(६) त्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी दिली आणि तुम्हाला संपत्ती आणि संततीद्वारे मदत केली आणि तुमची संख्या पहिल्यापेक्षा वाढविली.
(७) पाहा! तुम्ही भलाई केली तर ती तुमच्या स्वत:साठीच भलाई होती आणि वाईट केले तर ते तुमच्या स्वत:साठी वाईट सिद्ध झाले. मग जेव्हा दुसर्या वचनाची वेळ आली तेव्हा आम्ही काही दुसर्या शत्रुंना तुमच्यावर लादले जेणेकरून त्यांनी तुमचे चेहरे विद्रुप करावेत आणि मस्जिद (बैतुलमक्दिस) मध्ये तसेच शिरावे जसे पहिले शत्रू शिरले होते आणि ज्या वस्तूवर त्यांचे हात पडतील तिला नष्ट करून टाकावे.५
(८) शक्य आहे की आता तुमचा पालनकर्ता तुमच्यावर दया दाखवील, परंतु जर तुम्ही पुन्हा आपल्या जुन्या चालीची पुनरावृत्ती केली तर आम्हीदेखील पुन्हा आपल्या शिक्षेची पुनरावृत्ती करू आणि देणगीला लपविणार्यांसाठी जहन्नमला तुरुंग बनवून ठेवले आहे.
५) याने अभिप्रेत, ते ‘रोमन’ लोक आहेत ज्यांनी बैतुलमक्दिस पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले, ‘बनीइस्राईल’ (यहुदी) ना झोडपून ‘फलस्तीन’च्या (पॅलेस्टाईन) बाहेर घालविले व त्यानंतर आज दोन हजार वर्षांपासून ते जगभरात परागंदा आणि विस्कळीतावस्थेत आहेत
Post a Comment