इस्लामी इतिहासाच्या सुवर्ण काळामध्ये महिलांनी आपली खरी जबाबदारी म्हणजे घरेलू जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपना सोबत इस्लामी शिक्षण प्रशिक्षणाच्या जबाबदाऱ्या खुबीने सांभाळल्या. विशेष करून लेखन आणि प्रकाशनाच्या क्षेत्रात त्यांची कामगिरी दैदिप्यमान अशी होती. धार्मिक शिक्षणाचे मैदानही अपवाद नव्हते. त्यांनी धार्मिक शिक्षण दिले. शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यांचे संरक्षण केले. शैक्षणिक सेवेसाठी तज्ज्ञ लोक तयार केले. त्यासाठी आपली संपत्ती खर्च केली. थोडक्यात मुस्लिम समाज कधीच त्यांची ही सेवा विसरू शकणार नाही.
हदीसचे क्षेत्र विस्तृत क्षेत्र असून, प्रेषित सल्ल. यांच्या हदीसचे अनेक ग्रंथ तयार करण्यात आले आहेत. हदीसचे शिक्षण देण्यासाठी अनेक उलेमांनी आपले जीवन खर्ची घातले आहे. आनंद आणि संतोषाची गोष्ट म्हणजे या मैदानामध्ये महिला सुद्धा अग्रगण्य राहिलेल्या आहेत. त्यांनी अनेक हदीस तज्ज्ञांकडून शिक्षण घेतले आणि सामान्य लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचविले. हदीसच्या संग्रहांपैकी सर्वात महत्त्वाचे संग्रह म्हणजे बुखारी असून, मोठ्या संख्येने महिलांनी या पुस्तकात रस घेतलेला आहे. तसेच यात प्राविण्य प्राप्त केलेले आहे. विशेष करून डॉ. मुहम्मद बिन अजीज यांचे एक पुस्तक वाचण्याचा योग आला. ज्याचे नाव सफहात मुशरकत मन अनायतुल मर्राह बसही अल इमाम अल बुखारी असून, हे पुस्तक 387 पानाचे आहे. याचे प्रकाशन दार इब्ने हजम बैरूत लेबनान येथून सन 2002 मध्ये झालेले आहे. या पुस्तकाचा खुलासा खालीलप्रमाणे आहे. 1. पालक आपल्या मुलांसोबत आपल्या मुलींनाही त्या काळात हदीस शिकविल्या जाणाऱ्या वर्गात पाठवत होते. 2. तज्ज्ञांकडून सही बुखारीमधील हदीस ऐकूण त्यांचे पठण करण्याची परवानगी अनेक महिलांना होती. 3. बुखारी हदीस संग्रहाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये फक्त महिलाच नव्हे तर पुरूषांचीही संख्या मोठी होती. म्हणूनच अनेक पुरूषांनी हदीसचे ज्ञान आपल्या महिला शिक्षिकांकडून प्राप्त केले होते. 4. महिलांनी फक्त हदीसचे संदर्भ आणि त्यांच्या शिकविण्यावरच लक्ष केंद्रीत केलेले आहे. हदीस लिहिण्यामध्ये आणि संग्रह करण्यामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. म्हणूनच बुखारी हदीस संग्रहाचे भाष्य लिहिण्यामध्ये कुठल्याही महिलेचा समावेश आढळून येत नाही. 5. प्रसिद्ध हदीसतज्ञ महिला शिक्षकांना अनेक मुस्लिम शासक आपल्या राज्यात आपल्या प्रजेला हदीसचे ज्ञान देण्यासाठी मोठ्या सन्मानाने आमंत्रित करीत होते.
डॉ. अजूज यांनी अनेक मनोरंजक उदाहरणे प्रस्तुत केलेली आहेत. ज्यात असे म्हटलेले आहे की, लोक आपल्या मुलींना हदीस शिकण्यासाठी पूर्ण संधी देत होते. डॉ. अजूज यांनी श्रेष्ठ महिला हदीस तज्ज्ञांचे विस्ताराने कथन केलेले आहे. ज्यांनी आपले सर्व आयुष्य हदीस संग्रह बुखारीच्या शिक्षणामध्ये व्यथित करून टाकल आहे.
- क्रमशः
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment