Halloween Costume ideas 2015

बॉईज लॉकर रूमने दिल्लीकर हादरले

दिल्ली
इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर दिल्लीच्या पॉश इलाक्यामध्ये राहणार्‍या काही तरूणांनी बॉईज लॉकर रूम नावाने एक ग्रुप बनविला. ही सर्व मुले उच्चभ्रू व श्रीमंत घरातील व मोठ्या महागड्या शाळांमध्ये शिकणार्‍यांची आहेत. विशेष म्हणजे ही सर्व मुलं हायस्कूल स्तराची आहेत. या ग्रुपमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात असलेल्या-नसलेल्या तरूण मुलींचे अश्‍लील फोटो टाकण्यास सुरूवात केली.
    एवढ्यावरच हे थांबले असते तरी कदाचित बोबाटा झाला नसता. परंतु, त्यातील काही मुलांनी मुलींवर बलात्कार कसे करावेत, त्याचे तंत्र एकमेकांना शिकविण्यास सुरूवात केली. तसेच काही मुलींना आपण पटवून आणू शकतो व त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करू शकतो, अशाही पोस्ट शेअर करण्यात आल्या. याच ग्रुपमधील एका मुलाला हे आवडलं नाही आणि त्याने या संबंधाची तक्रार केली. आणि प्रकरण दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचले. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने जेव्हा या ग्रुपची झाडाझडती घेतली तेव्हा ते अवाक झाले. अतिशय कोवळ्या वयातील माध्यमिक शाळेत शिकणार्‍या मुलांकडून अशा वर्तणुकीची त्यांना अपेक्षा नव्हती. त्यातील एका मुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले. सर्व मुले जिवेनाईल म्हणजे अल्पवयीन असून दिल्ली पोलीस या प्रकरणावरून गांगारून गेले आहे. या ग्रुपचा जेव्हा बोभाटा झाला तेव्हा संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. परंतु, यात संतापण्याचे आणि आश्‍चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणार्‍या महिला या गृहिणी बनण्यापेक्षा नोकरीला जास्त महत्व देताना दिसून येतात. जॉब करण्याची क्रेज या उच्चभ्रू गटामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे त्यांची पीढि संस्कारहीन झाली आहे, यात आश्‍चर्य ते कोणते.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget