(४७) आम्हाला माहीत आहे की जेव्हा ते कान लावून तुमच्या गोष्टी ऐकतात तर खरोखर काय ऐकतात आणि जेव्हा बसून आपापसात कानगोष्टी करतात तेव्हा काय म्हणतात. हे अत्याचारी आपापसात म्हणतात की हा तर एक जादूग्रस्त मनुष्य आहे ज्याच्या पाठीमागे तुम्ही लोक जात आहात.२२
(४८) पाहा! कशा गोष्टी आहेत ज्या हे लोक तुमच्यावर रचतात, हे भटकलेले आहेत. यांना मार्ग सापडत नाही.
(४९) ते म्हणतात, ‘‘जेव्हा आम्ही केवळ हाडे आणि माती बनून राहू तेव्हा काय आमचे पुनर्निर्माण व पुनरुत्थान केले जाईल?’’
(५०) यांना सांगा, ‘‘तुम्ही दगड अथवा लोखंड जरी झालात,
२२) मक्केच्या काफिरांची अवस्था अशी होती की लपूनछपून कुरआन ऐकत असत व मग त्यावर तोडगा कोणता असला पाहिजे यासाठी आपापसात सल्लामसलत करीत असत. बहुतेक वेळा ते आपल्याच माणसांपैकी एखाद्यावर अशी शंकाही घेत असत की कदाचित कुरआन ऐकण्याचा या माणसावर काहीतरी परिणाम झाला असेल, म्हणून ते सर्व मिळून त्याची समज घालू लागत असत की अहो! तुम्ही हे कुणाच्या फेर्यात अडकत आहात, हा माणूस तर जादूग्रस्त आहे. म्हणजे कोणा शत्रूने त्यावर जादू केली आहे, म्हणून बहकल्यासारख्या गोष्टी करू लागला आहे.
Post a Comment