वैश्विक इतिहासाच्या आधुनिक युगाचा आरंभ दुसऱ्या जागतिक युद्धाच्या समाप्तीपासून होतो. दुसरे जागतिक युद्ध आणि इस्रायल राष्ट्राची स्थापना ह्या दोन्ही घटना एकाच वेळी उदयास आल्या. इस्रायलच्या स्थापनेच्या चळवळीचे मूळ उद्दिष्ट पॅलेस्टाईनमधून अरबांना बाहेर काढून तेथे झायोनिस्ट राष्ट्राची स्थापना करणे हे होते.
इस्रायलच्या स्थापनेची सुरुवात मुळात डरगन आणि स्टर्न गँग या दोन दहशतवादी संघटनांनी मिळून केली होती, ज्यांना इस्रायलच्या सैन्य संघटन हगानाचा पूर्ण पाठिंबा होता. या दोन संघटनांनी आपल्या कार्याची सुरुवात दैरयासीन नामक एका छोट्याशा गावापासून केली होती आणि त्या छोट्या गावात या संघटनांनी जे क्रूर अत्याचार केले ते पाहता येणाऱ्या काळात म्हणजे जेव्हा इस्रायलच्या निर्मितीला साऱ्या जगाचा पाठिंबा मिळाल्यावर ते राष्ट्र जगाच्या नकाशावर प्रकट झाले तेव्हा हे राष्ट्र भविष्यात खरोखर एक सामान्य राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय कायदे-नियमांप्रमाणे वागेल का? यूनोने वेळोवेळी पारित केलेल्या ठरावाचे पालन करेल का? एकूणच हे की खरोखर इस्रायल सामान्य राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले अस्तित्व प्रस्थापित करू शकेल का? नंतरच्या ज्या घटना घडत गेल्या त्यांनी याची पुष्टी केली की इस्रायल एक सामान्य राष्ट्र म्हणून वागणार नाही. २० जून १९७४ रोजी इस्रायलचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री अब्बा एबान यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात ही घोषणा केली होती की “इस्रायल कधीही इतर राष्ट्रांप्रमाणे एक सामान्य राष्ट्र असूच शकत नाही. कारण त्याच्या स्मृती सामान्य नाहीत. शतकानुशतके अत्याचार सहन केलेत आणि ६० लाख लोकांना नामशेष करून टाकण्यात आले आहे.” सध्या जे युद्ध इस्रायल विरुद्ध गाजामध्ये चालू आहे या दरम्यान नुकतीच तिथल्या एका धर्मपंडित (रब्बी) याने अशी घोषणा केली आहे की गाजामधील सर्वांची कत्तल केली जावी, लहान मुलांची, चिमुरड्यांची सुद्धा (Kill everyone in Gaza even the babies.) त्या धर्मपंडिताचे नाव आहे एलियाहू माली (Rabbi Eliyahu Mali). या धर्मपंडिताने हे सिद्ध केले आहे की खरोखरच इस्लायल राष्ट्र सामान्य नाही. म्हणूनच त्याने गाजामधील नागरिकांवर बाँब टाकले, मस्जिदीच नव्हे तर हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेज उद्ध्वस्त केले आणि आजवर अंदाचे ४० हजार लोकांची हत्या केली ज्यात ७० टक्के लहान मुले आणि स्त्रिया आहेत.
दुसरी एक गोष्ट अशी की अब्ब एबान यांनी हे सांगितले की ६० लाख ज्यू धर्मियांची कत्तल केली गेली. ही खरेच अत्यंत दुःखदायक आणि जगातील सर्वांत क्रूर घटना आहे. यासाठी जर्मनीचा हुकुमशाह हिटलर जबाबदार होता. म्हणजे हिटलरच्या मृत्यू आज शंभर वर्षांपूर्वी झाला असला तरी त्याची क्रूरता लोकांनी विसरलेली नाही, याची जाणीव जगातील असतील नसतील किंवा ज्यांची इच्छा आहे हुकुमशाह होण्याची त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. माणसाला साधी जखम झाली तर कितीतरी महिने शरीरावर त्याचे निशाण असते आणि जे लोक नरसंहार करताना काही विचार करत नाहीत त्यांची इतिहासात नोंद झालेली असते. अफगाणिस्तानातील रक्तपात असो की इराक, सीरिया, लीबिया, येमेन, पॅलेस्टाईन सगळ्यांची इतिहासात नोंद आहे. फक्त त्यांची पुनरावृत्ती कधी होईल हे कुणाला माहीत नाही.
असो, इस्रायल हे सामान्य रष्ट्र असूच शकत नाही ह्या धारणेचा परिणाम असा झाला की इस्रायली राष्ट्र आणि त्याच्या सत्ताधारी वर्गाने जे काही क्रूर कृत्य केले त्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय संस्थांनी कधीच शिक्षा दिली नाही, तर उलट त्याच्या अत्याचारांना माफ करून त्याला संरक्षण देण्यात आले. त्याच्या जन्मापासून सध्या गाजामध्ये जो नरसंहार इस्रायलने चालवला आहे त्याबद्दल कोणत्याही देशाला, अरबांचा तर उल्लेखच नको, इस्रायलविरुद्ध कारवाई व्हावी असे वाटत नाही. सारे जग मूग गिळून गप्प आहे. जेव्हा इस्रायल दुसऱ्या राष्ट्रांना आपले लक्ष्य करेल, कारण रक्तास अत्याचाराची जेव्हा सवय लागते तेव्हा समोर कोण आहे हे कळत नसते, त्या वेळी जगाला याचे दुष्परिणाम माहीत होतील. म्हणजे इस्रायल सामान्य राष्ट्राप्रमाणे वागू शकत नाही. कारण मागच्या इतिहासात त्याच्यावर अत्याचार झालेला आहे. अत्याचाराचा हा सिलसिला असाच चालू राहिला तर हे जग पुन्हा त्या वळणावर येऊन ठेपेल जेव्हा सभ्यता-संस्कृती म्हणजे केवळ रक्तपात, नासधूस यापलीकडे काहीच नव्हती.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक
मो.: 9820121207
Post a Comment