(९७) जो कोणी सत्कर्म करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री मात्र अट ही की तो ईमानधारक असावा, त्याच्याकडून आम्ही जगात पवित्र जीवन व्यतीत करवू आणि (परलोकात) अशा लोकांना त्यांचा मोबदला त्यांच्या उत्तम कृत्यानुसार प्रदान करू.
(९८) मग जेव्हा तुम्ही कुरआनचे पठण करू लागाल तेव्हा धिक्कारलेल्या सैतानापासून अल्लाहचा आश्रय मागा.२८
(९९) त्यांना त्या लोकांवर प्रभुत्व प्राप्त होत नाही जे ईमान धारण करतात व आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात.
(१००) त्याचा जोर तर त्याच लोकांवर चालतो जे त्याला आपला वाली बनवितात व त्याच्या बहकविण्याने अनेकेश्वरत्व पत्करतात.
२८) याचा अर्थ केवळ इतकाच नाही की तोंडाने ‘‘अऊ़जु बिल्लाहि मिनश-शैतानिर-रजीम’’– ‘‘मी बहिष्कृत सैतानापासून अल्लाहचा आश्रय घेतो’’ उच्चारावे. तर याबरोबरच प्रत्यक्षात मन:पूर्वक अल्लाहशी अशी प्रार्थनादेखील केली पाहिजे की कुरआनचे वाचन करताना त्याला सैतानाच्या दिशाभूल करणार्या भ्रमापासून सुरक्षित ठेवावे. कारण ज्याला येथून बोध प्राप्त झाला नाही त्याला मग कोठूनही बोध प्राप्त होणार नाही व ज्याने या ग्रंथापासून दिशाभूल करवून घेतली त्याला मग मार्र्गभ्रष्टतेच्या चक्रातून जगाची कुठलीही शक्ती मुक्त करू शकणार नाही.
Post a Comment