सुनीलकुमार सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला विशेष ग्रंथ पुरस्कार
कोल्हापूर
संत गाडगे महाराज अध्यासन व करवीर साहित्य परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा विशेष ग्रंथ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व लेखक, सा. करवीर काशीचे संपादक, सुनीलकुमार सरनाईक यांच्या ‘पाऊलखुणा’ पुस्तकाला समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य, उद्योजक एम. बी. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. ज्येष्ठ लेखक प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले. रोटरी क्लबचे एस. एन. पाटील. बालसाहित्यिक शाम कुरळे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी बा. ग. जोशी, आदींनी मनोगत व्यक्त केले.
किसनराव कुराडे, जयश्री दानवे, डॉ. सुनिल पाटील, सिनेदिग्दर्शक भास्कर जाधव, श्रीकांत हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. टि. आर. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. निलीमा दोशी यांनी आभार मानले. पुणे येथील स्वरूप प्रकाशनने सरनाईक यांचे ‘पाऊलखुणा’ हे पुस्तक प्रकाशित केलें असून त्यास प्रा. डॉ. प्रकाश पवार यांची प्रस्तावना लाभली आहे. सरनाईक यांच्या माणसं मनातली, रोखठोक, जोतिबा : एक लोकदैवत, कृपावंत, ग्राहक जागर, स्मरणगाथा या पुस्तकांना विविध साहित्यिक संस्थांनी गौरविले आहे. सरनाईक यांना भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने, तसेच बाळशास्त्री जांभेकर- दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मास्टर ऑफ जर्नालिझम परीक्षेत प्रथम क्रमांकावर उतीर्ण झाल्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ज्येष्ठ पत्रकार (कै.) बापुसाहेब दफ्तरदार पारितोषिकाचे ते मानकरी ठरले आहेत.