मुंबई
अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे जोरदार आवाहन केले आहे. ज्यामुळे आपल्या समाजात, विशेषत: तरुणांमध्ये हाहाकार माजला आहे.
मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आहे. ते म्हणाले की शिक्षण संस्थांनी अंमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामध्ये व्यापक जागरूकता कार्यक्रमांचा समावेश असावा, ज्याद्वारे मुले आणि तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल शिक्षित केले जाईल, जे व्यसन बऱ्याचदा लहान वयात सुरू होते. आपली मुले आणि तरुण लहान वयातच अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. हे एक संकट आहे ज्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांनी त्वरित आणि सातत्यपूर्ण हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
मौलाना इलियास खान फलाही यांनी पोलिसांना अंमली पदार्थांची तस्करी आणि वितरण नेटवर्कवर कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहन केले. या लढाईत पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या समुदायांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे जाळे नष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी सतर्क आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.
अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी पालकांची अपरिहार्य भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. मौलाना फलाही म्हणाले, “पालकांनी आपल्या मुलांच्या आयुष्यात सावध आणि व्यस्त राहावे. आपल्या मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी मुक्त संवाद, अंमली पदार्थांच्या धोक्यांविषयी शिक्षण आणि घरातील पोषक वातावरण प्रदान करणे आवश्यक आहे.”
इस्लामी विद्वान, मशिदींचे इमाम, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि प्रसारमाध्यमांनी अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सामाजिक चळवळ सक्रियपणे पुढे नेण्याचे आवाहन मौलाना इलियास फलाही यांनी केले. समाजात जनजागृती आणि प्रबोधन करण्यात इस्लामी विद्वान आणि इमामांची महत्त्वाची भूमिका आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी यांनी एकत्र येऊन भक्कम सपोर्ट सिस्टीम तयार केली पाहिजे आणि माध्यमांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले पाहिजे आणि सकारात्मक संदेशांना प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करीविरोधी आंतरराष्ट्रीय दिनासारखे दिवस पाळणे पुरेसे नाही, यावर त्यांनी भर दिला. मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, “हा दिवस साजरा करणे महत्वाचे असले तरी आपल्याला सातत्यपूर्ण, ठोस कृतीची गरज आहे. अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन एक मजबूत, एकसंध आघाडी उभी केली पाहिजे. सामूहिक, सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच आपण आपल्या समाजातून हा धोका दूर करू शकतो.”
Post a Comment