सत्ताधारीवर्गाची अविरत सत्ता गाजवण्याची इच्छा कशा प्रकारची नवनवीन रुपं धारण करते याची कल्पना करवत नाही. ज्या दोन देशांत साधी लोकशाही म्हणजे विविध विचारधारांच्या पक्षांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही. फक्त सत्ताधारीवर्गाचा एकच पक्ष आणि त्याच पक्षाद्वारे निवडणूक लढवणारेच पात्र उमेदवार असतात. त्यांनाच नागरिकांना निवडून द्यावे लागते. त्यांच्या इच्छेला, त्यांच्या आवडीनिवडीला काहीच अर्थ नसतो. असे देश जगात रशिया आणि चीन आहेत. दुसरेही असतील.
रशिया आणि चीन या दोन राष्ट्रांनी असे जाहीर केले की ते अमेरिकेच्या आक्रमक व्यवहाराला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्या दोन्ही राष्ट्रांचे यूक्रेनसहित अनेक विषयांवर एकमत आहे. आणि उभय देशांमधील संबंधांमध्ये पाश्चात्य देशांकडून हस्तक्षेप सहन करणार नाहीत. त्यांनी असेही जाहीर केले की हे दोन्ही देश मिळून जगभर न्याय आणि प्रामाणिकपणाला उत्तेजन देतील. त्या दोघांनी म्हणजे रशिया आणि चीन यांनी एक गंमतीची गोष्टदेखील सांगितली ती अशी की आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आम्ही जगभर न्याय आणि लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करू. इथे नमूद करावेसे वाटते की या दोन्ही देशांचे सत्ताधारी लोकशाहीच्या प्रचलित पद्धतीने निवडून आलेले नाहीत. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी स्वतःला २०३० पर्यंत सत्तेत राहण्याची व्यवस्था पूर्वीच करून ठेवलेली आहे, तर जवळजवळ आजीवन चीनचे राष्ट्राध्यक्ष राहण्याची सोय शी जिनपिंग यांनीदेखील करून ठेवली आहे. म्हणजे हे आजीवन सत्ताधारी तर प्रजा आजीवन गुलाम! ज्यांनी ७५ वर्षांपूर्वी सोव्हियत संघाला मान्यता दिली त्या चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओझे डाँग यांच्या कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत.
या दोन देशांचे मानवतेच्या संहारात किती मोठे योगदान आहे ते पाहू या. माओझे डाँग ज्यांनी १९४९ मध्येआधुनिक चीनची स्थापना केली होती, ते आपल्या शासनकाळात झालेल्या जवळपास ८ कोटी लोकांची हत्या/मृत्यूस जबाबदार आहेत. त्यांनी १९६६ ते १९७६ च्या काळात सांस्कृतिक क्रांतीची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश भांडवलदारी व्यवस्थेला संपवणे हा होता. पण याची वास्तविकता अशी होती की त्यांनी या काळात २.५ लाख मस्जिदी उद्ध्वस्त केल्या. काही मस्जिदींची इस्लामी ओळक नष्ट करून टाकली. रेड गार्ड्स नावाची संस्था स्थापन केली. यात विद्यार्थी सहभागी झाले. ही एक सामाजिक चळवळ होती. याचा उद्देश जुने विचार, जुनी संस्कृती, जुन्या परंपरा आणि जुन्या सवयी संपवणे हा होता. या मोहिमेस ‘गँग ऑफ फोर’ म्हणून ओळखले जाणारे माओझे डाँग यांचे समर्थक होते. यात माओ यांच्या पत्नी जिआंग किन तसेच झान्य. युंग याओ वेन यान वान्य हान्य यांचा समावेश होता. त्यांनी जी सांस्कृतिक हिंसा पसरवली यात दीड-दोन कोटी लोक मारले गेले. त्यांनी जे अत्याचार मानवांवर केले यामध्ये मानवांची हत्या करून ते खात होते. (Cannibalism) रास्त ज्या लोकांची कत्तल केली त्यांची मोठी संख्या वगळता दुष्काळ आणि महामारी यात लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले. एक योजना माओ यांनी चालवली होती ती म्हणजे छोट्यामोठ्या खेड्यापाड्यांतील शेतजमिनी त्यांच्या मालकांकडून हिसकावून घेऊन त्या जमिनी औद्योगिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात याव्यात या मोहिमेत लाखोच्या जमिनी गेल्यामुळे ते अन्नधान्याअभावी मरण पावले. गंमत म्हणजे ही योजना एकदा बंद करण्यात आली होती, पण सध्या पुन्हा ह्या योजनेची पुनरावृत्ती होत आहे. १९४९ सालीच जे तैवानच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा झाले. त्यात अंदाजे ५० लाख सैन्य आणि इतर नागरिक मिळून १५० लाख लोक मरण पावले. यात उपासमार आणि महामारीमुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी होती. भूसुधार मोहिमेत ४० लाख चीनी नागरिक मरण पावले तर ३ वर्षांच्या दुष्काळात माओ यांनी केवळ माणसेच मारली नाहीत तर आकाशात उडणाऱ्या गौरेयावरही त्यांचा राग होता. का तर त्या चिमण्या शेतातील पिकांसाठी मोठा धोका आहेत. म्हणून चीनमच्या आकाशातील एकन् एक गौरेया आणि लहान पक्ष्यांना मारण्याचे नागरिकांना आदेश दिले. आणि सर्व नागरिकांनी सर्व पक्ष्यांचा खात्मा केला. याच्या परिणामस्वरुप तिथल्या नागरिकांना दुष्काळाला सामोरे जावे लागले, ज्यामध्ये ४.५ कोटी लोक मरण पावले. यात जवळपास ८ कोटी लोकांचे चीनमध्ये माओझे डाँग यांच्या रानटीपणामुळे प्राण गेले. अगदी अलीकडच्या काळात १९८९ मध्ये तियानमन स्केअर मध्ये चीनच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. त्यांची मागणी होती की पर्यावरण सुधारणा, कायद्याचे राज्य, लोकशाही वगैरे आधुनिक विचार. पण ज्या सत्ताधारीवर्गाने जुन्या परंपरा व इतिहास संपवण्यासाठी लोकांची कत्तल केली त्यांनीच ह्या आधुनिक विचारांची मागणी करणाऱ्या १०००० विद्यार्थ्यांना रणगाड्यांखाली चिरडून हत्या केली. त्या देशाचे आताचे राष्ट्रपती शी जिनपिंग जगात न्या आणि लोकशाही स्थापनेसाठी दुसरे हुकुमशाह ब्लादिमिर पुतीन यांच्याशी हातमिळवणी करत आहेत. स्वतः रशियन क्रांतीमध्ये पाच कम्युनिस्टांनी ७०-७२ लाख लोकांचे प्राण घेतले. १८१७-२३ या काळात या मोहिमेला ‘रेड टेर्रर’ नाव देण्या आले होते. त्यामध्ये ५-६ लाख लोकांची कत्तल झाली. इतकेच नव्हे तर सार्वजनिक बलात्कार, सर्रास हत्या, ज्यू लोकांविरुद्ध अभियान हे सर्व चालू होते. तसेच गावेच्या गावे जाळून नष्ट करण्यात आली. पिके नष्ट केली गेली.
अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी चालवलेल्या मानवांच्या कत्तलीची मोहीम थांबेली नसताना ही दुसरी दोन राष्ट्रे आंतरराष्ट्रीय कृती दाखवून देण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांनाही नरसंहारात भाग घ्यायला हवा की नाही! अमेरिका आणि यूरोपच नेहमी का? लोकशाही आणि न्यायाच्या वाटणीत त्यांचा सहभाग नको का?
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.: 9820121207
Post a Comment