एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाली आणि विचारले की आपल्या सेवकाला किती वेळा माफ करू? प्रेषितांनी त्यांना उत्तर दिले नाही ते मौन होते. त्या व्यक्तीने पुन्हा तोच प्रश्न विचारला, तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना उत्तर दिले, “दररोज ७० वेळा (माफ करत जा).” (ह. अब्दुल्लाह बिन उमर, तिर्मिजी)
एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) मस्जिदमध्ये एका उंच जागेवर उभे राहिले आणि आवाज दिला की, “हे लोकहो, तुम्ही तोंडाने तर श्रद्धेचा उच्चार केला, पण तुमच्या मनामध्ये ती पूर्णपणे उतरली नाही.” पुन्हा सांगितले, “मुस्लिमांना त्रास देऊ नका. त्यांना लाज वाटेल असे काही म्हणू नका, त्यांच्या गुप्त उणिवांच्या मागे लागू नका. तसे केल्यास अल्लाह स्वतः अशा व्यक्तीच्या उणिवांच्या मागे लागेल आणि ज्याच्या उणिवांमागे अल्लाह लागेल अल्लाह अशा माणसाला लाजिरवाणे करून टाकील जरी तो आपल्या घरीच बसून राहिला तरीदेखील.” (ह. इब्ने उमर (र.), तिर्मिजी)
ह. अबू जर (र.) म्हणतात, मला माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांनी सात गोष्टींची ताकीद दिली आहे. त्यांनी मला निराधार आणि गरिबांवर प्रेम करण्याची आज्ञा दिली आहे आणि त्यांनी मला म्हटले आहे की मी अशा लोकांवर नजर ठेवावी जे माझ्यापेक्षा खालच्या स्तराचे आहेत. आणि अशा लोकांकडे पाहू नये जे माझ्यापेक्षा प्रतिष्ठित आहेत. आणि मला आज्ञा दिली की मी आपल्या नातेवाईकांशी कृपेचा व्यवहार करावा आणि त्यांच्याबरोबर असलेले नाते जोडून ठेवावे जरी त्यांनी माझ्याशी असा व्यवहार नाही केला तरीदेखील. तसेच मला आज्ञा दिली गेली आहे की मी कुणाशी काहीही मागू नये आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मी सत्य आहे तेच बोलावे जरी ते कितीही कटू असले तरी. आणि मला असे म्हटले गेले आहे की अल्लाहच्या संदर्भात मी कुणाच्या निंदानालस्तीला भिऊ नये. आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मी नेहमी वाचन करत राहावे. (अल्लाहच्या मदतीशिवाय परिस्थितीत बदल होऊ शकत नाही आणि सामर्थ्यदेखील प्राप्त होत नाही). या सर्व गोष्टी उशीखाली असलेल्या खजिन्यामधील आहेत.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment