नवी दिल्ली
लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, भाविक आणि पर्यटकांना नेण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गाड्यांविषयी अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने रविवारी विशेष गाड्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला आहेत.
रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विशेष रेल्वे चालविण्यासंदर्भात राज्याने दिलेल्या प्रवाशांच्या संख्येनुसार ट्रेनची तिकिटे छापली जातील. राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रवासी तिकीट घेऊ शकतात. प्रवासी तिकिटाचे पैसे स्थानिक अधिकाऱ्याला देता येईल. स्थानिक अधिकारी प्रवाशांकडून आलेले प्रवाशी भाडे रेल्वेला देतील.
रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विशेष रेल्वे चालविण्यासंदर्भात राज्याने दिलेल्या प्रवाशांच्या संख्येनुसार ट्रेनची तिकिटे छापली जातील. राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रवासी तिकीट घेऊ शकतात. प्रवासी तिकिटाचे पैसे स्थानिक अधिकाऱ्याला देता येईल. स्थानिक अधिकारी प्रवाशांकडून आलेले प्रवाशी भाडे रेल्वेला देतील.
विशेष ट्रेनने कोणाला प्रवास करता येणार ?
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगितले आहे की लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, आणि पर्यटकांना देशब देशभरात प्रवास प्रवास करता येणार आहे. यासाठी या प्रवाशांना स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करावा लागणार आहे. तसेच प्रवाशांचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रवाश्याला निर्दिष्ट ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतरच तिकिट दिले जाईल.
प्रवासासाठी दिशानिर्देश
– सर्व प्रवाशांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल.
– रेल्वेने १२ तासापेक्षा जास्त प्रवास करणार्याना रेल्वेतर्फे एक वेळचे जेवण दिले जाईल.
– राज्य सरकारची परवानगी आणि तिकिट मिळाल्यानंतरच रेल्वेमध्ये प्रवास करता येणार. त्यानंतर प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येईल. स्क्रीनिंग झाल्यानंतरच प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
– प्रशासनाने ठराविक ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा प्रवाशांची तपासणी करेल.
– रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यात येईल.
दरम्यान, कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव देशात वाढतच आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूने देशात गंभीर परिस्थिती निर्माण केली असून, आतापर्यंत ३९ हजार ९८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ हजार ३०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १० हजार ३६६ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
Post a Comment