(८२) आता जर हे लोक विमुख होत असतील तर हे पैगंबर (स.)! तुमच्यावर सत्याचा संदेश स्पष्टपणे पोहचवण्याखेरीज इतर कोणतीच जबाबदारी नाही.
(८३) हे अल्लाहचे उपकार ओळखतात, मग त्याचा इन्कार करतात आणि यांच्यातील बहुतेक लोक असे आहेत जो सत्य स्वीकारण्यास तयार नाहीत.
(८४) (यांना याचे काही भान तरी आहे की त्या दिवशी काय दशा होईल?) जेव्हा आम्ही प्रत्येक जनसमुदायातून एक साक्षीदार उभा करू, मग इन्कार करणार्यांना वाद घालण्यास संधी दिली जाणार नाही२५ व त्यांच्याकडून पश्चात्ताप व क्षमायाचनेची मागणीदेखील केली जाणार नाही.
(८५) अत्याचारी लोक जेव्हा एकदा शिक्षा पाहतील तर त्यानंतर त्यांच्या शिक्षेत कपात केली जाणार नाही आणि त्यांना एका क्षणाची सवडदेखील दिली जाणार नाही.
२५) त्यांना आपली बाजू मांडण्याची परवानगी दिली जाणार नाही असा अर्थ नव्हे तर अर्थ असा की त्यांना आपली बाजू मांडण्यास जागाच राहणार नाही, अशा अगदी स्पष्ट आणि अखंडनीय व नि:संदिग्ध साक्षीद्वारे त्यांचे अपराध शाबीत केले जातील.
Post a Comment