इस्लामच्या आरंभ काळामध्ये मुस्लिम विदुशींचा व्यापक प्रभाव होता. त्यांच्या ज्ञानाचा लाभ महिलाच नव्हे तर पुरूषसुद्धा घेत होते. महिलांना शिक्षण घेण्यासाठी सहाबा रजि. आणि त्यानंतरच्या ताबईननी सुद्धा प्रतिबंध लावलेला नव्हता. महिलांना गर्व करण्यासाठी एवढीच गोष्ट पुरेशी आहे की, त्यांच्या वर्गामध्ये मोठमोठे इस्लामी विद्वान, न्यायशास्त्री आणि हदीस तज्ज्ञ उपस्थित राहून लाभ घेत होते. 1. अबुउमरू मुस्लिम बिन इब्राहीम अलजारी, अलफराही (222 हि.) यांच्या शिक्षिकांमध्ये 70 महिला शिक्षिका होत्या.
2.अबु अल वलीद बिन अब्दुल मलीक अल तयालसी (हि.227) यांच्या शिक्षकांपैकी 70 महिला शिक्षिका होत्या. 3. अब्दुल्लाह मुहम्मद बिन महेमूद बिन अल नजार (हि.346) यांनी ज्यांच्याकडून शिक्षण घेतले ते 3 हजार पुरूष शिक्षक होते तर 400 महिला शिक्षिका होत्या.
4. अल्लामा इब्ने हजम यांच्या शिक्षक आणि प्रशिक्षणामध्ये अनेक महिला शिक्षिका सामील होत्या. ज्यांनी त्यांना कुरआनचे शिक्षण दिले. लिहिणे वाचणे शिकविले, काव्य करण्याची कला शिकविली. ही गोष्ट इब्ने हजम यांनी स्विकारलेली आहे. 5. खतीब बगदादी (हि.463) यांनी ताहेरा बिन्ते अहेमद बिन युसूफ अल तनुखियात या प्रसिद्ध हदीस तज्ञ महिलेकडून शिक्षण घेतले होते.
क्रमशः
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment