उन्हात तडफडून एक पक्षी मरणाच्या वाटेवर होता. त्याला उचलून पाणी पाजले, घरी घेऊन आलो. पक्षाला थोडा आराम मिळाल्यावर दाणे टाकले. नंतर त्याला आकाशात भरारी घेण्यासाठी सोडून दिले आणि मोकळे झालो. वाटले किती पुण्याचे काम केले. पण खरंच एवढे करून पुण्य लाभले का? या घटनेच्या मुळाशी जाऊन विचार केल्यास लक्षात आले की माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा किती ऱ्हास करत चालला आहे. त्याच्या परिणामस्वरूप उन्हाची तीव्रता आणि तापमानात किती वाढ होत चालली आहे. सुर्याची किरणे एवढी तीक्ष्ण होत चालली आहेत की ते सहन करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
खरं पाहिले तर पृथ्वीला उब पोहोचवणे हे सुर्याचे कामच आहे. आलेली किरणे पुर्णपणे परत न जाता काही प्रमाणात जमिनीवर थांबवली जातात. यासाठी हरितगृह वायू (ॠीशशपर्हेीीश ॠरीशी) मदत करतात. पण हे हरितगृह वायू एका मर्यादेपर्यंत असणे आवश्यक आहे. कारण त्यांनी आपली मर्यादा ओलांडली तर सुर्यकिरणे जास्त प्रमाणात रोखली जातील आणि परिणामी तापमानात वाढ होईल.
मागच्या काही दशकांत पर्यावरणाशी मानवाच्या दुर्व्यवहारामुळे हे हरितगृह वायू वाढत आहेत. याची कारणे बघितली तर मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, मोटार वाहनांच्या संख्येत आणि वापरात वाढ, झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, ओझोन पट्ट्याची जाडी कमी होणे, रासायनिक शेतीमुळे वातावरणात बदल होत आहेत आणि पर्यायाने जागतिक तापमानवाढ (ॠश्रेलरश्रुरीाळपस) होत आहे. याचे परिणाम बघीतले तर, जगभरातील बर्फ वितळण्याच्या बातम्या वारंवार बघायला मिळत आहेत. अतिउष्ण परिस्थितीत जीवंत राहणाऱ्या अतिसूक्ष्मजीवांमुळे नवनवीन आणि वेगाने पसरणारे रोग तापमानवाढीच्या वातावरणात उदयास येत आहेत. जगभरातील अनेक ठिकाणी अधिक तीव्र वादळे येत आहेत. डोडो बदकासारख्या कित्येक प्रजाती नष्ट होत आहेत. जमीनीची धूप होऊन जमीन वाळवंटात रूपांतरीत होत आहे आणि म्हणूनच यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ’ङरपवीशीीेींरींळेप, वशीशीींळषळलरींळेप रपव र्वीेीसहीींशीळश्रळशपलश’ आहे. याचा संबंध मृदा प्रदुषणाशी आहे ज्यामध्ये प्रदुषणामुळे जी जमीन नापीक झाली आहे, ज्या जमीनीचे वाळवंटात रूपांतर झाले आहे किंवा दुष्काळाची लवचिकता वाढली असेल अशा जमिनीचे पुनरसंचयन करणे यात समाविष्ट आहे.
2021 च्या फिजियोलॉजी अहवालात प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार वातावरणीय तापमान श्रेणी ज्यामध्ये मानवी शरीर हे 104-122ओ फॅरेनहाइट किंवा 40-50ओ सेल्शीअस च्या दरम्यान त्याचे तापमान आणि समतोल प्रभावीपणे राखू शकते. एकदा हवेचे तापमान 122 अंशांवर गेले की आपले शरीर यापुढे उष्णता नष्ट करू शकत नाही आणि आपले कोर तापमान वाढते. परिणामी शरिरातील प्रथिने आणि इतर मुलद्रव्यांचा नाश होतो.
जरी संपूर्ण ग्रहावर तापमानवाढ एकसमान नसली तरी, जागतिक पातळीवरील सरासरी तापमानातील वरचा कल दर्शवितो की थंड होण्यापेक्षा जास्त क्षेत्रे तापमानवाढ करत आहेत. राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासन छज-- च्या 2023 च्या वार्षिक हवामान अहवालानुसार 1850 पासून प्रति दशक सरासरी 0.11ओ फॅरेनहाइट म्हणजे 0.06ओ सेल्सिअस दराने जमीन आणि समुद्राचे एकत्रित तापमान वाढले आहे. 1982 पासून तापमानवाढीचा दर तिप्पट वेगाने वाढला आहे तो म्हणजे 0.36ओ फॅ (0.20ओ सेल्सिअस) प्रति दशक. हे जर असेच चालू राहिले तर महाप्रलय म्हणजे कयामत यायला वेळ लागणार नाही. सध्या, सूर्य आपल्यापासून लाखो मैल दूर आहे तरीही त्याची उष्णता माणसाला असह्य होत आहे. कयामतच्या दिवशी जेव्हा सुर्य पृथ्वीपासून केवळ एक मैल दूर असेल तेव्हा काय होईल? मिश्कात अल्-मसाबिह या हदीसग्रंथाच्या हदीस क्र. 5453 नुसार कयामतच्या दिवशी सुर्य पृथ्वीपासून केवळ एक मैल दूर असेल.
जागतिक तापमानवाढीवर एकमेव उपाय जर कोणता असेल तर तो म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण. ज्यामुळे हरीतगृह वायू आटोक्यात येतील. पाऊस जास्त आणि वेळेवर पडेल. जैवविविधता टिकेल आणि पर्यायाने जागतिक तापमानवाढ होणार नाही. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्वांची मानसिकता झाड लावण्याची असेल. एका हदीसमध्ये आहे की, तुमच्या हातात एक रोप आहे आणि कयामत येऊन ठेपली आहे, तरी ते रोप लावून टाका. म्हणजे, वृक्षारोपण करणाऱ्याने अजिबात हा विचार करू नये की आता तर कयामतचा दिवस आलेला आहे, हे जग आता नष्ट होणार आहे. या रोपाचे झाडात रूपांतर कधी होईल? आणि त्याचा फायदा कोणाला व कसा होईल? हा विचार न करता माणसाने आपले कर्तव्य पार पाडावे हाच आदेश या हदीसवरून स्पष्ट होतो, आणि यावरून वृक्षारोपणाचे महत्त्व लक्षात येते. हरीत भविष्याकडे वाटचाल करून जागतिक तापमानवाढ रोखुया आणि पशु पक्षांसमवेत मानवजातीचे कल्याण करून पुण्य कमावण्याची जी संधी आपल्या पिढीला मिळाली आहे त्या संधीचे सोने करूया, हीच या पर्यावरण दिनी सदिच्छा.
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. : 7507153106
Post a Comment