(८६) आणि जेव्हा ते लोक ज्यांनी जगात अनेकेश्वरत्व पत्करले होते आपल्या ठरविलेल्या भागीदारांना पाहतील तेव्हा सांगतील, ‘‘हे पालनकर्त्या! हेच आहेत आमचे ते भागीदार ज्यांचा आम्ही तुला सोडून धावा करीत होतो.’’ यावर त्यांचे ते उपास्य त्यांना स्पष्ट उत्तर देतील, ‘‘तुम्ही खोटारडे आहात.’’२६
(८७) त्या वेळेस हे सर्व अल्लाहसमोर लीन होतील आणि त्यांचे ते सर्व रचलेले कुभांड परागंदा होतील जे हे जगात रचित होते.
(८८) ज्या लोकांनी स्वत: इन्कार करणार्याचा मार्ग अवलंबिला आणि इतरांना अल्लाहच्या मार्गापासून रोखले त्यांना आम्ही यातनेवर यातना देऊ, त्या उपद्रवाबद्दल जे ते जगात माजवीत असत.
(८९) (हे पैगंबर (स.)! यांना त्या दिवसासंबंधी सावध करा) जेव्हा आम्ही प्रत्येक जनसमुदायातून खुद्द त्यांच्यामधूनच एक साक्षीदार उभा करू जो त्यांच्यावर साक्ष देईल...,.
२६) खूशही नव्हतो, किंबहुना आम्हाला तर माहीतदेखील नव्हते की तुम्ही आम्हाला पुकारीत आहात.
Post a Comment