येथपावेतो की तो आपल्या तारुण्यापर्यंत पोहचेल. वचनाचे पालन करा, नि:संशय वचनाबद्दल तुम्हाला जाब द्यावा लागेल.
(३५) मापाने द्याल तेव्हा पूर्ण भरून द्या आणि वजन कराल तेव्हा तराजूने ठीक व रास्त वजन करा ही चांगली पद्धत आहे आणि परिणामाच्या दृष्टीनेदेखील हीच उत्तम आहे.
(३६) एखाद्या अशा गोष्टीमागे लागू नका जिचे तुम्हाला ज्ञान नसेल.१६ निश्चितच डोळे, कान व हृदय या सर्वांच्याकडे जाब विचारला जाईल.
(३७) जमिनीवर घमेंडीत चालू नका, तुम्ही जमिनीला फाडूही शकत नाही किंवा पर्वताच्या उंचीला गाठू शकत नाही.
(३८) या गोष्टींपैकी प्रत्येकाचा वाईट पैलू तुझ्या पालनकर्त्याजवळ अप्रिय आहे.१७ या त्या विवेकाच्या गोष्टी आहेत ज्यांना तुझ्या पालनकर्त्याने तुझ्यावर दिव्य प्रकटन केले आहे.
(३९) आणि पाहा! अल्लाहबरोबर कोणी दुसर्याला ईश्वर बनवू नकोस नाहीतर तू जहन्नममध्ये घातला जाशील, धिक्कारलेला आणि प्रत्येक चांगुलपणापासून वंचित होऊन,१८ (४०) किती चमत्कारिक बाब आहे की तुमच्या पालनकर्त्याने तर तुम्हाला पुत्रसंततीने उपकृत केले आणि आपल्या स्वत:साठी दूतांना मुली बनविल्या? मोठे असत्य आहे जे तुम्ही लोक उच्चारता.
१६) असे फरमाविण्यामागील आशय असा की लोकांनी आपल्या व्यक्तिगत अथवा सामूहिक जीवनात ग्रह आणि कल्पनाऐवजी ‘ज्ञाना’चे अनुसरण करावे.
१७) म्हणजे या आज्ञांपैकी कोणतीही आज्ञा जर भंग केली गेली तर ते अप्रिय आहे.
१८) या फरमानचे संबोधन प्रत्येक माणसाला आहे. अर्थ असा की हे मानवा, तू हे काम करू नकोस.
Post a Comment