(५५) तुझा पालनकर्ता जमीन व आकाशांतील सृजनांना अधिक जाणतो. आम्ही काही पैगंबरांना काहींपेक्षा वरचढ दर्जे दिले. आणि आम्हीच दाऊद (अ.) ला ‘जबूर’ (ग्रंथ) दिला होता.
(५६) यांना सांगा, ‘‘पुकारून पाहा अल्लाह व्यतिरिक्त त्या ईश्वरांना ज्यांना तुम्ही (आपला कार्यसाधक) समजून आहात. ते कोणताही त्रास तुमच्यापासून दूरही करू शकत नाहीत अथवा बदलूदेखील शकत नाहीत.२७
(५७) ज्यांचा धावा हे लोक करतात ते तर स्वत:च आपल्या पालनकर्त्याच्या ठायी पोहचण्यासाठी वशिला शोधत आहेत की कोण त्याच्या अधिक जवळचा होतो आणि ते त्याच्या कृपेचे इच्छुक आणि त्याच्या प्रकोपापासून भयभीत आहेत.२८ वास्तव असे आहे की तुझ्या पालनकर्त्याचा प्रकोप आहेच भीतीदायक.
(५८) आणि कोणतीही वस्ती अशी नाही जिला आम्ही कयामतपूर्वी नष्ट करणार नाही अथवा भयंकर यातना देणार नाही, हे ईशलेखात नमूद केलेले आहे.
२७) केवळ अल्लाहशिवाय इतरांनाही सजदा करणे अनेकेश्वरोपासना आहे असे नाही तर अल्लाहशिवाय एखाद्या दुसर्या कोणाची प्रार्थना करणे किंवा त्याला मदतीसाठी पुकारणे हादेखील अनेकेश्वरत्व आहे, ही गोष्ट यावरून अगदी स्पष्टपणे कळते.
२८) हे शब्द अगदी स्पष्टपणे निदर्शनास आणत आहे की अनेकेश्वरवादींच्या ज्या ईश्वरांचा आणि फिर्याद ऐकणार्यांचा या ठिकाणी उल्लेख केला जात आहे, त्याच्याने दगडी मूर्ती अभिप्रेत आहेत असे नाही तर एकतर फरिश्ते आहेत किंवा गत काळातील प्रतिष्ठित माणसे आहेत.
Post a Comment