‘आरोग्य सेना’ स्थापन केली तेव्हा पंचवीस वर्षापूर्वी आम्ही घोषणा दिली की, ‘आरोग्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच.’ त्या वेळेपासून ते आजपर्यंत आम्ही सातत्याने हे सांगत आलो आहोत की ज्या आरोग्य व्यवस्थेने देशातील जनतेच्या आरोग्याचा आधार बनले पाहिजे; ती आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था स्वत: दुर्धर
रोगाने पछाडलेली आहे. या रोगाच्या मूळ कारणाचे निदानही आम्ही पंचवीस वर्षापूर्वी करून देशापुढे मांडले होते. या मूळ कारणावर तातडीने उपचार केले नाहीत तर ‘भारताची आरोग्य व्यवस्था’ नावाचा हा ‘रुग्ण’ त्याच्या आरोग्यावर अनपेक्षित असा हल्ला झाला तर आचकेद्यायला लागून स्वत: व्हेंन्टीलेटरवर जाईल असा भाकीत वजा इशारा अनेकदा दिला होता. या देशावर काँग्रेसने सर्वाधिक काळ, म्हणजे साडेपाच दशके (सत्तर वर्षे नाही) राज्य केले हे खरे असले तरी हेही विसरून चालणार नाही की देशात अनेक पक्षांची सरकारे सत्तास्थानी येऊन गेली. जनता पक्ष, ज्यात पूर्वाश्रमीचा भाजपा म्हणजे जनसंघही होता, जनतादल, समाजवादी जनता पक्ष आणि तीन टप्प्यांमध्ये तब्बल एक तपापेक्षा अधिक काळ सत्तेवर असलेला भाजपा. सरकारे आली आणि गेली, पण सातत्याने देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी जी.डी.पी.च्या फक्त 1.2% तरतुदीची मर्यादा ओलांडावी असे शहाणपण कोणालाही सुचले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आकडा किमान 5% असला पाहिजे.
दुसऱ्या बाजूला संरक्षणावरील खर्च प्रचंड वाढवण्यात येत गेला. भाजपा तर त्यासाठी सातत्याने पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करीत राहिले. खाजगीकीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, या खाउजा, धोरणाचा अवलंब करताना काँग्रेसने देशाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही पूर्ण मोडीत काढून ती खाजगी उद्योगांच्या ताब्यात सुपूर्द करण्याचा घाट घातला. पी.पी.पी., पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या गोंडस नावाखाली एक-एक रुग्णाणालय खाजगी यंत्रणांच्या घशाखाली घालण्याची काँग्रेसने जेव्हा सुरुवात केली तेव्हा आरोग्य सेना त्याच्या विरोधात ठामपणे उभी राहिली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे ‘जनतेच्या पैशाने रुग्णालये उभी करायची आणि खाजगी संस्थांनी ती चालवून नफा लाटायचा. या धोरणामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे नुसते खाजगीकरण होत गेले नाही तर त्याचे व्यापारीकरण आणि पुढे औद्योगिकरण झाले.’ आरोग्य क्षेत्र अनिर्बंध नफ्याचे क्षेत्र बनू लागले आणि वैद्यकीय नीतीमत्ताही खालावू लागली. वैद्यकीय शिक्षण ही बाजारातील विक्री योग्य वस्तू बनली आणि क्रयशक्ती अधिक असणाऱ्यांच्या हाती ती पडू लागली. बरे ही वस्तूही अशी की तिचे दाम श्रीमंतांनाच परवडणार आणि हे दाम देण्याची क्षमता ते कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गांनी मिळवणार. रुग्णालये कॉर्पोरेट बनण्यास सुरुवात याच काळात झाली. त्यावेळी आम्ही देशाची सार्वजनिक आणि एकूणच आरोग्य व्यवस्था कशी असायला पाहिजे याचे आराखडे जाहीर करीत होतो. महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आरोग्याचे खुले जाहीरनामे देशापुढे ठेवत होतो. भारतासारख्या खंडप्राय, बहुतांश ग्रामीण भाग असणाऱ्या आणि 60% पेक्षा अधिक जनता दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या देशाने आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मोडकळीस आणून ती खाजगी व्यवस्थेकडे देणे हे आत्मघातकी आहे असे आमचे म्हणणे होते. आमच्या म्हणण्याकडे सत्ताधाऱ्यांनी तर सोडाच जनतेनेही लक्ष दिले नाही. भाजपाने तर यावर कळस चढवला. माणूस आपल्या शरीराला आणि आरोग्याला गृहीत धरतो. आपल्यावरच नाही तर एकूणच जगभरातील जनतेवर आरोग्याची एखादी आपत्ती कोसळेल ही गोष्ट एक वाईट स्वप्न म्हणून त्याकडे तो दुर्लक्ष करू इच्छितो. पण निसर्ग उदार नसतो. तो ‘स्टार वॉर्स एन्डगेम’ या हॉलीवूड चित्रपटातील वैश्विक खलनायक ‘थॅनोस’सारखा पाषाणहृदयी असतो. पण हा थॅनोस खलनायक नाही तर तत्त्वज्ञही आहे. विश्वातील साऱ्या दु:खांचे मूळ हे लोकसंख्येच्या स्फोटात आहे आणि त्यासाठी कोणताही भेदभाव आणि दुजाभाव न करता ती निम्म्याने कमी केली पाहिजे हे थॅनोसचे तत्त्वज्ञान. हे घडवण्याची अमर्यादित शक्ती या थॅनोसकडे आहे. पण असे असूनही अनेक सुपर हिरोज मोठ्या हिमतीने एकत्र येऊन या महाबलाढ्य थॅनोसचा पराभव करतात आणि विश्वातील मानवजातीला वाचवतात असे हे कथानक आहे. कोरोनाचा विषाणू या थॅनोसचे अतिसूक्ष्म रूप आहे. एखाद्या देशावर परका देश नाही तर परका जंतू आक्रमण करू शकतो हे कोणालाच मान्य नव्हते. या आक्रमणाविरुद्ध तुमची सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सैन्ये कुचकामी ठरू शकतात हे कोणाच्या स्वप्नातही आले नाही. असे आक्रमण झाल्यावर त्याच्याविरुद्ध लढणारा सुपरहिरो म्हणजे आरोग्याची सक्षम यंत्रणा आणि त्या यंत्रणेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करणारे सर्व आरोग्य योद्धे. मानव जातीवर शेवटचे असे संकट 102 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूच्या रूपाने आले होते आणि त्यामुळे आम्हाला केव्हाच त्याचे विस्मरण झाले होते. प्लेग, देवी तर फार जुने झाले. भूतकाळ हा इतिहास बनतो आणि वाईट इतिहास हा त्यापासून कोणतेही धडे न घेता विस्मरणाच्या अंधारात ढकलायचा असतो, हा मानवी स्वभाव आहे. अप्रिय गोष्टी विस्मरणाच्या अंधारात गाडल्यावर त्यांची पुनरावृत्ती होऊ शकते असा इशारा कोणत्याही भक्कम आधारावर दिला तरी माणसाला तो नको असतो. सामुदायिक संकटाचा इशारा त्याहूनही नकोसा वाटतो. कोरोना महासाथीबाबत अगदी हेच घडले. यामुळे ज्या देशांच्या सार्वजनिक आरोग्याच्या यंत्रणा सक्षम होत्या त्या देशांनी समर्थपणे हे संकट पेलले. ज्या देशांच्या सार्वजनिक आरोग्याच्या यंत्रणा आधीच कमकुवत होत्या ते देश या संकटापुढे कोलमडले. त्यातही ज्या देशांना ट्रम्प, बोल्सेनेरो आणि मोदी यांच्यासारखे आत्ममग्न, अहंकारी, अकार्यक्षम, अवास्तव प्रतिमा फुगवण्यात आलेले, सामान्य वकुबाचे आणि मुळात हुकुमशाही प्रवृत्तीचे नेते लाभले ते देश सर्वाधिक कोलमडले. कोरोना मृत्यू आणि संसर्ग यांत हे तीन देशच पहिल्या तीन स्थानांवर आहेत. सजग अमेरिकन जनता, तेथील भक्कम लोकशाही, लांगूलचालनाचा रोग न जडलेली प्रशासकीय यंत्रणा आणि माध्यमे यांनी एकत्र येऊन ट्रम्प नावाचे संकट दूर केले. ब्राझीलची अवस्थाही वाईट आहे. पण आपल्या देशाची अवस्था ही तर शब्दांपलीकडची आहे.
कोरोनाची दुसरी लाट आपल्या देशासाठी अत्यंत घातक ठरली. या लाटेचा इशारा जगातील अनेक देशांमध्ये आलेल्या लाटेने एकप्रकारे दिलाच होता. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने हा इशारा नोव्हेंबर 2020 मध्ये सादर केलेल्या अहवालात सरकारला दिला होता. या समितीने विविध तज्ज्ञांची मते विचारात घेतली होती. या अहवालात अत्यंत स्पष्टपणे असे म्हटले होते की कोरोनाचा दुसरा संभाव्य उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. देशात सरकारी रुग्णाणालयांमधील एकूण खाटांची संख्या फक्त 7 लाख 13 हजार 986 असून ती एका हजार लोकसंख्येमागे फक्त 0.55 % म्हणजे, अर्धी खाट एवढीच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हा आकडा एक हजार मागे किमान 3 खाटा इतका असला पाहिजे. आपल्या देशाची प्राणवायू निर्मिती क्षमता प्रतिदिन फक्त 6900 मेट्रिक टन आहे. अतिदक्षता खाटा, व्हेन्टिलेटर्स यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. याबाबी लक्षात घेऊन या समितीने सर्वात पहिली शिफारस केली होती की केंद्राने 2020-21 च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यासाठी जी.डी.पी.च्या किमान 2.5% टक्के, म्हणजे आजवरच्या तरतुदींच्या दुप्पट तरतूद करावी. त्याचबरोबर रुग्णालयांतील खाटांची संख्या, प्राणवायू निर्मिती, औषध निर्मिती, उपकरणे या सर्वांच्या संख्येत प्रचंड वाढ युद्धपातळीवर केल्याशिवाय येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा सामना आपण करू शकणार नाही. औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची सूचनाही केली होती.आत्ममग्न मोदी आणि उन्मत्त शहा या जोडीने या अहवालाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. शेवटी दुसरी लाट आलीच. सुरुवातीला आडवी पसरणारी ही लाट अधिक संसर्गजन्य पण कमी घातक आहे असे वाटले. बघता बघता या लाटेने अत्यंत वेगाने पसरत पसरत आपले घातक रूप दाखवायला सुरुवात केली. पहिल्या लाटेने ज्येष्ठ आणि को-मॉर्बिडीटीज असणाऱ्यांना अधिक दणका दिला. दुसऱ्या लाटेने या बरोबर तरुण आणि धडधाकटलोकांनाही गिळंकृत करायला सुरुवात केली. कोरोनाची लक्षणे तशी चोरपावलांनी येतात आणि हळू-हळू पुढे जातात. कोरोनाने होणारे मृत्यूही तडकाफडकी होत नाहीत तर ते अनेक दिवसांनी, एक ते दोन आठवड्यांनी होतात. या काळात अत्यंत तातडीने योग्य ते उपचार मिळाले तर ते टळतात. वास्तवात भारतात कोरोना आला तो हवाई मार्गे. वेळीच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक थांबवली असती तर त्याला खूप आधीच अटकाव झाला असता. अमेरिकेच्या अराजकतावादी विदूषकाच्या चाटूगिरीचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम अहमदाबादमध्ये ठेवलेला असल्याने देशाला धोक्यात घालून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. टाळ्या- थाळ्या, दिवे लावणे अशा विविध मार्गांनी अत्यंत बेमुर्वतखोरपणे संसर्गसाखळी अखंड राहील अशी व्यवस्था करण्यात आली. मग देशाला अचानक लॉकडाउनमध्ये ढकलून देण्यात आले. लाखो स्थलांतरित आपापल्या गावी परतले. नोटबंदी, जी.एस.टी. आणि अक्कलशून्य आर्थिक धोरणामुळे आधीच रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था पूर्ण नेस्तनाबूद झाली. आपापल्या गावी परतणाऱ्या गर्दीने कोरोना संसर्गाची साखळीही निर्माण केली. कोरोना हा संसर्ग साखळ्या तयार झाल्याने पसरतो. त्याच्या वारंवार येणाऱ्या लाटाही फक्त नव्या स्ट्रेनमुळे येत नाहीत तर त्या संसर्गसाखळ्या तयार झाल्याने येत राहतात. म्हणूनच यातील पहिला भाग आहे संसर्ग प्रतिबंधाचा. संसर्ग प्रतिबंधाची पहिली पायरी आहे संसर्गसाखळी निर्माण होऊ न देणे ही.
संसर्गसाखळी ही जनतेने व्यक्तीगत पातळीवर प्रतिबंधक उपाय पाळणे यावर जरी अवलंबून असली तरी सामुहिक पातळीवर गर्दी प्रतिबंध हा त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी अमानुष लॉकडाउनची गरज नाही. मोदी-शहा या जोडीने पुन्हा कुंभमेळा आणि लाखो लोकांच्या निवडणूक रॅलीज घेऊन आधीच्या चुकांवर कळस चढवला. यामध्ये इतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मनसोे भर घातली. संसर्ग प्रतिबंधाची दुसरी पायरी आहे जनतेची सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत वेगाने किमान 60% जनतेचे केलेले लसीकरण. एखादी नवी लस शोधण्याची प्रक्रिया ही किमान दहा-पंधरा वर्षे लागणारी आहे. लस संशोधन ही अत्यंत खर्चीक गोष्टही आहे. अमेरिकन सरकारने आठ खाजगी कंपन्यांना 83 हजार कोटी रुपये यासाठी दिले. इंग्लंडनेही अस्ट्रा झेनेकाला आर्थिक पाठबळ पुरवले. जगभरातील सर्वच कंपन्यांनी ऐतिहासिक वेगाने ही प्रक्रिया 15-16 महिन्यांमध्ये पार पाडली. रशियाने स्पुटनिक नावाने स्वत:ची लस तयार केली. चीनकडे आधीच लस तयार असावी. 33 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेने संशोधन सुरू होताच विविध कंपन्यांशी 60 कोटी डोस पुरवण्याचे करारही करून टाकले. अस्ट्रा झेनेकाच्या लसीचे उत्पादन सिरम इंडियाने भारतात सुरु केले. भारत बायोटेक या लस उत्पादनाचा अनुभव नसणाऱ्या कंपनीनेही लस तयार केली. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या सरकारने सिरमशी जानेवारी 2021 मध्ये फक्त सव्वा कोटी लसींच्या डोसचे करार केले. भारत बायोटेकशीही सुमारे तेवढेच करार झाले. 16 जानेवारी 2021 मध्ये आपल्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली. साडेतीन महिन्यांमध्ये आपण जेमतेम 2% जनतेचे पूर्ण लसीकरण केले आहे. या वेगाने देशातील 60% जनतेचे लसीकरण करण्यास आपल्याला पाच वर्षे लागतील. या साडेतीन महिन्यांच्या काळात मोदींनी 85 देशांना पावणेसात कोटी डोस पाठवले, यातील निम्मे डोस 44 देशांना भेट म्हणून आणि उरलेले 41 देशांना विकण्यात आले. आता तर को-विन साईटमध्येच बंद पडत आहे आणि अनेक लसीकरण केंद्रे लसीचा साठा न आल्याने ठप्प आहेत. केंद्र सरकार राज्यांना स्वतंत्रपणे लस खरेदीस परवानगी द्यायला तयार नाही. या सर्वांचा परिणाम असा की लसीच्या प्रतीक्षेत असणारे करोडो लोक दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचे शिकार बनत आहेत. लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग झाला पण तो सौम्य राहिला. लस न मिळालेल्यांना कोरोनाने गाठायला सुरुवात केली. 45 वर्षांपेक्षा वय कमी असणाऱ्यांना लस न देण्याच्या सुरुवातीच्या चुकीच्या धोरणामुळे असंख्य तरुण कोरोनाला बळी पडले ही दुःखाची बाब आहे. प्रत्यक्षात जगाच्या 700 कोटी लोकसंख्येपैकी 60% लोकांना लसीचे 2 डोस देता येतील एवढे लस उत्पादन जगात होत आहे. यातील विविध लसी युद्ध पातळीवर जनतेला उपलब्ध करून देणे तर सोडाच सिरमचे मालक अदर पूनावाला यांना जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून देश सोडून लंडनला जावे लागले. छपन्न इंच आपल्या देशातील आणि जगातील अत्यंत मोठ्या लस उत्पादकाला सुरक्षेची हमी देऊ शकले नाही ही शरमेची बाब आहे. आम्हाला तर उलट मोदी-शहा यांच्या मनमानीला कंटाळून त्यांनी देश सोडला असावा असा संशय येतो. प्राणवायू बाबत हेच. देशाच्या प्राणवायूच्या एकूण उत्पादनापैकी जेमतेम 5% प्राणवायू वैद्यकीय क्षेत्राला दिला जात होता, बाकी औद्योगिक क्षेत्राला दिला जात होता. अगदी काही दिवसांपूर्वी मोदींनी या काळात प्राणवायूच्या औद्योगिक वापरावर बंदी आणली. रेमडेस्वीरच्या बाबतही हेच. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत त्याची निर्यात चालू होती. देशातील जनता मरत असताना हे घडत होते. याच काळात कृषी विधेयके आणण्यात आली, राममंदीराचा घाटघालून त्यासाठी अब्जावधी रुपये गोळा करण्यात आले आणि 20 हजार कोटी रुपयांच्या सेन्ट्रल व्हिस्टाचे बांधकाम सुरू करण्यात आले. लसीकरण करण्याचा आपला वेग किती राहील आणि ते न होताच दुसरी लाटआली तर आपण आपल्या जनतेला कसे वाचवणार आहोत याचा कोणताही विचार करायला मोदी- शहा या जोडीला पाच राज्यांतील, विशेषत: पश्चिम बंगालमधील निवडणुकांमुळे वेळ नव्हता. त्यांना देशातील माणसे जगविण्यात रस नव्हता, त्यांना वाट्टेल ते करून ममता दीदींना हरवायचे होते. त्याचवेळी देशभर लाखो लोक प्राणवायू अभावी तडफडत होते, रुग्णाणालयात खाटमिळावी म्हणून सैरावैरा धावत होते. सगळीकडे एकच आक्रोश, प्राणवायू हवा, व्हेन्टिलेटर हवा, कोणाला रेम्डेस्वीर हवे तर कोणाला टॅझिलीझुमॅब हवे. वाट्टेल ते दाम देऊ, आमच्या प्रिय व्यक्तीला वाचवाहो. अहो फक्त प्राणवायू मिळाला तरी ती जगेल. खबरदार कोणी प्राणवायू हवा म्हणून ट्वीट केले तर. शोधून काढू, घरे दारे जप्त करू. देशाची बदनामी करता? देशद्रोही लेकाचे. त्यापेक्षा पाकिस्तानात का जात नाही? आक्रोश आक्रोश! देशाचे नेते तिकडे जल्लोषात बहिरे बनले होते. लाखांच्या रॅलीजमध्ये बसेसच्या टपांवर उभे राहून फुले उधळून घेण्यात मश्गुल होते. आत्मनिर्भर बना! शेवटी मरण अटळ आहे, आत्मा अमर आहे. हिंदू राष्ट्रासाठी सारा देश काबीज करणे ही खरी गरज आहे. इकडे कोव्हीड वॉर्डात माणसांना मरणाला एकाकी सामोरे जावे लागत होते. भोगायचेही एकट्याने, मृत्यूला सामोरे जायचेही एकट्याने. मग त्यात काय झाले? जगात आलात तेव्हा एकट्यानेच आलात ना? मग जायचेही एकट्यानेच. अहो आमच्या प्रियजनाचे शेवटचे दर्शन तरी द्या! घ्या, हे चेहऱ्यावरचे झाकण काढले, पण स्पर्श नाही करायचा. अहो रामनाम सत्य है म्हणून चार फुले तरी उधळून द्या. कशासाठी? राममंदीर बांधायचे आहे आपल्याला, एकदा का राममंदीर उभे राहिले की रामराज्य येईल. रामराज्यात कोरोना वगैरेचे येण्याचे धाडसही (उर्वरित पान 8 वर)
होणार नाही. राममंदिरासाठी वर्गणी दिली होती ना? दिली ना. मग तुमाच्या माणसाला स्वर्गातच जागा मिळेल! अहो, पण आत्ता स्मशानात जाळायला जागा नाही. सारे मैदान धडधडणाऱ्या चितांनी भरले आहे. वाटबघा, येईल नंबर. आत्ता जाळले काय आणि उद्या जाळले काय? शेवटी राख ती राख! पण अहो आता तर देशाची राख रांगोळी झाली आहे. खबरदार, मोदी हे प्रभू रामाचा अवतार आहेत. त्यांनीही आपल्या सीतेला वनवासात पाठवून दिले. मग हनुमान कोण? हनुमान? अमित शहा! आणि श्रीकृष्ण? उघडच आहे, योगी! योगी? ते तर ब्रम्हचारी आहेत आणि प्रेमाचे विरोधी आहेत मुर्खासारखे बोलू नकात. योगी हे कर्मयोगी आहेत आणि गीतेत भगवान कृष्णाने सांगितलेले स्थितप्रज्ञ आहेत. बरोबर सांगताय तुम्ही, उत्तर प्रदेशात पदपथांची स्मशाने झाली तरी त्यांच्या चेहऱ्यावरील रेषही हलली नाही. त्यांचा इतर धर्मातील गोपींना विरोध नाही, आपल्या धर्मातील मुलींनी मुस्लिम धर्मीयांच्या गोपी बनण्याला विरोध आहे. एक विचारू का? रागावणार नाही ना? नाही, बोला. भागवत कोण आहेत हो? भागवत? ते तर भगवान विष्णूचे अवतार!
आपल्याला या सर्व देवांची मंदिरे उभारायची आहेत. पण त्या ऐवजी रुग्णालये उभी केली तर? नाही, हिंदू राष्ट्राला रुग्णालयांची गरज नाही. या सर्व देवांच्या मंदिरांच्या जागी मुसलमानांनी मशिदी बांधल्या, त्या आपल्याला पाडल्या पाहिजेत. हे आपले धर्म कर्तव्य आहे. धर्म म्हणाला म्हणून बोलतो, हा गेला ना तो गोरक्षक होता. सांगू नका कोणाला, झुंडीत शिरून एका गोहत्या करणाऱ्याला ठेचून मारलेही होते त्याने. बाबरीला पण जाऊन आला होता. रेम्डेस्वीर मिळेना तर शेवटी श्रद्धेने त्याने थोडेगाईचे शेण खाल्ले आणि गोमुत्र सलाईनमधून देण्याचा आग्रह धरला. डॉक्टर म्हणाले असे करता येणार नाही तर त्याने ते प्यायले. पण काही उपयोग झाला नाही. त्याने अभिमानाने आणलेली बाबरीची वीट डोक्याखाली ठेवून पाहिली. शेवटी ‘मोदी मोदी’ असे नामस्मरण करत गेला. एक गोष्ट सांगू? रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना, ज्या मिळाल्या त्या वाट्टेल ते पैसे मागायला लागल्या. शेवटी एका मुस्लिम रिक्षावाल्याने नेले आणि पैसेही घेतले नाहीत. माणुसकी धर्मापलीकडे आहे. मूर्ख आहात. लव्ह जिहादचा हा दुसरा प्रकार, माणुसकीचा जिहाद! ही खरी माणुसकी नाही, ही धर्मासाठी माणुसकी. अशा गोष्टींना फसू नकात.आपल्याला खूप पुढे जायचे आहे. मोदी महागुरू आहेत. ट्रम्प आणि बोल्सेनेरो यांनी त्यांचा सल्ला घेतला म्हणून कोरोना महासाथीत त्यांचा क्रमांक जगात वर राहिला. पण शेवटी पहिल्या क्रमांकावर मोदीच येणार. आपल्याला महासत्ता बनायचे आहे. पाकिस्तानला संपवायचे आहे. चीन नष्ट करायचा आहे. नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश ताब्यात घ्यायचे आहेत. अखंड भारत उभा करायचा आहे. ये तो सिर्फ झांकी है, मथुरा काशी अभी बांकी है. एखाद्या मृत्यूने असे हडबडून जाऊ नका. काय बोलताय? अहो, ये तो सिर्फबरबादी है, और समशान बनना क्या बाकी है? अखंड भारत तर सोडा, आधी देशाचा आत्मा संपवलात, आता देशच संपवायला निघालात? ‘हिंदू खतरे मे है’ अशी हाकाटी पिटली आणि आता हिंदू मरत आहेत तर दाढी वाढवून मोराबरोबर नाचत आहात. नाही आता एकच, हॅशटॅग रीझाईन मोदी-शहा-योगी. हिंदू खतरे मे है क्योंकी मोदी-शहा-योगी कुर्सी पे है. (साभार : पुरोगामी जनगर्जना, पुणे) ***
- डॉ. अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com
कोविड-19 च्या दोन आवर्तनांनी माणसाला अंतर्मुख होण्याची संधी दिलेली आहे. आता ही जे अंतर्मुख होणार नाही, आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर पुनर्विचार करणार नाहीत, स्पष्ट आहे असे लोक पुढे येणाऱ्या काळामध्ये टिकू शकणार नाहीत. कोविड-19 मुळे सर्वात जास्त जीवहानी अमेरिका आणि युरोपीय देशांची झाली आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की या देशांत राहणाऱ्या लोकांची जीवनशैली चांगली नव्हती. म्हणूनच उच्च कोटीच्या आरोग्य सुविधा असतांनासुद्धा सर्वात जास्त चित्तहानी याच देशांची झाली. म्हणून आता कोविड-19 पासून बोध घेण्याची वेळ आलेली आहे. युरोप आणि अमेरिकन लोकांची जीवनशैली उच्च दर्जाची समजली जाते परंतु ती कोविड समोर पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती कोणती? कुरआनने याचे उत्तर एका वाक्यात दिलेले आहे ते असे, ’’इन्न दिना इंदल्लाही इस्लाम’’ अर्थात तुमच्यासाठी जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत इस्लाम आहे. (सुरे आले इमरान आयत नं. 19).
कुरआनचा हा दावा तपासून पाहण्याअगोदर आपण जगात प्रचलित असलेल्या जीवनशैलींचे संक्षिप्त समीक्षण करूया. इस्लामी जीवनशैली वगळता इतर सर्व जीवनशैलींमध्ये हलाल आणि हरामची संकल्पनाच अस्तित्वात नाही. त्यामुळे काय खावं? काय खावू नये? काय ल्यावं काय लेऊ नये? काय घ्यावं काय घेऊ नये? कसं वागावं कसं वागू नये? याबद्दल ठोस असे ईश्वरीय मार्गदर्शन नसल्यामुळे लोक आपापल्या अंदाजाप्रमाणे जीवन जगत असतात. इस्लाम वगळता इतर सर्व जीवनशैल ह्या माणसाने निर्माण केलेल्या आहेत म्हणून त्रुटीपूर्ण आहेत. ज्याने माणसाला जन्माला घातले त्याच्यापेक्षा जास्त माणसाचे कल्याण कशात आहे, हे दुसऱ्या कोणाला ठाऊक असणार?
इतर जीवनपद्धतींमध्ये अनेक आत्मघाती तरतुदी आहेत ज्यामुळे मानव समुहाची अतोनात हानी झालेली आहे. उदा. इस्लाम वगळता इतर सर्व जीवनपद्धतींमध्ये व्याजाला -(उर्वरित पान 7 वर)
मान्यता आहे. व्याज म्हणजे नफा, असे समजण्याचा मूर्खपणा त्यात केलेला आहे. व्याज ही जीवनाला्निलष्ट करणारी गोष्ट आहे. व्याजामुळे त्यांचेच जीवन सुसह्य होते ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे. परंतु ज्यांच्याकडे संपत्ती नाही, अशा लोकांसाठी व्याज हे अभिशाप आहे आणि अशाच लोकांची संख्या जगात जास्त आहे. दुसरे उदाहरण दारू किंवा ड्रग्सचे घ्या. शालेय बुद्धीचा कोणताही माणूस हे समजू शकतो की, दारू आणि ड्रग्जचे व्यसन माणसाला देशोधडीला लावण्यासाठी पुरेसे आहे. परंतु इस्लाम वगळता आज सर्वच जीवन पद्धतींमध्ये दारू आणि ड्रग्स अनेकांच्या जीवनशैलीचा भाग आहे. नव्हे सोशल ड्रिंकिंगला तर समाजमान्यता असून, ती अभिमानाची बाब समजली जाते. तीसरे उदाहरण भ्रष्टाचाराचे घेऊ. हलाल-हरामची संकल्पनाच अस्तित्वात नसल्यामुळे भ्रष्टाचार हा इस्लामखेरीज इतर जीवन पद्धतींचा अविभाज्य भाग बनलेला आहे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविलेल्या लोकांचा समाजामध्ये सन्मान होत असल्यामुळे अप्रत्यक्षपणे भ्रष्ट आचरणाला उत्तेजन मिळत असते. हीच नाही अशी शेकडो उदाहरणे आपल्याला देता येतील. तसे पाहता सर्वच जीवन शैलींमध्ये वाईट गोष्टींना वाईट आणि चांगल्यांना चांगले म्हटलेले आहे. परंतु वाईट गोष्टींचे समाजातून उच्चाटन करून चांगल्या गोष्टी समाजात रूजविण्यासाठी प्रत्यक्षात कार्यकारी योजना कुरआनच्या स्वरूपात फक्त इस्लामकडे आहे. त्यामुळे चांगले आणि वाईट, हलाल आणि हराम यांच्यामध्ये स्पष्ट सीमारेखा आखणे आणि त्यानुसार आचरण करणे प्रत्येकाला सहज शक्य होऊन जाते. मानवनिर्मित जीवनशैलीमुळे समाजाचे नुकसान होत असल्याचा दांडगा अनुभव सोबत असेल तर ईश्वरनिर्मित जीवनशैली कशी असते हे किमान समजून घेण्यास काय हरकत आहे?
खरच ईश्वरनिर्मित जीवनशैलीची गरज आहे काय?
मानवनिर्मित जीवनशैलीमध्ये माणसांच्या इच्छा आकांक्षाचा अनिवार्य प्रभाव असतो ईश्वरनिर्मित जीवनशैलीमध्ये तो नसतो. म्हणून या जीवनशैलीप्रमाणे जगणारे लोक आपल्या या जीवनात व पारलौकिक जीवनात यशस्वी होतात.
पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व माणसांची शारीरिक व मानसिक रचना एकच आहे. त्यांच्या आवडी-निवडी एकच आहेत. त्यांना सर्वांना एकच सुर्यापासून सारखच डी व्हिटॅमिन मिळतं. त्यांचं रक्त एकमेकांना चालतं, त्यांची आपसात लग्न होऊ शकतात. त्यांची लैंगिकप्रकृती सारखीच त्यांची उत्पत्तीची प्रक्रिया सारखीच. त्यांचे सुख, दुःख सारखेच. त्या सर्वांना एकसारखीच बुद्धीमत्ता दिलेली आहे. त्यांच्या क्षमता एकसारख्याच आहेत. त्यांच्यातील वैगुण्यही एकसारखे आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत त्यांच्या भावना सारख्याच आहेत. त्यांच्या सर्वच गोष्टी एकसारख्या असतील तर उघड आहे त्यांची जीवन जगण्याची पद्धत ही एकसारखीच असायला हवी. म्हणूनच ईश्वराने त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट अशी जीवन पद्धती पसंत केलेली आहे, ज्याचे नाव इस्लाम आहे. परंतु याची जाण सर्वांना नाही. मात्र जगातील जवळ-जवळ 200 कोटी लोक आज या पद्धतीनुसार समाधानाने जगत आहेत.
इस्लामी जीवन पद्धती नेमकी कशी असते?
’अद्-दीन’ या अरबी भाषेतील शब्दाचे अनेक अर्थ आहेत. उदा. वर्चस्व, धर्म, व्यवस्था, सत्ता, मोबदला तसेच या शब्दाचा एक अर्थ ’तरीका’ अर्थात जीवन जगण्याची पद्धत असा सुद्धा आहे. कुरआनचा असा दावा नाही की इस्लाम ईश्वराच्या नजरेत खरी जीवन पद्धती आहे उलट त्याचा दावा असा आहे की, फक्त इस्लाम हीच खरी जीवन पद्धती आहे. यावरून हा दावा तपासून पाहणे अनिवार्य होऊन जाते. या दाव्याचे वैशिष्ट्ये असे की, हा फक्त अरबस्थानापुरता दावा नाही तर जगात राहणाऱ्या सर्वांसाठी हा दावा करण्यात आलेला आहे. तसेच एखाद्या काळापुरता नाही तर पृथ्वीच्या अंतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी हा दावा करण्यात आलेला आहे. स्पष्ट आहे हा धर्म ईश्वरीय आहे म्हणूनच हा दावा व्यापक स्वरूपात करण्यात आलेला आहे.
दीनप्रमाणेच ’इस्लाम’ या शब्दाची स्पष्ट व्याख्या करण्यात आलेली आहे. अरबी भाषेच्या या शब्दाचे खालीलप्रमाणे दोन अर्थ आहेत.
1. आत्मसमर्पण 2. अनुसरण.
आत्मसमर्पण ईश्वरासमोर आणि अनुसरण ईश्वरीय आदेशाचे. आत्मसमर्पण म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण. आज बहुतेक मुस्लिम आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये इस्लामी इबादतींचे अनुसरण करतात मात्र आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये ते भांडवलशाही जीवनपद्धतीचे अनुसरण करतात. म्हणजे इस्लाम आणि भांडवलशाही यांच्या संकरातून निर्माण झालेल्या तिसऱ्याच जीवनशैलीची त्यांना सवय लागलेली आहे. म्हणून अशा लोकांच्या जीवनामध्ये इस्लामच्या बरकती सोबत-सोबत भांडवलशाहीमुळे येणारे नुकसान आपसुकच आलेले आहेत. त्यामुळे एक विचित्र जीवन पद्धती अस्तित्वात आलेली आहे.
इस्लामी जीवनशैली उत्कृष्ट का आहे?
इस्लामी जीवनशैली उत्कृष्ट असल्याचा पहिला दावा कुरआनमध्ये असा करण्यात आलेला आहे की, ही प्राकृतिक जीवनशैली आहे. माणसाच्या प्रकृतीशी अनुकूल असल्यामुळे यात माणसाच्या इच्छा-आकांक्षाना वैधमार्गाने पूर्ण करण्याची क्षमता याच जीवनशैलीमध्ये आहे. उदा. इस्लाम वगळता इतर जीवनशैलींमध्ये ब्रह्मचर्याला पवित्र मानले जाते. सन्यास घेण्यास उत्कृष्ट मानले जाते. त्याशिवाय मोक्ष प्राप्त होतच नाही असेही मानले जाते. या उलट इस्लाममध्ये संसारिक जीवन जगूनही मोक्षप्राप्त करता येतो अशी मान्यता आहे. ब्रह्मचर्य किंवा सन्यस्त जीवन ही प्राकृतिक व्यवस्था नसून असे जीवन जगणाऱ्या अनेक फादर आणि जोगीनींंचे अनैतिक प्रकरणे सातत्याने समोर येत असतात. या उलट इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांच्या लैंगिक गरजांना सनदशीर मार्गाने पूर्ण करण्याची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे.
ही जीवनशैली प्राकृतिक आहे, असा दावा कुरआन खालील शब्दात करतो. ’’आता हे लोक अल्लाहच्या आज्ञापालनाची पद्धत (ईश्वरीय दीन) सोडून इतर एखादी पद्धत इच्छितात? वास्तविक पाहता आकाश आणि पृथ्वीमध्ये जे काही आहे ते आपणहून किंवा अपरिहार्यपणे ईश्वराला समर्पित झालेले आहेत. आणि त्याच्याकडेच एक दिवस परत जावयाचे आहे’’ (संदर्भ : सुरे आलेइमरान आयत क्र. 83).
ही जीवनशैली प्राकृतिक आहे. याचा दूसरा दावा कुरआनमध्ये असा करण्यात आलेला आहे की, जीवन जगण्याचा हाच सत्य आणि न्यायपूर्ण मार्ग आहे. ’’वस्तुतः तुमचा पालनकर्ता अल्लाहच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले, मग आपल्या सिंहासनावर (अर्श) विराजमान झाला. जो रात्रीला दिवसावर झाकतो व परत दिवस रात्रीच्या पाठीमागे धावत येतो. ज्याने सूर्य, चंद्र व तारे निर्माण केले, सर्व त्याच्या आदेशाच्या अधीन आहेत. सावध रहा त्याचीच सृष्टी आहे व त्याचाच हुकूम आहे. फार समृद्धशाली आहे अल्लाह, सर्व विश्वाचा मालक व पालनकर्ता.’’ (संदर्भ : सुरे आराफ आयत क्र. 54).
या आयातीमध्ये केलेल्या दाव्यामध्ये एक महत्त्वाच्या मुद्याकडे ईश्वराने मानवाचे लक्ष वेधलेले आहे की, माणसाला सोडून इतर सर्व गोष्टी या ईश्वरीय आदेशाने बांधलेल्या आहेत. उदा. दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर परत दिवस येतो, सूर्य, चंद्र, तारे हे आपल्या ठरलेल्या गतीमध्ये व कक्षेत परिक्रमा करीत आहेत. पृथ्वी आणि आकाशामध्ये जे काही आहे ते त्याच्याच मालकीचे आहे आणि त्याच्याच आदेशाचे पाबंद आहेत. फक्त माणूसच हा उत्कृष्ट जीव असल्यामुळे ईश्वराने त्याला बुद्धी देऊन त्यानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र बहुतेक लोक या स्वातंत्र्याचा ईश्वराच्या मर्जीविरूद्ध उपयोग करून स्वतःचे आणि स्वतःबरोबर इतरांचे जीवन संकटात टाकत आलेले आहेत. कोविड ही अशाच संकटापैकी एक संकट असल्याचा अंदाज अनेक साथीच्या रोगाच्या तज्ज्ञ लोकांचा आहे. कारण मानवीय इतिहासामध्ये असे कधीच झालेले नाही की, एका विशिष्ट अशा रोगाची साथ जागतिक स्तरावर एकदाच आलेली आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वातावरण असते. म्हणून साथीच्या विषाणूंना जे वातावरण अनुकूल असते साथ त्याच ठिकाणी पसरते. कोविड मात्र अपवाद आहे. तो सर्वच वातारणात सारखीच हानी पोहोचवत आहे. म्हणून हे संकट मानवनिर्मित असावे.
सुरे बकराच्या 130 व्या आयातीमध्ये ईश्वराने पाचवा दावा असा केलेला आहे की, त्याने आपल्या प्रेषितांमार्फत जे ज्ञान दिलेले आहे तेच खरे ज्ञान आहे व खरा उपदेश आहे. अर्थात त्यातच मानवाचे हित लपलेले आहे. नेमक्या शब्दात सांगायचे तर ईश्वर म्हणतो, ’’ जो स्वतःला अज्ञानी बनवील तोच इब्राहीम (अलै.) च्या धर्माकडे पाठ फिरवील. निःसंशय आम्ही त्याला जगामध्ये आमचे कार्य करण्यासाठी निवडले होते आणि परलोकामध्येही याची गणना सदाचाऱ्यांमध्ये होईल.’’
बहुतेक आनंदाच्या घटना होणार आहेत, याचा माणसाला अगोदरपासूनच अंदाज असतो. उदा. एक तारखेला पगार येणार आहे. अमूक तारखेला लग्न होणार आहे. मात्र बहुतेक दुःखाच्या घटना अचानक घडतात. उदा. अपघात होणे, चोरी होणे, कोविडने मृत्यू होणे. दुःखाच्या घटना घडल्यानंतर एक श्रद्धावान मुस्लिम तीन प्रकारे व्यक्त होतो. एक दुःखाच्या काळात तो ईश्वराच्या अधिक जवळ जातो. दोन- तो हा विचार करतो की, दुःखाची घटना छोटी आहे, याच्यापेक्षाही मोठी घटना घडू शकली असती. तीन - प्रत्येक दुःखानंतर सुख येणार, याची खात्री ईश्वरानेच दिलेली आहे. थोडक्यात सुख आणि दुःख दोन्हीमध्ये संतुलन ठेऊन तो नेहमी ईश्वराचे धन्यवाद करणारा बनतो. येणेप्रमाणे एका मुस्लिमाचे जीवन, आनंद असो का दुःख संतुलित होऊन जाते. तो भौतिक गोष्टीही कमावतो सोबत मोक्ष प्राप्तीचा विश्वासही ठेवतो.
जगामध्ये स्त्रीयांच्या बाबतीत कोणत्याही जीवनशैलीमध्ये सुरक्षा आणि सन्मानाची खात्री दिलेली नाही. ती फक्त इस्लाममध्ये आहे. इस्लामच्या छत्रछायेखालीच स्त्री सुरक्षित आहे. ती कशी सुरक्षित आहे हा वेगळा विषय आहे. त्यावर पुन्हा कधी चर्चा करू. इस्लामी जीवनशैलीचे एक वैशिष्ट्ये हे आहे की, ही जीवनशैली पूर्णपणे अंगीकारल्यावरच त्याचे चांगले परिणाम अनुभवता येतात.
- एम.आय.शेख
प्रेषितांची वास्तविकता
परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला काही न काही गुण दिलेले आहेत. काही व्यक्तीत जन्मतःच नेतृत्वक्षमता असते काहींचे गणितात हात चांगले असते काही नवनवीन आविष्कार करत असतात.
या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त इंजिनियर, डॉ्नटर, वैज्ञानिक, व्यापारी इ.चीच गरज आहे असे नाही. अश्या व्यक्तींची पण गरज आहे की जो परमेश्वराचा मार्ग दाखवेल जेणेकरून मनुष्य नेहमी राहणारे यश संपादित करू शकेल. अश्या व्यक्तीत परमेश्वराला ओळखण्याची क्षमता खूप होती. परमेश्वराने या व्यक्तींना ईश्वरी ज्ञान दिले व त्याचा प्रसार मानवांत करण्यास सांगितले. हे व्यक्ती म्हणजेच परमेश्वराचे प्रेषित / पैगंबर.
प्रेषितांची ओळख :
ज्याप्रमारे महान व्यक्ती काही न काही विशेष गुण घेऊन जन्माला येतात त्याप्रमाणेच प्रेषित ही काही विशेष गुणासह जन्माला येतात.
एखादा व्यक्ती जन्मतःच कवी असतो. एखाद्या व्यक्तीत भाषण कला असते. एक व्यक्ती जन्मतःच नेतृत्व करणारा असतो. त्यांना आपण लगेच ओळखू शकतो. याचप्रमाणे प्रेषितांचेही असते. प्रेषित जे बोलतात त्याचा विचार सामान्य व्यक्ती कधी करूच शकत नाही. त्यांची नजर सूक्ष्म असते. तो जे काही बोलतो त्याला आपले मन मानते. जगाच्या अनुभवावरून व विश्वावर दृष्टीक्षेप टाकल्यास प्रेषितांचे बोलणे आपल्याला पटते.
प्रेषितांचे व्यक्तीमत्व व चारित्र्य पवित्र असते. तो खरा बोलणारा सभ्य असतो. तो कधी चुकीची गोष्ट बोलत नाही. तो वाईट काम करत नाही. नेहमी चांगले कर्म करण्याची शिक्षा इतरांना देतो. तो दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतः नुकसान करवून घेतो. प्रेषितांमध्ये कुठल्याही प्रकारचे दुर्गूण नसतात. ते सर्वगुणसंपन्न असतात. या गोष्टी बघून ओळखले पाहिजे की हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे.
प्रेषितांप्रती आज्ञाधारकपणा
जेव्हा आपल्याला माहित होते की, हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणे. त्यांची आज्ञापाळणे व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक असते.
एखादा व्यक्ती प्रेषितांना मानतो पण त्यांची आज्ञा पाळत नाही तर तो मूर्ख आहे. प्रेषित जो बोलतो आहे ते परमेश्वराचे बोल असतात व परमेश्वराचे बोल नेहमी सत्यच असतात हे जाणून देखील तो व्यक्ती प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टींच्या विरूद्ध काम करतो.
आपल्याला परमेश्वराचे ज्ञान मिळवायचे असल्यास आपल्याला ते प्रेषितांकडून मिळवावे लागेल व त्यासाठी आपला खरा प्रेषित कोण हे ओळखावे लागेल. चुकीच्या माणसाला आपण प्रेषित मानले तर तो आपल्याला चुकीचा मार्ग दाखवेल. खरा प्रेषित कोण हे ओळखल्यानंतर त्याची आज्ञा पाळावी.
प्रेषितांवर विश्वास ठेवण्याची गरज...
जेव्हा आपल्याला माहित होते की खरा मार्ग तोच जो प्रेषितांनी सांगितलेला आहे तेव्हा प्रेषितांवर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती प्रेषितांना प्रेषित मानतो पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांची आज्ञा पाळत नाही असा व्यक्ती काफिर तर आहेच पण मूर्खही आहे. कारण त्याला सत्य काय हे माहित असूनही तो त्याचा स्विकार करत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला प्रेषितांची आज्ञा पाळायची गरज नाही. आम्ही आमचा मार्ग स्वतः शोधू. गणितात जसे दोन बिंदूंना जोडणारी एकच रेषा असते तसेच माणसाला व परमेश्वराला जोडणारा मार्गही एकच आहे तो म्हणजे ’सिराते मुस्तकीम’(सत्य मार्ग). प्रेषितांनी सांगितलेला मार्ग हाच ’सिराते-मुस्तकीम’ आहे. इतर सर्व मार्ग चुकीचे आहेत.
पण जो व्यक्ती प्रेषितांवर विश्वास ठेवत नाही त्याला परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्गच सापडणार नाही. प्रेषित हे परमेश्वराने पाठवलेले असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळावी लागते. जे प्रेषितांवर विश्वास ठेवत नाहीत ते बंडखोर असतात. जो व्यक्ती परमेश्वराला मानतो पण त्याने पाठवलेल्या प्रेषिताला नाही तर तो काफिर आहे.
प्रेषितांचा इतिहास...
आपल्याला माहितच असेल की अल्लाहने सर्वात प्रथम एक मानव तयार केला व त्या मानवापासूनच त्याचा जोडीदार जन्माला घातला व त्या दोघांपासून मानवजातीचा जन्म झाला. मोठमोठे वैज्ञानिक ही मानतात की माणवाचे वंशज हे एकच आहेत.
इस्लाममध्ये या मानवाला ’आदम’ (अलैहि.) म्हणतात. या शब्दातूनच हिंदीतील ’आदमी’ शब्द निघतो. अल्लाहने सर्वप्रथम आदम (अलैहि.) ला बनवले व त्यांना आज्ञा केली की त्यांनी आपल्या संततीला इस्लामचे शिक्षण द्यावे. परमेश्वर एक आहे व त्याचीच पूजा करावी. त्याच्यासमोरच नतमस्तक व्हावे, त्याच्याशीच मदत मागावी आणि चांगले जीवन जगावे, हे ज्ञान संततीला द्यावे व यापासून भरकटाल तर त्याची शिक्षा मिळेल, याचीही कल्पना द्यावी.
हजरत आदम (अलैहि स.) यांची जी संतान चांगली निघाली त्यांनी आपल्या पित्याची शिकवण लक्षात ठेवली पण जी वाईट संतान होती त्याने सत्याचा मार्ग सोडला व काहींनी सूर्य, चंद्र, हवा, आग इत्यादींची पूजा चालू केली. यामुळे मूर्तीपूजा वाढीस लागली. आदम (अलैहि.)चे वंशज संपूर्ण जगात पसरले व त्यांचे वेगवेगळे वंश बनले. हे आता परमेश्वराला व त्याच्या नियमांना विसरले. त्यांनी सद्सद्विवेक बुद्धीचा त्याग केला.
आता अल्लाहने प्रत्येक वंशात आपले प्रेषित पाठवल्यास सुरूवात केली. या प्रेषितांनी आदम अलै. ने दिलेल्या शिक्षणाची आठवण या वंशांना करून दिली. त्यांना मूर्तीपूजेपासून रोखले. चुकीच्या रीवाजांपासून रोखले. परमेश्वराच्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. जगाच्या प्रत्येक भागात भारत, चीन, ईरान, ईराक, युरोप प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने आपले प्रेषित पाठवले व तेथील लोकांना ईश्वरी ज्ञान दिले. त्या सर्व प्रेषितांचा धर्म इस्लामच होता. मानवजातीचा सुरूवातीला तेवढा विकास झालेला नव्हता त्यामुळे त्यांना ईश्वरी ज्ञानही साध्या प्रकारचे दिले गेले. पण सर्व प्रेषितांचा संदेश एक ईश्वराची पूजा करणे समाजात चांगली माणसे वाढवणे व वाईट प्रवृत्ती नष्ट करणे हा होता.
प्रेषितांसोबत मानवाने वेगळाच हिशोब ठेवला. सुरूवातीला त्यांना त्रास दिला. त्यांची शिक्षा मानण्यास निकार दिले. काहींचा बहिष्कार केला. काहींचे खून केले. -(उर्वरित आतील पान 7 वर)
काही प्रेषितांना जीवनभर कष्ट करून हाताच्या बोटावर मोजण्या इतके अनुयायी भेटले तरीपण परमेश्वराचे पाठवलेले हे व्यक्ती आपले काम करत राहिले. काही प्रेषितांचा प्रभाव एवढा होता की एक संपूर्ण राज्य त्यांचे अनुसरन करू लागले. आता प्रेषितांच्या जाण्यानंतर काहींनी त्यांच्या शिक्षणात बदल केला. त्यांच्या ईश्वरी ग्रंथात स्वतःकडून काही लिहिले. काहींनी प्रेषितांची पूजा सुरू केली. कोणी प्रेषितांनाच ईश्वर मानायला लागले. काही प्रेषितांना ईश्वराचा मुलगा मानायला लागले. अशा परिस्थितीत नंतरच्या लोकांना प्रेषितांची खरी शिकवण मिळणे अवघड होते.
प्रत्येक प्रेषितांनी आपापल्या लोकांत चांगूलपणा सतप्रवृत्ती चांगले आचरण या गोष्टी शिकविल्या व वेगवेगळ्या वंशांना तयार केले की जगात एक धर्म पसरवला जाऊ शकेल जो संपूर्ण मानवजातीसाठी आहे.
जे काही प्रेषित आले होते ते एका विशिष्ट देशाकरिता वंशाकरिता आले होते. त्यांची शिकवण त्या भूभागापूर्तीच मर्यादित होती. वेगवेगळ्या राष्ट्रांत देवाणघेवाण नव्हती. अशा परिस्थितीत सर्व मानवजातीसाठी शिकवण या सर्व राष्ट्रांत पसरवणे अवघड होते. तसेच या राष्ट्रातील लोकांत अज्ञान वाढले होते. त्यांच्या व्यक्तीमत्वात बिघाड झाले होते. त्यामुळे परमेश्वराने हळूहळू सर्व राष्ट्रांत आपले प्रेषित पाठवून त्यांना सरळ मार्गावर आणले. आता मानवजातीचा विकास झालेला आहे.
वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांचे एकमेकांशी संबंध येऊ लागले. व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत संचार वाढला. लोकांत काही प्रमाणात साक्षरता वाढली. याच काळात मोठमोठे राजे, बादशाह झाले त्यांनी त्यांनी आपले साम्राज्य बनवले. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा एकमेकांशी संबंध येऊ लागला. आजपासून अडची हजार वर्ष पूर्वी अशी परिस्थिती होती की संपूर्ण मानवजातीसाठी एकच धर्माची गरज वाढू लागली होती. बौद्ध धर्म एक संपूर्ण धर्म नव्हता, त्याच्यात आचरणाचे नियम होते. हा धर्म भारतातून निघून चीन, जापान व मंगोलियापर्यंत प्रसार पावला. या धर्माचे धर्मगुरू वेगवेगळ्या देशांत जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचे. याच्या काही शतकानंतर ख्रिश्चन धर्म उदयास आला. हजरत ईसा (अलैहि.) इस्लामचे शिक्षण घेऊन आले होते. परंतु, लोकांनी त्यांच्यानंतर ख्रिश्चन हा अपूर्ण धर्म बनवला. व ख्रिश्चन लोकांनी हा धर्म अफ्रिका, युरोप व दूरदूरच्या प्रदेशांत हा धर्म प्रसारला. यावरून असे लक्षात येते की जग स्वतःला यावेळी एक सर्वांसाठी असलेल्या धर्माची मागणी करत होता. यासाठी त्यांनी अपूर्ण धर्मांचाही स्विकार केला व त्याचा प्रसार केला. क्रमशः...
- अबु सकलैन रफिक अहमद पटेल,
लातूर
9860551773
पदोन्नतीतील आरक्षणाचा पेच
एकीकडे मराठा आरक्षणाचा पेच कायम असताना राज्यात आता पदोन्नतीतील आरक्षणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होताच पदोन्नतीत अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागासप्रवर्ग, भटक्या व विमुक्त जाती यांना असलेले ३३ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यामुळे मंत्रीमंडळातील मराठा समाज व अन्य समाजातील मंत्र्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर येण्याची लक्षणे आहेत. विजय वडेट्टीवार सारखे इतर मागासवर्गीय समाजातील नेते बहुजन कल्याण मंत्री असल्याने ते मराठा समाजाला आरक्षणाव्यतिरिक्त इतर लाभ मिळू देत नाही, असा प्रचार त्यांच्याविरूद्ध करण्यात आला. सारथी संस्थेवरून त्यांना लक्ष्य करण्यात आले. मराठा समाजाच्या काही नेत्यांनी मराठेतर नेतृत्वाबद्दल अविश्वास निर्माण केला. सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतरही मराठा समाजातील काही नेत्यांनी आमची भर्ती नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही म्हणत राज्य सरकारच्या विविध नोक-यांमधील भर्ती प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजासाठी राखीव जागा वगळून इतर जागा भरण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्यावर त्यालाही न्यायालयात आव्हान दिले गेले. याउलट पदोन्नतीतील आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असताना राज्य मंत्रीमंडळातील मराठेतर मंत्र्यांना अंधारात ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेवरून कालपर्यंत पदोन्नतीत असणारे आरक्षण न्यायालयात रद्द व्हायच्या आधी रद्द कररण्यात आले. पदोन्न्तीतील आरक्षणाला अजितदादांच्या असलेल्या विरोधाची कल्पना राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सर्वांना आहे. तरीही त्यांनाच पदोन्नतीतील आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद देण्यात आले, हा एक विरोधाभास आहे. महाविकास आघाडी सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीच्या शिफारशींची गंभीरपणे अंमलबजावणी न करून एकप्रकारे राज्यातील मागासवर्गियांची फसवणूक केली आहे. मंत्रीमंडळ उपसमितीची फेररचना करून दलित वा बहुजन समाजातील मंत्र्याला या समितीचे अध्यक्षपद दिले जावे अशी मागणी आता केती जातेय. यावरून मंत्रिमंडळातील काहींचा अजित पवारांवर या बाबतीत विश्वास नाही, हे स्पष्ट आहे. मराठा समाज जर दलित-ओबीसी नेतृत्वावर विश्वास दाखवायला तयार नाही तर मग या घटकांनी तरी मराठा नेतृत्वावर कसा विश्वास दाखवायचा, हा प्रश्न आता निर्माण होत आहे. काँग्रेसने या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याने भविष्यात हे आरक्षण कायम ठेवण्याची वेळ सरकारवर येईल अशी शक्यता आहे.
नमामि नव्हे शवामि गंगे
भारतीयांसाठी विशेषतः हिंदूंसाठी अतिशय पवित्र मानली जाणा-या गंगा नदीत वाहत्या शवांनी देशभर खळबळ माजवली आहे. भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील गंगा किना-यावरील ११४० किमीच्या पट्ट्यात २ हजार प्रेत नदीकिना-यावरील वाळूंमध्ये पुरलेले आढळले. कानपूर, उन्नाव, प्रयागराज, प्रतापगड, कन्नोज या जिल्ह्यांमध्ये हे प्रेत आढळले. याशिवायही नदीत तरंगणा-या शेकडो प्रेतांची दृश्ये पाहूनही देश हादरला. अंत्यसंस्कारांची सोय नाही की मृतांचे आकडे लपवायचे म्हणून ही ‘राम तेरी गंगा मैली’ करणे सुरू आहे? कुंभमेळ्यात ज्या गंगेत स्नान केले जाते त्याच गंगेत हजारो प्रेत सोडली जातात. आपण गंगेचा खरोखरच आदर करतो का? मृतदेह स़डल्याने ‘गंगाजल’ प्रदूषित होऊन विविध आजारांची लागण हे गंगाजल पिणा-या वा त्यात स्नान करणा-या वा पोहणा-या हजारो लोकांना होईल यात काही शंका नाही.
भाजपचीच सत्ता असलेल्या गुजरातमध्ये एक मार्च ते १० मे या काळात यावर्षी १.२३ लाख लोकांचा मृत्यू झाला. याच काळात गेल्यावर्षी ५८ हजार लोकांचा मृत्यू झाला. मात्र गुजरात सरकारने कोरोनामुळे या काळात केवळ ४२१८ लोक मेल्याचे जाहीर केले आहे. मग १.२० लाख लोक कशाने मेले? कोरोना किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्याशिवाय ७० दिवसात जवळपास सव्वा लाख मरणे शक्य नाही. यावरून स्पष्ट आहे की भाजपशासित राज्यात कोरोना बळींची आकडेवारी दडवली जातेय. गुजरात सरकारची ही चोरी दैनिक भास्करने उघडकीस आणल्यानंतर पतंप्रधान मोदींनी राज्यांनी आकडे लपवू असे तोंडदेखले आवाहन केले. देशाच्या पंतप्रधानांना गुजरातमधील, उत्तरप्रदेशातील ही लपवालपवी माहित होती. मात्र त्यांची, भाजपची व भाजपच्या राज्यातील सरकारांची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून ही आकडेवारीची चोरी चालू होती. भाजपचीच सत्ता असलेल्या गोवा राज्यात तीन दिवसात ७० कोरोना रूग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झालाय. ज्या पक्षाला गोवा सारख्या छोट्या राज्यातही कोरोना स्थिती सांभाळता येत नाही तो देशातील परिस्थिती कशी सांभाळेल?
भाजपशासित राज्ये कोरोनाने होणारे मृत्यू लपवत असताना त्याबद्दल एक शब्दही न काढणारे विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू वा बाधित असल्यावरून थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून स्वतःला पुन्हा एकदा हास्यास्पद ठरवले आहे. नाशिकमधील रूग्णांनी ज्या शब्दात त्यांची खिल्ली उडवली तशी आता समाजमाध्यमांवर, खासगी चर्चेत त्यांची खिल्ली उडवली जाऊ लागली आहे. देशात लसींची गरज असताना ६.६ कोटी लशी विदेशात पाठवण्याच्या मोदी सरकारच्या कृतीला पोस्टर लावून आक्षेप घेतल्याच्या आरोपाखाली मोदी सरकारने आजवर १५ लोकांना अटक केली आहे. यातील बहुसंख्य गरीब व कामगार वर्गातील आहे. इतक्या आपत्तीच्या परिस्थितीतही मोदी सरकार टीकेचा एक स्वर सहन करायला तयार नाही ही तर हुकूमशाही झाली.
“ तुम्हारी अर्थिया उठे,पर ध्यान रहे,
मेरे लिये है जो सजी, वो सेज ना खराब हो!
यह बादशाह का हुक्म है,और एक हुक्म यह भी है
कि चाहे कोई भी मरे, मेरी इमेज ना खराब हो!’’
पुनीत शर्मा यांची ही कविता मोदींच्या कार्यशैलीचे समर्पक वर्णन करते. मोदी सरकारच्या चुकांमुळे आजवर देशातील २ लाख ७० हजाराहून अधिक लोकांना अधिकृतरीत्या कोरोनाच्या माध्यमातून मोदी सरकारने ‘मृत्यूदंड’ ठोठावलाय. (गुजरातसारख्या राज्याने लपवलेली आकडेवारी पाहता ही अधिकृत संख्या किमान एक दीड लाखांनी कमी वाटते)
नामवंत चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रकाश झा यांनी निर्माण केलेले ‘आरक्षण’, ‘मृत्यूदंड’ व ‘गंगाजल’ हे चित्रपट सध्या प्रत्यक्ष राजकीय, सामाजिक जीवनात जणू घडत आहेत, असे ही सर्व परिस्थिती पाहून नाईलाजाने म्हणावेसे वाटते!
- प्रमोद चुंचूवार
०९८७०९०११८५
(लेखक 'अजिंक्य भारत'चे राजकीय संपादक आहेत)
हस्ताक्षरकर्ता-
1. मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी, जनरल सेक्रेट्री आल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड
2. मौलाना महमूद असद मदनी, जनरल सेक्रेट्री -जमीअत ए उलमा ए हिन्द
3. सय्यद सआदतुल्लाह हुसैनी, अध्यक्ष- जमाअत ए इस्लामी हिन्द
4. मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी, डायरेक्टर -इमाम वलीउल्लाह इंस्टिट्यूट दिल्ली
5. मौलाना मुहम्मद सुफियान कासमी, मुहतमिम -दारुल उलूम देवबंद(वक्फ)
6. डॉ. मंज़ूर आलम, जनरल सेक्रेट्री आल इंडिया मिल्ली कौंसिल
7. डॉ. के सी त्यागी , मेंबर एक्झिक्युटव्ह कमिटी ऑफ पार्लमेंटएरिरियन फॉर अल्कुदस
8. जनाब विनये कुमार , सेक्रेटरी जनरल , प्रेस क्लब ऑफ इंडिया
9. महरिषी भरेगुपथडेश्वर गोसावी सुशील जी महाराज, नॅशनल कंवेनोर, भारतीय सर्व धर्म संसद
10. श्री संतोष भारतीय , सिनियर जर्नालिस्ट
11. डॉ. एम डी थॉमस , फौंडर डायरेक्टर इन्स्टिट्युट ऑफ हार्मनी अँड पीस , न्यू देल्ही.
- सुनिलकुमार सरनाईक
संपादक- करवीर काशी, कोल्हापूर
भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहेत.)
(२८) हे श्रद्धावंतांनो! अनेकेश्वरवादी अपवित्र आहेत, म्हणून या वर्षानंतर हे माqस्जदे हरामजवळ फिरकतादेखील कामा नये२५ व जर तुम्हाला हलाखीची स्थिती येण्याचे भय वाटत असेल तर दूर नव्हे की अल्लाहने इच्छिले तर त्याने आपल्या कृपेने तुम्हाला श्रीमंत करावे. अल्लाह सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे.
(२९) युद्ध करा ग्रंथधारकांपैकी त्या लोकांविरूद्ध जे अल्लाहवर व मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवत नाहीत,२६ आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराने जे काही निषिद्ध ठरविले आहे त्याला निषिद्ध करीत नाहीत,२७ आणि सत्य धर्माला आपला धर्म (दीन) बनवीत नाहीत. (त्यांच्याशी युद्ध करा) इथपावेतो की त्यांनी स्वहस्ते जिझिया (रक्षा-कर) द्यावा व छोटे (अधीनस्थ) बनून राहावे.२८
(३०) यहुदी म्हणतात की ‘उजैर’ अल्लाहचा पुत्र आहे,२९ आणि ‘इसाई’ म्हणतात की मसीह (येशू) अल्लाहचा पुत्र आहे. या अवास्तव गोष्टी आहेत ज्या ते आपल्या तोंडातून काढतात, हे त्या लोकांचे अंधानुकरण आहे, जे त्यांच्यापूर्वी द्रोहामध्ये गुरफटले होते.३० अल्लाहचा कोप त्यांच्यावर. कोठून हे बहकविले जात आहेत.
(३१) यांनी आपल्या धर्मपंडितांना व संतांना अल्लाहशिवाय आपला पालनकर्ता (प्रभू) बनविले आहे,३१ आणि अशाचप्रकारे मरयमपुत्र मसीहलादेखील. वास्तविक पाहता त्यांना एक उपास्याशिवाय इतर कोणाचीही भक्ती करण्याचा आदेश दिला गेला नव्हता, तो ज्याच्यशिवाय इतर कोणीही भक्तीचा अधिकारी नाही, पवित्र आहे तो त्या अनेकेश्वरवादी गोष्टींपासून ज्या हे लोक करीत आहेत.
२५) म्हणजे भविष्यात त्यांचा हज आणि जियारत फक्त बंद नाही तर मस्जिदे हरामच्या सीमेतसुद्धा त्यांचा प्रवेश बंद आहे, जेणेकरून अनेकेश्वरत्व आणि अज्ञानता पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता शिल्लक राहणार नाही. `नापाक' (अपवित्र) म्हणजे ते स्वत: अपवित्र आहेत असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांचे विश्वास, आस्था, त्यांचा चरित्र, त्यांचे कर्म आणि जीवन व्यतीत करण्याची अज्ञानतापूर्ण व्यवस्था अशुद्ध आहे आणि याच अशुद्धतेमुळे ते हरमच्या सीमेत प्रवेश करू शकत नाहीत. इमाम शाफई (रजि.) यांच्याजवळ या आदेशाचा उद्देश आहे की ते मस्जिदे हराममधे प्रवेश करू शकत नाहीत. इमाम अबू हनीफा (रह.) यांच्यानुसार, ते हज, उमरा आणि अज्ञानतापूर्ण रूढी-परंपरा कार्यान्वित करण्यासाठी हरमच्या सीमेत प्रवेश करू शकत नाहीत. इमाम मालिक (रह.) यांच्या मते केवळ मस्जिदे हरामच नव्हे तर कोणत्याच मस्जिदमध्ये त्यांचा प्रवेश निषिद्ध आहे. परंतु हे शेवटचे मत खरे व योग्य नाही, कारण पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत: मस्जिदे नबवीमध्ये अनेकेश्वरवादींना प्रवेश करण्याची अनुमती दिली होती.
२६) ग्रंथधारक जरी अल्लाह आणि परलोकवर विश्वास ठेवण्याचा दावा करतात परंतु सत्य तर हे आहे की ते अल्लाह व परलोकावर ईमान राखत नाहीत. अल्लाहवर ईमान राखण्याचा अर्थ हा नाही की मनुष्याने मानावे की अल्लाह आहे. याचा अर्थ तर हा आहे की, मनुष्याने अल्लाहला एकमेव उपास्य आणि एकमेव पालनहार मानावे आणि अल्लाहचे अस्तित्व, त्याचे गुण, त्याचे हक्क आणि अधिकारात स्वत: भागीदार बनू नये किंवा दुसऱ्यांना भागीदार ठरवू नये. इसाई आणि यहुदी हे दोन्ही हा अपराध करतात. नंतरच्या आयतीमध्ये याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. म्हणून त्यांचे अल्लाहला मानणे निरर्थक आहे आणि याला कदापि ``अल्लाहवर ईमान'' म्हटले जाऊ शकत नाही. याचप्रकारे आखिरत (परलोक) चा अर्थ हा होत नाही की मनुष्याने मान्य करावे की मृत्यूपश्चात मनुष्याला पुन्हा जिवंत केले जाईल. परंतु यासह हे मान्य करावे लागते की येथे शिफारसचे कोणतेच प्रयत्न, एखादी देणगी एखाद्या संताशी असलेले संबंध कामी येणार नाही आणि कोणी दुसऱ्याचे प्रायश्चित बनणार नाही. अल्लाहच्या न्यायालयात खरा न्याय होईल. मनुष्याचे ईमान आणि कर्माशिवाय इतर कशाचाच विचार केला जाणार नाही. या विश्वासाशिवाय परलोकला मानणे निरर्थक आहे. परंतु यहुदी आणि िख्र्तासी लोकांनी याच दृष्टीने आपले विश्वास आणि आस्थांना खराब केले म्हणून त्यांचा परलोकवरील विश्वाससुद्धा अमान्य आहे.
२७) म्हणून या शरियतला आपल्या जीवनाचे नियम बनवत नाही जी अल्लाहने आपले पैगंबर मुहम्मद (स.) द्वारा अवतरित केली आहे.
२८) म्हणजे युद्धाचा उद्देश हा नाही की त्यांनी ईमान धारण करावे आणि सत्यधर्माचे अनुयायी बनावेत. युद्धाचा उद्देश हा आहे की त्यांची स्वायत्तता आणि श्रेष्ठता समाप्त् व्हावी. ते पृथ्वीवर शासक आणि सत्ताधारी बनून राहू नयेत तर पृथ्वीव्यवस्थेची सत्ता आणि शासनाधिकार व नेतृत्व सत्य धर्मियांच्या हातात यावेत आणि हे लोक त्यांचे आश्रित बनून व आज्ञापालक बनून राहावेत. `जिझिया' (रक्षाऱ्कर) मोबदला आहे त्या आश्रयाचा आणि रक्षणाचा जे जिम्मीना (इस्लामी राज्याची मुस्लिमेतर प्रजा) इस्लामी राज्यात दिले जाते. तसेच ती निशाणी आहे की हे लोक आदेशाधीन राहण्यास राजी आहेत. `हाताने जिझिया देणे' म्हणजे सरळ सरळ आज्ञापालन करून प्रतिष्ठेने जिझिया देणे आहे. `लहान बनून राहणे' म्हणजे पृथ्वीवर मोठे (श्रेष्ठ) ते नाहीत तर ईमानधारक मोठे आहेत जे अल्लाहचे प्रतिनिधी (खलीफा) असण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. सुरवातीला हा आदेश यहुदी व िख्र्तासी लोकांसाठी दिला गेला होता. नंतर स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मजूसींकडून जिझिया घेऊन त्यांना जिम्मी बनविले. यानंतर सहाबा (रजि.) यांनी सर्वसंमतीने अरबच्या बाहेरील सर्व राष्ट्रांवर या आदेशाला लागू केले. हा जिझिया ज्याच्यासाठी मोठमोठे क्षमायाचनात्मक वादविवाद एकोनावीसाव्या शतकाच्या युगात मुस्लिमांकडून केले गेले. त्या युगातील काही लोक आजपण आहेत जे खुलासे देतात. परंतु अल्लाहचा दीन (जीवनपद्धत) यापेक्षा अत्युच्च् व श्रेष्ठ आहे की अल्लाहच्या विद्रोहीसमोर या जीवनपद्धतीला विवश होण्याची काहीच गरज नाही. साधे सरळ तत्त्व आहे की जे लोक अल्लाहने अवतरित जीवनपद्धतीचा स्वीकार करीत नाहीत आणि स्वत: निर्मित किंवा दुसऱ्यांकरवी निर्मित मार्गावर चालतात, ते तर फक्त इतक्याच स्वायत्तेचे अधिकारी आहेत की ते स्वत: जितके अपराध करू इच्छितात ते करावेत. पंरतु यांना हा अधिकार नाही की अल्लाहच्या धरतीवर सत्ताधिश आणि शासनाधिकारी ते बनावेत, मनुष्याची जीवनव्यवस्था त्यांनी आपल्या मार्गभ्रष्टतेने बनवावी? आणि आपल्या या मार्गभ्रष्टतेवर लोकांना चालवावे? आणि लोकांची सामूहिक जीवनव्यवस्था आपल्या मार्गभ्रष्टतेनुसार चालवावी. सत्ताधिकार जिथे कोठे त्यांना प्राप्त् होईल तिथे बिघाड फैलावतच जाईल. अशा स्थितीत ईमानधारकांचे दायित्व असेल की त्यांना यापासून बेदखल करावे आणि त्यांना कल्याणकारी जीवनव्यवस्थेच्या आधीन करावे. आता प्रश्न उरतो की हा जिझिया काय आहे? याचे उत्तर म्हणजे जिझिया त्या स्वातंत्र्याची किंमत आहे जे त्यांना इस्लामी शासनव्यवस्थेत आपल्या मार्गभ्रष्टतेवर चालण्यास दिले जाते. या किमतीला (रकमेला) त्या कल्याणकारी शासन व्यवस्थेवर खर्च केली जाते जी त्यांना या स्वातंत्र्याला बहाल करते आणि त्यांच्या (जिम्मींच्या) अधिकांराची रक्षा करते. याचा मोठा फायदा म्हणजे जिझिया देताना दरवर्षी जिम्मी लोकांत ही भावना ताजी होते की अल्लाहच्या मार्गात जकात देण्यापासून ते असमर्थ आहेत आणि मार्ग भ्रष्टतेवर चालण्यासाठी आपण किंमत मोजत आहोत हे मोठे दुर्भाग्य आहे. याची जाण त्यांना दरवर्षी होत जाते.
२९) `उजैर' म्हणजे `एजरा' (एनठअ) आहे ज्यांना यहुदी आपल्या धर्माचे पुनर्स्थापक मानतात. त्यांचा काळ इ. पू. ४५० च्या आसपासचा दाखविला जातो. इस्त्राईली कथनानुसार आदरणीय सुलैमान (अ.) यांच्यानंतर जो परीक्षाकाळ बनीइस्राईलींवर आला होता. त्यात तौरात जगातून नाहीसा झाला होता. तसेच बाबिलच्या कैदेमुळे इस्राईली वंशाला आपले धर्मशास्त्र, आपल्या रूढी-परंपरा आणि राष्ट्रभाषा इबरानीपासून अनभिज्ञ केले होते. शेवटी याच उजेर किंवा एजरा याने बायबलच्या ``जुन्या करारा'ला पुन्हा व्यवस्थित केले आणि नवीन धर्मशास्त्र बनविले. याचमुळे इस्राईली लोक त्यांचा अतिसन्मान करतात आणि हा सन्मान या सीमेपर्यंत जाऊन पोहचला की काही यहुदी गटांनी त्याला (उजेर) अल्लाहचा पुत्र बनवून टाकले. येथे कुरआनचा अभिप्राय हा नाही की सर्व यहुदीनी एकत्रित येऊन एजरा यास खुदाचा पुत्र (बेटा) बनविले. कुरआन स्पष्ट करतो ते म्हणजे अल्लाहविषयी यहुदी लोकांच्या विश्वासामध्ये जो दोष निर्माण झाला तो या सीमेपर्यंत पोहचला की एजरा यास अल्लाहचा पुत्र बनविणारे त्यांच्यात जन्माला आले.
३०) म्हणजे मिस्र (इजिप्त्), यूनान, रोम, इराण आणि दुसऱ्या देशांतील लोक पूर्वी पथभ्रष्ट झालेले होते. त्यांचे तत्त्वज्ञान, अंधविश्वास व कल्पनांनी प्रभावित होऊन त्या लोकांनीसुद्धा तशीच भ्रष्ट धारणा स्वीकारली.
३१) हदीसकथन आहे की माननीय अदी बिन हातिम हे पूर्वी िख्र्तासी होते. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर होऊन इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्यांनी त्या वेळी जे प्रश्न विचारले होते त्यात हा प्रश्नसुद्धा विचारला की या आयतमध्ये आमच्यावर आमचे विद्वान आणि संतांना `ईश्वर' बनविण्याचा जो आरोप ठेवला गेला आहे त्याची वास्तविकता काय आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, ``काय हे सत्य नाही की हे लोक ज्यांना अवैध (हराम) ठरवितात त्यांना तुम्ही अवैध मानता. तसेच ज्यांना ते वैध (हलाल) ठरवितात त्यांना तुम्हीसुद्धा वैध (हलाल) मानता? त्यांनी सांगितले की हे तर आम्ही अवश्य करतो. पैगंबरांनी सांगितले, ``हेच कृत्य त्यांना `ईश्वर' बनविणे आहे.'' याने माहीत होते की अल्लाहच्या ग्रंथाने प्रमाणित न केलेल्या गोष्टी मानवी जीवनासाठी जे लोक वैध किंवा अवैध ठरवितात ते `ईशत्वाच्या' पदावर आपोआप विराजमान होतात. जे अशा लोकांनी निर्मित धर्मशास्त्राला (शरियत) मान्य करतात, ते त्यांना `प्रभु' स्वीकार करतात. हे दोन्ही आरोप म्हणजे एखाद्याला अल्लाहचा पुत्र ठरविणे आणि कुणाला धर्मशास्त्रनिर्मितीचा अधिकार देणे, यामुळे हेच सिद्ध होते की हे लोक अल्लाहवर ईमान ठेवण्याच्या दाव्यात खोटे आहेत. अल्लाहला हे मानतात परंतु त्यांची ईशधारणा चुकीची आहे ज्यामुळे ईश्वराला मानणे किंवा अमान्य करणे एकसारखे झाले आहे.
पवित्र कुरआनच्या शिकवणी येण्याआधी, अरबस्थानात विविध जाती-जमातींची व्यवस्था होती. प्रत्येकास आपल्या जमातीवर निष्ठा होती. संघटित समाज नव्हता. समाजाचे काही मापदंड विशिष्ट परंपरेवर आधारलेले होते. यासाठी सामाजिक, भौगोलिक सीमा, साधने, अर्थव्यवस्था, भावनात्मक आणि बौद्धिक परिमाण असावे लागते. यातला एकही निकष तत्कालीन अरब समाजाला लागू नव्हता. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सुरुवातीला समाजजीवनाच्या सुधारणेचे कार्य हाती घेतले. पवित्र कुरआनच्या मागदर्शक तत्त्वांनुसार शून्यातून नव्या समाजाची उभारणी करायची होती. त्या काळी अरबस्थानात सामूहिक जीवन नगण्य होते. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक जीवन जगत असे. म्हणून प्रेषितांनी वैयक्तिक जीवनात सुधारण घडवून आणल्या. पारंपरिक रुढी-श्रद्धांना तिलांजली दिली. यासाठी प्रेषितांना त्यांना आध्यात्मिक प्रशिक्षण द्यावे लागले. त्यांना पावन आणि पवित्र काय हे सांगिलते. अनिष्ठ रुढी-परंपरा नष्ट केल्या. प्रेषितांनी ज्या शिकवणी त्यांना देण्यास सुरू केली त्यांचा प्रभाव अनुयायांवर अनन्यसाधारण पडला. ते प्रेषितांकडे येऊन आपला गुन्हा कबूल करायचे आणि त्यांना पावन करण्यास प्रेषितांकडे विनंती करायचे. एका अनुयायीचे उदालरण असे की ते एकदा प्रेषितांचकडे आणि म्हणाले, मी चुकलो. माझ्याकडून व्यभिचार झाला आहे. मला शिक्षा करा. प्रेषितांनी त्यांना तीन वेळा परत पाठवले. त्यांच्या कुटुंबियांना विचारले असता ते म्हणाले की ते व्यवस्थित आहेत. परत चौथ्यांदा जेव्हा ते प्रेषितांकडे आले तेव्हा त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. एका महिलेचेदेखील असेच उदाहरण आहे. तिच्याकडूनही अशाच स्वरूपाचा गुन्हा घडला होता. त्यांनी प्रेषितांकडे शिक्षा करण्याची विनंती केली. प्रेषित म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर या. जन्मलेले मूल कडेवर घेऊन त्या परत आल्या. प्रेषित म्हणाले, हे बाळ जेव्हा अन्न खाऊ लागेल तेव्हा या. त्या परत गेल्या आणि दोन वर्षांनी मुलाच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन परत आल्या आणि प्रेषितांकडे हट्ट धरला की आता तरी मला शिक्षा करा. आणि मग प्रेषितांनी त्यांना शिक्षा दिली – तीच मृत्युदंडाची! म्हणजे प्रेषितांचे अनुयायांना पवित्र जीवन जगण्याची किती उत्कटता होती हेच या उदाहरणांवरून दिसून येते. मापतोल करताना पुरेपूर मापून द्या. तोलताना प्रामाणिक राहा. जे तुम्हाला माहीत नाही अशा गोष्टीमागे पडू नका. ऐकणे, पाहणे आणि मनात ठेवणे या सर्वांविषयी विचारले जाईल. पृथ्वीवर उद्दामपणे संचार करू नकोस, तुम्ली पर्वतांएवढी उंची गाठू शकत नाही की धरतीला दुभंगू शकणार नाही. (संदर्भ – पवित्र कुरआन, १७)
नातीप्रधान समाजव्यवस्था
पवित्र कुरआनच्या शिकवणीनुसार समाजव्यवस्था न पुरुषप्रधान आहे न स्त्रीप्रधान. इस्लामी समाजव्यवस्था नातीप्रधान आहे. या नात्यांच्या केंद्रस्थानी पहिले स्थान मातेचे आणि दुसरे पित्याचे. अल्लाहने मानवांची निर्मिती एका पुरुष आणि एका स्त्रीपासून केली. आणि मग त्यापासून संतती चालत येऊन एक समाज निर्माण होतो. या समाजाच्या रचनेत केंद्रस्थानी माता-पिता आणि नंतर रक्ताची नाती, जवळचे नातेवाईस, शेजारी असे करत हे वर्तुळ विस्तारले जाऊन समाज गोलाकार होतो. धार्मिक विधी, उपासना हे नंतरचे आहेत. पवित्र कुरआननुसार, “तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे केले की पश्चिमेकडे केले हा सदाचार नाही. सदाचार म्हणजे, जे लोक अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, त्याच्या प्रेमापोटी आपल्या संपत्तीतून आपल्या नातलगांना, अनाथांना, निराधारांना आणि जे मागतील त्यांना देणे होय. (२:१७०)” दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, माता-पित्यांशी औदार्याने वागा, त्यांच्यासमोर ब्र देखील काढू नका. एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला परवानगी द्या जिहादमध्ये सहभागी होण्याची. प्रेषितांनी विचारले, तुमचे आईवडील हयात आहेत? त्यांनी उत्तर दिले, होय, हयात आहेत. मग प्रेषितांनी आज्ञा दिली की, जा त्यांची सेवा करा, हाच तुमचा जिहाद आहे. प्रेषितांचे सोबती अबू हुरैरा म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले, कोण माझ्या सदवर्तनास अधिक पात्र आहे? प्रेषित म्हणाले, तुझी आई. दुसऱ्यांदा त्यांनी विचारले, मग कोण? प्रेषित म्हणाले, तुझी आई. तिसऱ्यांदाही प्रेषितांनी हेच उत्तर दिले. मग त्या व्यक्तीने विचारल्यानंतर चौथ्यांदा उत्तर मिळाले, तुझे वडील. आणखी एका अनुयायींनी विचारले, सर्वोत्तम इस्लाम कोणता? प्रेषित म्हणाले, गरीब आणि वंचितांवर प्रेम करा. लोकांना अडचणीत टाकू नका. त्यांच्यासाठी सुलभता, सहजता निर्माण करा. हाच सर्वोत्तम इस्लाम आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सकारात्मक मूल्यांवर सामाजिक सहिष्णुता परस्परांसाठी संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी निर्माण केली. पवित्र कुरआनने यासाठी दिलेली शिकवण समाजरचनेचा पायाभूत बिंदू होता. अल्लाहने माणसांना एकमेकांशी नातेसंबंध जोडून ठेवण्याचे त्यांच्याकडून वचन घेतले असल्याने जर माणूस अल्लाहने सांगितलेले नातेसंबंध जोडण्याऐवजी ते तोडून टाकत असेल तर मग समाजात अराजकता आणि अनाचार माजेल. याचा अर्थ असा की सामाजिक नातेसंबंध जोपासणे माणसांच्या इच्छेवर सोडलेले नाही तर प्रत्येक माणसाने हे नातेसंबंध जोपासण्यासाठी अल्लाहला वचन दिलेले आहे. हा माणसाने माणसाशी करार केलेला नाही. त्याने आपल्या विधात्याला वचन दिलेले आहे. तसेच हा दोन गटांमधील करार नव्हे. करार करणारे दोघे परस्परांशी काही अटी-नियमांवर करार करत असतात. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वचन देतो तेव्हा ज्याला वचन दिले जाते ते वचन त्याचा अधिकार असतो. वचन करणाऱ्यास मोडण्याचा अधिकार नसतो. अल्लाहशी वचनबद्धतेमुळेच समाजाचा प्रत्येक घटक प्रामाणिकपणे वागत असतो. कुणी दुसऱ्यावर अन्याय करत नाही. सर्वजण मिळून समाजामध्ये संतुलन कायम राखतात. हे संतुलन राखण्याची जबाबदारीदेखील पवित्र कुरआनद्वारे अल्लाहने माणसावर सोपवली आहे. “या ब्रह्मांडामध्ये जसे संतुलन कायम आहे, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह ठराविक हिशोबाने भ्रमण करतात, उत्तुंग आकाश उभारून त्यास समतोल ठेवले.” त्याच प्रकारे माणसांनी संतुलन कायम ठेवावे. व्यवहारात संतुलन असावे. प्रेषितांनी ज्या मूल्यांवर समाज निर्माण केले ते असे (१) कुणाचा द्वेष करू नका, (२) एकमेकांशी शत्रुत्व बाळगू नका, (३) आपसात हेवेदावे करू नका, (४) आपसातील नाती तोडू नका, (५) एकमेकांशी बंधुभावाने वागा, (६) मुस्लिम एकमेकांचे बांधव आहेत. ते कुणावर अत्याचार करत नाहीत. कुणास एकाकी सोडून देत नाहीत. कुणाचा तिरस्कार करत नाहीत.
- सय्यद इफ्तिखार अहमद
- सय्यद इफ्तिखार अहमद
सन १९६४ मध्ये तहसीलदार ऑफीस देवरुख येथे नोकरीस रुजू झाले. ३० वर्षांच्या शासकीय कार्यकाळात ते देवरुख, खेड, मंडणगड, रत्नागिरी या ठिकाणी आपली सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात प्रेषितांच्या शिकवणींनुसार त्यांनी प्रामाणिकपणा, त्याग, सचोटी, न्याय, देशप्रेम इत्यादी मूल्यांचे पुरेपूर अनुसरण केले. आपल्याकडे कामानिमित्त आलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यांनी कधी निराश केले नाही. त्यांच्या कामात सर्वतोपरी सहकार्य करून आपले कर्तव्य पार पाडले. ज्या ज्या ठिकाणी ते नोकरीस गेले तेथे आपल्या साध्या राहणीमानामुळे व सचोटीमुळे तेथील स्थानिक नागरिक त्यांच्याकडे आकर्षित झाले. १९९४ साली ते खेडू येथून निवृत्त झाले. गेली जवळजवळ ४० वर्षे ते साप्ताहिक शोधनचे वाचक होते. निवृत्तीनंतर त्यांनी ‘शोधन’साठी विविध सामाजिक व धार्मिक विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण केले. त्यांनी आपले जीवन समाज व देशासेवेसाठी वाहिले होते.
आपल्या कामाप्रती प्रामाणिक, कर्तृत्ववान, निस्वार्थी, निष्कलंक व्यक्तिमत्त्व. मागील वर्षभरात अनेक कर्तृत्ववान तसेच चांगली माणसे आपल्यातून या जगाला कायमचा निरोप देऊन गेली. त्यांच्यापैकीच एक स्वच्छ प्रतिमा असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व सर्वांना सुपरिचित मोडक भाऊ व त्यांची पत्नी अझीझा (मृत्यू २ मे २०२१) आपल्यातून निघून गेले. अल्लाह त्यांच्या आत्म्याल्या शांती देओ आणि त्यांना स्वर्गात उच्च स्थान देओ हीच अल्लाहपाशी प्रार्थना.
(१६) तुम्ही लोकांनी असा समज करून घेतला आहे काय की असेच तुम्हाला सोडून दिले जाईल? वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण आहेत ज्यांनी (अल्लाहच्या मार्गात) प्राण पणास लावले आणि अल्लाह व त्याचा पैगंबर व श्रद्धावंत यांच्याशिवाय इतर कोणासही जिवलग मित्र बनविले नाही.१८ जे काही तुम्ही करता अल्लाह त्याचा जाणकार आहे.
(१७) अनेकेश्ववादींचे हे काम नव्हे की त्यांनी अल्लाहच्या मस्जिदीचे सेवक बनावे ज्याअर्थी की आपल्याविरूद्ध ते स्वत:च द्रोहाची (कुफ्र) साक्ष देत आहेत,१९ यांची सर्व कर्मे वाया गेलीत२० आणि नरकामध्ये यांना सदैव राहावयाचे आहे.
(१८) अल्लाहच्या मस्जिदीचे नियमित उपासना करणारे मुजावर (सेवक) तर केवळ तेच लोक होऊ शकतात ज्यांनी अल्लाह आणि परलोकाला मानले आणि नमाज कायम केली, जकात दिली व अल्लाहव्यतिरिक्त कोणाचीही भीती बाळगत नाही. यांच्याकडूनच अपेक्षा आहे की ते सरळमार्गावर चालतील.
(१९) हज यात्रेकरूंना पाणी पाजणे आणि मस्जिदेहराम (काबा मस्जिद) ची सेवा करणे याला तुम्ही त्या व्यक्तीच्या कामाबरोबर ठरविले आहे काय ज्याने श्रद्धा ठेवली अल्लाहवर व ‘पारलौकिक’ जीवनावर व ज्याने प्राण वेचले अल्लाहच्या मार्गात?२१
(२०) अल्लाहपाशी तर हे दोघे समान नाहीत व अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवीत नाही. अल्लाहच्या येथे तर त्याच लोकांचा दर्जा मोठा आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरेदारे सोडली आणि जीवित व वित्तानिशी संघर्ष (जिहाद) केले, तेच यशस्वी आहेत.
(२१) त्यांचा पालनकर्ता त्यांना आपली कृपा व प्रसन्नता आणि अशा स्वर्गाची शुभवार्ता देतो जेथे त्यांच्यासाठी चिरस्थायी ऐश्वर्याचा सरंजाम आहे.
(२२) त्यांच्यात ते सदैव राहतील. निश्चितपणे अल्लाहजवळ सेवेचे फळ देण्यासाठी बरेच काही आहे.
(२३) हे श्रद्धावंतांनो! आपले वडील व आपले बंधु यांनादेखील आपले मित्र बनवू नका जर ते ईमानवर कुफ्रला प्राधान्य देत असतील. तुम्हापैकी जे त्यांना आपले स्नेही बनवतील तेच अत्याचारी ठरतील.
(२४) हे पैगंबर (स.)! सांगून टाका की जर तुमचे वडील, तुमची मुले आणि तुमचे बंधु व तुमच्या पत्नीं व तुमचे आप्तेष्ट व नातेवाईक व तुमची ती धन-दौलत जी तुम्ही कमाविली आहे व तुमचे ते व्यापार-उदीम ज्यांच्या मंदावण्याची तुम्हाला भीती वाटते आणि तुमची ती घरे जी तुम्हाला पसंत आहेत, तुम्हाला अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) आणि अल्लाहच्या मार्गात धर्मयुद्धा (जिहाद) पेक्षा अधिक प्रिय असतील तर वाट पाहा इथपर्यंत की अल्लाहने आपला निर्णय तुमच्या समक्ष आणावा,२२ आणि अल्लाह अवज्ञाकारी लोकांना मार्ग दाखवीत नसतो.
(२५) अल्लाहने यापूर्वी अनेक प्रसंगी तुम्हाला मदत केलेली आहे. नुकतेच हुनैनच्या युद्धाच्या दिवशी (त्याने केलेल्या मदतीचे वैभव तुम्ही पाहिले आहे)२३ त्या दिवशी तुम्हाला आपल्या मोठ्या संख्येचा गर्व होता, पण ती तुमच्या काहीच उपयोगी पडली नाही व जमीन विस्तृत असूनदेखील तुमच्याकरिता तंग झाली व तुम्ही पाठ दाखवून पळत सुटला.
(२६) मग अल्लाहने आपली ‘सकीनत’ (मन:शांती) आपल्या पैगंबरावर व श्रद्धावंतांवर उतरविली; आणि ते लष्कर उतरविले जे तुम्हाला दिसत नव्हते आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना शिक्षा दिली की हाच बदला आहे त्यांच्याकरिता जे सत्याचा इन्कार करतील.
१८) हे संबोधन आहे त्या नव्या लोकांशी जे नुकतेच इस्लाममध्ये आले होते. त्यांच्याशी सांगितले जात आहे की जोपर्यंत तुम्ही या परीक्षेला सामोरे जाऊन प्रमाणित करत नाही की वास्तविकपणे तुम्ही आपले जीव व वित्त आणि सगेसोयरे यांच्यापेक्षा जास्त अल्लाह आणि इस्लामला प्रिय ठेवत आहात तोपर्यंत तुम्ही खरे ईमानधारक ठरू शकत नाही. अद्याप प्रत्यक्षाला पाहून तुमची स्थिती अशी आहे की इस्लाम सच्च्े ईमानधारक आणि प्रारंभीच्या ईमानधारकांच्या बलिदानाने विजयी झाला आणि देशात प्रभावी ठरला. त्यामुळे तुम्ही आज मुस्लिम बनला आहात.
१९) म्हणजे ज्या मस्जिदी एकमेव अल्लाहच्या उपासनेसाठी बनलेल्या आहेत त्यांचे प्रबंधक, मुजावर, सेवक आणि उपासक बनण्यासाठी ते लोक योग्य नाहीत जे अल्लाहबरोबर त्याच्या गुणात, हक्कात आणि अधिकारात इतरांना भागीदार बनवतात. त्यांनी स्वत: एकेश्वरत्वाचे आवाहन स्वीकारले नाही आणि स्पष्ट सांगितले की एक अल्लाहच्या उपासनेला आम्ही बांधील नाही. तेव्हा त्यांना काय अधिकार आहे की एखाद्या अशा उपासनागृहाचे प्रबंधक बनून राहावे की जे फक्त एक अल्लाहच्या उपासनेसाठी बनविले आहे. येथे सामान्यत: ही गोष्ट सांगितली आहे आणि आपल्या वास्तविकतेच्या दृष्टीने ती सामान्य आहे. परंतु मुख्यता येथे तिचा उल्लेख करण्याचा हेतू म्हणजे काबागृह आणि मस्जिदे हराम यावरील अनेकेश्वरवादींच्या व्यवस्थापन प्रबंधाला समाप्त् केले जावे. तसेच ते प्रबंधन नेहमीसाठी एकेश्वरवादींच्या हातात दिले जावे आणि एकेश्वरवादी काबागृहाचे नेहमीसाठी प्रबंधक बनावेत.
२०) म्हणजे जी थोडी सेवा त्यांनी काबागृहाची केली होती तीसुद्धा निरर्थक ठरली कारण हे लोक त्याबरोबर अनेकेश्वरत्व आणि अज्ञानतापूर्ण रीतींची भेसळ करीत होते. त्यांच्या थोड्याशा पुण्याईला भल्या मोठ्या दुष्टतेने खाऊन टाकले.
२१) म्हणजे एखाद्या दर्गास्थानाची मुजावरी व प्रबंधन आणि काही दिखाऊ धार्मिक कार्यांचे करणे याला जगातील संकुचित दृष्टी ठेवणारे लोक सौभाग्य व पवित्रतेचा आधार ठरवितात. परंतु अल्लाहजवळ हे निरर्थक आहे. वास्तविक मूल्य तर ईमानचे आहे आणि अल्लाहच्या मार्गात त्यागाचे आहे. या गुणांचा धारक व्यक्ती मौल्यवान व्यक्ती असतो मग त्याचा संबंध उच्च् परिवाराशी नसोत की त्याच्याशी काही वैशिष्ट्य चिकटलेले नसोत. परंतु जे लोक या गुणांनी वंचित आहेत व मोठ्यांची संतती आहेत, त्यांचा मुजावरीचा धंदा पारिवारिक परंपरा आहे. काही विशेष वेळी काही धार्मिक रीतींचे प्रदर्शन ते शानशौकांती करतात. ते कोणत्याच पदाचे अधिकारी होत नाहीत. हे अवैध आहे की अशा मूल्यहीन पैतृक अधिकारांना मान्य करून या पवित्र स्थानांना आणि धार्मिक स्थळांना अयोग्य लोकांच्या हातात द्यावे. या कथनाने हा निर्णय केला गेला की अल्लाहच्या गृहाचे प्रबंधक आता अनेकेश्वरवादी असूच शकत नाही. कुरैशचे अनेकेश्वरवादी फक्त यासाठी याचे प्रबंधक अधिकारी होऊ शकत नाही की ते हाजी लोकांची सेवा करीत होते.
२२) म्हणजे तुम्हाला हटवून सच्चा धार्मिकतेची देणगी आणि त्याच्या ध्वजावाहनाचे सौभाग्य आणि मार्गदर्शन करण्याचे पद दुसऱ्या कुणाला दिले जावे.
२३) जे लोक या गोष्टीपासून भीत होते की उत्तरदायित्वापासून अलिप्त् होण्याच्या घोषणेत या भयानक नीतीला व्यवहारात आणण्यासाठी सर्व अरब देशाच्या कानाकोपऱ्यांत युद्ध भडकेल आणि त्याचा सामना करणे कठीण होईल. त्यांच्याशी सांगितले जात आहे की या आशंकांनी घाबरू नका. अल्लाहने तर यापेक्षा जास्त भयानक धोक्याच्या वेळी तुमची मदत केली आहे. आतासुद्धा तो तुमच्या मदतीला इच्छुक आहे जर हे काम तुमच्या शक्तीवर आधारित असते तर मक्काहून पुढे वाढे होणे अशक्य होते. तसेच बदरच्या युद्धात तरी अवश्य नष्ट झालेच असते. परंतु इस्लामच्या पाठीशी अल्लाहची शक्ती आहे. मागील अनुभवाने तुम्हाला माहीत झाले आहे की अल्लाहचीच शक्ती इस्लामी आंदोलनाला पुढे नेत आहे. म्हणून विश्वास ठेवा की आजसुद्धा तोच यास पुढे वृद्धिगंत करील. हुनैनच्या युद्धाचा येथे उल्लेख झाला आहे. शव्वाल हि. सन ०८ मध्ये या आयती अवतरित होण्याच्या केवळ बारा-तेरा महिन्यापूर्वी मक्का आणि ताइफच्या दरम्यान हुनैनच्या घाटीत हुनैनचे युद्ध झाले आहे. या युद्धात मुस्लिमांकडून १२ हजारचे सैन्य होते जे यापूर्वी कधीही एवढ्या संख्येत एकत्रित झाले नव्हते. दुसरीकडे शत्रूचे चैन्य यापेक्षा कमी होते. परंतु तरीही हवाजन कबिल्याच्या तीरंदाज लोकांनी त्यांचे हाल केले आणि इस्लामी सैन्याची दानादान झाली. त्या वेळी केवळ पैगंबर मुहम्मद (स.) आणि थोडेसे सहाबा होते ज्यांची पाऊले डगमगली नव्हती. त्यांच्या अडिग राहण्यामुळेच सैन्य पुन्हा एकत्रित करण्यात आले आणि शेवटी विजय मुस्लिमांचा झाला होता. अन्यथा मक्का विजयाने जे काही प्राप्त् झाले होते त्याच्यापेक्षा जास्त हुनैनच्या युद्धात गमवावे लागले असते.
मुस्लिम जगतामध्ये रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवाराला, ’’जुम्मतुल विदा’’ असे म्हणतात. या महिन्यामध्ये जुम्मतुल विदा हा 7 मे 2021 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. मुस्लिम धर्मियांची मक्का आणि मदिनानंतर तीसरी पवित्र मस्जिद जेरूसलम येथे आहे, जिचे नाव ’’मस्जिद-ए-अक्सा’’ असे आहे. या ठिकाणी शेकडो पॅलेस्टिनियन मुस्लिम शेवटच्या शुक्रवारच्या विशेष प्रार्थनेसाठी गोळा झाले होते आणि अचानकपणे इजराईली सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरूवातीला 20 लोक जखमी झाल्याची बातमी आली नंतर ही संख्या 200 पर्यंत वाढली. 7 मे पासून सुरू झालेला हिंसाचार रमजान संपला तरी संपता संपत नाहीये. यात आतापावेतो 40 पॅलेस्टिनियन नागरिकांचा मृत्यू झालेला असून, किती जख्मी आहेत, याची अधिकृत माहिती नाही.
या हिंसेच्या प्रतिउत्तरादाखल पॅलेस्टाईनच्या हमास या संघटनेने इजराईलवर रॉकेट हल्ले केले असून, अमेरिकेने दिलेल्या पेट्रीयॉट मिजाईल सुरक्षा प्रणालीचा उपयोग करून इजराईलने ते हल्ले यशस्वीपणे परतावून लावलेले आहेत. इजराईली सुरक्षा रक्षकांकडून हा हल्ला रमजानमध्ये झाल्यामुळे जागतिक मुस्लिम समुदायाच्या भावना उद्वेलित झालेल्या आहेत. सात दशकांपेक्षाही जुन्या अरब-इजराईल संघर्षाची पार्श्वभूमी अनेक वाचकांना माहित नाही. -(उर्वरित पान 2 वर)
म्हणून या पार्श्वभूमीचा परिचय नव्याने वाचकांना करून देण्यासाठीचा हा लेखन प्रपंच.
ट्रम्प आणि इजराईल संबंध
6 डिसेंबर 2017 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलम शहराला इजराईलची राजधानी म्हणून मान्यता दिली व तेल अवीव येथील अमेरिकी दुतावास जेरूसलम येथे हलविण्यास मंजुरी दिली. गेली 70 वर्षे जो निर्णय अमेरिकेच्या आतापावेतो झालेल्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी तहकूब ठेवला होता त्याची अंमलबजावणी ट्रम्प यांनी सगळ्यांचा विरोध डावलून केली. ट्रम्प यांच्या या अविवेकी निर्णयाचा जगाच्या सर्वच भागातून विरोध झाला. ट्रम्प यांना मात्र या विरोधाची काडीमात्र परवा नव्हती म्हणून त्यांनी हा निर्णय रेटून नेला. या निर्णयाचा सर्वात कडवा विरोध सऊदी अरब आणि ईरानकडून होण्याची शक्यता होती. म्हणूनच इरानला वेगळे पाडून व सऊदी अरबमध्ये आपल्या जावयाचा मित्र मोहम्मद बिन सलमान याला सत्तेत आणून ट्रम्प यांनी या विरोधाची धार अगोदरच बोथट करून ठेवलेली होती. इजराईलची राजधानी तेल अवीव येथून जेरूसलेम येथे हलविण्यामागे ट्रम्प यांचे यहूदी (ज्यू) जावाई जेराड कुश्नर यांचे राजकारण असल्याचे स्पष्ट आहे. इजराईल वगळता कोणीही या निर्णयाचे समर्थन केलेले नाही.
पॅलेस्टिनचा इतिहास
ज्या काळात मानव आपली उपजिविका भागविण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी भटकत होता त्या काळात अरबस्थानमधील अनेक टोळ्यांपैकी ’साम’ टोळीच्या एका शाखेच्या काही लोकांनी ज्यांचे नाव ’कन्आनी’ होते. ईसापूर्व 2500 मध्ये अरबस्थान येथून येवून जॉर्डन नदीच्या किनारी पॅलेस्टीनमध्ये आपली वस्ती केली. जॉर्डन आणि इजिप्तच्या मध्ये असलेल्या जॉर्डन नदीच्या किनार्याच्या लगतच्या प्रदेशाला हजारो वर्षापासून इजराईल असे म्हणतात. इजराईलच्या शेजारी सीरिया, इराक आणि सऊदी अरब असून लिबीया, सुडान, युथोपिया, इरान ही त्याच्या जवळ आहेत.
ह. इब्राहीम अलै. (अब्राहम) सुद्धा इराकच्या ’अर’ येथून येवून पॅलेस्टीन येथे स्थायीक झाले होते. त्यांना दोन मुले होती. एकाचे नाव इसकाह अलै. तर दूसर्याचे नाव इस्माईल अलै. असे होते. त्यांनी इसहाक अलै. यांना पॅलेस्टीनमध्ये (बैतुल मुकद्दस) येथे तर ह.इस्माईल यांना मक्का (बैतुल हराम) येथे जावून स्थाईक होवून धर्मप्रचार करण्याचा आदेश दिला. हजरत इसहाक अलै. यांचे पुत्र हजरत याकूब अलै. होते ज्यांना इस्राईल (अल्लाहचा बंदा) म्हणून ओळखले जात होते. आज अस्तित्वात असलेल्या इस्राईल या देशाचे नाव त्यांच्याच नावावरून घेतलेले आहे. इस्राईलच्या भूमीला प्रेषितांची भूमीही म्हटले जाते. कारण याच भूमीमध्ये ह. दाऊद अलै, ह.सुलेमान अलै., ह. याह्या अलै., ह.मुसा अलै., ह. हारूण अलै., ह.ईसा अलै. ही वास्तव्यास होते. ह. इब्राहीम अलै. यांच्यापासून प्रेषितांच्या दोन शाखा निघाल्या. एक- हजरत याकूब उर्फ इस्राईल यांच्यापासून सुरू झालेल्या शाखेला बनी इस्राईल असे म्हणतात तर ह. इस्माईल अलै. यांच्या पासून सुरू झालेल्या शाखेला बनी इस्माईल असे म्हणतात. बनी इस्माईलमध्ये प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचा जन्म झाला. ही गोष्ट बनी इस्राईल म्हणजे आजच्या यहुदी आणि ख्रिश्चनांना सहन झाली नाही. म्हणून ते प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित मानत नाहीत, हेच यहुदी-ख्रिश्चन विरूद्ध मुस्लिम यांच्यातील वैराचे प्रमुख कारण आहे.
दुसर्या महायुद्धापूर्वी आटोमन साम्राज्य म्हणजेच उस्मानिया खिलाफतीचा पॅलिस्टीन हा एक भूभाग होता. या साम्राज्याचे शेवटचे खलीफा सुलतान अब्दुल हमीद सानी यांना यहुदी लोकांच्या एका शिष्टमंडळाने भेटून त्यांना पॅलेस्टीनमध्ये यहुदी वस्ती वसविण्याची परवानगी मागितली. त्या बदल्यात आटोमन साम्राज्यावर असलेले कर्ज स्वतः फेडण्याची तयारी दर्शविली. मात्र सुलतान अब्दुल हमीद यांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. 1909 मध्ये सुलतान अब्दुल हमीद यांचा मृत्यू झाला. पहिल्या महायुद्धामध्ये आटोमन साम्राज्याने जर्मनीचे समर्थन केले होते. जर्मनीच्या पाडावाने पहिले महायुद्ध संपले व ऑटोमन साम्राज्यावर ब्रिटीशांनी ताबा मिळविला. त्याचे वेगवेगळे तुकडे केले. तुर्कीचा भाग आपल्या मर्जीतील कमाल पाशा अतातुर्क याला दिला तर हिजाजचा भाग सऊद परिवाराला दिला. पॅलेस्टीनच्या भागावर मात्र दुसर्या महायुद्धापर्यंत ब्रिटीशांचाच अंमल होता. म्हणून यहुदी लोकांनी यहुदी लोकांसाठी ब्रिटीशांकडे पॅलेस्टीनच्या भूभागामध्ये वेगळे राष्ट्र तयार करून देण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांनी दुसर्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भरपूर अर्थसहाय्य केले. हिटलर यांनी यहुदी लोकांवर केेलेल्या आनन्वित अत्याचाराचा दाखला दिला. ब्रिटीशांना दुसर्या महायुद्धामध्ये जरी विजय प्राप्त झाला तरी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की त्यांना आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक राष्ट्रांना स्वातंत्र्य द्यावे लागले. परिणामी भारत आणि पॅलेस्टीनवरचा ताबा त्यांनी 1947 व 1948 साली सोडला.
यहुदींनी केलेल्या अर्थसहाय्याच्या बदल्यात यहुदींसाठी नवीन राष्ट्र तयार करण्यासाठी ब्रिटीशांनी अमेरिकेच्या मदतीने 1947 साली संयुक्त राष्ट्रामध्ये एक ठराव संमत करून पॅलिस्टीनच्या भूमीवर इस्राईल नावाच्या नवीन देशाची निर्मिती करण्यास मंजुरी मिळविली. संयुक्त राष्ट्राच्या या ठरावाप्रमाणे 14 मे 1948 रोजी त्यांनी पॅलिस्टनवरील आपला ताबा सोडला. मात्र जाता-जाता त्यांनी पॅलिस्टीनची फाळणी करून इस्राईलची निर्मिती केली. सरकारी इमारती, हत्यारे, पोलीस यहुद्यांच्या ताब्यात दिले.
अरब राष्ट्रांचा याला प्रखर विरोध होता या विरोधाला न जुमानता शेवटी 15 मे 1948 साली इजराईल या देशाची अधिकृत घोषणा झाली आणि लगेचच अरब-इजराईल युद्धाला तोंड फुटले. सऊदी अरब, लेबनान, सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांनी संयुक्तरित्या इजराईलवर हल्ला केला. मात्र ब्रिटन आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीमुळे इजराईलने हे युद्ध जिंकले. या युद्धामध्ये अरब राष्ट्रांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा 29 ऑक्टोबर 1958 रोजी इजराईलने इजिप्तवर हल्ला करून सीना नावाचा भाग आपल्या राज्यात जोडला. इजराईलच्या या दंडेलशाहीला फ्रान्स आणि ब्रिटनने सक्रीय सहकार्य केले. 6 नोव्हेंबर 1958 रोजी युद्धबंदी करार झाला जो 19 मे 1967 पर्यंत कायम राहिला. 1967 मध्ये मात्र सहा दिवसांचे अरब इजराईल युद्ध झाले. यात इजराईलने अमेरिका आणि ब्रिटीश सैनिकांच्या मदतीने सीनाबरोबर पूर्वी जेरूसलमच्या काही भागावर आणि इजिप्तच्या गोलान टेकड्यांवर तसेच जॉर्डनच्या काही भागावर आपला कब्जा प्रस्थापित केला.
10 जूनला संयुक्त राष्ट्राने मध्यस्ती करून युद्धबंदी केली पण इजराईलने बळकावलेला प्रदेश त्याच्याकडेच राहिला. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1973 रोजी यहुद्यांच्या पवित्र दिवशी म्हणजे ’यौमे कपूर’ ला इजिप्त आणि सीरियाने संयुक्तरित्या पुन्हा इजराईलवर हल्ला केला. इजराईलने प्रतिकार करीत हा हल्ला परतवून लावला. एवढेच नव्हे तर सुवेज कालव्याच्या पूर्व किनार्यावर कब्जा मिळविला. 24 आक्टोबर 1973 रोजी युद्धबंदी झाली आणि संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेने या भागात प्रवेश केला. युद्धबंदी करारात ठरल्याप्रमाणे 18 जानेवारी 1974 रोजी इजराईलने सुवेज कालव्यावरचा आपला ताबा सोडला. यानंतरचे दोन वर्ष शांतीत गेले. मात्र 13 आक्टोबर 1976 रोजी ऐन्टेबे विमानतळावर इजराईली सैनिकांनी एक धाडसी हल्ला करून आपल्या 103 नागरिकांना सोडवून आणले. यानंतर मात्र अरबांची हिम्मत खचली आणि इजराईलशी युद्ध करण्याचा त्यांनी नाद सोडला. 26 मार्च 1979 रोजी इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांनी इजराईलला मान्यता देवून त्याच्याबरोबर तह केला. यानंतर या दोन्ही देशात राजकीय आणि व्यापारिक संबंध सुरू झाले. मैत्रीचा उपहार म्हणून 1982 साली इजराईलने इजिप्तचा जिंकलेला सीनाचा प्रदेश त्याला परत दिला.
हळू-हळू पॅलेस्टीन व आजूबाजूच्या अरब देशांचा भूभाग बळकावत असतांनाच जुलै 1980 मध्ये पूर्व आणि पश्चिम जेरूसलेमला इजराईलने आपली राजधानी म्हणून घोषित केले. 7 जून 1981 रोजी इजराईलने परत एका धाडसी हवाई कारवाईमध्ये इराकचे अणुकेंद्र उध्वस्त केले. 6 जून 1982 रोजी परत एका धाडसी कारवाईमध्ये इजराईली सैनिकांनी लेबनानमधील पीएलओ (पॅलिस्टीन लिबरेशन ऑर्गनायझेशन) चे मुख्यालय उडवून दिले. यात बैरूत शहराचा पश्चिमी भाग बेचिराख झाला. अधिक रक्तपात टाळण्यासाठी पीएलओने बैरूत शहर रिकामे करण्याला मान्यता दिली. याचवर्षी 14 सप्टेबरला लेबनानचे निर्वाचित अध्यक्ष बशीर जमाल यांची हत्या इजराईलची गुप्तचर संघटना मोसाद ने केली. यानंतर सुद्धा इजराईलने शेजारी अरब राष्ट्रांना सळो की पळो करून सोडले. इस्राईलने जरी जेरूसलेमला आपली राजधानी घोषित केली मात्र प्रत्यक्षात इस्राईलची राजधानी तेल अवीव शहरात आहे. जेरूसलेमच्या अर्ध्या भागावर म्हणजे पश्चिमी जेरूसलेम ज्यात बैतुल मुकद्दस आहे तो भाग अजूनही पॅलेस्टीनचाच भाग म्हणून ओळखला जातो. त्या भागासहीत पूर्व आणि पश्चिम जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यामुळे बैतुल मुकद्दस सहीत संपूर्ण जेरूसलम शहर आता इस्राईलचे शहर म्हणून भविष्यात ओळखले जाईल. हे अरबांनाच नव्हे तर जगातील इतर मुस्लिम देशांना सहन होण्यासारखे नाही. इस्राईल शहराचे महत्व एका ईश्वराला मानणार्या यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तिन्ही धर्मांमध्ये एकसारखे आहे. ख्रिश्चन ज्यांना आपले प्रेषित मानतात ते ईसा अलै. यांचा जन्म जेरूसलेमच्या बेथलहेम भागातला. त्यांना याच शहरात यहुद्यांनी क्रुसेडवर चढविले. या नात्याने हे शहर ख्रिश्चनांसाठी अत्यंत पवित्र आहे. यहुद्यांच्या मान्यतेप्रमाणे पवित्र विपींग वॉल ही याच शहराच्या एका टेकडीच्यापायथ्याशी आहे. शिवाय त्यांचे पवित्र धार्मिक स्थळ हैकल-ए-सुलेमानी या शहराच्या भूभागात असल्याची त्यांची मान्यता आहे. याच शहरात असलेली मस्जिद-ए-अक्सा ही मुस्लिमांसाठी ’किब्ला-ए-अव्वल’ असून याच मस्जिदीमधून सर्व पैगम्बरांना नमाज पढवून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मेराजच्या रात्री अल्लाहकडे सदेह प्रस्थान केले. म्हणून मुस्लिमांसाठी हे शहर जीवापेक्षा जास्त प्रिय आहे. मक्का आणि मदिनानंतर जेरूसलेम हेच मुस्लिमांसाठी तिसरे पवित्र शहर आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मुस्लिमांचा या शहरावरील अधिकार तसेच मस्जिद-ए-अक्सा दोन्ही धोक्यात आलेले आहेत. परंतु ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला. यासाठी चार महत्वपूर्ण कारणे आहेत. एक - यहुदी समाज अमेरिकेमध्ये फक्त 60 लाख एवढा आहे. मात्र या लोकांचा प्रमुख व्यवसाय व्याजावर आधारित व्यवहार आहेत. म्हणून हा समाज अत्यंत श्रीमंत असा समाज आहे. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या याच समाजाच्या हातात आहेत. अमेरिकेच्या प्रत्येक महत्वाच्या पदावर यहुदी लोक अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. माध्यमे मग ती प्रिंट असो का इलेक्ट्रॉनिक्स जवळ-जवळ सर्वांवरच यहुद्यांची मालकी आहे. म्हणून यांच्या मर्जीला डावलण्यासाठी जो धोरणीपणा या पुर्वीच्या अध्यक्षांच्या अंगी होता त्याचा अभाव ट्रम्प यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी यहुदी लॉबीच्या दबावाला बळी पडून हा निर्णय घेतला आहे.
दोन - त्यांचे जावाई जेराड कुश्नर हे स्वतः यहूदी असून त्यांनीच या निर्णयासाठी ट्रम्प यांच्यावर आतून दबाव आणला असावा.
तीन - अमेरिका आता खनिज तेलासाठी स्वयंपूर्ण झालेली आहे. 2015 पासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या समुद्रधुनीतून फ्रँकिंग पद्धतीने समुद्रतळाला असलेले तेलाचे साठे शोधून काढण्यास अमेरिकेला यश आलेले आहे. तेव्हापासून सऊदी अरबसह मध्यपुर्वेच्या इतर मुस्लिम देशांवर तेलासाठी अमेरिकेचे असलेले अवलंबित्व संपलले आहे. त्यामुळे या देशांच्या नाराजीची फारशी पर्वा करण्याची गरज अमेरिकेला राहिलेली नाही.
चार - जगामध्ये अस्तित्वात असलेल्या 56 पेक्षा अधिक मुस्लिम देशांमध्ये एकी नाही. ते कितीही नाराज झाले तरी एकत्र येवून कोणाविरूद्ध लढू शकत नाहीत. याची पक्की खात्री अमेरिका आणि इजराईलला आहे. म्हणून सुद्धा ट्रम्प यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. शिवाय, सऊदी अरबचे वली अहेद राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांना आपल्या गोटात वळवून सऊदी अरबचा विरोध होणार नाही, याची पक्की व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मात्र सऊदी अरबची जनता आणि मध्यपुर्वेतील इतर राष्ट्रातील जनता तसेच इजीप्तमधील जनता या निर्णयाने गप्प राहील असे वाटत नाही. या निर्णयानंतर मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. जेरूसलम मधील ताजी हिंसा याच पार्श्वभूमीतून सुरू झालेली आहे.
ट्रम्पच्या या निर्णयामुळे हमासचे प्रमुख इस्माईल हनिया यांनी तिसऱ्या इंतफादा (सशस्त्र चळवळ) ची घोषणा केलेली होती.एकंदरित परिस्थिती चिघळण्यास सुरूवात झालेली आहे. भविष्यात हे प्रकरण किती चिघळेल याचा अंदाज बांधणे कठिण आहे. मात्र अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन हे एक धुरंधर राजकारणी असून, ते यात मध्यस्थता करून प्रश्न चिघळू देणार नाहीत, अशी आशा करणे अप्रस्तुत होणार नाही.