Halloween Costume ideas 2015

3 भारतीय छायाचित्रकारांना जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकनासाठी पुलित्झर

नवी दिल्ली
भारताच्या 3 छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. हे तिघेही छायाचित्रकार जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यानंतरची स्थिती स्वतःच्या कॅमेऱयाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यासीन डार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद यांना हा जागतिक पुरस्कार मिळाला आहे. हे तिघेही जण असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेसाठी काम करतात.

यासिन आणि मुख्तार हे श्रीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. तर आनंद हे जम्मू जिल्हय़ाचे रहिवासी आहेत. चन्नू आनंद मागील 20 वर्षांपासून एपीशी संलग्न आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल विश्वासच बसत नसल्याचे उद्गार आनंद यांनी काढले आहेत. सोमवारी रात्री उशिरा या पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली आहे. या तिघांनीही खोऱयातील सामान्य जनजीवनासह निदर्शक तसेच सुरक्षादलांची छायाचित्रे जगापर्यंत पोहोचविली होती.

न्यूयॉर्क टाईम्स, एंकरेज डेली न्यूज, प्रो पब्लिका यांनाही पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अमेरिकेतील भ्रष्टाचार, कायदा अंमलबजावणी, लैंगिक हिंसाचार आणि वर्णभेद यासारख्या विषयांवरील वृत्त अहवालासाठी हे पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सला तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

याचबरोबर द न्यू यॉर्कर, द वॉशिंग्टन पोस्ट, असोसिएटेड प्रेस, द लॉस एंजिलिस टाईम्स, द बाल्टिमोर सन, द पॅलेस्टाईन हेराल्ड प्रेस यांना विविध वृत्तांसाठी पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे मागील महिन्यात संचालक मंडळाने पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा स्थगित केली होती.

पुलित्झर पुरस्काराचा प्रारंभ 1917 मध्ये झाला होता. वृत्तपत्रीय पत्रकारिता, साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱयांना हा पुरस्कार देण्यात येतो. मागील वर्षी हा पुरस्कार न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नलला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित माहिती जगासमोर आणण्यासाठी देण्यात आला होता.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget