Halloween Costume ideas 2015

कुरआन आणि वनस्पतीशास्त्र (भाग २२)

घनदाट बागांचे गुढ


जैवविविधता ही जीवशास्त्राची खुप महत्वाची शाखा आहे आणि ती वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, भुगोल, परिसंस्था विज्ञान, इत्यादी विषयांत शिकविली जाते. वनस्पती विविध रंगांनी, आकारांनी, पानाफुलांनी निसर्गाची शोभा वाढवतात. वनस्पती आपल्या विविध रंगांनी आणि आकारांनी त्यांच्यामध्ये खुप विविधता आढळते. या विविधतेत असणारे फायदे मानव आपल्या गरजांनुरूप घेत असतो. जसे काही वनस्पतींच्या बिया धान्य म्हणून वापरल्या जातात, काही वनस्पती भाजीपाल्याच्या रूपात तर काहींचा उपयोग नैसर्गिक सौंदर्य असल्याने बागांमध्ये शोभेची झाडे म्हणून केला जातो. एकाच प्रकारचे उन, वारा, पाऊस मिळत असून वनस्पतींमध्ये असणारी ही विविधता विचार करणाऱ्यांसाठी फारच आश्चर्यकारक बाब आहे. कुरआनमध्ये अध्याय 'अन्-नबा'च्या आयत १५ आणि १६ मध्ये म्हटले आहे, "जेणेकरून त्याद्वारे धान्य व भाजीपाला आणि घनदाट बागा उगविल्या."

निसर्गकर्त्याकडून वर्षविला जाणारा पाऊस एकाच प्रकारचा असला तरी त्यापासून एकाच प्रकारच्या वनस्पती न उगवता कुठे धान्य, कुठे भाजीपाला तर कुठे घनदाट बागा उगवतात. प्रत्येक वनस्पतीचे आपले एक महत्त्व आहे. विरळ बागा तेवढ्या आकर्षित दिसत नाहीत. घनदाट असणाऱ्या बागा या एक तर कमी जागेत जास्त संख्येने असलेल्या वनस्पती असतात. दुसरे, बागा घनदाट होण्यासाठी एक एक झाड सुद्धा तेवढीच भुमिका निभावतात. पानांचा आकार, खोडावरील त्यांची उगवण्याची पद्धत (Phyllotaxy), कांडे आणि पेऱ्यांमधील अंतर या सर्व बाबी सुद्धा बागांना घनदाट होण्यास मदत करतात. खोडावरील पानांच्या उगवण्याच्या या पद्धतीमुळे झाड घनदाट तर दिसते पण त्यामागील मुळ कारण प्रकाशसंश्लेषणाचे प्रमाण वाढवणे आहे. ज्या प्रकारे पाने उगवतात त्यांचा सुर्य प्रकाशाशी संपर्क वाढतो आणि पर्यायाने प्रकाशसंश्लेषणही जास्त प्रमाणात होते. निसर्गकर्त्याने वनस्पतींमधील ही विविधता त्यांच्या सोयीसाठी केलेली आहे, यासोबतच माणूस आपल्या सोयीनुसार त्यांचा उपयोग करू शकतो ही निसर्गकर्त्याची माणसांसाठी फार मोठी देणगी आणि कृपा आहे.

(क्रमशः)


- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget