किंवा आणखीन दुसऱ्या देशात का जातात? त्याचे कारण गेल्यावर्षी 16 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. मेडिकलच्या एकूण जागा देशभरात 88 हजार आहेत. त्यातले निम्मे शासनाच्या ताब्यात. युक्रेनमध्ये नीटची केवळ परीक्षा पास होणे एवढीच अट आहे. ज्या विद्यार्थ्यांचे युक्रेन युद्धात प्राण गेले त्याने 97 टक्के गुण घेतले होते. तरीदेखील त्याला इथे दाखला मिळाला नाही, असे त्याच्या  वडिलांनी वृत्तवाहिन्यांवर सांगितले. त्याच बरोबर युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च भारतापेक्षा निम्मा आहे. आपल्याकडे खाजगी जागा मिळविण्यासाठी अगोदर डोनेशन द्यावे लागते, दरवर्षी साठ लाख रुपये शिक्षणाचा खर्च, होस्टेल, जेवण, पुस्तके आणि इतर खर्च वेगळाच. भारतीय विद्यार्थी सांगतात की, युक्रेनमध्ये मायदेशी खर्चापेक्षा निम्म्या खर्ची शिक्षण पूर्ण घेता येते. तेथून पदवी मिळाल्यावर भारतासारखे नोकरीसाठी सैरावैरा भटकत फिरावे लागत नाही. इतर युरोपीय देशात त्यांना नोकरी मिळविता येते. कारण युक्रेनमधील शिक्षणाचा दर्जा देखील उत्तम आहे. भारतात बेरोजगार जास्त आणि रोजगार कमी आहेत. संघाचे लोक असे विधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणू शकतील.

कोरोना काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी नागरिकांनी कसला व्यवहार केला होता हेही सर्वांना माहित असेलच. शासनाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर ज्या भाड्याच्या घरात डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी राहत होते तिथल्या घर मालकांनी त्यांना घराबाहेर काढले होते. त्यांना वेळेवर पगार मिळाला नसल्याच्या तक्रारी ही केल्या जात होत्या देशाची राजधानी दिल्ली येथे अशा डॉक्टर मंडळींना वेतनासाठी आंदोलन करावे लागले होते. देशातील अनेक वैद्यकीय संस्था राज्यकर्ते चालवितात. त्यांच्याकडे निवडणुका लढविण्यासाठी कोट्यावधी रुपये असतात पण विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सवलती, स्वस्तात शिक्षण देण्यासाठी पैसे नसतात ! निवडणूक प्रधान देशात निवडणुकी शिवाय इतर कोणतीही सेवा राज्यकर्त्यांच्या विचारात बसत नाहीत. गेल्या आठ वर्षापासून शौचालये बांधण्याची मोहीम राबविली जाते. ज्याद्वारे लोकांची मते मिळविता येतील पण नव्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या नाहीत. दरवर्षी भारतीय विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी खर्च करत आहेत तेवढ्या खर्चात एम्स आणि आयआयएम सारख्या संस्थांची स्थापना होऊ शकते. पण यासाठी जी दूरदृष्टी आणि संकल्पाची गरज आहे ती संघाच्या नेत्यांकडे नाही कारण त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले तर बस इतरांनी 

शिक्षण घ्यायचेच कशाला?

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना परत आणावयास शासन निकामी ठरल्याचा आरोप होत आहे. भारतीय एम्बेसी चे कर्मचारी त्यांना वेळेवर मदत करू शकले नाहीत असा आरोप होत आहे. युक्रेन मधून आणणे शक्य नसेल पण थंडी पावसात शेकडो किमीचा प्रवास करून रोमानिया इत्यादी शेजारील देशात कसे पोहोचू शकतील ते हा पायी विद्यार्थ्यांनी एवढा लांब प्रवास कसे करू शकतील. सभ्य संस्कृतीचा अहंकार माजवणाऱ्या युक्रेनमधील काही पोलीस, सैन्य कर्मचाऱ्यांनी भारतीय मूळच्या मुलींशी गैरवर्तन केल्याच्याही बातम्या आल्या आहेत.

तिथून जे व्हिडिओज भारतात आले त्यात असे दिसते की पोलीस भारतीय विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारत आहेत.

सीमेवरील तैनात पोलीस त्यांना काठ्यांनी मारताहेत. रशियन सैन्याने विद्यार्थ्यांना घेऊन त्यातील मुलींना कुठेतरी इतरत्र घेऊन गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी जिथे आश्रय घेतला होता तिथे अनोळखे युक्रेन नागरिक जाण्याचा प्रयत्न आहेत. 

युरोपीय राष्ट्रांनी आपल्या चेहऱ्यावरील सभ्यतेच्या मुखवटा परिधान केला असला तरी त्यांचा अंतरात्मा किती भयानक आहे हे वास्तव समोर येते. अफगाणिस्तानात तालिबान परत आल्यावर दीड-दोन लाख लोकांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याच अफगान अधिकाऱ्यांनी त्यांची सोय करून दिली होती त्यांना सुरक्षा प्रदान केली होती. या काळात भारताचेही नागरिक तिथे होते. अशा बातम्या कुठेच आल्या नाहीत ज्यामध्ये अफगाणींनी कुणावर अन्याय अत्याचार केलेला असेल. एकाही महिलेशी गैरवर्तन केले गेले नव्हते. बरे झाले, जग त्यांना असभ्य म्हणत आहे सभ्य असते तर त्यांनीदेखील युरोपियन राष्ट्रांसारखे वागले असते. पाश्चात्य माध्यमांनी एकही घटना प्रसारित केली नव्हती ज्याद्वारे परकीय नागरिकांशी अफगाणी नि गैरव्यवहार केला असावा. जेव्हा रशियाने युक्रेन वर हल्ला केला तेव्हा कोणीही युक्रेनियन च्या राष्ट्रप्रेमावर काहीही बोलले नाही पण जेव्हा याच नाटो आणि अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तिथले नागरिक आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी मैदानात आले तेव्हा त्यांना आतंकवादी म्हणून घोषित केले गेले हा दांभिकपणा पाश्चात्य राष्ट्रवाद आणि तिथल्या संस्कृतीचा.

युक्रेनसाठी ईस्राईली अश्रू ढाळत आहेत. गेल्या शंभर वर्षापासून तो आणि त्याचे दत्तक पाश्चात्त्य राष्ट्र पॅलेस्टाईन नागरिकांना आतंकवादी घोषित करून त्यांचा अतोनात छळ करीत आहेत. बरे झाले युक्रेनमुळे पाश्चात्त्यांचे चालचरित्र जगासमोर आले. भारतीय माध्यमे याच पाश्चात्यांचे गुलाम! त्यांची बाजू मांडणं एवढेच यांचे कर्तव्य. फलस्तीनच्या बाबतीत वेगळी गोष्ट अशी ते मुस्लिम म्हणून त्यांचा विरोध हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार. पण युक्रेन प्रकरणात दोन्हीकडे मुस्लिम नाहीत म्हणून त्यांच्यासमोर संकट आहे. कधी युक्रेनची बाजू घेतात तर कधी रशियाच्या बाजूने जातात. आपले जुने मित्र रशियाची साथ द्यावी की अमेरिकेची मर्जी राखावी हेच त्यांना कळेनासे झाले आहे.


- डॉ. सलीम खान



भौतिक शिक्षणाचा पाया नैतिक शिक्षणावर ठेवला गेला तरच तो समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये योग्य भूमीका अदा करू शकतो. अन्यथा अशा शिक्षणातून केवळ स्वार्थ साध्य करणारी व आपल्या स्वार्थासाठी समाजाची पिळवणूक करणारी उच्चशिक्षित पिलावळ जन्म घेतील. शिक्षणामुळे कौशल्य प्राप्त होते तर कौशल्यातून अर्थप्राप्ती होते. शिक्षणामुळे माणसामध्ये धैर्य आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण होते.


सबक पढ सदाकत का, अदालत का, शुजाअत का

लिया जाएगा तुझसे काम कौमों की इमामत का

पूर्वी दर 100 वर्षाला शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलत असे. पण अलिकडे काही दशकांपासून शिक्षणाच्या स्वरूपात वेगाने बदल होत आहेत. आता शिक्षणाचे स्वरूप आठ-दहा वर्षातच पूर्णपणे बदलत आहे. विशेष करून तांत्रिक शिक्षणाचे स्वरूप इतक्या वेगाने बदलत आहे की, त्या शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाबरोबर जे जुळवून घेवू शकणार नाहीत ते नक्कीच मागे पडतील. हा धोका टाळावयाचा असेल तर 22 व्या शतकातील शिक्षणाचे स्वरूप कसे बदलणार आहे याचा पूर्व अंदाज सातत्याने लावता आला पाहिजे. या ठिकााणी एक उदाहरण ‘पेजर’चे देता येईल. पेजर इतक्या वेगाने अदृश्य झाले की ते कधी मार्केटमध्ये आले होते याचा अनेकांना विश्वासच बसणार नाही. 

मोबाईल फोनच्या पहिल्या जनरेशनपासून पाचव्या जनरेशनपासूनचा प्रवास किती वेगाने झाला हा इतिहास आपल्या समोरचा आहे. मोबाईलच्या बदलत्या स्वरूपाशी सांगड न घालता आल्यामुळे नोकिया आणि इरिक्सनसारख्या कंपन्या मार्केटमध्ये टिकाव धरू शकल्या नाहीत. हे ही, आपल्या डोळ्यासमोरच घडलेल्या आहेत. उपभोक्तावादी संस्कृती जगाने स्वीकारलेली असल्यामुळे त्यातून अनेक वाईट गोष्टी जन्माला आलेल्या आहेत व येणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या वाईट गोष्टींपासून स्वतःला वाचवत त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा आपल्या विकासासाठी जो समाज उपयोग करण्यात यशस्वी होईल तोच भविष्यात टिकेल, अन्यथा त्याचा नाश अटळ आहे. 

इस्लामची सुरूवातच मुळात शिका या शब्दाने झालेली आहे. कुरआनमध्ये जी पहिली आयत अवतरित झाली तिचा पहिला शब्दच इकरा अर्थात शिका असा आहे. ती आयत खालीलप्रमाणे - वाचा,(हे पैगंबर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली. वाचा, आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे, ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता.  (सुरे अल अलक: आयत नं. 1 ते 5)

वर नमूद आयातीमध्ये शिक्षण घेण्याचे जे आदेश दिलेले आहेत ते जागतिक आहेत. प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यामध्ये दिलेल्या आदेशाचे पालन केल्याशिवाय जागतिक स्पर्धेमध्ये टिकता येणार नाही हे स्पष्ट आहे. या आयात संबंधी कुठलाही संशय असण्याचे कारण नाही की ही आयत फक्त इस्लामचे शिक्षण घेण्याचाच आदेश देते की, भौतिक शिक्षणाची सुद्धा परवानगी देते. प्रेषित सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, शिक्षण प्राप्त करा, त्यासाठी तुम्हाला मग भले ही चीनला जावे लागो. यावरून हे सिद्ध होते की, इस्लाममध्ये धार्मिक शिक्षण आणि भौतिक शिक्षण दोन्ही  घेण्याबद्दल निर्देश दिलेले आहेत कारण ज्यावेळेस प्रेषित सल्ल. यांनी चीनला जाण्याचे उदाहरण दिले त्यावेळेस चीनमध्ये इस्लामी शिक्षणाचा गंधही नव्हता. हजरत अनस रजि. यांनी म्हटले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फर्माविले, ’’प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य आहे.’’ (इब्ने माजा) 

हे शिक्षणामधील नैपुण्य आणि नितीमत्ताच आहे की, युक्रेनसारख्या साडेचार कोटी लोकसंख्या असलेल्या देशाने आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणाचे असे उपयोगी जाळे विणले की, भारतासारख्या खंडप्राय देशातून हजारोंच्या संख्येतून विद्यार्थी लाखो कोटी खर्च करून त्या देशात शिक्षण घेण्यासाठी जातात. कल्पना करा एका विद्यार्थ्याने पाच वर्षात 30 लाख रूपये खर्च केला तर त्या देशाला शिक्षणाच्या माध्यमातून किती आर्थिक फायदा झाला. कारण जगभरातून लाखो विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षणासाठी येतात. आपल्या देशात जरी वैद्यकीय शिक्षण उपलब्ध असले तरी खाजगी शिक्षासंस्था चालकांनी ते लालसेपोटी इतके महाग करून टाकलेले आहे की ते सामान्यांच्या हाताबाहेर गेलेले आहे. म्हणून भौतिक शिक्षणाचा पाया नैतिक शिक्षणावर ठेवला गेला तरच तो समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये योग्य भूमीका अदा करू शकतो. नसता अशा शिक्षणातून केवळ स्वार्थ साध्य करणारी व आपल्या स्वार्थासाठी समाजाची पिळवणूक करणारी उच्चशिक्षित पिलावळ जन्म घेते. शिक्षणामुळे कौशल्य प्राप्त होते तर कौशल्यातून अर्थप्राप्ती होते. शिक्षणामुळे माणसामध्ये धैर्य आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. 

आयीना झूठ बोलने नहीं देता

इल्म डरने नहीं देता

इस्लाम जाहिलों का मजहब नहीं अर्थात इस्लाम अज्ञानी लोकांचा धर्म नाही. इस्लाम आणि अज्ञान एका ठिकाणी जमाच होऊ शकत नाही. इस्लाम हा शब्द अज्ञानाचा विरूद्धवाचक शब्द आहे. असे म्हटल्यास ते चुकीचे होणार नाही. कुरआनमध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करतांना दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ‘‘ हे प्रेषित (सल्ल.) यांना विचारा, जाणणारे आणि न जाणणारे दोघे कधी एकसमान होऊ शकतात काय? उपदेश तर बुद्धी असलेलेच ग्रहण करीत असतात.’’  (सुरे अलजुमर : आ.क्र.9)

या आयातीमध्ये दिलेल्या निर्देशात एक मुलभूत प्रश्न विचारलेला आहे की, ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात फरक असतो की नाही? स्पष्ट आहे फरक असतो. डॉ्नटर-डॉ्नटर असतो पेशंट-पेशंट असतो. दोघांच्यामध्ये वैद्यकीय ज्ञानाचाच फरक असतो. डॉ्नटरला ते ज्ञान असते रूग्णाला ते नसते. हेच उदाहरण प्रत्येक क्षेत्रात लागू होते. म्हणून कुठल्याही समाज गटाला प्रगती करावयाची असल्यास प्रचलित काळातील ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये त्या गटातील लोकांना ज्ञान मिळविता आले पाहिजे. जे लोक काळानुरूप आपले ज्ञान अपडेट करत राहतील ते स्पर्धेत टिकतील आणि जे करणार नाहीत ते मागे पडतील. ही बाब नैसर्गिक आहे. म्हणून कुरआन आणि प्रेषित यांच्या निर्देशाप्रमाणे मुस्लिम समाजाने सुद्धा आधुनिक ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी परळीमध्ये जमाअते इस्लामीच्या एका मेळाव्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, ’’ ’गोद’ (आईची कुशी) से लेकर ’गोर’ (कब्र) तक इन्सान को इल्म हासिल करते रहेना चाहिए.’’ म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सातत्याने शिकले पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी समाजाची दोन गटात विभागणी केली आहे. 

एक - असे लोक ज्यांना समज नाही. उदा. शेतकऱ्यांना आयटीची समज नाही तर आयटी क्षेत्रातील लोकांना कृषीची समज नाही. 

दोन - ज्ञान नसल्याची समज असलेले लोक. उदा. शेतकऱ्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, आपल्याला आयटीचे काही ज्ञान नाही. तर आय.टी. क्षेत्रातील लोकांना याची जाण आहे की आपल्याला कृषी क्षेत्रातील लोकांबद्दल काही ज्ञान नाही. 

माणसाला जर या गोष्टीची जाणीव असेल की अमूक शाखेतील ज्ञान आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे तर तो किमान ते ज्ञान मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न तरी करेल. स्वतःला जमलं नाही तरी तो स्वतःच्या मुलांना त्या शाखेतील ज्ञान आपल्या मुलांना देण्याची धडपड करेल. पण एखाद्या समाजाला याचीच जाणीव नसेल की आपल्या प्रगतीसाठी कोणत्या शाखेचे ज्ञान मिळविण्याची गरज आहे तर तो समाज कधीच प्रगती करू शकणार नाही. म्हणून आपल्याला काय माहित नाही याचेही ज्ञान असणे आजच्या काळात गरजेचे होऊन गेलेले आहे. 

सय्यद सआदतुल्ल्लाह हुसैनी यांनी पुढे असेही म्हटलेले आहे की, पाच कारणामुळे माणसाला ज्ञान मिळविण्यामध्ये अडथळे येतात. 

पहिले कारण 1- आपल्यापैकी अनेक जणांचा असा समज असतो की, ज्ञान मिळविण्याचे एक विशिष्ट वय असते. बाल आणि तारूण्यामध्येच ज्ञान प्राप्त केले जाऊ शकते. एकदा का ही वयोमर्यादा ओलांडली की मग ज्ञान प्राप्त करणे शक्य होत नाही. 

2- न्यूरोप्लास्टिसिटी संबंधीचे अज्ञान. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या मेंदूच्या रचनेमध्ये एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था केलेली आहे, जी शिकण्यामध्ये माणसाला साह्य करते. जर कोणी सतत शिकण्यामध्ये व्यस्त राहतात त्यांचा मेंदू त्यांना शिकण्यामध्ये मदद करत राहतो. मग त्यांचे वय कितीही असो. अगदी नव्वद वर्ष वयामध्ये सुद्धा ज्याची न्यूरोप्लास्टिसिटी लवचिक असेल तो माणूस नवीन नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो. परंतु, ज्ञान मिळविण्याचे काम तरूण वयामध्येही जे सोडून देतील त्यांची न्युरोप्लास्टिसिटी इतकी ताठर होऊन जाते की, ते शिकण्याच्या वयामध्ये सुद्धा शिकू शकत नाहीत. 

3- समाजामध्ये एक व्यापक गैरसमज असाही आहे की, फक्त आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडूनच ज्ञान प्राप्त करता येते. हा विचार सुद्धा चुकीचा आहे. आज तुम्हाला सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवायचे असेल तर तुमच्यापेक्षा कितीतरी कमी वयाच्या तरूणांकडून तुम्हाला ते शिकावे लागेल. हे सत्य नाकारता येण्यसारखे नाही. 

4- समाजामध्ये एक असाही गैरसमज आहे की, अनेक लोक असे समजतात की ते अत्यंत व्यस्त आहेत की त्यामुळे नवीन गोष्टी शिकू शकत नाहीत. हा पण चुकीचा समज आहे. माणूस कितीही व्यस्त असला तरी महत्त्वाच्या गोष्टींसाठी तो वेळ काढतोच. ज्ञानाचे महत्त्व लक्षात आले तर माणसं नक्कीच वेळ काढून ते शिकू शकतात. 

5- मुस्लिम समाजामध्ये असाही एक व्यापक गैरसमज आहे की, कुरआन आणि हदीस मध्ये तर सर्व ज्ञान आहे. मग इतर ज्ञान प्राप्त करण्याची काय गरज? वस्तुतः कुरआनचा विषय मनुष्य आहे. मानवी जीवनासंबंधी प्रामुख्याने कुरआनमध्ये सविस्तर निर्देश देण्यात आलेले आहेत. बाकीच्या ज्ञान क्षेत्रांकडे फक्त इशारे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुरआनमधून विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकता येणे शक्य नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील पुस्तके वाचावी लागतील. त्या शाखांमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास करावा लागेल. पदवी मिळवावी लागेल. त्या क्षेत्रातील अनुभव जमा करावा लागेल. तेव्हा कुठे त्या क्षेत्रामध्ये कुठे तज्ञ होवू शकता. 

6- असाही एक गैरसमज समाजात पसरलेला आहे की, इंटरनेटर, सोशल मीडियावर सर्व माहिती उपलब्ध आहे. मग पुस्तकी ज्ञान प्राप्त करण्याची काय गरज? ही धारणाही अतिशय चुकीची आहे. इंटरनेटवर बरीच माहिती अशी असते की, ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. म्हणून सनदशीर मार्गाने एखाद्या विशिष्ट शाखेचे ज्ञान मिळविल्याशिवाय त्या विषयाचे खरे ज्ञान आपल्याला आहे, असा दावा कोणीही करू शकत नाही. 

महिलांचे शिक्षण 

महिलांचे शिक्षण कसे असावे याबाबतीत अनेकांचा गोंधळ उडतो. मौलाना मौदुदी यांनी याबाबत म्हटले आहे की, ’’ जहाँ तक तालीम व तरबियत का तआल्लुक है इस्लाम में औरत और मर्द के बीच कोई अंतर नहीं किया गया है. अलबत्ता स्वरूप में अंतर जरूरी है. इस्लामी दृष्टी से औरत की सही तालीम व तरबियत वो है जो उसको बेहतरीन बिवी, बेहतरीन माँ और एक बेहतरीन गृहिणी बनाए. उसका कार्यक्षेत्र घर है. इसलिए उसे विशेष रूप से उन विषयों की तालीम दी जानी चाहिए जो उस क्षेत्र में उसे ज्यादा फायदा पहूंचा सकते हैं. साथ ही वो ज्ञान भी उसके लिए आवश्यक है जो इन्सान को इन्सान बनानेवाले और उसके अख्लाक संवारनेवाले और उसकी नजर को व्यापक बनानेवाले हैं. ऐसी तालीम और ऐसी तरबियत हासिल करना हर मुसलमान औरत के लिए जरूरी है. इसके बाद अगर कोई औरत गैरमामुली जहेनी (बौद्धिक) योग्यता रखती हो और उन विषयों के अलावा दूसरे विषयों की तालीम भी हासिल करना चाहती हो तो इस्लाम उसके राह में रोडा नहीं बनता. बशर्ते की उन हदों से वो आगे न बढे जो शरियत ने औरतों के लिए मुकर्रर किए हुए हैं.’’ 

(संदर्भ : परदा, पान क्र.197).

भारतीय परिपेक्षात पाहता इतर समाज गटांपेक्षा मुस्लिम समाज गट हा शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात मागे पडलेला आहे. याची जाणीव आता सर्वांनाच झालेली आहे. समाधानाची बाब ही की, या जाणीवेचा विस्तार एवढा झालेला आहे की, आता गरीब लोक सुद्धा प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यात हिरहिरीने पुढे येत आहेत. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ ऐ अल्लाह! आम्हाला आणि आमच्या देशबांधवांना असे ज्ञान प्राप्त करण्याची समज आणि संधी प्रदान कर जे ज्ञान प्राप्त करून आम्ही आमच्या देशाला जगामध्ये सर्वोच्चस्थानी नेण्यामध्ये यशस्वी होऊ.’’ (आमीन)

- एम. आय. शेख


हजरत अदी बिन हातिम (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे की ‘‘तुमचा (म्हणजे मानवाकडून) अशा प्रकारे हिशेब घेतला जाणार आहे की अल्लाह आणि त्याच्या दरम्यान कोणी वकील किंवा त्याची बाजू मांडणारा असणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या उजव्या आणि डाव्या बाजुला पाहिल्यास त्याला कोणच दिसणार नाही. फक्त त्याचे कर्मच त्याला दिसतील. त्याने समोर पाहिल्यास त्याला नरक दिसेल. जर तुम्हाला शक्य असेल तर दान करीत जा. कितीही क्षुल्लक का असे ना. याद्वारेच तुम्हाला नरकापासून सुटका मिळणे शक्य आहे.’’ (बुखारी, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की ‘‘लोक हा माल माझा आहे, असे सांगत असतात. हा माझा माल आहे, माझा माल आहे. पण वास्तविकता अशी आहे की त्याने जे खाल्ले ते संपले. जी काही वस्त्रे त्याने परिधान केली असतील ती जुनी होऊन फाटून गेली. पण त्याने अल्लाहच्या कारणास्तव जे काही खर्च केले असेल तो माल मात्र अल्लाहपाशी त्याच्या नावाने जमा आहे. त्याव्यतिरिक्त  जे काही त्याच्याकडे असेल ते त्याचे नाही. ते त्याच्या वारसांचे आहे. तो स्वयंम रिकाम्या हातांनी जगाचा निरोप घेईल.’’ (ह. अबू हुरैरा (र.), मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘कयामतच्या दिवशी अल्लाह आपल्या मानवांना जीवंत उठवील. ज्यांना त्याने मालमत्ता आणि संतती बहाल केली होती. त्यांच्यातून एकाला अल्लाह विचारील की हे अमक्याची संतती. ती व्यक्ती उत्तर देईल की मी हजर आहे, माझ्या विधाता! अल्लाह विचारील, मी तुला मालमत्ता आणि संतती दिली होती, त्याचे काय केलेस? ती व्यक्ती उत्तर देईल की माझ्या विधात्या, तू मला बरेच काही दिले होते. अल्लाह विचारील की माझ्या देणग्यां मिळाल्यानंतर तू कोणते कर्म केले? ती व्यक्ती म्हणेल की मी माझी सर्व मालमत्ता आपल्या संततीसाठीसोडून आलो जेणेकरून त्यांच्यावर गरिबीचे जीवन जगण्याची पाळी येऊ नये. अल्लाह त्यास म्हणेल की तुला जर वास्तवतेचे ज्ञान असते तर तू कमी हसला असतास आणि जास्त रडला असतास. ज्याला आपल्या संततीविषयी जी भीती होती तीच अवस्था त्यांच्यावर लादली गेली आहे. (दारिद्र्य) पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला अल्लाह असा प्रश्न विचारील की जो काही माल आणि संतती तुला दिली होती त्याचे काय केलेस? ती व्यक्ती उत्तर देईल की माझ्या विधाता, तू मला जे काही दिले होते ते सर्व मी तुझ्या कारणास्तव खर्च करून टाकले आणि आपल्या संततीच्या बाबतीत मी तुझ्या आणि तुझ्या कृपेवर विश्वास ठेवला. अल्लाह अशा व्यक्तीस म्हणेल की तुला जर वास्तविकतेचे ज्ञान असते तर जास्त हसला असता आणि कमी रडला असता. आणि ऐक, आपल्या संततीविषयी जसे तू माझ्यावर विश्वास ठेवला होता तसेच मी त्यांना दिले. (औदार्य आणि सुबत्ता)’’ (ह. अब्दुल्लाह इब्ने मसूद (र.), तिबरानी)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget