आसमानवाला देखील तुमच्यावर दया करील
इस्लाम धर्मात ज्या दयेचे करुणेचे शिक्षण दिले आहे ते केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर हे सकल मानवजातीसाठी आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जी व्यक्ती माणसावर दया करत नाही, अल्लाहदेखील त्याच्यावर दया करत नाही. हेही सांगितले आहे की तुम्ही या धरतीवरील सजीवांवर दया करा आसमानवाला देखील तुमच्यावर दया करील.
ज्या काळात प्रेषित मुहम्मद (स.) प्रवास करीत असत आणि त्यांच्याबरोबर इतर लोकही प्रवास करीत असत तो काळ आणि आताचा काळ पुरेपूर बदलून गेलेला आहे. प्रेषितांनी त्या काळात प्रवासाच्या वेळी माणसांनी (प्रवाशांनी) काय करावे, कसे करावे त्याच काळाच्या अनुषंगाने लोकांना मार्गदर्शन दिले होते. आताचा काळ बदलला आहे. अरबची धरती, कोरडी, वैराण वाळवंटी होती, पाणी नव्हते, उन्हाची तर सीमाच नव्हती. त्याशिवाय रस्त्यात लुटारू आणि हत्यारी लोक सुद्धा होते. अशा स्वरुपाच्या काळात प्रेषितांनी प्रवासाच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि दक्षतेविषयी मार्गदर्शन केलेले आहे. लोकांना जास्तकरुन पायीच प्रवास करावा लागत होता आणि रस्त्यात काही खाण्यापिण्याच्या वस्तू मिळण्याचा प्रश्नच नव्हता. अशा काळी प्रेषितांनी प्रवाशासांठी काही सूचना दिलेल्या आहेत.
(१) प्रवासावर जाणाऱ्या माणसाला निरोप द्यावा, त्याच्या भल्यासाठी प्रार्थना कराव्यात. (२) प्रवास पहाटे सुरू करावा. ज्यामुळे माणसाचा वेळ वाया जात नाही. ऊन आणि उष्णतेपासून सुरक्षित राहतो. एका ठराविकच वेळेनंतर (दुपारी) काही वेळ आराम करावा. (३) एकट्याने प्रवास करू नये, कमीतकमी तीन माणसांनी मिळून प्रवास करावा. यामुळे तिघांना सुरक्षा मिळते. (४) जर तीन माणसे एकत्र प्रवास करत असतील तर आपल्यातील एका माणसाला आपला नेता करावा. (५) प्रवासाहून परत आल्यावर लगेच घरात प्रवेश करू नये तर घरच्या लोकांना तयारीसाठी थोडा वेळ द्यावा. (६) जर कोणती प्रतिष्ठित व्यक्ती प्रवासानंतर परत येत असेल तर तिचे साजेसे स्वागत करावे. (७) रात्रीच्या वेळी प्रवास केल्यास बरेच अंतर कमी होते. ऊन आणि उष्णता नसल्याने माणूस जलद गतीने प्रवास करू शकतो. अरब लोक एक तर पहाटे सकाळी प्रवासास जात असत किंवा रात्रीच्या वेळी. (८) आपण प्रवासासाठी ज्या पशुंवर स्वार होतो त्यांची चांगली देखभाल केली जावी. (९) रात्री प्रवास करताना सडकेच्या बाजूने चालावे, कारण रात्री जंगली जनावरे निघत असतात. (१०) प्रवासाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर परत येण्याची घाई करावी, कारण प्रवासात आपल्याला इजा पोहचत असतात आणि समाधान नसते.
इस्लाम धर्मात ज्या दयेचे करुणेचे शिक्षण दिले आहे ते केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर हे सकल मानवजातीसाठी आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जी व्यक्ती माणसावर दया करत नाही, अल्लाहदेखील त्याच्यावर दया करत नाही. हेही सांगितले आहे की तुम्ही या धरतीवरील सजीवांवर दया करा आसमानवाला देखील तुमच्यावर दया करील.
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment