Halloween Costume ideas 2015

किसिंजरच्या शटल डिप्लोमॅसीचे बळी अरब राष्ट्रे


मयत अमेरिकन परराष्ट्रमंत्री डॉ. हेनरी किसिंजर यांनी १९७८ मध्ये इजिप्त आणि इस्रायलमध्ये एक ऐतिहासिक करार घडवून आणला होता. तो करार ‘कॅम्प डेविड पीस अकॉर्डस १९७८’ या नावाने ओळखला जातो. पण खऱ्या अर्थाने तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी स्वतः या कराराची सुरुवात केली होती. करार अंमलात आणण्यासाठी मात्र हेनरी किसिंजर यांनी एक वेगळ्याच प्रकारची राजकीय रणनीती अवलंबली होती. त्याला ‘शटल डिप्लोमॅसी’ म्हटले जाते. १९७३ मध्ये जेव्हा इजिप्तने इस्रायलवर हल्ला केला त्या वेळी इस्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगीन आणि अमेरिकन राज्यकर्त्यांना इस्रायलच्या सुरक्षेची चिंता वाढली. त्या वेळी हे प्रकरण स्वतः आपल्या हाती घेऊन हेनरी किसिंजर इस्रायल आणि इजिप्त देशांमध्ये सतत ये-जा करीत होते. कोणत्या राजकीय प्रोटोकॉलची चिंता न करता किंवा दैनंदिन माध्यमांशी बोलत फक्त इस्रायल आणि इजिप्त यांच्या दरम्यान फेऱ्या मारून या दोन्ही देशांच्या नेत्यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांच्या इच्छेनुसार आपसात करार करण्यास राजी केले. हा करार अमेरिकेतील कॅम्प डेविड येथे १७ सप्टेंबर १९७८ रोजी संपन्न झाला. आणि म्हणून ‘कॅम्प डेविड करार १९७८’ असे म्हटले जाते. हा करार इतका महत्त्वाचा ठरला की पुढे जाऊन एकूणच अरब राष्ट्रांच्या इस्रायलविषयीच्या राजकीय पॉलिसीमध्ये आमूलाग्र बदल झाला. कालपर्यंत जे देश इस्रायलला मान्यता देण्यास नव्हे तर त्या देशाच्या अस्तित्वाला स्वीकारत नव्हते त्यांनी १९४७ ला पॅलेस्टाईनची फाळणी करून इस्रायलच्या निर्मितीला मान्यता दिली. फेज मोरोक्को स्थित पीएलओचे अध्यक्ष यासिर अरफात यानी स्वतः ९ सप्टेंबर १९८२ रोजी ही घोषणा केली की अरबांनी एकत्रितपणे असा ठराव मांडला आहे की ते इस्रायल राष्ट्राला मान्यता देतील. हा करार अंशतः सऊदी अरेबियाचे तत्कालीन अध्यक्ष किंग फहद यांनी आखलेल्या इस्रायल-पॅलेस्टाईन बाबतच्या धोरणावर आधारित होता. 

९ सप्टेंबर १९९२ रोजीच्या मोरोक्कोमधील सर्व अरब राष्ट्रांच्या एका बैठकीत इस्रायलला मान्यता देण्यात आली. अरब राष्ट्रांनी इस्रायलला मान्यता देण्याच्या निर्णयामागे किसिंजर-कार्टर यांनी अरब राष्ट्रांमधून इजिप्त वेगळे करून शटल डिप्लोमॅसीद्वारे घडवून आणलेला कॅम्प डेविड करार होता. अरबांना हे कळून चुकले की इजिप्तची साथ मिळाली नाही तर इस्रायलशी युद्ध करणे अवघड होईल. म्हणून अरफात आणि अरबांनी मिळून इस्रायलला मान्यता दिली. पुढे त्याच कराराच्या धरतीवर अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनीही पॅलेस्टाईन-इस्रायल समस्येकडे पाहिले, तर आज अरब राष्ट्रांनी इस्रायलविषयी जे धोरण अवलंबिलेले आहे त्याची मुळे १९७८ च्या किसिंजर-कार्टर करारात आहेत. म्हणून त्याच्या शटल डिप्लोमॅसीचे बळी अरब राष्ट्रे आहेत.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: 9820121207


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget