मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही आणि तो सुटेल याची शाश्वती नाही. मुळात हा प्रश्नच राज्याच्या मराठा माणसांमध्ये तेढ निर्माण करून भारतात एका सर्वार्थाने अग्रेसर राज्याला मागास करणे आणि इथल्या पारंपरिक स्थितीवर देशभर मराठा अंपायर उभे करणारे मराठा आज नोकरीसाठी आरक्षणाची मागणी करत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट. कोणताही मानवी समूह आपल्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी आपला जीव पणाला लावतो, संघर्ष करतो, लढतो, तेव्हा अशा मानवी समूहाला लोकांमध्ये आदराचे स्थान प्राप्त होते. मागणाऱ्याला मग ते काहीही असो लोक सन्मान देत नाहीत. हे जग स्वतःच्या जीवावर कमवावे लागते याची जाणीव मराठा समाजाला व्हायला हवी. ते सत्ताधारीवर्गाचे असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या साऱ्या नागरिकांना मग ते कोणत्याही जातीसमूहाचे असोत, आपल्या बरोबरीने त्यांचा आदरसन्मान करत स्वतःबरोबर घेतले तर त्यांना भीकेपोटी दिलेल्या आरक्षणाची गरज राहणार नाही.
मराठ्यांनी आरक्षणाचा लढा सुरू केल्याने साऱ्या मराठा माणसामाणसांत एकमेकांविषयी वैर निर्माण झाल्याचे सध्या दिसून येत आहे. एकीकडे जरांगे-पाटील तर दुसरीकडे राज्याचे मंत्री छगन भुजबळ दोन्ही एकमेकांविरुद्ध टीका करत आहेत. ही टीका त्यांच्यामध्ये वैयक्तिक नसून ते टीकात्मक वैर बहुजन समाज आणि मराठा समाजात आहे. एकेकाळी शिवसेनेने आपला प्रमुख आधारस्तंभ भाजपाच्या दावणीला बांधला होता, आता बाकीच्या उरल्यासुरल्या बहुजनांना छगन भुजबळ भाजपच्या पदरात पाडत आहेत.
भाजपने अगोदर शिवसेनेत बंड घडवून सेनेला फोडले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला फोटले. यामागे केवळ पक्षापक्षांमध्ये फूट पाडून सत्ता हस्तगत करणे नव्हते तर मराठा समाजाकडून महाराष्ट्र हिसकावून घेणे हे लक्ष्य होते. ते लक्ष्य फक्त पक्ष फोडल्याने पूर्णत्वास पोहोचतेच असे नाही. म्हणून मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू करण्यात आले. भाजपला आरक्षणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून मराठी माणसाला हद्दपार करायचे आहे. इतकी समजदारी मराठा समाजाला व्हायला हवी. महाराष्ट्राची जनता संभ्रमात आहे. लोक विचारू लागले आहेत की महाराष्ट्र पेटवण्याची आरक्षणवादी आणि विरोधकांची इच्छा आहे का? अशा वेळी मराठा समाजाने आरक्षणाचा आग्रह सोडून देऊन राज्याचे नेतृत्व करावे. वेळ आधीच गेलेली आहे. जितकी लवकर याची जाणीव मराठी माणसाला होईल तितके चांगले. मराठ्यांना बरेच काही मिळाले आहे. साधनसंपत्ती, संस्था, राजकीय इछाशक्ती इ.. आपल्या या साधनांचा महाराष्ट्र शाबूत ठेवण्यासाठी वापर करावा. नसता गुलामगिरी तर आहेच. लोक फक्त वेळ पाहत आहेत. संधी आधीच त्यांना मिळालेली आहे. ती संधी हिसकावून घेतली तरच आपले राज्य वाचवाल नसता आरक्षण तर गेल्यातच जमा आहे. गुलामी पत्करू नका. महाराष्ट्र तसा पेटलेलाच आहे. ओबीसी विरुद्ध मराठे, आता धनगरांच्या आरक्षण आंदोलनात झालेली दगडफेक, हे वाढतच जाणार!
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक
मो. 9820121207
Post a Comment