Halloween Costume ideas 2015

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी


जमात-ए-इस्लामी हिंद ची शासनाकडे मागणी

जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रने 18 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात, जमाअतचे प्रदेशाध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये- प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील नव्वद हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्याच्या वृत्तामुळे अत्यंत चिंतित आहे. अवकाळी पाऊस आणि 

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे. या भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, केळी, संत्री आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. आधीच लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात कांद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी असल्याने आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील आंबा शेती आणि कापूस व धान्य पिकांवर होणारा संभाव्य परिणाम यामुळे मंद पेरणीची चिंता आहे. पीक नुकसान मूल्यांकन (पंचनामा) साठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना कौतुकास्पद असल्या तरी, ज्या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मंजुरी आणि भरपाईचे वाटप करणे आवश्यक आहे. शेतकरी आजही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे पीक कापणीवर अवलंबून आहेत. पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्यामुळे आर्थिक नुकसान होते ज्यामुळे शेतकरी मोठ्या व्याजावर कर्ज शोधण्यास आणि मग कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून आत्महत्या करण्यास भाग पडतात. त्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी तत्काळ नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.. जमात-ए-इस्लामीची मागणी आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रश्नात प्राधान्याने लक्ष घालून ताबडतोब प्रति एकर 15,000 नुकसान भरपाई जाहीर करुन व शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन मदत केली पाहिजे. शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांचे जीवन नव्याने उभारण्याची संधी दिली पाहिजे.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget