Halloween Costume ideas 2015

मुख्यमंत्री ठाकरे जाणार बिनविरोध विधान परिषदेवर!

Uddhav Thakare
मुंबई
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसने दोन जागा लढवण्याचा हट्ट सोडून दुसऱ्या जागेवरील उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध विधान परिषदेवर निवडूण जाणार आहेत.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने परस्पर दोन उमेदवार जाहीर केल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.  ही निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर आपण निवडणूकच लढवणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे आघाडीत पेच निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने विधान परिषदेची एकच जागा लढवण्याची तयारी दर्शवल्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला पेच सुटला आहे. याबाबत आज तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक झाली. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर काँग्रेसने हा निर्णय जाहीर केला.

पुरेसे संख्याबळ नसतानाही विधान परिषदेच्या दोन जागा लढवण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत राजकीय पेच निर्माण झाला होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बिनविरोधच विधान परिषदेवर जावेत, यासाठी शिवसेना प्रयत्नशील होती. त्यातच काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले होते.  राज्यावर कोरोनाचे संकट असल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणे महत्वाचे आहे, असा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही आग्रह होता. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशीच इच्छा होती.

२१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या संख्याबळानुसार उमेदवार जाहीर केले तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. भाजपने आपल्या संख्याबळानुसार ४ तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या संख्याबळानुसार प्रत्येकी २ उमेदवार जाहीर केले. काँग्रेसने मात्र एकऐवजी २ उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता मतदान घेतले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर काँग्रेसने विधान परिषदेची एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या जागांचा तिढा सुटला असून विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी सर्वांनी मुंबईत येणे उचित नव्हते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह धरला होता. संपूर्ण परिस्थितीचा विचार करता काँग्रेस विधान परिषदेची एकच जागा लढवणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget