(१६) जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीला नष्ट करण्याचा इरादा करतो तेव्हा तिच्या सुखवस्तू लोकांना हुकूम देतो आणि ते तिच्यात अवज्ञा करू लागतात. तेव्हा प्रकोपाचा निर्णय त्या वस्तीवर लागू होतो आणि आम्ही तिला उद्ध्वस्त करून टाकतो.९
(१७) पाहून घ्या, कित्येक अशा पिढ्या आहेत ज्या नूह (अ.) नंतर आमच्या आज्ञेने नष्ट झाल्या. तुझा पालनकर्ता आपल्या दासांच्या पापांची पुरेपूर खबर राखणारा आहे आणि सर्व काही पाहत आहे.
(१८) जो कोणी (या जगात) झटपट लाभाचा इच्छुक असेल त्याला जे द्यायचे ते आम्ही येथेच देऊन टाकतो. मग त्यांच्या नशिबी जहन्नम लिहितो. ज्यात तो होरपळेल तिरस्कृत आणि कृपेला वंचित होऊन,
९) ज्या वस्तुस्थितीसंबंधी सदरहू आयतीत बजावले गेले आहे ती अशी की सरतेशेवटी समाजाला सव&नाश करणारी गोष्ट म्हणजे त्या समाजातील सुखवस्तू आणि उच्चवगी&यांचे बिघडणे होय. जेव्हा एखाद्या राष्ट्रावर अरिष्ट यावयाचे असते तेव्हा त्याचे श्रीमंत आणि सत्ताधारी लोक अवज्ञाकारी होऊ लागतात. जुलूम व अत्याचार आणि दुराचार व खोडसाळपणा करू लागतात, व सरतेशेवटी हाच उपद्रव संपूण& राष्ट्र बुडवून टाकतो. म्हणून जो समाज स्वत:च आपला शत्रू बनला नसेल त्याने सत्तासूत्रे आणि संपत्तीच्या किल्ल्या तुच्छ वृत्तीच्या आणि अनैतिक लोकांच्या हातात जाऊ देता कामा नये.
Post a Comment