Halloween Costume ideas 2015

लोकशाहीची शोकांतिका


प्रख्यात राजकीय तत्त्वज्ञ अरिस्टॉटल यचे म्हणणे आहे की लोकशाहीद्वारा स्वतंत्र लोकांवर राज्य केले जाऊ शकते, पण श्रीमंत वर्गावर सत्ता केली जाऊ शकत नाही. लोकशाही कायद्याचे राज्य या संकल्पनेचे महत्त्व कमी करते. सर्वांसाठी कायद्याचे राज्य असावे. जर तसे नसेल तर जे शक्तिशाली लोक किंवा वर्ग कोणत्या देशामध्ये, समाजामध्ये असतात त्यांना आपल्या मर्जीनुसार काहीही करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीची दुसरी बाजू अशी की कोणत्याही राष्ट्रात गरीब लोकांची संख्या धनवानांपेक्षा अधिक असल्याने श्रीमंतवर्गाला मागे ठेवतात आणि त्यांना कंगाल करून टाकतात. गरीब आणि श्रीमंत तर लोकांचा लोकशाहीच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटलचे विचार चुकीचे आहेत. म्हणजे सध्याच्या काळात ज्या काळी त्यांनी आपले विचार मांडले होते तो इ.सन पूर्वीचा काळ होता, लोक सुशिक्षित नव्हते. श्रीमंतीही नव्हती. सभ्यता-संस्कृती इतकी उंचावलेली नव्हती जितकी सध्याच्या काळाने गाठली आहे. बऱ्याच खोट्या आणि लबाड गोष्टींचे ज्ञान त्या काळातील लोकांना नव्हते, कारण त्यांच्याकडे शिकण्या-सवरण्याची साधनं नव्हती की त्यासाठी लागणारी श्रीमंती नव्हती. बिचारे गरिबीचे जीवन जगत होते आणि गरीब म्हटलं की प्रामाणिक, इमानदार वगैरे हे गुण स्वाभाविकच त्यांच्याकडे असणार. पण जसजसा लोकांकडे पैसा येत जातो चांगले जीवन जगण्याची संधी मिळते. शिक्षण, संस्कृती वगैरे चालून येतात तसतशी त्यांच्यातली नैतिकता, प्रामाणिकपणा, एकमेकांशी आपुलकी वगैरे मानवी जीवनमूल्ये, श्रीमंतीची साधने जसजशी त्यांच्याकडे एकवटतात उपरोल्लेखित गुण आपोआप बाहेर निघून जातात. तेव्हा अरिस्टॉटलने लोकशाही वगैरेच्या बाबतीत जे काही म्हटले आहे ते आजच्या लोकशाहीबाबत नाही हे वाचकांनी समजून घ्यावे.

सध्याची लोकशाही म्हणजे जितके म्हणून शक्तिस्रोत श्रीमंतीचे कोणत्या राष्ट्रात असतात ते सर्वचे सर्व फक्त आणि फक्त सत्ताधारीवर्गाकडे एकत्रित होतात आणि सत्ताधारीवर्ग याला स्वतःची कामगिरी समजतात. जनतेला भगवानच्या दारी सोड़तात, कारण त्याच भगवानच्या नावावर त्यांनी कमवलेले असते. पण ती जी कला आहे कमवण्याची ती जनतेला माहीत होऊ देत नाही. काही लोक गटार साफ करत असतील तर त्यांना ते काम करताना आध्यात्मिक समाधान मिळते, असे काही समजावलेले असते. असे करून एका समाजाला नाही एका राष्ट्राला आपले गुलाम बनवून टाकतात. अरिस्टॉटलचे म्हणणे असेही आहे की गुलामीचेही बरेच प्रकार असतात. एका प्राकृतिक गुलामाला समजुतदारपणा कशाला म्हणतात हे कळते, पण तो स्वतःकडे असावा जेणेकरून आपण इतरांची गुलामी करू नये हे कळत नाही. म्हणजे सत्ताधारी जे काही आदेश देत असतात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतात, पण ते प्राकृतिक गुलाम असल्याकारणाने इतरांना आदेश देण्याची क्षमता आपल्याकडे असावी असे त्यांना वाटत नाही. असे लोक इतरांकडून आदेश घेत असतात, त्याचे पालन करण्यासाठी. पण त्यांनी स्वतः इतरांना आदेश द्यावेत ज्याचे इतरांनी पालन करावे अशी इच्छा त्यांच्यामध्ये नसते, कारण त्यांची कल्पानाशक्ती विकसित झालेली नसते किंवा ‘कल्पना’ हा आभासच त्यांना होत नाही.

असे नाही की फक्त निरक्षर आणि गरीब लोकच या समस्येला बळी पडतात. बरेचसे श्रीमंत, बुद्धिजीवी, राजकारणी लोकसुद्धा लोकशाही व्यवस्थेशी बऱ्याच आशा-आकांक्षा लावून असतात आणि आज ना उद्या त्यांनासुद्धा इतरांना आदेश देण्याची संधी मिळेल या आशेवर जगता जगता केव्हा गुलाम बनून जातात हे कळत नाही. सत्ताधारीवर्गाला चांगले माहीत असते कधी कुणाला गुलाम बनवायचे. भारतात मात्र लोकशाही व्यवस्थेचे कित्येक राजकारणी बळी गेलेत. त्यांना माहीतही झाले नाही की लोकशाही सत्तेच्या दालनातून त्यांची कशी हकालपट्टी झाली. त्यांची अवस्था गुलामासारखी याच लोकशाहीने केलेली आहे. लोकशाही जुलमी राजवटीत कधी परिवर्तित होते हे लवकर कळतसुद्धा नाही!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: 9820121207


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget