रहमतुल्लाह मोहम्मद सयानी यांचा जन्म ५ एप्रिल १८४७ रोजी मुंबईत झाला. ते दोन प्रसिद्ध मुस्लिम प्रतिनिधींपैकी एक होते, ज्यांनी १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात भाग घेतला होता, ज्यात केवळ ७२ सदस्य उपस्थित होते. रहमतुल्लाह हे १८६८ मध्ये पहिले पोस्ट ग्रॅज्युएट झाले ज्या काळात मुस्लिमांना इंग्रजी शिक्षणाची खूप जाण होती. पुढे १८७० मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि मुंबईत वकील म्हणून सराव सुरू केला आणि अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली.
ते आपल्या सामाजिक कार्याने जनतेला आकर्षित करू शकले आणि १८७६ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. नंतर ते १८८८ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले आणि त्याच वर्षी ते मुंबई विधान परिषदेचे सदस्य झाले. ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये कार्यरत राहिले आणि १८९६ पर्यंत त्या पदावर होते.
रहमतुल्लाह मोहम्मद सयानी १८९६ मध्ये इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य बनले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १२ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. समाजातील विविध घटकांमध्ये धार्मिक सलोखा आणि शांतता वाढवण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.
सर सय्यद अहमद खान हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधात प्रचार करत असताना त्यांनी या मोहिमेचा जोरदार प्रतिकार केला. त्यांनी मुस्लिमांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आणि विनंती केली की त्यांना सामूहिक संपत्तीमध्ये त्यांचा वाटा मिळण्याचा अधिकार आहे, तेव्हाच ते सामूहिक आंदोलनात सामील होऊ शकतील.
रहमतुल्लाह मोहम्मद सयानी यांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीचा मजबूत पाया घातला. त्यांनी लोकांना समजावून सांगितले की राष्ट्रीय संपत्ती कशी कमी झाली आणि त्यामुळे भारतातील लोकांचे नुकसान झाले. ब्रिटिशांच्या करप्रणालीतील पक्षपातालाही त्यांनी आव्हान दिले.
रहमतुल्लाह मोहम्मद सयानी यांनी शेती आणि दुष्काळाच्या समस्यांवर सखोल अभ्यास केला आणि सैद्धांतिकदृष्ट्या सिद्ध केले आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांना इशारा दिला की उपासमारीपेक्षा मोठा उठाव होणार नाही.
ब्रिटीश राजवटीच्या शोषणाच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठी आणि जातीय सलोखा प्रस्थापित करून लोकांचे जीवन बदलण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
रहमतुल्लाह मोहम्मद सयान ज्यांना लोक ‘भारताचे खरे लाडके पुत्र’ मानत होते, त्यांचे ४ जून १९०२ रोजी निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment