Halloween Costume ideas 2015

अ‍ॅनिमल


आजकाल अ‍ॅनिमल या चित्रपटाची चोहिकडे चर्चा आहे. ही चर्चा ऐकूण माझा एक मित्र व त्याची पत्नी हा चित्रपट पहायला गेले. मध्येच पत्नी रडायला लागली म्हणून अर्धवट चित्रपट सोडून दोघे परत आले. माझ्या मित्राने या चित्रपटाचा दाहक अनुभव माझ्याशी शेअर केला. तेव्हा मी या चित्रपटासंबंधी अनेक रिव्हीव्यू पाहिले. संसदेत खा. रंजीत रंजन यांनी या चित्रपटासंबंधाने केलेले वक्तव्य पाहिले. शेवटी माझी खात्री झाली की हा एक फक्त चित्रपट नसून सामाजिक विकृती आहे, एक सामाजिक आजार आहे. म्हणून याची दखल घेणे अनाठायी होणार नाही. 

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. समाजामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्या चित्रपटातून प्रतिबिंबित होत असतात. जुन्या काळातले चित्रपट काही आशयघन तर काही निखळ मनोरंजनासाठी तयार केले जात. अलिकडे मात्र मनोरंजनाच्या नावाखाली मनोविकृतीचे नवनवीन आविष्कार चित्रपटातून दाखविले जात आहेत. अश्लिलता, अनैतिक संबंध, प्रेमाचे त्रिकोण-चौकोन तर सोडा समलैंगिक संबंधाचे सुद्धा उदात्तीकरण चित्रपटातून होत आहे. ओटीटी प्लेटफॉर्मवर तर सेन्सर बोर्डाचे सुद्धा नियंत्रण नाही. त्यामुळे पॉर्न सदृश्य देशी-विदेशी चित्रपटांचा महापूर या ठिकाणी पहायला मिळतो. 

तसे पाहता प्रत्येक चित्रपटात हिंसा आणि आक्षेपार्ह दृश्य असतातच. परंतु, ज्या स्तरावरची हिंसा आणि आक्षेपार्ह दृश्ये अ‍ॅनिमलमध्ये दाखविलेली आहेत ती अगदी पराकोटीची अशी आहेत. या चित्रपटात महिलेला दुय्यम स्थानच दिलेले नसून तिला गुलामासारखी वागणूक चित्रपटाचा नायक (अल्फामॅन अर्थात दबंग पुरूष) दोन महिलांना देताना दिसतो. ज्यात एक त्याची पत्नी. तिच्यावर तो केव्हाही शारीरिक अत्याचार करतो, हात पिरगळतो, गळा आवळतो. एवढेच नव्हे तर कानशिलावर पिस्तुल ठेवतो. दुसरी स्त्री जी त्याच्यावर  प्रेम करत असते (जिला मुद्दाम मुस्लिम नाव दिलेले आहे) तिला तो आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वतः बूट चाटण्याचा आदेश देतो. तीसरी गोष्ट म्हणजे शूर आणि परोपकारी शीख समाजाचे विकृत चित्रण या चित्रपटात केलेले आहे. एकंदरित हा चित्रपट आजारी मानसिकतेचे ठसठशीत उदाहरण आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने 700 कोटीची कमाई केलेली असून, कमाईचा आकडा दिवसेंदिवस फुगतच आहे. हा चित्रपट सेन्सर बोर्डाने पासच कसा केला याचेच आश्चर्य वाटते. खरे तर हा चित्रपट तात्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात यायला हवा. मात्र उलटेच होत आहे. अ‍ॅनिमल पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडत आहेत. चित्रपटाच्या कन्टेटपेक्षा त्याला समाजात मिळत असलेली स्वीकृती अधिक चिंताजनक आहे. 

चित्रपटाचा परिणाम होत नाही

या चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा एक वादग्रस्त व्यक्ती असून, त्याने यापूर्वीसुद्धा कबीर सिंग नावाच्या चित्रपटातून अशाच अल्फा मॅनला सिल्व्हर स्क्रीनवर साकारले होते. ज्यात नायक लिंगपिसाट दाखविलेला असून, नायिका आणि ईतरांवर शारीरिक आणि अत्याचार अशा पद्धतीने करतो की, जणू त्याच्या संपर्कात आलेल्या स्त्रीया ह्या त्याच्या गुलाम आहेत. एका मुलाखतीत वागावं यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, स्त्री पुरूषांच्या प्रेमामध्ये एकमेकांना मारहाण करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर ते प्रेम कसले? त्याचा असा स्पष्ट दावा आहे की, चित्रपटांना एक मनोरंजन मुल्य असते. चित्रपटाचा माणसावर कसलाच परिणाम होत नाही. त्याने एका महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट सांगितले आहेकी, ’मी आणि माझा भाऊ गँगस्टरवर आधारित चित्रपट पहात मोठे झालो. तर आम्ही काही गँगस्टर झालो का? चित्रपटाचा खरच परिणाम होत असता तर आम्ही गँगस्टर व्हायला हवे होते. सकृतदर्शनी त्याचा तर्क बरोबर जरी वाटत असला तरी तो फसवा आहे. कुठलाही माणूस एखाद दोन चित्रपट पाहून गँगस्टर होत नाही किंवा रेपिस्ट होत नाही. मात्र सातत्याने अशाच प्रकारचे चित्रपट पाहत राहिल्यास व त्याला समाजात पूरक वातावरण असल्यास अशी माणसं गँगस्टरच काय त्यापेक्षाही पुढचे गुन्हे करू शकतात. संदीप वांगा यांच्या तर्काला दुसर्या तर्काने असे उत्तर देता येईल की, दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होते. पण जर कोणी म्हणत असेल मी तर आज दाबून दारू ढोसली आहे पहा माझं लिव्हर कुठं खराब झाले? एकदा दारू पिल्याने लिव्हर खराब होत नाही. पण जसे रोज दारू पिल्याने एक दिवस नक्कीच लिव्हर खराब होते. तसेच अशी चित्रपटे सतत  पाहिल्याने माणसामध्ये विकृती निर्माण होते. विशेषकरून पौगंडावस्थेतील मुलं अशा विकृतीला बळी पडतात. 3 तास 21 मिनिटाच्या या लांबलचक चित्रपटात नायक अनेक लोकांची हत्या करतो. पण त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. पोलिस त्याला अटक करत नाहीत. यावरून पौगंडावस्थेतील तरूण सुद्धा अशी हिंसा करण्याचं धाडस करू शकतात. अशी हिंसा केल्याने पोलिस सोडत नाहीत हे त्यांच्या लक्षातच येणार नाही. 

निर्भयाच्या घटनेपासून आपल्या देशात सामुहिक बलात्कारासंबंधी जी चेतना जनतेमध्ये निर्माण झाली होती ती अल्पावधीतच शांत झाली. आता फक्त बळी हिंदू व बलात्कारी मुसलमान असेल तरच वातावरण तापतं अन्यथा नाही. सातत्याने अशी चित्रपटं पाहून समाजसुद्धा बधीर झालेला आहे. होणार का नाही? संगितामध्ये अश्लीलता (हनिसिंगची गाणी पहा), चित्रपटांमध्ये अश्लीलता, मालीकांमध्ये अश्लीलता मीडियामध्ये अश्लीलतेचे समर्थन. एकंदरित सर्व समाजच हिंसा आणि अश्लीलता पाहण्यासाठी सरावलेला आहे. असा समाज जेव्हा बनतो तेव्हा गुन्हेगारीला आपोआपच उत्तेजन मिळत असते. गुन्हेगारीसंबंधी भाष्य करताना आंतरराष्ट्रीय किर्तीचे सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, असा प्रत्येक गुन्हा जो समाजाच्या इच्छेनुसार केला जातो किंवा ज्यासाठी त्याला समाजाची इच्छा आणि पसंती मिळते तो राष्ट्रीय गुन्हा आहे. असा गुन्हा जरी एकच माणूस करत असला तरी त्याची शिक्षा सर्व समाजाला मिळते. ज्याप्रकारचे गुन्हे समाज स्विकारतो ते गुन्हे राष्ट्रीय गुन्हे होत. (संदर्भ : तफहिमुल कुरआन खंड 2 पान क्र. 54, परिच्छेद क्र.61)

एका ट्विटर हँडलवर अ‍ॅनिमल संबंधी फार मार्मिक असे निवेदन केलेले आहे ते म्हणजे, अ‍ॅनिमल इज अ फिल्म बाय अ‍ॅनिमल फॉर अ‍ॅनिमल अँड फ्रॉम अ‍ॅनिमल तीन सैतानी शक्ती माणसासोबत सतत सावलीसारख्या असतात. याबद्दल सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात की, तीन सैतानी शक्तीयाँ हैं जिनकी त्रिभुजा आज दुनियापर छायी हुई है और तीनों एक जहान्नुम तयार करने में व्यस्त हैं. अश्लील साहित्य जो आश्चर्यजनक गती और बहोत ही बेशर्मीसे बढता चला जा रहा है. गतीशील तस्वीरें (क्लिप्स) जो वासनात्मक प्रेम की भावनाओं को ना सिर्फ भडकाती हैं बल्के उन भावनाओं को व्यवहारिक स्तर पर लाने की शिक्षा भी देती हैं. औरतों का गिरा हुआ नैतिक स्तर जो उनके पहेनावे और कभी कभी उनकी नग्नता के बढते इस्तेमाल और मर्दों के साथ उनके मर्यादाओं से मुक्त मेलजोल की शक्ल में जाहीर होता है. ये वो तीन चीजें हैं जो शैतानी हैं और हमारे समाज में बढती जा रही है. और इनका नतीजा ख्रिश्चन सभ्यता की तबाही और मुल्यों की गिरावट के रूप में सामने आया है अगर इनको न रोका गया तो हमारा इतिहास भी रोम और ख्रिश्चन कौमों जैसा होगा जिनको यही नफ्सपरस्ती, मौजमस्ती, शराब औरतों के नाच, रंग, रासलीला सहीत विनाश के घाट उतार चुका है. (संदर्भ : पुस्तक परदा, पान क्र.83).

पुरूषांच्या अल्फामेल चरित्राला साधारणतः भारतीय समाजाची सुद्धा मान्यताप्राप्त आहे.  बलात्कार करणार्या पुरूषांच्या समर्थनामध्ये, लडकों से गलती हो जाती है सारखे वाक्य मुलायमसिंग यादव सारखा नेता जेव्हा उच्चारतो तेव्हा लक्षात येतं की, समाजाच्या सबकॉन्शीयस माईंडमध्ये काय चाललेलं आहे. 

अ‍ॅनिमलला जी समाजमान्यता मिळाली तीच समाजमान्यता त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या सॅम मानिकशॉ जो की खरा अल्फामेल फिल्म मार्शल होता, त्याला मिळाली नाही. यावरूनच समाजाची अभिरूची किती हीन झालेली आहे याचा अंदाज येतो. असा अभिरूचीहीन समाज उध्वस्त होण्याच्या मार्गावर लागलेला असतो. अशा समाजाबद्दल भाष्य करताना सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात,  जो कौमें तबाही की ओर जा रही हैं उनके हालात भी देख लीजिए. वो अपनी वासनाओं को आर्ट, ललित साहित्य और सौंदर्यप्रियता जैसे कितनेही सुंदर नाम दे लें मगर नाम बदलजानेसे हकीकत नहीं बदला करती. ये क्या चीज है के समाज मे औरतों को औरतों से ज्यादा मर्द की संगती और मर्दों को मर्दों से ज्यादा औरतों का साथ पसंद है? ये क्यूं है के औरतों और मर्दों में साज सज्जा और बनने संवरने की ऋची बढती चली जा रही है? इसका क्या कारण है की, मर्दों और औरतों की मिली जुली सोसायटी में औरत का जिस्म लिबास से बाहर निकल पडता है? वो कौनसी चीज है जिसकी वजह से औरत अपने जिस्म के एक एक हिस्से को खोलखोलकर पेश कर रही है और मर्दों की ओर से, कुछ और का तकाजा है? इसकी क्या वजह है के नंगी तस्वीरें, नंगी प्रतीमाएं, नंगे नाच सबसे ज्यादा पसंद किए जाते हैं? इसकी क्या वजह है के सीनेमा में उस वक्त तक मजा ही नहीं आता जब तक इश्क की चाशनी ना हो और उसपर यौनाचार व यौन संंबंधों की बहोत सी बातें और क्रियाएं बढा न दी जाएं? ये और ऐसे बहोत से दृश्य अगर अमर्याद कामवासना जाहीर नहीं करते तो क्या करते? जिस संस्कृती में ऐसा असंतुलित कामुक वातावरण पैदा हो जाए उसका अंजाम तबाही के सिवा और क्या हो सकता है? (संदर्भ : परदा पेज नं.115)

मुस्लिमांची जबाबदारी

सर्व इस्लामी विद्वान ज्या प्रेषित वचनावर एकमत आहेत व जिचा उल्लेख मुस्लिम या हदीस संग्रहामध्ये केलेला आहे त्यात प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी असे म्हटलेले आहे की, तुम में से जो शख्स कोई बुराई देखे वो उसे अपने हाथ से रोक दे, अगर वो इसकी ताकत नहीं रखता तो फिर अपनी जबान से रोके, अगर वो इसकी भी ताकत नहीं रखता तो फिर उसे अपने दिल में बुरा जाने और ये इमान का कमतर दर्जा है.

अर्थात या प्रेषित वचनाप्रमाणे मुस्लिम समाजाचे तीन वर्ग करण्यात आलेले आहेत. भारतात 20 कोटी मुसलमान राहतात. त्यांच्या आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी पसरलेल्या आहेत त्यांना दूर करण्याची त्यांची जबाबदारी आहे. प्रथम श्रेणीचे मुस्लिम ते आहेत जे या वाईट गोष्टींना स्वतःच्या शक्तीने रोखतात. दुसर्या श्रेणीचे मुसलमान ते आहेत जे या वाईट गोष्टींना आपल्या वाणी किंवा लेखणीने रोखतात. तिसर्या श्रेणीचे मुसलमान ते आहेत जे आपल्यात वरील दोन्ही शक्ती नसल्यामुळे मनात वाईट वाटून घेतात. पण ह्या तीन वर्गात मोडणारे मुसलमान किती आहेत? बहुसंख्य मुसलमान तर या तिन्ही वर्गामध्ये येत नाहीत. ते तर चौथ्या वर्गात आहेत. म्हणजे मुसलमान असूनसुद्धा ते स्वतःच वाईट गोष्टींमध्ये लिप्त आहेत. युसूफखान (दिलीपकुमार) पासून शाहरूख खानपर्यंत, नर्गीसपासून तब्बू (तब्बसूम हाश्मी) पर्यंत शेकडो मुसलमान हिंदी चित्रपटांमधून वाईट गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करतांना व अनेक मुसलमान पैसे देऊन त्यांची चित्रपटं पाहतांना दिसून येतात. रमजानचा महिना संपल्याबरोबर ईदच्या दिवशी खास ईद का तोहफा म्हणून सलमान खानचे हिंसक आणि अश्लील चित्रपट दरवर्षी रिलीज होत असतात आणि अनेक मुसलमान ईदगाहवर नमाज केली की सरळ चित्रपटगृहात जातात आणि तो चित्रपट पाहतात. चित्रपटांची गोष्ट सोडा अशी कोणती वाईट गोष्ट आहे ज्यात मुसलमान लिप्त नाहीत. दारू, जुगार, वेश्यावृत्ती, अन्याय, अत्याचार, घरेलू हिंसाचार व इतर फौजदारी गुन्हे सर्वात मुसलमान आघाडीवर आहेत. याचे एकमेव कारण भारतातील बहुसंख्य मुसलमानांचा कुरआनशी व्यावहारिक संबंध तुटलेला आहे. जोपर्यंत तो बहाल होत नाही तोपर्यंत मुस्लिम समाज हा वाईट गोष्टींच्या विरूद्ध कुठलीही कारवाई करण्यासाठी पात्र होणार नाहीत. अ‍ॅनिमल चित्रपटाच्या निमित्ताने मी सर्व भारतीय समाज विशेष करून ज्यांना आपल्या देशाची व समाजाची काळजी आहे त्यांना व त्याहून ही अधिक विशेषकरून मुस्लिम समाज, ज्यांच्यावर वाईट गोष्टींविरूद्ध लढण्याची राष्ट्रीय आणि धार्मिक अशी दुहेरी जबाबदारी आहे यांना विनंती करतो की त्यांनी तरी किमान या अ‍ॅनिमल प्रवृत्तीपासून दूर रहावे. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की,  ऐ अल्लाह ! आम्हाला स्वतःला कुरआनप्रमाणे नैतिक वर्तन करण्याची व आपल्या देशबांधवांना नैतिकतेडे  बोलावण्याची शक्ती प्रदान कर. आमीन.


- एम. आय. शेख

लातूर

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget