महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना असे सांगितले आहे की राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद निर्माण करून सामाजिक शांतता भंग झाल्याने राज्यातले ५० हजारांहून अधिक छोटे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. राज्याबाहेर म्हणजे नेमके कुठे हे त्यांनी सांगितले नसले तरी भारतात एकच राज्य आहे जिथे सर्व उद्योग, उद्योगपती, श्रीमंती, धनसंपत्ती एकवटली जात आहे. ते राज्य सर्वांना माहीत आहे. गुजरात भारतात नसते तर भारताची इतकी क्रांती इतका विकास झाला नसता. जे लोक महाराष्ट्राचे उद्योगधंदे बाहेर गेले असे म्हणतात ५० हजार उद्योग गेल्यानंतर ते त्यांना अगोदर कळले नव्हते का? कळले होते तर उद्योगधंदे राज्याबाहेर जाताना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न का केला नाही? गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाचा गोंधळ चालू आहे. ते कोण करतंय, कुणी हे भांडण लावून दिले याचीही माहिती काँग्रेसचे अध्यक्ष पटोले यांना आहे. त्यांनीच ती बोलून दाखविली. याचे एकमेव कारण काँग्रेस पक्षाला जनतेच्या समस्यांशी कधीच देणे घेणे नव्हते आणि आजही नाही. निवडणुकांच्या वेळी अमुक तमुक योजना जाहीर करण्यापेक्षा निवडणुकांआधी कमीतकमी ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तेथे तर लागू करायच्या होत्या, पण निवडणुका जिंकणे सत्ता मिळवणे, पुढे सत्तेचा उपभोग घेणे या पलिकडे काहीच नाही. याचा अर्थ ज्या पक्षावर पटोले राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण करत आहेत असे आज म्हणतात ती गोष्ट त्यांना पूर्वी माहीत नव्हती का? भाजप असो की काँग्रेस जनतेच्या समस्यांशी त्यांचे देणे घेणे नाही, पण भाजपवाले आपण जनतेची किती पर्वा करतो, किती त्यांच्याशी त्यांच्या समस्यांशी सहानुभूती आम्हाला आहे, देवाधर्माचा भावनिक आधार घेऊन ते जनतेला पटवून देण्यात पटाईत आहेत. गेली नऊ वर्षे देशाच्या सामान्यांचे किती हाल होत आहेत, आर्थिक स्थिती कोणत्या स्तराला गेली आहे, साऱ्या नाकरिकांना माहीत आहे. पण यासाठी भाजप जबाबदार नसून काँग्रेसच जबाबदार असल्याचे जनतेला पटवून देण्याची जी कला आहे ही आज दुसऱ्या कुणाच्या पक्षाकडे नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अहंकार त्यांना कोणत्याच निवडणुका जिंकू देत नाही. मराठा आरक्षणाची समस्या मार्गी लागणार हे कुणीही सांगू शकत नाही. कारण महाराष्ट्रावर राज्य करायचे असेल तर भापला मराठा-ओबीसीला कोणत्याही परिस्थितीत येऊ द्यायचे नाही. जर कधी परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसली तर महाराष्ट्राचे आतापर्यंत राजकीय स्तरावर जसे विभाजन केले आहे तसे उद्या गरज पडली तर मुंबईला वेगळे करून त्यास केंद्रशासित प्रदेश बनवले तर मुंबईवर संपूर्ण ताबा तसेच महाराष्ट्रावर ते बहुजन समाजाद्वारे राजकीय सत्तेवर मराठा बसतील. आरक्षण आरक्षण करीत पटोले यांनी जी खंत व्यक्त केली ती आधीच करायची होती. सर्व काही हातातून निघून गेल्यावर ...होश में आये तो क्या हुआ.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.:982012120
Post a Comment