एका व्यक्तीने मला लिखित प्रश्न विचारला की, ‘‘ मी एक डॉक्टर असून, माझे पूर्ण खानदान इस्लामी मुल्यांच्या शीतल छायेखाली आहे. मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवू इच्छितो. परंतु, माझ्या सासुरवाडीचे लोक या गोष्टीला विरोध करीत आहेत. शरीयत प्रमाणे मुलींना वैद्यकीय शिक्षण घेणे चूक आहे काय?’’ यावरून मी त्यांना खालीलप्रमाणे उत्तर दिले. आपल्या सासुरवाडीच्या लोकांचा वैद्यकीय शिक्षणाला विरोध कदाचित या गोष्टीला असावा की, डॉक्टर झाल्यानंतर मुलीला महिलांबरोबर पुरूषांचाही इलाज करावा लागेल. जर हे कारण असेल तर त्यांचा विरोध योग्य नाही. शरियतमध्ये महिला डॉक्टर पुरूष रूग्णांवर उपचार करू शकते.
इमाम बुखारी यांनी आपल्या पुस्तकात अशा अनेक प्रेषित वचनांना संग्रहित केलेले आहे की, ज्यातून स्पष्ट होते की, महिलांच्या मार्फतीने पुरूषांवर वैद्यकीय उपचार केले गेले आहेत. अशा प्रेषित वचनांचा एक भागच इमाम बुखारी यांनी आपल्या पुस्तकात सामील केलेला आहे.
1. इस्लामी न्याय शास्त्रामध्ये इथपर्यंत लिहिलेले आहे की, वैद्यकीय उपचारा दरम्यान पुरूष डॉक्टर महिला रूग्णांच्या शरिराच्या त्या भागाचीही तपासणी करू शकतात जे शरीयतमध्ये सहसा परदा ठेवण्याचा आदेश दिला गेलेला आहे. तसेच महिला वैद्यकीय अधिकारीसुद्धा पुरूषांच्या लपविण्यायोग्य अवयवांना वैद्यकीय गरजेपोटी तपासू शकते.
हा कसला इस्लामी खानदान आहे ज्यात मुलीच्या वैद्यकीय शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करत आहे. ही विचित्र बाब आहे की मुस्लिम घराण्यातील लोक आपल्या महिलांचा उपचार पुरूष डॉक्टरकडून करणे गरजेेचे असेल तर करून घेतात. मात्र अशा महिला डॉक्टर तयार करत नाहीत जे त्यांच्या महिलांचा उपचार करू शकतील.
क्रमशः
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment