(१२) पाहा, आम्ही रात्र आणि दिवस अशा दोन निशाण्या बनविल्या आहेत. रात्रीची निशाणी आम्ही प्रकाशहीन बनविली आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान केले जेणेकरून तुम्ही आपल्या पालनकर्त्याची कृपा शोधावी आणि महिना व वर्षाचा हिशेब माहीत करून घ्यावा. अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गोष्टीचे स्पष्ट पृथ:करण केले आहे.
(१३) प्रत्येक माणसाचा शकून आम्ही त्याच्या स्वत:च्या गळ्यात लटकविलेला आहे.७ आणि कयामतच्या दिवशी आम्ही एक लेख त्याच्यासाठी काढू जो त्याला उघड पुस्तकाप्रमाणे आढळेल.
(१४) वाच,आपल्या कृत्यांची नोंद, आज स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस.
(१५) जो कोणी सरळमार्गाचा अवलंब करील त्याचे सरळमार्गावर चालणे त्याच्या स्वत:साठीच लाभदायक आहे. आणि जो पथभ्रष्ट होईल त्याच्या पथभ्रष्टतेचा दुष्परिणाम त्याच्यावरच होणार आहे. एखादा ओझे उचलणारा दुसर्याचे ओझे उचलणार नाही.८ आणि आम्ही शिक्षा देणार नाही जोपर्यंत की (लोकांना सत्य-असत्याचा फरक समजाविण्यासाठी) आम्ही एक पैगंबर पाठवीत नाही.
७) म्हणजे प्रत्येक माणसाचे सुदैव अथवा दुदै&व आणि त्याच्या शेवटाचे भले अथवा वाईटाची कारणे व सबबी खुद्द त्याच्या अस्तित्वातच आहेत.
८) अर्थ असा की प्रत्येक मनुष्य स्वत:साठी कायमस्वरूपी एक नैतिक जबाबदारी बाळगतो. तो आपल्या वैयक्तिक स्वरूपात सर्वोच्च अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. सदरहू व्यक्तिगत जबाबदारीत इतर कोणीही व्यक्ती त्याची सहभागी नाही.
Post a Comment