एखाद्या व्यक्तीला प्रत्येक माणसाच्या कार्यपद्धतीत वाईट विचार आढळतात. कुणाच्याही कार्यवद्धतीत त्याला प्रामाणिकपणा आणि कार्यकुशलता आढळत नाही. दुसऱ्या माणसाकडून जे घडले नाही त्यासाठी त्याला दोषी ठरवतो. दुसऱ्या माणसांना जेव्हा अशा माणसाचा स्वभाव समजतो तेव्हा ते अशा माणसापासून दूर जाऊ लागतात. यामुळे आपसात द्वेष आणि शत्रुत्व उत्पन्न होते. म्हणूनच अल्लाहने माणसांना अशा वृत्तीपासून स्वतःला वाचवण्याची ताकीद दिली आहे. “हे श्रद्धावंत लोकहो, कुणाविषयी चुकीच्या विचारांपासून स्वतःला वाचवा. कारण काही चुकीच्या धारणा गुन्हा असतात.” प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जेव्हा चुकीच्या धारणांपासून मनाई केली तेव्हा त्याचबरोबर शत्रुत्व, ईर्ष्या आणि दुसऱ्याची हेरगिरी करण्यापासून देखील त्यांना मनाई केली. कारण त्या गोष्टी चुकीच्या धारणेचे कारण असतात. तुम्ही स्वतःला इतराविषयी चुकीच्या धारणांपासून वाचवा, दुसऱ्याच्या बाबतीत वैयक्तिक माहितीच्या मागे लागू नका. तसेच एकमेकांशी वरचढ असण्याचे प्रयत्न करू नका, आपसात ईर्ष्या, द्वेष करू नका, एकमेकांपासून अलिप्त राहू नका. आणि हे अल्लाहचे भक्तहो, आपसात बंधुत्वाचे व्यवहार करा. (मुस्लिम, अबू दाऊद, तिर्मिजी)
जर एखादा माणूस असे कोणत्या कार्यात व्यस्त असेल ज्यामुळे इतरांना चुकीचे विचार यावेत तर अशा माणसाने तो जे काही करत आहे त्याची हकीकत लोकांना सांगावी, जेणेकरून इतर माणसं त्या माणसाविषयी चुकीचे विचार बाळगणार नाहीत. याचे उदाहरण स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत केले. एकदा प्रेषित (स.) एकांतात (मशिदीत एकाग्र अवस्थेत) बसले असताना त्यांच्या पत्नी त्यांना भेटायला आल्या होत्या. प्रेषित (स.) आपल्या पत्नींना परत घरी सोडण्यासाठी निघाले. तेवढ्यात समोरून दोन अन्सार व्यक्ती येत होत्या, त्यांनी प्रेषितांना एखाद्या स्त्रीबरोबर पाहिले आणि ते परत निघाले, तेवढ्यात प्रेषितांनी त्यांना हाक दिली आणि म्हटले की “ह्या माझ्या अमुक पत्नी आहेत.” त्या माणसांनी उत्तर दिले की “हे अल्लाहचे प्रेषित (स.)! आम्ही आपल्या बाबतीत कोणतातरी चुकीचा विचार मनात कसा अणू शकतो?” प्रेषितांनी उत्तर दिले, ”सैतान माणसामध्ये त्याच्या रक्तात मिसळून वहात असतो.”
पवित्र कुरआनात म्हटले आहे की “अल्लाहला कुण दुसऱ्याच्या बाबतीत त्याचे वाईट वर्ण करणं पसंत नाही. परंतु ज्याच्यावर अन्याय-अत्याचार झाला असेल (त्याची गोष्ट वेगळी), अल्लाह सर्वकाही ऐकतो आणि जाणतो.” (पवित्र कुरआन, ४:२१)
म्हणून कुणा दुसऱ्या माणसाविषयी लोकांना सांगत राहावे, पण अत्याचारपीडिताला अधिकार आहे की त्यैने स्वतःवर झालेला अत्याचार लोकांना सांगावा आणि अत्याचारीच्या कृत्यांची सर्वांना माहिती द्यावी.
(शिबली नोमानी, सगद सुलैमान नदवी, सीरतुन्नबी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment