अलिकडे मस्जिदीमध्ये महिलांना प्रवेश द्यावा की नाही यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसते. इस्लामच्या सुरूवातीच्या काळात महिलांना मस्जिदीमध्ये प्रवेश करण्याची मुभा होती. त्या मस्जिदीमध्ये कुरआन प्रवचन सुद्धा देत होत्या. स्पष्ट आहे नमाज अदा करण्यावर प्रतिबंध नव्हता. इस्लामच्या तीन महत्त्वाच्या मस्जिदी मक्काची मस्जिदे हराम, मदीना येथील मस्जिदे नबवी आणि मस्जिदे अक्सा सर्वात पवित्र मानल्या जातात. त्यामध्ये महिलांचे स्वतंत्र अध्यात्मिक कार्यक्रम व्हायचे. त्यात प्रामुख्याने उम्मे मुहम्मद सारा बिन्ते अब्दुर्रहमान अल म्नदसीया आणि उम्मूल खैर और उम्मे मुहम्मद फातेमा बालबतीही ह्या प्रमुख होत. जैनब बिन्ते नजमुद्दीन अल म्नदीया या प्रमुख काजी अल कजात शेख तकीयोद्दीन सुलेमान यांच्या पत्नी होत्या. उम्मे मुहम्मद जैनब बिन्ते अहेमद अल म्नदसीया मस्जिदे अक्सामध्ये प्रवचन देत होत्या. उम्मूल दर्दा अल तबियाह ज्या प्रसिद्ध हजरत अबु दर्दा रजि. यांच्या पत्नी होत्या. इस्लामी इतिहासामध्ये दमासकसच्या मस्जिदे उमवीला अत्यंत महत्व प्राप्त असून, यातही अनेक महिलांनी कुरआन प्रवचन केले होते.
इब्ने बतूताने आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेले आहे की, दमासकसच्या मस्जिदीमध्ये अनेक महिला उदा. जैनब बिन्ते अहेमद आणि आएशा बिन्ते मुहम्मद या हदीसची शिकवण देत होत्या. दुर्दैवाने नंतरच्या काळात या मस्जिदीमधून महिलांच्या प्रवचनांचा सिलसिला बंद झाला. अशा महिलांना पुन्हा प्रवचनाची संधी मिळेल आणि पुरूषही त्यांचे प्रवचन ऐकू शकतील अशी शक्यता कमीच आहे. उलट महिलेचा आवाज पुरूषांसाठी ऐकणे निषिद्ध ठरविण्यात आलेले आहे. क्रमशः
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment