इस्लामच्या इतिहासामध्ये अनेक अशा महिलांची नावे दिसून येतात ज्यांनी कुरआन आणि प्रेषित वचनांचा सखोल अभ्यास केला होता. एवढेच नव्हे तर त्या संदर्भात प्रचार, प्रचार केला होता. पुस्तकं लिहिली होती. अनेकवेळा त्यांचा सहभाग पुरूषांपेक्षा जास्त होता.
1. हजरत हब्सा बिन्ते सिरीन (हिजरी 101) ह्या कुरआन आणि हदीसच्या तज्ज्ञ होत्या. त्या कुरआन पठण इतक्या सुंदर पद्धतीने करत की त्यांचे बंधू मुहम्मद बिन सीरीन यांना कुरआन पठणामध्ये जर काही अडचण आली तर ते हब्सा यांना विचारत.
2. हजरत सईद बिन अलमुसैब (हि.94) मोठे इस्लामी विद्वान होते. त्यांच्या ज्ञानाचा असंख्य लोकांनी लाभ घेतला. त्यांची मुलगी दुर्रत ने त्यांनी उल्लेखित केेलेल्या सर्व प्रेषित वचनांना मुखोद्गत करून टाकले होते. तत्कालीन खलीफा अब्दुल मलिक बिन मरवान (हि. 86) याने आपला मुलगा वलीद यासाठी दुर्रत यांना लग्नाची मागणी घातली होती. परंतु, इब्ने मुसैब यांनी नकार कळवला होता आणि त्यांचा निकाह आपले एक शिष्य इब्ने अबी वदआ यांच्याशी करून दिला होता. निकाहनंतर दुर्रत यांचे पती जेव्हा मुसैब यांच्या अभ्यास गटात जाण्याची इच्छा व्यक्त करत तेव्हा त्या म्हणत इथेच बसा माझे वडिलांकडे जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला इथेच घरबसल्या देते.
3. इमाम मालिक बिन अनस (हि.179) यांच्या मुलीला त्यांनी उल्लेखित केलेले हदीसचे पुस्तक मुखोद्गत होते. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, वडिलांचे धार्मिक प्रवचन त्या दाराआडून ऐकत. हदीस वाचतांना जर एखाद्या व्यक्तीने चूक केली तर त्या दाराची कडी वाजवून चूक निदर्शनास आणून देत.
4. फातमा बिन्ते मंजर ह्या हदीसच्या मोठ्या तज्ज्ञ होत्या. त्यांनी स्वतः अनेक हदीस उल्लेखित केलेल्या आहेत. ज्या त्यांनी आपल्या आजी हजरत आसमा रजि. यांच्याकडून शिकल्या होत्या.
क्रमशः..
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment