Halloween Costume ideas 2015

आपल्याला घृणेच्या विषाची नाही तर प्रेमाच्या सुगंधाची गरज आहे

पृथ्वीवर जेव्हा कोरोना व्हायरसचा हल्ला झाला तेव्हा सगळ्यांना अशी आशा होती की, या अदृश्य शत्रुशी लढणे हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असेल अणि ही लढाई वंश, धर्माच्या भींतीच्या वर उठून लढली जाईल. परंतु हे दुःखद आहे की, भारतातील स्थिती एवढी वाईट झाली की, संयुक्त राष्ट्र संघाला सुद्धा म्हणावे लागले की, या वैश्‍विक आपदेच्या वेळी वंश आणि धर्माची कुठलीही भूमिका नसावी. त्यानंतर कुठे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस हा जाती आणि धर्मांच्या भींतीला पाहत नाही आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही सांगितले की, काही लोकांच्या चुकीसाठी सगळया समुदायाला दोषी धरले जाऊ नये. या दोघांचे मत येईपर्यंत जे काही नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले होते.
    भारतात सर्वात अगोदर तबलिगी जमाअतवर निशाना लावण्यात आला. या संस्थेच्या काही गंभीर चुकींना कोरोनाच्या प्रसारासाठी जबाबदार धरण्यात आले. एवढेच नव्हे तर अनेक प्रकारे या संदर्भात खोट्या गोष्टींचा प्रचार करण्यात आला. असेही म्हटले गेले की, जमाअतचे सदस्य डॉक्टर आणि परिचारीकांच्या सोबत दुर्व्यवहार करत आहेत, कोरोना पसरविण्यासाठी भाजीपाला आणि फळांवर थुंकत आहेत. जातीयवादी तत्वांचे एवढ्यावरच समाधान लाभले नाही तेव्हा त्यांनी मुस्लिम व्यापार्‍यांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले आणि अवासीय परिसरांमधील भाजीपाला विकणार्‍या गाडेवाल्यांवर प्रतिबंध लावला.
    एका अन्य घटनेमध्ये मुंबईच्या बांध्रा स्टेशनवर हजारो लोकांची गर्दी एकत्री झाली होती. याचे कारण एक अफवा होती की काही रेल्वे गाड्या तेथून रवाना होणार आहेत. ज्या त्यांना त्यांच्या गावी पोहोचवतील. संयोगाने हे स्टेशन आणि मस्जीद जवळ-जवळ आहे. याचा लाभ उचलत गोदी मीडियाने या घटनेचे जातीयकरण करून टाकले. यामुळे वातावरणात आधीच असलेले घृणेचे रंग अधिकच गडद झाले.
    तीसरी मोठी घटना पालघर महाराष्ट्रातील होती. ज्या ठिकाणी दोन साधूंना त्यांच्या ड्रायव्हरसहित मुलं चोरणार्‍या टोळीचे सदस्य समजनू जीवंत मारण्यात आले. मीडियाने सुरूवातीला हे कामही मुस्लिमांनीच केले असे ठोकून दिले. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीने आकाश, पाताळ एक करून टाकले. त्यांनी एक पाऊल पुढे जावून या घटनेमुळे सोनिया गांधी अत्यंत आनंदी झाल्या असतील यासह अनेक आक्षेपार्ह विधाने श्रीमती गांधी यांच्याविरोधात केली. गोस्वामी यांना या आगाउपणाबद्दल  कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागत आहे ही गोष्ट अलाहिदा.
    देशात ज्या प्रमाणे मुसलमानांपासून दूर राहून त्यांचा बहिष्कार करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत, त्यावरून जर्मनीमध्ये यहूदी व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकण्याचे हिटलरचे आव्हान आठवणे स्वाभाविक आहे. या आवाहनानंतर जर्मनीमध्ये फायनल सोल्युशनची घोषणा दिली गेली होती. आपल्या समाजामध्ये मुस्लिम आणि काही प्रमाणात ख्रिश्‍चनांच्या बाबतीत वेगवेगळे मिथक आणि पूर्वाग्रह भरपूर प्रमाणात पसरलेले आहेत. या समुदायांच्या विरूद्ध घृणा फैलावणारी एक मोठी शक्ती देशात सक्रीय आहे. ही शक्ती मागच्या काही वर्षांमध्ये अधिक मजबूत झालेली आहे. या विचारांची मूळं खोलपर्यंत रूजली आहेत. आणि ती रूजविण्यासाठी जातीयवादी तत्वांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. या सर्व गोष्टी असतांना सुद्धा आपल्यासाठी ही कल्पना करनेही अवघड होते की, कोविड 19 सारख्या मानवी त्रासदीचा उपयोग सुद्धा विभाजनकारी रेषांना अधिक गडद करण्यासाठी केला जावू शकेल.
    हिंदू विचारधारेमध्ये अकंठ बुडालेल्या हजारो प्रशिक्षित लोकांच्या एका विशाल सेनेनी मुस्लिामांची नकारात्मक प्रतीमा तयार करण्यासाठी त्यांच्या बद्दलचे समाजात असलेल्या पूर्वाग्रहांचा भरपूर प्रचार आणि प्रसार केला. या सेनेने समाजातील प्रत्येक वर्गामध्ये आपले स्थान पक्के केलेले आहे. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात आणि जयप्रकाश नारायण यांच्या संरक्षणात तयार झालेली जनता पार्टी सरकारमध्ये भाजपाचा पूर्व अवतार असलेल्या जनसंघाला सामील करून घेतल्यानंतर बाबरी मस्जिदीचे विध्वंसक लालकृष्ण आडवाणी यांना केंद्रीय सूचना आणि प्रसारणमंत्र्यांची जबाबदारी दिली गेली होती. तेव्हापासून मीडियामध्ये सांप्रदायिक तत्वांची चलती सुरू झालेली आहे.
    शाहबानो खटल्यामध्ये मुस्लिम नेतृत्वाच्या एका गटाच्या जिद्दीने या प्रश्‍नाला किचकट बनवून टाकले होते. त्यानंतर तर जातीयवाद्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. देशातील मध्ययुगीन इतिहासाची मोडतोड करून त्याचा उपयोग आजच्या मुस्लिमांच्या दानवीकरणासाठी केला गेला. त्यानंतर लव्ह जिहाद, घर वापसी, गाय सारखे मुद्दे उचलून मुस्लिमांच्या विरोधात घृणा पसरविण्यात आली. त्यामुळे त्यांच्या विरूद्धच्या हिंसेचा ग्राफ आणखीन उंचावला. मुसलमान आपल्या मोहल्ल्यांमध्ये आणखीन संकुचित झाले. त्यांच्यात वाढत्या असुरक्षिततेच्या भावनेने त्यांना अलगदपणे मौलानांच्या मांडीवर नेऊन बसविले. या मौलानांनी इस्लामची संकिर्ण आणि पुरआनपंथी व्याख्या करणे सुर केले. त्यामुळे गोदी मीडियाला संपूर्ण मुस्लिम समुदायाला बदनाम करण्याची पुन्हा संधी मिळाली. जे मुसलमान इस्लामच्या खर्‍या शिकवणीबाबत बोलत होते, जे मुसलमान मानवीय मुल्यांचे समर्थक होते,जे मुसलमान उदारवादी होते, त्यांची आवाज या गोंगाटामध्ये दबून गेली.
    मग आला सोशल मीडिया, ट्रोल आर्मी आणि फेक न्यूज. आज मुस्लिमांच्याविरूद्ध घृणा पसरविणे यामुळे सोपे झाले की, त्यांच्या संदर्भात अनेक पूर्वग्रह अगोदरपासूनच जनतेच्या डोक्यामध्ये भरलेले होते. याच पृष्ठभूमीवर काही मुस्लिम बुद्धीजीवी लोकांनी एकत्रित येऊन एका थिंक टँकची स्थापना केली आहे. ज्याचे नाव ’इंडियन मुस्लिम्स फॉर प्रोग्रेस अँड रिफॉर्म’ असे आहे. याचे सदस्य एकाच वेळेस अनेक स्तरावर काम करण्याचे निश्‍चत करून पुढे आले आहेत. आपण केवळ आशा करू शकतो की, हे लोक या समुदायाला सुधारणेच्या दिशेकडे घेऊन जातील आणि मुस्लिम युवकांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यामध्ये मदत करतील. सोबतच ते मीडियाद्वारे मुस्लिमांच्या केल्या जाणार्‍या दानवीकरणाचा यशस्वी प्रतिवाद देखील करतील.
    आम्ही त्यांच्याकडे अनुरोध करतो की, समाजात पसरलेल्या घृणेच्या पायावरही त्यांनी प्रहार करावेत. या संदर्भात डॉ. असगरअली इंजिनियर, के.एन. पणीक्कर आणि अनेक इतिहासकार ज्यांना साम्यवादी इतिहासकार म्हटले जाते, या लोकांनी अत्यंत उपयोगी काम केलेले आहे. त्यांनी इतिहासाच्या वैज्ञानिक आणि तार्किक अध्ययनावर जोर दिलेला आहे. त्या इतिहासावर जो इतिहास विविधतेचा उत्सव साजरा करतो. त्यांना गांधींचे विचार आणि कार्य याकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आम्हाला ही गोष्ट विसरता येणार नाही की, गांधीजींनी या देशात आंतरसामुदायिक नात्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द मोठ्या प्रमाणात प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या कामामध्ये जवाहरलाल नेहरूंचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि त्यावर आधारित भारत एक खोज नामक टीव्ही सिरियलही उपयोगी सिद्ध होऊ शकेल. ़जरा आणखीन मागे गेल्यावर भक्ती चळवळ (कबीर, तुकाराम, नर्सी मेहता इत्यादी.) आणि सुफी चळवळ (निजामुद्दीन अवलिया, खाजा मोईनुद्दीन चिश्ती रहे. इत्यादी) संतांकडून प्रेरणा गृहण करू शकतात. ज्यांनी संयुक्त धार्मिक परंपरांना मोठे बळ दिले होते.
    या थिंक टँकला देशातील त्या संघटनांचीही मदत घ्यावी लागेल जे या दिशेमध्ये काम करत आहेत. बंधुत्वाच्या भावनेला वृद्धींगत केल्याशिवाय आपल्या देशात लोकशाही जीवंत राहू शकत नाही. आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवावे लागेल की, जर अल्पसंख्यांकांचे दानवीकरण रोखले गेले नाही तर ही घृणा आपल्याला एक दिवस अशा हिंसेच्या ज्वालामुखीमध्ये ढकलून देईल ज्याची झळ आपल्या सर्वांना बसल्याशिवाय राहणार नाही.

- राम पुनियानी
    (इंग्रजीचे हिंदी भाषांतर अमरिश हरदेनिया, हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख).

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget