गत शंभर वर्षांमध्ये एकही कवी अल्लाम्मा इकबाल यांच्यासारखा महान झालेला नाही आणि येत्या एक-दोन शतकात कुणी इकबालइतका महान कवी जन्माला येईल हे शक्य नाही. अल्लामा इकबाल यांनी खऱ्या अर्थाने आपला काव्यसंग्रह फारसी भाषेत केलेला आहे. त्यांचे बहमोल विचार, तत्त्वज्ञान, वाड़मय हे सर्वचे सर्व पर्शियन भाषेतच आहे. उर्दूमध्ये त्यांनी फक्त चार काव्यसंग्रह लिहिले आहेत. एक बाले-जिब्रेल, दुसरे बांगे-दरा, तिसरे अरमगान-ए-हिजाज आणि चौथे जबूरे अजम.
पर्शियन भाषेत त्यांनी दोन खंडांमध्ये जावेदनामा हा काव्यसंग्रह लिहिला आहे. हा काव्यसंग्रह आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. या काव्यसंग्रहातील एक भाग तासीने मुह्म्मद नावाचा आहे. जादेनामा खऱ्या अर्थाने कवी इकबाल यांनी आपल्या कल्पनेने अवकाशाची यात्रा केली होती. तिथे जगातल्या ज्या ज्या महान लोकांशी त्यांची भेट झाली त्यांच्याशी त्यांनी जी चर्चा केली त्याचा अहवाल आहे. अवकाशातील अशाच एके ठिकाणी इकबाल यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविषयी अबू जहल (प्रेषित मुहम्मद (स.) यांचा कट्टर विरोधक) याने जे काही वक्तव्य केले आहे त्याच्या थोड्याशा भागाच्या पर्शियन काव्याचे मराठीत भाषांतर इथे देत आहोत...
“अबू जहल म्हणतो की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींमुळे आपल्या छातीत आग लागली आहे. कारण त्यांनी आपल्या शिकवणींद्वारे आमच्या पूर्वापार चालत आलेल्या धर्माचा नाश झाला. त्यांनी जगातून सर्व सम्राटांचा खातमा केला. त्यांच्या शिकवणींमुळे तरुण पिढीने आपल्या पूर्वजांशी बंड केले. ते जादूगार आहेत. त्यांनी जो कलमा दिला तो तर खऱ्या अर्थाने खोटे आले. त्यांनी आपल्या धर्माच्या शिकवणींची आमच्या अराध्यांची निंदा केली आहे. त्यांनी लात आणि मनात यांचा विध्वंस केला. त्यांनी दृश्य देवीदेवतांच्या पुजेऐवजी अदृश्य ईश्वरीच्या उपासनेची शिकवण दिली. अदृश्य ईश्वराची श्रद्धा चुकीची आहे जो दिसत नाही. तो हजर कसा असू शकतो. जो ईश्वर आम्हाला दिसत नाही त्याच्यासमोर नतमस्तक होण्यात अर्थ काय?
“अबू जहल पुढे म्हणतो की प्रेषितांवर माझा आक्षेप आहे की त्यांनी असा धर्म सांगितला ज्याद्वारे वंशपरंपरा, जातीय व्यवस्था या सर्वांना समूळ नष्ट केले. इस्लाम अरब राष्ट्रे आणि कुरैश या दोन्हींना नाकारतो. त्यांच्या शिकवणींद्वारे गुलाम आणि मालक दोघे समान दर्जाचे आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) गुलामांना बरोबर घेऊन जेवण करत होते. यापेक्षा कोणती गोष्ट कष्ट देऊ शकते. अरबस्थानचे स्वतंत्र लोक आणि गुलाम असलेले बिलाल दोहोंना समान दर्जा दिला. रंगभेद नष्ट करुन काळ्या लोकांना गोऱ्या लोकांच्या बरोबरीने सन्मान दिला. म्हणजे त्यांना कुरैशसारख्या श्रेष्ठ कबिल्याची लक्तरे केली. समता आणि भाऊबंध ही अरबी सभ्यता नाही. प्रेषितांच्या शिकवणींद्वारे अरबस्थानच्या मोठमोठ्या व्यक्ती प्रभावित झाल्या आहेत.
“अबू जहल म्हणतो, हे लोक चुकीच्या मार्गावर आहेत. जहीर नदवाचा एक महान कवी जो मृत्यू पावला आहे त्याला हाक देऊन म्हणतो, तूच आम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि पवित्र कुरआनच्या शिकवणी नाहीशा करू शकतो.
“इतर कवींनाही अबू जहल विनंती करतो आणि नंतर संगे अस्वद (काबागृहातील काळ्या दगडाला) ला संबोधून म्हणतो की या यातनांपासून तूच आमची सुटका करू शकतो. हे हुबल (सर्वांत मोठी मूर्ती ज्यास अत्यंत अडचणीच्या समयी अरब लोक तिच्याकडे विनंती करत) ला संबोधून अबू जहल म्हणतो की काबागृहाला या लोकांपासून दूर ठेव. त्यांना नष्ट कर. त्यांचं जगणं कठीण कर. त्यांच्यावर संहारक वारा पाठव ज्यामुळे त्यांच्यावर खजुरीची झाडं पडतील आणि ते नष्ट होऊन जातील.
“हे लात आणि मनात तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही आमच्या हृदयांपासून दूर जाऊ शकत नाही. तुम्ही जाण्याचा निर्णय घेतलाच असेल तर थोडे दिवस तर आमच्याकडे थांबा.”
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment