इतिहासामुळे माणसांच्या इच्छा-आकांक्षा निर्माण होतात आणि त्यांच्या याच आकांक्षामुळे माणसे इतिहास घडवत असतात. जे त्यांच्या आचारविचारांद्वारे, त्यांच्या आपसांतील संभाषणातून किंवा त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या कामांतून त्या संक्रमित होतात. हेच संभाषण, विचार इतिहासाची मांडणी करतात ज्याद्वारे नवीन राष्ट्रे उदयास येतात किंवा अस्तित्वात असलेली राष्ट्रे उद्ध्वस्त होतात. हे विचार एका पाश्चात्य इतिहासकाराचे आहेत.
पाश्चात्य देशांनी या विचारांच्या आधारावर एक संस्कृती उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वातंत्र्य आणि सामान्य माणसांच्या मूलभूत हक्कांविषयी मोठ्या प्रमाणात साहित्य प्रकाशित केले. साऱ्या जगाच्या लोकांना स्वातंत्र्य, समता आणि अभिव्यक्तीचे प्रलोभन दिले. पण यामध्ये खरेच त्यांना स्वतः आपल्या विचारांचं महत्त्व जास्त प्रिय होते की ही साहित्यसंपदा आणि आपल्या आचारांद्वारे जगातल्या सामान्य माणसांना आपल्या जाळ्यात गुंतवायचे होते. शंभर वर्षे त्यांनी आपल्या विश्वासांवर जगातल्या कित्येक देशांना आपल्या विचारधारेचा अवलंब करण्यास भाग पाडले. आज शंभर वर्षे पूर्ण होत असताना जगातली जवळपास तीन चतुर्थांश लोकसंख्या त्रस्ता आहे. त्यांच्यावर गंभीर अत्याचार केले जाताना कित्येक देशांमध्ये लोकांना स्वातंत्रपणे आपले विचार मांडण्याची परवानगी नाही. पाश्चात्य सभ्यता-संस्कृती आपले उद्दिष्ट सुंदर शब्दावलीद्वारे प्रसारित करत असते. त्या शब्दावलीचा अर्थ सामान्य माणसांना वर्षानुवर्षे आणि पिढ्यान् पिढ्या एका सुंदर आणि स्ऱतवत्र भविष्याच्या आशेवर जगायला भाग पाडतो आणि जेव्हा पाश्चात्य इतिहासकारांच्या संविधानकारांच्या विचारांचा अर्थ समजेपर्यंत कित्येक राष्ट्रे आणि कोट्यवधी निरपराधांचे प्राण हरपले जातात. रक्तपाताचा बाजार शस्त्रास्त्रनिर्मितीद्वारे थाटला जातो. जगाला सगळ्या लोकांची संपत्ती एकवटली जाते आणि ही संपत्ती उद्योजक-उद्योगपतींद्वारे राजकीय व्यवस्थेतील माणसांपर्यंत पोहोचते. जगभर गरिबीचा नंगानाच माजवला जातो. विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यात येते. शंभर वर्षांनंतर सध्या हीच परिस्थिती जगभर पसरलेली आहे. या संस्कृतीचे आमिष दाखवून ब्रिटन साम्राज्य चायनाकडे जाण्याची गोष्ट केली ज्यामुळे तिथल्या सत्ताधारी बादशहांनी त्यांना धुडकावून लावले आणि आजपर्यंत त्यांना संधी मिळाली नाही. अमेरिकेला याचेच दुःख आहे. ब्रिटिश सम्राटाने चीनच्या सम्राटास ज्या भेटवस्तू दिल्या होत्या त्यात प्रामुख्याने २०० घोडे, ४० वाहन, ३०० कामगार, ९० मोठी वाहने त्याशिवाय हिरे, सोन्याचे खजिने पाठवले होते, पण चीनच्या सम्राटाने ते स्वीकारले नाही आणि आपल्या देशात त्याला पाऊल ठेवण्याची अनुमती दिली नाही. त्याच सुमारास जेव्हा उस्मानिया साम्राज्याचा प्रतिनिधी चीनकडून खंडणीची मागणी करतो तेव्हा भारताच्या सरहद्दीपर्यंत तिथला सम्राट ती खंडणी आणून देत होता.
आज जगभर एकाधिकारशाहीचा उदय झाला आहे. काही देशांमध्ये तिने सत्तेवर कब्जा केलाय तर काही देशांमध्ये ती अस्तित्वात येण्याचा खटाटोप करत आहे. लोकांना चांगले भविष्य, चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्य असे अनेक वचने देऊन शेवटी त्यांच्या गळ्यात गुलामी लादली. काही मोजके देश सोडून जगातले अधिकांश देश एकाधिकारशाहीखाली जगायला विवश आहेत. एक शासक, एक देश हे नवीन अस्त्र १९१४-१८ नंतर जगात रुढ करण्याचा प्रयत्न होत आहे. काही देश यात अडकले. इतर लवकरच अडकतील. लोकशाही, अभव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेची वचने नाहिसी होत गेली.
१७७६ साली जगातल्या मानवांना संबोधून असे म्हटले गेले होते की उघड सत्य आहे की साऱ्या मानऱजातीला ईश्वराने समान हक्क, समान अधिकार, समान दर्जा दिला आहे आणि म्हणून साऱ्या मानवजातीला हे अधिकार बहाल केले जातील. पाश्चात्य संस्कृतीने हे अधिकार १७७६ साली बहाल केले तर तिसरे खलीफा ह. उमर (र.) यांनी इ.स. ६३५ च्या सुमारास घोषणा केली होती. साऱ्या मानवजातीला त्यांच्या मातांनी स्वतंत्र जन्म दिला आहे. त्यांना कुणीही कोणत्याही गुलामीत अडकवण्याचा प्रयत्न करू नये.
आज साऱ्या जगात मानवजाती सत्ताधारी आणि उद्योजकवर्गाच्या गुलामीत अडकलेली आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment