(८९) ...,. आणि या लोकांवर साक्ष देण्यासाठी आम्ही तुम्हाला समोर आणू आणि (ही त्याच साक्षीची तयारी आहे की) आम्ही हा ग्रंथ तुमच्यावर उतरविला आहे जो प्रत्येक गोष्टीचा अगदी स्पष्टपणे खुलासा करणारा आहे आणि मार्गदर्शन, कृपा आणि खूशखबरी आहे त्या लोकांकरिता ज्यांनी आज्ञापालनार्थ मान तुकविली आहे.
(९०) अल्लाह न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो, तो तुम्हाला उपदेश करतो जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा.
(९१) अल्लाहचे करार पूर्ण करा जेव्हा तुम्ही त्याच्याशी एखादा करार केलेला असेल आणि आपल्या शपथा पक्क्या केल्यानंतर मोडून टाकू नका ज्याअर्थी तुम्ही अल्लाहला आपल्यावर साक्षीदार बनविले आहे. अल्लाहला तुमची सर्व कृत्ये माहीत आहेत. (९२) तुमची स्थिती त्या स्त्रीसारखी होऊ नये जिने स्वत:च परिश्रमपूर्वक सूत कातले आणि मग स्वत:च त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. तुम्ही आपल्या शपथांना आपसातील व्यवहारात लुबाडण्याचे शस्त्र बनविता की जेणेकरून एका समूहाने दुसर्या समूहापेक्षा जास्त लाभ उचलावा. वास्तविक पाहता अल्लाह या करार-मदारांद्वारे तुमची परीक्षा घेतो आणि निश्चितच तो कयामतच्या दिवशी तुमच्या तमाम मतभेदांची वास्तविकता तुमच्यावर उघड करील.
Post a Comment