Halloween Costume ideas 2015

सौंदर्य आणि मेकअपसंबंधी दृष्टीकोण

इस्लामने प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्वाचा संबंध धर्म आणि ईशपरायणतेशी जोडला आहे. ”वास्तविकत: अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वांत जास्त ईशपरायण आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (दिव्य कुरआन, 49-13). इस्लामच्या दृष्टीने सौंदर्य ही काही अशी वस्तू नाही जिचा मोठेपणा आणि श्रेष्ठत्व याशी संबंध असावा. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले.
    ”स्त्रीशी विवाह चार कारणांसाठी केला जातो - धनसंपत्ती, वंश, सौंदर्य आणि धर्म. तर तुम्ही त्या स्त्रीशी विवाह करा जी धर्माच्या बाबतीत सर्वात उत्कृष्ठ आहे.” (हदीस : बुखारी, मुस्लिम).
सौंदर्य ही अल्लाहची देणगी आहे आणि अल्लाहने जे काही दिले आहे त्यावर संतुष्ट राहणे आवश्यक आहे, ”जेव्हा तुम्ही अशा माणसाला पाहता ज्याला धनसंपत्ती आणि सौंदर्य तुमच्यापेक्षा अधिक दिले गेले आहे, तर तुम्ही अशा लोकांकडे पाहा ज्यांना तुमच्यापेक्षा कमी दिले गेले आहे.” (हदीस : मुस्लिम)
    इस्लामने स्त्रियांना साज-शृंगार करण्यास परवानगी दिली आहे, परंतु खालील अटीवर -
1) साज-शृंगार फक्त पतीसाठी असावा - स्त्रीचे शृंगार करणे फक्त तिच्या पतीसाठी असावे. कोणी असा ज्याच्याशी लग्नसंबंध होऊ शकतात, अशासाठी साज-शृंगार करणे निषिद्ध आहे. साज-शृंगार करून आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करणे, पवित्र कुरआनने अज्ञातकाळाचे मूर्ख कर्म म्हटले आहे आणि त्याची निंदा केली आहे - ”गत अज्ञानमूलक काळाप्रमाणे शृंगाराचे प्रदर्शन करीत फिरू नका.” (दिव्य कुरआन, 33:33).
    2) शृंगार करीत असताना आपल्या मूळ रूपास लपविण्यासाठी कृत्रिम साधणे वापरणे योग्य नाही. आपली नैसर्गिक बनावट आणि ओळख बदलणे अनुचित आहे -
” मी (सैतान) त्यांना बहकवीन, मोहपाशात अडकवीन व मी त्यांना आदेश देईन व ते माझ्या आज्ञेने जनावरांचे कान चिरतील व मी त्यांना आज्ञा करीन व ते माझ्या आज्ञेने अल्लाहच्या रचनेत फेरबदल करतील. त्या शैतानाला ज्याने अल्लाहऐवजी आपला वाली व पालक बनविला तो उघडपणे तोट्यात आला.” (दिव्य कुरआन, 4:119).
    ” सौंदर्यासाी गोंदून घेणार्‍यांना, गोंदण्याचे काम करणार्‍यांना, चेहर्‍यावरील केस खेचून काढणार्‍यांना आणि दातांमध्ये फटी करणार्‍यांना आणि अल्लाहची रचना बदलणार्‍यांना अल्लाहने शाप दिला आहे.” (हदीस : बुखारी).
    अल्लाहने केसात नकली केस लावणार्‍यांना आणि लावण्याचे काम करणार्‍यांना शाप दिला आहे. (हदीस: बुखारी).
    अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कृत्रिम केस लावण्यास धोका ठरविले आहे आणि म्हटले आहे,
    ” जेव्हा त्यांच्या स्त्रियांनी हे असे करणे सुरू केले तेव्हा बनीइस्त्राइल नष्ट झाला.” (दिव्य कुरआन, 4:29)
    या सिद्धान्ताच्या आधारे धर्मशास्त्रज्ञांनी केवळ सौंदर्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करण्यास निषिद्ध ठरविले आहे. आंतरराष्ट्रीय इस्लामी धर्मशास्त्रज्ञांच्या अ‍ॅकॅडमीने मलेशियामध्ये आयोजित केलेल्या विश्‍व संमेलनात या विषयावर ठराव पास केला तो असा आहे. ” सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जाणार्‍या सर्जरीत चिकित्सक उपायाचा भाग नसेल आणि ज्यामुळे व्यक्तीची केवळ नैसर्गिक रचना बदलणे हेच उद्दिष्ट असेल तर उचित नाही.”
    इस्लामचे हे सिद्धान्त त्या आधारांना उद्ध्वस्त करतात, ज्यावर आपल्या वेळची विनाशकारी सौंदर्यप्रसाधन इंडस्ट्री कायम आहे आणि जिच्याद्वारा भांडवलदार स्त्रियांचे शोषण करू लागला आहे.
    साधे जीवन, उच्च विचार आणि उच्च चारित्र्य हे इस्लामी जीवन तत्वज्ञानाचे आधार आहेत. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,” साध्या जीवनशैलीत राहणे (माणसाच्या) श्रद्धेचा भाग आहे.” (हदीस : अबु दाऊद)
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हेसुद्धा सांगितले -
    ” ऐहिक भोगविलासची सामग्री माझ्यासाठी नाही. मी एका प्रवाशासारखा आहे, जो विश्रांतीसाइी थोडा वेळ झाडाच्या सावलीत थांबला आहे, मग तो चालू लागतो.” (हदीस : सुनन तिर्मिजी).
    जाबिर (रजि.) यांचे कथन आहे, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ” एक बिछाना पतीसाठी, एक पत्नीसाठी, एक अतिथीसाठी आणि चौथा बिछाना सैतानाचा असेल.” (हदीस : बुधारी).
    या हदीसचा अभिप्राय हा आहे की आवश्यकतेपेक्षा अधिक जमा करणे उधळपट्टी आहे, जे एक सैतानी कर्म आहे.
    इस्लामने साधनासमुग्रीच्या उपयोगाचा मध्यममार्ग स्वीकारला आहे आणि जरूरीपेक्षा अधिक सामुग्रीला गरीबांमध्ये वाटून टाकण्याचा आदेश दिला आहे.
    ” आणि खा, प्या परंतु मर्यादांचे उल्लंघन करू नका. अल्लाह मर्यादेच्या बाहेर जाणार्‍यांना पसंत करीत नाही.” (दिव्य कुरआन, 7:31).
    जर अधिक साधनसामुग्री उपलब्ध असेल तर पवित्र कुरआन तिच्या उधळपट्टीऐवजी गरजवंतांवर खर्च करण्याचा आदेश देतो -
    ” नातेवाईकाला त्याचा हक्क द्या आणि गरीब व वाटसरूला त्याचा हक्क. वायफळ खर्च करू नका. वायफळ खर्च करणारे सैतानाचे बंधु होत. आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.” (दिव्य कुरआन, 17:26-27).
    ” ते तुम्हाला विचारतात की काय खर्च करावा? सांगा की जे काही आवश्यकतेपेक्षा अधिक असेल.” (दिव्य कुरआन, 2:219).
    अल्लाहचे अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले.
” सैतानाचे काही उंट असतात आणि काही घरसुद्धा. सैतानांच्या उंटाना मी पाहिले आहे की तुमच्यापैकी एक मनुष्य काही स्वार नसलेले उंट घेऊन निघतो, ज्यांना त्याने खाऊ घालून घालून लठ्ठ केले आहे आणि त्यातील कोणत्याही उंटावर तोही स्वार होत नाही आणि आपल्या बंधुलाही स्वार होऊ देत नाही.” (हदीस : अबू दाऊद).
या शिकवणी असताना त्या तणावांची काही शक्यता नसते जे (तणाव) जीवनस्तर आणि भोगविलासामागे लागण्याच्या सवयी भांडवलशाही समाजाने आजच्या स्त्रियांमध्ये निर्माण केल्या आहेत. सच्चा मुस्लिमांना अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याचे आणि लोकांना फायदा पोहोचविण्याचे एक व्यसन लागलेले असते, तो कसा वायफळ खर्च आणि वायफळ खरेदीच्या व्यसनामध्ये अडकू शकतो.
    भांडवलशाही साम्राज्य आणि स्त्रिया या पुस्तकांमध्ये जे विचारमंथन करण्यात आले आहे. त्यातील सर्व मुद्यांवर समाजात चर्चा घडवून आणणे आवश्यक आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. शिवाय, यासह राज्याचीही जबाबदारी या पुस्तकात विशद केली आहे. ती अशी -
    1) स्त्रियांच्या काामची परिस्थिती आणि कामाच्या ठिकाणाची परिस्थिती व्यवस्थित करण्यासाठी कायदे केले पाहिजेत आणि त्या कायद्यांना सर्व कंपन्यांवर सक्तीने लागू केले पाहिजे. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना एकांत मिळाला पाहिजे आणि त्यांच्या नैसर्गिक गरजा आणि दुर्बलतेला पूर्ण सवलत असली पाहिजे.
    2) पोर्नोग्राफी, अश्‍लील साहित्य, वेबसाइट इत्यादींवर सक्त बंदी’ घातली पाहिजे. अशा वेबसाईटला ब्लॉक करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर फायरवॉल्सचा उपयोग केला पाहिजे. प्रसिद्धीमाध्यमांना यासंबंधी व्यवस्थित करण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आणि प्रेस काऊन्सिलसारख्या संस्थांना सक्रिय बनविले पाहिजे. या प्रकारचे उद्योग आणि त्यांच्या शेअर्सची विक्री, त्यासाठी बँकांकडून भांडवल देण्यास आणि जाहिराती इत्यादींवर बंदी घातली पाहिजे.
    3) कॉस्मेटिक्सच्या निरीक्षणासाठी ड्रग्ज अ‍ॅथॉरिटीसारख्या संस्था आणि कायदे बनविले पाहिजेत आणि या कायद्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून आयात केेलेल्या उत्पादनांवरसुद्धा सक्तीने लागू केले पाहिजे. याचप्रमाणे सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया इत्यादींवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासंबंधी कायदे बनविण्यासाठी विशेषज्ञ डॉक्टर आणि मानसशास्त्र विशेषज्ञांची समिती बनविली पाहिजे.
    4) जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे आणि अंमलबजावणी यंत्रणा बनविली पाहिजे. त्याचप्रमाणे रियालिटी शोजवर बंदी घातली पाहिजे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget