(५१) अथवा त्याहूनसुद्धा कठीण एखादी वस्तू जी तुमच्या मनात जीवधारणेपासून दूर असेल.’’ (तरीसुद्धा त्ाुम्ही पुनरुत्थानापासून वाचणार नाही) ते जरूर विचारतील, ‘‘कोण आहे तो जो आम्हाला पुन्हा जीवन देईल?’’ उत्तरादाखल सांगा, ‘‘तोच, ज्याने तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केले.’’ ते डोके हलवून हलवून विचारतील,२३ ‘‘बरे तर हे घडणार केव्हा?’’ तुम्ही सांगा, ‘‘काय आश्चर्य की ती घटका जवळच येऊन ठेपली असेल.
(५२) ज्या दिवशी तो तुम्हाला पुकारील तर तुम्ही त्याची स्तुती करीत त्याच्या हाकेला ओ म्हणून निघून याल आणि तुमची कल्पना त्या वेळी अशी असेल की आम्ही तर केवळ थोड्याच वेळेपर्यंत या स्थितीत पडून राहिलो आहोत.’’२४
२३) मूळ अरबी शब्द ‘इऩगा़ज’ (हलविणे) याचा डोक्याला वरून खाली आणि खालून वरच्या बाजूस हलविणे असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, अथवा उपहास करण्यासाठी म्हणून डोके खालीवर करतो.
२४) म्हणजे जगात मृत्यू पावल्यापासून ते कयामतच्या दिवशी उत्थापित होण्याच्या वेळेपर्यंतचा कालावधी तुम्हाला काही तासांपेक्षा जास्त वाटणार नाही. आम्ही काही वेळ झोप घेत होतो की अकस्मात या उत्थापनेच्या गोगांटाने आम्ही खडबडून उठलो, असेच त्या वेळी तुम्ही समजाल.
Post a Comment