Halloween Costume ideas 2015

कंजूसपणा : प्रेषितवाणी (हदीस)


कंजूसपणा मुळात अनैतिकता आहे. म्हणजे अशी अनैतिकता जी बऱ्यापैकी मूलभूत अनैतिकतेचे मूळ आहे. निर्दयीपणा,  धोका देणे तसेच कठोरपणा, लालसा, संकुचित दृष्टिकोन, दौर्बल्य आणि इतर बऱ्याच काही वाईट गोष्टींचे मूळ कंजूसपणा आहे. इस्लामचा उदय झाल्यावर सर्वप्रथम खोटे बोलणे, खोटे आचारविचार यांना लक्ष्य करण्यात आले. आणि उपाशी लोकांना जेवू घालणे, ज्याच्याकडे कपडे नाहीत त्यांच्या वस्त्रांची व्यवस्था करणे, वंचितांची सहायता करणे, अनाथांची आर्थिक मदत करणे ह्या सर्व गोष्टी मुस्लिमांवर अनिवार्य केल्या गेल्या. जकातची व्यवस्था केली गेली जे नमाजनंतर दुसरे अनिवार्य कर्तव्य आहे.

जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सर्वप्रथम ह. जिब्राईल यांच्या आगमनाविषयी आपल्या पत्नी ह. खदीजा (र.) यांना सविस्तर अहवाल सांगितला तेव्हा ह. खदीजा (र.) यांनी प्रेषितांना सांगितले होते की “आपण नातलगांना अधिकार देता, जे कर्जबाजारी आहेत त्यांच्या कर्जांची परतफेडृ करता, गोरगरीबांना आर्थिक मदत करता, पाहुणचार करता आणि सत्याधिष्ठित लोकांना समस्यांचा सामना करावा लागला असता त्यांची मदत करता. (आपणास काहीही गैर होणार नाही.)” (सहीह बुखारी)

थोडा विचार केल्यास असे लक्षात येईल की सर्व प्रेषितांमध्ये प्राथमिक गोष्ट म्हणजे कोणतेही प्रेषित कंजूस असू शकत नाहीत.

कंजूसपणा एक असा आजार आहे ज्याबद्दल वास्तविकपणे आपल्याकडून होणाऱ्या चुकांची आपल्याला कधीच शिक्षा मिळणार नाही, अशी समजूत करून घेणे आहे. कारण ज्याला आपल्या कर्माविषयी ही खात्री असत नाही की चांगल्या कर्मांचा त्याला मोबदला मिळणार आहे आणि वाईट कर्मांची शिक्षा मिळणार आहे, याची त्याला खात्री नसते. पवित्र कुरआनातील एका अध्यायात असे म्हटले गेले आहे की जेव्हा नरकातील लोकांशी असे विचारले जाईल की त्यांना नरकात का बरे पाठवण्यात आले आहे? ते उत्तर देतील की आम्ही नमाजचे पठण करीत नव्हतो, गरिबांना जेवू घालत नव्हतो, जे धर्माचा विरोध करीत होते त्यांच्याबरोबर आम्ही धर्मावर टीका करत होतो. हे सर्व करण्यामागचे कारण असे होते की आम्हाला आमच्या नेक आणि कुकर्मांचा मोबदला दिला जाणार आहे यावर आमचा विश्वास नव्हता.

(सीरतुन्नबी – शिबली नोमानी / सय्यद सुलेमान नदवी, खंड ६)

- संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget