Halloween Costume ideas 2015

रमजान, चंद्रकोर आणि गैरसमज

Moon Phase
मशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रकोरीच्या उपयोग केला जातो. पहिली चंद्रकोर पाहूनच रमजानचे रोजे सुरु होतात आणि त्यानंतर येणार्‍या ’शवाल’ या अरबी महिन्याच्या सुरुवातीला चंद्रकोर पाहूनच रमजानची सांगता होते आणि दुसर्‍या दिवशी ईद साजरी केली जाते. अशाप्रकारे ही चंद्रकोर एकप्रकारे नैसर्गिक कॅलेंडरच आहे. कुरआनात  याविषयी म्हटले आहे -
”तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्‍चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. ” - कुरआन  (10:5)
या श्‍लोकात वाढत्या आणि कमी होणार्‍या चंद्रकला या फक्त तारखा निश्‍चित करण्यासाठीच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. यापेक्षा जास्त चंद्राचे महत्व इस्लाम धर्मात नाही.
मशीद, मदरसा किंवा मुस्लिमांची लग्न पत्रिकेवर बहुतेकवेळा चंद्रकोर काढलेली असते. काही मुस्लिमबहुल देशांच्या राष्ट्रध्वजावरही चंद्रकोर काढलेली असते. त्यामुळे आमच्या बर्‍याच मुस्लिमेतर बांधवांचा असा गैरसमज होतो कि, मुसलमान हे चंद्राची पूजा करत असतात.
मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सण 1924 पर्यंत मुसलमानांची एक वैश्‍विक सत्ता होती, त्याचे मुख्यालय तुर्कस्थानातील इस्तंबूल होते. तेथील खलिफा हा जगातील समस्त मुस्लिमांचा खलिफा गृहीत धरला जात होता. त्या उस्मानी खिलाफत (राज्य प्रणाली)च्या ध्वजावर हिलाल (चंद्रकोर) होती. तेव्हापासून मुस्लिमांचे एक सांस्कृतिक चिन्ह चंद्रकोर बनले. अशाप्रकारे यामागे ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. परंतु याला काहीही धार्मिक आधार मुळीच नाही. चंद्र एक उपग्रह असून तो आपले काहीही बरे वाईट करू शकत नाही, तो पूज्य अजिबात नाहीये, ही समस्त मुस्लिमांची धारणा आहे, इस्लामचीही तीच भूमिका आहे. फक्त मुस्लिम समाज सौर कालगणना (सोलर केलेंडर) ऐवजी  ”चांद्र कालगणना (लुनार केलेंडर)” नुसार आपले धार्मिक सण उत्सव साजरा करत असतो आणि ही कालगणना चंद्रावर अवलंबून असते.
चंद्र कालगणनेनुसार वर्ष हे 365 ऐवजी 355 किंवा 354 दिवसांचेच असते. त्यामुळे सौर कॅलेंडरच्या वर्षाच्या तुलनेत ते दरवर्षी दहा -दहा दिवस मागे मागे येत असते. त्यामुळे पूर्ण 36 वर्षात रमजान हा महिना पूर्ण इंग्रजी वर्षात फिरत असतो. त्यामुळे रमजान हा एखाद्या देशात कधी कडक उन्हाळ्यात तर कधी थंड हिवाळ्यात तर कधी ओल्या पावसाळ्यात येतो. त्यामुळे प्रत्येक देशाच्या नागरिकांना नेहमीच एकाच ऋतूत रोजे ठेवण्याची पाळी येत नाही. सौर कॅलेंडरनुसार जर रोजे ठेवले गेले असते तर काही विशिष्ट देशांना भर उन्हाळ्यात दर वर्षी रोजे ठेवावे लागले असते. पण चंद्र कालगणनेचा हा नैसर्गिक फायदा रोजेधारकांना होतो.
अशाप्रकारे निसर्गनियमांवर आधारित इस्लाम धर्म हा निसर्ग नियमांचे पालन करण्याचे एकप्रकारे संकेत देतो. कारण इस्लाम हा नैसर्गिक धर्म आहे. रमजानमधील आकाशातील चंद्रकोर जणू स्मित हास्य करत हेच सांगत असते.

   - नौशाद उस्मान, औरंगाबाद

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget