असे म्हटले जाते की प्रत्येक वस्तुची चांगली व वाईट बाजू असते. अशाच प्रकारे एकीकडे कोरोनामुळे जीवनचक्राची गती थंडावली, जगाची अर्थव्यवस्था मंस्रfवली, लोकांना आपल्या प्रियजनांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास भाग पाळले, शॉपिंग मॉल व मनोरंजन केंद्रे बंद होऊन लोकांच्या मनोरंजनाचा खात्मा झाला, लोक एकांतवासी झाले. पण वाऱ्याच्या गतीने भरारी घेणाऱ्या जगाच्या इंजिनमध्ये बिघाड करून सदैव कामात व्यस्त असणाऱ्या लोकांना फुरसतीचे काही दिवस या कोरोनाने देऊ केले हे तितकेच खरे!
जगभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्त लोकांची संख्या ५८,२१,०७७ पेक्षा अधिक झालेली आहे आणि ३,५८,१०४ लोक मृत्युमुखी पडले, सोबतच एका जागतिक संघटनेच्या रिपोर्टनुसार लॉकडॉनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ५ हज़ार अब्ज डॉलरचा तोटा होण्याची शक्यता आहे. पण कोरोनामुळे जलदगतीने धवणाऱ्या या मशीनी युगात जेव्हा लॉकडॉन लागला तेव्हा मानवाला बसून विचार करण्याचा वेळ मिळाला की तो कुठे उभा आहे? त्याचा काय चुकत आहे व त्याच्या जीवनाचे ध्येय काय आहे?
कोरोनासमोर जगाच्या मोठमोठ्या महाशक्तींनी गुडघे टेकले, पण दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर कित्येक वर्षांपासून जगातील सर्वच देश विचारमंथन करीत आहेत, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बैठकींचे आयोजनही केले जात होते, पण ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण आणण्याकरिता कोणतेही देश स्वतःहून आपल्या ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत कारवाया कमी करण्यास तयार नव्हते. मग काय निसर्गाने स्वतःच कोरोनाच्या मदतीने आपले समतोल व्यवस्थित ठेवण्याकरिता सर्वच देशांची (ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत कामे) एकदमच कमी करून टाकली.
कोरोनाने आम्हाला नेहमी हात धुण्याचे व स्वच्छता ठेवण्याचे शिकविले. अमेरिकेच्या ‘सेंटर फ़ॉर डिसीज् कंट्रोल अँड प्रिवेंशन' या संस्थेनुसार कोणतेही विषाणू व वायरस हातांच्या माध्यमातूनच अधिक प्रमाणात शरीरात प्रवेश करतात, म्हणूनच नेहमी हात धुतलेले बरे. कोरोनाने आम्हाला फावल्या वेळेचा सदुपयोगही शिकविला, लॉकडाऊनात घरी बसून चित्रकला, गायन, पुस्तक वाचन इत्यादी छंद जोपसण्यास वेळ मिळाला. कोरोनामुळे घरची सर्व मंडळी एकत्र आली. गप्पागोष्टी रंगल्या, एकमेकांची काळजी घेतली जाऊ लागली. घरातील वृद्धांजवळ बसायला वेळ मिळाला. कोरोनामुळेच नातेवाईकांत जिव्हाळा निर्माण झाला. या कोरोनानेच आम्हाला मानवजातीवर प्रेम करायचे व सर्वांची काळजी घेण्याचे शिकविले.
कोरोनाने आम्हाला शिकविले की सोशल डिस्टन्सिंग का आवयश्क आहे? आम्ही आज समजलो की कितीही जमाव असला तरी लाइनीत सर्व काही व्यवस्थित व शांततेत चालतो. मानवाने प्रगती केली व तो निसर्गापासून दूर होत गेला, जसे विमानाच्या मदतीने वाऱ्यावर मात करीत वायुप्रदूषणात कोणतीच उणीव बाकी सोडली नाही, तर समुद्रात जहाज चालविण्याची संधी मिळताच त्याने जलप्रदूषणच्या माध्यमातून पाण्यातील सजीवांच्या जीवाशी खेळने सुरु केले. पण आज कोरोनामुळे परिस्थिती वेगळी झालेली आहे. जगातील जंगलांमधील मोठमोठ्या प्राण्यांना आपल्या जेरीस आणणारा हा मानव आज कोरोना नावाच्या एका लहानशा अदृश्य जंतूने हैरान झालेला आहे. पण याच कोरोनाने आम्हाला शिकविले की वायुप्रदूषण व जलप्रदूषणापासून मुक्ती कशी मिळविता येते. गंगा, यमुना व अन्य नद्यांचे प्रदूषण हजारो कोटी रुपये खर्चून थांबविता आले नाही ते काम लॉकडाऊनमुळे शक्य झाले. कारखाने व वाहन बंद असल्याने जलप्रदूषण व वायुप्रदूषण थांबले आणि वातावरण स्वच्छ व सुंदर झाले. कोरोनाने शिकविले की फक्त अत्यावश्यक कामे वगळता घरीच थांबून रस्ते दुर्घटनांचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
शेवटी एवढेच प्रार्थना की, कोरोनापासून जगाची लवकर सुटका होवो, पण कोरोनाने जे शिकविले ते कायम आमच्या आचरनात राहावे.
-शेख साबेरोद्दीन नूरोद्दीन
सहशिक्षक, ईबीकेउवि, टेंभुर्णी, जि. जालना
मो.: ९४२१३२७०३४
Post a Comment