Halloween Costume ideas 2015
April 2020

पुणे येथील आझम कॅम्पस येथील मशिदीचे रविवारी ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात रुपांतर करण्यात आलं. आजम कॅम्पस शैक्षणिक परिसर , भवानी पेठ मधील भव्य मस्जीद शिक्षण संस्थेने quarantine साठी शासनाला दिली, एवढेच नव्हे तर या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटीन अॅण्ड एज्युकेशन सोसायटीकडून जेवण आणि इतर अत्यावश्यक सेवांचा पुरवठाही करण्यात येणार आहे. यासाठी अजूनही जागा लागेल तर आम्ही ते ही देऊ असे सांगितले आहे.
शहराच्या मध्यवस्तीत २४ एकर क्षेत्रावर असलेल्या या कॅम्पस मधे १८ शैक्षणिक संस्था आहेत ज्यामधे २०००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

1. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे 20 देश भारताबरोबर होते. ते आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. त्या ठिकाणी कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

2. आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. जनतेने देखील साथ दिली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतो आहे.

3. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.

4. आपल्या देशात अनेक विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यांना आणायचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे. त्यांच्या लगेच चाचण्या करुन क्वारांटाईन करणं गरजेचं आहे.

5. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करुन ठरवायचे आहे.

6. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा.“दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.

7. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा.

8. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे.

9. येत्या 3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली, तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

10. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.

11.  रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी गोष्टी राज्य सरकारने ठरवणे गरजेचे आहे.

12. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे संपर्क जास्तात जास्त तपासा.

13. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत.

14. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरुप बनवण्याची गरज आहे, असे झोन्स फुल प्रुफ करा

15. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.

16. कोरोनशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत.

17. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार आहे. गेल्या 20 एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली, पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.

18. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे.

19. हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.

20. प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.

रमजान करीमचा हा पवित्र महिना गौरव, समृद्धी आणि समरसता आणी कोविड १९ च्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आम्हाला मदत करू शकेल! अशी आशा नांगरे पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली.
नाशिक ; मुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिन्याला प्रारंभ झाला आहे. यालाच रमजानचा अर्थात बरकतीचा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच. अश्यातच या पवित्र उत्सवानिमित्त नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रमजान सणाच्या शुभेच्छा त्यांच्या अनोख्या शैलीत दिल्या आहेत. त्या संबंधित त्यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिध्द केला आहे. यंदा सर्वांनी घरात नमाजपठण, इफ्तार करण्याचे आवाहन नांगरे पाटील यांच्याकडून करण्यात आले.  या व्हिडिओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काय आहे नेमकं या व्हिडिओ मध्ये....

काय म्हणाले नांगरे पाटील...

रमजान करीमचा हा पवित्र महिना गौरव, समृद्धी आणि समरसता आणी कोविड १९ च्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी आम्हाला मदत करू शकेल! अशी आशा नांगरे पाटील यांनी व्यक्त केली.

नाशिकमध्ये रमजान पर्वाला सुरुवात

चंद्रदर्शन घडल्याने मुस्लिम धर्मीयांत विशेष महत्त्व असलेल्या रमजानपर्वाला सुरवात झाली. शनिवारी (ता. 25) रमजानपर्वातील पहिला रोजा असेल, अशी माहिती शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांनी दिली. मुस्लिम बांधवांत आनंदाचे वातावरण असून, शुक्रवारी सायंकाळी तरावीहची विशेष नमाजपठणास सुरवात झाली. मुस्लिम समाजात रमजानपर्वास विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी चॉंदरात असल्याने गुरुवारी (ता. 23) शहर-ए-खतीब यांनी सर्वांना चंद्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्वांच्या नजरा आकाशाकडे टिकून होत्या. चॉंद कमिटी आणि खतीब यांनी चंद्रदर्शन घडल्याचे स्पष्ट करीत शनिवारी (ता. 25) पहिला उपवास असल्याची घोषणा केली. चंद्रदर्शन घडताच सर्वांनी परस्परांना रमजानपर्वाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर शुभेच्छासंदेशाचा वर्षाव झाला. लॉकडाउनमुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना वेळेचे बंधन होते. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून विशेषतः महिलांकडून दिवसभर पहिल्या रोजाची तयारी सुरू होती. सहेरी अर्थात रोजा ठेवण्यासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांसह जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी दुपारी चारपर्यंत करण्यात आली. 

मालेगावात रमजान काळात खास व्यवस्था - अपर जिल्हाधिकारी
मालेगाव शहरात रमजान काळात फळे, भाजीपाला, जीवनावश्‍यक वस्तूपुरवठा व खरेदीसाठी प्रशासनाने खास व्यवस्था केल्याचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी सांगितले. निकम यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत बेकरी उत्पादन व फळ विक्री करता येईल. भाजीपाला, दूध मुबलक असून, त्याचा पुरवठा सुरळीत आहे. धान्यपुरवठा टेहेरे व सोयगाव घाऊक बाजारातून होत आहे. रमजानसाठी खास फळे व खजूर यासाठी नियोजन केले आहे. घाऊक व्यापारी फळे मागवून स्टार हॉटेलजवळ छोट्या वाहनातून ती शहरात पाठवतील. यानंतर महापालिकेने निश्‍चित केलेल्या जागांवर व शहरात हातगाड्यांवर फळ विक्री होईल. कंटेन्मेंट झोनच्या प्रवेशद्वारावर घाऊक व्यापारी माल, फळे उपलब्ध करून देतील. घाऊक व्यापाऱ्यांना प्रभाग अधिकारी सुनील खडके पास देतील. गर्दी होऊ नये, यासाठी बॅरिकेडिंग करण्यात येईल. विक्रेत्यांची यादी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हा काळ प्रशासनासाठी कसोटीचा ठरणार आहे.

मुंबई
कुर्ला येथे गुरुवारी लॉकडाऊन दरम्यान कर्करोग आणि डायलिसिस रूग्णांना रूग्णालयात जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले. जमात-ए-इस्लामीतर्फे देण्यात येणारी सेवा...
कुर्ला येथे गुरुवारी लॉकडाऊन दरम्यान कर्करोग आणि डायलिसिस रूग्णांना रूग्णालयात जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
जमात-ए-इस्लामी हिंद, मुंबईमार्फत पुरविल्या जाणारी ही सेवा कुर्ला, विक्रोळी आणि नागपाडा येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे लॉकडाऊन दरम्यान रुग्णवाहिकांचा लाभ घेण्यास मदत होईल, असे जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई या संघटनेचे म्हणणे आहे.
‘साथीच्या आजाराच्या या कठीण काळात डायलिसिस आणि केमोथेरपीच्या रूग्णांना रूग्णालयात जाण्याची समस्या येते. म्हणूनच आम्ही या सेवेला अत्यंत सुरक्षिततेच्या वेळी रुग्णालयात पोहोचण्यासाठी ही सेवा सुरू केली,’ असे जमात-ए-इस्लामी हिंद, मुंबईचे अध्यक्ष अब्दुल हसीब भाटकर यांनी सांगितले.

या अॅम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन कुर्ला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो. निरीक्षक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जमाअतचे इतर स्वयंसेवकदेखील उपस्थित होते.
ही अॅम्बुलन्स सेवा सध्या सुरू असून गरजूंनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी खालील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा-
विक्रोळीसाठी- ९३२३८०१२५२
कुर्लासाठी- ०९३२४१९०७७
नागपाडासाठी- ९९८७८३२७८५

वाघोलीतील जामा मशिदमध्ये सामाजिक अंतर राखत बैठक घेण्यात आली. मुस्लिम बांधवाना यानिमित्त शुभेच्छा देऊन किराणा, फळे आदींची घरपोच सेवा मिळेल याबाबत नियोजन करण्यात आले.
वाघोली : पवित्र रमजान महिन्यास शुक्रवारी सुरुवात झाली. या महिन्यात मुस्लिम बांधवांना किराणा व अन्य वस्तूंची कमतरता भासू नये, यासाठी समाजातील 10 जणांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून या वस्तूंची घरपोच सेवा करण्यात येणार असल्याची माहिती लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली.
वाघोलीतील जामा मशिदमध्ये सामाजिक अंतर राखत बैठक घेण्यात आली. मुस्लिम बांधवाना यानिमित्त शुभेच्छा देऊन किराणा, फळे आदींची घरपोच सेवा मिळेल याबाबत नियोजन करण्यात आले. या महिन्यात त्यांना कोणत्याही अडचण येऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून नियुक्त केलेले विशेष पोलिस अधिकारी याकडे लक्ष ठेवणार आहे.
दरम्यान समाजातील 100 गरजुना किराणा माल किटचे वाटप लोणीकंद पोलिसांच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी वाघोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जानमहंमद पठाण, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदी उपस्तीत होते.

पीतांबर लोहार

पिंपरी 
 कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे बाजारपेठा, धार्मिक स्थळे बंद आहेत. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान शनिवारपासून (ता. 25) सुरू झाला. या कालावधीत इफ्तार व नमाज पठण घरात थांबूनच करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान. जकात (दान), नमाज (प्रार्थना) आणि रोजा (उपवास) यांसह ईदच्या चंद्र दर्शनाला विशेष महत्त्व. दररोज पहाटे "सहेरी' आणि सायंकाळी "इफ्तार' म्हणजे नामस्मरण आणि बंधुभाव जोपासण्याची वेळ. या महिन्यात अनेकांचे उपवास असल्याने फळे, सुकामेवा व किराणासह नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. यंदा कोरोनाच्या सावट असल्याने बाजारपेठांवर काही प्रमाणात निर्बंध आहेत. जमावबंदी, संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत मुस्लीम बांधवांचा नित्यनेम कसा असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न. 

घरातच नमाज पठण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. घराबाहेर न पडणे हेच, सर्वांच्या हिताचे आहे. केंद्रातील असो की राज्यातील सरकारनं आपल्यासाठीच निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारचं ऐकावं. विनाकारण घराबाहेर जावू नये. उपवास असल्याने फळांची गरज असते. मात्र, सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत फळे, भाजीपाला, किराणा दुकाने खुली असतात. त्या वेळी गर्दी न करता फळे, सुकामेवा, किराणा माल खरेदी करावी. नमाज घरातच पडायची. त्यासाठी मशिदीत जाण्याची गरज नाही.
- प्रा. नौशाद शेख, संचालक, क्रिएटिव्ह अकॅडमी 

मशिदी बंद
लॉकडाऊन असलं तरी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत दुकाने उघडी असतात. या वेळेत जाऊन उपवासासाठी आवश्‍यक असलेली फळे, सुकामेवा व अन्य साहित्य घेऊन यावे. आणि उपवास सोडण्यासाठी फळांचीच आवश्‍यकता असते, असे नाही. पाणी पिऊनसुद्धा उपवास सोडता येतो. त्यासाठी घराबाहेर जाण्याची आवश्‍यकता नाही. सर्व मशिद बंद आहेत. त्यामुळे घरामध्येच सोशल डिस्टंसिंग ठेवून नमाज पडावी. कुराण पठण करावे. अगदी शेजाऱ्यांनासुद्धा त्यासाठी बोलवू नये. एकटा व्यक्ती सुद्धा नमाज पडू शकतो.
- जिकरूल्ला चौधरी, बांधकाम व्यावसायिक, पिंपरी 

गरजूंना "जकात' द्या
रमजान महिन्यात दानधर्माला मोठे महत्त्व आहे. ईदच्या दिवशी अनेक जण दान करतात. त्याला "जकात' असे म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या किमान अडीच टक्के "जकात' द्यायला हवी. कोणताही जात-धर्म न बघता प्रत्येक गरजूला "जकात' दिल्यास त्यांना मदत होईल. कारण, कोरोना हा कोणा जाती अथवा धर्मावरचे संकट नसून संबंध मानवावरचे संकट आहे. ते घालविण्यासाठी सोशल डिस्टसिंग वापरून गरजूंना मदत करायला हवी. सरकारने दिलेल्या वेळेत दुकाने उघडतात, त्या वेळी आवश्‍यक वस्तू खरेदी कराव्यात. गर्दी करू नये. घरातच नमाज पठण करायला हवे.
- इरफान सय्यद, अध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघ

लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या भाविकांना मिळणार ऑनलाईन मार्गदर्शन

मुंबई
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत सुरु झालेल्या रमजानच्या महिन्यात अनेक भाविक मशिदींमध्ये जाऊन नमाजात सहभागी न होता घरीच नमाज पडणार आहेत. मात्र नमाजमध्ये प्रत्यक्ष जाऊन सहभागी  होता येणार नसले तरी या भाविकाना या त्यांच्या पवित्र महिन्यात विशेष ऑनलाईन प्रवचनांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे या मार्गदर्शनाचा एक भाग मराठीत ही प्रसारित केला जाणार आहे.

रमजानच्याया महिन्सात जमात-ए-इस्लामी हिंद आणि विद्यार्थी संघटना स्टूडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ)कडून  दररोज तीन प्रवचने - एक हिंदीमध्ये, दुसरे मराठीत आणि तिसरे महिलांसाठी खास प्रवचन  ऑनलाईन प्रसारित केले जाणार आहे.  या प्रवचनांद्वारे इस्लामिक विद्वान व तज्ञ हे कुरआनमध्ये काय शिकवण दिली आहे याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय ज्यांना भाविकांना या महिन्यात काही नियमित कामे व कृतीपासून वंचित रहावे लागणार आहे तय्साठी नेमके काय करावे यावरही मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी एसआयओ १ मे पासून राज्यातील मराठी भाषिक लोकांसाठी कुरआनच्या शिकवणी समजावन्यासाठी ऑनलाइन 'कुरआन सार' नावाची विशेष मालिका सुरू करणार आहे. रमजान महिन्याचे महत्त्व कुरणामुळेच आहे, या महिन्यात दररोज रात्री 'तरावीह' नावाची विशेष प्रार्थना केली जाते, जिथे दररोज कुरआनच्या तीस भागांमधून एका भागाचे वाचन केले जाते. सामान्यत: अरबी भाषेत पाठ होत असताना अनेक मशिदींमध्ये स्थानिक भाषांमध्ये याचे भाषांतर केले जाते. याच पार्श्वभूमीवर याचे मराठीतही भाषांतर केले जाते.

या सोबतच कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून उपवासाचा महीना पाळताना सर्व आवश्यक नियम पाळून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जमातने केले आहे. आपल्या सगळ्या प्रार्थनांचे पठन आपण योग्य शारीरिक अंतर राखून घरातच करायला हवे असे आवाहन  जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष  रिझवान-उर-रहमान खान यांनी केले आहे.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे मुस्लिम महिलांनो! एखाद्या शेजारणीने आपल्या शेजारणीला भेटवस्तू दिल्यास ते तुच्छ समजू नये, मग  ते एक बकरीचे खूर का असेना!’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
महिलांचा स्वभाव असा असतो की एखादी क्षुल्लक वस्तू आपल्या शेजारणीच्या घरी पाठविणे तिला आवडत नाही. त्यांची इच्छा असते की त्यांच्याकडे एखादी चांगली वस्तू पाठवावी. म्हणून पैगंबर  मुहम्मद (स.) यांनी महिलांना उपदेश केला आहे की लहानात लहान भेटवस्तूदेखील आपल्या शेजारणीकडे पाठवा आणि ज्या महिलांकडे शेजाऱ्यांकडून भेटवस्तू आली आणि ती क्षुल्लक असेल तरीही  ती प्रेमाने स्वीकारली पाहिजे. त्यास तुच्छ समजू नये आणि त्यात कसलीही खोट काढू नये.

माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझे दो शेजारी  आहेत. त्यांच्यापैकी कोणाकडे भेटवस्तू पाठवू?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्या शेजाऱ्याकडे ज्याचा दरवाजा तुमच्या दरवाज्यापासून जवळ असेल.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
शेजाराचा परीघ आसपासच्या चाळीस घरांपर्यंत आहे आणि त्यांच्यापैकी सर्वात जास्त हक्कदार ते आहेत ज्यांचे घर सर्वांत जवळ असेल.

माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह व पैगंबर (स.) यांनी आपल्यावर प्रेम करावे असे ज्या मनुष्याला वाटत असेल  त्याने संभाषण करताना खरे बोलावे, जर त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली असेल तर ती त्या ठेवीच्या मालकाला त्याने सुखरूप परत करावी आणि त्याने आपल्या शेजाऱ्यांशी चांगला व्यवहार  करावा.’’ (हदीस : मिश्कात)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘अमुक महिला खूपच जास्त ऐच्छिक (नफ्ल) नमाज अदा करते, ऐच्छिक रोजे करते आणि दान  देते आणि त्यामुळे ती प्रसिद्ध आहे. परंतु आपल्या शेजाऱ्यांना आपल्या वाणीने त्रास देते.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती नरकात जाईल.’’ तो मनुष्य पुन्हा म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अमुक महिलेच्या  बाबतीत म्हटले जाते की ती कमी प्रमाणात ऐच्छिक रोजे करते आणि खूपच कमी प्रमाणात ऐच्छिक नमाज अदा करते आणि पनीरचे काही तुकड्यांचे दान (सदका) देते, मात्र आपल्या वाणीने   शेजाऱ्यांना त्रास देत नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती स्वर्गात जाईल.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण

पहिली महिला नरकात जाईल कारण तिने अल्लाहच्या दासांच्या अधिकारांचे हनन केले आहे. शेजाऱ्याला त्रास न दिला जावा हा त्याचा हक्क आहे आणि तिने हा हक्क अदा केला नाही आणि  जगात तिने आपल्या शेजाऱ्यांची क्षमादेखील मागितली नाही म्हणून तिला नरकातच जावे लागेल.

माननीय उकबा बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,  ‘‘ज्या दोन व्यक्तींचा खटला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वप्रथम सादर करण्यात येईल त्या
शेजारी असतील.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
अंतिम निवाड्याच्या दिवशी (कयामतच्या दिवशी) अल्लाहच्या दासांच्या अधिकारांच्या बाबतीत सर्वप्रथम अल्लाहसमोर दोन व्यक्ती सादर होतील. त्या जगात एकमेकांच्या शेजारी असतील आणि  एकाने दुसऱ्याला त्रास दिला आणि अत्याचार केला असेल. या दोघांचा खटला सर्वप्रथम सादर होईल.

(५२) आणि जे लोक आपल्या पालनकर्त्याचा अहोरात्र धावा करीत असतात व त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यात गुंतलेले असतात त्यांना आपल्यापासून दूर लोटू नका.३४ त्यांच्या हिशेबातील  कोणत्याही गोष्टीचा भार तुमच्यावर नाही व तुमच्या हिशेबातील कोणत्याही गोष्टीचा भार त्यांच्यावर नाही. याउपरदेखील जर तुम्ही त्यांना दूर लोटले तर अत्याचारी लोकांत गणले जाल!३५
(५३)  खरे पाहता आम्ही अशा तऱ्हेने या लोकांपैकी काहींना काहींच्याद्वारे परीक्षेत टाकले आहे३६ जेणेकरून त्यांनी त्यांना पाहून म्हणावे, ‘‘हेच ते आमच्यातील लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहची  दया व कृपा झाली आहे?’’ होय! काय अल्लाह आपल्या  कृतज्ञ दासांना यांच्यापेक्षा अधिक जाणत नाही?
(५४) जेव्हा तुमच्याजवळ ते लोक येतील जे आमच्या वचनांवर श्रद्धा ठेवतात तेव्हा त्यांना सांगा, ‘‘तुमच्यावर शांती असो. तुमच्या पालनकर्त्याने दया आणि कृपेचा परिपाठ स्वत:साठी अनिवार्य केला  आहे. (ही त्याची दया व कृपाच आहे की) जर तुमच्यापैकी एखाद्याने अज्ञानाने एखादे दुष्कर्म केले असेल व नंतर पश्चात्ताप व्यक्त केला व सुधारणा केली तर तो त्याला माफ करतो, नरमाई  दाखवितो.३७
(५५) आणि आम्ही अशा तऱ्हेने आमची संकेतचिन्हे उघड करून प्रस्तुत करतो जेणेकरून अपराध्यांचा मार्ग अगदी स्पष्ट व्हावा.३८
(५६) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘तुम्ही लोक अल्लाहशिवाय इतर ज्यांचा धावा करीत आहात त्यांची भक्ती करण्यास मला मनाई करण्यात आली आहे.’’ सांगा, ‘‘मी तुमच्या इच्छांचे अनुकरण  करणार नाही. जर मी असे केले तर मी पथभ्रष्ट होईन, सरळमार्ग प्राप्त करणाऱ्यांपैकी राहू शकणार नाही.’’
(५७) सांगा, ‘‘मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एका उज्ज्वल प्रमाणावर कायम आहे आणि  तुम्ही त्याला खोटे लेखले आहे. आता माझ्या अखत्यारीत ती गोष्ट मुळीच नाही जिच्याबद्दल तुम्ही घाई करीत आहात.३९ निर्णयाचा सर्वस्वी अधिकार अल्लाहला आहे.  तोच सत्य बाबी सांगतो आणि तोच सर्वोत्कृष्ट निवाडा करणारा आहे.’’
(५८) सांगा, ‘‘जर एखादे वेळी ती गोष्ट माझ्या अखत्यारीत असती जिच्यासाठी तुम्ही घाई करीत आहात तर माझ्यात आणि तुमच्यात केव्हाच निर्णय लागला असता. परंतु अल्लाह अधिक चांगले  जाणतो की अत्याचाऱ्यांशी कोणता व्यवहार केला गेला पाहिजे.


३४) कुरैशचे मोठमोठे सरदार आणि सधन लोकांचा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर इतर अनेक आक्षेपांपैकी एक आक्षेप हा होता की त्यांच्या चहुबाजूला गुलाम, दलित, पद्दलित, गरीब आणि  निम्नवर्गाचे लोक जमा झालेले होते. ते टोमणे मारत की या माणसाला साथीदार पाहा कसे कसे इज्जतदार लोक मिळालेत! बिलाल (निग्रो गुलाम), अम्मार, सुहैब आणि खब्बाब (रजि.) आमच्यातून बस हेच लोक अल्लाहला सापडले ज्यांना सन्मानित केले जावे! ते सरदार व श्रीमंत लोक ईमानधारकांच्या गरीब स्थितीची टिंगल उडविण्यावरच शांत होत नसत तर एखाद्याच्या इस्लामपूर्व जीवनातील नैतिक उणिवांचा बोभाटा व भांडवल करीत असत आणि चेष्टेने म्हणत की कालपर्यंत तो तर असा असा होता पण आज या सन्मानित समुदायात सामील झाला. याच  चेष्टेचे उत्तर येथे दिले आहे.
३५) म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या भल्या-बुऱ्यासाठी स्वत:च जबाबदार आहे. या मुस्लिम होणाऱ्यांपैकी कोणाबद्दलही तुम्हाला जाब विचारला जाणार नाही आणि न तुमच्याबद्दल त्यांना जाब  विचारला जाईल. तुमच्या हिश्श्याची नेकी (सदाचार) हे हिसकावून घेऊ शकत नाही आणि आपल्या हिश्श्याचा दुराचार (दुष्टता) तुमच्यावर टाकू शकत नाही. हे केवळ सत्याचे अभिलाषी बनून तुमच्याजवळ येतात तर तुम्ही त्यांना दूर का लोटता?
३६) म्हणजे गरीब, दलित आणि समाजातील उपेक्षित लोकांना सर्वप्रथम ईमान धारण करण्याचे सौभाग्य देऊन आम्ही (अल्लाहने) श्रीमंत, गर्विष्ट लोकांना परीक्षेत टाकले आहे.
३७) ज्या लोकांनी त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान धारण केले त्यात बहुतांश लोक असे पण होते, ज्यांच्याकडून इस्लाम स्वीकारण्यापूर्वी मोठमोठे गुन्हे व पाप घडले होते. आता  इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण बदलून गेले होते. तरी इस्लामविरोधक त्यांना मागील जीवनाच्या (अज्ञानकाळाच्या) उणिवा, दोष आणि कामाविषयी खजील करीत असत. यावर सांगितले जात आहे, की ईमानधारकांना धीर द्या व त्यांना सांगा की जो मनुष्य पश्चात्ताप करून स्वत:ची सुधारणा करून घेतो त्याच्या मागील अपराधांसाठी त्याची पकड करण्याची रीत अल्लाहजवळ नाही.
३८) आणि अशाप्रकारे संकेत व्याख्यानाच्या पूर्णक्रमाकडे आहे जो चौथ्या प्रभागाच्या (रूकुअ) या आयतीपासून सुरू झाला आहे. हे लोक म्हणतात की त्यांच्यावर एखादी निशाणी का उतरली नाही?  म्हणजे इतके स्पष्ट आणि बोलके पुरावे असूनसुद्धा लोक आपल्या नकार आणि अवज्ञेच्या आग्रहाखातर अडून बसलेले असतात. असे लोक अपराधी वृत्तीचे असणे असंदिग्धरित्या सिद्ध होते आणि  ही वास्तविकता आरशासारखी स्पष्ट समोर येते की हे लोक खरेतर मार्गभ्रष्टतेच्या आहारी गेल्यामुळे चुकीच्या मार्गावर आहेत. यामुळे नव्हे की सत्य मार्गाचे पुरावे स्पष्ट नाही किंवा काहीं पुरावे त्यांच्या मार्गभ्रष्टतेच्या बाजूचे आहेत.
३९) संकेत आहे अल्लाहच्या कोपाकडे. विरोधक म्हणत होते की जर तुम्ही अल्लाहकडून पाठविलेले पैगंबर आहात आणि आम्ही उघडपणे तुम्हाला नाकारात आहोत, तर का अल्लाहचा कोप  आमच्यावर होत नाही? तुम्ही अल्लाहतर्फे नियुक्त असल्याची निकड तर ही होती की ज्याक्षणी तुम्हाला कोणी खोटे ठरविल व अपमानित करील त्याक्षणी जमीन खचावी आणि तो त्यात गाडला  जावा अथवा वीज पडावी आणि तो भस्म व्हावा. हा कसा अल्लाहने नियुक्त केलेला पैगंबर की त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे तर संकटांवर संकटे आणि अपमानावर अपमान सोसत आहेत. मात्र त्यांना  शिवीगाळ करणारे आणि दगड धोंडे मारणारे चैन करत आहेत!

सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रभाव पुढील काळात आपणा सर्वांना दिसून येईलच. मात्र आतापासूनच याचे दुष्परिणाम सामान्य माणसांच्या मानसिकतेवर झाल्याचे आढळून येते. गेल्या गुरुवारी म्हणजे १६ एप्रिल रोजी पालघर येथे गाडीने सुरतला चाललेल्या तीन व्यक्तींची जमावाद्वारे हत्या केली गेली. मृत व्यक्तींमध्ये गाडीचा ड्रायव्हर आणि दोन साधू सामील आहेत. लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही चोर दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा अफवा नागरिकांमध्ये पसरत होत्या. याच अफवांमधून जमावाने तीन जणांची हत्या केल्याचे स्पष्टपणे पोलीस अहवालामध्ये म्हटले आहे. अशा तNहेने अफवा पसरवून जमावाद्वारे हत्या घडविणे हा कदाचित पूर्वनियोजित कट असावा, असे अनेक विश्लेषकांनी मत व्यक्त केले आहे. या घटनेमध्ये सामील प्रत्येक व्यक्तीला कायद्याद्वारे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे! परंतु पुन्हा एकदा झालेल्या या मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे देशामध्ये सतत दिसून येणारी 'जमावाची' मानसिकता आणि या घटनेनंतर चाललेले धर्माचे राजकारण हे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा हल्ला करत जमावाने ही हत्या केली! यामध्ये पोलीस यंत्रणेचे अपयश, अकार्यक्षमपणा दिसून येतो, त्याचप्रमाणे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा जनतेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरली आहे हे निश्चित! अशामध्ये मॉब लिंचिंगच्या बहाण्याने समाजात विष पसरवणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या असल्याचे दिसून येते. अशा घटनांचे निमित्त करून राजकारणाच्या पोळ्या भाजत सत्ता सोपानापर्यंत जाण्याची तयारी चालली आहे. जमावाद्वारे हत्यांना योग्य ठरवणारे, दंगलींच्या आगीत राजकारण करणारेच लोक आता या घटनेवर मगरीचे अश्रू ढाळत आहेत. त्यांना आता उदार, प्रगतीशील लोकांकडून उत्तर हवे आहे. राज्यासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना असले विकृत राजकारण का केले जात आहे?  यापूर्वी मुलीवर बलात्कार करून तिच्यासह तिच्या बापाला मारले गेले. कित्येक दलितांना निघृणपणे मारले गेले. कोरोनाच्या काळात सर्व धर्मीय कोट्यवधी गरीब, कष्टकरी, कामगारांवर कोसळलेल्या संकटाच्या पहाडाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून अशा प्रकारच्या घटनांचे निमित्त बनविले जात आहे जेणेकरून पुन्हा एकदा जनतेने हिंदू-मुस्लिम तणावात गुरफटून जावे आणि कोरोनाच्या संकटात सरकारचे अपयश झाकले जावे. कोरोनापेक्षा धोकादायक अशा या धार्मिक विद्वेषाच्या व्हायरस पासून सावधान!  आतापर्यंत जमावाला भडकावणाऱ्या लोकांना किंवा मारणाऱ्या लोकांना फुलांचे हार घालून सन्मानित केले जात होते, त्यांना पैसा आणि वकील पुरवले जायचे, त्यांना 'धर्मरक्षक'सारख्या उपाध्या दिल्या जायच्या हे आपण पाहिलेच आहे. त्यामुळे मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढच होईल!  मॉब लिंचिंग करणाऱ्यांना डोक्यावर चढवले गेले. दररोज अंधविश्वास, धर्मवादाचा विषारी कचरा आणि वेगवेगळ्या अफवा पसरवून लोकांना विवेकशून्य रोबोट्समध्ये बदलवण्याचे काम सुरू आहे. पालघरच्या घटनेमध्ये सांप्रदायिक शक्तींनी आणि असामाजिक तत्त्वांनी अफवा पसरवण्यात कसर सोडलेली नाही. असे लोक समाजासाठी अत्यंत धोकादायक असतात. त्यापासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे. जमावाद्वारे हिंसेच्या घटना भाजप शासनामध्ये सामान्य गोष्ट बनली आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये मोहम्मद अखलाक, पहलू खान, इन्सपेक्टर सुबोध कुमार, मधू, तबरेज अंसारी सहीत शेकडो लोक जमावाद्वारे मारले गेले आहेत. फक्त गायीच्या नावानेच २०१२ नंतर मॉब लिंचिंगच्या ८८ घटना झाल्या आहेत, ज्यापैकी ८६ भाजप शासनात झाल्या आहेत. झुंडीच्या या मानसिकतेला थांबवले गेलेच पाहिजे! कायदा, न्याय आणि लोकशाही मूल्यांची रुजवण जिथे कमी आहे अशा देशामध्ये जात-धर्म-चोरी अशा कोणत्याही निमित्ताने लोकांच्या भावना भडकावल्या जातात आणि कायदा हातात घेऊन झुंडीला वाटू लागते की ‘थेट न्याय' करण्याच्या मार्गानेच आता गेले पाहिजे. प्रश्नांच्या मुळाशी न जाता तडकाफडकी न्यायाची ही कल्पना झुंडशाहीकडेच नेते. लक्षात ठेवले पाहिजे की विद्वेष आणि झुंडशाहीने कधीही कोणतेही परिवर्तन होत नाही! लोकांच्या मनातील भीतीमुळे संवेदना, सहानुभूती आणि सामाजिक सौहार्द यासारख्या मूलभूत मूल्यांचे पतन होत चालले आहे. भीतीच्या वातावरणात सामाजिक विद्वेषाचा व्यापक आणि दृढ परिणाम समाज आणि लोकांवर पडेल. भीतीची मानसिकता अनंत काळापर्यंत जीवनशैली आणि सामाजिक व मानसिक आरोग्यावर अतिशय परिणामकारक ठरू शकते. हिंसाचार जेव्हा शिगेला पोहोचतो तेव्हा संपूर्ण समाजाबरोबरच देशाचे नुकसान होते. मानवतेच्या मूळ भावनेला अतिश गंभीर आघात पोहोचतो. अफवांना बळी पडलेले लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना रुजते आणि त्याचा उद्रेक होऊन शांतीप्रिय समाजाचे फार मोठे नुकसान होते. त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवता आपसातील सद्भावना वाढविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. सांप्रदायिक सौहाद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. सामाजिक ऐक्य टिकविण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.

 -शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. जगभरातील तब्बल १८० कोटी मुस्लिम बांधवांना इतिहासात प्रथमच एक अनोखा रमजान साजरा करण्याचे खडतर आव्हान असणार आहे.
एक मात्र खरे की बहुतांशी सर्व मुस्लिम राष्ट्रे तसेच युरोपमधील ब्रिटन, तुर्कस्थान असो की सौदी अरेबिया, इराण, इजिप्त तसेच मलेशिया, इंडोनेशिया ह्यांनी एकमताने कोरोनामुळे होणाऱ्या धार्मिक रूढी, परंपरांमध्ये बदल स्वीकार केला असून लागलीच कार्यवाहीदेखील अमलात आणली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.
रमजान म्हणजे खरे तर शांतीचा संदेश देणारा महिना. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने जे जगभर थैमान घातले आहे त्यामुळे सर्व जगात लॉकडाउन आहे. जगातील मक्का, मदीनासह ब्रिटन, टर्की, मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रातील सर्व मस्जिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
रोजच्या नमाजबरोबर पवित्र रमजान महिन्यातील तरावीहची विशिष्ट नमाज कुठे अदा करावी? याबाबत भारतातील मुस्लिम विशेषता खेड्यापाड्यांतील अशिक्षित मुस्लिम बांधव मात्र संभ्रमात आहेत. यापूर्वी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिम बांधवांना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले, तेही मस्जिदीमध्ये. याहून आमच्या समाजाचे दुर्भाग्य ते काय असू शकते? आम्हीदेखील या घटनेला जबाबदार आहोत. अशा घटना केवळ पाहून चालणार नाही. या रमजान महिन्यात अशी एकही घटना घडणार नाही यासाठी मात्र सर्वांनी सतर्क राहाण्याची आणि एकमेकांना आधार व मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्व मुस्लिमांनी तरावीह नमाज घरातच अदा करावी, असे स्पष्ट संकेत "FIQH RULING SPERTAINING TO PERFORMING THE TARAWIH PRAYER IN OUR HOMES" या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शेख सुलेमान अर् रूहाली जे इस्लामिक विद्यापीठ, मदीनाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि काबा मस्जिद, मदीनाचे इमाम म्हणून कार्यरत आहेत.
काय म्हटले आहे या अहवाल मध्ये?
१- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये तरावीह नमाज अदा केली होती आणि यावर्षी कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
२- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये काही कारणास्तव तरावीह नमाज अदा केली नव्हती आणि या वर्षी मस्जिदीमध्ये तरावीह नमाजसाठी निश्चय केला असेल परंतु कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
३- घरात अदा केलेली तरावीह नमाजलादेखील सुन्नह म्हणून गृहीत धरले जाईल.
४- एकाच कुटुंबातील व्यक्तींनी घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार सामूहिक नमाज अदा करावी.
५-एकट्यानेदेखील तरावीह नमाजला मान्यता आहे, परंतु घरातील सर्वांनी त्यात सामील होताना सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास त्यास अधिक प्राधान्य असेल.
या काळात बुद्धिजीवी मुस्लिमवर्ग, वैचारिक संघटना, सेवाभावी संस्थांनी प्रामुख्याने पुढे येऊन सामान्य मुस्लिम बांधवांचे प्रबोधन करण्याची अत्यंत गरज आहे.
या रमजानच्या काळात मुस्लिमांना खालील जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. ज्या महाराष्ट्र शासनाने बंधनकारक ठरविल्या असून तसे आदेश दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहेत.
१- कोणत्याही परिस्थित मस्जिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी हजर राहू नये.
२- घरच्या /इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
३- मोकळ्या मैदानावर /ईदगाह येथे एकत्र जमून नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
४- घरातच नमाज, तरावीह आणि इफ्तार कार्यक्रम पार पाडावेत.
खरे तर कोरोनाचे आव्हान आम्ही सकारात्मक स्वीकारले तर अनेक बाबी उलघडू लागतात. या रमजानचा विचार केल्यास ‘वर्क फ्रॉम होम’प्रमाणे ‘नमाज फ्रॉम होम’ हे सर्व जण स्वीकारत आहेत. त्याचबरोबर कुरआनचे पठण यापूर्वी वेळ नसलेल्यांना लॉकडाऊनमधील फावला वेळ सत्कारणी लावता येणार आहे. हा रमजान म्हणजे न भूतो न भविष्यती असाच असणार आहे. प्रत्येकाच्या जीवनातील हा पहिलाच अकल्पित असा प्रसंग अनुभवावा लागणार आहे. रोजा स्वत: उपाशीपोटी राहून इतरांची भावना ओळखण्याबरोबर निराधार, गरीब मजूर यांच्या पोटासाठी धावून जाणे शिकवत आहे. या कोरोनाने आमचे रियल हिरो हे चित्रपटातील कलाकार, खेळांमधील आंतरराष्ट्रीय नावाजलेले खेळाडू नसून आजमितीला आमच्या जीविताचे रक्षण करणारे हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स असो की पोलीस कर्मचारी किंवा शेतात राबणारे शेतकरी हेच आमचे देवदूत असणार आहेत हे सिद्ध होते.
कोरोनामुळे रमजान दैनदिनीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. जगभरातील बहुतांशी मस्जिदींतील समित्यांनी गरजूंच्या सेवेसाठी  वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. या काळात अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी, इफ्तारच्या माध्यमातून अन्न पदार्थांचे पॅकेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची योजना आखली आहे. भारतामध्येदेखील जमाअत-ए-इस्लामी हिंद ही सामाजिक संघटना दरवर्षी गरीब, निराधार व गरजूंपर्यंत रमजानच्या काळात अन्नपदार्थ व जीवनावश्यक वस्तू पोहोचवत असतेच. आता मात्र प्रत्येक गावागावांमधील मस्जिदींच्या समित्या असतील, मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीने, सेवाभावी संस्थांनी रस्त्यावरील गरीब, मजूर, निराधार यांच्यापर्यंत अन्नदान आपआपल्या परीने नियोजनबद्धरीत्या पोहोचवले पाहिजे. त्याचबरोबर अहोरात्र सेवेसाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच...!
या कामी कॉर्पोरेट व्यवस्थापनासारखे तंत्र अवलंबणे महत्त्वाचे ठरेल. कालानुरूप सर्वांना बदलावे लागणार आहे. उदा. मस्जिदीच्या परिघात किती मुस्लिम कुटुंब राहातात त्यांची यादी कुटुंबप्रमुख, कुटुंबातील एकूण लोकांची संख्या, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यासह समाज सुधारणेसाठी ते कुटुंब काय योगदान देऊ शकते? याचा आढावा घेतला पाहिजे. या सूचीवरुन नेमके गरजू शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल. केवळ पैसाच नव्हे तर एखाद्या मुस्लिम मानसोपचारतजज्ञाचा समुपदेशांनासाठीदेखील मोठा उपयोग होईल. एखाद्या तरुणाचा त्याच्या क्षमतेचा उपयोग दुसऱ्याच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी होऊ शकेल.
कोरोनामुळे अनेक बुद्धिजीवी वर्गातील घटक एकत्र येऊ लागले आहेत. सर्वप्रथम मुस्लिम पत्रकारांना एकत्र येऊन सध्याचा काळात मुस्लिमांवर लागणारे दोषारोप कसे दूर करता येतील यासाठी पुढाकार घेऊन काम करावे लागणार आहे. मुस्लिम समाजात हळू हळू बदल घडू लागले आहेत, ही जमेची बाजू असली तरी सर्व बुद्धिजीवी घटकांनी मोठ्या प्रमाणात पुढे येणे काळाची गरज ठरणार आहे. पत्रकारांसोबत डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजीनियर्स, शासकीय सेवेतील अधिकारी यांचे स्वतंत्र ग्रूप तयार होऊन प्राथमिक स्वरुपात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर महाराष्ट्र असे सुरू करावेत. तीन महिन्यांतून या सर्व ग्रुपनी एकत्र जमा होऊन विचारांची देवाणघेवाण अर्थात ‘थिंक-टँक’ बनवावेत. समाजातील उपेक्षित जे घटक आहेत ज्यांना पैशाची, कर्जाची गरज भासते, तसेच शिक्षणासाठी गुणवत्ता असूनदेखील प्रवेशाला मुकावे लागते, अशांसाठीही इस्लामिक बँक प्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकते. या कामी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आणि निवृत्त शिक्षित मुस्लिमांचा मोठा हातभार लाभू शकतो. गावागावांतील सर्वांनीच एकजुटीने समाज सुधारणेसाठी (टीमवर्कने) काम करणे अपेक्षित आहे. या कामी धर्मगुरू, उलेमा, जमाअतचे सहकार्यदेखील मोठी दिशा देऊ शकते.
रमजानच्या निमित्ताने दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे इफ्तार पार्टी, त्यासाठी लाजवाब पदार्थ हे सर्वत्र पाहावयास मिळतात. परदेशीच काय पण भारतामध्ये शहरांमधून सर्रास स्टॉल लावले जातात. मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मीयदेखील या खाद्य पदार्थांचा मोठ्या आनंदाने आस्वाद घेत असतात. या वर्षी मात्र या सर्व बाबींना मुकावे लागणार आहे.
परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मुस्लिम राष्ट्रांमधून तसेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रान्समध्ये रमजान इफ्तार स्टॉल्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्देश सोशल डिस्टन्सिंग हाच होय. यामुळे मात्र केटरिंग व्यवसाय धोक्यात आला असून वर्षभरातील ३० ते ४५ टक्के रमजानमध्ये होणारा व्यवसाय लयास गेला आहे.
या रमजानमध्ये खरे गरजू शोधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने किमान एका व्यक्तीसाठी दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचे सत्कर्म जरी घडवून आणले तरी हजचे पुण्य पदरी पडल्याचे भाग्य मिळू शकेल.
नमाजपूर्वी अजान देण्याच्या माध्यमातून मस्जिदीत प्रार्थनेकरिता येण्याचे आवाहन करण्यात येते. आता मात्र या कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी अजानमधून ‘घरातच नमाज अदा करा’ किंवा ‘जिथे असाल तिथेच नमाज अदा करा’ असे बदलाचे सुतोवाच संपूर्ण जगभरातून विशेषता मुस्लिम राष्ट्रांत स्वीकारण्यात आले आहे. ही खरोखरच इस्लामध्ये धार्मिक विधींबाबत विशिष्ट प्रसंगी सवलतीची पोचपावती म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
मुस्लिमांना मानवसेवा करण्याची इतिहासातील ही अनोखी संधी कोरोना अर्थात रमजानच्या निमित्ताने चालून आली आहे, तिचा सकारात्मकदृष्ट्या स्वीकार हा करावाच लागेल!

- अस्लम जमादार

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग २१० देशांमध्ये पसरला आहे. संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास २.६ दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. आर्थिक आणि वैद्यकीय संसाधनांनी संपन्न अनेक विकसित आणि मोठे देश या संकटाला बळी पडले आहेत. विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये संक्रमण पसरण्याची शक्यता असल्याने परिस्थिती भयानक होण्याची स्थिती आहे. दिवसेंदिवस वाढत जाण्याचे एक कारण म्हणजे निश्चित उपचारांचा अभाव आणि संसर्गाचा जागतिक प्रसार. गेल्या चार दशकांच्या जागतिक उदारीकरणाच्या धोरणांमुळे, विकसनशील देशांकडून गरीब देशांपर्यंत आरोग्य आणि इतर सामाजिक सेवांच्या वाढत्या खाजगीकरणामुळे अनिश्चिततेची परिस्थिती वाढत चालली आहे.
अशा वेळी लॅटिन अमेरिकेतील लहान बेट असलेले क्युबा या अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करीत आहे. जगातील देशांमध्ये क्युबाचे डॉक्टर कोरोना विषाणूंमुळे पीडित व्यक्तींवर उपचार करीत आहेत. क्युबा सध्या ५९ देशांना वैद्यकीय मदत पाठवित आहे. बऱ्याच जणांना कदाचित हे माहीतही नसेल. क्युबा सध्या जगातील एकमेव नियोजित अर्थव्यवस्था असून पर्यटन उद्योग आणि कुशल कामगार, साखर, तंबाखू आणि कॉफीच्या निर्यातीत या अर्थव्यवस्थेचे वर्चस्व आहे. मानव विकास निर्देशांकानुसार क्युबाचा मानवी विकास उच्च स्थानावर आहे. उत्तर अमेरिकेत आठव्या क्रमांकवर असून २०१४ मध्ये जगात ६७ व्या क्रमांकावर आहे. क्युबा आरोग्य सेवा, शिक्षणासह राष्ट्रीय कामगिरीच्या काही मेट्रिक्समध्ये देखील उच्च स्थानावर आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफने दिलेल्या टिकाऊ विकासाच्या अटींची पूर्तता करणारा क्युबा जगातील एकमेव देश आहे.
क्युबन सरकार एक राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा चालविते आणि आपल्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वित्तीय आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारते. क्युबामध्ये कोणतीही खासगी रुग्णालये किंवा दवाखाने नाहीत. कारण सर्व आरोग्य सेवा शासकीय संचालित आहेत. सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री रॉबर्टो मोरालेस ओजेदा आहेत. चीनच्या वुहानमध्ये रूग्णांच्या मदतीसाठी प्रथम आलेल्या परदेशी लोकांपैकी क्युबाचे डॉक्टरदेखील होते. इतकेच नव्हे तर क्युबाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ग्रॅन्मा' या वृत्तपत्रानुसार सध्या जगातील ६१ देशांमध्ये क्युबाच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय ब्रिगेडचे २८,२६८ सदस्य आहेत.
चीनने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी निवडलेल्या औषधांपैकी क्युबाचे अँटीवायरल रिकॉम्बीनंट इंटरफेरॉन अल्फा २ बी (घ्इNrाम्) हे आहे. हे औषध आज जगभरात प्रसिद्ध झाले. हे साडेतीन दशकांपूर्वी क्युबामध्ये विकसित झाले होते. याचा एक प्रकार १९८६ मध्ये तयार झाला होता, ज्याने कोट्यवधी क्युबा लोकांना डेंग्यूपासून वाचवले. सप्टेंबर २०१४ मध्ये युनायटेड नेशन्स (यूएन) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पश्चिम आफ्रिकेत इबोला विषाणूच्या साथीच्या आजारामुळे होणाऱ्या वैद्यकीय संकट आणि सामाजिक आपत्तीला रोखण्यासाठी वैद्यकीय सहकार्याचे आवाहन केले. ऑक्टोबर २०१४ ते एप्रिल २०१५ पर्यंत सिएरा लिओनी, लाइबेरिया आणि इक्वेटोरियल गिनी येथे इबोला साथीच्या वेळी क्युबाच्या २५६ डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गटाने थेट सेवा दिली.
पश्चिम आफ्रिकेतील इबोला साथीच्या रोगास क्युबाच्या वैद्यकीय पथकांचा प्रतिसाद म्हणजे जगभरातील आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी आरोग्य सेवेची तरतूद अधिक मजबूत करण्यासाठी क्युबा एक आदर्श उदाहरण आहे.
आफ्रिकेतील इबोलाविरूद्ध लढाईचा अनुभव घेऊन कोविड -१९ सोबत लढण्यासाठी, मदतीसाठी क्युबाचे ५२ जणांचे वैद्यकीय चमू इटली येथे दाखल झाले आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव झालेले लोम्बार्डी शहर येथे हा चमू मदत करत आहे.
क्युबाच्या इंटेन्सिव्ह केअरचे विशेषज्ञ लिओनार्डो फर्नांडिस म्हणतात, ‘आम्हाला सुद्धा कोरोनाची भीती आहे, मात्र आता या संकटसमयी भीती बाजूला सारून कर्तव्य पूर्ण करायला पुढे यावं लागेल.' इटलीत सेवा देणाऱ्या परिचारिका कार्लोस आर्मान्डो गार्सिया हर्नांडेझ यांनी सांगितले, ‘मंजुरीची पर्वा न करता, वैद्यकीय कर्मचारी जगभरातील आजाराशी लढत राहतील', ‘ही जागतिक लढाई आहे आणि आम्हाला ती एकत्र लढण्याची गरज आहे.’
जग अनिश्चित भविष्याचा सामना करत असून क्युबाने गेल्या आठवड्यात निकाराग्वा, व्हेनेझुएला, सूरीनाम आणि जमैका येथे वैद्यकीय कर्मचारी पाठविले आहेत. परंतु कमी उत्साहाने किंग्स्टन आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४० क्युबा कर्मचाऱ्यांना अभिवादन केल्यानंतर जमैकाचे आरोग्यमंत्री खिस्तोफर तुफ्टन यांनी त्यांच्या उदारपणाचे कौतुक केले; ते म्हणाले, ‘संकटाच्या काळात क्युबाचे सरकार, क्युबाचे लोक, प्रसंगी उठले; त्यांनी आमचे अपील ऐकले आणि त्यांनी प्रतिसाद दिला’. पंतप्रधान अँड्र्यू होलिने देखील तितकेच आभार मानले, ‘आम्ही कोविड -१९ या साथीच्या रोगाविरुद्ध लढत असून क्युबाच्या सहकार्याबद्दल जमैका कृतज्ञ आहे,’
एक ब्रिटीश जहाज कॅरिबियन समुद्रात भटकत होते. त्यात स्वार झालेल्या काही लोकांना कोरोनाचा संसर्ग होता. अनेक देशांत त्यांचा प्रवेश नाकारला गेला होता. क्युबाने ते जहाज आपल्या किनाऱ्यावर उभे केले. पोलिसांच्या सुरक्षेसह सर्व प्रवाशांना नीट उतरवून घेऊन विमानतळावरुन त्यांना मायदेशी जाण्याची सोय उपलब्ध करून दिली. ब्रिटिश क्रूझ लाइनर एम.एस.च्या स्वागतासाठी युनायटेड किंगडमनेही कॅरिबियन बेटाचे आभार मानले.
क्युबाच्या वैद्यकीय संघांनी आंतरराष्ट्रीय आरोग्य संकटाला प्रतिसाद देण्याची ही पहिलीच वेळ नाही. डब्ल्यूएचओचे संचालक डॉ. मार्गारेट चॅन इबोला साथीच्या वेळी म्हटले होते, ‘जर आपण इबोलाबरोबर युद्धाला जात आहोत तर आपल्याला लढायला संसाधनांची गरज आहे. क्युबाच्या सरकारच्या उदारपणाबद्दल आणि आरोग्य व्यावसायिकांनी आम्हाला सर्वात वाईट इबोलाचा उद्रेक होऊ नये म्हणून मदत केली. त्यासाठी त्यांचे आभारी आहोत.'
क्युबाच्या सर्वांत व्यापक प्रयत्नांपैकी एक म्हणजे व्हेनेझुएला येथे नेत्र शस्त्रक्रिया कार्यक्रम आहे. जिथे हजारोंंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले गेले आहे.
२०१० मध्ये हैती येथे झालेल्या भूकंपात क्युबाच्या शेकडो वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मदत केली. क्युबन वैद्यकीय संघांनी दक्षिण आशियाई त्सुनामी आणि २००५ मधील काश्मीर भूकंपसारख्या संकटात काम केले. सध्या दक्षिण आफ्रिका, गॅम्बिया, गिनी बिसाऊ आणि माली या देशांमध्ये आफ्रिकेत सुमारे २००० क्युबाचे डॉक्टर कार्यरत आहेत.
क्युबामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. अमेरिका धार्जिण बतिस्ताची हुकूमशाही सत्ता उलथवून लावण्यात आली आणि युनायटेड स्टेट्सने क्युबाविरूद्ध केलेल्या प्रतिबंधानंतर १९६० मध्ये रोग आणि बालमृत्यूची संख्या वाढत गेली. फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा या क्रांतिकारकांनी क्युबामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. १९६० मध्ये क्रांतिकारक आणि चिकित्सक चे गव्हेरा यांनी क्रांतिकारक औषधी या निबंधात क्युबाच्या आरोग्य सेवेच्या भविष्यासाठी आपले ध्येय मांडले ‘आज आरोग्य मंत्रालय आणि तत्सम संस्था यांच्याकडे जे काम सोपविण्यात आले आहे, ते महान सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणे आहे. संभाव्य व्यक्ती, प्रतिबंधात्मक औषधाचा एक कार्यक्रम स्थापित करा आणि आरोग्यविषयक पद्धतींच्या कामगिरीकडे जनतेला अभिमुख करा.' कम्युनिस्ट क्युबा सरकारने असे ठासून सांगितले की सार्वत्रिक आरोग्य सेवा ही राज्य नियोजनाची प्राथमिकता बनली पाहिजे. त्या दुष्टीने क्युबाने वाटचाल केली. १९६० पासून सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय सेवांचे राष्ट्रीयकरण आणि प्रादेशिकरण करण्याचा कार्यक्रम सुरू केला गेला.
क्युबाची राष्ट्रीय आरोग्य प्रणाली अनेक स्तरांवर बनलेली आहे, १) व्यक्ती आणि कुटुंब असलेले समुदाय, २) कौटुंबिक डॉक्टर-परिचारिका संघ, ३)  मूलभूत कार्य संघ, ४) समुदाय पॉलीक्लिनिक, ५) रुग्णालये आणि ६) वैद्यकीय संस्था. क्युबाचा फॅमिली फिजीशियन आणि नर्स प्रोग्राम हा डॉक्टर आणि नर्स टीमचा बनलेला आहे. जो व्यक्ती, कुटुंब आणि त्यांच्या समुदायांना सेवा देतो. ते त्यांच्या शासकीय-निर्मित कौटुंबिक औषध कार्यालयावर जगतात. थेट त्यांच्या समाजात राहातात आणि २४ तास उपलब्ध असतात. क्युबामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक या सर्व स्तरांवर तिहेरी निदान करण्यासाठी प्रतिबद्धता आहे. सर्व स्तरांवर निर्णय घेताना 'रुग्ण' आणि लोकांचा व्यापक सहभाग असतो. पॉलीक्लिनिकद्वारे रुग्णालय, समुदाय, प्राथमिक काळजी यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. १९७६ मध्ये क्युबाचा आरोग्य सेवा कार्यक्रम सुधारित क्यूबन राज्यघटनेच्या कलम ५० मध्ये समाविष्ट करण्यात आला. ज्यामध्ये असे म्हटले आहे की ‘प्रत्येकास आरोग्य संरक्षण आणि काळजी घेण्याचा अधिकार आहे. राज्य या हक्काची हमी देतो.’
१९६३ पासून क्युबा पोलिओपासून मुक्त आहे, परंतु मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेद्वारे सुरू असते. प्राथमिक काळजी सुविधांमध्ये, नीतिशास्त्र, मूल्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासह क्युबाच्या आरोग्य व्यवस्थाचा एक मोठा भाग म्हणून शिकविले जाते. लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसिन हे जगातील सर्वांत मोठे वैद्यकीय विद्यापीठ क्युबामध्ये आहे. आतापर्यंतचा सर्वांत मोठा फरक म्हणजे प्रति व्यक्ती डॉक्टरांचे गुणोत्तर क्युबामध्ये प्रति १७५ लोकांपैकी एक डॉक्टर आहे, यूकेमध्ये हे प्रमाण ६०० लोकांपैकी एक डॉक्टर आहे आणि भारतात १८०० लोकांपैकी एक डॉक्टर आहे. (ैैै.र्rोीrम्प्ुaूा.हाू) १९८० च्या दशकात क्युबाच्या शास्त्रज्ञांनी बॅक्टेरियाच्या मेंदूच्या बुबुळाच्या रोगास प्रतिबंधक लस तयार केली, जो त्या बेटावर एक गंभीर आजार होता. क्युबानची ही लस संपूर्ण लॅटिन अमेरिकेत वापरली जाते.
२०१२ पर्यंत युनायटेड स्टेट्समध्ये बालमृत्यू दर १,००० जन्मामागे ६.० होता, तो क्युबामध्ये ४.८ आहे. २००० मध्ये, युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस कोफी अन्नान म्हणाले की, ‘क्युबाने इतर अनेक देशांचा हेवा केला पाहिजे' आणि असे म्हटले आहे की, दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या आकारामुळे सामाजिक विकासातील कामगिरी प्रभावी आहेत. ‘आरोग्य, शिक्षण आणि साक्षरता यावर योग्य प्राधान्य दिल्यास राष्ट्रांनी आपल्याकडे असलेल्या स्रोतांद्वारे किती कार्य करणे शक्य आहे हे दर्शविले आहे.'
२००७ मध्ये क्युबाने जाहीर केले की त्याने रक्तपेढी, नेफ्रोलॉजी आणि वैद्यकीय प्रतिमांमध्ये संगणकीकरण आणि राष्ट्रीय नेटवर्क तयार केले आहे. अशा उत्पादनात फ्रान्स नंतर क्युबा जगातील दुसरा देश आहे. क्युबा एक संगणकीकृत आरोग्य नोंदणी, रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली, प्राथमिक आरोग्य सेवा, शैक्षणिक कार्ये, वैद्यकीय अनुवांशिक प्रकल्प, न्यूरोसायन्स आणि शैक्षणिक सॉफ्टवेअर तयार करीत आहे. क्युबातील लोकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा मोफत राखणे, तज्ज्ञांमध्ये देवाणघेवाण वाढविणे आणि संशोधन-विकास प्रकल्पांना चालना देणे हे यामागील उद्दिष्ट आहे. वायरिंग प्रक्रियेचा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे राष्ट्रीय आरोग्य प्रणालीतील सर्व घटक आणि कामगारांना क्युबाच्या डेटा ट्रांसमिशन नेटवर्क आणि आरोग्य वेबसाइट (घ्Nइध्श्ED) मध्ये प्रवेश मिळण्याची हमी देणे होय.
दोन दशकांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात क्युबा क्रांतीवीर नायक ‘चे गव्हेरा’ यांची मुलगी एलिडा गव्हेरा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, 'क्युबाला हजारो वकील, लेखापाल, दलाल नसून हजारो डॉक्टर, शिक्षक आणि तज्ज्ञांची आवश्यकता आहे. तिच्या वडिलांप्रमाणेच एलिडा स्वत: डॉक्टर आहे. क्युबाच्या समाजवादी राजकारणाचे सर्वांत मोठे समीक्षक आणि फिदेल कॅस्ट्रो यांच्यासह त्याचे नेतेही असा विश्वास ठेवतात की, ‘शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरी विलक्षण आहे.' सध्याचे राष्ट्रपती राउल कॅस्ट्रो दैदिप्यमान कामगिरी करत आहेत.
क्युबाच्या डॉक्टरांनी नैसर्गिक आपत्तीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला (विशेषत: तिसऱ्या जगातील देशांना) मोफत वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्याचे काम केले आहे. आता संकट काळातही क्युबा धैर्याने लढत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे क्युबन कोरोना विषाणूशी लढण्यासाठी गेले आहेत.
आज जेव्हा क्युबा कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात अग्रणी आहे. तेव्हा फिदेल कॅस्ट्रोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘आपला देश इतर लोकांवर बॉम्ब टाकत नाही. आपल्याकडे जैविक किंवा आण्विक शस्त्रे नाहीत. आम्ही इतर देशांना मदत करण्यासाठी डॉक्टर तयार करतो.' क्युबाची आरोग्यदायी कामगिरी लक्षात घेता निश्चितपणे जगातील सर्वच देशांनी आपले प्राधान्यक्रम लक्षात घेतले पाहिजेत. तुम्ही तुमच्या देशाची संपत्ती जर पैशात मोजत असाल तर भविष्यात येणाऱ्या संकटांचाही तुम्ही सामना करू शकणार नाही. चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य हेच तुमचे संरक्षण करणार आहे.
क्युबाने मानवतेबद्दल दाखवलेली जागतिक एकता, बांधिलकी, दृष्टिकोन जगाला दिशादर्शक आहेच. फक्त जगाने त्यातून धडा घेण्याची गरज आहे. फिदेल कॅस्ट्रो एकदा म्हणाले होते की, ‘उत्तर अमेरिकन लोकांना हे समजत नाही की क्युबाशिवाय आपल्याकडे देखील एक देश आहे, मानवता.' हे केवळ एका आश्चर्यकारक वत्तäयाचे विधान नाही. त्यांच्या आदर्श आणि तत्त्वांबद्दलच्या त्यांच्या दृढनिश्चयाची ती अभिव्यक्ती आहे. या प्रतिबद्धतेमुळेच अमेरिकेने कॅस्ट्रोला अनेक प्रकारे उलथून टाकण्याचे प्रयत्न केले. क्रांतीनंतर क्युबाने कम्युनिस्ट विचारांवर वाटचाल केली. शीतयुद्ध सुरू असेपर्यंत सोव्हिएट रशिया आणि इतर समाजवादी देशांकडून क्युबाला मदत होत होती. मात्र, सोव्हिएट कोसल्यानंतर क्युबासमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती. अमेरिका आणि अमेरिकधार्जिण अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादले. मात्र त्यावरही त्यांनी मात केली. परंतु जनतेच्या एकजुटीवर निधडाने सामना केला. ‘केवळ मानवताच संकटापासून मानवता वाचवू शकते.' हा आदर्श क्युबाने घालून दिला आहे.

- नवनाथ मोरे, 
कोल्हापूर, ९९२१९७६४६०

Palghar Lynching
पालघर येथे घडलेली मॉब लिंचिंगची घटना खुप क्लेशदायक आहे. मुळात लिंचिंग हे कृत्य घोर निंदनिय व अमानवीय आहे. पालघर येथील घटनेचा विडियो  प्रसार माध्यमात पाहिल्या नतंर लोकांनी किती निर्दयतेने क्रुरपणे त्यांची हत्या केली हे स्पष्ट होते. जरी संबधितांनी लॉकडाउनचे नियम तोडले असतील तरी, कांही तरी खोटी अफवा पसरवून त्यांना ठार मारण्याचा अधिकार लोकांना कोणी दिला? हेच कळत नाही. आपल्या देशात कोर्ट आहे व दोष सिद्ध झाल्यास शिक्षा देण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे तरी परंतु लोक स्वतः शिक्षा का देत आहेत ? मग का आता आपल्याला न्यायालयाची आवश्यकता राहिलेली नाही का?
       अलीकडे आपल्या देशात मॉबलिंचिंगच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अखलाक, पहेलु खान, तबरेज वगैरे अशा अनेक लोकांना ठेचून मारण्यात आले. त्यावेळेस अनेकांचे रक्त सळसळले नाही व ते मूकदर्शक बनले. त्यामुळेच अशी प्रवृत्ती देशात वेगाने फोफ़ावलीय व पुन्हा परवा लिंचिंग सारखी घटना घडून निरपराध साधु संताचा बळी गेला, आता कांहीही केले तर कोणीही त्यांचे जीव त्यांना परतावू शकणार नाही हे ही तेवढेच वास्तव.
       गाड़ी अडविन्यात आली, त्यावर शंभर पेक्षा जास्त सैतानानी दगड़ाने व काठयाने हल्ला केला, विचार करा त्यावेळेस त्या साधूंच्या मनात किती भीती व दहशत निर्माण झाली असेल स्वतः चा जीव वाचविण्यासाठी किती गया-वया केला असेल परंतु त्या हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांच्या मनात थोड़ीही दया आली नाही. या ठिकानी मी मुद्दाम दहशतवादी हा शब्द वापरला आहे तो कोणाची कथित भावना दुखाविण्यासाठी नव्हे तर त्या हल्लेखोंरानी घटनेच्या वेळेस त्या निरपराध साधु संताच्या मनात जी भीती व दहशत
निर्माण केली -(उर्वरित पान 7 वर)
होती ते दहशतवादी कृत्यच आहे. निर्भया प्रकरणातील दोषी हे सुद्धा एक प्रकारे दहशतवादीच होते. कारण त्यानी बलात्कार करून हत्या केली होती व तमाम माता, भगिनींच्या मनात स्वतः च्या सुरक्षेसंबंधी दहशत निर्माण केली होती.
       या आधुनिक युगात लिंचिंग सारखे प्रकार आपल्या देशासाठी कलंक आहेत, आपण सहिष्णु आहोत म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतो परंतु संयम व सहिष्णुता प्रत्यक्षात वागण्यात दिसून आली पाहिजे. अजमल कसाब सारख्या खूंखार आतंकवाद्याला व निर्भयाच्या दोषीनाही कोर्टाचे सर्व पर्याय उपलब्ध करून देवूनच फासावर लटकविण्यात आले आहे, याही गोष्टीचा विचार लिंचींगवाद्यांनी करायला पाहिजे व कोर्ट व कायद्यावर त्यांनी विश्‍वास ठेवायला पाहिजे.     लिंचिंगवादी व त्यांना पाठिंबा देणार्‍यांची संख्या खूप वाढलेली आहे, आतंकवादी बगदादी व हे लिंचिंगवादी यांच्या वागन्यात समानता आहे. कारण बगदादी हा हैवान आहे व तो लोकांना ठार मारण्यात विश्‍वास ठेवतो तर लिंचिंगवादी सुध्दा लोकांना ठारच मारत आहेत. आता वेळ आली आहे की अशी प्रवृत्ती थांबविन्याची.     याप्रकरणी शंभरपेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात काही अल्पवयीन ही आहेत, बघा काय भवितव्य घडवित आहोत आपण पुढील पिढीचा; विचार करण्याची व पावले उचलण्याची हीच वेळ आहे. मला त्या हल्लेखोराना विचारायचे आहे एवढी निर्दयता आणली कुठून, काय मिळाले तुम्हाला लिंचिंग करून? शेवटी कलम 302 चे आरोपी होण्याशिवाय काय मिळाले तुम्हाला?
      या घटनेच्या वेळेस ज्या-ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्या विरुद्ध ही शासनाने कठोर कार्यवाही करायला हवी. दिल्लीमध्ये पोलिसांच्या समोरच गुंडांद्वारे आंदोलनकारी व विद्यार्थ्यांवर गोळीबार होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेते त्या पोलिसांवर कार्यवाही झाल्याचे ऐकिवात नाही, परंतु हे महाराष्ट्र आहे व शिवरायांचा, फुलेंचा व बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे, व सरकारही खंबीर आहे, ते संबधितावर कार्यवाही करतीलच ही अपेक्षा. 

- अ‍ॅड. शाहनवाज पटेल, औसा
 मो. 9423349156

येत्या दोन दिवसात रमजानचे आगमन होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र इतर वर्षांप्रमाणे या वर्षाचे रमजान वेगळे असून, संपूर्ण लॉकडाउनमध्ये रमजानचा महिना आलेला आहे. हा महिना कसा साजरा करावा, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वेही ठरवून दिलेली आहेत. देशाचा कायदा पाळण्याचा आदेश आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीतून मिळतो. म्हणून शारीरिक अंतर राखून लांब राहून हे रमजान साजरे करावे लागणार आहेत. म्हणून पाचवेळेसची नमाज आणि तरावीहची विशेष नमाज मस्जिदमध्ये जावून अदा करणे यावर्षी शक्य होणार नाही, याची खंत आपल्या सर्वांनाच आहे. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी हृदयावर दगड ठेउन आपल्याला मस्जिदीपासून लांब रहावे लागणार आहे. रमजान म्हटलं की, सार्‍यांची लगबग असते. मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल होते. रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत असते. वेगवेगळे चमचमीत पदार्थांनी हॉटेल आणि गाडे सजलेले असतात. यावर्षी मात्र असे काहीच होणार नाही. एका दृष्टीने जरी हिरमोड करणारी ही परिस्थिती असली तरी दुसर्‍या दृष्टीने आत्मचिंतन करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एकांतामध्ये अभ्यास चांगला होतो. रमजानमध्ये कुरआनला समजण्यासाठी एकांताममध्ये अभ्यास करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एरव्ही तर कुरआन समजून घेण्याला अनेक लोकांना वेळ नसतो. पण आता ही वेळ चालून आलेली आहे. म्हणून प्रत्येकाने ही संधी सोडू नये. कारण कोणी काहीही म्हणो, कुरआन हीच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
    अल्लाहवर विश्‍वास ठेवणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी ही एक चारित्र्यसंवर्धनाची संधीच आहे. आज भारतामध्ये पाश्‍चात्य असभ्यतेचा प्रभाव खोलपर्यंत रूजलेला आहे. पावलापावलावर खोटेपणा, विश्‍वासघातकीपणा, अश्‍लिलता इत्यादी विकारांनी थैमान घातलेले आहे. चांगल्या माणसांना जगणे मुश्किल करून टाकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांचे हे राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे कि, आपल्या प्रिय देशबांधवांपर्यंत सत्य आणि चांगुलपणाचा संदेश पोहोचविणे. रमजान म्हणताच सगळीकडे एक चैतन्याचे वातावरण निर्माण करते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना रोजे ठेवण्याचा उत्साह असतो. दिवसभर उपाशी राहून इबादत केल्याने एका वेगळ्याच आत्मीक आनंदाची अनुभूती होते. वर्षभर जे लोक इस्लामी उपासनेपासून अंतरराखून असतात ते सुद्धा रमजानच्या महिन्यामध्ये मनापासून इबादत करण्यामध्ये तल्लीन होतात. अनेक लोक ठरवून सुट्ट्या घेतात व या 30 दिवसाच्या तजकिया-ए-नफ्स (आत्म्याचे शुद्धीकरण) मोहिमेमध्ये उत्साहाने सहभागी होतात. तसे पाहता प्रत्येक समाजामध्ये उपवास ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. मात्र रमजानमधील रोजे हे इतर उपवासापेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे असतात. सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पेय आणि पदार्थाचे सेवन न करता राहणे हे केवळ आत्मीक बळानेच शक्य होते. नसता दुपारच्या जेवणाला तासभर उशीर झाला तर सहन होत नाही. रमजानमध्ये मात्र महिनाभर दिवसभर उपाशी राहूनसुद्धा माणसे शांत राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाहनी माणसाची रचना दोन गोष्टींपासून केलेली आहे. एक त्याचे शरीर आणि दूसरे त्याची आत्मा. शरीर रक्त, मांस, हाडे यांच्यापासून बनलेले आहे व दृश्य आहे. (उर्वरित  मात्र आत्मा अदृश्य आहे. आत्म्याच्या बाबतीत कुरआनमध्ये म्हटलेले आहे कि, हा आत्मा म्हणजे ’अम्र-ए-रब्बी’ म्हणजेच अल्लाहचा आदेश आहे. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आत्मा सुद्धा आजारी पडतो. ज्याप्रमाणे शरीराला पोषणाची गरज असते त्याप्रमाणे आत्म्यालाही पोषणाची गरज असते. शरीराचे पोषण अन्न, पाण्याने होते तर आत्म्याचे पोषण इबादते इलाही(अल्लाहच्या उपासने) ने होते. आणि उपासनेचा उत्कृष्ट आविष्कार नमाज आणि रोजा आहे. रोजा ही एक अदृश्य इबादत आहे. एखाद्या माणसाने रोजा ठेवला म्हणजे स्वखुशीने त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. कोणासाठी? फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहासाठी. म्हणजे रोजा एक अशी इबादत आहे, ज्याचा संबंध अल्लाह आणि त्याचा बंदा दोघांमध्येच आहे. नमाजला जात असतांना सगळे लोक पाहत असतात. पण रोजा आहे का नाही? हे लोकांना कळत नाही. हे फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहला कळते. रोजामुळे तक्वा (चांगले चारित्र्य) वाढतो. लहापणापासून मुस्लिम मुलांना रोजा ठेवण्याची सवय लावली जाते. त्यातून त्यांचे चारित्र्य घडते, ते असे की- लहान मुले जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा ते अल्लाहला घाबरून संधी असूनही पाणीही पीत नाहीत आणि जेवणही करीत नाहीत. समजा त्यांनी लपून घोटभर पाणी पीले तरी त्यांना कोणी पाहणारा नसतो. मात्र ते स्वमर्जीने अल्लाह पाहत आहे, म्हणून पाणी पीत नाहीत. यात त्यांच्या आत्म्याचे प्रशिक्षण होते. अल्लाहचे भय मनात निर्माण होण्यासाठी मदत होते. हीच मुले मोठी हाऊन देशाचे नागरिक बनतात आणि अल्लाहच्या भयाने वाम मार्गापासून दूर राहतात. लहानपणी जर का पूर्वजाद्वारे व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले नाहीत तर हीच मुले मोठी झाल्यावर वाईट गोष्टींच्या प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. रोजाचा मूळ उद्देशच चारित्र्य संवर्धन असल्यामुळे या महिनाभरात रोजदारांकडून कसून मेहनत घेतली जाते. भल्या पहाटे उठून मर्जी नसतानांनाही, भूक नसतांनाही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून काहीतरी खावं लागतं. त्यानंतर दिवसभर इच्छा असूनही, भूक असूनही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून अन्न आणि पाण्यासारख्या एरव्ही हलाल असलेल्या गोष्टींपासून दूर रहावे लागते. परत त्यात पाच वेळेसची नमाज आली. त्याशिवाय, 20 रकात अतिरिक्त तरावीहची नमाज आली. म्हणजे एकंदरित इबादतीचा भरगच्च कार्यक्रम असतो . मात्र यावेळेस सामुहिक नमाज वगळता बाकीचे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पाडता येवू शकतात. त्यातही शासकीय निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 30 दिवसाच्या सततच्या या खडतर जीवन व्यवस्थेमुळे माणसाला एवढी उर्जा मिळते की, पुढच्या रमजानपर्यंत ती टिकते. पुढच्या रमजानपर्यंत 11 महिन्याचा जो काळ असतो त्या काळात येणार्‍या वेगवेगळ्या प्रलोभनांना रोजातून मिळालेल्या उर्जेमुळे मुस्लिम व्यक्ति बळी पडण्याची शक्यता कमी असते. रोजाच्या संदर्भात नुसते उपाशी राहून उपयोग नाही. यासंबंधी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे, रोजा फक्त उपाशी राहण्याचे नाव नाही. तर डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायाचा रोजा, कानाचा रोजा सर्वार्थाने रोजा म्हणजे रोजा ठेवणार्‍याने डोळ्यांनी वाईट पाहू नये, हाताने वाईट करू नये, त्याची पावले वाम मार्गाकडे उठू नये, कानांनी वाईट ऐकू नये, कोणाशी भांडू नये, कोणी भांडायला आला तर त्याला नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. एकंदरित ही एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणार्‍या व्यक्तिस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते की, समाजासाठी ती व्यक्ति उपयोगी होवून जाते. आज समाजामध्ये राहणारे अनेक लोक समाजहिताच्या विरूद्ध वागताना दिसून येतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी उपकारक ठरण्याऐवजी अपकारक ठरत असते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तिंची निर्मिती करावी, ज्यायोग्य एक आदर्श समाजाची रचना होईल, हाच उद्देश आहे. शऊरी (समजून उमजून) पद्धतीने रोजा ठेवणे यासाठी प्रचंड माणसिक तयारीची गरज लागते. तर मित्रांनों! या दोन दिवसात आपली मानसिक तयारी करून घ्या आणि रमजानच्या स्वागतासाठी तयार व्हा.

- बशीर शेख

गेल्या दीड महिन्यांपासून मक्का येथील हरम शरीफ मधील ’काबागृहा’ला दोन ठिकाणी कृत्रिम अडथळे उभारून ’कार्डन-ऑफ्फ’ केले आहे. त्यामुळे जगभरातील श्रद्धावान मुस्लिम चिंताग्रस्त झालेले आहेत. लाखो रूपये खर्चून मक्का येथे जावे व तेथे काबागृहाला स्पर्श करण्याचे पुण्यही मिळू नये यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? दीड महिन्यापूर्वी ’कोरोना’ विषाणुचा संघर्ष होऊ नये म्हणून सऊदी अरब सरकारने आखाती देश वगळता सर्वांना उमराहसाठी विजा बंद केला. त्यानंतर काबागृहाची सतत होणारी तवाफ (प्रदक्षिणा) ही थांबविली, ती अलिकडे तो दोन अडथळ्यांबाहेरून सुरू असल्याचे दिसते. सकृतदर्शनी कोरोनाचे कारण चपलख बसले असले तरी काबागृहाचा तवाफ रोखण्याचे मूळ कारण कोरोना नसून ’सत्ता’ आहे. सऊद घराण्यात एक अयशस्वी बंड झालेले असून त्याची तीव्रता फार मोठी आहे. हा सर्व घटनाक्रम समजून घेण्याचा अधिकार प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला आहे कारण काबागृहावर जेवढा अधिकार अरबांचा आहे तेवढाच अजमींचाही आहे. म्हणून हा घटनाक्रम उलगडून दाखविणे हाच ह्या लेखामागचा हेतू आहे. या बंडाला समजून घेण्यासाठी सप्तसुदैरींची कहाणी समजून घेणे गरजेचे आहे.
सात सुदैरी
    आधुनिक सऊदी अरबचे संस्थापक राजे अ.अजीज-बिन-अल-सऊद यांनी 22 कबिल्यांच्या 22 स्त्रियांशी विवाह करून सऊदी अरबची स्थापना केली. लग्नाशिवाय हे सर्व कबिले एकत्र येणार नसल्याने त्यांना हे सारे विवाह करावे लागले. त्या सर्व राण्यांना मिळून 37 मुले झाली. या सर्वांचा विस्तार होत-होत आजमितीला दोन-अडीच-हजार राजपुत्र-पुत्री ह्या घराण्यात आहेत. त्यांना सरकारी खजिण्यातून मोठ्या प्रमाणात तन्खा मिळतो. म्हणून हे सर्व युरोप आणि अमेरिकेमध्ये ऐश-आरामी जीवन जगत असतात. मात्र सत्तेमध्ये यांचा समावेश नाही. सत्तेमध्ये सात-सुदैरी बंधू व त्यांच्या मुलांचीच चलती असते. सात भावंडांपैकी एकाच्या मृत्यूनंतर त्यानंतरचा भाऊ राजा बनतो. राजाच्या पुत्राला राजा करण्याची प्रथा सऊदी अरबमध्ये नाही. राजाच्या मृत्यूनंतर ’बैत काऊन्सिल’ नावाची या सात भावंडांची व त्यांच्या मुलांची एक शिर्ष संघटना आहे ती मृत्यू झालेल्या राजाच्या धाकट्या भावाची राजा म्हणून निवड करत असते. तत्पूर्वी तो ’किंग इन वेटिंग’ माणला जातो व त्याला ’क्राऊन प्रिंस’ म्हणून संंबोधिले जाते. त्याच्याकडे गृह खाते असते. बाकी महत्त्वपूर्ण खाती बाकी बंधू व त्यांच्या मुलांना दिली जातात. या सुदैरी बंधु व त्यांच्या मुलां व्यतिरिक्त कुणीही मंत्री किंवा लष्करप्रमुख होऊ शकत नाही. सुदैरी बंधूंचे हे महत्वपूर्णच्या साठी आहे की, ’किंग-अब्दुल-अ़जी़ज-इब्ने सऊद यांनी 1913 मध्ये त्या काळातील सर्वात सक्षम असलेल्या सुदैरी कबिल्यातील हुस्सा बिन्ते अहमद अल सुदैरी यांच्या मुलीशी लग्न केले त्या लग्नातून त्यांना  साद नावाच्या राजपुत्राचा जन्म झाला. (1914 -1919) परंतु तो अल्पजीवी ठरला. त्यानंतर हुस्सा आणि (उर्वरित लेख पान 2 वर)
अ.अजीज यांच्यात मतभेद झाले व त्याची परिणीती घटस्फोटात झाली. त्यानंतर हुस्सा यांनी मुहम्मद बिन अ.रहेमान यांच्याशी विवाह केला. हुस्सा यांना मुहम्मद बिन अ.रहेमान यांच्यापासून अब्दुल्लाह नावाचा पुत्र झाला. परंतु काही खाजगी कारणाने हा विवाह ही टिकला नाही. तेव्हा राजे अब्दुल अजी़ज यांनी हुस्सा यांच्यासमोर पुन्हा विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी व त्यांच्या कबिल्याने अशी अट टाकली की हुस्सा यांच्या पोटी जन्माला येणार्‍या पुत्रांनाच भविष्यात राजा करण्यात येईल. अन्य 21 राण्यांच्या मुलांना नाही. सुदैरी कबिल्याच्या दबदब्यामुळे व आधुनिक सऊदी अरबच्या निर्मितीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या महत्वामुळे राजे अ.अजी़ज यांनी ही अट मान्य केली व हुस्सा यांच्याशी पुन्हा लग्न केले. या लग्नातून हुस्सा यांच्या पोटी सात राजपुत्र जन्माला आले व तेच एकानंतर एक राजे झाले. अशी ही चमत्कृत करणारी, जुन्या चित्रपटात शोभेल अशी कथा आहे. या सात भावांच्या गटाला असाबियाह (पवित्र गट) म्हंटले जाते.
    23 जानेवारी 2015 रोजी अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज अल सऊद यांच्या निधनानंतर मुहम्मद सलमान बिन अब्दुल अजीज हे वारसा हक्काने राजे बनले व त्यांनी आपला पुत्र मुहम्मद बिन सलमान (एमबीएस) याला संरक्षण व न्यायमंत्री बनविले व 28 एप्रिल 2015 रोजी राजे सलमान यांचे वारस म्हणून त्यांचा पुतण्या मुहम्मद बिन नायफ यांना क्राऊन प्रिन्स घोषित करण्यात आले. कारण सलमान  यांच्यानंतर त्यांचे भाऊ मुहम्मद बिन नायफ यांची पाळी होती पण त्यांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या पुत्राला त्यांच्या जागी क्राऊन प्रिन्स म्हणून बैत काऊन्सील ने मंजूरी दिली. मात्र अंतर्गत राजकारण खेळून प्रिंस मुहम्मद बिन नायफ यांची क्राऊन प्रिन्स पदावरून उचलबांगडी करून राजे सलमान यांनी आपले पुत्र मुहम्मद बिन सलमान यांना 21 जून 2017 रोजी क्राऊन प्रिन्स घोषित केले. त्या क्षणापासून सेव्हन सुदैरी असाबियाह गटामध्ये असंतोषाची ठिणगी पडली.
    किंग सलमानचे सख्खे बंधू व सात सुदैरियन पैकी एक अहमद बिन अब्दुल अजीज हे राजे सलमान व प्रिन्स नायफ यांनी एमबीएसला क्राऊन प्रिन्स बनविण्यास विरोध केला व त्यांच्या राजा बनण्याच्या क्रमवारीवर आक्षेप घेतला. राजे सलमान हे 84 वर्षांचे असून त्यांना विस्मृतीचा आजार आहे म्हणून प्रत्यक्षात क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान हेच सऊदी अरबचा राजकारभार पाहतात. त्यातून त्यांना सत्तेची चटक लागली. येत्या नोव्हेंबर मध्ये जी-20 देशांच्या राष्ट्र प्रमुखांची परिषद सऊदी अरबमध्ये होणार आहे. त्या आधी कांहीही करून राजेपद मिळवायचेच या लालसेने मुहम्मद बिन सलमान यांना झपाटले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे दोन विश्‍वासू मित्र ट्रम्प आणि त्यांचे जावाई जेरॉर्ड कुश्‍नर यांची मदद घेतली आहे. 130 अब्ज डॉलरची रक्षा उपकरणे खरेदी करून मुहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या मरगळलेल्या हत्यार उद्योगांना उर्जित अवस्था प्राप्त करून दिल्याने ट्रम्प आणि त्यांचे जावाई दोघांनी मिळून अमरिका धार्जिण्या मुहम्मद बिन सलमान यांना राजेपद मिळवून देण्याचा जणू चंगच बांधला आहे.
एमबीएसला बैत काऊन्सीलचा विरोध
    एक तर पाळी डावलून क्राऊन प्रिन्स पद मिळविल्याने बैत काऊन्सीलच्या अधिकारांवर मुहम्मद बिन सलमान यांनी अतिक्रमण केल्याचा राग बैत काऊन्सिलच्या सदस्यांमध्ये आहे. दूसरे आणि त्यापेक्षा मोठे कारण म्हणजे एमबीएस यांनी सऊदी अरबचे वेगाने सुरू केलेले पाश्‍चिमात्यीयकरण होय. सीनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, म्युजीक कंसर्ट, सीगारेट, महिलांना महेरमच्या व्यवस्थेतून मुक्ती, व्याज आधारित नीऑन सीटीची निर्मिती, अविवाहीत विदेशी जोडप्यांना सऊदी अरबच्या हॉटेल्समध्ये प्रवेश, इस्राईलशी अनावश्क जवळीक, जेफ बोझेसची हेरगीरी, सेंच्युरी डीलचे समर्थन, पत्रकार जमाल खशोगीची घडवून आणलेली हत्या, तीन वर्षांपासून यमनवर लादलेले युद्ध व त्यातून नाहक मरण पावलेले दोन लाख मुसलमान या सर्व कारणांमुळे  सऊदी अरबची तरूण पिढी जरी एमबीएसच्या बाजूने असली तरी बैत काऊन्सीलचे बहुतेक सदस्य आणि पुराणमतवादी सऊदी जनतेमध्ये मुहम्मद बिन सलमान अलोकप्रिय झालेले आहेत. त्यामुळे त्यांना पदच्युत करण्यासाठी बैत काऊन्सीलचे सदस्य असलेले व नसलेले 20 पेक्षा अधिक राजपुत्र तसेच अहेमद बिन अब्दुल अजीज, प्रिंस मुहम्मद बिन नायफ या सर्वांनी मिळून मुहम्मद बिन सलमान यांना पदच्युत करून प्रिंस अहेमद बिन अब्दुल अझीझ यांना राजा घोषित करण्याचा डाव रचला. याची कुनकुन मुहम्मद बिन सलमान यांना लागताच 6 मार्च 2020 रोजी मुहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेच्या ब्लॅक वॉटर या सुरक्षा एजन्सीच्या मदतीने होणार्‍या संभाव्य बंडाचा बिमोड केला. मुहम्मद अहेमद बिन अब्दुल अजीज, प्रिंस मुहम्मद बिन नायफ व इतर 20 राजपुत्र आणि 200 सैन्य आणि प्रशासनातील अधिकार्‍यांना अटक करण्यात आली. हे बंडखोर काबागृहाच्या गीलाफवर हात ठेऊन बंडात एकमेकांची साथ देण्याच्या शपथा घेणार असल्याचा सुगावा लागल्याने आयत्या चालून आलेल्या ’कोरोना’ची संधी साधून बंडखोरांना काबागृहाजवळ जाता येऊ नये यासाठी दुहेरी अडथळे तयार करून काबागृहाशी संलग्न मताफमध्ये कुणालाही प्रवेश मिळणार नाही याची पक्की व्यवस्था एमबीएसने केली.
    आजमीतिला रियादमधील शाही महाल, मक्का-मदीना आणि इतर महत्त्वाच्या प्रांतातील गव्हर्नर हाऊसच्या सुरक्षेची जबाबदारी सऊदी अरबच्या सैनिकांच्या कडून काढून घेऊन ब्लॅक वॉटरकडे देण्यात आल्याचे वृत्त अलजझीरा वाहीनी आणि वॉल स्ट्रीट जर्नलने अधिकृरित्या दिलेले आहे. 
    या कार्यवाहीत मुहम्मद बिन सलमान जखमी झाले व प्रिन्स नायफ मारले गेले अशा ही बातम्या बहरीनच्या वाहिन्यांनी दिल्या पण नंतर लगेच त्याचा इन्कार करण्यात आला. मुहम्मद बिन सलमान 6 मार्च पासून भूमिगत असल्याचा व कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित नसल्याच्या बातम्या ही आलेल्या आहेत. 20 राजपुत्र आणि 200 अधिकारी यांचे काय झाले हे जगाला माहित नाही. मुहम्मद बिन सलमान कसे आहेत? हे ही माहित नाही मात्र एवढे नक्की की सत्तेची सुत्रे त्यांच्याच हाती आहेत. कोरोनामुळे त्यांनी स्वतःला जद्दापासून जवळ असलेल्या एका बेटावरील राजप्रसादामध्ये सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. आज न उद्या ते प्रकट होतील व बाकी गोष्टींचा उलगडा होईल. तूर्त इतकेच !

- एम.आय.शेख

blame
अक्षरनामा या संकेतस्थळावर कादियानी धर्मातील अहेमदिया पंथाचे बशारत अहमद यांच्या एका पुस्तकातील संपादित परिच्छेद ‘मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात’ जमातवाद’ फैलावला आहे. फक्त भारतीय उपखंडातच नव्हे, तर जगभर फैलावला आहे.’ या लांबलचक शिर्षकाने नुकताच वाचण्यात आला. त्यात त्यांनी स्वत: फार उदारवादी असल्याचा देखावा करत काही खर्‍याखुर्‍या उदारवादी धार्मिक चळवळींवर खोटे आरोप केले आहेत, त्याचेच हे खंडण -
सध्या कोरोना आणि तबलीगी जमाअतला घेऊन काही लोकांनी बराच अपप्रचार चालवलेला असतांना त्यात अनेक जन मागचा पुढचा सगळा सूड उगविण्यासाठी वाहत्या गंंगेत हात धुऊन घेत आहेत. तबलीगींसोबतच इतर उदारवादी मुस्लिम संघटनांनाही विनाकारण यात ओढले जात आहे. त्यासाठी ते ’जमात’ या शब्दाचा हेतुपुरस्पर गैरवापर करत आहेत. खरं म्हणजे ’जमात’ व ’जमाअत’ यात फरक आहे. (तबलीगी जमाअत किंवा जमाअत ए इस्लामी हिंद या ’जमाअत’ आहेत, जमात नव्हे.) ’जमात’ म्हणजे ’टोळी’ आणि ’जमाअत’ म्हणजे विशिष्ट सहेतूक चळवळ चालविणारी संघटना. परंतु काही पुरोगामी मंडळींना विश्‍वासात घेऊन त्यांचा बुद्धीभेद करण्याकरिता पुरोगाम्यांनीच प्रस्थापितांविरूद्ध तयार केलेला ’जमातवाद’ हा शब्द लेखकांनी या लेखात फार चालाखीने वापरलेला आहे. मात्र लेखक खुद्द ’जमात-ए-अहेमदिया’ चे प्रचारक असून त्यांनीच लेखाच्या शेवटी या टोळीचा उल्लेख केला आहे. खरं म्हणजे ते स्वत:च ’जमातवाद’ फैलावत असल्याचं स्पष्ट होतंय. अन् या तथाकथित जमातवादाच्या फैलावासाठी ते ब्रिटिशांना कारणीभूत ठरवितात. सुरूवातीला लेखक लिहितात की, ”जमातवादाचा उदय भारतात किंबहुना सर्व दक्षिण आशियायी देशांत पाश्‍चात्य देशांनी लादलेल्या वसाहतवादातून आणि धर्म व भाषेवर आधारित राष्ट्रवादाच्या कल्पित सिद्धांतांतून झालेला आहे. पण ज्या ब्रिटिश पाश्‍चात्यांना लेखक जमातवाद फैलावण्यासाठी जबाबदार धरत आहेत, त्याच ब्रिटिशधार्जिण्या व्यक्ती व विचारधारेला पुढे नेणार्‍या टोळीचे स्वत: या लेखाचे लेखकच प्रचारक आहेत. हा सगळा प्रकार समजून घेण्यासाठी लेखकांची ’कादियानी/अहेमदी’ विचारधारा नेमकी काय आहे, ते समजल्याशिवाय लेखाची पार्श्‍वभूमी लक्षात येणार नाही. कादियानी किंवा अहेमदींचा हा संक्षिप्त परिचय -
    भांडवलवादाला साम्राज्यवादाशी जोडून जगभरात एक धोरण म्हणून स्वीकारणार्‍या इंग्रजांनी आपलं इप्सित साध्य करण्यासाठी सुधारणावादी, पुरोगामी, आधुनिकतावादी आणि उदारवादाचा मुखवटा चढविलेला होता. ब्रिटिश राज्यकर्ते हे इथल्या मागासलेल्या समाजाला शिक्षणाचा अधिकार देऊन आपल्या देशातील जातीव्यवस्थेला खिंडार पाडतील असा आशावाद काही बहुजन समाजसुधारकांना सुरूवातीला वाटू लागला होता. परंतु फक्त आपले नौकर किंवा कारकून तयार करणार्‍या मेकालेच्या शिक्षण व्यवस्थेकडून फारसं काही साध्य झालं नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत इंग्रजांनी जाती व्यवस्था समूळ नष्ट न केल्याची खंत शेवटी व्यक्त केलीच होती. रेल्वे, टेलीफोन वगैरे वरकरणी वाटणार्‍या विकासप्रवण योजना या फक्त ‘कंपनी’साठी एक ’इन्फ्रास्ट्रक्चर’च्या पलिकडे काहीही नव्हत्या, हेही कटू सत्त्यच!
    ब्रिटिशांनी इतकी वर्षे राज्य केले ते आपल्यातूनच तयार केलेल्या काही हस्तकांमार्फत. त्याशिवाय त्यांना ते करता येणे शक्य नव्हते. भारत देश सोडल्यानंतरही इथे मानसिकदृष्ट्या आपलेच व्हाइसरॉय जागोजागी बसवून ते गेले आहेत, जेणेकरून भविष्यातही इथे भांडवलधार्जिणेच धोरण राबविले जावेत म्हणून. हे हस्तक आजही समाजात वावरत आहेत, जे देशासाठी फार मोठा धोका आहे. म्हणून त्यांची ओळख पटवणे फार महत्त्वाचे आहे.
    हे हस्तक फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर जवळपास सर्वच क्षेत्रात लपलेले आहेत. विस्तारभयास्तव या लेखात फक्त धार्मिक क्षेत्रात आणि त्यातल्या त्यात फक्त मुस्लिम समाजात लपलेल्या अशा मुस्लिमेतर ब्रिटीश-समर्थकांचा उपापोह करण्यात आला आहे. मुस्लिम नाव धारण करून, मुस्लिमांसारखीच टोपी, दाढीचा वापर करून हे ब्रिटीशांचे पपेट आज फारच तुरळक प्रमाणात असले तरीही प्रशासन व इतर व्यवस्थेच्या तळाशी यांचा वावर हा दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. थोडंसं दुर्लक्षही देशासाठी घातक ठरू शकते.
    या ब्रिटीश समर्थकांचं नाव आहे - अहेमदीया किंवा कादियानी ! देशाचे शत्रू असलेल्या इंग्रजांचा समर्थक विचारसरणीचा संस्थापक मिर्जा गुलाम अहमद कादियानी होता. त्याचा जन्म इ.स. 1839 किंवा 1840 मध्ये पंजाबच्या कादियान गावात झाला. याने सन 1901 मध्ये स्वत: इस्लामचा प्रेषित असून त्याच्याकडे अल्लाहकडून श्‍लोक अवतरीत होत असल्याचा दावा केला होता (संदर्भ: मिर्जा गुलाम अहमद कादियानीचे पत्र, हकीकतुल सुबूत, पान नं.270 ते 271, उद्धृत: कादियानीयतची वास्तविकता, लेखक: मुहम्मद अब्दुल रऊफ) आणि ’कादियानी’ म्हणून नवीन धर्माची स्थापना केली होती. मोगालांचा वंशज असलेल्या या मिर्झाचे निधन इ.स. 1908 मध्ये झाले आणि त्याला लाहोरमध्ये दफन करण्यात आले होते. त्याच्यानंतर त्याचे खलिफा (उत्तराधिकारी) म्हणून या धर्माची धुरा हातात घेतली ती आजतायगत पाकिस्तानात सुरू आहे. भारतात राहून इथल्या अहेमदी कादियानींची निष्ठा या तथाकथित खलिफा असलेल्या एका पाकिस्तानीशी असणे, ही देखील देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
     या धर्माचे लोकं आपण मुस्लिम असल्याचं सांगत असले तरीही कुरआन व हदिसनुसार हे मुस्लिम नाहीत. कारण एका खोट्या तोतया पैगंबराला मानणारे मुस्लिम असूच शकत नाही. आता मिर्जा हा तोतया पैगंबर कसा? तर याचे उत्तर तीन टप्प्यात देता येते -
1) मिर्जा गुलाम कादियानी हा ब्रिटिश सरकारचा समर्थक होता. 2) ब्रिटिश सरकार हे अत्याचारी होते. 3) अत्याचारिंचा समर्थक हा एक प्रेषित असूच शकत नाही.
आता उपरोक्त तीनही विधानांसाठी एकानंतर एक आपण संदर्भ तपासून पाहू -
1) मिर्जा गुलाम कादियानी हा खरंच ब्रिटिश सरकारचा समर्थक होता की नाही?
तर याचे उत्तर ’होय’ असे आहे. याचा पुरावा म्हणून 1857 च्या उठावात जे मुस्लिम स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिशांविरूद्ध जिहाद करत होते, त्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल म्हणजेच त्या जिहादबद्दल मिर्जा काय लिहितो बघा -I have been writing in favor of the British Government from the past seventeen years. During all these seventeen years, in all the books which I wrote and publishes, I have been advocating to the people to be loyal to the British Government and have tried to persuade them to be sympathetic and obedient to government officers. I have given convincing lectures against Jihad and, as a matter of policy, I wrote many books in Arabic and Persian and published them in Arabia, Egypt, Syria, Iraq, and Afghanistan abrogating Jihad and spent thousands of rupees in this propaganda.’ (Al-Barriah, Sept. 2, 1867, No. 3)भाषांतर -
    ”मी मागील सतरा वर्षांपासून ब्रिटिश सरकारच्या समर्थनार्थ लिहित आलो आहे. मी जीतकी काही पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली, त्यात मी लोकांना ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले आहे आणि सरकारी अधिकार्‍यांच्या बाबतीत सहानुभुतीपूर्ण व आज्ञाधारक म्हणून राहण्याचा आग्रह धरला. मी (जो इंग्रजांविरूद्ध सुरू होता त्या) जिहाद विरूद्ध अनेक भाषणे केली आणि एक धोरण म्हणून, जिहाद संपविण्याकरिता मी अरबी, फारसीत अनेक पुस्तकं लिहिलीत आणि ती अरबस्थान, इजिप्त, सीरीया, इराक व अफगानीस्तान येथे प्रकाशित केली आणि या प्रचारकार्यात मी हजारो रूपये खर्च केले.”
- संदर्भ: अल-बरीराह, सप्टें.2, 1867, नं.3, उद्धृत संकेतस्थळ लिंक -http://www.irshad.org/exposed/ service.php2) ब्रिटिश अत्याचारी होते की नाही?
    याचे प्रतिउत्तर अहेमदीया लोकं असे देतात की, इंग्रजांनी जे काही अत्याचार केले ते मिर्जा मेल्यानंतर म्हणजे 1908 नंतर केले. परंतु ब्रिटिशांनी 1908 च्या पूर्वीही जगभरात अतिशय भयानक अत्याचार केल्याची नोंद इतिहासात नमूद केलेली आहे. उदाहरणार्थ 1899 ते 1902 दरम्यान आफ्रिकेतील बोअर्स कँपमध्ये महिला व चिमुकल्या मुलांसहीत 1 लाख 7 हजार लोकांना तुटपुंजे राशन पाणी देऊन इतक्या वाईट पद्धतीने अटक करून ठेवण्यात आले होते की, 27 हजार 927 लोकं मृत्युमुखी पडले होते. (संदर्भ:https://www.independent.co.uk/news/uk/home-news/worst-atrocities-british-empire-amritsar-boer-war-concentration-camp-mau-mau-a7612176.html?fbclid=IwAR1z_9axwIeAo-
4C_V43Ydv0FCuBH6onh-7_lI0d_cBMKj1E-PO5zArbVNU ))
अशा अनेक घटनांचा मिर्जाने कधी विरोध करून त्याविरूद्ध आंदोलन केल्याचा उल्लेख    इतिहासात कुठेही सापडत नाही. अशा देशद्रोह्याच्या अनुयायींची देशाबद्दल निष्ठा कशी राहील, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे एक फार मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे की, भारतीय मुस्लिम समाजच नव्हे तर जगभराचा विवेकी समाज या लोकांचा विरोध करतो. अशी व्यक्ती प्रेषितच काय तर तो मुसलमानही नसतो, नव्हे एक सच्चा माणुसदेखील असु शकत नाही.
3) मिर्ज़ा प्रेषित होता का?
    भारतात प्रत्येकाला धर्म स्थापण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा घटनादत्त अधिकार असला तरीही कलम 420 अंतर्गत कुणाची फसवणूक करण्याचा अधिकार नाहीये. कुणी ओबीसी नसून जर ओबीसी असण्याचा दावा करत असले किंवा अल्पसंख्यक नसून अल्पसंख्यांक असल्याचा दावा करून त्यांना मिळणार्‍या सवलती लाटण्याचा प्रयत करत असेल तर तो फार मोठा गुन्हा ठरतो. प्रेषित मुहम्मद सलअम् यांच्यानंतर कुणीही प्रेषित येणार नसल्याचं स्पष्ट कुरआनात म्हटलं आहे -
”(लोकहो!) मुहम्मद (सलअम् ) तुमच्या पुरूषांपैकी कोणाचे पिता नाहीत, परंतु ते अल्लाहचे रसूल (संदेष्टा) आणि अंतिम प्रेषित आहेत, आणि अल्लाह प्रत्येक वस्तूचे ज्ञान राखणारा आहे.”     - कुरआन (33:40)
    प्रेषित मुहम्मद सलअम् यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ’ला नबी य अबदी’ म्हणजे माझ्यानंतर कुणीही प्रेषित नाही. याचे अनेक संदर्भ हदिस (प्रेषित वचन) ग्रंथात मिळतात. म्हणून कादियानी किंवा अहेमदीया हा मुस्लिमांचा एक सांप्रदाय नसून तो स्वतंत्र असा धर्म आहे. पाकिस्तानात त्यांनी स्वत:ला अल्पसंख्यक म्हणजेच तेथील बहुसंख्यक मुस्लिमांपेक्षा वेगळा धर्म असल्याचे मान्य केलेले आहे. तिथे त्यांना अल्पसंख्यकांच्या सर्व सुविधा बहाल करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे त्यांनी स्वत:ची वास्तविकता उघड करून राहण्यात काहीही वावगं नाही. परंतु तोतयागीरी करणे हे फक्त मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर देशासाठीही घातक ठरू शकते. म्हणून आमचा विरोध फक्त तोतयागीरीला आहे. बाकी कुणी काय मानावं, काय मानू नये, कोणता धर्म स्थापन करावा, कोणता सांप्रदाय स्थापन करावा याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देतो, आम्ही त्या संवैधानिक स्वातंत्र्याचा आदर करतो. आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं की, इथल्या मुस्लिम समाजातील जवळपास सर्वच सांप्रदायात अनेक मतभेद असले तरीही मात्र कमालीचं सहिष्णुता आणि काही बाबतीत बर्‍याच प्रमाणात एकवाक्यता आढळते. सर्व मुस्लिम सांप्रदायांचं प्रतिनिधीत्व असलेली शिखर संघटना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे त्याचं जीवंत उदाहरण आहे, ज्याचे अध्यक्ष हे सुनी तर उपाध्यक्ष शिया आहेत. इतकी एकता असूनही अहेमदीया कादीयानी हे मुस्लिम नाहीत, यावर देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या मुस्लिमांची एकवाक्यता आहे. म्हणून सांप्रदायिक सहिष्णुतेच्या नावाखाली काही लोकं या ब्रिटीशसमर्थकांना जवळ करण्याचा जो केविलवाणा प्रयत करतात, तो किती फसवा आहे, ते स्पष्ट होते.
    प्रेषित मुहम्मद सल्लम यांची शिकवण ही फक्त धर्म किंवा मज़हब (पुजाविधी) नसून तो धम्म (परिपूर्ण जीवन संहिता, जीवन व्यवस्था) आहे. त्यात फक्त अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, नैतिक, सामरिक तसेच राजकीय क्षेत्राविषयीही पुरेपूर मार्गदर्शन केलेले आहे. फक्त मार्गदर्शनच नव्हे तर त्या शिकवणीद्वारे प्रबोधन कार्य करून इमान, समता, न्याय व बंधुत्त्वावर आधारित जगभरात एक आदर्श व्यवस्था शांतीच्या मार्गाने कायम करण्याचे आदेशही मानवी कल्याणाच्या दृष्टीने दिलेले आहे. सामाजिक परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन घडवून आणणे हाच उद्देश लक्षात घेऊन जगभरात अनेक क्रांतिकारी चळवळी उभ्या राहिल्या, त्यातीलच एक जमाअत ए इस्लामी हिंद ही चळवळ आहे. परंतु या उदात्त हेतूला या चळवळीचे संस्थापक संत अबुल आला मौदुदींची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा संबोधून लेखक अतिशय खोटारडा आरोप करतात. संत मौदुदी हे देशाच्या फाळणीविरूद्ध असल्याचं स्वत:च लेखक सांगतात अन् पुन्हा त्यांच्यावर पाकिस्तानात ’पळून गेले’ या भाषेत मखलाशी जोडतात. मुळात संत मौदूदी हे हैद्राबाद दक्खन येथे राहत होते आणि कवी इक्बाल यांच्या विशेष विनंतीवरून पठाणकोट येथे 1938 साली एका इस्लामी विद्यापीठाच्या डीन पदी विराजमान होण्यासाठी सहकुटूंब गेले होते. फाळणीच्या वातावरणात देशभरात दंगली उसळल्या असतांना पठाणकोट येथेही दंगलीचे लोन उसळले होते. विद्यापीठ परिसराला दंगेखोरांनी घेरले होेते. त्यावेळी त्या ठिकाणी राहत असलेले संत मौदुदी व त्यांचे सहकारी तेथून कसेबसे कुटुंबासहीत बाजुच्या सुरक्षित गावात निघून गेले होते. आणि ते गाव फाळणीनंतर पाकिस्तानच्या हद्दीत गेले. या परिस्थितीमुळे त्यांना तिथेच रहावं लागलं. परंतु त्यांचं मन हे नेहमीच अखंड भारतासाठीच नव्हे तर अखंड जगतासाठी तळमळत होते. त्यांच्या समस्त मानवी व्यवस्थेला, लेखक पॅन इस्लाम वगैरे पाश्‍चात्त्य शब्द वापरून जमाअतची तुलना फॅसिस्ट संघटनांशी करतात. वास्तविकपणे एकजातीय, एक वंशीय देशाची भाषा करणार्‍या कोणत्याही संघाची तुलना अखिल मानवी समाजाच्या ऐक्यासाठी झटणार्‍या जमाअतशी होऊच शकत नाही.
    यामागचे कारण इतिहासात दडलेले आहे. प्रेषितांच्या पूर्णत्वालाच आव्हान देणार्‍या आणि भांडवलदार ब्रिटीशधार्जिण्या असलेल्या कादियानी उपद्रवाचा खरा चेहरा चव्हाट्यावर आणण्याकरिता तसेच समाज व देशाला त्यांच्या गुप्त कारवायांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मूळचे आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबदमधील मराठी माणुस असलेले संत अबुल आला मौदुदींनी ’खत्म ए नबुवत (प्रेषित्त्वाची समाप्ती)’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचा प्रतिवाद आतापर्यंत हे लोकं करू शकलेले नसल्याने संत मौदुदींचं फक्त नाव काढलं तर हे लोकं चिडत असतात. त्याच पुस्तकामुळे या उपद्रवाला भारतीय उपमहाद्विपमध्ये तग धरता आलेला नाहीये. या लोकांच्या उपद्रवी कारवायांमुळे त्या काळात पाकिस्तानात दंगली उसळल्या आणि मोठा रक्तपात झाला होता. पण हे त्या पुस्तकामुळंच घडल्याचा आरोप करून दंगलींचं खापर विनाकारण संत मोदुदींवर फोडण्यात आले. यासाठी तत्ताकालीन कादियानीधार्जिण्या पाकिस्तानी सरकारनं संत मौदुदींना फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु या महान क्रांतिकारकाची जगभरातल्या विविकी देशांनी दखल घेऊन बेईमान पाकिस्तान सरकारवर दबाव आणला आणि फाशिची शिक्षा रद्दबातल ठरवली गेली. ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती, मात्र ती पूर्ण होण्याअगोदरच संत मौदुदींची निर्दोष सुटका करण्यात आली.
    संत मौदुदींचे विचार अन् त्यांनी नंतर घेतलेल्या काही निर्णयांचा विरोधाभास लेखकांनी दाखविण्याचा प्रयत्न सदर लेखात केला आहे. परंतु तो विरोधाभास नसून परिस्थितीनुरूप घेतलेले योग्य निर्णय होते. ते निर्णय समजून घेण्यासाठी लोकशाही (डेमोक्रसी) आणि नेतानिवड (इलेक्ट्रोसी) यातला फरक समजून घेण्याची गरज आहे. स्वैर मानवी इच्छा आकांक्षाना सार्वभौमत्त्व बहाल करून फक्त बहुमताच्या नावाखाली निसर्गकर्तानिर्मित नीतीमुल्यांवर प्राथमिकता देणार्‍या लोकाशाहीला संत मौदुदींनी विरोधच केला आहे, परंतु स्वत:च्या मनाने आपला नेता निवडण्याची पद्धत ही तर प्रेषित मुहम्मद सल्लम यांचे उत्तराधिकारी असलेल्या आदर्श खलिफांपासून चालत आलेली आहे. म्हणूनच अत्याचारी अयुब खानाला सत्ताच्यूत करण्यासाठी संत मौदुदींनी त्याच्याविरूद्ध असलेल्या सक्षम पक्षाला पाठिंबा दिला होता. आजही जमाअत फॅसिस्टांना पराभूत करणार्‍या दुसर्‍या सक्षम पक्षाला नेहमी पाठिंबा देत असते.
    अशा क्रांतिकारक संत मौदुदींनी समाज प्रबोधनासाठी जवळपास 200 पुस्तकं लिहिली असून त्यापैकी अनेक पुस्तकं मराठीतही उपलब्ध आहेत. त्यांनी स्थापन केलेली जमाअत ए इस्लामी फाळणीनंतर भारतात जमाअत-ए-इस्लामी हिंद म्हणून 1948 मध्ये पुनरस्थापित झाली. माणसाला माणुस जोडण्याकरिता इस्लामविषयीच्या गैरसमजुती दूर करून मुस्लिम व मुस्लिमेतरांचं ऐक्य घडवून आणणे, मुस्लिम समाजातील अनिष्ट चालीरिती दूर करण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्याच्या उद्देशाने लोकशिक्षणाची चळवळ राबवणे, समाज सेवा करणे आणि लोकांना व्यवस्था परिवर्तनासाठी संघटित करणे असा जमाअतचा चार कलमी कार्यक्रम आहे. त्यासाठी वैयक्तिक भेटीगाठी, छोटे छोटे साप्ताहिक कुरआन प्रवचन, कॉर्नर मिटींग्स, चर्चासत्रे, कधी कधी मोठमोठी अधिवेषणे, जाहिर सभा, साहित्याचं मोठ्या प्रमाणावर वितरण, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लेखण व निर्मिती (प्रॉडक्शन) तसेच महिलांमध्ये जनजागृती, विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी ईद मिलन, इफ्तार पार्टी व प्रेषित परिचय सम्मेलनं, मस्जिद परिचय संमेलने इत्यादी माध्यमातून जमाअत कार्य करत असते. महाराष्ट्रात इस्लाम व मुस्लिमांविषयी तीनशेपेक्षा जास्त विषयांवर आधारित जमाअतने आय.एम.पी.टी. प्रकाशनातर्फे मराठी भाषेत प्रकाशित केली आहेत.
    तबलीग़ी जमाअतशी काही मुद्यांवर स्वत: आमचेही मतभेद आहेत. परंतु त्यांच्या समाज प्रबोधनामुळे समाजात फूट पडली व देशाच्या मिश्र संस्कृतीला तडा गेल्याचा जो आरोप लेखक करतात, तो धादांत खोटा आणि वस्तुस्थितीला धरून नाही. हाच आरोप दस्तूरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावरही मक्केतले पुरोहितवादी लावत होते, कारण प्रेषित त्यांच्या पुरोहितगीरी, वर्णवाद आणि अंधश्रद्धेविरूद्ध लोकांचं प्रबोधन करायचे. ऐक्य हे चागंल्या गोष्टींसाठी चांगल्या लोकांत हवं, चोरी करण्यासाठी चोर व पोलीसांच ऐक्य हे समाजासाठी घातक असतं. तसंच चांगल्या गोष्टींचा प्रचार झाल्यावर वाईट लोकांशी वैर विकत घेणे हे ओघानं येतंच. तेंव्हा तुम्ही वाईट लोकांशी असलेलं सख्य मोडताय, असा त्याचा अर्थ होत नाही. वाईट लोकांना खरंच समाजात ऐक्य हवं असेल तर त्यांनीही अंधश्रद्धा वगैरे वाईट चाली, रीती सोडायला हव्या. परंतु प्रबोधन करत असतांनाही तबलीगी लोकांनी तुमचे कौटंबिक किंवा सामाजिक नातं तोडून टाका, अशी शिकवण कधीही दिलेली नाहीये. त्यामुळे मतभेद व पूर्ववैमनस्यातून सकारात्मक व विधायक कार्य करणार्‍या चळवळींवरही विनाकारण चिखलफेक कुणीही करायला नको. सर्व जाती, धर्म व सांप्रदायांनी प्रेम व सहिष्णुतेने एकत्रित राहावे, याही मताचे आम्ही आहोत. पण आधीच देशाची परिस्थिती अतिशय नाजुक असतांना, कोरोनासहीत अफवांचाही विषाणू पसरलेला असतांना बुद्धीभेद करणारे असे लेख लिहून दोन समाजात तेढ निर्माण करून समाजाचं वातावरण गढूळ करणार्‍या लेखकांवर सरकारनेच कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. यापुढेही अशाप्रकारचे लेखन वाचल्यानंतर वाचकांनी कृपया दुसरी बाजुही नीट तपासून पाहत जावी, ही विनंती.

- नौशाद उस्मान
9029429489

रुबी हॉल क्लिनिकमधील 25 कर्मचाऱ्यांना 'कोरोना'

Ruby Hall
पुणे
राज्यात कोरोनाचं थैमान वाढत चाललं आहे (Pune corona patients update). पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 800 पार गेला आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ख्याती असलेल्या रुबी हॉल क्लिनिकच्या 25 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 16 नर्स, 3 डॉक्टर आणि इतर 6 कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. रुबी हॉल क्लिनिक हे फक्त पुण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या रुग्णालयांपैकी एक रुग्णालय मानलं जातं. मात्र, याच रुग्णालयातील तब्बल 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे
या सर्व कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट काल (20 एप्रिल) रात्री उशिरापर्यंत समोर आले. या नव्या रुग्णांमुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 803 वर पोहोचला आहे. याअगोदरही पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील काही नर्सचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे इतर 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या 25 कर्मचाऱ्यांच्या सहवासात किती लोक आले आहेत, याची माहिती घेण्याचं काम प्रशासन करत आहे.
पुण्यात सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे रुबी हॉल क्लिनिकमधील इतर रुग्णांना खबरदारी म्हणून लवकर डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता डॉक्टर आणि नर्सेस यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकचे नवे 25 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून, नायडू आणि भारती रुग्णालयांमधील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आता काही खाजगी रुग्णालयांच्या शोधात आहे. सध्या ससूनमध्ये 100, नायडूत 120 आणि भारती रुग्णालयात 135 बेड्सची व्यवस्था आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे रुगणालयांमधील बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खासगी रुग्णालये मिळाले नाहीत तर प्रशासनाकडून वसतिगृहही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलंडला आहे. तर एकट्या पुण्यात कोरोनाचे 803 रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 20 एप्रिलपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील या 5 तालुक्यातील ही 27 गावे आता पूर्णपणे सील करण्यात आली आहेत.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget